✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नारायण धारप यांच्या भयकथा !!!

क
किल्लेदार यांनी
Tue, 01/20/2015 - 11:55  ·  लेख
लेख
भयकथांचे जे भोक्ते आहेत त्यांना नारायण धारप हे नाव माहीत नाही असे होणार नाही. मराठीत जे मोजके भयकथाकार आहेत त्यात नारायण धारप हे पितामह ठरावेत. अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे धारपांचे वैशिष्ट्य. त्यांचीच "चंद्राची सावली " ही गोष्ट वाचतांना लहानपणी सर्वजण घरात असूनही अंगावर शहारे आले होते. स्वतः विज्ञानात पदवीधर असल्यामुळे त्यांची भीतीची मांडणीदेखील अतिशय शास्त्रोक्त अशी असावी. जवळपास सर्व पुस्तकात असलेला समान धागा म्हणजे चांगल्या शक्तींचा वाईटावर विजय. त्यामुळे भीतीदायक वातावरणनिर्मिती करूनही शेवटी एक दिलासा असायचा. स्टीफन किंग किंवा रस्किन बॉंड यांच्या भयकथा , रत्नाकर मतकरी आणि हिचकॉकच्या शेवटी "पंच" असलेल्या भयकथापण घाबरवून टाकणाऱ्या असल्या तरी धारपांची भुतावळ ही पोटात गोळा आणणारी होती. तर आज ही सत्य-नारायणाची आरती का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल :) तर ते म्हणजे कुठे ही पुस्तके ऑनलाइन वाचता येतील का हे इथे विचारायचे आहे. मिपावर बरेच भयकथाकार आहेत आणि त्यांना कदाचित याबद्दल माहिती असावी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
71041 वाचन

💬 प्रतिसाद (99)

प्रतिक्रिया

देवाज्ञा

किल्लेदार
Sun, 04/05/2020 - 05:11 नवीन
देवाज्ञा अजून मिळालं नाही. आउट ऑफ प्रिंट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

किंडलवर बरीच वर्षे मिळते आहे.

मनो
Sat, 08/19/2023 - 00:38 नवीन
किंडलवर बरीच वर्षे मिळते आहे. मी तिथूनच घेऊन वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

मी वाचनालयातून मिळवून वाचले

सौंदाळा
Wed, 09/06/2023 - 17:38 नवीन
मी वाचनालयातून मिळवून वाचले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

साठे फायकस...

किल्लेदार
Sun, 04/05/2020 - 05:09 नवीन
साठे फायकस ची जातकुळी वेगळी होती पण कथा मस्त होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धारपांच्या सर्वच विज्ञान

सस्नेह
Sun, 04/05/2020 - 12:01 नवीन
धारपांच्या सर्वच विज्ञान कथांची जातकुळी एकदम हटके असते. 'युगपुरुष' पासून ते 'अबक' पर्यंत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

ऑनलाईन किती वाचणार ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/21/2015 - 07:21 नवीन
धारपांच्या कथा वाचल्या आहेत. आत्ताच मला कुठल्या तरी पुस्तक प्रदर्शनात समन्वय प्रकाशन कोल्हापूर यांनी त्यांची बरीच पुस्तके नव्याने प्रकाशित केलेली दिसली आहेत. माझ्याकडे आता नारायण धारपांचं फक्त 'फरिस्ता' शिल्लक आहे, वाचायला घेऊन गेलेली पुस्तके अजून परतली नाहीत. धारपांच्या कथा वाचकांना खिळवून ठेवतात एवढं मात्र नक्की. वर्णनं मला आवडतात. बाकी, ऑनलाइन वाचण्यापेक्षा पुस्तक संग्रही असलं पाहिजे, कधीही वाटलं की वाचायला कोणत्याही पानावरुन सुरुवात करायची आणि पुस्तकात हरवून जायचं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लुचाइ

किल्लेदार
Wed, 01/21/2015 - 12:46 नवीन
त्यांचे सगळ्यात गाजलेले पुस्तक "लुचाई" होते का? ते वाचायची फार इच्छा आहे. एकदा दुकानात ४०० ला मिळत होते. गोष्ट वाचण्या-आधीच घाबरलो :). नंतर हिंमत करून गेलो पण पुस्तक मिळाले नाही.
  • Log in or register to post comments

लुचाई भन्नाट होतं.

प्रचेतस
Wed, 01/21/2015 - 12:49 नवीन
लुचाई भन्नाट होतं. ह्याशिवाय धारपांच्या कादंबर्‍यांची मुखपृष्ठं अतिशय कल्पक असत. वाचकाला घाबरवण्याची सुरुवात त्यापासूनच झालेली असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

"लुचाई"

अजिंक्य विश्वास
Wed, 04/27/2016 - 01:38 नवीन
"लुचाई" आऊट ऑफ प्रिन्ट आहे. शिवम प्रकाशनने काढले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

वाखु साठवतो.

जेपी
Wed, 01/21/2015 - 13:43 नवीन
वाखु साठवतो. रत्नाकर मतकरी यांची पुस्तके वाचलीत पण नारायण धारप यांची नाही. आता शोध घेतो.
  • Log in or register to post comments

धारपांचे प्रत्येक पुस्तक

निनाद मुक्काम …
गुरुवार, 01/22/2015 - 03:47 नवीन
धारपांचे प्रत्येक पुस्तक वाचनालयातून शोधून शोधून काढून वाचले आहे , पण त्यांच्या पुस्तकांचा संग्रह असावा अशी मनात इच्छा आली नि दर भारतभेटीत मी त्यांची व मतकरी ह्यांची पुस्तके विकत घेऊन येतो. बुकगंगा वर सवलतीत बहुतेक त्यांची पुस्तके मिळतील. मागे एकदा पुण्यात शुक्रवार पेठेत आभासी जगतातील मित्र मैत्रिणींचे स्नेह संमेलन भरले होते तेव्हा धारपांचा मी चाहता आहे हे सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या घराच्या समोरील प्रशस्त वाड्याकडे बोट दाखवत हे धारपांचे घर असे सांगताच मी क्षणभर थरारलो. परकीय कथा आपल्या मातीत कश्या रुजावायःच्या ह्याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे स्टीफन किंग च्या गाजलेल्या दोन जगप्रसिद्ध टेली मालिका इट व ग्रंडमा मूळ कथा धारपांच्या पुस्तकात वाचल्या असल्याने त्या प्रत्यक्ष पडद्यावर पाहण्यात मजा आली अवांतर महेश कोठारे ह्यांनी धारपांच्या कथा अनोळखी दिशा नावाच्या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर आणल्या , ते पाहून धारपांचे कट्टर चाहते हळहळले , डोक्याचे पार ......
  • Log in or register to post comments

धारप यांच्या भयकथांचे इन्स्पिरेशन ….

किल्लेदार
गुरुवार, 01/22/2015 - 10:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ओ तात्या, असे घाबरवणारे फोटो

सूड
Tue, 01/27/2015 - 18:57 नवीन
ओ तात्या, असे घाबरवणारे फोटो नका टाकत जाऊ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

ऑनलाइन पुस्तके....

किल्लेदार
Mon, 01/26/2015 - 20:05 नवीन
अरे अजुन कोणी ऑनलाइन पुस्तके वाचायला मिळतिल का हे बोलतच नाही.... *dash1*
  • Log in or register to post comments

पुस्तकाची किंमत फक्त किल्लेदार लोकांनाच परवडेल अशी असल्याने

सवंगडी
Tue, 01/27/2015 - 13:13 नवीन
हा 'किल्ल्या' मला कायम किल्ल्या मारत असतो की, "नारायण धारप वाच." मी म्हंटल ,"दे एखादं पुस्तक, तर म्हणतो कसा घे कि विकत…"! मुळात मला रत्नाकर मतकरी यांच्या भयकथा वाचायची सवय "किल्ल्या" मुळेच लागली. पण नारायण धारप यांची एक एक कथा अख्खं एक पुस्तक बेतवते. शिवाय पुस्तकाची किंमत फक्त किल्लेदार लोकांनाच परवडेल अशी असल्याने माझ्या सारखे सवंग गडी तिकडे फिरकत नाहीत. ( उदाहरणा दाखल सांगतो कि मी अच्युत गोडबोले यांचे 'अर्थात' पुस्तक ३ महिने पैसे जमवून घेतलं होतं.)
  • Log in or register to post comments

अहो ते वर एकानं लिहिलंय ना

काळा पहाड
Tue, 01/27/2015 - 13:31 नवीन
अहो ते वर एकानं लिहिलंय ना तसं टीळक स्मारक मंदीर समोर प्रदर्शनात ५० रुपयात एक अशी धारपांची पुस्तकं मिळतात. मी जवळ जवळ सर्व घेतली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सवंगडी

असं करा..

चौकटराजा
Tue, 01/27/2015 - 15:00 नवीन
पांढर्‍या रंगाने एक पंचकोनी चांदणीचे जमीनीवर रेखन करा. येती अमावस्येची रात्र निवडा. शिजवलेला भात, गुलाल ई पाची त्रिकोणात टाका. पंच महाभुते त्यामूळे तुमचे संरक्षण करतील. मध्यावरील पंचकोनात आसनस्थ व्हा.बरोबर बाराच्या ठोक्याला एक थंडगार वार्‍याचा उदगम खिडकीतून होईल. झाडाची पाने सळसळू लागतील. मग स्वस्त पुस्तके ....स्वस्त पुस्तके ,,,असा मंत्र म्हणायला सुरूवात करा. एकदम खोलीत काहीतरी हिरवे, ओंगळ , हिडीस दरवाजात उभे असलेले दिसेल. तो प्रकाशक असोशीशन अध्यक्ष बरं का? तुम्हाला केवळ त्रास देण्यासाठी आलाय वेळ साधून ... मंत्र चालूच ठेवा,,,,, विश्वाला तिरका छेद गेल्याचे कळून येईल. तो पाचव्याया मितीत शिरून तमच्याकडे चाल करून येईल . चांदणी भोवती पुस्तकांचा अक्राळ विक्राळ फेर तमच्या भोवती धरला जाईल.... त्यावर मराठी साहित्याची सखोल समीक्षा.... साहित्य आणि समाज एक चिकित्सक अभ्यास... काव्य आणि पर्यावरण यांचा परस्पर संबध - एक मागोवा असले काही कव्हस्र वर दिसेल.कुठेही न खपणारे ते जटील ग्रंथ तुमचा ग्रास घेण्यासाठी पुङे सरसावतील. शेवटी खिशातले नोटांचे पुडके त्या अभद्र प्रकाशकावर फेका......सारे काही शांत.....तुमच्या नोटा गायब.. समोर नारायण धारपांची सर्व पुस्तके रचलेली आढळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सवंगडी

(No subject)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 01/27/2015 - 19:44 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हा हा हा.........

किल्लेदार
Wed, 01/28/2015 - 16:41 नवीन
भयंकर !!!!!! अभद्र प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

समर्थांना बोलवायला हवं. बाकी

काळा पहाड
गुरुवार, 01/29/2015 - 09:42 नवीन
समर्थांना बोलवायला हवं. बाकी नारायण धारपांच्य मृत्यूनंतर त्यांचंच भूत झालं असेल तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

तर....

किल्लेदार
गुरुवार, 01/29/2015 - 18:19 नवीन
तर ते भूत अभद्र नक्कीच नसेल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

तुम्ही जीवनाची मूल्यं

काळा पहाड
गुरुवार, 01/29/2015 - 20:45 नवीन
तुम्ही जीवनाची मूल्यं मृत्यूनंतरच्या आस्तित्वाला चिकटवताय. हे असंच असतं का हा प्रश्न आहे. जीवनाबरोबर आठवणी आणि (पापपुण्याची) जाणीव सुद्धा संपत असावी. तसं असेल तर आत्मा हा एक शुद्ध उर्जेचा प्रकार असावा आणि मानवी जीवनाची मूल्यं त्याला कितपत लागू पडतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

ठ्ठो

बॅटमॅन
Sun, 02/01/2015 - 18:15 नवीन
ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आता चौरा यांच्याबद्दलच भीती

चौथा कोनाडा
Mon, 04/06/2020 - 17:46 नवीन
आता चौरा यांच्याबद्दलच भीती वाटायला लागलीय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

हा हा हा !!!

किल्लेदार
Mon, 04/06/2020 - 21:19 नवीन
चौरा यांची कशाला भीती? ते तर छान उपाय सांगताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

>>हा 'किल्ल्या' मला कायम

सूड
Tue, 01/27/2015 - 20:11 नवीन
>>हा 'किल्ल्या' मला कायम किल्ल्या मारत असतो की, "नारायण धारप वाच. मी म्हंटल ,"दे एखादं पुस्तक, तर म्हणतो कसा घे कि विकत…"!
असं करतात? आपण त्यांचं घर उन्हात बांधू हां!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सवंगडी

आमच्याकडे धारपांचि सर्व

palambar
Mon, 04/25/2016 - 23:44 नवीन
आमच्याकडे धारपांचि सर्व पुस्तके आहेत. बाजिराव रोड वर एक जण जुनि पुस्तके विकत असतात. सरस्वति मन्दिर पाशि, पण आता असतात कि नाहि ठाउक नाहि. भयकथा वाचायच्या अस्तिल तर चंद्रकांत आणि धनंजय सुद्धा चांगलि मासिके आहेत.
  • Log in or register to post comments

द्या की आम्हाला वाचायला

किल्लेदार
Fri, 04/29/2016 - 16:21 नवीन
द्या की आम्हाला वाचायला !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar

डेलीहंट

सुमीत भातखंडे
Tue, 04/26/2016 - 18:59 नवीन
डेलीहंट वर धारपांची बरीच पुस्तकं आहेत. काही काही अगदी ५ रुपयापासून उपलब्ध आहेत. माझी आवडती पुस्तकं: १) चेटकीण २) चंद्राची सावली ३) आनंद महल ४) दस्त ५) ४४० चंदनवाडी (नारायण धारपांचा पंखा) सुमीत भातखंडे
  • Log in or register to post comments

धारप माझे आवडते लेखक आहेत.

अजिंक्य विश्वास
Wed, 04/27/2016 - 01:36 नवीन
धारप माझे आवडते लेखक आहेत. शिरवळकरांनंतर मी धारपांचा फॅन आहे. मला धारपांना भेटायचे भाग्य देखील मिळाले आहे. आणि त्यांची स्वाक्षरी देखील! धारपांच्या ९०% कथा ह्या परकीय साहित्यावर आधारीत होत्या. विशेषत: त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या. स्टीफन किंग आणि बरेच लेखक त्यांचा आधार होते. आणि ते ह्या गोष्टी प्रांजळपणे सांगत देखील. त्यांची खासियत म्हणजे ते मराठीकरण करताना मूळ कथा धरून त्याभोवती भारतीय साज खूप छान चढवायचे. बखळ, बळद, माजघर, ह्या गोष्टी त्यांच्या लिखाणातून सहज यायच्या. १०-१५ वर्षापूर्वीच्या पुणेकरांने हे शब्द माहित होते. आमच्या वाड्याच्या मागे बखळ होती, आणि मी लहान असताना सर्रास लाईटस्‌ गेले की धारपांच्या गोष्टी आठवून पाचावर धारण बसायची. धारपांनी उचललेल्या काही कथा-कादंबर्‍या: लुचाई- सलेमस्‌ लॉट - स्टीफन किंग आनंदमहल- शायनिंग- स्टीफन किंग शपथ- इट‌‌- स्टीफन किंग ( ह्यावर हिंदीमध्ये लिलीपूट, आशुतोष गोवारीकर आणि धारा तेलाच्या जाहितातीतला ’जलेबी’ म्हणणारा मुलगा ह्यांची ’वोह’ नावाची सिरीयल देखील आली होती. त्याचा इंग्लीश टी.व्ही. मूव्ही पण आहे १९९२-९३ बहुतेक. आणि २०१७ मध्ये तो मोठ्या पडद्यावर नवीन पद्धतीत बनत आहे. नंतर रूम नं. १४०८ ( १४०८ नावाचा सिनेमा आहे) ह्यावर त्यांनी स्टोरी पण लिहिली आहे. लवकरच समग्र धारप यादी जाहिर करेन. त्यात विज्ञानकथा, भय/गूढ कथा-कादंबरी, लहान मुलांसाठीच्या कथा, अनुवाद, साहस कथा, सामाजिक कादंबरी ह्या सगळ्यांची माहिती देण्याचा प्रयत्न असेन.
  • Log in or register to post comments

येस मी जे अनुभवले ते....

चौकटराजा
Wed, 04/27/2016 - 07:11 नवीन
अरे वा तुम्ही ही माझ्यासारखेच त्याना भेटलेले दिसताय. परकीय मूळ हे त्यानी आपल्याकडेही कबूल केलेले होते हे वाचून त्यांच्या दिसखुलास पणा विषयी आनंद वाटला. ते मिस्कील स्वभावाचे गृहस्थ वाटले असा उल्लेख मी इथेच एका प्रतिसादात केला होता. वरील एका टेरर फोटोत आरशातील " ते" हिरवट रंगाचे दिसावयास हवे तरच धारपाना न्याय मिळेल त्या फोटोत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजिंक्य विश्वास

पारंब्यांच्या जगात, साठे

वामन देशमुख
Tue, 08/14/2018 - 21:34 नवीन
पारंब्यांच्या जगात, साठे फायकस या कादंबर्‍यांचे मूळ कोणते ते सांगाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजिंक्य विश्वास

अरे वा धारपांवर बरीच चर्चा

स्पा
Wed, 04/27/2016 - 07:31 नवीन
अरे वा धारपांवर बरीच चर्चा सुरु आहे :)
  • Log in or register to post comments

नुकतीच झी मराठीवर रात्री १०

प्रसाद प्रसाद
Tue, 03/20/2018 - 11:33 नवीन
नुकतीच झी मराठीवर रात्री १०.३० ला सुरु झालेली ग्रहण मालिका धारपांच्या ग्रहण या कथेवरून घेतली असावी असा अंदाज आहे. ग्रहण
  • Log in or register to post comments

मराठी साहित्य online क्वचितच

सुशिल कोकाटे
Tue, 08/14/2018 - 13:54 नवीन
मराठी साहित्य online क्वचितच मिळते. आजकाल बरेचजन विकत घेऊन laptop/mobile वर वाचायला तयार आहेत. पण प्रकाशक उदासीन असतात मराठी साहित्य बदल. Google Books वर इतर भाषेचे भरपूर साहित्य मिळते पण मराठीचे फार कमी.
  • Log in or register to post comments

Amazon Kindle unlimited

SHASHANKPARAB
Tue, 08/14/2018 - 17:53 नवीन
तुमच्या वाचनाचा वेग चांगला असेल तर फक्त 169 रुपयांत Amazon Kindle unlimited ची मेम्बरशिप घेऊन नारायण धारपांची बहुतेक सगळी पुस्तक एका महिन्यात वाचू शकता.
  • Log in or register to post comments

कृपया लिंक द्याल का ?

सस्नेह
Wed, 08/15/2018 - 16:04 नवीन
कृपया लिंक द्याल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: SHASHANKPARAB

https://www.amazon.in/kindle-dbs/hz/signup

SHASHANKPARAB
Mon, 08/20/2018 - 18:14 नवीन
https://www.amazon.in/s/ref=nb_sb_noss_2?url=search-alias%3Daps&field-keywords=narayan+dharap
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मस्त !

सस्नेह
Mon, 08/20/2018 - 21:31 नवीन
मस्त ! धन्यवाद ! खजिनाच आहे की हा. Enjoying free reading !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: SHASHANKPARAB

फ्री कुठे मिळालं?

खटपट्या
गुरुवार, 08/23/2018 - 18:05 नवीन
फ्री कुठे मिळालं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

Kindle पहिल्या महिन्यात फ्री

सस्नेह
गुरुवार, 08/23/2018 - 20:02 नवीन
Kindle पहिल्या महिन्यात फ्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने

विनिता००२
गुरुवार, 01/17/2019 - 11:21 नवीन
औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने 'लुचाई / अनोळखी दिशा खंड १ / २ / ३ ' प्रकाशित केले आहेत. मर्यादित प्रती!! लवकर आपली मागणी नोंदवा. संपर्क - साकेत प्रकाशन - ९८८१७ ४५६०५
  • Log in or register to post comments

time travel

साबु
Mon, 04/06/2020 - 16:21 नवीन
धारपांच time travel वर एक पुस्तक का कथा आहे . एक बाई चुकून time travel ने स्वातंत्र पूर्व काळात जाते. तिला परत येता येत नाही पण ती चिठ्ट्या लिहून ठेवते असं काहीतरी आहे. कुणाला आठवते आहे का ?
  • Log in or register to post comments

पळती झाडे.

किल्लेदार
Mon, 04/06/2020 - 16:36 नवीन
पळती झाडे या पुस्तकात अशी एक गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साबु

पळती झाडे. बरोबर...

साबु
Mon, 04/06/2020 - 17:27 नवीन
धन्य्वाद किल्लेदार... सध्या outlander नावाची एक सिरीज बघतोय नेटफ्लिक्स वर त्यात असेच कथानक आहे . एक बाई १९५४ मधून एकदम १७५४ मध्ये जाते स्कॉटलंड मधून ....ती परत यायचा प्रयत्न करते पण नाही जमत मग तिकडेच लग्न करते आणि तिला परत यावा लागत ..फार मस्त आहे
  • Log in or register to post comments

अरे वा

किल्लेदार
Mon, 04/06/2020 - 21:16 नवीन
अरे वा ... बघावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साबु

धागा वर काढत आहे...

वामन देशमुख
Fri, 08/18/2023 - 16:34 नवीन
मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक नारायण धारप यांचे २००८ साली आजच्या दिवशी निधन झाले. त्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

येस

केदार पाटणकर
Wed, 09/06/2023 - 15:09 नवीन
धारप. साहित्यातून वगळता न येणारे नाव.
  • Log in or register to post comments

यावरून

उन्मेष दिक्षीत
गुरुवार, 09/07/2023 - 01:56 नवीन
आठवले, मीत्राला उर्मीला मातोंडकरचा नैना पिक्चर बघायला घेऊन जात होतो आम्ही तर तो म्हणाला उगीच पैसे देऊन घाबरायला जायचं काय
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा