निर्णय चुकतात, चुकू द्यावे
श्रेय हुकतात, हुकू द्यावे
जगता जगता आयुष्याकडून
जुगारातले दान घ्यावे.
बंध सुटतात,सुटू द्यावे
माणसं तुटतात, तुटू द्यावे
जगता जगता नात्याकडून
आपुलकीचे फुल घ्यावे.
मार्ग चुकतात, चुकू द्यावे
रस्ते सरतात, सरु द्यावे
चालता चालता रस्त्याकडून
सावलीचे दान घ्यावे.
प्रश्न पडतात, पडू द्यावे
उत्तरं चुकतात,चुकू द्यावे
सोडवता सोडवता उत्तराकडून
ज्ञानाचे कण घ्यावे.
ध्येय हुकतात, हुकू द्यावे
अनुभव मुकतात, मुकू द्यावे
जगता जगता अनुभवाकडून
स्वत्वाचे भान घ्यावे.
------ अभय बापट
०५/०८/२०२३
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6025
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा !
धन्यवाद
In reply to वा ! by हेमंतकुमार
छान.
धन्यवाद
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खुप सुंदर रचना !
धन्यवाद
In reply to खुप सुंदर रचना ! by चौथा कोनाडा
सु रे ख . . .
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Imagine Dragons - Bones (Official Music Video)धन्यवाद
In reply to सु रे ख . . . by मदनबाण
सुंदर कच्चा माल !
धन्यवाद
In reply to सुंदर कच्चा माल ! by प्रसाद गोडबोले
लैच जिंदगीची देवघेव करुन