✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पापा की परी

स
साहना यांनी
Wed, 05/24/2023 - 10:51  ·  लेख
लेख
सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. कुटुंबातील अनेक १५-२५ वर्षांच्या मुलींची भेट झाली आणि एकूणच मुलींच्या पालन पोषणात आणि संस्कारात कमालीचा बदल झाला आहे असे दिसून आले. त्याशिवाय हल्लीच कुटुंबात ३-४ घटस्फोट पहिले आहेत. माझ्या ओळखीच्या ३० अश्या जोडप्यांत पहिले तर एकूण ९ घटस्फोट आहेत. ४० वयोगटन्ट ६ घटस्फोट आहेत. टोकाचे अपवाद सोडले तर काही लग्ने तुटण्यात मुलींची भूमिका आणि आडमुठेपणा होता असे तरी प्रथमदर्शनी दिसून आले. आधी पापा कि परी इफेक्त्त पाहू : १. १७ वर्षांची एक मुलगी. वडील प्रचंड श्रीमंत (५०-१०० कोटी नेट वर्थ). आधी दिसायला गोंडस होती. दर रोज फास्ट फूड खाणे, फक्त AC गाडीतून फिरणे, शून्य फिटनेस, शून्य शरीराची देखभाल इत्यादींमुले ४० वर्षांची आंटी असावी अशी सुटली आहे. मुख्य म्हणजे आईवडिलांना ह्यांत काहीही चुकीचे वाटत नाही. अजून तिला घरी "बाळ" म्हटले जाते. २. २३ वर्षांची मुलगी. वडील बऱ्यापैकी श्रीमंत आहेत. शिक्षणात हुशार असून सुद्धा आई वडिलांपासून दूर नको म्हणून चांगल्या संधी सोडल्या. दुपारी ११ वाजता उठणे. नेटफ्लिक्स पाहणे, झोमॅटो वरून वाट्टेल ते ऑर्डर करून खाणे. दार शनीवारी रविवारी ३०-४० हजर रुपये मॉल मध्ये उडवणे. पण हिशोब येत नाही. गणितांत चांगले मार्क पडले तरी सध्या पेट्रोल चे भाव काय ते ठाऊक नाही आणि साधारण टॅक्सीला अमुक ठिकाणी जायला किती खर्च येईल हा हिशोब येत नाही. अमुक वस्तूचा योग्य भाव काय असावा ह्याची जाणीव शून्य. ३. २७ वर्षांची मुलगी. मध्यमवर्गीय परिवार. चांगली नोकरी आहे पण सेविंग्स हि संकल्पना ठाऊक नाही. आई गाडीने नोकरीच्या ठिकाणी पोचवते आणि घरी आणते. स्वतःला काहीही चालवायला येत नाही शिकायची इच्छा नाही. अश्या घरांत लग्न व्हावे तिथे ड्रायव्हर असावा हि अपेक्षा. काहीही पदार्थ बनवायला येत नाही. गॅस आयुष्यांत फक्त एकदा चालू केला होता म्हणे. नोकरी सुद्धा नको आहे कारण तिला खूप पैसे पाहिजेत. ४. १३ वर्षांची मुलगी. घरी झोमॅटोवरून अमुकच पाहिजे हा हट्ट. आईने १००० रुपये खर्चून ऑर्डर केला. एक घास घेऊन चव आवडली नाही म्हणून थेट कचऱ्याच्या डब्यांत फेकला आणि दुसरी डिश ऑर्डर केली. हि झाली पापा कि परी ची उदाहरणे. लोकांच्या मुलांना काय संस्कार असावेत हि माझी समस्या नाही. त्यामुळे मी फक्त माझे निरीक्षण व्यक्त करते. १. पैश्यांची किंमत हि गोष्ट बहुतेक तरुण मुलींना आई वडील शिकवत नाही असे दिसून आले. तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी विनाकारण पैसे नष्ट करू नयेत, तारतम्य बाळगावे हे आमचे जुने संस्कार गायब झाले आहेत. २. मुलीला काहीही "बोलण्यास" पालक घाबरत आहेत आणि तिने डोळ्यातून अश्रू काढले तर सरळ शरणागती पत्करत आहेत. ३. चार चौघांत कसे वागावे, कश्या प्रकारे संभाषण करावे, "भान कसे ठेवावे" ह्या गोष्टी ज्या एके काली मुलींसाठी महत्वाच्या होत्या त्या गायब झाल्या आहेत. वाट्टेल ठिकाणी पाय वर घेऊन बसणे, आपल्या आजूबाजूला काय लोक आहेत आणि कोण काय ऐकत आहे हे "प्रसंग सावधान" अजिबात नाही आणि आई वडील सुद्धा शिकवत नाहीत. उदा अपिरिचित लोक आजू बाजूला असताना फोन वरून आज मी घरी एकटी असेल असे मोठ्याने बोलणे. ४. रस्ता कसा पार करावा, दुकानात जाऊन सामान कसे आणावे, घरकामात मदत कशी करावी, घरखर्चात कसा आपला सहभाग असावा ह्या सर्वांचे ज्ञान बहुतेक मुलींना शून्य होते. ५. एका मुलीसोबत मी बाहेर गेले. जाताना तिला म्हणे पाण्याची बाटली बरोबर लागतेच. आम्ही बरेच अंतर चालून गेलो कि तिच्या लक्षांत आले कि तिने बाटली आणली नाही. ती बाटली तिच्याकडे यावी हि तिची अपेक्षा. तिला अपेक्षित होते कि मी पुन्हा माघारी अर्धा किलोमीटर जाऊन बाटली आणावी. मी साफ नकार दिला. त्यावर तिने आईला फोन करून सांगितले मग आई सर्व काम सोडून बाटली घेऊन आली. ६. काही मुली ह्या aspergers वाल्या असाव्यात अशी शंका मला आहे. -- हे सर्व ठराविक अनुभव झाले. ह्याचा अर्थ सर्वच मुली अश्या आहेत असे नाही. वाचकांनी आपल्या कुटुंबातील मुलींबद्दल सांगावे. -- घटस्फोट बऱ्याच पापा कि परी आता कायमच्या पापा च्या घरी आल्या आहेत. नवऱ्यावर प्रचंड पैश्यांचा दावा ठोकला आहेच पण मानसिक आणि शारीरिक छळाच्या पूर्णतः खोट्या कंप्लेन सुद्धा घातल्या आहेत. बहुतेक वेळा आपण काहीही तडजोड करणार नाही आणि सर्व तडजोड नवऱ्याने करावी असली अवास्तव अपेक्षा कारणीभूत आहे असे दिसून येते. एके ठिकाणी तर मुलीने पहिल्याच महिन्यात सासू सासऱ्यांची संपत्ती आपल्या नावावर करण्याची मागणी केली. ह्या संपत्तीवर तिच्या नवऱ्याचा सुद्धा अधिकार नव्हता. नवऱ्याला अजिबात आदर न देणे, तो जणू काही नोकर आहे आणि फक्त पैश्यांचे ATM आहे अश्या प्रकारे त्याला वागवणे. आर्थिक जबाबदारीचा पूर्णता अभाव इत्यादी गोष्टी मला ठळक पणे विविध मुलीत दिसून आला. कर किंवा बँकिंग विषयाचे ज्ञान तर जवळ जवळ शून्य होते. काहींची लग्ने तुटली नसली तरी पती मानसिक दृष्ट्या त्या रिलेशन मधून कधीच बाहेर पडला आहे असे दिसून आले. एक तर त्यांनी इतर मित्र आणि इतर हॉबी निर्माण केल्या आहेत नाहीतर आणखीन कुणाबरोबर संबंध निर्माण केले आहेत. चुकून एखादा व्यसनाच्या अधीन सुद्धा दिसून येतो. हल्ली घटस्फोट जास्त होत आहे असे लोक बोंबलत असले तरी चुकीच्या माणसाबरोबर संसारांत पडण्यापेक्षा घटस्फोट चांगला आहे असे वाटते. अश्या परित्यक्ता मुलींकडे आणि त्यांच्या भविष्यातील ससेहोलपटीकडे पाहून तरी त्याच्या पुढील पिढी कदाचित सुधारेल असे वाटते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26318 वाचन

💬 प्रतिसाद (120)

प्रतिक्रिया

परगर्भधारणा (सरोगसी ) कायदा म्हणजे मुर्खपणाचा कळस आहे.

Trump
Sat, 05/27/2023 - 12:08 नवीन
धन्यवाद. थोडेसे अवांतर: परगर्भधारणा (सरोगसी ) कायदा म्हणजे मुर्खपणाचा कळस आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याविषयी तारखा चालु आहेत. सरकारने केलेले युक्तिवाद आणि बचाव बालिश आणि अपुरे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

येथे नवरा आणि बायकोला मुलाची इच्छा आहे, पण लग्न मोडायचे नाही.

Trump
Sat, 05/27/2023 - 12:14 नवीन
श्री साहना यांच्या प्रतिसादामुळे हे सापडले. येथे नवरा आणि बायकोला मुलाची इच्छा आहे, पण लग्न मोडायचे नाही. त्यामुळे कोर्टकचेर्या चालु आहेत. जर तोच जर मुस्लीम असता तर बिनधास्त मध्ये दुसरे लग्न केले असते आणि नंतर हवे तर नवीन बायकोला इस्लामी कायद्यानुसार घटस्फोट दिला असता.
“My family doesn’t know about my wife’s cancer. I fear they will push me for a second marriage if they learn that my wife cannot conceive a child,” he said. https://theprint.in/judiciary/govt-tells-sc-why-it-wont-change-surrogacy-law-given-societal-norms-law-in-its-current-form-appropriate/1497222/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

खतरनाक

सर्वसाक्षी
Wed, 05/24/2023 - 17:36 नवीन
एका मुलीने तिच्या अपेक्षांचा समारोप करताना लिहिलं होतं: .., किमान वार्षिक उत्पन्न वीस लाख, सरकारी अधिकारी असल्यास उत्पन्नाची अट नाही
  • Log in or register to post comments

वास्तव परिस्थिती लिहिलीय ...

चौथा कोनाडा
Wed, 05/24/2023 - 17:55 नवीन
वास्तव परिस्थिती लिहिलीय ... आजुबाजूला काही कुटूंबात ही परिस्थिती दिसून येत आहे.
  • Log in or register to post comments

माझ्या बघण्यात एका मुलीला

सौंदाळा
Wed, 05/24/2023 - 19:26 नवीन
माझ्या बघण्यात एका मुलीला चालायला लागल्यापासून बसायला छोटी खुर्ची, कार मधे बेबी सीट, जेवण्यासाठी वेगळी खूर्ची होती. जेव्हा तिचा प्लेग्रुपचा पहिला दिवस होता (अडीच-तीन वर्षांची असताना) तेव्हा तिला खाली मांडी घालून बसताच येत नव्हते. आता बोला असो लग्नाच्या बाबतीत बोलायचे तर १५-२० वर्षापुर्वीपर्यंत मुलांचे दिवस होते आता मुलींचे दिवस आलेत. पन्नास पन्नास मुली बघितलेले पण माहितीतले आहेत. एकुलत्या एक मुला-मुलींमुळे लाडावण्याचे प्रमाण बेसुमार वाढले आहे आणि अश्या कटकटी निर्माण होत आहेत. काहीही असले तरी मुला-मुलींच्या अपेक्षा व्यवहार्य पाहिजेत आणि संस्कार चांगले पाहिजेत.
  • Log in or register to post comments

खरोखर ज्वलंत समस्या आहे.

सस्नेह
Wed, 05/24/2023 - 19:35 नवीन
खरोखर ज्वलंत समस्या आहे. मुलींपेक्षा त्यांचे आईवडील चुकत आहेत हे नक्की.
  • Log in or register to post comments

येथे पूर्ण दोष मुलींना दिला

श्रीगुरुजी
Wed, 05/24/2023 - 20:34 नवीन
येथे पूर्ण दोष मुलींना दिला जातोय. लग्नाळू मुलांचेही मुलीकडच्यांना अनेक विचित्र अनुभव येतात.
  • Log in or register to post comments

तेही विचारणार होतो

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 05/24/2023 - 21:16 नवीन
ईथे कोणी मुलीकडचे असतील तर अनुभव लिहावेत
  • Log in or register to post comments

बरेच चांगले-वाईट अनुभव आलेत.

श्रीगुरुजी
Wed, 05/24/2023 - 21:49 नवीन
बरेच चांगले-वाईट अनुभव आलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

अतिशय सुंदर, विचार मंथन करायला लावणारा लेख

Nitin Palkar
Wed, 05/24/2023 - 21:19 नवीन
विज्ञानाच्या वेगवान प्रगती बरोबरच, गेल्या दहा पंधरा वर्षातील झपाट्याने होणारे जीवनशैलीतील बदल हे विस्मय चकीत करणारे आहेत. घटस्फोटांचे वाढते प्रमाण हे त्याचेच एक फळ आहे. नजीकच्या बघण्यातील काही उदाहरणे देतो. सुमारे वीस वर्षांपूर्वी माझ्या भावाच्या बाबतीत घडलेला किस्सा, घटस्फोटाचा नाही पण वधुपित्यांच्या बदललेल्या मानसिकतेचा. भाऊ एम् एस्सी नंतर केमिस्ट्री मधील एक पदविका करून एका चांगल्या कंपनीत केमिस्टच्या पदावर नोकरी करत होता. डोंबिवलीत स्वतःची नवीन जागा घेतली होती. आमचे वडील गेले होते, आई माझ्याकडे रहात होती, कोणत्याही कौटुंबिक जबाबदाऱ्या नव्हत्या. डोंबिवलीतीलच एक स्थळ सांगून आले, दोघांनीही एकमेकांना बघून, दोन वेळा भेटून पसंत केले. प्राथमिक बोलणी होऊन मुहूर्त ठरवू या इथपर्यंत आले. आणि एका दिवशी वधुपित्यांचा मला (मोठा भाऊ) फोन आला, 'येऊन जाल का, काही बोलायचे आहे'. मी गेल्यावर जुजबी बोलणी झाल्यानंतर त्यांनी विचारले, 'मुलाने स्वतःची जागा घेतली आहे ती कर्ज काढून घेतली आहे का'? 'हो', असे मी उत्तरताच ते म्हणाले, 'म्हणजे संसाराची उमेदीची वर्षे कर्ज फेडण्यात जातील, मुलं हौस मौज केव्हा करणार'? मी म्हणालो,'तुमची मुलगीही पदवीधर आहे, तीही नोकरी करून संसाराला हातभार लावू शकेल'. यावर ते थोडे विचारात पडल्यासारखे दिसले व म्हणाले, ' ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला'. आणि त्यांनी दोन दिवसांनी नकार कळवला. (भावाचे दुसऱ्या मुलीशी लग्न होऊन, लग्नानंतर दोनच वर्षात त्याने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि सहा वर्षात ती जागा सोडून डोंबिवलीतच स्वतःचे रो हाऊस बांधले). दुसरा किस्सा: मुलगा मुलगी दोघेही मध्यम वर्गीय. मुलगा इंजिनिअर, मुलगी पदवीधर नोकरी न करणारी. रीतसर बघून, ठरवून लग्न. मुलगा, मुलगी दोघेही एकुलते एक. मुलगा, मुलाचे वडील दोघेही चांगल्या ठिकाणी नोकरी करत होते. सासू होम मेकर. लग्नानंतर चौथ्या पाचव्या महिन्यात मुलीचे वडील भेटले, मी सहजच मुलीची चौकशी केली, विचारलं,'जयू मजेत आहे ना'? ते म्हणाले, 'नाही हो, फसलो आम्ही'. मी विचारलं, 'काय झालं'? 'महिना झाला, जयू परत आलीय, आणि परत जाणार नाही म्हणतेय'. 'काय झालं'? ते म्हणाले,'रोज जयूला भाजी आण, किराणा आण अशी कामे सांगतात'. मी विचारलं, घरची धुणी, भांडी'? 'नाही, वरच्या सगळ्या कामाला बाई आहे, स्वयंपाक सगळा सासू करते. आम्ही आमच्या मुलीला कधी कोथिंबिरीची काडी आणायला बाहेर पाठवलं नाही'. यथावकाश घटस्फोट झाला. (त्या वेळेस स्वीगी इंस्टामार्ट, बिग बझार नव्हते). किस्सा तिसरा: हा ही बघून, ठरवून केलेला विवाह. मुलगा कुठल्यातरी बँकेत उच्च पदावर, मुलगीही बी कॉम, बँकेत नोकरीला. मुलगा एकुलता एक, मुलाच्या वडलांचा नवी मुंबई येथे तीन बेडरूमचा फ्लॅट. लग्नानंतर वर्षभरात मुलीने 'आपण वेगळं राहू या' असा धोषा लावला. मुलीच्या आईने तिला विचारले, सासू जाच करते का, सासरे काही बोलतात का'? 'नाही, पण मला वेगळं राहायचंय,' दरम्यान मुलीला दिवस गेले, बाळंतपणासाठी मुलगी माहेरी आली, तिला मुलगी झाली, 'परत त्या घरी जाणार नाही' हा हेका धरून बसली. शेवटी घटस्फोट झाला. दुर्दैवाने या तिन्ही ठिकाणी मुलगी/ मुलीच्या घरचे दोषी आहेत असं दिसतंय.
  • Log in or register to post comments

> आम्ही आमच्या मुलीला कधी

साहना
गुरुवार, 05/25/2023 - 10:13 नवीन
> आम्ही आमच्या मुलीला कधी कोथिंबिरीची काडी आणायला बाहेर पाठवलं नाही' जबर आहे ! माझ्या माहितीतील अनेक मुली जयूच्या पावलांवर पाऊल ठेवून मार्गक्रमण करत आहेत असे दिसते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar

इथे तर मला व्हाट'स अंकल आणि

भागो
Wed, 05/24/2023 - 21:23 नवीन
इथे तर मला व्हाट'स अंकल आणि आंटींंचा मेळावा भरला आहे असे दिसतेय. अजून "हमारे जमानेमे " वाले आलेले दिसत नाहीयेत. ते पण येतील.
  • Log in or register to post comments

फक्त मुला-मुलीवर स्वविवाह

श्रीगुरुजी
Wed, 05/24/2023 - 21:46 नवीन
फक्त मुला-मुलीवर स्वविवाह जमविण्याची कामगिरी सोपविणे उचित नाही. मुला-मुलींचा एक दृष्टिकोन असतो, तसेच आईवडीलांचाही वेगळा अनुभवी दृष्टिकोन असतो. दुसऱ्या बाजूचे जे सांगतात त्यात तथ्य किती आहे, भविष्यात दोघांचे एकमेकांशी किती जमू शकेल, मुला-मुलीच्या सद्यपरिस्थितीवरून भविष्यात काय होऊ शकेल हे आईवडीलांच्या अनुभवी नजरेला समजू शकते. आईवडील व लग्नाळू मुलगी/मुलगा या दोघांचेही दृष्टिकोन एकसमान असल्यास विवाह यशस्वी ठरण्याची शक्यता बरीच जास्त असते. बरेच अनुभव गाठीशी आहेत.
  • Log in or register to post comments

+१

Bhakti
गुरुवार, 05/25/2023 - 08:52 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

लग्नाच्या गाठी

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 05/25/2023 - 10:37 नवीन
या बाबतीत माझ्या स्वतःच्याच उदाहरणावरून तितकासा सहमत नाही. आपल्याकडे म्हणतात की लग्नाच्या गाठी वर बांधलेल्या असतात ते अगदी पूर्ण पटते. आज माझे माझ्या बायकोबरोबर अगदी उत्तम चालले आहे. आम्ही आधी तीन-साडेतीन वर्षे चॅट करून लग्नाचा निर्णय जवळपास पक्का केलाच होता. तेव्हा मी अमेरिकेत होतो आणि ती मुंबईत. त्याकाळी व्हिडिओ चॅटसाठी लागणारा वेबकॅम सगळीकडे असायचाच असे नाही. त्यामुळे व्हिडिओ चॅटही फार वेळा झाला नसावा. मी भारतात परतल्यावर आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि पाच दिवसात साखरपुडाही झाला :) आता जाणवते की गध्देसत्ताविशीत घेतलेली ती मोठी जोखिम होती पण नंतर कसलाही त्रास झाला नाही. या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात. खरं तर माझी आणि बायकोची गाठ अन्यथा पडलीही नसती. ती गाठ पडावी म्हणूनच मी अमेरिकेला गेलो होतो की काय असा प्रश्नही मला अनेकदा पडतो. दुसरे म्हणजे माझी बायको मला चॅटवर भेटलीच नसती आणि जर पालकांवर लग्नाचा निर्णय सोडला असता तर माझे लग्न होणेच अशक्य झाले असते. मी अमेरिकेतून भारतात अपयशी होऊन परतलो होतो हे मी मिपावर अन्यत्र लिहिलेही आहे. पहिले वर्षभर मिळाली ती नोकरी मी केली होती. त्यानंतर दोन वर्षे मी शिकत होतो. त्याच दोन वर्षात बायकोही पुढचे शिक्षण मुंबईत घेत होती. मी अमेरिकेत असताना खास मराठी मध्यमवर्गीय स्वभावामुळे अंथरूण पाहून पाय पसरावे, उगीच व्यर्थ खर्च करू नये अशा सवयींमुळे पैसे साठवले होते ते बायकोच्या फी साठी आणि आमच्या दोघांच्या दोन वेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी दोन वर्षात संपले. माझे शिक्षण संपले लग्नानंतर तीन वर्षांनी. तेव्हा आणखी डोक्यावर शिक्षणकर्ज साठले होते आणि मला नोकरी लागल्यावर मुंबईत पहिले भाड्याने घर घ्यायचे होते तेव्हा डिपॉझिट जमवायला मारामार झाली होती. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की लग्नानंतर तीन वर्षांपर्यंत माझे स्वतःचेच काही धड चालू नव्हते. अशा कोणाबरोबर कोणत्या मुलीच्या पालकांनी लग्न करून दिले असते? तिसरे म्हणजे आमच्या ओळखीतील एक गोष्ट आहे. ते लग्न पालकांनी बघून, सगळ्या गोष्टींचा विचार करून करून दिले होते. पत्रिकेतही गुण ३६ पैकी ३२ जुळत होते. पण कुठचे काय. गेली कित्येक वर्षे ते दोघे भांडत आहेत. वरकरणी दिसायला सगळे ठीक चालू आहे असे कोणाला वाटेल पण खरं काय चालू आहे हे थोड्या लोकांनाच माहित आहे. एकदा माझ्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त रात्री १२ वाजता कापायला म्हणून केक मागवला होता. तो केक रात्री दहाच्या सुमारास घरी आल्यावर केकचा फोटो मी आमच्या ग्रुपवर टाकला आणि म्हटले- "बायकोच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू होत आहे. अजून फक्त ११५ मिनिटे बाकी आहेत". त्याविषयी त्या व्यक्तीने नंतर मला म्हटले की त्यांच्याकडे असा काऊंटडाऊन भांडायचा असतो :( स्वतः लग्न जमविणारे काही आनंदात राहतात तसेच पालकांनी ठरवून लग्न केलेले काहीही आनंदात राहतात. त्याचप्रमाणे स्वतः लग्न जमविणारे काही भांडत राहतात तसेच पालकांनी लग्न जमविलेले काहीही तसेच भांडत राहतात. तेव्हा लग्नाच्या गाठी वर बांधलेल्या असतात हेच मला पटते. खरं सांगायचं तर ती एक अंधारात मारलेली उडी असते. नशीब चांगले असेल तर आपली नौका तरून जाते नाहीतर बुडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१

Bhakti
गुरुवार, 05/25/2023 - 10:54 नवीन
+१ वाह! मुळात लग्नाचा बेस प्रेम आहे, बाकी सब मायाजाल है :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

वर सौंदाळा यांनी

नचिकेत जवखेडकर
गुरुवार, 05/25/2023 - 06:41 नवीन
वर सौंदाळा यांनी म्हटल्याप्रमाणे, मुलामुलींना बेसुमार लाडावून ठेवण्याची वृत्ती वाढली आहे. त्यातून, `जो मैं अपनी जवानी में कर ना सका, वो मेरा बेटा/बेटी करेगी` छाप बॉलीवूडी मनोवृत्ती पण वाढीस लागलेली असू शकते. जितक्या लवकर मुलामुलींना रिऍलिटी चेक देता येईल तितक्या लवकर ते जास्त विचारपूर्वक वर्तन करू शकतील. बाकी कोथिंबिरीची काडी पण आणायला कधी पाठवलं नाही टाईप्स विचार असतील तर त्यांना म्हणो तुम्ही लग्न तरी का करून दिलं मग. माझी मुलगी आत्ताशी ४ वर्षांची आहे पण हे सगळे अनुभव ऐकून, पालक म्हणून लक्ष देणं किती गरजेचं आहे हे अजून जास्त कळालं :)
  • Log in or register to post comments

मीपा Andrew Tate. एकाच बाजूचे

कॉमी
गुरुवार, 05/25/2023 - 07:39 नवीन
मीपा Andrew Tate. एकाच बाजूचे दोष दाखवणारा लेख.
  • Log in or register to post comments

मीपा Andrew Tate. एकाच बाजूचे

भागो
गुरुवार, 05/25/2023 - 09:10 नवीन
मीपा Andrew Tate. एकाच बाजूचे दोष दाखवणारा लेख.>>> +१ अगदी अगदी. Andrew Tate says women belong in the home, can’t drive, and are a man’s property. He also thinks rape victims must “bear responsibility” for their attacks and dates women aged 18–19 because he can “make an imprint” on them, according to videos posted online.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

अँड्रू टेट ,जॉर्डन पीटरसन

साहना
गुरुवार, 05/25/2023 - 10:14 नवीन
अँड्रू टेट ,जॉर्डन पीटरसन इत्यादी मंडळी फ्रॉड आहेत. ह्या लोकावंर तालेब ह्यांचे मत वाचावे. बीटा मेल मंडळींना (जयंत बहुसंख्य भारतीय पुरुष आले) आपली पुस्तके आणि प्रोपागंडा विकून पैसे कमावणे हे ह्यांचे ध्येय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

पुणे, मुंबईत अजूनही अरेंज

Bhakti
गुरुवार, 05/25/2023 - 08:45 नवीन
पुणे, मुंबईत अजूनही अरेंज मॅरेज होतात? ;) पापाच्या परीने एकतर नोकरी करून सगळ्या कामांना मदतनीस लावावी , मस्त शांती मिळेल.नोकरी नसेल करायची तर कोणत्याही एका कामाची मदतनीस कमी करावी (हाकानाका).
  • Log in or register to post comments

पुणे, मुंबईत अजूनही अरेंज

श्रीगुरुजी
गुरुवार, 05/25/2023 - 09:54 नवीन
पुणे, मुंबईत अजूनही अरेंज मॅरेज होतात? ;) हो, बहुसंख्य विवाह ठरवून होतात. या लेखात बहुतांशी मुलींना दोष दिला असून मुले पापभीरू दाखविली आहेत. प्रत्यक्षात दोन्ही बाजू समसमान आहेत. मुलीने विवाह करण्यापूर्वी खालील मुद्दे पहावे. १) मुलगा किमान आपल्याएवढा तरी शिक्षित असावा व किमान आपल्याएवढा तरी कमावता असावा. अन्यथा मुलीला भविष्यात न्यूनगंडातून निर्माण झालेल्या पुरूषी अहंकाराचा त्रास होऊ शकतो. २) मुलगा पूर्ण निर्व्यसनी असावा. नेहमी नाही, कधीतरीच मित्रांबरोबर अपेयपान करतो असे सांगितले असल्यास विवाह टाळावा कारण कधीतरीची वारंवारता भविष्यात (विशेषतः चाळीशीनंतर मोठ्या प्रमाणात वाढते). ३) लग्न न करणारी किंवा घटस्फोट होऊन माहेरी आलेली किंवा नवऱ्याशी पटत नसल्याने माहेरी राहणारी बहीण मुलास असल्यास विवाह टाळावा कारण अशी बहीण असूयेतून किंवा नैराश्यातून भावाच्या प्रपंचात हस्तक्षेप करते. ४) आपली गुंतवणूक किती, आईवडीलांकडे किती संपत्ती आहे, आईवडीलांनी आपल्या नावावर काय ठेवले आहे याची माहिती मुलीनं विवाहानंतर काही वर्षे तरी नवऱ्यास देऊ नये. नवऱ्याच्या स्वभावाचा अंदाज आल्यानंतरच आवश्यक वाटल्यास सांगावे. ५) मुलीने आपले आर्थिक व्यवहार स्वत:च करावे. सर्व काही नवऱ्याच्या हातात देऊ नये. ६) विवाह ठरल्यानंतर विवाहापूर्वगच्या काळात नवऱ्याच्या स्वभावाचा अंदाज घ्यावा. तो धरसोड वृत्तीचा आहे का, व्यसने लपविली आहेत का, काही भानगडी होत्या/आहेत का, पैशामागे आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. यातील काही गोष्टी आढळल्यास विवाह टाळावा. हे सर्व मुद्दे मुलांकरिता सुद्धा लागू आहेत. अजून एक - लग्नानंतर लगेच किंवा लग्नापूर्वीच शक्य असल्यास मुलाच्या आईवडीलांनी आपल्या मुलाचा संसार वेगळा थाटून द्यावा. भविष्यात मतभेद होऊन कटु मनाने वेगळे होण्यापेक्षा लग्न होतानाच आनंदाने वेगळे राहिल्यास कटुता निर्माण होण्याची शक्यता कमी असते व दोन्ही जोडप्यांना स्वातंत्र्य उपभोगता येते. तसेच लग्नानंतर दोन्ही बाजूच्या आईवडीलांनी मुलामुलीच्या प्रपंचात हस्तक्षेप टाळावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

वाह,

Bhakti
गुरुवार, 05/25/2023 - 10:56 नवीन
वाह, आताच हा प्रतिसाद सेव्ह करणे.२० वर्षांनी गरज पडेल कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मिपा म्हणजे फ्रस्टेेटेड

भागो
गुरुवार, 05/25/2023 - 09:34 नवीन
मिपा म्हणजे फ्रस्टेेटेड म्हाताऱ्यांंचे विरंगुळा केंद्र झाले आहे. मालक,चालक, पालक मिपा मधे जरा नवचैतन्य इंफ्युस करा.
  • Log in or register to post comments

नालायकपणा

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 05/25/2023 - 11:12 नवीन
बऱ्याच पापा कि परी आता कायमच्या पापा च्या घरी आल्या आहेत. नवऱ्यावर प्रचंड पैश्यांचा दावा ठोकला आहेच पण मानसिक आणि शारीरिक छळाच्या पूर्णतः खोट्या कंप्लेन सुद्धा घातल्या आहेत.
हा सगळ्यात हलकट प्रकार असतो. एक प्रकार ओळखीत बघितला आहे. संबंधित स्त्रीचे वय आता ६० च्या आसपास असावे. १५ वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर ५-७ वर्षात कॅनडातील एका विधुर मराठी माणसाला तिने गटवले. आम्हा सगळ्यांना तिने सांगितले की तिला कॅनडाचे इमिग्रेशन मिळाले आहे म्हणून ती तिथे जात आहे. तेव्हाच प्रश्न पडला होता वयाच्या पन्नाशीनंतर इमिग्रेशनसाठीचे पॉईंट्स तिला मिळालेच कुठून? नवरा अनेक वर्षे कॅनडात वास्तव्याला आणि कॅनडाचा नागरिक होता. कॅनडाच्या नागरिकाशी लग्न केले म्हणून तिला बहुदा व्हिसा मिळायला काही अडचण आली नसावी. तिथे गेल्यानंतर तिने त्याला अगदी ठरवून त्रास द्यायला सुरवात केली. डोमेस्टिक हिंसेची खोटी तक्रार दाखल करेन अशी धमकी देऊन त्याला अगदी आपल्या तालावर नाचवले. शेवटी नवरा मानसिक छळ करतो या नावावर त्याच्याकडून घटस्फोट मिळवला. मला वाटते कॅनडातील कायद्याप्रमाणे घटस्फोट झाल्यास नवर्‍याने बायकोला घर देणे बंधनकारक असते (चुभूदेघे). तसे घर तिने त्याच्याकडून उकळले. पोटगी म्हणूनही बरीच रक्कम तिला मिळत आहे आणि ती आता कॅनडात काहीही न करता आरामात राहात आहे. तिचा भाऊ पण कॅनडात असतो. त्याच्याकडून हे सगळे कळले. म्हणजे किती नालायकपणा आहे हा. अजून दुसरा प्रकार असतो खोटी सेक्शुअल हॅरॅसमेंटची तक्रार द्यायची धमकी देणे. आमच्या कॉलेजमधील तीन वर्षे सिनिअरबरोबर हा प्रकार घडला आहे. तो मुंबईत एका बँकेत नोकरीला आहे. त्याच्या टीममधील एका मुलीला तो कामावरून काही बोलला तर तिने सरळ एच.आर कडे ती तक्रार करेन अशी धमकी दिली. मग त्याची पाचावर धारण बसली. असली तक्रार केली असती तर नुसती नोकरीच गेली असती असे नाही तर तुरूंगात जावे लागले असते. समाजात नाचक्की झाली असती ती गोष्ट वेगळीच. मग ती कधी एकदा सोडून जाते याची वाट बघत राहिला. तिचे काम चांगले नसूनही तो तिला चांगले रेटिंग द्यायचा आणि तिला कधीही भेटायचाही नाही. Appraisal चे बोलणे कसे काय व्हायचे काय माहित. शेवटी लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी १५-२० दिवस ती बया एकदाची सोडून गेली आणि त्याचा जीव भांड्यात पडला. सगळे कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेत त्याचा सरळसरळ गैरफायदा घेणे झाले. फेसबुकवर दिपीका नारायण भारद्वाज अशा मुलींच्या हलकटपणाविषयी लिहित असते. अनेकदा कोणत्या कोणत्या लॉजमध्ये जाऊन वेगवेगळे प्रकार करायचे आणि मग बलात्काराची तक्रार दाखल करेन म्हणून सरळ ब्लॅकमेल करायचे असले प्रकारही अनेक होतात. त्याविषयीही दिपीका नारायण भारद्वाज लिहिते. असल्या नालायक मुली स्त्रियांचेच जास्त नुकसान करत असतात. असे प्रकार अधिक प्रमाणात व्हायला लागले तर ज्या ठिकाणी स्त्रियांना खरोखरच अशा प्रकारांना सामोरे जावे लागते ते प्रकारही असेच खोटे आहेत असे वाटायला लागायचा संभव जास्त आहे.
  • Log in or register to post comments

दुसऱ्या प्रसंगात तुम्ही खोटं

नचिकेत जवखेडकर
गुरुवार, 05/25/2023 - 11:42 नवीन
दुसऱ्या प्रसंगात तुम्ही खोटं सांगताय असा मला म्हणायचं नाही पण मला नाही वाटत की फक्त धमकी दिल्यावर एच आर नी मान्य केलं असतं. केवळ एक मुलगी म्हणतीये म्हणून पुरुषाला कंपनीतून काढून नाही टाकणार. कंपन्यांमध्ये POSH कमिटी असते. त्यांच्याकडे केस गेली तर सर्व पुरावे असतील तरच इतकी कडक कारवाई केली जाते. हां, आता तो पुरुष सहकारी जर का खूप मोकळेपणे(म्हणजे साधारणपणे ऐतराज मधल्या अक्षय कुमार च्या पात्रासारखा) स्त्री कर्मचाऱ्यांशी वागत असेल तर हा मुद्दा कोण कसा उचलून धरेल सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

मानसिक अवस्था

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 05/25/2023 - 12:00 नवीन
हे बोलणे तांत्रिकदृष्ट्या मान्य आहे. पण अशी धमकी मिळाल्यावर त्याची मानसिक अवस्था नक्की काय झाली असेल याची कल्पना अशा प्रसंगातून न गेलेल्या कोणाला करता येणार नाही. अशा वेळेस तर्कशुध्द किंवा लॉजिकल वर्तणुक होईलच याची खात्री कशी देता येईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नचिकेत जवखेडकर

अर्थातच, मानसिकदृष्ट्या खचून

नचिकेत जवखेडकर
गुरुवार, 05/25/2023 - 12:41 नवीन
अर्थातच, मानसिकदृष्ट्या खचून जाणं स्वाभाविक आहे आणि इथे त्या स्त्री कर्मचाऱ्याला अनुमोदन नाहीचे. कृपया गैरसमज नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

भारतात तरी स्त्रीने एकदा तक्रार केली आहे असे दिसले की पुरुषाकडे

Trump
गुरुवार, 05/25/2023 - 12:10 नवीन
अजून दुसरा प्रकार असतो खोटी सेक्शुअल हॅरॅसमेंटची तक्रार द्यायची धमकी देणे. आमच्या कॉलेजमधील तीन वर्षे सिनिअरबरोबर हा प्रकार घडला आहे. तो मुंबईत एका बँकेत नोकरीला आहे. त्याच्या टीममधील एका मुलीला तो कामावरून काही बोलला तर तिने सरळ एच.आर कडे ती तक्रार करेन अशी धमकी दिली
दुसऱ्या प्रसंगात तुम्ही खोटं सांगताय असा मला म्हणायचं नाही पण मला नाही वाटत की फक्त धमकी दिल्यावर एच आर नी मान्य केलं असतं.
बरेचदा अश्या गोष्टींचे पुरावे नसतात. आणि एच आर आणि व्यवस्थापन नेहमी तटस्थ असेलच असे नाही. (ते अंतर्गत राजकारणावर अवलंबुन असेल.), त्यामुली कडे काही पुरावे नसले तरी, तीला साथ देणारे कोणी (स्त्री असेल तर अधिकच उत्तम) असेल त्या पुरुषाची सद्दी संपलीच असे समजायचे. एच आर आणि व्यवस्थापनाची बांधिलकी ही कंपनीबरोबर असते, एकदा त्यांना समजले की त्या पुरुषाला साथ देऊन कंपनीचे नुकसान होईल तर ते लगेच त्या पुरुषाची साथ सोडतील. भारतात तरी स्त्रीने एकदा तक्रार केली आहे असे दिसले की पुरुषाकडे लोक संशयाने बघतात, एकादा पापभिरु असेल तर त्याचे जगणे मुश्कील होत जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नचिकेत जवखेडकर

सहमत

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 05/25/2023 - 12:19 नवीन
आता तर तो कोणा मुलीला/स्त्रीला इंटरव्ह्यूसाठी पण बोलावत नाही. आपल्या टीममध्ये एकही मुलगी/स्त्री नको असे त्याला वाटायला लागले असेल तर त्यात त्याचे काय चुकले? जोपर्यंत सगळे कायदे स्त्रियांच्याच बाजूचे आहेत आणि असा गैरफायदा घ्यायचे प्रकार चालू आहेत तोपर्यंत अशी दुसरी टोकाची प्रतिक्रिया आली तर नवल वाटू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

हीच गोष्ट दुर्दैवाने SC/ST ची

साहना
गुरुवार, 05/25/2023 - 21:57 नवीन
हीच गोष्ट दुर्दैवाने SC/ST ची आहे. SC/ST कायद्यामुळे बहुसंख्य छोटे उद्योग ह्या लोकांना दूरच ठेवत आहेत. हल्ली हाऊसिंग सोसायटी मध्ये सुद्धा शांतताप्रिय समाजाप्रमाणे ह्यांना जागा न देण्याची परंपरा सुरु होत आहे. चुकीच्या पार्किंग मध्ये ठेवलेली गाडी हलवायला सांगितली म्हणून Sc/ST कायद्याची धमकी दिली, आपल्या गॅलरीतून केबल नेण्याची परवानगी नाकारली म्हणून कायद्याची धमकी दिली असल्या गोष्टी सर्रास घडत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

लैंगिक आत्याचाराची खोटी तक्रार..

Nitin Palkar
गुरुवार, 05/25/2023 - 12:48 नवीन
लैंगिक आत्याचाराची खोटी तक्रार... हा प्रकार अगदी जवळून बघितलेला आहे. माझ्या मित्राचा मुलगा, जो माझ्या मुलाचा वर्गमित्र देखील आहे. त्याच्या बाबतीत घडलेला हा किस्सा. तो आणि त्याची एक स्त्री सहकर्मचारी कंपनीच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेले होते. राहण्याची व्यवस्था कंपनीनेच चांगल्या हॉटेलमध्ये केलेली होती. ही स्त्री सह कर्मचारी कंपनीने दिलेले काम कारण्याऐवजी भटकण्यात आणि शॉपिंग करण्यात वेळ घालवत होती. मित्राचा मुलगा थोडासा सेवाज्येष्ठ असल्याने त्याने तिला हटकले. तिथून परतण्याच्या आदल्या दिवशी ती मुलगी त्या मुलाला म्हणाली ,'आज मी तुला ट्रीट देते'. ते दोघे हॉटेलात एकत्र जेवायला गेले. त्या मुलीने मित्राच्या मुलाला बियर किंवा ड्रिंक घेण्याचा आग्रह केला, तो मुलगा काही घेत नसल्याने त्याने सौम्य शब्दात नकार दिला. ती मुलगी मात्र बियर प्याली. हॉटेलवर परतल्यावर ती म्हणाली,'अरे, दोन मिनिटे माझ्या रूमवर येतोस का'? ते रूममध्ये शिरल्यावर ती मूलगीच त्याच्या अंगचटीस येऊ लागली. त्यावर सावध होऊन तो मुलगा तिच्या रूमवरून निघून आपल्या रूम मध्ये गेला. परत आल्यावर त्या मुलीने सह कर्मचाऱ्याबद्दल लैंगिक आत्याचाराची तक्रार केली. त्या सर्व प्रकरणात त्या मुलाला अतिशय मानसिक त्रास झाला. अखेर कोणताही धब्बा न लागता तो सुटला. त्या मुलाचा मानसिक त्रास अगदी जवळून बघितला आहे. त्याने लवकरच ती नोकरी बदलली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

एका मित्राची पत्नी

साहना
गुरुवार, 05/25/2023 - 21:54 नवीन
एका मित्राची पत्नी कुटुंबियांच्या चिथवण्यावरून त्याला सोडून गेली. पार येण्यासाठी पैसे मागू लागली. त्याने साफ नकार दिला. मग नंतर घरी आली, पतीची माफी मागितली आणि त्याच दिवशी सेक्स ची मागणी केली. सुदैवाने हा मुलगा चतुर होता त्याने तिला सरळ घराबाहेर हाकलले. मॅरिटल रेप ची केस बनविण्यासाठी मुलीच्या वकिलाने तिला घरी शिकवून पाठविले होते. मुलगा जर बळी पडला असता तर ताबडतोप सरकारी दवाखान्यात तपासणीची वगैरे व्यवस्था वकिलांनी करून ठेवली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar

मॅरिटल रेप ची केस

तर्कवादी
गुरुवार, 05/25/2023 - 22:17 नवीन
मॅरिटल रेप ची केस बनविण्यासाठी मुलीच्या वकिलाने तिला घरी शिकवून पाठविले होते
मॅरिटल रेपचा कायदा कधी झाला भारतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार स्वत:च्या स्त्रीबरोबर शरीरसबं

Trump
Fri, 05/26/2023 - 11:23 नवीन
मग नंतर घरी आली, पतीची माफी मागितली आणि त्याच दिवशी सेक्स ची मागणी केली.
सेक्स = शरीरसबंध, संभोग, प्रणयराधना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार स्वत:च्या स्त्रीबरोबर शरीरसबंध ठेवणे हा पुरुषाचा हक्क आहे. त्यामुळे तो गुन्हा होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

मग ते बच्चन साहेबांनी नो

कानडाऊ योगेशु
Fri, 05/26/2023 - 11:55 नवीन
मग ते बच्चन साहेबांनी नो मीन्स नो असे गुरगुरत म्हटले ते कशाबद्दल होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

वैवाहिक बलात्कार

Trump
Fri, 05/26/2023 - 12:09 नवीन
The Supreme Court of India is set to hear petitions about the constitutionality of the ‘marital rape exemption’ on May 9, 2023. As of 2019, marital rape has been criminalized in 150 countries, but marital rape under the Indian Penal Code (IPC) only applies in the situation of “non-consensual intercourse with a wife who is aged between 12 and 15 years”. Where the exception does not apply, the IPC (Section 375) states that “sexual intercourse by a man with his own wife, the wife not being under fifteen years of age, is not rape.”
https://www.equalitynow.org/news_and_insights/a-ruling-on-marital-rape-in-india-is-coming-up-heres-why-you-should-be-watching-closely/ -------------------
https://www.indiatoday.in/law/story/law-that-says-sexual-intercourse-between-man-and-wife-isn-t-rape-even-if-by-force-1845850-2021-08-26 Law that says sexual intercourse between man and wife isn't rape even if by force Chhattisgarh High Court today held that sexual intercourse by a man with his wife is not rape, even if it was by force or against her wish. The High Court, on the basis of this reasoning, discharged a man for the offence of rape while at the same time upholding the charges against him for unnatural sex.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

आमच्या अत्यंत जवळच्या

साहना
गुरुवार, 05/25/2023 - 11:15 नवीन
आमच्या अत्यंत जवळच्या मित्राची गोष्ट आहे. अत्यंत गरीब परिस्थितून वर आला, IIT शिक्षण, अत्यंत बुद्धीमान इत्यादी. घराची परिस्थिती इतकी गरीब कि साधारण एकूण नेट वर्थ १,००,००० पेक्षा कमी असावे. मी साधारण त्याच्याच वयाची आणि त्याच्यासोबत फिरणे वगैरे होत असे. (दूरचे रिलेशन असल्याने आमचे नाते शक्य नव्हते). एका आंटीने माझ्यावर दबाव टाकला कि ह्या पोराला आत्ताच अमुक मुली सोबत साखरपुडा करायला सांग. त्याने फक्त हो म्हणावे मी १० दिवसात सर्व करते. ५ रुपये खर्च करण्याची गरज नाही. मी म्हटले कि मुलगी कोण ? तर एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याची (डायरेक्टर ऑफ समथिंग) एकुलती एक पोरगी. मी म्हटले मग तो ह्याला कशाला देईल पोरगी ? पण आंटी मानेना. मी सहज मित्राला म्हटले. त्याला इंटरेस्त नव्हता कारण त्याला इंग्लंड मध्ये शिष्यवृत्ती मिळत होती पण तारुण्य सुलभ कुतूहलाने आम्ही म्हटले हि मुलगी पाहून तरी घेऊया. त्यामुळे आम्ही पत्ता काढला आणि त्या सरकारी अधिकाऱ्याच्या भल्या मोठया बंगल्यापुढे गाडी पार्क करून नजर ठेवली. हि मुलगी फेसबुक वगैरेवर नव्हती. शेवटी आम्हाला दिसली. साधारण म्हस आणि रानडुक्कर ह्यांच्या सारखी दिसणारी आणि किमान ३०० पाऊंड तरी वजन असेल. म्हणजे हि रिक्षा वैगैरेत मावणे शक्यच नव्हते. मी माझ्या आंटीला बरेच फैलावर घेतले. ती वरून म्हणते कि बापाने जावयासाठी बंगला, गाडी आणि इतर अनेक असेट्स ठेवले आहेत. शेवटी माझ्या मित्रानेही थेट हिच्या सोबत लग्न करण्यापेक्षा मी सन्यास घेईन असे सांगून अँटीचें तोंड बंद केले. नंतर ह्या मुलीचे लग्न झाले आणि २ महिन्यात मुलगी घरी परत. मी मुद्दाम आंटीला फोन करून कारण विचारले. तर म्हणजे जावयाला सासर्याने ह्युंदाई वेर्णा गाडी दिली. एक दिवस गर्दीतून गाडी चालवत असताना कुठे तरी लागली. त्यावर मुलीने पतीला सुनावले, माझ्या बापाची गाडी आहे, सांभाळून चालाव इत्यादी. गाडी आणि पापा कि परी ह्या दोन्हांची रवानगी पतीने घरी केली.
  • Log in or register to post comments

हुंडा /तडजोड मुल्य आणि आत्मनिर्भरता

तर्कवादी
गुरुवार, 05/25/2023 - 17:07 नवीन
धाग्याचा मुख्य विषय हुंडा हा नाही. पण त्यावरही चर्चा झाली आहे. त्यामुळे त्याबद्दल मी काही मत मांडतो. हुंड्याकरिता ऐनवेळी अडून बसणे, लग्नानंतर विविध तर्हेने अधिकचा हुंडा मागणे , त्याकरिता वधूचा छळ मांडणे ह्या गोष्टी निश्चितच निंदाजनक आहेत. पण दुसरीकडे असे बघा की एखादा बीए वा बी कॉम उत्तीर्ण झालेला, कुठेतरी साधीशी-कमी पगाराची नोकरी करणारा मुलगा आणि उच्चशिक्षित, सुंदर , चांगली नोकरी करणारी मुलगी यांचा विवाह ( त्यातही नियोजनपूर्वक / अ‍ॅरेंज्ड) होवू शकतो काय ? अगदी हजारांत एखादा अपवाद असेल तर तो बाजूला ठेवून ढोबळ मानाने सांगा ... पण तेच सामन्य रुपाची किंबहूना कुरुप सुद्धा , साधारण शिक्षण असलेली मुलगी व उच्चशिक्षित / उत्तम नोकरी असणारा मुलगा यांचा विवाह ही फार सामान्य गोष्ट आहे. हे शक्य होते ते हुंड्यामुळेच ना ? याला हुंडा न म्हणता खरे तर तडजोड मुल्य म्हणायला हवे. तडजोड कोणत्याही स्वरुपात असू शकते. हुंडा हा त्यातला एक रोखठोक प्रकार. पुर्वी साटेलोटे (मुलाच्या बहिणीचे लग्न मुलीच्या भावासोबत जुळवणे) पद्धत होती, ती ही बहुधा अशा प्रकारच्या तडजोडीचे एक स्वरुप असावे. "दम लगा के हाएशा" हा चित्रपट आपण पाहिला असेल तर त्यात दहावी अनुत्तीर्ण , फारसे उत्पन्न नसलेला पण रुपाने देखणा कनिष्ठ मध्यमवर्गीय नायक (आयुष्मान खुराणा) अभ्यासात हुशार, स्पर्धा परिक्षेची तयारी करत करिअर घडवू पाहणारी पण आकाराने अवाढव्य व त्यामुळे रुपाच्या खात्यात शून्य (की उणे ) गुण असलेली नायिका (भूमी पेडणेकर) यांचा विवाह होतो. माझ्या आठवणीप्रमाणे यात हुंड्याची देवाणघेवाण दाखवलेली नाही. पण नायकाचे शिक्षण / करिअर /उत्पन्न याबाबतीत नायिकेने केलेली तडजोड हा एक प्रकारचा हुंडाच आहे. आपण आयुष्यात तडजोडी करुन जगू नये असे प्रत्येकालाच वाटते. पण अशा विविध तडजोडी होतात हे सत्य आहे. उच्चशिक्षित मुलाने घेतलेला हुंडा म्हणजे भीक वा खंडणी नव्हे पण त्याने स्वीकारलेल्या तडजोडीचे ते मुल्य आहे. ते मुल्य म्हणजे १०-१५-२५ लाख वगैरे रुपये हे पैशाच्या स्वरुपात उघड दिसून येते. पण मुलाने केलेली तडजोड काय / त्याचे मुल्य काय ते नेहमीच उघडपणे दिसून येत नाही. (ज्या मुलाला तडजोड स्वीकारुन मन मारत जगायचे नाही तो हुंड्याची अपेक्षा करत नाही, किंबहूना वधुपित्याने स्वेच्छेने दिलेल्या भेटीसुद्धा स्वाभिमानाने नाकारतो.) मुलाच्या पालकांनी मिळणार्‍या हुंड्याकरिता मुलाला त्याचे मन मारायला लावणे (त्याला आवडेल अशा मुलीशी त्याचे लग्न न लावता केवळ अधिक हुंडा देणार्‍या मुलीशी त्याचे लग्न लावून देणे) चुकीचे. तसेच मुलीच्या पालकांनी मुलीला अर्थिकडृष्ट्या स्वावलंबी बनवण्याकरिता प्रयत्न करणे, स्वतःच्या आरोग्याची, फिटनेसची तिने काळजी घ्यावी अशी तिला सवय लावणे हे न करता पैशाच्या जोरावर जो मुलगा केवळ तडजोड म्हणून मुलीला स्वीकारायला तयार झाला आहे त्याच्या गळ्यात बांधणे हेसुद्धा चुक. त्यामुळे दोघांच्या जीवनात प्रेम, ओढ न राहता केवळ तडजोड्/व्यवहार शिल्ल्लक राहतो (बहुधा). मुलीच्या पालकांनी मुलीला अर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यावर भर दिला पाहिजे तसेच आपल्या अपत्याचे लग्न झालेच पाहिजे हा अट्टहास मनातून काढून टाकायला हवा. एखादी मुलगी सुशिक्षित / स्वावलंबी असूनही तिच्या रुपामुळे तिचे लग्न होत नसेल तर ते सत्य स्वीकारावे. एखाद्या मुलाने तडजोड म्हणून तिला स्वीकारावे यापेक्षा तिचे लग्न नाही झाले हे वास्तव कमी क्लेषकारक असेल. मुलगा वा मुलगी कुणीही आपला जोडीदार आपल्याला आवडला/ली असल्यासच (आणि आपणही त्याला /तिला पसंत आहोत याची खात्री झाल्यावर) लग्न करावे. लग्नात प्रेम व ओढ (पॅशन) असावी , तडजोड नाही. एक प्रसिद्ध वाक्य इथे उद्धृत करतो "You don’t marry someone you can live with, you marry the person who you cannot live without.” "
  • Log in or register to post comments

> हुंड्याकरिता ऐनवेळी अडून

साहना
गुरुवार, 05/25/2023 - 21:51 नवीन
> हुंड्याकरिता ऐनवेळी अडून बसणे, लग्नानंतर विविध तर्हेने अधिकचा हुंडा मागणे , त्याकरिता वधूचा छळ मांडणे ह्या गोष्टी निश्चितच निंदाजनक आहेत. बरोबर. हुंडा आहे ह्याचा अर्थ ह्या प्रकारचं निंदनीय घटना घडतीलच असे नाही. आज सुद्धा देशांत असंख्य लागेन हुंड्याच्या जोरावर होतात पण ह्या निंदनीय गोष्टी घडत नाहीत. हुंड्यासाठी छळ मांडणारे कुटुंबीय कायद्याला घाबरत नाहीत, कायदा काहीही असू अश्या घरात पोरगी लोटणे म्हणजे तिला संकटात फेकण्यासारखेच आहे. पण अशामुळे संपूर्ण हुंडा प्रथेला अनैतिक ठरविणे चुकीचे आहे. सरकारी नोकरी असलेल्या अधू मुलीने बेरोजगार तरुणाकडे लग्न करावे हा सुद्धा हुंडाच आहे, इथे चेक आधीच फाडला जात नाही तर हप्त्या हप्त्याने फाडला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

नाही त्या वरदक्षिणा म्हणातात.

Trump
Fri, 05/26/2023 - 11:23 नवीन
आज सुद्धा देशांत असंख्य लागेन हुंड्याच्या जोरावर होतात
नाही त्या वरदक्षिणा म्हणातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

हुंडा म्हणजे फक्त

चौकस२१२
Sat, 05/27/2023 - 10:40 नवीन
हुंडा म्हणजे फक्त मुलीकडच्यांनी लग्न जुळावे म्हणून देणे आणि त्याची अपेक्षा मूला कडच्यांनी ठेवणे आणि तो स्वीकारणे हि व्याख्या जर असले तर ते चुकीचे आणि कायद्यात बसत नाहीच मग राहिला काय तर नवीन संसाराला मदत म्हणून दोन्ही कडच्यांनी समान मदत करणे यात लग्नाच्या खरचा पासून ते इतर भेट वस्तू पैसे सगळे आले हे देणे याचा पाठपुरावा होऊ शकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

हुंडा म्हणजे फक्त

चौकस२१२
Sat, 05/27/2023 - 10:41 नवीन
हुंडा म्हणजे फक्त मुलीकडच्यांनी लग्न जुळावे म्हणून देणे आणि त्याची अपेक्षा मूला कडच्यांनी ठेवणे आणि तो स्वीकारणे हि व्याख्या जर असले तर ते चुकीचे आणि कायद्यात बसत नाहीच मग राहिला काय तर नवीन संसाराला मदत म्हणून दोन्ही कडच्यांनी समान मदत करणे यात लग्नाच्या खरचा पासून ते इतर भेट वस्तू पैसे सगळे आले हे देणे याचा पाठपुरावा होऊ शकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

लोल

हणमंतअण्णा शंक…
गुरुवार, 05/25/2023 - 19:19 नवीन
एकंदरीतच मौज आहे. एकंदरीतच दहा-एक हजार वर्षांचे उट्टे आजकालच्या मुली पैतृक समाजव्यवस्थेवर काढत आहेत हे पाहून गंमत वाटली. बाकी, बाकी म्हणाल तर धागाकर्ती/कर्ते जरा माणसांत मिसळल्या/ले तर सँपल सेट अजून वास्तविक झाला असता. बाकी काय, तालेब बिलेब वाचीत राहा, उधळण्या ज्ञानकण साठवित राहा, घेतला वसा टाकू नका एवढी माफक अपेक्षा.
  • Log in or register to post comments

हा हा

Bhakti
Fri, 05/26/2023 - 12:23 नवीन
एकंदरीतच दहा-एक हजार वर्षांचे उट्टे आजकालच्या मुली पैतृक समाजव्यवस्थेवर काढत आहेत हे पाहून गंमत वाटली. मीनव्हाईल लग्नाळू मुले ;) https://www.instagram.com/reel/CsbgQzbOTlV/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

हा हा

Bhakti
Fri, 05/26/2023 - 12:23 नवीन
एकंदरीतच दहा-एक हजार वर्षांचे उट्टे आजकालच्या मुली पैतृक समाजव्यवस्थेवर काढत आहेत हे पाहून गंमत वाटली. मीनव्हाईल लग्नाळू मुले ;) https://www.instagram.com/reel/CsbgQzbOTlV/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

हे जरा गोंधळात टाकणारे आहे

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 05/25/2023 - 19:49 नवीन
मुलगा वा मुलगी कुणीही आपला जोडीदार आपल्याला आवडला/ली असल्यासच (आणि आपणही त्याला /तिला पसंत आहोत याची खात्री झाल्यावर) लग्न करावे. लग्नात प्रेम व ओढ (पॅशन) असावी , तडजोड नाही. अ‍ॅरेंज मॅरेज मधे बर्‍याच गोष्टी लग्नानंतरच समजुन येतात. १०-२० वर्षात जे समजत नाही ते १०-२० दिवसात कसे समजणार? शिवाय बरीचशी अ‍ॅरेंज मॅरेज ही "घरचे म्हणतात म्हणुन" होतात. नवरा/नवरीला तेव्हा तितकीशी अक्कल नसते.(मरतंय आता :) पळा). अजुन एक म्हणजे पहीले काही दिवस नखरे करुन "हे नको/ते नको" केल्यावर थोडी अक्कल येऊन अपेक्षा कमी कमी होत जातात आणि "काहीही चालेल" पर्यंत मजल जाते. जन्मभर एकटे रहाण्याची तयारी असणारे थोडेच असतात, मग तडजोड्च पर्याय उरतो. अजुन एक म्हणजे या सगळ्यात आपण वर/वधू शिकलेले, हातीपायी धड(अव्यंग) वगैरे अध्याह्रुत धरले आहे. तसे नसल्यास तडजोड करावीच लागणार ना? आमच्या नात्यात एक पायाने अधू, पण सरकारी नोकरी असणारी मुलगी होती. चाळीशी आली पण लग्न जमेना. मग एक कमी शिकलेला मुलगा मिळाला, स्थिर नोकरी नाही. पण सामोपचाराने लग्न झाले, संसार झाला, मुलगा झाला. मुलाचे शिक्षण वगैरेही झाले. सगळे घर जन्मभर तिनेच चालवले. अर्थात सगळे काही आलबेल नव्हते, पण पार पडले. म्हातारपणी तिने आई वडीलांनाही नवर्याच्या मदतीने सांभाळले. त्यानी सुखाने डोळे मिटले. तडजोड न करता हे झाले असते का?
  • Log in or register to post comments

पण पार पडले

तर्कवादी
गुरुवार, 05/25/2023 - 22:14 नवीन
पण पार पडले
पार पडणं हेच एकमेव उद्दिष्ट होवून जातं आयुष्याचं... तडजोड न करता हे झाले असते का? आयुष्यात सगळं काही असेल पण जोडीदारबद्दल प्रेम / ओढ नसेल तर अशी तडजोड असू नये इतकंच मला वाटतं.. बाकी शिक्षण, उंची , पगार ई तडजोडी दुय्यम आहेत..अर्थात ज्याचा त्याचा विचार आणि दृष्टीकोन.. पण तडजोडी होतात हे वास्तव आहेच...तडजोडी झाल्याच नसत्या तर कदाचित हा प्रतिसाद लिहायला मी अस्तित्वात नसतो किंवा वाचायला तुम्ही (कृपया व्यक्तिशः घेवु नका)
शिवाय बरीचशी अ‍ॅरेंज मॅरेज ही "घरचे म्हणतात म्हणुन" होतात
अ‍ॅरेंज मॅरेज ही संकल्पना मोडीत काढायला हवी.. किमानपक्षी पहिली पायरी म्हणून घरच्यांनी बाळासाठी/बेबीसाठी स्थळ बघणे, पारखणे, छाननी करणे व निर्णयप्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणे हे तरी बंद करावं. (वरच्या एका प्रतिसादात मी हेच म्हंटलंय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

+१

Bhakti
Fri, 05/26/2023 - 09:24 नवीन
+१ तडजोडीचा पाया जर शारीरिक व्यंग ,रंग,वजन,उंची,अधूपणा,काही स्किन इश्यु,हेअर इश्यु इत्यादी असेल तर त्यातून ही तडजोड न्यूनगंड म्हणून कायम राहणार नाही का? शेवटी लग्न हेच सर्वस्व नाही हे निदान आजच्या पिढीने तरी ओळखावे. एक मुलगी आहे.ती कमालीची हुशार आहे.पण एक शुल्लक समस्या आहे.पण मुलगी म्हणून तिला तिचा न्यूनगंड नाही.करीयरच्या बाबतीत तिने काही चुका केल्या आहेत.त्या सुधारणा करूनच लग्न करेन असं ठरवलं आहे.कोणी आपल्यावर उपकार करू नये ,प्रेमानेच स्वीकार करावा असा मानस आहे (finger r crossed :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

शेवटी लग्न हेच सर्वस्व नाही

तर्कवादी
Fri, 05/26/2023 - 15:54 नवीन
शेवटी लग्न हेच सर्वस्व नाही हे निदान आजच्या पिढीने तरी ओळखावे. अगदी. आणि त्याबरोबर लनाआधी शरीरसंबंध असणे हे काही पाप नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा