कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात?

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
6 Sep 2010 - 1:55 pm
गाभा: 

प्रतिक्रिया

निरन्जन वहालेकर's picture

6 Sep 2010 - 2:04 pm | निरन्जन वहालेकर

भंयंकर प्रकार ! पाशवी पणाचा कळस ! ! !

परिकथेतील राजकुमार's picture

6 Sep 2010 - 2:23 pm | परिकथेतील राजकुमार

बाप रे !!

'जख्मी औरतची' आठवण झाली. आमचे पका काका म्हणतात तसा एखादा योग त्या रिक्षावाल्याच्या पत्रिकेत आला असावा.

इंटरनेटस्नेही's picture

6 Sep 2010 - 2:36 pm | इंटरनेटस्नेही

बापरे! अशा गुन्हेगारांना मग स्त्री असो वा पुरुष, सौदी स्टाईल शिक्षाच व्हायला हवी.
लाहोल विलाकुवत!

प्रसन्न केसकर's picture

6 Sep 2010 - 4:00 pm | प्रसन्न केसकर

इंग्रजीत बॉबिट (bobbit)असे म्हणतात. १९९३ मधे लॉरेना बॉबिट या महिलेने आपल्यावरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी आपल्याच पतीचे तो झोपेत असताना लिंग कापले होते. या प्रकारावरुन हे नांव पडले. परंतु अश्या प्रकारचे गुन्हे त्याआधीही घडत. क्रिमिनॉलॉजीमधे अश्या प्रकारच्या गुन्ह्यांना लिंगविकृतीशी संबंधित गुन्हे समजले जाते. बहुतेकदा बॉबिट च्या प्रकरणातील आरोपी एकतर लैंगिक अत्याचाराचा बदला घेण्यासाठी गुन्हा करतात तर काही अपवादात्मक प्रकरणांमधे ते लिंगपिसाट असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

6 Sep 2010 - 4:02 pm | अविनाशकुलकर्णी

पाशवी असतात व मायावी पण असतात

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Sep 2010 - 4:20 pm | llपुण्याचे पेशवेll

भयानक.

मस्त कलंदर's picture

6 Sep 2010 - 4:30 pm | मस्त कलंदर

पण मला एक कळत नाही, नेमक्या तुम्हालाच अशा बातम्या कशा काय सापडतात??? आम्हाला उगाच राजकारण्यांचे लंबुळके चेहरे, अमक्या सेलिब्रिटीचे लग्न ढमक्याशी, भारत हजार ठिकाणी खेळात हरला असल्याच बातम्या सापडता!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Sep 2010 - 4:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण मकीला पडलेला प्रश्न मलाही पडलाय; मला तर कोंकोणा आणि रणबीरच्या लग्नाची बातमी दिसली टीओआयमधे!

'पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना' मुळे असावं! :)

सुनील's picture

6 Sep 2010 - 5:01 pm | सुनील

पेपर सगळ्याच बातम्या देतो. ज्याला जे हवे ते त्याने वाचावे! कुणाला काश्मिर तर कोणाला कोंकणा!!

श्रावण मोडक's picture

6 Sep 2010 - 6:52 pm | श्रावण मोडक

नेमक्या तुम्हालाच अशा बातम्या कशा काय सापडतात???

शोधा म्हणजे सापडेल, असं म्हणतात बुवा!!!

नेमक्या तुम्हालाच अशा बातम्या कशा काय सापडतात?

नित्शे नावाच्या एका प्रसिद्ध तत्त्वज्ञाचे एक प्रसिद्ध वाक्य आहे - women are barbarous in love and vengeance. नित्शेचे हे विधान खरं की खोटं याचा शोध घेतो आहे. अशा बातम्या नित्शेच्या विधानाला पुष्टी देतात.

वेताळ's picture

6 Sep 2010 - 5:31 pm | वेताळ

मला वाटते ती मिक्स फ्रुट कापुन विकत असावी. माणुस न मारता असे काम तिची कलाकुसर दाखवते.
बाकी ते वाईट होती का चांगली किंवा रिक्षावाला चांगला का वाईट हे पुर्ण सत्य कळाल्या खेरीज समजणार नाही.

jaypal's picture

6 Sep 2010 - 6:38 pm | jaypal

"पुरुष" नाटकाची आठवण झाली.

मदनबाण's picture

6 Sep 2010 - 6:51 pm | मदनबाण

"पुरुष" नाटकाची आठवण झाली.
हेच म्हणतो...

(नाना पाटेकरचा पंखा)

एका बाईंना काहीतरी कापाकापी केली म्हणून स्त्रीया पाशवी असतात का असला जाहीर प्रश्न कसा काय विचारू शकता तुम्ही??
आणि कुठं गेल्या त्या स्त्रीमुक्तीवाल्या... ;-)

स्त्रीया पाशवी असतात का असला जाहीर प्रश्न कसा काय विचारू शकता तुम्ही??

मी काय प्रश्न विचारला आणि तुम्ही माझ्या तोंडी काय घातले? असा प्रश्न विचारणे बेकायदेशीर आहे की अनैतिक??

यशवंतकुलकर्णी's picture

6 Sep 2010 - 7:45 pm | यशवंतकुलकर्णी

मी कशाला तुमच्या तोंडी काही घालू...शीर्षकच पाहा तुमचे
"कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात?"
तुमचा हा प्रश्न बेकायदेशीर आहे आणि अनैतिकसुध्दा आहे. आमच्यासारख्या अननुभवी लोकांच्या मनात त्यामुळं उगाच स्त्रीयांबद्दल भीती निर्माण होईल.

मी म्हणतो स्त्रीया पाशवी नसतात!!!!

स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरं.

अवांतरः आम्हाला स्वर्ग पहायचा नाही, मूळ प्रश्नावर ऑब्जेक्शन नाही.

युयुत्सु's picture

6 Sep 2010 - 8:41 pm | युयुत्सु

तुमचा हा प्रश्न बेकायदेशीर आहे आणि अनैतिकसुध्दा आहे.

योग्य दाखले देऊन आपले म्हणणे सिद्ध करा नाहीतर मी तरी तुमच्या प्रतिसादांकडे दूर्लक्ष करेन.

यशवंतकुलकर्णी's picture

6 Sep 2010 - 9:00 pm | यशवंतकुलकर्णी

व्वा!!! सिध्द झाले नाही आणि तुम्ही माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले तर जसं काय आकाशच कोसळणार आहे. आणि यात दाखले देऊन सिध्द करण्यासारखं काय आहे??
कुठल्यातरी पागल बाईनं काहीतरी कापाकापी केली, कोणत्यातरी बाराण्याच्या पेपरनं त्याची बातमी करून छापली आणि तुम्ही त्यावर आधारीत राहून "कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात??" असा जाहीर सवाल विचारताय. इथं चर्चा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एखादी स्त्री अपवाद असू शकेल असा विचार बिलकुल करावा वाटला नाही. तुमचा हा प्रश्न तुमचा बेकायदेशीर, अनैतिक प्रश्न आहे म्हणून सिद्ध करताना तुम्हालाही विचारात घ्यावं लागेल आणि मग पुढची चर्चा व्यक्तिगत पातळीवर उतरेल. म्हणून थांबतो.

युयुत्सु's picture

7 Sep 2010 - 7:20 am | युयुत्सु

तुमचा हा प्रश्न तुमचा बेकायदेशीर, अनैतिक प्रश्न आहे म्हणून सिद्ध करताना तुम्हालाही विचारात घ्यावं लागेल

एखादा प्रश्न कायदेशीर आणि नैतिक आहे अथवा नाही हे ठरवणे जर व्यक्तीसापेक्ष असेल ( म्हणजे प्रश्न विचारणा-या व्यक्तीवर अवलंबून असेल) आणि ते जर सिद्ध करता येत नसेल तर माझ्या दृष्टीने तो जातिवंत बिनडोकपणा असेल.

यशवंतकुलकर्णी's picture

7 Sep 2010 - 12:34 pm | यशवंतकुलकर्णी

तुमचा जन्म पाशवी स्त्री च्या पोटी झालेला नाही ही सत्यता असूनही तुम्हाला असला अश्लाघ्य प्रश्न विचारावा वाटला.

तुम्ही जी कोणती स्त्री साथीदार म्हणून निवडली असेल ती पाशवी नाही ही सत्यता असूनही तुम्ही ही निर्लज्ज आरोळी ठोकली.

तुमच्या पोटी स्त्री जन्माला आली असेल ती पाशवी नाही ही सत्यता असूनही भर चव्हाट्यावर ही असंबध्द बडबड तुम्ही करू शकता.
वरील सत्यतांचा ढळढळीत प्रकाश तुम्हाला दिसू शकत नाही. यावरून हेच दिसतं की व्यक्तिसापेक्षतेचा विचार तुम्हाला तुमच्यापुरतासुध्दा देखील करता येत नाही. आणि हाईट ऑफ इट २४ तास उलटून गेले तरी तुम्हाला असा प्रश्न विचारल्याबद्दल यत्किंचितही पश्चात्ताप होत नाही. जाहीर मंचावर "कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात" याच शीर्षकाखाली चर्चा पुढे चालू ठेवता.
तुम्हाला मागच्या प्रतिसादात चर्चा व्यक्तीगत पातळीवर येईल याबद्दल सावधान केल्यानंतरही नसती गरळ टाकीत उगाच वाद पुढे रेटता.
मी तुमच्यासमोर काहीही सिद्ध केलं तरी काही अर्थ नाही कारण प्रश्न तुमचा आहे.

योग्य दाखले देऊन आपले म्हणणे सिद्ध करा नाहीतर मी तरी तुमच्या प्रतिसादांकडे दूर्लक्ष करेन.

हा हा हा...मेलो !!

बाकी, बातमीतील पुरुषाबद्दल सहानुभूती !

सूड's picture

6 Sep 2010 - 6:48 pm | सूड

स्त्रिया पाशवी नसतात असं ज्यांचं मत असेल ते कदाचित बदलेल हे वाचून.

यशवंतकुलकर्णी's picture

6 Sep 2010 - 8:04 pm | यशवंतकुलकर्णी

असल्या पाणचट बातम्या एकतर छापूनच येऊ नयेत. त्या येतात. लगेच त्यांचं जनरलायझेशन करून "स्रीया पाशवी असतात" असे काही ध्वनितसुद्धा करायची गरज नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Sep 2010 - 8:17 pm | llपुण्याचे पेशवेll

स्रीया हा शब्द काळजास भिडला.

>>असल्या पाणचट बातम्या एकतर छापूनच येऊ नयेत

ही बातमी तुम्हाला पाणचट वाटते ?? मला निव्वळ अमानुषपणा वाटतो.

अवांतरः बाकी स्रीया शब्दाबाबतीत आमचं काहीसं पुपेंसारखंच झालंय.

यशवंतकुलकर्णी's picture

6 Sep 2010 - 9:20 pm | यशवंतकुलकर्णी

पाणचटपणा ही अमानुष होण्याची सुरूवात आहे. म्हणून दोन्ही सारखंच. ;-)

सूड's picture

6 Sep 2010 - 11:38 pm | सूड

>> पाणचटपणा ही अमानुष होण्याची सुरूवात आहे.

नवीन माहितीबद्दल धन्यवाद.

स्वगतः पाणचट आमटी, भाजी नवर्‍याला वाढणे स्त्रियांच्या अमानुषपणाची सुरुवात असते असा अर्थ घ्यावा का रे भाऊ ??

यशवंतकुलकर्णी's picture

6 Sep 2010 - 11:47 pm | यशवंतकुलकर्णी

मी कधी कुणाला कशाचा अर्थ विचारत नाही आणि सांगत तर बिलकुलच नाही. तुमचं तुम्ही बघून घ्या.

तुम्हाला विचारत सुद्धा नाही.
>>पाणचटपणा ही अमानुष होण्याची सुरूवात आहे. म्हणून दोन्ही सारखंच.
हे असले अर्थ म्हणजे कळलं आम्हाला एकंदर काय आहे ते. ज्याला सुरुवात आणि त्याच्या पुढची पायरी हे दोन्ही सारखं वाटतं असल्या माणसाला काय विचारणार ? म्हणूनच 'स्वगत' चा अर्थ आपणांस उमगला नसावा, आणि आपण ते स्वतःवर ओढवून घेतलंत. आपल्या मराठीच्या ज्ञानाबद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे. त्यामुळे तुमचं चालू द्या, मी निरोप घेतो.
जाता जाता पुन्हा एकदा: आपला स्रीया हा शब्द काळजाला भिडला.

यशवंतकुलकर्णी's picture

7 Sep 2010 - 1:25 pm | यशवंतकुलकर्णी

मी अर्थ सांगत नाही आणि विचारत नाही याचा अर्थ मी विधाने करीत नाही असा घेतलात यात सर्व आले. मी सुद्धा या चर्चेतून आता रजा घेतो.

शानबा५१२'s picture

6 Sep 2010 - 6:59 pm | शानबा५१२

पुरुष व स्त्री ह्यांत काहीच फरक नसतो फक्त काही शारीरीक बदल सोडुन्,माझे म्हणने आज जगाला पटले तर.

some Qs,
1.why did she choose THAT PART OF BODY?

2.What was that person doing while she was CHOPPING?why did not he object?

काहीतरी मते आताच बनवायची घाई करु नकोस.

शानबा५१२'s picture

6 Sep 2010 - 10:47 pm | शानबा५१२

माझे 'तिच्या'बद्दल काय मत आहे ते महत्वाचे,बाकी सर्व गेल्या मसनात.

'ती' नाही भेटली तर मी ही मसनात जाईन्,दुसरीला शोधत.

वाचलस ना,मग आता तु पण जा मसनात!!!

वेताळ's picture

7 Sep 2010 - 10:11 am | वेताळ

तुझ्या "त्या"सगळ्याजर मसनात येणार असल्यातर मला काही काळजी नाही.

शिल्पा ब's picture

6 Sep 2010 - 9:25 pm | शिल्पा ब

युयुत्सुंना अपवाद म्हणजेच सर्वसामान्य असे काहीसे वाटत असावे...नाहीतर सारखे अशा पद्धतीचे धागे त्यांनी काढले नसते..

बातमीतील पुरुशाविषयी सहानुभूती.

बाकी किती स्त्रियांना हुंड्यावरून जिवंत जाळले आहे...किती तरुण अन शोडशवर्षीय मुलींना प्रेमाला प्रतिसाद देत नाही म्हणून जिवंत जाळणे, असिड फेकणे इ. ना तोंड द्यावे लागते आहे...
किती स्त्रियांना बलात्कार करून मारून टाकले आहे....अन या सगळ्यांना पुरून जेव्हा स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहतेय , स्वसंरक्षण करते तेव्हा तिला अबला म्हणायचे...

अरेरे आमचेच चुकले..हा पिडीत महिलांचा आकडा कमीच असावा, कारण स्त्रिया मेल्या फारच पाशवी आहेत...पाशवी अबला म्हणा हवे तर, कारण यांना स्वसंरक्षण पण जमत नाही असे म्हणतात.

पैसा's picture

6 Sep 2010 - 10:58 pm | पैसा

अर्थात असं जनरायलेझशन तुम्हाला का करावंसं वाटलं? अशी वृत्ति कोणाचीही असू शकते!

शाहरुख's picture

6 Sep 2010 - 11:21 pm | शाहरुख

युयुत्सुनी जनरलायझेशन कुठं केलंय पण ?

कुणीतरी त्यांना कधीतरी म्हटलेले आहे की "स्त्रिया पाशवी नसतात"..
त्यावर त्यांनी या बातमीद्वारे हे उत्तर दिलंय "हे बघ, आहे की नाही एकतरी स्त्री पाशवी "

पैसा's picture

6 Sep 2010 - 11:23 pm | पैसा

कुणीतरी त्यांना कधीतरी म्हटलेले आहे की "स्त्रिया पाशवी नसतातच"

हे पण जनयरलायझेशन झालं!

हे पण जनयरलायझेशन झालं!

तोच तर त्यांचा मुद्दा आहे :-)

युयुत्सु राव, चहा तरी पाजा आता !

पैसा's picture

6 Sep 2010 - 11:29 pm | पैसा

तुम्हाला सुपारी दिल्ये का हो?

पैसा's picture

6 Sep 2010 - 11:50 pm | पैसा

आमचा कोणत्याही प्रकारच्या जनरालायझेशनला विरोध आहे!

युयुत्सु's picture

7 Sep 2010 - 1:29 pm | युयुत्सु

सगळे टोणगे गाभण काय हो युयुत्सु??
(एकंदर स्त्री जमातीशी तुमच वाकड असल्याने म्हशी म्हणालो नाही. ) ;)

मिसळभोक्ता's picture

7 Sep 2010 - 5:56 pm | मिसळभोक्ता

म्हशी ह्या पशु असल्यामुळे ऑटोम्याटिक पाशवी प्रवृत्तीच्या असतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Sep 2010 - 6:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिभोकाकांचा विजय असो.

युयुत्सु, सॉयमिल्क वापरता येईल. पाशवी वृत्तीचा संबंधच नाही येणार! ;-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Sep 2010 - 3:39 am | विश्वनाथ मेहेंदळे

कालिजात असताना तर्कशास्त्र शिकवले होते आम्हाला. त्यातील नियमानुसार "स्त्रिया पाशवी नसतात" या वाक्याचे विरुद्धार्थी वाक्य "काही स्त्रिया पाशवी असतात" असे होते "सर्व स्त्रिया पाशवी असतात" असे होत नाही.

युयुत्सु साहेबांनी प्रश्न खूपच ओपन एन्डेड विचारला आहे. मुळात "स्त्रिया पाशवी नसतात" हे वाक्य कुणाचे आहे हेच मला माहित नाही. तसे कुणी म्हणाले नसेल तर हा वादच निराधार आहे. असेही बघता असे काही करणारी ही काय पहिली स्त्री आहे काय? अबु घारेब मधील छळाच्या कहाण्या वाचा. केवळ २३-२४ वर्षाच्या अमेरिकन तरुणींनी काय काय अत्याचार केले युद्धाबंद्यांवर ते वाचा. संदर्भासाठी विकिपीडिया चाळावा.

हे घ्या...
http://en.wikipedia.org/wiki/Abu_Ghraib_torture_and_prisoner_abuse
http://en.wikipedia.org/wiki/Lynndie_England

बाकी मिसळपाव ची या आधीची वाटचाल पाहता, इथे अजून दंगा झाला नाही हे नवलच आहे. कुठे गेल्या साऱ्या रणरागीण्या? अमेरिकेत मोठा वीकांत चालू आहे म्हणून की काय ? (समस्त रणरागीण्यांनी हलके घ्यावे)

शिल्पा ब's picture

7 Sep 2010 - 4:55 am | शिल्पा ब

हे अबु घारीब प्रकरण माहीती नव्हते...कोणत्याही कैद्यांवर असे अत्याचार होणे अमानुशच.

यशवंतकुलकर्णी's picture

7 Sep 2010 - 5:03 am | यशवंतकुलकर्णी

मेहेंदळे साहेब,
इतिहासातील वाक्यांबद्दल वाद नाही. इथं खुद्द युयुत्सुंचा जाहीर प्रश्न आहे "कोण म्हणतं स्त्रिया पाशवी नसतात?"
युयुत्सुंनी तो नित्शेचा संदर्भ फक्त त्यांच्या विधानाला पुरक म्हणून दिलाय.
तर्कशास्त्र इथं गैरलागू आहे. धडधडीत विधान आणि विधान करणारा समोर असताना त्याचा काहीही उपयोग नाही.

युयुस्तु कायमच अपवादात्मक स्त्रियांबद्दल लिहित आले आहेत !
तर युयुस्तु हाच धागा पकडुन आता तुम्ही झाशीच्या राणी बद्दल, ताराराणी बद्दल अगदी गेला बाजार तेजस्विनी बद्दल पण लिहाव ! ज्या प्रकारे शोधुन शोधुन तुम्ही विकृती मांडता त्याच हिरीरीन चांगल ही एकदा लिहायचा प्रयत्न करा, बघा जमत का?

जे या स्त्रि कडुन प्रेम भावनेचा अव्हेर केला म्हणुन वा तो आपला फायदा घेउन आता दुसरी कडे जातोय या भावनेतुन राग येउन झाल त्याचा इतका बाउ कशाकरता? झाल ते वाइटच पण दोघांचा निदान यात काही संबंध तरी होता? जे आज काल एक तर्फी प्रेमातुन वा हुंड्या साठी किंवा फक्त स्वतःच्या सुखासाठी पुरुषांकडुन घडत त्या मानान असे प्रकार .०००१% पण नाही आहेत याची जाणिव ठेवावी.

युयुत्सु's picture

7 Sep 2010 - 8:32 am | युयुत्सु

टक्केवारी कमी असल्याने गांभिर्य कमी होतं का?. तसं असलं तर बलात्कार रोज होत नाहीत. म्हणुन मग त्यांच्याकडे दूर्लक्ष करायचे का? का बायका ठरवतील तेवढेच गुन्हे मानायचे?

प्रकाश घाटपांडे's picture

7 Sep 2010 - 9:05 am | प्रकाश घाटपांडे

टक्केवारी कमी असल्याने गांभिर्य कमी होतं का?

नाही. एखाद्या शस्त्रक्रियेत यशस्वी असण्याचा दर ९९ टक्के असला तरी सर्जन तुम्ही ९९ टक्क्यात मोडता कि उरलेल्या १ टक्क्यात असे अगोदर सांगत नाही. तो संमतीची सही घेतोच. समजा तुमचा रुग्ण दगावला तर तुम्ही १ टक्क्यात जर नाही दगावला त ९९ टक्क्यात. म्हणजेच १ टक्क्यातील लोकांसाठी ते अपयश हे १०० टक्के असते.

तसं असलं तर बलात्कार रोज होत नाहीत. म्हणुन मग त्यांच्याकडे दूर्लक्ष करायचे का?

माझ्या मते रोज काही माणस जन्मतात काही मरतात तसे बलात्कार हे रोज होत असतात. भारतात एकही दिवस असा जात नसेल कि ज्यादिवशी बलात्कार झाला नाही. हा आता ते गुन्हा म्हणुन नोंदवले जाणे ही बाब वेगळी आहे. (माझ्याकडे आकडेवारी नाही) फारतर स्थानिक वर्तमानपत्रात रोज त्याची बातमी नसेल.

का बायका ठरवतील तेवढेच गुन्हे मानायचे?

तसे नक्कीच नाही हे आपणही जाणताच.

युयुत्सु's picture

7 Sep 2010 - 9:30 am | युयुत्सु

बलात्कार हे रोज होत असतात

हे फार धक्कादायक विधान आहे. प्रत्येक पुरुष हा रेपीस्ट असतो या स्त्रीवाद्यांच्या लाडक्या गृहितकाचा वास या विधानात मला येत आहे. विनयभंग रोज होत असतो असं विधान केलं असतं तर पटलं असतं. आपण फक्त नोंदवलेल्या गुन्ह्यांचाच विचार करूया.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Sep 2010 - 10:46 am | प्रकाश घाटपांडे

धक्कादायक असले तरी वास्तव आहे. काही नोंदी नुसार प्रत्येक ३२ मिनिटाला एका बाईवर बलात्कार होत असतो. इथे पहा.
या नोंदी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आधारे नोंदलेल्या आहेत. विनयभंगाची संख्या यापेक्षा जास्तच असणार.

नगरीनिरंजन's picture

7 Sep 2010 - 9:12 am | नगरीनिरंजन

निषेध!
कोणतीही सूड भावना नसलेल्या बिचार्‍या पशूंची उपमा स्त्रियांना देण्याच्या प्रयत्नाबद्दल सर्व प्राणिमित्रांच्या वतीने हार्दिक निषेध!

पैसा's picture

7 Sep 2010 - 9:16 am | पैसा

मला वाटतं माणूस हा एक प्राणी आहे आणि स्त्रिया ही सुद्धा माणसेच आहेत! म्हणजे तुम्ही सगळ्यांचाच निषेध करताय!

नगरीनिरंजन's picture

7 Sep 2010 - 9:22 am | नगरीनिरंजन

मग पाशवी शब्दाला अर्थ काय राहिला? तुमच्या युक्तीवादाप्रमाणे सगळेच पशू आहेत आणि त्यात स्त्रियापण आल्या. मग युयुत्सुरावांवर का तुटून पडतात सगळे?
सोयीस्करपणे कधी प्राणी आणि कधी माणूस व्हायचं हे बरंय का?

पैसा's picture

7 Sep 2010 - 9:34 am | पैसा

आम्हाला भविष्यकाळात पुढारी व्हायचे आहे!

नगरीनिरंजन's picture

7 Sep 2010 - 11:20 am | नगरीनिरंजन

मग तुमचंच बरोबर आहे! शुभेच्छा!
युयुत्सुरावांना नवा विषय. कोण म्हणतं स्त्रिया पुढारी नसतात?

मला वाटते ती मिक्स फ्रुट कापुन विकत असावी. माणुस न मारता असे काम तिची कलाकुसर दाखवते.
बाकी ते वाईट होती का चांगली किंवा रिक्षावाला चांगला का वाईट हे पुर्ण सत्य कळाल्या खेरीज समजणार नाही..............

हा हा हा हा हा हा .................

कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात ? >>

कोण म्हणत दगड्स देव नसतात ?
कोण म्हणत खडु पांढरे नसतात ?
कोण म्हणत फळा काळा नसतो ?
कोण म्हणत झाडं हिरवी नसतात ?
कोण म्हणत पाणी वाहत नसतं ?
कोण म्हणत मनुष्यप्राणी पाशवी नसतात ?
कोण म्हणत ................. नसतात ?
कोण म्हणत ................. नसतात ?
कोण म्हणत ................. नसतात ?
कोण म्हणत ................. नसतात ?
कोण म्हणत
कोण म्हणत
कोण म्हणत
कोण म्हणत

काय पण धागा ? आणी काय त्यावरचे स्वताच दिलेले प्रतिसाद ...
बाकी घागा प्रवर्तकाचे ईतर अश्याच प्रकारचे धागे पाहुन आम्हाला " श्रीमान आशिक " या चित्रपटातील " अनुपम खेर " ने रंगवलिल्या " प्रोफेसर विश्वमित्र " च्या, छाती ताठ करुन म्हटलेल्या " औरत नरकका द्वार है " या डॉयलॉकची फार-फार आठवण येते आणी तो ज्या चित्रपटावर बेतला होता त्याचे एक गाणे आठवते.(लिंकासाठी श्री नंदन यांना संपर्क करावा.)
'बडे मिंया दिवाने '
' ऐसे ना बनो '
'हसीना क्या चाहे '
'हमसे सुनो'

(गर्ल्स स्पेशालिस्ट)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Sep 2010 - 10:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

"बडे मिंया दिवाने" हे गाणं शागिर्द या अतिशय विनोदी चित्रपटातलं आहे.

नंदन हा माझा आयडी नाही.

सुहास..'s picture

7 Sep 2010 - 11:01 am | सुहास..

"बडे मिंया दिवाने" हे गाणं शागिर्द या अतिशय विनोदी चित्रपटातलं आहे >>>

एकदम बरोबर !! दहा पैंकी दहा गुण आपल्याला.

सुहास बांदेकर

तो ज्या चित्रपटावर बेतला होता त्याचे एक गाणे आठवते .

हे वाचायच होत ना !! कॉपी होती पण शागीर्द मधील आयएस जोहर च पात्र जरा वेगळ्या रुपात अनुपम खेर नी केलेल होत ..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Sep 2010 - 11:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वारी शक्तीमान!
पाशवीपणामुळे अर्धाच प्रतिसाद वाचला बहुदा!

पाशवीपणामुळे अर्धाच प्रतिसाद वाचला बहुदा! >>>

=)) =))

चुकुन पिशवीपणामुळे वाचल !!

पिशवीपणा : दर आठवड्याला,रविवारी लोहगावाच्या बाजारात, पिशव्या घेऊन आम्ही जो बाजारहाट करतो,त्याला आमचे मित्र खवाट पणाने 'पिशवीपणा' म्हणतात.

>>कोण म्हणतं स्त्रीया पाशवी नसतात?
मी म्हणतो स्त्रिया पाशवी नसतात.
नियमाला अपवाद असू शकतो . त्यामुळेच एका स्त्रीमुळे सर्व स्त्रिया पाशवी ठरू शकत नाहीत.
बातमी अशी असती तर - रिक्षावाल्या प्रियकराने फळवाली प्रेयसीच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकले. मग तुमचा 'कोण म्हणतं पुरूष पाशवी नसतात?' असा धागा आला असता का? नक्कीच नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Sep 2010 - 1:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पक्या भाऊ गोंधळ होतोय थोडा!

रिक्षावाल्या प्रियकराने फळवाल्या प्रेयसीसाठी काही त्याग केला असेल, (रक्तदान किंवा काहीही) तर "कोण म्हणतं पुरूष पाशवी असतात?" अशी बातमी पाहिजे.

(पाशवी) अदिती

युयुत्सु's picture

7 Sep 2010 - 1:17 pm | युयुत्सु

स्त्रीमुळे सर्व स्त्रिया पाशवी ठरू शकत नाहीत.

मी सर्व स्त्रिया पाशवी असतात असं निश्चित विधान कुठ केले आहे?

निश्चित विधान नाही ना केलं ..मग अनिश्चित विधान तर अजिबातच करू नका. विषय संपला.
पूर्ण प्रतिसादातील फक्त एक शब्द पकडायचा आणि त्यावर वाद घालत बसायचे. चालू द्या.

युयुत्सु's picture

7 Sep 2010 - 1:42 pm | युयुत्सु

पूर्ण प्रतिसादातील फक्त एक शब्द पकडायचा आणि त्यावर वाद घालत बसायचे.

एका शब्दाने जर तुमचा प्रतिसाद निरर्थक ठरत असेल तर ते तुमच्या लक्षात आणून देणे जरूरीचे आहे.

तुमच्या कोण म्हणतं प्रश्नाला मी उत्तर दिलेल आहे त्यामुळे प्रतिसाद निरर्थक ठरण्याचा प्रश्नच येत नाही.
मुळात धाग्याचे शिर्षकच चुकीचे दिले आहे.

विजुभाऊ's picture

26 Jul 2012 - 11:22 am | विजुभाऊ

अरेच्चा हे वाचायचेच राहिले होते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Aug 2012 - 8:43 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मग इतके दिवस प्रश्न नव्हता पडला की हे "पाशवी शक्ती" काय प्रकरण आहे म्हणून ? कमाल आहे..

रमताराम's picture

25 Aug 2012 - 9:55 am | रमताराम

काय हे विमे. तुम्ही विजुभाऊंच्या बोलण्यावर विश्वास ठेवता? अहो आमचे विजुभाऊ म्हणजे जुन्या लेखरत्नांची बिब्लिओग्रफी आहे हो. अचूक वेळी नेमका लेख वर काढतात. हे असे वरवरचे कारण देतात, पण ते तितके महत्त्वाचे नसते. हो की नै विजुभाऊ.

स्पंदना's picture

9 Aug 2012 - 4:48 pm | स्पंदना

http://www.dailymail.co.uk/news/article-2178201/Uroko-Onoja-death-Husban...

अर्थात ही बातमी वाचल्यावर मला युयुंची फाऽऽऽऽऽर आठवण आली.

पुण्याचे वटवाघूळ's picture

24 Aug 2012 - 6:54 pm | पुण्याचे वटवाघूळ

हे वाचा: http://timesofindia.indiatimes.com/city/chennai/Techie-steals-Rs-49L-fro...

(हे केवळ टाइमपाससाठी लिहिले आहे हे वेगळे सांगणे न लागे. असे कोणतेही सरसकट जनरलयझेशन कराणे चुकीचे आहे हे मला माहित आहे.)

विजुभाऊ's picture

28 Aug 2014 - 3:03 pm | विजुभाऊ

रमतारांशी सहमत.
बरेच दिवसात मिपावर युयुत्सुजींचे प्रवचन झाले नाही.

प्रमोद देर्देकर's picture

28 Aug 2014 - 5:19 pm | प्रमोद देर्देकर

कशाला हा धागा काढला हो विजुभावु तुम्ही वरती? आता हा शंभरी गाठणार बघा.

चित्रगुप्त's picture

28 Aug 2014 - 7:23 pm | चित्रगुप्त

'पाशवी' शब्दाविषयी असहमती. कोणताही पशु अशी कापाकापी वगैरे करत नाही. असली कृत्ये मनुष्यप्राणीच करू जाणे.
अश्या केसमधे, म्हणजे एकादा नर पशु त्याच्या नेहमीच्या मादी शिवाय अन्य मादीशी संबंध ठेवतो, असे पहिल्या मादीला वाटले/समजले तर ती नेमके काय करते? यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.