Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by हेमंतकुमार on Fri, 08/19/2022 - 11:26
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
भाग १ इथे. नमस्कार रूळगाडी मित्रांनो ! आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे. इथल्या चर्चेत सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व धागाप्रवाशांचे आभार ! या नवीन भागाचेही नवे आणि जुने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे. तर येउद्यात ट्रेनसंबंधी......... काय वाट्टेल ते ........... ! ok
  • Log in or register to post comments
  • 71317 views

प्रतिक्रिया

Submitted by हेमंतकुमार on Tue, 01/31/2023 - 14:16

Permalink

वंदे भारत नवी गाडी

सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन 10 फेब्रुवारीला होणार.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिकेत वैद्य on Fri, 02/10/2023 - 11:10

In reply to वंदे भारत नवी गाडी by हेमंतकुमार

Permalink

मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अश्या दोन वंदे भारत

माननीय पंतप्रधान ह्यांच्या हस्ते आज (१० फेब्रुवारी २०२३) रोजी मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अश्या दोन वंदे भारत एक्सप्रेसचे उदघाटन होत आहे. कसारा ते इगतपुरी ह्या थळ घाटात आणि कर्जत ते लोणावळा ह्या भोर घाटात बँकर्स न लावता हि गाडी जाऊ शकते. सोलापूर ते मुंबई ह्या प्रवासाला ६ तास ३० मिनिटे वेळ लागणार असून प्रवास भाडे साधारण ११०० रु आहे. पुणे ते मुंबई ह्या प्रवासाला ३ तास २० मिनिटे लागणार असून प्रवास भाडे साधारण ७७० रु. आहे. सोलापूरहून सकाळी ६:०५ वाजता हि गाडी निघून पुणे येथे सकाळी ९:१५ वाजता येईल. पुणे येथील ९:२० वाजता निघून दुपारी १२:४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात मुंबई येथून दुपारी ४ वाजता निघून (पुणे ७:१५) सोलापूरला साधारण १०:३० वाजता पोहोचेल. (मुंबई ते शिर्डी गाडीचे वेळापत्रक आणि प्रवासभाडे ह्याची माहिती मिळाली नाही.)
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 02/10/2023 - 11:28

In reply to मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अश्या दोन वंदे भारत by अनिकेत वैद्य

Permalink

खासदारांची मागणी

मुंबई येथून सोलापूरला येणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या वेळेत बदल करून दुपारी चार ऐवजी संध्याकाळी सहा वाजता मुंबईहून सोडावी, जेणेकरून सकाळी सोलापूरहून आलेल्या व्यापारी व इतर लोकांना मुंबईतील त्यांची कामे उरकून संध्याकाळी पुन्हा सोलापूरकडे रवाना होता येईल असे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 02/11/2023 - 05:44

In reply to वंदे भारत नवी गाडी by हेमंतकुमार

Permalink

वंदे भारत आणि इतर अधिकाधिक आराम गाड्यांबद्दल

दोन शहरांमधील धावणाऱ्या जलद/अतिजलद गाड्या या फक्त व्यापारी पर्यटकांसाठी असतात. (असा समज आहे)खूप खूप सामान नेणाऱ्या प्रवाशांसाठी नसतात. काल (मुंबईहून पुणे मार्गावर) पहिल्या वंदे भारताचा विडिओ डोंबिवलीत मिळवला. गाडीचा वेग १३०पर्यंत जाऊ शकतो. रूळ तसेच आहेत. मुंबई ते सोलापूर ही सहा तासांत जाणार आहे. दिवसा धावणारी मुंबई ते बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस सात तासांत जाते. पण उद्यानाला स्लीपर कोच आहेत. सामान भरपूर राहाते. कोकण रेल्वेवरच्या गाड्या १२० ने जातातच. त्यात नवीन काही नाही. ते रूळ मार्ग सुरवातीपासूनच १५०चे आहेत. वंदे भारतचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला एंजिन वेगळे दिसत नाही. कर्जतला मागे बंकर एंजिने लावावी लागतात का हे कळले नाही. ती जोडण्याची दहा मिनीटे वाचतील. लोकल ट्रेनप्रमाणे डबे आहेत. बऱ्याच गाड्यांप्रमाणे सोळा डबे होते. (सिकंदराबाद गाडीला ? २६ असतात.) परदेशातल्या जलद गाड्यांना चार/सहा/आठच डबे असतात. याने फरक पडतोच. सिटा फिरवता येण्याच्या सोयीची दुसरी वाईट बाजू म्हणजे (बसच्या सिटा असणाऱ्या डब्यांतही) सीटखाली सामान ठेवता येत नाही. वरती फक्त फळी /रॅक आहे. त्यावर सामान ठेवण्यावरून मुंबई गोवा जनशताब्दी गाडीत भांडणे होतात. रेझर्वैशन असणारे प्रवासी इतर गाड्यांत धक्काबुक्की करून चढत नाहीत कारण प्रत्येकाला सामानासाठी भरपूर जागा असते. गोवा जनशताब्दी गाडीत तसे होत नाही. पहिला आत घुसेल तो वरच्या रॅकवर चार पिशव्या ठेवायला पाहतो. नंतरच्या प्रवाशाला जागाच नसते. भांडणे सुरू. गोव्याचे प्रवासी व्यापारी नसून हौशी सुटी घालविण्यासाठी जाणारे भरपूर सामान घेऊन जाणारे असतात. थोडक्यात प्रवाशांच्या प्रकाराप्रमाणे गाडीची वेळ आणि प्रकार ठेवणे गरजेचे आहे. मी तर म्हणेन की लोकल ट्रेनच चालवाव्यात. पण त्यांत टॉयलेट नसतात आणि १६० किमीच्या पुढे अशी गाडी ठेवता येत नाही. मुंबई पुणे थेट लोकल न ठेवण्याचे / जाण्याचे हेसुद्धा कारण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 02/11/2023 - 08:50

In reply to वंदे भारत आणि इतर अधिकाधिक आराम गाड्यांबद्दल by कंजूस

Permalink

सामान

खरंय ! लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तर काही लोक एक क्विंटलच्या पोत्यासह, प्रवासी डब्यांमध्ये परवानगी नसलेले अवजड सामान ठेवतात. अशा गाड्यांमधून लघुपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची एक बॅग ठेवायची देखील चोरी होते
  • Log in or register to post comments

Submitted by अनिकेत वैद्य on Sun, 02/12/2023 - 15:16

In reply to वंदे भारत आणि इतर अधिकाधिक आराम गाड्यांबद्दल by कंजूस

Permalink

>

<<कर्जतला मागे बंकर एंजिने लावावी लागतात का हे कळले नाही.>> कसारा ते इगतपुरी ह्या थळ घाटात आणि कर्जत ते लोणावळा ह्या भोर घाटात बँकर्स न लावता हि गाडी जाऊ शकते. <<थोडक्यात प्रवाशांच्या प्रकाराप्रमाणे गाडीची वेळ आणि प्रकार ठेवणे गरजेचे आहे.>> सद्ध्या वन्दे भारतच्या बरोबरीने इतर (पुर्वी चालू असलेल्या) गाड्या आहेतच की. उलट वन्दे भारत सुरु झाल्याने प्रवासी विभागले जाउन बाकिच्या गाड्यात तिकिटे मिळण्याची शक्यता वाढते.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 02/12/2023 - 20:02

In reply to > by अनिकेत वैद्य

Permalink

पुढे काय?

प्रवासी विभागले जाउन बाकिच्या गाड्यात तिकिटे मिळण्याची शक्यता वाढते. कसं काय? त्या गाड्यांचे प्रवासी वेगळे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Sun, 02/12/2023 - 20:24

In reply to पुढे काय? by कंजूस

Permalink

वेगळे प्रवासी कसे? गाड्या

वेगळे प्रवासी कसे? गाड्या वाढल्यातर प्रवासी नक्कीच विभागले जातील. ज्यांना मुंबई वरून सोलापूरला जायचे असेल आणि ज्यांना भाडे परवडत असेल असे लोक नक्कीच वंदे भारत चा विचार करणार.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 02/11/2023 - 10:18

Permalink

नको तो वेग !

सतत धावपळ आणि वेगवान जीवनाचा कधीतरी कंटाळा येतो ना मग अशा वेळेस प्रवास करायचा तो या कासवगती गाडीने : १० किलोमीटर प्रति तास अशा नीचांकी वेगाने धावणारी भारतीय ट्रेन: Mettupalayam ते उटी Image removed. भारतातील सर्वात वेगवान ट्रेनच्या फक्त एक १/१६ वेग असलेली ही पर्यटकांची लाडकी ट्रेन !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 02/12/2023 - 16:01

Permalink

गणिताचा तास !

रेल्वेमंत्र्यांनी सांगितली 'वंदे भारत'ची यशकथा
या रेल्वेत हादरे नाहीत आणि ध्वनी पातळी विमानापेक्षा १०० पट कमी आहे. गणिताच्या तासाला जशी शांतता असते तशी शांतता असते या रेल्वेत, ’ अशा शब्दांत वैष्णव समजावून सांगत होते
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Mon, 02/13/2023 - 08:10

Permalink

विद्युतीकरण

ईशान्य रेल्वेचा (NER) वाराणसी विभाग १२७२ किलोमीटरचा मार्ग आता पूर्णपणे विद्युतीकृत झाला आहे. देशभर चाललेल्या विद्युतीकरण कार्यक्रमामुळे कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 02/14/2023 - 22:05

Permalink

Delhi Meerut RRTS First Trial Run

हल्लीच ही ट्रायल रन पाहण्यात आली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Honthon Pe Bas | Zaara Yesmin, Parth Samthaan | Seepi Jha, Sameer Khan | Raaj Aashoo |
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 02/15/2023 - 10:34

In reply to Delhi Meerut RRTS First Trial Run by मदनबाण

Permalink

वा !

वेगवान चित्रफित आवडली
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 02/16/2023 - 20:20

Permalink

मालगाडी बेपत्ता !

अजबच! तब्बल नव्वद कंटेनर घेऊन जाणारी मालगाडी बेपत्ता, जाणून घ्या नेमकं काय घडलं Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 02/18/2023 - 17:38

Permalink

तिकीट रद्द : परतावा

आज ट्रेन तिकीट काढताना वेबसाईट वारंवार गंडत होती म्हणून मोबाईलवरून तिकीट काढले. तिकीट काढताना चित्रात दाखवलेला पर्याय प्रथमच पाहण्यात आला. Image removed. आपण तिकिटाच्या रकमेत जर त्यांनी दाखवलेली रक्कम आधीच वाढवून दिली तर मग तिकीट रद्द करायची वेळ आल्यास ९२% रक्कम परत मिळणार असे ते म्हणत आहेत. चित्रात दाखवलेल्या उदाहरणात तिकिटाला ७८२ रुपये पडले आहेत आणि त्यांच्या त्या योजनेचा लाभ घेतला तर ७२५ परत मिळणार असे ते म्हणत आहेत. मी काही तो लाभ घेतला नाही. कुणाला अनुभव आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 02/18/2023 - 17:45

In reply to तिकीट रद्द : परतावा by हेमंतकुमार

Permalink

जर

तो लाभ घेतला तर ते तिकीट ७८२ + ९१ = ८७३ ला पडेल. मग तो परतावा ८३% राहील. काय वाटते अनुभवी लोकांना ?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 02/18/2023 - 18:52

In reply to तिकीट रद्द : परतावा by हेमंतकुमार

Permalink

कळले नाही.

ट्रेन तिकीट काढताना वेबसाईट वारंवार गंडत होती म्हणून मोबाईलवरून तिकीट काढले रेल्वेचे रीफंड, रद्दीकरण यांचे नियम पक्के आहेत. किती तास अगोदर,नंतर,कोणते तिकिट वगैरे. मोबाईलवरून म्हणजे आइआरसिटिसी/ दुसरी कोणती वेबसाईट?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 02/18/2023 - 19:48

In reply to कळले नाही. by कंजूस

Permalink

मोबाईलवरून म्हणजे

रेल यात्री app तो चित्रातला पर्याय मला वेबसाईटवरून तिकीट काढताना कधी दिसला नव्हता.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 02/19/2023 - 06:33

In reply to मोबाईलवरून म्हणजे by हेमंतकुमार

Permalink

Ok

म्हणजे शेवटच्या ४८तासांत रद्द केल्यास रेल्वे पन्नास टक्के कापते तसे मात्र करणार असतील. त्या अगोदर प्रत्येक यात्रीचे रेल्वे कापते (रु८०,/१२०,/१८० )ते कापणार नसतील.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 02/20/2023 - 21:09

In reply to मोबाईलवरून म्हणजे by हेमंतकुमार

Permalink

ही रेल यात्री साईट हॅक झाल्याची बातमी

आजच्या हिंदुस्तान टाइम्समध्ये आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 02/21/2023 - 20:18

Permalink

आंतरराज्य प्रवास रंजन

भारतातील काही मोजक्या ट्रेन्स अशा आहेत की ज्यांचे निघण्याचे स्थानक एका राज्यात असते , त्यांचा जवळजवळ सर्व प्रवास दुसऱ्या मधल्या राज्यातून होतो आणि पोहोचण्याचे स्थानक तिसऱ्याच राज्यात असते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे लोकनायक एक्सप्रेस (१५११५). तिचा प्रवास असा आहे: सुरुवात : छपरा, बिहार सर्वाधिक प्रवास (96.5%) उत्तरप्रदेश मधून अंत : दिल्ली स्थानक. रेल्वे शौकिनांनी खणून काढलेल्या माहितीनुसार असा त्रिराज्य प्रवास आणि मधल्या राज्यातून सर्वाधिक प्रवास करणारी ही पहिल्या क्रमांकाची गाडी आहे. ९६.५% पेक्षा अधिक या प्रकारचा प्रवास असणारी गाडी कोणाला सापडल्यास जरूर कळवा पण लक्षात ठेवा : मधला प्रवास फक्त एकाच वेगळ्या राज्यातून पाहिजे; एकापेक्षा अधिक नको.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 02/22/2023 - 22:55

Permalink

The Journey of Train 18

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Gudilo Badilo Full VideoSong |DJ Duvvada Jagannadham ||
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 02/23/2023 - 15:24

Permalink

प्लॅटफॉर्म उपलब्धता ??

मुंबईहून दक्षिण राज्यांमध्ये जाणारे जे रेल्वे मार्ग आहेत त्यातल्या प्रमुख मार्गांवरचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. बऱ्याच टप्प्यांमध्ये अधिक सक्षम डबे आणि रूळ देखील टाकले गेलेले आहेत. असे असतानाही गाड्यांचे उशिरा धावणे चालूच आहे. काही गाड्या तर दोन स्थानकांच्या दरम्यान पूर्वीपेक्षा बराच वेळ अधिक घेत आहेत. उदाहरणार्थ, उद्यान एक्सप्रेस सोलापूर ते पुणे हा प्रवासाचा वेळ सध्या तब्बल पाच तास आहे, जो पूर्वी चार तास वीस मिनिटेच होता. आज प्रवास करताना हा विषय काही सहप्रवासी असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबर काढला. त्यांनी दिलेले उत्तर असे, "हा सर्व मुद्दा स्थानकांवरील प्लॅटफॉर्म उपलब्ध नसण्याशी निगडित आहे. पुण्याहून मुंबई आणि उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या या "राजाच्या गाड्या" आहेत. त्यांनाच नेहमी प्राधान्य मिळते. दक्षिणेकडून पुण्याला येणाऱ्या गाड्या या 'गरीब बिचाऱ्या' समजल्या जातात. त्यांना मिळेल तेव्हा आणि मिळतो तो प्लॅटफॉर्म कसाबसा दिला जातो. पुणे सोलापूर सुपरफास्ट इंटरसिटीचा प्रवास आता मनात आणले तर तीन तासात संपवता येईल. परंतु वरील कारणास्तव ते होत नाही. प्रवासात मधूनमधून एक्सप्रेस गाड्यांची गती अगदी बैलगाडी इतकी केली जाते "!
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 02/23/2023 - 15:30

In reply to प्लॅटफॉर्म उपलब्धता ?? by हेमंतकुमार

Permalink

भर ...

विद्युतीकरण आणि लोहमार्गांचे दुपदरीकरण या दुहेरी सुधारणा होऊन देखील प्रवाशांच्या वाट्याला संथ प्रवास !
  • Log in or register to post comments

Submitted by संग्राम on गुरुवार, 03/30/2023 - 23:05

In reply to भर ... by हेमंतकुमार

Permalink

कदाचित यानंतर सुधारणा होईल

Dedicated Freight Corridor
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 03/31/2023 - 06:49

In reply to कदाचित यानंतर सुधारणा होईल by संग्राम

Permalink

छान !

अशी प्रगती व्हावी ही इच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 03/13/2023 - 12:39

In reply to प्लॅटफॉर्म उपलब्धता ?? by हेमंतकुमार

Permalink

सहमत.

हल्ली दक्षिणेकडच्या गाड्यांनी सहली झाल्या तेव्हा हे लक्षात आले. त्यांच्या काही खास गाड्या आहेत त्या उशिरा असल्या आणि आपली अगदी वेळेत चालणारी गाडी असली त्यांच दिशेने जाणारी तरी ती थांबवून त्यांना मागून पुढे काढून जाऊ देतात. यामध्ये पंचवीस मिनिटे वाया जातात. अशा तीन गाड्या पुढे काढल्या की दीड तास जातो. मधल्या स्टेशनांत प्रवास करणाऱ्यांना हे फार जाणवतं( चार तासांचा प्रवास साडेसहा तासांचा होतो.) परंतू दूर जाणार असलो तर मात्र आपली गाडी वेळेवर ( वेळापत्रकानुसार) जाते. हा चमत्कार कसा होतो? तर यात चमत्कार नसतोच. मुळात गाडी मागे पडण्याची भानगड धरूनच वेळापत्रकात जादा वेळ बसवलेली असते. या राजधानी,हमसफर,दूरांतो गाड्यांना कायम हिरवा बावटा असतो. त्यांच्याकडे pantry नसली तर जेवण ठराविक स्टेशनावर आत आणले जाते. तेसुद्धा विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीतूनही फिरवतात. मग ती गाडी उशिरा असेल की हिलाही थांबवितात. शेवटी जेवणाची वेळ सांभाळायला हवी ना? प्रवासात डोके थंड ठेवणे, धावत्या गाडीच्या बाहेर न काढणे हे नियम पाळले की त्रास होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 03/15/2023 - 10:03

In reply to सहमत. by कंजूस

Permalink

रेल्वेच्या डिव्हिजन असतात.

रेल्वेच्या डिव्हिजन असतात. तेंव्हा गाडी एका डिव्हिजन मधून दुसऱ्या डिव्हिजन मध्ये जाते तेंव्हा शेवटच्या स्थानात पोचण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जातो म्हणजे शेवटचे स्थानक ३०-३५ किमी असले तरी त्याला एक ते सव्वा तास दिला जातो म्हणजेच ती गाडी अर्धा पाऊण तास उशिराने धावत असली तरी डिव्हिजन संपेपर्यंत ती परत वेळेवर असते आणि गाडी पुढच्या डिव्हिजनच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केली जाते तेंव्हा तो वेळेत असते. अशीच अतिरिक्त वेळ गाडीच्या शेवटच्या स्थानकासाठी दिलेली आहे. यामुळे गाड्या मंदगतीने चालतात परंतु कागदोपत्री सर्व गाड्या वेळेवर चाललेल्या दिसतात. उदा कोणार्क एक्स्प्रेस या गाडीला बेगमपेट ते सिकंदराबाद या पाच किमी अंतरासाठी २५ मिनिटे दिलेली आहेत. किंवा अनकापल्ली ते विशाखपटनम या ३३ किमी ला ८० मिनिटे दिलेली आहेत. आणि खुर्दा रोड ते भुबनेश्वर या शेवटच्या १९ किमी अंतरासाठी ५० मिनिटे वेळ दिलेली आहे. https://indiarailinfo.com/train/-train-konark-express-11019/945/12282/238
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 03/17/2023 - 06:06

In reply to रेल्वेच्या डिव्हिजन असतात. by सुबोध खरे

Permalink

अतिरिक्त वेळ गाडीच्या शेवटच्या स्थानकासाठी दिलेली आहे.

शहरे मोठी होत गेल्याने मुख्य शहरापासून पाच, दहा,पंधरा किमिटरवर परिसरातले अगोदरचे स्टेशनही नाव वेगळे असले तरी त्याचेच सावली भावंडं असते.तिथे प्रवाशांची खूप चढ उतार होते. गाडी जवळपास रिकामी होते/ भरते. त्याला वेळ दिलेला असतो. हे खरे कारण. मध्यंतरीच्या रेल्वे मार्गावर जर तो एकेरी असेल तर मात्र अधिक वेळ जमेस धरलेला असतो. तो वाया गेला तरी शेवटी गाडी वेळेवर पोहोचते. भूवनेश्वरहून येताना रायपूर पर्यंत गाडी वेळेवर आली तरी स्टेशनाअगोदर दोन किमीटर अंतरावर एक तास थांबवून ठेवली. तेव्हा सहप्रवासी बोलले की इकडे बिहार डिविजनच्या गाड्या पुढे काढण्याची पद्धत आहे. तसेच झाले. एक द.बिहारची गाडी पुढे गेली तेव्हा आम्ही सुटलो.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 03/02/2023 - 18:01

Permalink

मोबाईल चार्जिंग

हा एका एक्सप्रेस ट्रेन मधील शताब्दीसम डबा आहे. यातील मोबाईल चार्जिंग चे चित्र पहा Image removed. वरच्या प्लग मधून जो मोबाईल चार्ज होत आहे तो एकाने सामानाच्या जागेत ठेवला आहे. त्यापेक्षा एक कल्पना सुचली. स्वीच बोर्डच्या दोन्ही बाजूला पुरेशी जागा आहे. तिथे छानसे कप्पे करून दोन मोबाईल उभ्या स्थितीत चार्ज करता येतील.. तशी सोय सुचवावी असे म्हणतो. काय वाटते ?
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Mon, 03/13/2023 - 10:23

In reply to मोबाईल चार्जिंग by हेमंतकुमार

Permalink

नक्की सुचवा कुमार. रेल्वे

नक्की सुचवा कुमार. रेल्वे मंत्र्यांना आणि IRCTC ला सुचविणार. अशा वेळी रेल्वे कडून पोचपावती मिळते का?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 03/13/2023 - 12:51

In reply to नक्की सुचवा कुमार. रेल्वे by रात्रीचे चांदणे

Permalink

रेल्वे कडून पोचपावती मिळते का?

ट्विटरवर रेल्वे मंत्रालयाची दोन तीन अकाउंट सापडतील. तिथे मेसेज टाकला की " तुमची तक्रार समजली,योग्य डिपार्टमेंटला कारवाईसाठी पाठवली आहे आणि आदेश दिले आहेत" हे उत्तर येते. कधीकधी नाही येत.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 03/13/2023 - 14:49

In reply to नक्की सुचवा कुमार. रेल्वे by रात्रीचे चांदणे

Permalink

होय,

बघतो अनुभवून !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 03/14/2023 - 15:50

In reply to नक्की सुचवा कुमार. रेल्वे by रात्रीचे चांदणे

Permalink

कार्यवाही

वरीलप्रमाणे सूचना केलेली ईमेल या पत्त्यावर पाठवली आहे : cste@cr.railnet.gov.in
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 03/13/2023 - 12:48

In reply to मोबाईल चार्जिंग by हेमंतकुमार

Permalink

दोन मोबाईल उभ्या स्थितीत चार्ज करता येतील.. सहमत.

मी एक्सटेंशन वायरीच बनवल्या आहेत.(धागा काढला होता.) एका मिपाकराने सुचवले की ११०व्होल्ट डीसी करंट रेल्वेत एक्सटेंशन करू नका. मग मी पाच वोल्टस एक्सटेंशन वायरी (५ -६फुटी)बनवल्या. दोन्ही नेतो. कारण रेल्वेतही उपयोगी होतात शिवाय हॉटेल रुममध्येही कामाला येतात. तिथे दिलेल्या तुमचा बेडजवळचा इले पॉईंट चालत नसतो आणि टॉइलेटजवळचा चालू असतो तेव्हा उपयोगी पडतो.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 03/13/2023 - 14:51

In reply to दोन मोबाईल उभ्या स्थितीत चार्ज करता येतील.. सहमत. by कंजूस

Permalink

छान

**पाच वोल्टस एक्सटेंशन वायरी (५ -६फुटी)बनवल्या >>> उत्तम ! आवडले. तुम्ही दर्दी आहात .. 🙂 smile
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 03/13/2023 - 10:11

Permalink

हुब्बळी : गिनीज बुकात...

हुबळी येथे जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. लांबी 1507 मीटर्स
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 03/13/2023 - 15:15

Permalink

अल्पाक्षरी नावे

भारतातील सर्वात अल्पाक्षरी नावे (२ अक्षरी) असलेली ही दोन रेल्वे स्थानके : १. Image removed. आणि ..
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 03/13/2023 - 15:16

Permalink

२.

हे :
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 03/13/2023 - 15:18

In reply to २. by हेमंतकुमार

Permalink

सुधारणा

हे : Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिकेत वैद्य on Tue, 03/14/2023 - 13:29

Permalink

सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य महिला लोको पायलट कडे

सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी चालवली. बातमीचा दुवा
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 03/14/2023 - 13:32

In reply to सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य महिला लोको पायलट कडे by अनिकेत वैद्य

Permalink

वा !

हार्दिक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 03/16/2023 - 20:53

Permalink

जनावरांचा मृत्यू

भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी आपल्या ताज्या अहवालात सांगितले आहे की, गेल्या तीन वर्षात रेल्वे रुळांवर 63,000 हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. 2017-18 आणि 2020-21 दरम्यान रेल्वे अपघातात चार आशियाई सिंह आणि 73 हत्तींनी आपला जीव गमावला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 03/18/2023 - 10:21

Permalink

बेलानगर

Image removed. पूर्व रेल्वेच्या या स्थानकाचे एक वैशिष्ट्य आहे . या स्थानकाचे नाव बेला बोस (नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुतणी) यांच्यावरून दिले गेले आहे. एखाद्या रेल्वे स्थानकाला भारतीय नागरिक असलेल्या महिलेचे नाव देण्याची ही पहिली घटना होती.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Tue, 03/21/2023 - 20:53

Permalink

आपली ला य की नाही...

वंदे भारत मधील प्रवास : हेडफोन्सच्या चोऱ्या.. प्रवाशांचे असभ्यपणे बसणे आणि वागणे.. गाडीतील अस्वच्छता आणि.. गाडीवर दगडफेक ..

आपली लायकी नाही हेच खरे !

  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 03/22/2023 - 03:41

In reply to आपली ला य की नाही... by हेमंतकुमार

Permalink

सहमत.

या निमित्ताने - अशा गाड्या सुरू झाल्या की खाजगी बस वाहतुकदारांचे गिऱ्हाईक कमी होते. माथेरान मिनी ट्रेन, एसटीची कर्जत -माथेरान बस यामुळे टॅक्सी चालकांचे गिऱ्हाईक कमी होते.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 03/24/2023 - 21:19

Permalink

एकच इंजिन

हिमसागर एक्सप्रेसचे एक वैशिष्ट्य आहे. ती 3789 km अंतर 68 तास व 20 मिनिटांत पार करते. या संपूर्ण प्रवासात तिचे एकच इंजिन (ED P4) सलग काम करीत असते.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 03/27/2023 - 10:48

Permalink

सिंहाबाद

भारत-बांगलादेश सीमेवरचे सिंहाबाद हे भारतातील शेवटचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावरील सर्व यंत्रणा जशाच्या तशा ब्रिटिशकालीन आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 03/28/2023 - 20:17

Permalink

वंदे भारत 22223

रेलयात्री app हे ठाणे - नाशिक रुटवर वंदे भारत गाडी 22223 दाखवताच नाही. _______ Locate my train app ही गाडी दाखवते पण fare दाखवत नाही. __________ रेल्वेचेच app NTES FARE साठी नाही. _________ रेल्वेचीच साइट indianrail.gov.in वंदे भारत 22223 साठी chair car (cc) दाखवते पण executive chair car दाखवत नाही. ______ irctc.co.in site दोन्ही क्लास दाखवते पण fare break up समजत नाही. (660,1190!) जेवण /नाश्ता न घेण्याचे पर्याय अजून नाही. यूट्यूबवर एका विडिओत जेवण वाईट आहे दाखवत आहे. एकूण साईराम म्हणतात तसे श्रद्धा आणि सबुरी ठेवा.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 03/29/2023 - 13:17

Permalink

सशुल्क प्रतीक्षा

सबुरी >>+११ ….. ट्रेनचे वातानुकूलित तिकीट काढलेले असल्यास ट्रेन येण्यापूर्वी स्थानकावर वातानुकूलित खोलीत बसण्याची निशुल्क सेवा आतापर्यंत असायची. अलीकडे काही स्थानकांवर तशी बंद केली असून तासाला वीस रुपये या दराने तिथे बसता येते. तिथे सामान्य लोखंडी खुर्च्यांऐवजी आरामशीर सोफे ठेवलेले आहेत.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com