Skip to main content

माझी ट्रेन माझी प्रेयसी (२)

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 19/08/2022 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ इथे. नमस्कार रूळगाडी मित्रांनो ! आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे. इथल्या चर्चेत सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व धागाप्रवाशांचे आभार ! या नवीन भागाचेही नवे आणि जुने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे. तर येउद्यात ट्रेनसंबंधी......... काय वाट्टेल ते ........... ! ok
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 72346
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

In reply to by कंजूस

१८६२ ला बैलाद्वारे ओढली जाणारी ट्रामवे म्हणून शुभारंभ झालेल्या प्रोजेक्टची लातूर ते मिरज व्हाया बारसी टाउन अशी बारसी लाईट रेल्वे कंपनीची ३२५ कीमी ची नॅरोगेज लाईन १८९७ पासून १९५४ पर्यंत खाजगीच होती. १९५४ ला ती भारतीय रेल्वेने विकत घेतली.

सध्या भारतीय रेल्वेचे एकूण 19 कार्यकारी विभाग (zones) आहेत. त्यामध्ये आता नव्या एकाची भर पडणार आहे तो म्हणजे: South Coast Railway Zone त्याचे मुख्यालय विशाखापट्टणम असेल.

विजयवाडा जंक्शन का नाही? अमरावती आंध्राची नवीन राजधानी इथे बांधत आहेत. म्हणून East coast railway चे दोन भाग करून दक्षिण भागाचे मुख्यालय तिथे काढायला हवे.

रेल्वेची घरपोच पार्सल सेवा : गतीशक्ती एक्सप्रेस कार्गो रेल्वे व टपाल प्रशासनाने एकत्र येऊन ही सेवा द्यायचे ठरवले आहे. घरी येऊन पार्सल घेणार व प्राप्तकर्त्याच्या घरी पोचवणार . अशा सेवेची ट्रेन गरज भासल्यास संपूर्ण पार्सल रेल्वे असेल. त्याच्या डब्यांची रचनाही वेगळी केलेली असेल. जानेवारी 2023 पासून पुणे शहरात चालू होणार.

बातमी ‘युनेस्को’च्या पुरस्कारास पात्र ठरलेली दुसरी वास्तू म्हणजे, मुंबईतील मध्य रेल्वेवरील भायखळा रेल्वे स्थानक होय. रोजचा प्रवास करीत असताना ब्रिटिश काळात उभारलेल्या अशा ऐतिहासिक बांधकामांकडे लक्ष देऊन पाहिले जात नाही; त्यामुळे त्यांचे स्थापत्यसौंदर्य नजरेस पडत नाही. भायखळा स्थानकाचे बांधकाम १८८७मध्ये सुरू करून १८९१मध्ये पूर्ण झाले. याचाच अर्थ असा, की हे स्थानक १२५ वर्षे जुने आणि भारतातील सर्वांत जुने रेल्वे स्थानक आहे

रेल्वे चाहत्यांसाठी रेल्वेचे तीन अक्षरी वर्डल : https://irfca.org/irfca-wordle/ ज्या स्थानकांचा संकेत तीन अक्षरी असतो तशी स्थानके नेहमीच्या पद्धतीने ६ प्रयत्नात ओळखणे.

यात्रीगण कृपया ध्यान दें!' .. रेल्वे स्टेशनवर ऐकू येणारा हा आवाज कोणाचा? हा गोड आवाज सरला चौधरी यांचा आहे. त्यांनी ही उद्घोषणा प्रथम १९८२ मध्ये केली. .... सर्व रेल्वेप्रेमी तसेच सर्व मिपाकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

लवकरच या मार्गावरील शताब्दी बंद होऊन त्याऐवजी वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे तिचा वेग 110 किलोमीटर प्रति तास एवढाच असेल प्रवासी भाड्यात मात्र 40 ते 50 टक्के वाढ होणार आहे

In reply to by हेमंतकुमार

माननीय पंतप्रधान ह्यांच्या हस्ते आज (१० फेब्रुवारी २०२३) रोजी मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अश्या दोन वंदे भारत एक्सप्रेसचे उदघाटन होत आहे. कसारा ते इगतपुरी ह्या थळ घाटात आणि कर्जत ते लोणावळा ह्या भोर घाटात बँकर्स न लावता हि गाडी जाऊ शकते. सोलापूर ते मुंबई ह्या प्रवासाला ६ तास ३० मिनिटे वेळ लागणार असून प्रवास भाडे साधारण ११०० रु आहे. पुणे ते मुंबई ह्या प्रवासाला ३ तास २० मिनिटे लागणार असून प्रवास भाडे साधारण ७७० रु. आहे. सोलापूरहून सकाळी ६:०५ वाजता हि गाडी निघून पुणे येथे सकाळी ९:१५ वाजता येईल. पुणे येथील ९:२० वाजता निघून दुपारी १२:४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात मुंबई येथून दुपारी ४ वाजता निघून (पुणे ७:१५) सोलापूरला साधारण १०:३० वाजता पोहोचेल. (मुंबई ते शिर्डी गाडीचे वेळापत्रक आणि प्रवासभाडे ह्याची माहिती मिळाली नाही.)

In reply to by अनिकेत वैद्य

मुंबई येथून सोलापूरला येणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या वेळेत बदल करून दुपारी चार ऐवजी संध्याकाळी सहा वाजता मुंबईहून सोडावी, जेणेकरून सकाळी सोलापूरहून आलेल्या व्यापारी व इतर लोकांना मुंबईतील त्यांची कामे उरकून संध्याकाळी पुन्हा सोलापूरकडे रवाना होता येईल असे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले.

In reply to by हेमंतकुमार

दोन शहरांमधील धावणाऱ्या जलद/अतिजलद गाड्या या फक्त व्यापारी पर्यटकांसाठी असतात. (असा समज आहे)खूप खूप सामान नेणाऱ्या प्रवाशांसाठी नसतात. काल (मुंबईहून पुणे मार्गावर) पहिल्या वंदे भारताचा विडिओ डोंबिवलीत मिळवला. गाडीचा वेग १३०पर्यंत जाऊ शकतो. रूळ तसेच आहेत. मुंबई ते सोलापूर ही सहा तासांत जाणार आहे. दिवसा धावणारी मुंबई ते बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस सात तासांत जाते. पण उद्यानाला स्लीपर कोच आहेत. सामान भरपूर राहाते. कोकण रेल्वेवरच्या गाड्या १२० ने जातातच. त्यात नवीन काही नाही. ते रूळ मार्ग सुरवातीपासूनच १५०चे आहेत. वंदे भारतचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला एंजिन वेगळे दिसत नाही. कर्जतला मागे बंकर एंजिने लावावी लागतात का हे कळले नाही. ती जोडण्याची दहा मिनीटे वाचतील. लोकल ट्रेनप्रमाणे डबे आहेत. बऱ्याच गाड्यांप्रमाणे सोळा डबे होते. (सिकंदराबाद गाडीला ? २६ असतात.) परदेशातल्या जलद गाड्यांना चार/सहा/आठच डबे असतात. याने फरक पडतोच. सिटा फिरवता येण्याच्या सोयीची दुसरी वाईट बाजू म्हणजे (बसच्या सिटा असणाऱ्या डब्यांतही) सीटखाली सामान ठेवता येत नाही. वरती फक्त फळी /रॅक आहे. त्यावर सामान ठेवण्यावरून मुंबई गोवा जनशताब्दी गाडीत भांडणे होतात. रेझर्वैशन असणारे प्रवासी इतर गाड्यांत धक्काबुक्की करून चढत नाहीत कारण प्रत्येकाला सामानासाठी भरपूर जागा असते. गोवा जनशताब्दी गाडीत तसे होत नाही. पहिला आत घुसेल तो वरच्या रॅकवर चार पिशव्या ठेवायला पाहतो. नंतरच्या प्रवाशाला जागाच नसते. भांडणे सुरू. गोव्याचे प्रवासी व्यापारी नसून हौशी सुटी घालविण्यासाठी जाणारे भरपूर सामान घेऊन जाणारे असतात. थोडक्यात प्रवाशांच्या प्रकाराप्रमाणे गाडीची वेळ आणि प्रकार ठेवणे गरजेचे आहे. मी तर म्हणेन की लोकल ट्रेनच चालवाव्यात. पण त्यांत टॉयलेट नसतात आणि १६० किमीच्या पुढे अशी गाडी ठेवता येत नाही. मुंबई पुणे थेट लोकल न ठेवण्याचे / जाण्याचे हेसुद्धा कारण आहे.

In reply to by कंजूस

खरंय ! लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तर काही लोक एक क्विंटलच्या पोत्यासह, प्रवासी डब्यांमध्ये परवानगी नसलेले अवजड सामान ठेवतात. अशा गाड्यांमधून लघुपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची एक बॅग ठेवायची देखील चोरी होते

In reply to by कंजूस

कर्जतला मागे बंकर एंजिने लावावी लागतात का हे कळले नाही.>> कसारा ते इगतपुरी ह्या थळ घाटात आणि कर्जत ते लोणावळा ह्या भोर घाटात बँकर्स न लावता हि गाडी जाऊ शकते. थोडक्यात प्रवाशांच्या प्रकाराप्रमाणे गाडीची वेळ आणि प्रकार ठेवणे गरजेचे आहे.>> सद्ध्या वन्दे भारतच्या बरोबरीने इतर (पुर्वी चालू असलेल्या) गाड्या आहेतच की. उलट वन्दे भारत सुरु झाल्याने प्रवासी विभागले जाउन बाकिच्या गाड्यात तिकिटे मिळण्याची शक्यता वाढते.

In reply to by अनिकेत वैद्य

प्रवासी विभागले जाउन बाकिच्या गाड्यात तिकिटे मिळण्याची शक्यता वाढते. कसं काय? त्या गाड्यांचे प्रवासी वेगळे आहेत.

In reply to by कंजूस

वेगळे प्रवासी कसे? गाड्या वाढल्यातर प्रवासी नक्कीच विभागले जातील. ज्यांना मुंबई वरून सोलापूरला जायचे असेल आणि ज्यांना भाडे परवडत असेल असे लोक नक्कीच वंदे भारत चा विचार करणार.

सतत धावपळ आणि वेगवान जीवनाचा कधीतरी कंटाळा येतो ना मग अशा वेळेस प्रवास करायचा तो या कासवगती गाडीने : १० किलोमीटर प्रति तास अशा नीचांकी वेगाने धावणारी भारतीय ट्रेन: Mettupalayam ते उटी ok भारतातील सर्वात वेगवान ट्रेनच्या फक्त एक १/१६ वेग असलेली ही पर्यटकांची लाडकी ट्रेन !

रेल्वेमंत्र्यांनी सांगितली 'वंदे भारत'ची यशकथा
या रेल्वेत हादरे नाहीत आणि ध्वनी पातळी विमानापेक्षा १०० पट कमी आहे. गणिताच्या तासाला जशी शांतता असते तशी शांतता असते या रेल्वेत, ’ अशा शब्दांत वैष्णव समजावून सांगत होते

ईशान्य रेल्वेचा (NER) वाराणसी विभाग १२७२ किलोमीटरचा मार्ग आता पूर्णपणे विद्युतीकृत झाला आहे. देशभर चाललेल्या विद्युतीकरण कार्यक्रमामुळे कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.

आज ट्रेन तिकीट काढताना वेबसाईट वारंवार गंडत होती म्हणून मोबाईलवरून तिकीट काढले. तिकीट काढताना चित्रात दाखवलेला पर्याय प्रथमच पाहण्यात आला. ok आपण तिकिटाच्या रकमेत जर त्यांनी दाखवलेली रक्कम आधीच वाढवून दिली तर मग तिकीट रद्द करायची वेळ आल्यास ९२% रक्कम परत मिळणार असे ते म्हणत आहेत. चित्रात दाखवलेल्या उदाहरणात तिकिटाला ७८२ रुपये पडले आहेत आणि त्यांच्या त्या योजनेचा लाभ घेतला तर ७२५ परत मिळणार असे ते म्हणत आहेत. मी काही तो लाभ घेतला नाही. कुणाला अनुभव आहे का ?

In reply to by हेमंतकुमार

तो लाभ घेतला तर ते तिकीट ७८२ + ९१ = ८७३ ला पडेल. मग तो परतावा ८३% राहील. काय वाटते अनुभवी लोकांना ?

In reply to by हेमंतकुमार

ट्रेन तिकीट काढताना वेबसाईट वारंवार गंडत होती म्हणून मोबाईलवरून तिकीट काढले रेल्वेचे रीफंड, रद्दीकरण यांचे नियम पक्के आहेत. किती तास अगोदर,नंतर,कोणते तिकिट वगैरे. मोबाईलवरून म्हणजे आइआरसिटिसी/ दुसरी कोणती वेबसाईट?

In reply to by हेमंतकुमार

म्हणजे शेवटच्या ४८तासांत रद्द केल्यास रेल्वे पन्नास टक्के कापते तसे मात्र करणार असतील. त्या अगोदर प्रत्येक यात्रीचे रेल्वे कापते (रु८०,/१२०,/१८० )ते कापणार नसतील.

भारतातील काही मोजक्या ट्रेन्स अशा आहेत की ज्यांचे निघण्याचे स्थानक एका राज्यात असते , त्यांचा जवळजवळ सर्व प्रवास दुसऱ्या मधल्या राज्यातून होतो आणि पोहोचण्याचे स्थानक तिसऱ्याच राज्यात असते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे लोकनायक एक्सप्रेस (१५११५). तिचा प्रवास असा आहे: सुरुवात : छपरा, बिहार सर्वाधिक प्रवास (96.5%) उत्तरप्रदेश मधून अंत : दिल्ली स्थानक. रेल्वे शौकिनांनी खणून काढलेल्या माहितीनुसार असा त्रिराज्य प्रवास आणि मधल्या राज्यातून सर्वाधिक प्रवास करणारी ही पहिल्या क्रमांकाची गाडी आहे. ९६.५% पेक्षा अधिक या प्रकारचा प्रवास असणारी गाडी कोणाला सापडल्यास जरूर कळवा पण लक्षात ठेवा : मधला प्रवास फक्त एकाच वेगळ्या राज्यातून पाहिजे; एकापेक्षा अधिक नको.

मुंबईहून दक्षिण राज्यांमध्ये जाणारे जे रेल्वे मार्ग आहेत त्यातल्या प्रमुख मार्गांवरचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. बऱ्याच टप्प्यांमध्ये अधिक सक्षम डबे आणि रूळ देखील टाकले गेलेले आहेत. असे असतानाही गाड्यांचे उशिरा धावणे चालूच आहे. काही गाड्या तर दोन स्थानकांच्या दरम्यान पूर्वीपेक्षा बराच वेळ अधिक घेत आहेत. उदाहरणार्थ, उद्यान एक्सप्रेस सोलापूर ते पुणे हा प्रवासाचा वेळ सध्या तब्बल पाच तास आहे, जो पूर्वी चार तास वीस मिनिटेच होता. आज प्रवास करताना हा विषय काही सहप्रवासी असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबर काढला. त्यांनी दिलेले उत्तर असे, "हा सर्व मुद्दा स्थानकांवरील प्लॅटफॉर्म उपलब्ध नसण्याशी निगडित आहे. पुण्याहून मुंबई आणि उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या या "राजाच्या गाड्या" आहेत. त्यांनाच नेहमी प्राधान्य मिळते. दक्षिणेकडून पुण्याला येणाऱ्या गाड्या या 'गरीब बिचाऱ्या' समजल्या जातात. त्यांना मिळेल तेव्हा आणि मिळतो तो प्लॅटफॉर्म कसाबसा दिला जातो. पुणे सोलापूर सुपरफास्ट इंटरसिटीचा प्रवास आता मनात आणले तर तीन तासात संपवता येईल. परंतु वरील कारणास्तव ते होत नाही. प्रवासात मधूनमधून एक्सप्रेस गाड्यांची गती अगदी बैलगाडी इतकी केली जाते "!

In reply to by हेमंतकुमार

विद्युतीकरण आणि लोहमार्गांचे दुपदरीकरण या दुहेरी सुधारणा होऊन देखील प्रवाशांच्या वाट्याला संथ प्रवास !

In reply to by हेमंतकुमार

हल्ली दक्षिणेकडच्या गाड्यांनी सहली झाल्या तेव्हा हे लक्षात आले. त्यांच्या काही खास गाड्या आहेत त्या उशिरा असल्या आणि आपली अगदी वेळेत चालणारी गाडी असली त्यांच दिशेने जाणारी तरी ती थांबवून त्यांना मागून पुढे काढून जाऊ देतात. यामध्ये पंचवीस मिनिटे वाया जातात. अशा तीन गाड्या पुढे काढल्या की दीड तास जातो. मधल्या स्टेशनांत प्रवास करणाऱ्यांना हे फार जाणवतं( चार तासांचा प्रवास साडेसहा तासांचा होतो.) परंतू दूर जाणार असलो तर मात्र आपली गाडी वेळेवर ( वेळापत्रकानुसार) जाते. हा चमत्कार कसा होतो? तर यात चमत्कार नसतोच. मुळात गाडी मागे पडण्याची भानगड धरूनच वेळापत्रकात जादा वेळ बसवलेली असते. या राजधानी,हमसफर,दूरांतो गाड्यांना कायम हिरवा बावटा असतो. त्यांच्याकडे pantry नसली तर जेवण ठराविक स्टेशनावर आत आणले जाते. तेसुद्धा विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीतूनही फिरवतात. मग ती गाडी उशिरा असेल की हिलाही थांबवितात. शेवटी जेवणाची वेळ सांभाळायला हवी ना? प्रवासात डोके थंड ठेवणे, धावत्या गाडीच्या बाहेर न काढणे हे नियम पाळले की त्रास होत नाही.

In reply to by कंजूस

रेल्वेच्या डिव्हिजन असतात. तेंव्हा गाडी एका डिव्हिजन मधून दुसऱ्या डिव्हिजन मध्ये जाते तेंव्हा शेवटच्या स्थानात पोचण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जातो म्हणजे शेवटचे स्थानक ३०-३५ किमी असले तरी त्याला एक ते सव्वा तास दिला जातो म्हणजेच ती गाडी अर्धा पाऊण तास उशिराने धावत असली तरी डिव्हिजन संपेपर्यंत ती परत वेळेवर असते आणि गाडी पुढच्या डिव्हिजनच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केली जाते तेंव्हा तो वेळेत असते. अशीच अतिरिक्त वेळ गाडीच्या शेवटच्या स्थानकासाठी दिलेली आहे. यामुळे गाड्या मंदगतीने चालतात परंतु कागदोपत्री सर्व गाड्या वेळेवर चाललेल्या दिसतात. उदा कोणार्क एक्स्प्रेस या गाडीला बेगमपेट ते सिकंदराबाद या पाच किमी अंतरासाठी २५ मिनिटे दिलेली आहेत. किंवा अनकापल्ली ते विशाखपटनम या ३३ किमी ला ८० मिनिटे दिलेली आहेत. आणि खुर्दा रोड ते भुबनेश्वर या शेवटच्या १९ किमी अंतरासाठी ५० मिनिटे वेळ दिलेली आहे. https://indiarailinfo.com/train/-train-konark-express-11019/945/12282/2…

In reply to by सुबोध खरे

शहरे मोठी होत गेल्याने मुख्य शहरापासून पाच, दहा,पंधरा किमिटरवर परिसरातले अगोदरचे स्टेशनही नाव वेगळे असले तरी त्याचेच सावली भावंडं असते.तिथे प्रवाशांची खूप चढ उतार होते. गाडी जवळपास रिकामी होते/ भरते. त्याला वेळ दिलेला असतो. हे खरे कारण. मध्यंतरीच्या रेल्वे मार्गावर जर तो एकेरी असेल तर मात्र अधिक वेळ जमेस धरलेला असतो. तो वाया गेला तरी शेवटी गाडी वेळेवर पोहोचते. भूवनेश्वरहून येताना रायपूर पर्यंत गाडी वेळेवर आली तरी स्टेशनाअगोदर दोन किमीटर अंतरावर एक तास थांबवून ठेवली. तेव्हा सहप्रवासी बोलले की इकडे बिहार डिविजनच्या गाड्या पुढे काढण्याची पद्धत आहे. तसेच झाले. एक द.बिहारची गाडी पुढे गेली तेव्हा आम्ही सुटलो.

हा एका एक्सप्रेस ट्रेन मधील शताब्दीसम डबा आहे. यातील मोबाईल चार्जिंग चे चित्र पहा ok वरच्या प्लग मधून जो मोबाईल चार्ज होत आहे तो एकाने सामानाच्या जागेत ठेवला आहे. त्यापेक्षा एक कल्पना सुचली. स्वीच बोर्डच्या दोन्ही बाजूला पुरेशी जागा आहे. तिथे छानसे कप्पे करून दोन मोबाईल उभ्या स्थितीत चार्ज करता येतील.. तशी सोय सुचवावी असे म्हणतो. काय वाटते ?

In reply to by हेमंतकुमार

नक्की सुचवा कुमार. रेल्वे मंत्र्यांना आणि IRCTC ला सुचविणार. अशा वेळी रेल्वे कडून पोचपावती मिळते का?

In reply to by रात्रीचे चांदणे

ट्विटरवर रेल्वे मंत्रालयाची दोन तीन अकाउंट सापडतील. तिथे मेसेज टाकला की " तुमची तक्रार समजली,योग्य डिपार्टमेंटला कारवाईसाठी पाठवली आहे आणि आदेश दिले आहेत" हे उत्तर येते. कधीकधी नाही येत.

In reply to by हेमंतकुमार

मी एक्सटेंशन वायरीच बनवल्या आहेत.(धागा काढला होता.) एका मिपाकराने सुचवले की ११०व्होल्ट डीसी करंट रेल्वेत एक्सटेंशन करू नका. मग मी पाच वोल्टस एक्सटेंशन वायरी (५ -६फुटी)बनवल्या. दोन्ही नेतो. कारण रेल्वेतही उपयोगी होतात शिवाय हॉटेल रुममध्येही कामाला येतात. तिथे दिलेल्या तुमचा बेडजवळचा इले पॉईंट चालत नसतो आणि टॉइलेटजवळचा चालू असतो तेव्हा उपयोगी पडतो.

भारतातील सर्वात अल्पाक्षरी नावे (२ अक्षरी) असलेली ही दोन रेल्वे स्थानके : १. ok आणि ..

हे :

सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी चालवली. बातमीचा दुवा

भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी आपल्या ताज्या अहवालात सांगितले आहे की, गेल्या तीन वर्षात रेल्वे रुळांवर 63,000 हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. 2017-18 आणि 2020-21 दरम्यान रेल्वे अपघातात चार आशियाई सिंह आणि 73 हत्तींनी आपला जीव गमावला आहे.

ok पूर्व रेल्वेच्या या स्थानकाचे एक वैशिष्ट्य आहे . या स्थानकाचे नाव बेला बोस (नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुतणी) यांच्यावरून दिले गेले आहे. एखाद्या रेल्वे स्थानकाला भारतीय नागरिक असलेल्या महिलेचे नाव देण्याची ही पहिली घटना होती.

वंदे भारत मधील प्रवास : हेडफोन्सच्या चोऱ्या.. प्रवाशांचे असभ्यपणे बसणे आणि वागणे.. गाडीतील अस्वच्छता आणि.. गाडीवर दगडफेक ..

आपली लायकी नाही हेच खरे !


In reply to by हेमंतकुमार

या निमित्ताने - अशा गाड्या सुरू झाल्या की खाजगी बस वाहतुकदारांचे गिऱ्हाईक कमी होते. माथेरान मिनी ट्रेन, एसटीची कर्जत -माथेरान बस यामुळे टॅक्सी चालकांचे गिऱ्हाईक कमी होते.

हिमसागर एक्सप्रेसचे एक वैशिष्ट्य आहे. ती 3789 km अंतर 68 तास व 20 मिनिटांत पार करते. या संपूर्ण प्रवासात तिचे एकच इंजिन (ED P4) सलग काम करीत असते.

भारत-बांगलादेश सीमेवरचे सिंहाबाद हे भारतातील शेवटचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावरील सर्व यंत्रणा जशाच्या तशा ब्रिटिशकालीन आहेत.

रेलयात्री app हे ठाणे - नाशिक रुटवर वंदे भारत गाडी 22223 दाखवताच नाही. _______ Locate my train app ही गाडी दाखवते पण fare दाखवत नाही. __________ रेल्वेचेच app NTES FARE साठी नाही. _________ रेल्वेचीच साइट indianrail.gov.in वंदे भारत 22223 साठी chair car (cc) दाखवते पण executive chair car दाखवत नाही. ______ irctc.co.in site दोन्ही क्लास दाखवते पण fare break up समजत नाही. (660,1190!) जेवण /नाश्ता न घेण्याचे पर्याय अजून नाही. यूट्यूबवर एका विडिओत जेवण वाईट आहे दाखवत आहे. एकूण साईराम म्हणतात तसे श्रद्धा आणि सबुरी ठेवा.

सबुरी >>+११ ….. ट्रेनचे वातानुकूलित तिकीट काढलेले असल्यास ट्रेन येण्यापूर्वी स्थानकावर वातानुकूलित खोलीत बसण्याची निशुल्क सेवा आतापर्यंत असायची. अलीकडे काही स्थानकांवर तशी बंद केली असून तासाला वीस रुपये या दराने तिथे बसता येते. तिथे सामान्य लोखंडी खुर्च्यांऐवजी आरामशीर सोफे ठेवलेले आहेत.

हि चांगली गोष्ट आहे. दोन पैसे देऊन चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या तर ते लोकांच्या पचनी पडेल आणि हळू हळू सर्व सोयी सुविधा फुकटात किंवा नाममात्र दरात मिळाल्या पाहिजेत या दळभद्री मनोवृत्तीतुन भारतीय जनतेची मुक्तता होईल. सवंग लोकप्रियतेसाठी स्वस्त दरात/ फुकट प्रवास अन मग पैसे नाहीत म्हणून सुविधा नाहीत आणि आधुनिकीकरण सुद्धा नाही या शृंगापत्तीतून रेल्वेची सुटका होणे अत्यावश्यक आहे. सर्वच्या सर्व वंदे भारत गाड्या आणि व्हिस्टाडोमी कोचेस (ज्याचा दर सर्वात जास्त आहे) भरून जातात यावरून आपण धडा घेतला पाहिजे. कारण वातानुकूलित प्रतिक्षालयात कोणत्याही वर्गातील लोक आपल्या बापाची जागा असल्यासारखे बस्तान टाकून बहुतांश पाहायला मिळतात. कित्येक लोक आपले सामान सुद्धा बसायच्या जागेवर ठेवून आरामात पहुडलेले दिसतात. मागच्या वर्षी ऑक्टॉबर महिन्यात झाशी येथे असाच २० रुपये दर असलेले वातानुकूलित प्रतिक्षालय (दुर्दैवाने गाडी येण्याच्या वेळेस) पाहिले. तेथे असेच सोफे आणि वाय फाय ची उत्तम सुविधा होती याशिवाय तेथे चहा कॉफी खाद्यपेये यांचीही सशुल्क सोय होती. आम्ही अगोदर बसलेल्या वातानुकूलित वर्गाच्या प्रतिक्षालयात भरपूर लोक बसलेले होते. काही वेळाने तेथे पोलीस आले. त्यांनी लोकांना आपली तिकिटे दाखवायला सांगितल्यावर अर्ध्याच्या वर लोक बाहेर गेले आणि वातानुकूल वर्गाचे तिकीट काढलेल्या लोकांना बसायला जागा झाली.

In reply to by सुबोध खरे

कारण वातानुकूलित प्रतिक्षालयात कोणत्याही वर्गातील लोक आपल्या बापाची जागा असल्यासारखे बस्तान टाकून बहुतांश पाहायला मिळतात.> अ - ग दी. आज मी सोलापूर स्थानकावर त्या सशुल्क खोलीचा लाभ घेतला तेव्हा अगदी फरक जाणवला ! मोजकेच लोक आत आले होते. पूर्वी असे दिसायचे की रेल्वेचे कर्मचारी सुद्धा त्या विभागात ऊठसूठ जात येत असत. बाकी वशिलेवाले तर वेगळेच.

२०१९ ओक्टोबर - झाशी एसी वेटींग रूम दहा रू तास होती. निरनिराळ्या वेटिंग रूममध्ये बसू देण्याबाबत साऊथ सेंट्रल आणि सदन रेल्वे काटेकोर पालन करते. तिकिटांचा पीएएनआर नंबर लिहिल्यावरच अटेंडड बसू देतो.

डॉ. रावजी शिंदे यांनी तयार केलेले चुंबकीय रेल्वेचे प्रारूप इथे पाहता येईल. आता त्याची आयआयटीतर्फे पाहणी होणार आहे.

ट्रेनच्या प्रवासात मोठ्या स्थानकाच्या आसपास

"उपरी उपस्कर कर्षण डिपो"

अशी पाटी अनेक वेळा पाहण्यात येते. उत्सुकता म्हणून या शब्दांचे अर्थ पाहिले. उपस्कर म्हणजे उपकरण उपरी उपस्कर = pantograph ok