✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझी ट्रेन माझी प्रेयसी (२)

ह
हेमंतकुमार यांनी
Fri, 08/19/2022 - 11:26  ·  लेख
लेख
भाग १ इथे. नमस्कार रूळगाडी मित्रांनो ! आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे. इथल्या चर्चेत सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व धागाप्रवाशांचे आभार ! या नवीन भागाचेही नवे आणि जुने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे. तर येउद्यात ट्रेनसंबंधी......... काय वाट्टेल ते ........... ! ok
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
71308 वाचन

💬 प्रतिसाद (266)

प्रतिक्रिया

तांत्रिक कारणे आहेत हो. तिथे

Trump
Tue, 08/23/2022 - 10:35 नवीन
तांत्रिक कारणे आहेत हो. तिथे सरकार काय करणार?
कोणती तांत्रिक कारणे आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

तिकडचा घाट चढ मोजला आहे.

कंजूस
Tue, 08/23/2022 - 13:28 नवीन
एक किमीची उंची गाठायला किती अंतर जावे लागते. १) १/१०, २)१/२० ३)१/३० ४)१/४० ५)१/५० . . . खंडाळा - लोणावळा बोरघाट हा क्रमांक (४) आहे. तीन एंजिने गाडीमागे लावून गाडी वर चढवायला. लागते. सह्याद्रीचा पश्चिम उतार ( चढ) तीव्र आहे. पण सह्याद्रीचा पूर्व उतार ( चढ) तेवढा तीव्र नाही. पसरत पसरत पूर्व किनारा गाठतो. दक्षिणेकडे मंगळुरु - हसन उतार तीव्र नाही. वळणे घेत एक एंजिन गाडी ओढते. पुणे - सातारा गाडी अगदी उतारा बाजूला वळणे घेत सावकाश चढते (५५० मिटर्सवरून ७५०मिटर्स. )एकच डिझेल एंजिन कोयना एक्सप्रेस खेचू शकते. ( रस्ता मार्ग मात्र दोन चढ्या घाटाने सातारा/वाईला पोहोचतो आणि शंभर किमी कमी होतात/लागतात.) हिंदुपूर ते बंगलोर हा घाटही एकच डिझल एंजिन उद्यान एक्सप्रेसला खेचत वर नेऊ शकते. संबळपूर - कटक घाटमार्गही एक एंजिन खेचते. अंतर वाढले मान्य पण फारशी मोठी शहरेही वाटेवर नाहीत. मुंबई - दिल्ली पश्चिम रेल्वेने गेल्यास गाडी कोणताही घाट चढत/उतरत नाही. त्यामुळे वेगात सरळ जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

धन्यवाद श्री कंजुस. तुमची

Trump
Tue, 08/23/2022 - 14:03 नवीन
धन्यवाद श्री कंजुस. तुमची उदाहरणे ही पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. तुमच्याकडे दक्षिण भारताविषयी माहिती आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

पुणे बंगलोरचे कारण लिहिले आहे.

कंजूस
Wed, 08/24/2022 - 12:30 नवीन
पुणे ते बेंगलोर बस ने कमी वेळ लागतो आणि रेल्वेने जास्त हा तर ज्योक आहे. ते लिहिलं आहे. अगदी दक्षिणेकडे म्हणाल तर कोशुवेली( तिरुवअनंथपुरम/ त्रिवेंद्रम) कुर्ला गरीबरथ बरीच वेगात येते. त्या मार्गावर लक्षरी गाड्या हव्या आहेत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

पुणे बंगलोरचे कारण लिहिले आहे.

कंजूस
Wed, 08/24/2022 - 12:31 नवीन
पुणे ते बेंगलोर बस ने कमी वेळ लागतो आणि रेल्वेने जास्त हा तर ज्योक आहे. ते लिहिलं आहे. अगदी दक्षिणेकडे म्हणाल तर कोशुवेली( तिरुवअनंथपुरम/ त्रिवेंद्रम) कुर्ला गरीबरथ बरीच वेगात येते. त्या मार्गावर लक्षरी गाड्या हव्या आहेत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

आणखी एक कारण उदाहरणासह

कंजूस
Wed, 08/24/2022 - 22:32 नवीन
मुंबईतील प्रवाशांना ( भाविकांना) तिरुपती'ला थेट गाडी हवी या हट्टपायी एक गाडी जात असे. (16351- मुंबई ते नागरकोईल व्हाया तिरुपती. ) खरं म्हणजे मुंबईकडून चैन्नई जाणाऱ्या गाड्या रेनिगुंटा या स्टेशनवरून जातात आणि रेनिगुंटा ते तिरुपती फक्त अकरा किमी दुसऱ्या मार्गावर आहे. पण भाविकांसाठी ती गाडी ते अकरा किमी अंतर कापायला अडीच तास घेत असे. कारण रेनिगुंटा आणि तिरुपतीला एंजिन रिवर्सल. आता ( २०१३ सेप्टेंबर)काढून टाकले आहे. गाडी रेनिगुंटावरून सरळ पुढे जाते. आणखी एक कारण म्हणजे एकेरी मार्ग होते आणि प्रत्येक स्टेशनला एक 'की' / दांडा घेतल्याशिवाय गाडी पुढे जात नसे. एक वेताचे मोठे कडे असे ते धावत्या गाडीतही अदलाबदल केली जात असे. ही जुनी सिग्नल सिस्टम होती. ( मालगुडी डेज पुस्तकात चित्रे सापडतील.) २००६ मध्ये इलेक्ट्रॉनिक ओटो सिग्नल आले. आणि वेग वाढला. अशा बऱ्याच गोष्टी गेल्या वीस वर्षांत सुधरवल्या आहेत आणि वेग वाढवत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

दक्षिण भारतात रेल्वेच्या

सुबोध खरे
Tue, 08/23/2022 - 13:33 नवीन
दक्षिण भारतात रेल्वेच्या जाळ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. का कुणास ठाऊक सी के जाफर शरीफ सोडल्यास बहुसंख्य रेल्वे मंत्री हे उत्तर भारतातील होते त्यामुळे रेल्वे हे आपले वतन समजून त्यांनी आपल्या पोळीवर तूप ओढले आहे. भारतभरातून दिल्लीला जाणाऱ्या गाड्या सर्वात जलद आहेत यात राजधानी अंतर्भूत आहेत. मुंबई दिल्ली आणि कोलकाता दिल्ली हे प्रवास सर्वात जलद आहेत पण मुंबई चेन्नई मुंबई कोलकाता आणि कोलकाता चेन्नई हे मार्ग अजूनही कूर्मगतीने का आहेत याचा साधा सरळ अर्थ असाच आहे. रेल्वेचा नकाशा काढून पहा गंगेच्या खोऱ्यात सर्वात जास्त रेल्वेचे जाळे आहे. आणि झारखंड छत्तीसगड ओडिशा या कोळसा लोह खाणी असलेल्या प्रदेशात खरं तर वेगवान रेल्वेचे जाळे असायला हवे होते. कारण सर्वात जास्त मालवाहतूक तेथून होते. पण राजकीय फायद्यासाठी रेल्वे ७० वर्षे वापरली गेली आहे. WAG १२ या इंजिनांचा कारखाना माधेपुरा मध्ये का निघाला? कारण तो लालू प्रसाद यादव यांचा मतदार संघ आहे. मालदा शहर येथुन अनेक ठिकाणी गाड्या सुरु का झाल्या तर तो अब्दुल घनी खान चौधरी यांचा मतदार संघ होता. कोकण रेल्वे सारखा महत्त्वाचा प्रकल्प सुरु व्हायला इतकी दशके का लागली? श्री मधू दंडवते रेल्वे मंत्री झाल्यावर त्यांनी जोर लावला म्हणून ते झाले. अन्यथा उत्तर भारतीय खासदारांना त्यात काही रस नव्हता. रेल्वे हे स्वतःचे वतन म्हणून राजकीय पक्षांनी त्याची वाट लावली. श्री मोदी यांनी रेल्वे चा वेगळा अर्थसंकल्पच काढून टाकला त्यामुळे आता रेल्वे मंत्री हे पद तेवढे "प्रतिष्ठेचे" राहिलेले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

नाही.

कंजूस
Wed, 08/24/2022 - 21:46 नवीन
कोकण रेल्वे सारखा महत्त्वाचा प्रकल्प सुरु व्हायला इतकी दशके का लागली? श्री मधू दंडवते रेल्वे मंत्री झाल्यावर त्यांनी जोर लावला म्हणून ते झाले. माझाही ऐकीव समज असाच झालेला. पण श्रीधरनवरचं 'मेट्रोमन श्रीधरन वाचल्यावर तो भ्रम दूर झाला. मुंबई दिल्ली आणि कोलकाता दिल्ली हे प्रवास सर्वात जलद आहेत पण मुंबई चेन्नई मुंबई कोलकाता आणि कोलकाता चेन्नई हे मार्ग अजूनही कूर्मगतीने का आहेत याचं उत्तर वरच्या एक प्रतिसादात दिलं आहे. शिवाय एंजिन रिवर्सलची ठिकाणंही कमी करत आहेत. विजयवाडा,संबळपूर,महोबा,तिरुपती-रेनिगुंटा. शेवटचं कमी केलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

शिवाय एंजिन रिवर्सलची

चौकस२१२
गुरुवार, 08/25/2022 - 06:30 नवीन
शिवाय एंजिन रिवर्सलची ठिकाणंही कमी करत आहेत. या मागे तांत्रिक कारण आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

Reversal का?

कंजूस
गुरुवार, 08/25/2022 - 10:25 नवीन
महोबा स्टेशन नकाशा https://www.openstreetmap.org/#map=12/25.2909/79.8526 अशी जंक्शन आहेत तिथे डावीकडून (झाशी) खाली (खजुराहो) वळण नाही. तिकडे वस्ती असल्याने आता रूळ टाकणे शक्य नसेल. मग रिवर्सल करावे लागते आणि पाच मिनिटांऐवजी पन्नास मिनिटे लागतात. दिल्ली- खजुराहो ही पर्यटनाच्या कामाची ट्रेन अशी येते. २) भुबनेश्वर -नागपूर - मुंबई मार्गावर संबळपूर आणि झारसगुडा अशा दोन दोन ठिकाणी पन्नास किमीटरांत दोनदा रिवर्सल होते चार वर्षांपूर्वी पण आता झारसगुडा येथे वळण रूळ टाकला आहे. तिथला रिवर्सल वेळ वाचला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

महोत्सव नगर

कर्नलतपस्वी
गुरुवार, 08/25/2022 - 13:04 नवीन
माहोबा छतरपुर जवळचे का,बघितले आहे. दौंड येथे अशीच झेलम उलटी चालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

होय.

कंजूस
गुरुवार, 08/25/2022 - 17:28 नवीन
पूर्वी इथूनच खजुराहोला जावे लागायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

पूर्वी सारखे आता दौंड ला

सुबोध खरे
गुरुवार, 08/25/2022 - 18:11 नवीन
पूर्वी सारखे आता दौंड ला गाडीचे इंजिन मागे लावून दिशा बदलायला लागत नाही. नवीन कॉर्ड लाईन बनवली आहे आणि त्यावर नवीन स्टेशन वसवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

होय. परंतू रात्रीची शिर्डी/पंढरपूर या गाड्या

कंजूस
गुरुवार, 08/25/2022 - 19:49 नवीन
म्हणजे एकच बारा डब्यांची गाडी दौंडपर्यंत जाते व एंजिन पुढचे सहा डबे घेऊन एका लाईनवर पुढे जाते तर मागच्या सहा डब्यांना दुसरे एंजिन लावून शिरडीला नेतात. यात वेळ जातो. पण इतर एक्सप्रेसना हा प्रश्न येत नाही. असाच काही प्रकार भारतात कुठेकुठे जंक्शनला करतात. काही वेळा त्या प्रभागातले (झोनमधले) एंजिन त्याच भागात परत पाठवतात. याच वेळी दुसरी तिकडची गाडी यावी लागते. उदा महोबाचा वर उल्लेख केला आहे. बिहार(दक्षिण)/झाशी/खजुराहो इकडच्या गाड्या जंक्शनला आल्यावर एंजिनं बदलतात. वेळ जातो. बिहारकडचे आपल्या गाड्यांना पुढे काढतात आणि इतर झोनच्या गाड्यांना साइडिंगला टाकतात. मग दुसऱ्या झोनच्या गाड्या वेळवर असल्या तरी मागे पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

थोडे बदल

कंजूस
Fri, 08/26/2022 - 07:57 नवीन
त्या शिरडी गाडीला पंढरपूर/ बिजापूर जोडून दौंडला गाडी अर्धी करून एंजिन बदलायचा खटाटोप काढला आहे. म्हणजे तीन वेगळ्या गाड्या सुरु केल्या आहेत आणि पसेंजर वर्गातून काढून एक्स्प्रेस केल्या आहेत. नवे दौंड वेगळे दूर आहे. असा प्रश्न सोडवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मुंबई अहमदाबाद तेजस

विजुभाऊ
Mon, 08/22/2022 - 16:38 नवीन
मुंबई अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस चा प्रवास हा धक्कादायक वाटावा इतका सुखद आहे. सीट्स , सेवा , स्वच्छता , खान-पान सेवा सर्वच बाबतीत उत्तम आहे.
  • Log in or register to post comments

अरे वा,

हेमंतकुमार
Mon, 08/22/2022 - 17:28 नवीन
वाचून आनंद झाला. अशीच सेवा कायम राहो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

तेजस

जेम्स वांड
Tue, 08/23/2022 - 07:31 नवीन
मुंबई - अहमदाबाद तेजस ही पश्चिम रेल्वे ऑपरेट करत नसून IRCTC कंपनी ऑपरेट करत असल्यामुळे सेवेत असा फरक दिसत असावा काय असा प्रश्न पडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

ती खाजगी ट्रेन आहे असे ऐकिवात

विजुभाऊ
Tue, 08/23/2022 - 09:58 नवीन
ती खाजगी ट्रेन आहे असे ऐकिवात आहे. पण अहमदाबाद मुंबै शताब्दी पेक्षा तेजस खूपच भावली. आसने / खिडक्यांचे ऑटोमॅटीक ब्लाइंडर्स वगैरे सुविधा अप्रतीम आहेत. चेअर कार आहे त्यामुळे बसायला आसनांची खूप छान सोय आहे ( सामान्य उंचीच्या माणसाने च्या स्लिपर कोच मधील बाकड्यावर पाय खाली सोडून नीट टेकून बसुन दाखवावे. १०० रुपये बक्षीस देईन. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

प्रवासी किती?

कंजूस
Tue, 08/23/2022 - 13:35 नवीन
प्रवासी संख्या आणि तिकिट भाडे यांचा गुणाकार सारखाच राहतो. अधिक एसीचा अधिभार. परदेशांतली चारपाच डब्यांची गाडी दोनशे-अडिचशे वेगाने जाणे याच तोडीची अठरा डब्यांची कोकण रेल्वे १२० च्या वेगाने जाणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

तेजस एक्स्प्रेस चा डब्यांची

हेमंतकुमार
Wed, 09/28/2022 - 09:20 नवीन
तेजस एक्स्प्रेस चा डब्यांची हालत फार लवकर दयनीय झाली.... देखभाल नीट नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

World's Highest Rail Bridge

मदनबाण
Mon, 08/22/2022 - 20:35 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zara Sa... :- | Jannat | KK |
  • Log in or register to post comments

छान

हेमंतकुमार
Mon, 08/22/2022 - 20:45 नवीन
अप्रतिम ! तंत्रज्ञांचे अभिनन्दन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

चिनाब

कर्नलतपस्वी
गुरुवार, 08/25/2022 - 18:32 नवीन
चिनाब नदीच्या काठावर रामबन हे गाव कधी पंधरा वीस घरांची वस्ती , मिलिट्रीच्या परागमन शिबीरात राहीलो होतो.. अमरनाथ यात्रेच्या भटकंतीत चिनाब खोरे व नदीचा फोटो टाकलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

जपानमध्ये जर का ट्रेन उशिरा

नचिकेत जवखेडकर
Wed, 08/24/2022 - 06:53 नवीन
जपानमध्ये जर का ट्रेन उशिरा धावत असेल तर प्रत्येक स्टेशनवर स्टाफ एक स्लिप देतो ज्यात लिहिलेलं असतं की, आम्ही सर्टिफाय(मराठी शब्द निर्वाळा?) करतो की अमुक एक लाईन उशिरा धावत आहे(अर्थातच ती लाईन त्या स्टेशनवरून जात असेल तर) याचं कारण असं की, कचेरीत जायला उशीर झाला हा ती ट्रेन उशिरा धावत असल्यामुळे झाला. कर्मचाऱ्यांची चूक नाही. किंवा काही व्यवसाय निविदा सादर करायच्या असतील, तर आपण ती स्लिप दाखवली तर किमान एक संधी मिळते सादर करण्याची.
  • Log in or register to post comments

सर्टिफाय =प्रमाणित

सुबोध खरे
Wed, 08/24/2022 - 12:39 नवीन
सर्टिफाय =प्रमाणित
  • Log in or register to post comments

धन्यवाद सुबोध सर!

नचिकेत जवखेडकर
Wed, 08/24/2022 - 14:33 नवीन
धन्यवाद सुबोध सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दिव्य...

हेमंतकुमार
Wed, 08/24/2022 - 20:55 नवीन
या गलथानपणाला काय म्हणायचे ? Image removed. बातमी
  • Log in or register to post comments

झुक झुक अगीनगाडी..

कर्नलतपस्वी
गुरुवार, 08/25/2022 - 13:13 नवीन
जवळपास साठहजार कि मी प्रवास केला. सर्व प्रकारचे अनुभव घेतले.
  • Log in or register to post comments

१८० चा वेग

हेमंतकुमार
Sun, 08/28/2022 - 12:04 नवीन
बिगर इंजिनच्या वंदे भारत ट्रेनची 180 किलोमीटर प्रतितास या वेगात चाचणी पूर्ण: https://www-livemint-com.cdn.ampproject.org/v/s/www.livemint.com/news/india/watch-glass-filled-with-water-stays-stable-at-180-kmph-on-vande-bharat-train/amp-11661596719067.html?amp_gsa=1&amp_js_v=a9&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16616681214453&csi=1&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fwww.livemint.com%2Fnews%2Findia%2Fwatch-glass-filled-with-water-stays-stable-at-180-kmph-on-vande-bharat-train-11661596719067.html
  • Log in or register to post comments

टीप

हेमंतकुमार
Sun, 08/28/2022 - 12:21 नवीन
वरील गाडीला स्वतंत्र इंजिन नसून ती EMU तंत्रावर धावते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

वंदे भारत १८०च्या स्पीडने धावली

धर्मराजमुटके
Mon, 08/29/2022 - 09:20 नवीन
भारताच्या तिसऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने ट्रायल रनमध्ये ताशी रिकॉर्डतोड १८० किमीचा वेग पकडला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर ही माहिती देताना सांगितले की, वंदे भारत-२ ची स्पीड ट्रायल कोटा-नागदा सेक्शन दरम्यान १२०/१३०/१५० आणि १८० किमी प्रतितास वेगाने सुरु झाली. रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हायस्पीड ट्रेनमध्ये काच लावलेली दिसत असून, अतिशय वेगानंतरही ग्लासमधून पाण्याचा एक थेंबही सांडला नाही, हे नक्कीच आश्चर्यकारक आहे. ही बातमी
  • Log in or register to post comments

नागालँड

हेमंतकुमार
Wed, 08/31/2022 - 10:49 नवीन
नागालँडला शंभर वर्षानंतर दुसरे रेल्वेस्थानक मिळालेले आहे. बातमी
  • Log in or register to post comments

रुपक

हेमंतकुमार
Fri, 09/02/2022 - 10:21 नवीन
third rail असा एक शब्दप्रयोग वाचनात आला. Image removed. काही देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ट्रेन्सना विद्युत पुरवठा करणारी एक अन्य ट्रेन असते. ती अर्थातच उच्च विद्युत दाबाने भारित असते. यावरून राजकारणामध्ये third rail हे लाक्षणिक अर्थाने वापरले जाते. एखादा सामाजिक विषय अतिशय वादग्रस्त आणि स्फोटक असतो; जो कोणी त्याला हात लावायला जाईल त्याला जोरदार झटका बसतो !
  • Log in or register to post comments

ऐकावे ते नवलच!

वामन देशमुख
Fri, 09/02/2022 - 11:29 नवीन
काही देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ट्रेन्सना विद्युत पुरवठा करणारी एक अन्य ट्रेन असते.
ऐकावे ते नवलच! ओव्हरहेड पॉवर सप्लाय माहित होता; हे प्रकरण माहित नव्हते. --- काही देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ट्रेन्सना विद्युत पुरवठा करणारी एक अन्य ट्रेन असते. करणारा एक अन्य रूळ असतो. असं म्हणायचं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

वा दे,

हेमंतकुमार
Fri, 09/02/2022 - 12:04 नवीन
बरोबर. माझा गैरसमज झाला. ती रुळावर लावलेली यंत्रणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

तुम्ही रेलचे भाषांतर ट्रेन असे केल्याने तसे झाले.

Trump
Sat, 09/03/2022 - 22:59 नवीन
माझा गैरसमज झाला. ती रुळावर लावलेली यंत्रणा आहे.
तुम्ही रेलचे भाषांतर ट्रेन असे केल्याने तसे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

थर्ड रेल

बोका
Tue, 09/06/2022 - 19:56 नवीन
आपल्या पुण्यात थर्ड रेल येत आहे. मेट्रोच्या तीसर्‍या लाईनवर (शिवाजीनगर- हिंजवडी) थर्ड रेल ७५० व्हो. डीसी प्रणाली वापरली जाईल. पहिल्या व दुसर्या लाईनवर २५ केव्ही एसी ओवरहेड असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

वा !

हेमंतकुमार
Tue, 09/06/2022 - 20:05 नवीन
छान योगायोग !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका

धोके

हेमंतकुमार
Wed, 09/07/2022 - 19:04 नवीन
थर्ड रेल बद्दल काही प्राथमिक तांत्रिक माहिती इथे वाचली. Image removed. या यंत्रणेत दोन महत्त्वाचे धोके दिसतात : १. इलेक्ट्रिक शॉकचा धोका २. रेल्वेमार्गात चुकूनही माणूस पडणे परवडणार नाही. ३. आपल्याकडे रेल्वे रूळ ओलांडणारी भरपूर जनता आहे. या सगळ्यांचा विचार व्हावा असे वाटते .. जाणकारांनी अधिक माहिती द्यावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका

शॉकचा धोका

बोका
Wed, 09/07/2022 - 20:16 नवीन
शॉकचा धोका कमी असतो. ही प्रणाली शक्यतो अशा ठिकाणी वापरतात जिथे माणसांना मर्यादित प्रवेश असतो, जसे की मेट्रो मार्ग. मेट्रो मार्गावर रेल्वे रूळ ओलांडणारी जनता नसते. फलाटावर आजकाल platform screen doors असतात , त्यामुळे प्रवासी रूळ ओलंडू शकत नाहीत. दुरुस्ती कर्मचारी सुद्धा वीजप्रवाह बंद केल्यावर प्रवेश करु शकतात. तसेच तीसर्या रुळावर वीजरोधक आवरण असते. वीजप्रवाह खालील किंवा बाजूकडून घेतला जातो. Image removed. खालील चित्रात पिवळ्या रंगात वीजरोधक आवरण दिसत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

बोका

हेमंतकुमार
Wed, 09/07/2022 - 20:29 नवीन
चित्रात पिवळ्या रंगात वीजरोधक आवरण दिसत आहे.
ओह, मग चांगले आहे. आभार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका

प्रगती

हेमंतकुमार
Sat, 09/03/2022 - 21:22 नवीन
मुंबई-चेन्नई मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण
  • Log in or register to post comments

नवी दिल्ली

हेमंतकुमार
Mon, 09/05/2022 - 07:54 नवीन
आपल्या राजधानीचे रेल्वेस्थानक अत्याधुनिक करायचे ठरले आहे. त्याचे प्रारूप रेल्वे मंत्रालयाने जालावर जाहीर केले आहे. Image removed. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत
  • Log in or register to post comments

कसलं काय राव

जेम्स वांड
Mon, 09/05/2022 - 08:11 नवीन
असे 3डी, फोटोशॉप, कोरल ड्रॉ प्लॅन कायमच दिसतात, ग्राउंड वर काही होत नसतं. ते नई दिल्ली रेल्वे स्टेशन बघितल्यावर खात्री पटते त्याची. हे सगळे चकाचक करण्यास हरकत नाही किंवा उगाच टीका म्हणून टीका नाही पण हे इमले उभे करण्या अगोदर १. सगळी रेल्वे स्टेशन access controlled करा, स्टेशनवर entry / exit ठरवलेले असतील तितकेच, उगाच "रुळा शेजारून डायरेक्ट नाका" वाटा थेट बंद २. प्लॅटफॉर्म वगैरे सोबत ड्रेनेज, पावसाळी पाणी निचरा (मुंबई स्पेशल दिवास्वप्न) ह्याची चोख व्यवस्था ३. पाण्याचे / मुताऱ्यांचे गळके नळ अन् अमोनियाच्या वासाने भारलेले ते वातावरण हलके करायला हवे पहिले. ४. नाशिवंत माल ब्रेक व्हॅन मधून नेण्या आणण्यासाठी, लॉजिस्टिक्स पुन्हा work करायला हवेत, मासळीने भरलेले क्रेट्स इत्यादी गळत लळत प्लॅटफॉर्म वर पडलेले असतात ते rectify करा, गाडी पिट लाईन, वॉशिंग लाईन वरून आली की अमुक इतक्या वेळात ते नाशिवंत माल घेऊन यायचा, फ्रोजन ब्रेक व्हॅन मध्ये लोड करण्याची प्रोसीजर व्यवस्थित फॉलो व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

+११

हेमंतकुमार
Mon, 09/05/2022 - 08:21 नवीन
अगदी बरोबर मूलभूत सुविधांकडे आधी लक्ष दिले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

दादर (खजुराहो) बनारस थेट गाडी.

कंजूस
Mon, 09/05/2022 - 08:25 नवीन
थोडे दिवस दसऱ्यापर्यंतच आहे.
  • Log in or register to post comments

अधिक डबे तयार करण्याचे लक्ष्य ठेवले होते पण...

निनाद
Mon, 09/05/2022 - 08:41 नवीन
रेल्वेचे प्रमुख उत्पादन युनिट या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत डबे, चाके, लोकोमोटिव्ह आणि इतर रोलिंग स्टॉकचे उत्पादन उद्दिष्ट पूर्ण करण्यात अनेक कारणांमुळे अयशस्वी ठरले. ७३० डबे तयर करण्याचे लक्ष्य असतांना फक्त ५८ डबे तयार केले गेले. या आर्थिक वर्षाच्या उर्वरित महिन्यांत यात सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित महिन्यांत, उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

ऑ!!

जेम्स वांड
Mon, 09/05/2022 - 08:53 नवीन
लक्ष्य - ७३० डबे उत्पादन - ५८ डबे मग या आर्थिक वर्षाच्या उर्वरित महिन्यांत यात सुधारणा होण्याची शक्यता आहे ह्या शक्यतेला बेसिस काय म्हणता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

आशादायी

निनाद
गुरुवार, 09/08/2022 - 09:02 नवीन
आशादायी असावे. :) आता या ५८ पेक्षा ही कमी उत्पादन होईल असे तरी कसे म्हणता येईल? असो, आधी पुरवठ्याचे अनेक प्रश्न होते. ते प्रश्न सोडवत आणले असावेत म्हणून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा