Skip to main content

करोना : स्वलालधन्य जाहलो मी

लेखक गामा पैलवान यांनी गुरुवार, 05/05/2022 20:22 या दिवशी प्रकाशित केले.

महत्वाची सूचना: धागा लेखकाच्या मताशी आणि इतर प्रतिसादांशी मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. कोविड किंवा अन्य लस न घेणे हे हानिकारक ठरू शकते. या बाबतीत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत. - मिपा व्यवस्थापन

लोकहो, करोनाची लस घेण्यासाठी कोणावरही सक्ती करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. कुठेतरी देर आहे, पण अंधेर नाही. गेले दोन-अडीच वर्षं मी जे बोंबलंत होतो त्यातलं बरचसं महत्त्वाचं अखेरीस न्यायालयाने मान्य केलं तर. संबंधित बातमी : https://www.lokmat.com/national/corona-vaccination-supreme-court-says-n… सदर बातमीतील ठळक खंड येणेप्रमाणे : १.
रोग टाळण्यासाठी निर्बंध लादू शकतात, परंतु लसीकरण करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे विशेष औषध घेण्यास भाग पाडू शकत नाही.
हेच तर अस्मादिक म्हणंत होते की लशीची सक्ती हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1065888#comment-1065888 ). २.
आपल्या निर्णयात न्यायालयाने केंद्र सरकारला देशातील नागरिक आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर एक अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये लसीचे परिणाम आणि प्रतिकूल परिणामांचे संशोधन सर्वेक्षण असावे. :
ऐच्चाघोव, मग मी काय वेगळं बोंबलंत होतो ? आणि हे सांगायला सर्वोच्च न्यायालय कशाला पाहिजे ? इतकी साधी बाब सरकारला आपणहून समजायला हवी ना ? पण सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? ( संदर्भ : https://www.misalpav.com/node/48514 धागा उडाला आहे ). ३.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राज्य सरकारांना लस धोरणाबाबत सूचना करताना म्हटले आहे की, लसीच्या आवश्यकतेमुळे व्यक्तींवर लादलेले निर्बंध प्रमाणबद्ध आणि योग्य आहेत असे म्हणता येणार नाही.
हेच मी यापूर्वी म्हंटलं होतं की सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1066276#comment-1066276 ) असो. तर या यशाबद्दल मीच माझी पाठ थोपटून घेत आहे. कारण की शाबासकी द्यायला दुसरं कोणी येणार नाहीये. म्हणून मीच माझी लाल करून घेतो. अशा रीतीने मी स्वलालधन्य जाहलो आहे. आता एकेकाची एकेक भाष्ये पाहूया. १.
करोनाचे थोतांड प्रमाणाबाहेर फुगवल्याने जगभरातल्या आरोग्यसेवांवर अपरिमित ताण आला आहे. : https://www.misalpav.com/comment/1070817#comment-1070817
नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/ श्री. पॉल यांनी याबाबतीत लान्सेट या नामवंत प्रकाशनास दोष दिला आहे. च्यायला, हेच तर मी पण बोंबलतोय. मुडद्यावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? शेवटी कोणीतरी ऐकलं तर. २.
टाळेबंदी हा उपाय नाही. विशेषत: धडधाकट माणसांना घरात डांबल्याने कसलाही फायदा नाही. : https://www.misalpav.com/comment/1065945#comment-1065945
हेच तर न्यायालयाने सांगितलं आहे. मी जे दोन वर्षांपूर्वी घसा फोडून ओरडाआरडा करीत होतो, तो आता न्यायालयाने ऐकला. यावरनं मी द्रष्टा महापुरुष आहे हे सिद्ध होतं. ३.
करोना हा रोगप्रवण लोकांसाठी घातक आहे. म्हणून रुग्णालयातल्या खाटा रोगप्रवण लोकांसाठी मोकळ्या हव्यात. मात्र परिस्थिती नेमकी उलट होती. रुग्णालयांत खोट्या रुग्णांची सरसकट खोगीरभरती होत होती. तिचे दुष्परिणाम इथे आहेत : https://www.misalpav.com/comment/1074745#comment-1074745
रुग्णालयांचा अनुचित वापर टाळण्यासाठी शासनाने एक समिती गठित करावी असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश वर उद्धृत केलेलाच आहे. असंख्य निरर्थक बळी घेतल्यावर कुणालातरी ही अक्कल सुचली आहे. त्याबद्दल कुणाचंतरी अभिनंदन. ४.
माझ्यासारख्या बुद्धीभेदी लोकांमुळे करोनाच्या थोतांडास वाचा फुटली. : https://www.misalpav.com/comment/1098413#comment-1098413
आता पुढील लक्ष्य करोनाच्या लशीचं थोतांड उघड करण्याचं आहे. असो. हा एका अर्थी सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. अर्थात, त्यामुळे हुरळून न जाता आपण ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया. धन्यवाद ! आपला नम्र, -गामा पैलवान

वाचने 79318
प्रतिक्रिया 238

प्रतिक्रिया

कॉमी, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
एक डोकं कापलं कि तात्काळ दुसरं डोकं उगवतं.
तसं उगवायला पाहिजेच. एकतर करोना हा सर्दीपडशासारखा आजार आहे, फारतर फ्ल्यू सारखा म्हणता येईल. त्याच्यासाठी लस कशाला पाहिजे? सर्दी-फ्ल्यू वर कोणी जनुकोपचार ( MRNA ) लस काढतं का? डास मारायला रणगाडा कशाला ? आणि ते PCR चाचणी नसून अभिवर्धनतंत्र ( = amplification technique ) आहे. त्याचा लागणीशी अणुमात्र संबंध नाही. लागण ( clinical infection ) आधी होते आणि नंतर त्याची चाचणी करायची असते. पण करोनाचा उलटा कारभार आहे. आधी PCR 'चाचणी' करायची आणि नंतर त्यावरनं लागण झाली आहे असं ठोकून द्यायचं. थोतांड ते थोतांडच. म्हणून इतकी असंख्य डोकी उगवताहेत. २.
कापलेले डोके सुद्धा हळूच पुन्हा वर येते.
त्याचं काये की लबाडी तोकड्या चादरीसारखी असते. डोक्यावरनं ओढून घेतली की पाय उघडे पडतात. करोनाची लबाडी तशीच आहे. ३.
उदाहरणार्थ- विषाणू आयसोलेट केलेला आहे, पूर्ण जिनोम सिक्वेन्सीन्ग उपलब्ध आहे असा पुरावा दिल्यावर विषाणू आयसोलेट केलेला आहे ह्यावर तुम्ही अजिबात मत प्रदर्शित करत नाही, त्या लेखातल्या तिसऱ्याच गोष्टींवर टिप्पणी करता. आणि पुढच्या प्रतिसादात पुन्हा- विषाणू विलग केलेला नाही असा दावा करता.
रोग्याच्या नमुन्यापासनं करोनाचा विषाणू विलग केलेला नाही. तुम्ही दिलेल्या लेखात उल्लेखलेला नमुना इतरत्र वाढवलेला आहे. इथे इंग्लंडात सांख्यिकीय विभागाकडे करोना विषाणू अलग केल्याचा पुरावा नाही ( इंग्रजी दुवा ) : https://www.ons.gov.uk/aboutus/transparencyandgovernance/freedomofinfor… मात्र असा पुरावा इतरत्र असू शकतो, म्हणून ब्रिटीश मेडिकल जर्नल मध्ये शोध घेतला. तिथे करोनाच्या अस्तित्वाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.bmj.com/content/370/bmj.m3379/rr-2 त्यानुसार १२ ऑक्टोबर २०२० पर्यंत करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नव्हता. नंतरचं माहित नाही. पण ज्याअर्थी विषाणू मिळाल्याचा गवगवा झाला नाही, त्याअर्थी ही परिस्थिती तशीच असावी असं वाटतंय. ४.
काही लेखांचे चुकीचे इंटरप्रिटेशन करून टाकले होते. ऑक्सफर्डचा असो किंवा आत्ताचा ताजा निधी आयोगाचे पॉल काय म्हणले तो असो.
चूक झाली हे खरंय. कारण की माझा अन्वयार्थ ( = इंटरप्रीटेशन ) माझा जीव वाचवण्यापुरतंच होतं. त्यामुळे थोडी गफलत झाली. मी यांतला तत्ज्ञ नाही. जे जाणकार आहेत ते तोंडात मिठाची गुळणी धरून बसलेत. मग माझ्यासारख्या स्खलनशील माणसाला प्रयत्न करावे लागतात. ५.
तुम्ही फक्त एकूण मृत्यूमध्ये लसीकरण झालेले ४२% आहेत यावर आडून बसला.
कारण की, मला मरायचं नाहीये. लस घेऊनही मी जर ४२ % मध्येच अडकणार असेन, तर लस घ्यायचीच कशाला? ६.
बरं, जगात इतके जास्त लोक मेले आहेत- १.५ करोड. करोना थोतांड असेल तर इतके लोक मेले कसे काय ?
मृतांवर करोनाचे खोटे छाप मारल्याने. यावर कायझाद कापडिया यांच्या मृत्यूचं उदाहरण अगोदर https://henryclubs.com/kaizad-kapadia-fitness-expert-and-founder-of-k11… दिलं होतं. निरर्थक व खोटे छाप मारून आकडा फुगवण्यात आला आहे. ७.
त्या एक्सेस मॉर्टलिटी वर सुद्धा काहीच टिप्पणी नाही.
इथे इंग्लंडात फ्ल्यूचे मृत्यू करोनाखाली लपवण्यात आले आहेत. मृतावर करोनाचा छाप मारण्यासंबंधी या लेखात प्रश्न उपस्थित केले आहेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.bmj.com/content/375/bmj.n2514 या लेखातलं वाक्य : Deaths from covid-19 were most pronounced in people over 75 with chronic kidney disease or dementia and in black people with obesity, diabetes, or chronic kidney disease. करोनामृत्यूचा निरोगी असलेल्या धडधाकट माणसाशी कसलाही संबंध नाही. ८.
त्यांना रातोरात श्वास घ्यायला त्रास झाला आणि गेले. त्याहून संख्येने कित्येक जास्त ओळखीचे गंभीरपणे आजारी होते, त्यांना ऑक्सिजनवर ठेवावे लागलेले.
तुमचे आप्तेष्ट अकाली गेले याबद्दल खेद आहे. पण एक सांगायला हवं की, श्वासोत्तेजक व प्राणवायू हा करोनावरील उपचार नव्हे. आयव्हरमेक्टिन हा उपाय असू शकतो. तो डॉक्टरांच्या चर्चेत का येत नाही? इथे थोडी माहिती आहे : https://www.covid19treatmentguidelines.nih.gov/therapies/antiviral-ther… ९.
लस आल्यानंतर पुढे जी ओमीक्रोनची तिसरी लाट आली त्यात जवळपास दिसेल तो माणूस पॉझिटिव्ह अशी परिस्थिती होती. नुसता पाझिटिव्ह नाही तर माईल्ड आजारी सुद्धा- खोकला, ताप. पण (बहुदा) लसीकरणामुळे कोणालाही हॉस्पिटलमध्ये पायसुद्धा ठेवावा लागला नाही.
तिसरी लाट आलीच नाही हे डॉक्टर रवी गोडसे यांचं मत आहे : https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-third-… असो. जमेल तशी टिपणी केली आहे. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. हे वाक्य मला उद्देशून आहे असा मला वाटतं :
आकाशातील ग्रहांची शांती करता येते दुराग्रहाची नाही.
माझं म्हणणं आहे की; फुटबॉल खेळाडू मैदानावर मरताहेत, आणि मी दुराग्रही? इंग्लंडातल्या आरोग्यसेवेने लहान मुलांना लशीपायी हृत्शूल ( = हार्ट अॅटॅक ) येऊ नये म्हणून पत्रक काढलंय, आणि मी दुराग्रही? राफेल नदाल लशीमुळे छातीत गडबड वाटते म्हणून सांगतो, आणि मी दुराग्रही? याचा अर्थ असा की तुम्ही ज्यास दुराग्रह म्हणता, त्या दुराग्रहामुळे माझा जीव वाचला आहे. एक विनंती आहे. डॉक्टर एलिझाबेथ हम्फ्री यांनी लशीच्या इतिहासाबद्दल जे पुस्तक लिहिलंय ते वाचून त्याबद्दल अभिप्राय द्यावा. ते पुस्तक इथे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे : https://drive.google.com/file/d/1ZAR7v0i5t62JOUqmPlWR2v90ntpJfXRD/ तुम्ही आकडेवारीच्या पलीकडल्या सत्याचा उल्लेख केला आहे. मग करून टाका त्या पुस्तकाचं खरंखोटं. सत्याला आकड्यांची भीती कशाला? आ.न., -गा.पै.

"जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया." हे अजिबात पटलेले नाही .... नामजपात इतके सामर्थ्य आहे तर, मुस्लिम आणि ख्रिश्र्चन धर्माचे, हिंदुस्थानावर आक्रमण झालेच नसते.... धर्म राखल्या जातो, तो फक्त तलवारीच्याच बळावर ... मेक्सिको, इराण ही उदाहरणे पुरेशी आहेत .... परवाच एक जण अशीच गोष्ट करत होता की बाबा लोकांच्या अंगात दैवी शक्ती असते... इतकी जर शक्ती बाबा लोकांच्या अंगात असेल तर, विडीच्या एका झुरक्यात, सगळ्या ब्रिटीश लोकांना का नाही मारून टाकले? हा वाद, गामा पैलवान, यांच्या बरोबरच आहे .... सुज्ञ माणसे चोंबडेपणा करायला येत नाहीत ...

लोकहो, मंकीपॉक्स रोगासाठी अमेरिकेने ५००००० ( अक्षरी पाच लाख ) लशींची मागणी नोंदवली आहे. संबंधित ( इंग्रजी ) बातमी : https://www.politico.com/news/2022/06/10/us-monkeypox-vaccine-00038776 याचा अर्थ करोनाचं थोतांड गुंडाळी करून थंड्या बस्त्यात बांधायची तयारी सुरू झाली आहे. त्याबद्दल मी स्वत:ची परत एकदा लाल करवून घेतो आहे. अशी संधी सारखीसारखी मिळंत नसते. बाकी, मंकीपॉक्सला मराठीत प्रतिशब्द काय योजावा? माकडपुळी अगदीच पुचाट वाटतो. माकडफोड कसा वाटतो? किंवा मग माकडमोड हा माकडास मोड आल्यागत वाटतो. कुठला समर्पक आहे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अच्छा म्हणजे दुसरा रोग आला आहे आणि त्यासाठी लसी घेतल्या म्हणजे आधीचा रोग संपला असे गामाजींचे अफाट लॉजिक आहे. आपल्या भारतदेशात काल १२०००+ केसेस वाढल्या.

In reply to by कॉमी

दुसरा रोग आला आहे आणि त्यासाठी लसी घेतल्या म्हणजे आधीचा रोग संपला असे गामाजींचे अफाट लॉजिक आहे.
काही काळ गर्दी खेचणारा एकादा पिच्चर फारसा चालेनासा झाला, की थेटरवाले नवीन पिच्चर आणतात, तरीसुद्धा काही काही थेट्रात तो जुना पिच्चर थोडे दिवस चालूच रहातो, तसे असावे.

In reply to by चित्रगुप्त

ल मेटाफॉरने उंदराची शेपटी कुत्र्याला लावता येते. त्यापलीकडे त्याला काही अर्थ नाही. काल १२००० केसेस वाढल्यात हि वस्तुस्थिती आहे.

In reply to by कॉमी

त्या १२००० लोकांमध्ये क्लिनिकल इन्फेक्शन आहे का? ते नसतांनाच उगीच ठोकून दिलेलं दिसतंय की ते रुग्ण आहेत. -गा.पै.

लोकहो, पंढरीच्या वारीवरील अधिकाऱ्यांना वर्धकमात्रेची सक्ती करण्यात आलेली आहे. संबंधित बातमी : https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/dose-fo… लससक्तीचा आदेश न्यायालयाच्या उपरोक्त टिपणीच्या विरोधात आहे. आ.न., -गा.पै.

लोकहो, इंग्लंडच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने लस व मृत्यूविषयी विदा प्रकाशित केला आहे. सर्वात अद्यतन धारिका येथे आहे : https://assets.publishing.service.gov.uk/government/uploads/system/uplo… हिच्यातनं उचललेला मृत्यूंचा विदा खाली मांडला आहे. हा विदा रुग्णालयातल्या मृत्यूंचा आहे. हे मृत्यु करोना विषाणूशी संबंधित ( करोनामुळे झालेले नव्हे ) आहेत. साल महिना - किमान एक लस घेतलेले / लस न घेतलेले Year Month - Ever vaccinated / Unvaccinated २०२१ जानेवारी - ३४९३ / २४३६४ २०२१ फेब्रुवारी - ४८९२ / ७६६० २०२१ मार्च - १७७३ / १३११ २०२१ एप्रिल - ५२४ / २३८ २०२१ मे - २१३ / ७७ २०२१ जून - २२४ / ९७ २०२१ जुलै - ८३५ / ३३७ २०२१ ऑगस्ट - १६५७ / ५९० २०२१ सप्टेंबर - २१६४ / ४९६ २०२१ ऑक्टोबर - २३६९ / ४३० २०२१ नोव्हेंबर - २३७५ / ५५६ २०२१ डिसेंबर - १९९० / ६८२ २०२२ जानेवारी - ३९१४ / ६९३ २०२२ फेब्रुवारी - २४४७ / २६४ २०२२ मार्च - २६५८ / २०२ २०२२ एप्रिल - ३३६५ / २०६ २०२२ मे - १२८२ / ८२ करोनाशी संबंधित मृत्यूंमध्ये लस न घेतलेल्यांचं प्रमाण झपाट्याने उणावतंय हे संयुक्त साम्राज्याच्या शासनाने ( UK government ) अधिकृतरीत्या मान्य केलं आहे. घ्या लस टोचून आणि व्हा परलोकी मार्गस्थ. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

:-) पोलिओ लशीबाबतही हेच होणार आहे. हॉस्पिटल मृत्युंपैकी ९९ टक्क्याहून अधिक लोक पोलिओ लस घेतलेले असणार आहेत. बीसीजीचे पण तसेच. जोक्स अपार्ट. आपण दिलेल्या डोक्युमेंटमधील बाकीची सर्व टेबले, निरीक्षणे काय म्हणतात? हॉस्पिटल मृत्युंतील लस घेतलेले विरुद्ध न घेतलेले हा जो भाग इथे उद्धृत केला आहे त्याच्या बाबतीत दिलेला संदर्भ आपण वाचला असेल अशी आशा, पण नसेल अशी खात्री. In the context of very high vaccine coverage in the population, even with a highly effective vaccine, it is expected that a large proportion of cases, hospitalisations and deaths would occur in vaccinated individuals, simply because a larger proportion of the population are vaccinated than unvaccinated and no vaccine is 100% effective. This is especially true because vaccination has been prioritised in individuals who are more susceptible or more at risk of severe disease. Individuals in risk groups may also be more at risk of hospitalisation or death due to non-COVID-19 causes, and thus may be hospitalised or die with COVID-19 rather than because of COVID-19.

In reply to by गवि

ता.क. कोविड लस ही कमी परिणामकारक असू शकते आणि कदाचित तिचे गंभीर दुष्परिणाम (सुरुवातीला न समजलेले) असू शकतात या शक्यतेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. किंबहुना रक्तात गुठळी किंवा तत्सम काही परिणाम होतच नसतील असे छातीठोकपणे सांगणे सध्या कठीण आहे हेही मान्य. पण या बाबतीत दोन महत्वाचे मुद्दे: अ. गुठ्ळी किंवा तत्सम दुष्परिणाम हे जर लसीने होत असतील तर लस न घेताही मूळ इन्फेक्षन झाल्यास ते अधिक तीव्रतेने होऊ शकतात. हे परिणाम विषाणूच्या पेशीशी संबंधित असतात. ते टाळायचे तर बंद खोलीतच बसावे लागेल. ब. दिलेला विदा लशीची घातकता दाखवत नसून अधिकाधिक लोकांपर्यंत ती पोचली आहे इतकेच दाखवत आहे. मूळ मुद्दा (लस घातक) ही तात्विक शक्यता आणखी बराच काळ अस्तित्वात राहील. पण सध्या दिलेला विदा त्याला पूरक नाही. उलट ती शक्यता (टक्के) कमी कमी होताना दिसतात.

In reply to by गवि

गवि, तुमचे वरचे दोन्ही प्रतिसाद वाचले. अधिक लसटोचणीमुळे अधिक मृत्यू झालेले असू शकतात. पण हे सारे करोनापायी रुग्णालयात दाखल झालेले होते. याचाच अर्थ लस टोचूनही करोना अंगात सापडतोच. म्हणजेच ती तितकीशी परिणाकारक नाही. मग घ्यायचीच कशाला? आता तुमची दोन विधानं बघूया. १.
अ. लस न घेताही मूळ इन्फेक्षन झाल्यास ते अधिक तीव्रतेने होऊ शकतात.
करोनामुळे रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. लशीमुळे होतात. मग लस घ्यायचीच कशाला? २.
ब. दिलेला विदा लशीची घातकता दाखवत नसून अधिकाधिक लोकांपर्यंत ती पोचली आहे इतकेच दाखवत आहे
म्हणजेच लस घेऊनही काहीच लाभदायक फरक पडंत नाही. असाही अर्थ निघतो. मग लस घ्यायचीच कशाला? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

>>> मग लस घ्यायचीच कशाला ? ठीकय...! इतकं मान्य. बाकी, ते गुठळ्या बिठूळ्या सध्या अमान्य. :/ -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बर्‍याच काळानंतर आज हा धागा पुन्हा उघडला. आम्हा उभयतांना कोविडबाधा झाली होती, आणि त्यातून कोणतेही औषध न घेता सुखरूपपणे आपोआप बरे झालो. मात्र त्यानंतर काही काळाने लस घेतली होती. माझे सगळे रिपोर्ट अगदी चांगले असूनही रक्तात गुठळ्या झाल्याचे सुमारे वीस दिवसांपूर्वी सीटी स्कॅनमधून कळले. या गुठळ्या कित्येक महिने पायाचा पोटर्‍यात होत्या, त्यामुळे बरेच महिने पाय दुखत होता. अलिकडे पाय दुखणे बंद होऊन त्या गुठळ्या रक्तातून फुफ्फुसापर्यंत पोहोचल्यावर कळा येऊ लागल्या, वगैरे डॉक्टरांनी सांगितले. (छातीत भयंकर कळा येऊ लागल्यामुळे इस्पितळात दाखल होऊन सीटीस्कॅन आणि अन्य चाचण्या कराव्या लागल्या) ताबडतोब चोवीस तासांसाठी रक्तातून औषध चढवले गेले, छातीत दुखणे बंद झाले आणि जन्मात पहिल्यांदाच मला आता औषध घ्यावे लागते आहे. या औषधाचा अनुषंगिक परिणाम म्हणून की काय माझी शारीरिक शक्ती पुष्कळच कमी झालेली आहे. माझा कोविडबद्दलचा ऑगस्ट २०२० चा लेख इथे वाचता येईल.

In reply to by चित्रगुप्त

आम्ही अमेरिकेत असताना कोविडबाधा झाली होती. त्यावेळे सव्वा वर्ष तिथे राहिलो होतो, लसही तिथेच घ्यावी लागली, कारण त्याकाळी लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणताही विमानप्रवास वा महत्वाच्या कार्यालयांमधे, संग्रहालयांमधे वगैरे जाता येत नव्हते.

In reply to by चित्रगुप्त

कोविडबाधा झाली होती, आणि त्यातून कोणतेही औषध न घेता सुखरूपपणे आपोआप बरे झालो. वेळेवर वैद्यकीय सल्ला व औषध उपचार करणे काही गैर नाही. कदाचित अतिरेकी पणा असेच मी म्हणेन. मी ठिक आहे, मला काही होत नाही आशी समजुत करून घेऊन बरीच माणसे आला दिवस पुढे ढकलतात. कौविड नंतर किंवा त्यानंतर ही कधीतरी रक्त तपासणी केली असती तर लवकर कळाले असते.

In reply to by कर्नलतपस्वी

आम्हाला बाधा झाल्यावर लगेच मुलाने त्याच्या ऑफिसातील डॉक्टरचा तसेच सुनेने तिच्या अमेरिकेतल्याच डॉक्टर भावाचा सल्ला घेतला होता. दोघांनी सांगितले की कोविडवर काहीही औषध नसल्याने इस्पितळात नेण्याचा काहीही उपयोग नाही, उलट घरातच जास्त सुरक्षित रहाल. त्याप्रमाणे घरातच वेगवेगळ्या खोल्यांमधे राहिलो. घरगुती काढा वगैरे घेत होतो. बरे झाल्यावर लगेच तपासणी केली, ती निगेटिव आली. माझ्या १४ ऑगस्ट २०२० च्या लेखातला थोडा मजकूर इथे उधृत करतो:
--तोवर आम्ही कोविड टेस्ट करून घेतली नव्हती. अशक्तपणामुळे आम्हाला तिकडे जाताही आले नसते. याबद्दल मुलाने त्याच्या कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही. घरीच योग्य ती खबरदारी घेत आराम केल्याने हळूहळू ठीक होतील. -- त्याच सुमारास इंदौरच्या माझ्या एका मित्रानेपण त्याच्या ओळखीच्या एका डॉक्टरांना विचारून त्यांनी प्रिस्क्रिबलेल्या औषधांची यादी मला कळवली. त्यात भूक लागावी म्हणून अमुक गोळ्या, खोकल्यासाठी तमुक, स्ट्रेस कमी करण्यासाठी, ताप येऊ नये यासाठी अमुकतमुक अशी ती यादी होती. माझ्यामते तहान - भूक लागणे, झोप येणे वगैरे सगळे नैसर्गिक रीत्याच व्हायला हवे, त्यासाठी गोळ्या घेणे वगैरे मला अजिबात पटत नाही, आणि असे काही होणे, ही पण निसर्गाचीच एक योजना आहे, रोगप्रतिकारक यंत्रणेने आता पूर्ण शरीराचा ताबा घेऊन आघाडी सांभाळल्यामुळे अन्नावरची वासना उडणे वगैरे सर्व झालेले आहे, याची मला खात्री वाटत होती. स्ट्रेस वगैरे तर काही नव्हतेच. मग ती यादी बाजूला ठेवली. मागे चिकनगुनियाच्या वेळीपण कोणतेच औषध घेतले नव्हते. मुदत संपल्यावर आपोआप बरा झालो होतो. आपण यातून नक्कीच बाहेर पडणार याची मला खात्री वाटत होती. जीवेषणा अजिबात क्षीण झालेली नव्हती. दहा-बारा दिवस असेच गेल्यावर जरासे बरे वाटू लागले. थोडेसे खाणे आणि घरातच चालणे फिरणे सुरू झाले.
याउलट लस घेतल्याच्या परिणामी अलिकडे त्रास झाला असावा, असेही डॉ.चे मत आहे. इस्पितळात दर सहा तासांनी रक्त तपासणी केली जात होती, त्यात सगळे काही इतके चांगले असणे हे आश्चर्यजनक/अपवादात्मक असल्याचे नर्सने मला सांगितले, तसेच आजवर मी कधीही इस्पितळात गेलेलो नाही आणि औषधही घेतलेले नाही, याचे त्यांना खूप आश्चर्य वाटत होते. पहले रचा प्रारब्ध, फिर रचा शरीर... असे तुम्हीच सांगितले होते कर्नल साहेब. त्यानुसार सगळे काही घडते आहे. -- दुसरे म्हणजे कोविड टेस्ट एकाच दिवशी सकाळी पॉझिटिव आणि त्याच संध्याकाळी निगेटिव असे आमच्या घरातच घडलेले आहे. आता कशावर विश्वास ठेवायचा ?

In reply to by गामा पैलवान

याचाच अर्थ लस टोचूनही करोना अंगात सापडतोच. जरा लस काय असते .. ती कशी काम करते .. हे वाचा. करोनाचीच नाही .. इतर कुठलीही .. तुमची आवडती ... नंतर वरचे वाक्य पुन्हा वाचा ...

In reply to by सुक्या

सुक्या, काटेरी प्रथिनांचा हवाला कोणी द्यायचा? mRNA वापरून लस तयार केली. भले ठीक. त्यामुळे काटेरी प्रथिनं निर्माण झाली. ही प्रथिनं प्रतिपिंडांचं काम करतात. त्यांनी करोना विषाणूचा जीव घेतला. इथवर ठीक. पण हीच काटेरी प्रथिनं शरीरात इतरत्र घातक धुमाकूळ घालणार नाहीत याची हमी कोणी घ्यायची? तत्संबंधी लेख : https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/34100279/ ( केवळ प्रस्तावना पहावी ) याव्यतिरिक्त तुम्हीही जमलंच तर जरा Antibody Dependent Enhancement यावर वाचन करा म्हणून सुचवेन. लशीच्या दुष्परिणामांवर चर्चा करता येईल. आ.न., -गा.पै.

In reply to by आग्या१९९०

करोनमुळे गुठळ्या होत नसून अतिरिक्त प्रतिपिंडांमुळे होतात. संदर्भ : https://www.imperial.ac.uk/news/227414/blood-clots-severe-covid-cases-r… -गा.पै.

In reply to by आग्या१९९०

आग्या१९९०, आपल्या शरीराने करोनावर हल्ला करण्यासाठी एक योजना आखलेली असते. ती कार्यान्वित करणारे मानकरी म्हणजे प्रतिपिंडे होत. त्यांना antibodies म्हणतात. आ.न., -गा.पै. <स्वगत> हेचि फळ काय मम तपाला .... <⁄स्वगत>

In reply to by गामा पैलवान

म्हणजे करोना शरीरावर हल्ला करतो हे तुम्हाला मान्य आहे. त्याविरुद्ध प्रतिपिंड शरीरात तयार होतात हेही तुम्हाला मान्य आहे. त्यामुळे रक्तात गुठळ्या होतात हेही तुम्हाला मान्य आहे. मग कोरोनात रक्तात गुठळ्या होत नाही हा दावा का करता तुम्ही?

In reply to by आग्या१९९०

आग्या१९९०, १.
म्हणजे करोना शरीरावर हल्ला करतो हे तुम्हाला मान्य आहे.
हो. २.
त्याविरुद्ध प्रतिपिंड शरीरात तयार होतात हेही तुम्हाला मान्य आहे.
हो. ३.
त्यामुळे रक्तात गुठळ्या होतात हेही तुम्हाला मान्य आहे.
करोनाच्या विषाणूमुळे गुठळ्या होत नाहीत. शरीराची प्रतिकारयंत्रणा करोनावर प्रतिहल्ला करते. त्यासाठी योग्य प्रमाणात प्रतिपिंडे बनवते. पण लस टोचली तर भाराभार प्रतिपिंडे तयार होतात. आणि ही अतिरिक्त प्रतिपिंडे त्यांच्यावरील काटेरी प्रथिनांमुळे रक्तस्राव घडवून आणतात. त्यामुळे रक्त साकळून गुठळ्या होतात. ४.
मग कोरोनात रक्तात गुठळ्या होत नाही हा दावा का करता तुम्ही?
निव्वळ करोना विषाणूमुळे गुठळ्या होत नसून अतिरिक्त प्रतिपिंडांमुळे होतात. आधीच्या संदेशात हेच म्हंटलं आहे. अतिरिक्त हा शब्द महत्त्वाचा ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

करोनाच्या विषाणूमुळे गुठळ्या होत नाहीत. शरीराची प्रतिकारयंत्रणा करोनावर प्रतिहल्ला करते. त्यासाठी योग्य प्रमाणात प्रतिपिंडे बनवते. पण लस टोचली तर भाराभार प्रतिपिंडे तयार होतात. ज्यांनी करोनाची एकही लस घेतली नाही , मास्कही वापरला नाही अशा जवळच्या दोन नातेवाईकांना कोरोनाने मृत्यू झाला. दोघांनीही कोरोनाचे निदान झाल्यावर आयुर्वेदिक काढे,वाफारे आणि कोमट पाण्याच्या गुळण्या हे घरगुती उपचार घेतले. दोघांनाही श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयात दाखल केले, दोघांच्याही रक्तात गुठळ्या झाल्याने एकाचा काही तासात मृत्यू झाला दुसऱ्याचा उपचाराला दाद देत नसल्याने पंधरा दिवसात मृत्यू झाला. तुम्ही म्हणता ते अतिरिक्त प्रतिपींड कुठून तयार झाले?

In reply to by आग्या१९९०

आग्या१९९०, तुमच्या परिचितांच्या दुर्घात्नेबद्दल खेद आहे. १०० % अचूक निदान शक्य नाही. मला काय कोणालाही शक्य नाही. त्यांच्या परिस्थितीस विपरीत उपचारही कारणीभूत असू शकतात. जसे श्री. विवेक पटाईत यांच्या थोरल्या बंधूंवर झाले होते. प्रत्येक रक्तस्रावास प्रतिपिंड कारणीभूत असतात असंही नव्हे. मला स्वत:ला पोटात रक्तस्राव झाला होता, तो उलटीतनं बाहेर पडला. रुग्णालयात ताबडतोब दाखल झालो. तिथे दुसऱ्या दिवशी दुर्बिणीने तपासणी केल्यावर काहीच जखम वा व्रण ( ulcer or scar ) आढळला नाही. विष्ठा सर्वसामान्य ( normal ) व विनात्रास होत होती. म्हणजेच रक्तस्राव आतड्यांतला नसून जठरात झाला होता ( इति डॉक्टर ). रक्तस्रावाचं कारण कळू शकलं नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे रक्त पातळ करायची औषधं जास्ती मात्रेत दिल्याने तो झाला. सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक दुर्घटनेची कारणमीमांसा प्रतिपिंड नव्हे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ॲडमीट होईपर्यंत दोघांनीही कुठलीच आधुनिक औषधे घेतली नव्हती तरी रक्तात गुठळ्या का झाल्या. लस घेतली नसल्याने अतिरीक्त प्रतिपिंड कुठून आली?

In reply to by आग्या१९९०

आग्या१९९०, मला नक्की कारण नाही सांगता येणार. पण इतर घटक कारणीभूत असू शकतात. किंबहुना ते लक्षांत न घेता उपचार केले गेलेले दिसताहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

श्री गामा पैलवान, तुमच्या चर्चेत मला जास्त लेखक / प्रतिसादक म्हणुन रस नाही. पण तुम्ही जी आकडेवारी सादर केलीत ती अतिशय चुकीच्या पध्दतीने आणि दिशाभुल करणारी आहे. तुम्ही मृत्युचे टक्केवारी न देता, एकुण मृत्युचे आकडे दिले आहेत. खरे तर एकुण बाधित लोकांची संख्या, त्यातील गंभीर रुग्णांची संख्या, आणि मृत लोकांची टक्केवारे आवश्यक आहे.

In reply to by Trump

Trump, ही सरकारी माहिती आहे. जितकी मिळाली तितकीच मी दिली आहे. मात्र तरीही तुमचा मुद्दा मान्य आहे. सदर विदालेखात बिगर करोना मृत्यूंची आकडेवारीही समाविष्ट आहे (तालिका क्रमांक १). तिच्याकडे ओझरता दृष्टीक्षेप टाकला. लस घेतलेले ( किमान १) व लस न घेतलेले यांच्या मृत्यूंचं प्रमाण जानेवारी २०२१ मध्ये ६९७० : २८०९५ होतं. विनालस मृत्यू जास्त होते कारण तेव्हा लशीकरण फारसं झालं नव्हतं. मग लशीकरण झालं आणि मे २०२२ मध्ये हेच गुणोत्तर २८१८६ : ९३५ ( म्हणजे सुमारे ३० : १ ) झालं. करोनामृत्यूंचं प्रमाण सुमारे १५ : १ आहे. आता प्रश्न असा आहे की लशीकरण ३० : १ वा १५ : १ या दरम्यान दिसतंय आहे का? ३० : १ म्हणजे ९६+ % तर १५ : १ म्हणजे ९३+% होतात. प्रत्यक्षात संयुक्त साम्राज्यातलं ( UK मधलं ) लशीकरण ५३ मिलियन ( ६७ मिलियन पैकी ) आहे. म्हणजेच ते ८० % हून खाली आहे. मग प्रश्न असा उद्भवतो की लशीकरण ८० % असतांना मृत्यूचं प्रमाण ९३+% ते ९६+% कसंकाय? उरलेले १३+% ते १६+% अतिरिक्त मृत्यू लशीतून आले का? आ.न., -गा.पै.

In reply to by Trump

>>>>श्री गामा पैलवान, तुमच्या चर्चेत मला जास्त लेखक / प्रतिसादक म्हणुन रस नाही. गापै यांनी तुम्हाला व्य.नि. आणि खरड करुन धाग्यावर यायचं निमंत्रण दिलं असेल. नै तर, एखादा विचार पटत नसतांनाही कोण कोणाच्या धाग्यावर लिहायला येतं. ;) (ह. घ्या) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नै तर, एखादा विचार पटत नसतांनाही कोण कोणाच्या धाग्यावर लिहायला येतं. ;)
श्री बिरुटेसर, काही लोकांना सांख्यिकीमध्ये रस असतो.

घ्या लस टोचून आणि व्हा परलोकी मार्गस्थ.
लच टोचवून घेणे हा आत्महत्या करवून घेण्याचा खात्रीचा, राजमान्य, कायदेशीर उपाय, असे 'ह्यांचे म्हणणे. ------- बाईसाहेब फुरसुंगीकर.

प्रिय गामाजी, अपेक्षा आहे की आपली पुरेसी लाल झालेली असेल. प्रमाणापेक्षा जास्त लाल झाला की तो रंग नंतर काळपट तपकिरी रंगाकडे झुकतो.

In reply to by धर्मराजमुटके

धर्मराजमुटके, अहो काय सांगायचं आता. सरकारने नुकतीच वर्धक मात्रा ( बूस्टर ढोस ) ७५ दिवसांसाठी फुकट केला. मग अशी ताजा रंग फासायची संधी दिसल्यावर मलाही राहवलं नाही. पण तुमच्या आस्थेबद्दल आभार. :-) आ.न., -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे डॉक्टर, संयुक्त साम्राज्यातलं लशीकरण ८० % असतांना मृत्यूचं प्रमाण ९३+% ते ९६+% कसंकाय? उरलेले १३+% ते १६+% अतिरिक्त मृत्यू लशीतून आले का? की नाही आले? की अधिक विदा हवाय? याचं उत्तर दिलंत तर माझी या प्रश्नापुरती तरी शांती होईल. आ.न., -गा.पै.

गामाजींसाठी रोचक ट्विट

घातक लसींच्या दुष्परिणामाच्या अश्या केसेस आता दिवसेंदिवस बाहेर येतील. गामाजींच्या लस विरोधी डॉक्युमेंटेशन मध्ये आमचा खारीचा वाटा.

In reply to by कॉमी

“मी बूस्टर डोस घेतल्यापासून वेड्यासारखी झाली आहे. मी फक्त आदिलला शोधत आहे. आताही मी त्यालाच भेटायला जात आहे. यावरुन तुम्ही बुस्टर डोसने माझी अवस्था काय झाली असेल, याचा विचार करुच शकता. “मोदीजी, हे इंजेक्शन कसले आहे? यात कोणकोणते प्राणी आहेत हेच मला समजत नाही. मला झोप येत नाही. माझे डोळे सुजले आहेत. माझा चेहराही सूजला आहे. हे व्हायग्रा आणि वासनेचे इंजेक्शन आहे”, असेही राखी म्हणाली. त्यासोबतच तिने हे इंजेक्शन न घेण्याचा सल्ला दिला.

In reply to by सुबोध खरे

ती बाई कशी आहे हे तिचे नाव ज्यांनी ऐकले / वाचले असेल त्यांना नक्कीच माहिती आहे. मुद्दा कोणी मांडला त्यापेक्षा काय मांडला हे महत्त्वाचे आहे. काही महिन्यांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाने डझनभर वेळा कोरोनाची लस टोचून घेतली होती. जेव्हा तो पकडला गेला तेव्हा त्याला त्याने असे का केले या बद्दल विचारणा झाली असता त्याने दिलेले उत्तर हे राखीने मांडलेल्या मुद्द्यासोबत साम्य दर्शविणारे होते आणि तो एक सामान्य निम्नवर्गीय इसम होता आणि म्हणूनच पकडला गेला कारण त्याने फुकटची सरकारी लस घेतली होती. विकतची लस घेतली असती तर त्याला पकडण्याचा काही प्रश्नच नव्हता. असो. जर लशीचा असाही परिणाम / दुष्परिणाम होत असेल तर त्यावरही संशोधन होणे गरजेचे आहे.

लोकहो, अमेरिकेतील अध्यक्षीय निवासस्थानाच्या ( व्हाईट हाऊस च्या ) माजी डॉक्टर डेबोरा बर्क्स यांनी लशीमुळे लागणीपासून संरक्षण मिळंत नसल्याची कबुली दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, कोव्हिड लस या बाबतीत बिनकामाची आहे हे त्यांना माहीत होतं. अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://www.foxnews.com/media/dr-deborah-birx-knew-covid-vaccines-not-p… करोनाची लस हे थोतांड असल्याचं सत्य थेट अश्वमुखातनं अवतीर्ण झालं आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

Overplayed असा शब्द त्यांनी वापरला आहे. ह्या बाई खुद्द मान्य करतात की लसी मुळे गंभीर रोग आणि इस्पितळात भरती न करावी लागण्याइतपत मदत होते, ह्याचा अर्थ प्राण वाचतात असा आहे. तुम्हाला ते सुद्धा मान्य नाहीये. बाई म्हणतात की हॉस्पिटलायझेशन मध्ये लस घेतलेले जास्त आहेत. अर्थातच असणार.पूर्ण लसीकरण झालेले ६८% आहेत. किमान एक डॉस झालेले ७९% लोक आहेत. वारंवार विदा दाखवून देत आहे की लस न घेतलेल्या पूल मधून प्रोपोर्शनेटली जास्त मृत्यू आणि गंभीर रुग्ण आहेत.

In reply to by कॉमी

कॉमी,
लसी मुळे गंभीर रोग आणि इस्पितळात भरती न करावी लागण्याइतपत मदत होते, ह्याचा अर्थ प्राण वाचतात असा आहे. तुम्हाला ते सुद्धा मान्य नाहीये.
का म्हणून मी मान्य करू? बाई परस्परविरोधी विधानं करताहेत. गंभीर रोगांपासून बचाव वगैरे बाईंचा विश्वास आहे. तो विदा नव्हे. शिवाय बाईंचा सल्ला खासकरून ७०+ वय असलेल्यांसाठी आहे. मग तरुणांनी लस घ्यायचीच कशाला? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विदा नक्की आहे.तो तुम्हाला आणि बाईंना दोघांना माहिती आहे. पण तुम्ही अत्यंत चातुर्याने कानाडोळा करत आहात.

In reply to by गामा पैलवान

शिवाय बाईंचा सल्ला खासकरून ७०+ वय असलेल्यांसाठी आहे.मग तरुणांनी लस घ्यायचीच कशाला?
बाईंनी थेट उलटे विधान केले आहे असे माझ्या अल्प आकलनास वाटते. लस घेतली असली तरी सत्तरी वरील लोकांना त्रास होऊ शकतो असे त्या म्हणत आहेत. आणि अबालवृद्धांनी सर्वांनीच लस घ्यावी अश्याच मताच्या त्या आहेत. खासकरून, तरुणांना लस घेतल्यावर त्रास होणार नाही असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ दिसतो, कारण त्या फक्त 70 वरील लोकांना त्रास होईल असे म्हणत आहेत. मुद्दा काय, तर लस घेतल्यावर सेव्हर आजार आणि हॉस्पिटलायझेशन पासून संरक्षण मिळते असे त्यांचे मत आहे. त्या केवळ आणि केवळ म्हणतायत कि लसीचे महत्व OVERPLAY केले आहे, आणि त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा समज पसरला कि लस आजार आणि इस्पितळात भरती होण्यापासून संरक्षण देऊ शकत नाही (जे संरक्षण नक्की मिळते- it will). तर हा त्यांचा विश्वास आहे, आणि तोच या पन्नास शब्दांच्या लेखात मांडला आहे. पण तुम्हाला लेखाची हेडलाईन सोडून बाकीचे सगळे अमान्य आहे असे दिसते. किंवा तुम्ही फक्त हेडलाईनच वाचलीये असे तरी दिसते.

In reply to by कॉमी

कॉमी, it will हा केवळ बाईंचा दावा आहे. त्यास कसलाही आधार नाही. त्या म्हणतात way forward is testing and vaccination. हे टेस्टिंग कशासाठी करायचं? आणि जर लस घ्यायचीच असेल तर चाचणी करायची गरजच काय मुळातून? शिवाय RTPCR ही चाचणी नसून निव्वळ दिशाभूल आहे. अस्तित्वात नसलेल्या विषाणूपासून संरक्षण करायला लस कशाला पाहिजे? आ.न., -गा.पै.

In reply to by कॉमी

"लसींपासून रोगलागण होण्यापासून संरक्षण मिळत नाही हे मला (she knew) आधीपासून माहित होतं. आपण लसींचे (लागण रोखण्याबाबतचे) गुण जास्त वाढवून सांगितले. त्यामुळे लोकांचा लसीबाबत चुकीचा समज झाला की लस गंभीर आजार, इस्पितळात भरती होण्याचा धोका (आणि त्याच तर्काने, मृत्यू) पासून संरक्षण देणार नाही- जे नक्की मिळते आहे." १. ह्या बाईंना व्यक्तिष: काय माहित होतं आणि नव्हतं हा मुद्दा पूर्णपणे गौण आहे. त्यावेळचे ओव्हरॉल मत आणि विदा लसींपासून इन्फेक्शन विरुद्ध संरक्षण मिळते असाच होता, आणि त्यानुसारच लसींबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचत असावी. अजूनही लसी इन्फेक्शन विरुद्ध पूर्ण पणे कुचकामी नाहीयेत, मात्र त्या बाबत उपयोगिता अंदाजापेक्षा कमी आहे, कारण नवे नवे व्हरायंट येत आहेत. २. बाई स्पष्टपणे आणि या धाग्यावर अनेकदा देऊन झालेल्या विदावर आधारित सांगतात की लसीमुळे आजार व मृत्यूपासून संरक्षण नक्की मिळते. हा विदा जालावर अत्यंत सहजगत्या सापडतो, आणि ठराविक अजेंडा असलेले लोकच त्याकडे वारंवार कानाडोळा करतात. बाईंचे पहिले आणि दुसरे मत दोन्ही उपलब्ध विदावर आधारित आहे. गामाजी तुम्ही दुटप्पीपणे केवळ पहिले मत विदेवर आधारित असल्याचे आणि दुसरे पोकळ आणि आधारविरहित असल्याचे नाटक करत आहात. बाईंच्या पूर्ण वक्तव्याचा विपर्यास करून चेरी पिकिंग करत तुम्हाला हवे तेव्हढे सांगत आहात.

In reply to by कॉमी

कॉमी साहेब, गामा पहिलवान करोनाची लस घेणे आवश्यक आहे हे कधीच मान्य करणार नाहित. त्यामुळे कितीही प्रतिवाद केला तरी त्याचा फायदा नाही. गामा पहिलवान आणि त्यांचा प्रतिवाद करणार्‍यांची चिकाटी पाहून मला खरोखरच नवल वाटते. माझ्यात एवढी चिकाटी नाही त्यामुळे समोरच्याचे पटत नसले तरी मी जास्त प्रतिवाद करत नाही. हे जालीय आणी प्रत्यक्ष जीवनात देखील असेच आहे.

In reply to by धर्मराजमुटके

मी टाईमपास करण्यासाठी वेळ असेल तरच मिपावर येतो. आणि हे प्रतिवाद गामांसाठी नाहीत. ते ब्रेनवॉश झालेले आहेत, आणि हे वॉशिंग त्यांनी स्वतःहून केले आहे असेच मला वाटत आले आहे. पण मिपा वाचून कोणी गामाजींच्या "Do your own research" च्या नावाखाली फालतू निर्बुद्ध, मनाजोगते वाट्टेल ते आकलन केलेले आणि आउट ऑफ कॉन्टेक्स्ट लेख वाचून लस न घेण्याचा निर्णय घेत असेल तर ते थांबवणे हे मिपा या संस्थळाचे तसेच मिपावरील सदस्यांचे कर्तव्य आहे असे वाटते.

लोकहो, अमेरिकेतील ह्युस्टनचं दलित ( methodist ) हॉस्पिटल खुनी आहे. त्यांना रुग्णांचे व कर्मचाऱ्यांचे खून पाडण्यात अधिक रस आहे. संबंधित बातमी : https://fee.org/articles/massive-nurse-shortage-hits-houston-weeks-afte… सदर वार्तेनुसार रुग्णालयाने लस न घेतलेल्या सुमारे १५० जणांना कामावरून डच्चू दिला. आता त्यास मनुष्यबळाची कमतरता भासते आहे. या अभावापायी काही रुग्णांचा जीवही गेला आहे. एकंदरीत रुग्णालयाच्या व्यवस्थापनास रुग्णांचे व कर्मचाऱ्यांचे खून पाडण्यात अधिक रस आहे. आ.न., -गा.पै.

कॉमी, तुमचे दोन प्रतिसाद वाचले : https://www.misalpav.com/comment/1147985#comment-1147985https://www.misalpav.com/comment/1147995#comment-1147995 माझी मतं सांगतो. १.
त्यामुळे लोकांचा लसीबाबत चुकीचा समज झाला की लस गंभीर आजार, इस्पितळात भरती होण्याचा धोका (आणि त्याच तर्काने, मृत्यू) पासून संरक्षण देणार नाही- जे नक्की मिळते आहे."
लशीमुळे संरक्षण मिळते, हा केवळ दावा आहे. २.
अजूनही लसी इन्फेक्शन विरुद्ध पूर्ण पणे कुचकामी नाहीयेत, मात्र त्या बाबत उपयोगिता अंदाजापेक्षा कमी आहे, कारण नवे नवे व्हरायंट येत आहेत.
तुम्ही ज्याला नवनवे व्हरायंट म्हणता ना, त्यांच्याशी लढायला शरीराची प्रतिकारशक्ती सक्षम असते. पण लशीमुळे तिची मोडतोड होते. आणि शरीरास विषाणूच्या नव्या आवृत्तीची लागण होते. हे प्रकार पूर्वीही झाले आहेत. यांस Original Antigenic Sin असं म्हणतात. खरंतर हा प्रकार डॉक्टर लोकांनी उलगडून सांगायला हवा. पण ते करणार कोण ! ३.
लसीमुळे आजार व मृत्यूपासून संरक्षण नक्की मिळते. हा विदा जालावर अत्यंत सहजगत्या सापडतो,
तुमच्याकडे विदासंबंधी दुवा आहे का ? लशीमुळे रोग झाला नाही की इतर कारणामुळे, हे कसं कळणार ? शिवाय लस प्रायोगिक आहे ही बाब का लपवून ठेवलीये ? कुठल्याही लशीमुळे कसलीही साथ आजवर आटोक्यात आलेली नाहीये. या सत्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. ४.
बाईंचे पहिले आणि दुसरे मत दोन्ही उपलब्ध विदावर आधारित आहे.
या विदाचा दुवा मिळेल काय ? ५.
... ते ब्रेनवॉश झालेले आहेत, आणि हे वॉशिंग त्यांनी स्वतःहून केले आहे असेच मला वाटत आले आहे.
मी स्वत:हून ब्रेनवॉश्ड झालेलो आहे हे मान्य. आहेच मुळी मी स्वावलंबी. अहो लोकं कुठलीशी लस टोचवून घेतात आणि स्वत:ला करोनावॉश्ड समजतात. त्यापेक्षा माझा ब्रेनवॉश बराय. निदान जीव तरी जात नाही. ६.
.... फालतू निर्बुद्ध, मनाजोगते वाट्टेल ते आकलन केलेले आणि आउट ऑफ कॉन्टेक्स्ट लेख वाचून लस न घेण्याचा निर्णय घेत असेल तर ते थांबवणे ....
करोनाच्या लशीस मेकॉलेछाप क्लार्क लोकांनी मान्यता दिलेली आहे. भले त्यांच्या पदव्या व शिक्षणं काहीही असोत. ती तथाकथित लस टोचून कुणाचा जीव जाऊ नये या सद्हेतूने मी प्रेरित झालो आहे. आता तुम्ही लावलेल्या एकेक विशेषणांचा परामर्ष घेतो. फालतू : अत्यंत चुकीचं विशेषण. करोना हे थोतांड आहे. व त्याची लस फालतू आहे. त्यामुळे मला महाफालतू हे विशेषण लावायला पाहिजे. थोतांडाच्या पातळीवर उतरून मी महाफालतू पद्धतीने माझा मुदा पुढे रेटतोय. का ते पुढे वाचा .... निर्बुद्ध : .... कारण की मी निर्बुद्ध आहे. होय तर. मला मेडिकल अक्कल नाही. म्हणून मी माझ्यापेक्षा अधिक मेडिकल अक्कल असेलल्या तत्ज्ञांचं ऐकतो. त्यांचा दृष्टीकोन सरकारी नसून पर्यायी आहे. मनाजोगते : हे बरोबर बोललात. फक्त 'स्वत:च्या मनाजोगते' असं हवं होतं. कारण की मी मेकॉलेछाप कारकुंड्यांच्या ओंजळीने पाणी पीत नाही. वाट्टेल ते आकलन केलेले : करेक्ट. मी माझ्या मनाला वाट्टेल ते आणि तेव्हढंच आकलन करतो. मी निर्बुद्ध असल्याने माझ्यापेक्षा अधिक माहिती असलेल्या तत्ज्ञांचं मत बघतो. मग ते सरकारी प्रचाराच्या बाजूने असो वा विरोधात. मला त्याची पर्वा नाही. का ते पुढे वाचा .... आउट ऑफ कॉन्टेक्स्ट लेख : .... कारण की माझा कॉन्टेक्स्ट इतरांसारखा मर्यादित नाही. माझा कॉन्टेक्स्ट 'जिवंत राहणे' हा आहे. करोनाचा विषाणू, त्याची चाचणी, त्याची लस, इत्यादि कॉन्टेक्स्ट उथळ व मर्यादित असून ते स्वतंत्रपणे अभ्यासल्यास जीव जाण्याची शक्यता वाढते. म्हणून 'जिवंत राहण्या'चा माझा विशालतम कॉन्टेक्स्ट माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. उथळ कॉन्टेक्स्ट मध्ये नसलेले मुद्दे विशाल कॉन्टेक्स्ट मध्ये चर्चेस येतात. म्हणून तुम्हांस ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वाटतात. असो. लशीची पर्यायी बाजू का चर्चेस येत नाही, असा माझा साधा सोपा सरळ प्रश्न आहे. पर्यायी दृष्टिकोनाचा इतका तिरस्कार का होतोय? इतका तिरस्कार तर मी लशीचाही करीत नाही. कारण की मी फ्ल्यूची लस घेतो प्रत्येक हिवाळ्यात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुमच्याकडे विदासंबंधी दुवा आहे का ? लशीमुळे रोग झाला नाही की इतर कारणामुळे, हे कसं कळणार ?
लस आणि मृत्यू- अमेरिका. https://covid.cdc.gov/covid-data-tracker/#rates-by-vaccine-status हॉस्पिटलायझेशन आणि लस- अमेरिका. https://covid.cdc.gov/covid-data-tracker/#covidnet-hospitalizations-vac… बाकी भारताचा मृत्यूसंदर्भात डेटा ऑलरेडी इथे दिलेला. त्यावर तुम्ही कोण निधी आयोगाचे पॉल आहेत त्यांच्या विधानाचा १००% चुकीचा अर्थ काढून काहीबाही टाकले आणि परत त्या आकड्यांकडे फिरकला नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी एका गुगल सर्च वरून मिळतात. माझ्या कडे इतका सहजसाध्य विदा मागणे ते सुद्धा स्वावलंबी माणसाने हे कसे ?
आउट ऑफ कॉन्टेक्स्ट लेख : .... कारण की माझा कॉन्टेक्स्ट इतरांसारखा मर्यादित नाही. माझा कॉन्टेक्स्ट 'जिवंत राहणे' हा आहे. करोनाचा विषाणू, त्याची चाचणी, त्याची लस, इत्यादि कॉन्टेक्स्ट उथळ व मर्यादित असून ते स्वतंत्रपणे अभ्यासल्यास जीव जाण्याची शक्यता वाढते. म्हणून 'जिवंत राहण्या'चा माझा विशालतम कॉन्टेक्स्ट माझ्यासाठी सर्वोत्तम आहे
माझे मत वेगळे झाले आहे. . तुम्ही काहीतरी वाचता, आणि लेखात जो तज्ञ व्यक्ती बोलत असतो त्याचे म्हणणे नक्की काय आहे ह्याची तुम्हाला फारसे देणे घेणे नसते इतकेच. तुम्हाला हवा तो संदेश तुम्ही त्यातून घेता, भले तो संदेश तज्ञाला आजिबात पटत का नसो.

In reply to by कॉमी

गामा मोड ऑन> सीडीसी चा डाटा आजिबात स्टँडर्ड नाहीये / विश्वसनीय नाहिये . कुठल्यातरी कारकुंड्यांनी बनवलेला डेटा आहे. लस न घेतलेल्या लोकांचे जे मृत्यू झालेले दाखवले आहेत ते नक्की कोरोना ने झाले आहेत का? की कुठल्या सहव्याधी ने झाले आहेत? कुठ्लीतरी लिंक> या दुव्यावर आकडेवारी उलट दाखवत आहेत. मग नक्की कोणती आकडेवारी खरी? जानेवारी मधे लस घेतलेल्या लोकांचे मृत्यू हेच दर्शवतात की लस घेतल्याने कुठलेही संरक्षण मिळत नाही. सबब कोरोना हे थोतांड आहे. गामा मोड ऑफ>

कॉमी, १.
https://covid.cdc.gov/covid-data-tracker/#rates-by-vaccine-status
positive specimen असलेले म्हणजे करोनाने पीडित नव्हे. तसंच मृताच्या अंगात करोना सापडणे म्हणजे करोनामुळे मृत्यू झाला असेही नव्हे. हा करोना संगे मृत्यू आहे. death from corona virus हा शुद्ध दिशाभूलजनक अपप्रचार आहे. कारण की खाली छोट्या अक्षरांत associated deaths असं लिहिलंय. म्हणजे हे मृत्यू करोनासंगे झालेले आहेत. साहजिकंच 'लसविहिनांची करोनामुळे मरण्याची शक्यता ९ पट आहे' वगैरे विधानं निव्वळ धूळफेक आहेत. मी जो संयुक्त साम्राज्याचा ( UK चा ) विदा दिला त्यत कुठेही करोनामुळे मृत्यू असा स्तंभ नाही. सत्याशी अपलाप करणारा विदा नसेल तरंच मी तो ग्राह्य धरेन. २.
https://covid.cdc.gov/covid-data-tracker/#covidnet-hospitalizations-vac…
हे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे आकडे आहेत. त्यांतही अपूर्ण लशीकृत ( partially vaccinated ) लोकांची संख्या जमेस धरलेली नाहीये. ती धरली की मगंच खरं चित्रं कळून येईल. ३.
निधी आयोगाचे पॉल आहेत त्यांच्या विधानाचा १००% चुकीचा अर्थ काढून काहीबाही टाकले आणि परत त्या आकड्यांकडे फिरकला नाहीत.
मी त्या आकड्यांकडे फिरकलो नाही आणि फिरकणारही नाही. कारण की त्यांनी कसलीही आकडेवारी सादर केली नाही. केवळ ४,८९,००० करोनामृत्यू झालेत इतकंच बोललेत. यावर काय कप्पाळ चर्चा करणार? ( हा आकडाही फुगवलेला असू शकतो. पण ते सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे अतिरिक्त विदा नाही. ) बाकी, माझा रोख श्री. पॉल यांच्या या विधानाकडे आहे :
VK Paul on Tuesday said that the increase in death registrations in India in 2020 compared to 2019 is not only due to death from Corona.
४.
माझ्या कडे इतका सहजसाध्य विदा मागणे ते सुद्धा स्वावलंबी माणसाने हे कसे ?
समान विदावर चर्चा करण्यासाठी. ५.
तुम्ही काहीतरी वाचता, आणि लेखात जो तज्ञ व्यक्ती बोलत असतो त्याचे म्हणणे नक्की काय आहे ह्याची तुम्हाला फारसे देणे घेणे नसते इतकेच. तुम्हाला हवा तो संदेश तुम्ही त्यातून घेता, भले तो संदेश तज्ञाला आजिबात पटत का नसो.
अगदी बरोबर. या असल्या पोपटपंची तत्ज्ञांना मी फारशी किंमत देत नाही. ( म्हणूनंच मी जिवंत आहे. ) पण काये की हे तथाकथित तत्ज्ञ बर्क्सबाईंसारखं कधीकधी चुकून खरं बोलून जातात. अशा वेळेस त्यांच्यावर झडप घालून थोतांड उघडं पाडायला मजा येते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

म्हणजे हे तद्न्य इतर वेळेस खोटं बोलत असतात पण पब्लिक मध्ये चुकून त्यांच्या तोंडातून बावळटपणे खरं बोलतात असा बालिश कन्स्पायरसी समज आहे तुमचा.
सत्याशी अपलाप करणारा विदा नसेल तरंच मी तो ग्राह्य धरेन.
होय, तुमच्या मताविरोधात जाणारा विदा हा सत्याशी अपलाप करतो.

कॉमी, १.
म्हणजे हे तद्न्य इतर वेळेस खोटं बोलत असतात पण पब्लिक मध्ये चुकून त्यांच्या तोंडातून बावळटपणे खरं बोलतात असा बालिश कन्स्पायरसी समज आहे तुमचा.
यांस फ्रॉईडियन स्लिप म्हणतात. ही सिगमंड फ्रॉईड याची थियरी आहे. ती कॉन्स्पिरसी थियरी असू शकते. मला माहित नाही. २.
तुमच्या मताविरोधात जाणारा विदा हा सत्याशी अपलाप करतो.
होय तर. शंकाच नाही मुळी. विदा पुरेसा व सुसंगत ( sufficient and consistent ) असावा इतकंच माझं मत आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विदा पुरेसा आणि सुसंगतच आहे. तुम्ही तर एक काडीचाही विदा तुमच्या मुद्द्यांच्या समर्थनात आणू शकला नाहीये.