Skip to main content

Coronaचे साईड इफेक्ट्स

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 12/05/2020 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात . कंपनी जर त्यांच्यासाठी 15000/- रुपये वेतन निश्चित करत असेल तर कंत्राटदार फक्त जेमतेम 8000/ ते 10000/- रुपये हातावर टेकवतात . त्यात राहणे खाणे याची व्यवस्था कामगारांनी स्वतः च करायची . मग मोठमोठ्या कंपन्यांच्या जवळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत भाड्याने किंवा झोपड्या बांधून हे लोक राहतात . फॅमिली आणणे परवडत नाही मग ग्रुपने जेवण करून पोटाची खळगी भरत असतात ... आज करोना मुळे स्थलांतर करणाऱ्या migrant workers मध्ये हे लोक बहुसंख्य असणार ... आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारे आणि हातावर पोट असणारे हे लोक पुढे काय करणार हा गहन प्रश्न असणार आहे कारण गावाकडे कुटुंब देखील यांच्यावरच अवलंबून असणार ..गावाकडे असलीच तर थोडीफार शेती आणि जमीन यांच्या आधारे भविष्याची आस लावून हजारो किलोमीटर चालत जाण्यासाठी निघालेले हे लोक पाहून खूप वाईट वाटतंय ... आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !! ''उत्तम चर्चा झाली आहे. चर्चेचा रोख पाहता आता धागा वाचनमात्र करणे आवश्यक . सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार'' संपादक मंडळ

वाचने 103423
प्रतिक्रिया 211

प्रतिक्रिया

In reply to by मराठी कथालेखक

देश लहान की मोठा त्याने काय फरक पडतो ? मग एक सांगा.. सिंगापूरसारखी भारताची प्रगती का झाली नाही गेल्या ६० वर्षात..?

In reply to by मराठी कथालेखक

मराठी कथालेखक आपल्या माहिती साठी : जरी ऑस्ट्रेलिया मध्ये हे खूप चांगलंय प्रकारे आटोक्यात आणलं एअसले तरी येथे कोणी ना बढाया मारताय ना घरबंदी ला दोष देताय टप्पय टप्पय ने चालू आहेत प्र्यत्न ..देशबंदी चा फायदा निशिचत झाला आहे पण सरकारला आणि लोकांना हे हि माहित आहे कि आता बंधन शिथिल केल्यावर आणि त्यात थंडी सूर झाली आहे तेव्हा हे चित्र उलटू शकते, त्याची भीती आहेच भारतात एकतर हि बंदी एकतर १००% चुकीची किंवा १०० % यौग्य अशी टोकाची भूमिका का घेतात लोक हेच समजत नाही ( निदान मिपावरील काही अगम्य प्रतीक्रिया वाचल्या तर तसे वाटते ) एकदम हिरो नाही तर झिरो का करता ? कोणाला हे थोतांड वाटतं तर कोणाला यच्ययात फकिरी वृत्तीचा बेजवाबदार पणा दिसतो.. कोणाला सरकार पुरेसे समाजवादी का नाही याची पडलीय ..

In reply to by स्मिता.

१००% अगदी योग्य शब्दात आपण मांडले आहेत . जी लोक येथे "हे थोडात" आहे हे असे म्हणत आहेत त्यांनी जरूर वाचावे

स्मिता.,
या सगळ्याचा परिणाम म्हणून लोकांना सगळंच थोतांड वाटायला लागलंय आणि हा त्रागा समजण्यासारखा आहे.
लोकांना सगळंच थोतांड वाटायला लागलंय कारण हे थोतांडच आहे. आज कष्टकरी कामगार जात्यात आहे आणि आपण सुखवस्तू लोकं सुपात आहोत. तुमच्याकडे वर्षभर पुरेल इतका पैसा असला तरी नंतर काय, हा प्रश्न आहेच. हे थोतांड जर वेळच्या वेळीच निपटलं नाही तर उत्तरोत्तर हालत खराब होत जाणार ना? शिवाय सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? इतर वेळेस सदैव घटनेच्या नावाने टाहो फोडणारे रामदास आठवले, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर ऐन वेळेस तोंडं बंद करून का बरं बसले आहेत? कुठे गेले सगळे स्वयंघोषित घटनातत्ज्ञ? हा एक राजकीय घोटाळा वाटंत नाही का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कुणाची तयारी असो वा नसो या व्हायरसवर व्हॅक्सिन तयारहोउन ते सर्व सामन्य लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत परीस्थीती फारशी बदलणार नाही. हा राजकीय घोटाळा असेल तर रामदास आठवले, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर यांचा नक्की काय फायदा होत आहे? आर्थिक फटका लहान थोर, कॉर्पोरेट, गव्हर्नमेंट, सर्वांनाच बसत आहे, केवळ भारतात नव्हे, तर जगभरात. सर्वचजण परत नॉर्मल लाईफ साठी अत्यंत अधीर आहेत. पण महामारीच्या भीतीने सर्वजण सोशल डीस्टंसिंग पाळुन सहकार्य करत आहेत. सरसकट निर्बंध उठवणे हा पर्याय नाही.

In reply to by गामा पैलवान

जगभरातल्या सर्व (मित्र आणि शत्रू) राष्ट्रप्रमुखांनी ठरवून केलेला हा घोटाळा नक्कीच सगळ्यात मोठ्ठा राजकीय घोटाळा म्हणायला हवा.

नोबेल पारितोषिक प्राप्त डॉक्टर बॅनर्जी यांनी सुचविल्याप्रमाणे भारतात गरीब कोण आहे याची व्याख्या काय हे कदाचित मंत्री मग तो प्रधान असो वा वित्त असो माहित नसावी कारण भारतात तसे पहिले तर ९६ टक्के जनता गरीब आहे व त्यांना प्रत्येकी सरसकट ५०० किंवा ५००० रुपये द्यावेत व लाल किंवा पिवळी शिधा पत्रिका याचा विचार करू नये

चौकस२१२,
माझे वरील विधान जी लोक "या मृत्यूंत करोनाचं योगदान नगण्य आहे" अशी उचलली जीभ लावली टाळ्याला करीत आहेत त्यानं उद्देशून होते . नेत्रेश यांनी उद्देशून नाही ( खुलासा )
नगण्य योगदान हे माझं विधान आहे. या मृत्यूत करोनाचं योगदान नगण्य आहे याचा अर्थ इतर घटकांचं ( = वय + आरोग्य + सवयी) योगदान जास्त आहे. अमेरिकेतले हे जे ८८०००+ लोकं मेलेत ते सगळे वयस्कर आहेत. त्यांच्या अंगात करोनाखेरीज इतर अनेक व्याधी होत्या. इथे इंग्लंडमध्येही साधारणत: तशीच परिस्थिती आहे. करोना अंगात असतांना मृत झालेले बरेचसे लोकं वृद्धाश्रमातले होते. इथे त्यावर ताजी (१५ मे रोजीची) माहिती आहे : https://www.bbc.co.uk/news/health-52284281 करोना अंगात असतांना मृत झालेल्यांपैकी २५% वृद्धाश्रमातले मृत आहेत. बाकीचे बाहेर मृत झालेले आहेत. करोना स्वत:हून ठार मारंत नाही. त्याच्यामुळे शरीराची अनावश्यक प्रतिक्रीया (अॅलर्जी) होते आणि तिला माणूस बळी पडतो. माझा प्रश्न साधासोपा व सरळ आहे. जर हा वयस्करांचा आजार आहे तर धडधाकट लोकांवर टाळेबंदीची सक्ती का? असे किती धडधाकट लोकं मेलेत? आ.न., -गा.पै.

In reply to by मोदक

मोदक, करोनाच्या संदर्भात वृद्ध कोण हे करोनामुळे गतप्राण झालेल्यांचं सरासरी ( = अॅव्हरेज) अथवा मध्यममान ( = मेडियन ) काढून ठरवता येईल. कोणत्या वयोगटाला किती धोका आहे ते आपसूक समजेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जर हा वयस्करांचा आजार आहे तर धडधाकट लोकांवर टाळेबंदीची सक्ती का? भारतात आणि पाश्चात्य देशात खूप फरक आहे. भारतात बहुसंख्य वृद्ध लोक हे आपल्या मुलांबरोबरच राहतात याशिवाय भारतात अफाट लोकसंख्येमुळे मर्यादित जागेत जास्त लोक गर्दी करून असतात. आपल्याकडे मुलांची आपल्या आईवडिलांबद्दल भावनिक गुंतवणूक कितीतरी जास्त असल्यामुळे पाश्चात्य देशासारखे आईबाप वृद्धाश्रमातच मृत झाले हे फारच कमी आहे. आपल्याकडे मुलगा महिनोन्महिने आई बापाशी बोलत नाही असे होतच नाही. आजही रोजगार नाही खिशात पैसे नाहीत आणि गावी रोजगार मिळण्याची शक्यता शून्य टक्के असूनही स्थलांतरित मजूर आईबापाकडे गावाला मैलोगणती चालत का जात आहेत? यामुळेच तरुण लोकांना बाहेर फिरण्यासाठी मुभा दिली असती तर त्यांच्या मुळे वृद्ध लोकांना मोठ्या प्रमाणावर आजार होऊन आपल्याकडे एकत्र इतकी मोठी रुग्ण संख्या झाली असती कि आपली फारशी चांगली नसलेली आरोग्य यंत्रणा मोडून पडली असती. यासाठीच हा लॉक डाऊन आवश्यक होता

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, वाहक म्हणून छाप मारून कोणावरही टाळेबंदीची सक्ती करणं कितपत योग्य? वृद्ध लोकांना कसले ना कसले आजार होणारंच हे गृहीत असतं ना? उलट टाळेबंदीमुळे जे परिचयकाठीण्य उत्पन्न होतं ते न झाल्याने रोगापेक्ष उपचार भयंकर अशी अवस्था नाही होणार का? एड्स झालेला माणूस साध्या सर्दीने मरायचा. मग सर्दीचे विषाणू फैलावणारे सगळे लोकं वाहक झाले ना? सर्दी तर कोणलाही होऊ शकते. करोना फ्लूसारखा आहे. सर्दीपेक्षा फारसा वेगळा नाही. टाळेबंदी आणि अल्पसंपर्क ( मायनर एक्स्पोजर ) या दोन परस्परविरोधी उपाययोजना आहेत. त्यांच्यात समन्वय न साधता केवळ सरसकट टाळेबंदी हा एकांगी उपाय राबवला जातोय. हे कितपत उचित धरायचं? शासनाला करोना संपवण्यापेक्षा टाळेबंदी वाढवण्यामागे जास्त रस आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१. या आजारावे सर्व वयोगटातील व्यक्ती ICU मध्ये पोहोचतात. पण तरुण लोकं बरी होउन ५ ते १० दीवसांनी घरी परतण्याचे प्रमाण वृद्ध लोकांपेक्षा बरेच जास्त आहे. पण प्रचंड प्रमाणात तरुण लोक ICU मध्ये भरती झाले तर सर्वांना अ‍ॅडमिट करुन उपचार करणे शक्य होणार नाही. तेव्हा तरुणांनी आजारी न पडणे हा एकच उपाय आहे. २. वृद्धाश्रमातले लोक बाहेर जात नाहीत, मग त्यांना करोना कसा झाला? तर काही लोकांचे तरुण नातेवाईक जे करोनाचे वाहक होते, ते भेटायला आले व करोना संक्रमीत करुन गेले. एकदा एकाला करोना झाल्यावर तो अत्यंत जलदगतीने सर्व वृद्ध लोकांमध्ये पसरला व दुर्दैवाने बरेच लोक मेले. ३. काही वृद्धाश्रमात बाहेरील व्हीजीटरना मनाई केली, तरीही तीथे सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांकडुन करोना पसरला. करोना कॅरीयर ओळखणे खुप कठीण आहे. तो कॅरीयर आहे हे समजेपर्यंत त्याने बर्‍याचजणींपर्यंत करोना पोहोचवलेला असतो. ४, मरणार्‍या लोकांमध्ये तरुण घडधाकट लोकही आहेत. प्रमाण कमी आहे कारण त्यांना वैद्यकीय उपचार वेळेवर मिळत आहेत. पण रुग्णांचे प्रमाण अती वाढले तर वैद्यकीय व्यवस्था अपुरी पडुन तरुण लोकही जास्त प्रमाणात बळी पडतील. तर"जर हा वयस्करांचा आजार आहे तर धडधाकट लोकांवर टाळेबंदीची सक्ती का? असे किती धडधाकट लोकं मेलेत?" याचे उत्तर असे आहे की १. वैद्यकीय व्यवस्थेवर ताण येउन ती कोलमडु नये म्हणुन २. तरुण धडधाकट लोकांकडुन तो बाकी म्हतर्‍या माणसांपर्यंत पसरु नये. आपल्या वृद्ध नातेवाईकांचे संरक्षण व्हावे म्हणुन. "अमेरिकेतले हे जे ८८०००+ लोकं मेलेत ते सगळे वयस्कर आहेत. त्यांच्या अंगात करोनाखेरीज इतर अनेक व्याधी होत्या." ही चुकीची माहीती आहे. यात सर्व वयोगटातील व्यक्ती आहेत. आणी बर्‍याचजणांना फारशा गंभीर व्याधी नव्हत्या. जेव्हा आपल्या आजुबाजुचे / आपल्याला माहीती असलेले लोक मरु लागतात तेव्हा वास्तवाची दाहकता जाणवते. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. न्युयॉर्क, लॉस एंजेलीस सारख्या शहरात रहाणार्‍या लोकांना विचारा. थोडी अजुन माहीती - लॉस एंजेलीसमध्ये रस्त्यावर रहाणार्‍या १०,००० पेक्षा जास्त होमलेस लोकांना पालिकेने स्वतःच्या (लोकांच्या टॅक्सच्या) पैशांने गेल्या महीन्याभरापेक्षा जास्त दीवस चांगल्या हॉटेल्समध्ये ठेवले आहे. त्यांना रोज ३ वेळा जेवण, औषधे, मनोरंजन, ईत्यादी सर्व दीले आहे. कारण या लोकांना करोना होउन तो सर्वत्र पसरु नये म्हणुन. या साठी शेकडो खोल्या असतेली कीतीतरी हॉटेल्स भाड्याने घेतली आहेत.

र्‍याचजणांना फारशा गंभीर व्याधी नव्हत्या. जेव्हा आपल्या आजुबाजुचे / आपल्याला माहीती असलेले लोक मरु लागतात तेव्हा वास्तवाची दाहकता जाणवते हे विशेष करून मिपाकरांनी हे जाणून घेणे महत्वाचे आहे.फक्त पाककृती ,भटकंती,, कविता यांच्या धाग्यावर गर्दी नको ती अशा ज्ञानवर्धक धाग्यावर ही असावी. ही " कॅरियर " ची भानगड लोकांनी नीट समाजवुन घेणे गरजेचे आहे कारण जिथे जास्तीत जास्त टेस्ट करण्याची सोय नाही होणे शक्य नाही त्या भारतासारख्या देशात आपण " कॅरियर " देखील असू शकतो असे गृहित धरून घरीच थांबणे हे माझ्यासाठी तरी आता सक्तीचे व हिताचे झाले आहे. कारण मला धोका रोगी म्हणूनही आहे व माझी प्रतिकारशक्ती चांगली असेल तर " कॅरियर " म्हणूनही आहे !

In reply to by चौकटराजा

चौकटराजा,
जेव्हा आपल्या आजुबाजुचे / आपल्याला माहीती असलेले लोक मरु लागतात तेव्हा वास्तवाची दाहकता जाणवते
हा प्रश्न विचारायची वेळ येऊ नये. पण प्रश्न विचारायला हरकत नाही. तुमच्या माहितीतला कोणी धडधाकट मनुष्य परलोकवासी झालाय का करोनामुळे प्रतिक्रिया येऊन? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माझ्या नातेवईकात मित्रात कोणी नाही. त्याचे कारण बरेचसे सुखवस्तू आहेत. पैसे वाळगून आहेत निव्रुत्त आहेत. एक दोन बंकेत नोकरीस आहेत तरीही त्याना लागण वा मृत्यु नाही. सोसायटीत 50 दिवसानंतर ही केस नाही . कारण अर्थिक स्थिती चांगली असल्याने सर्व घरी थाम्बू शकतात. आता काहीचे हप्ते वगैरे कथा व्यथा असल्याने काही धोका पत्करून कामाला जाउ लागले आहेत. त्यात कोणाला लागण झाली तर सोशल डिस्टंसिंग हा भाग महत्वाचा म्हणून अधोरेखित होईल .आमच्या सोसाय्टीत एक पस्तीशीतील पी एस आय देखील आहे पण तो ही अजून ओके आहे. अजूनही ही परिस्थीती असण्याचे कारण एक असेही असू शकते की माणसे दोन विभागात विभागली गेली आहेत. पुण्यात भवानी पेठ हा हॉटस्पॉट आहे कारण तिथे झोपडपट्टी आहे व लोकसंख्या दाट आहे. आम्ही जिथे रहातो तिथे लोकवस्तीच्या आयसोलेशन साठी आदर्श अरिया आहे. त्यामुळे दाट वस्ती अधिक मजबुरी अधिक अशिक्षित पणा याचे कोम्बिनेशन झाले की केसेस वाढत असाव्यात. एका अर्थाने पैशाचा हव्यास असलेल्यानी रोग भारतात आणला पण बळी ठरतोय तो ज्याकडे पैसा नाही.

In reply to by चौकटराजा

पैशाचा हव्यास असलेल्यानी रोग भारतात आणला पण बळी ठरतोय तो ज्याकडे पैसा नाही. "पासपोर्ट विरूद्ध रेशन कार्ड" असे कांही..?

नेत्रेश, तुमचा इथला संदेश वाचला. माझी मतं मांडेन म्हणतो. १.
१. या आजारावे सर्व वयोगटातील व्यक्ती ICU मध्ये पोहोचतात. पण तरुण लोकं बरी होउन ५ ते १० दीवसांनी घरी परतण्याचे प्रमाण वृद्ध लोकांपेक्षा बरेच जास्त आहे. पण प्रचंड प्रमाणात तरुण लोक ICU मध्ये भरती झाले तर सर्वांना अ‍ॅडमिट करुन उपचार करणे शक्य होणार नाही. तेव्हा तरुणांनी आजारी न पडणे हा एकच उपाय आहे.
करोनाचे रुग्ण आपोआप बरे होतात. रुग्णालयात केवळ श्वासोत्तेजक ( = व्हेन्टिलेटर) लावला जातो. तो सुद्धा श्वास घ्यायला अडथळा होऊ लागला तरंच लावला जातो. अशा रुग्णांचं प्रमाण माझ्या मते बरंच कमी आहे. इतकं कमी की सरसकट टाळेबंदीची गरज नाही. २.
२. वृद्धाश्रमातले लोक बाहेर जात नाहीत, मग त्यांना करोना कसा झाला? तर काही लोकांचे तरुण नातेवाईक जे करोनाचे वाहक होते, ते भेटायला आले व करोना संक्रमीत करुन गेले. एकदा एकाला करोना झाल्यावर तो अत्यंत जलदगतीने सर्व वृद्ध लोकांमध्ये पसरला व दुर्दैवाने बरेच लोक मेले.
करोना हा विषाणू हवा, पाणी सर्वत्र असतो. तो अंगात सापडणं हे नैसर्गिक आहे. करोनाखेरीज इतर अनेक प्रकारचे विषाणू सर्वांच्या शरीरात सुखेनैव नांदत असतात. करोना काही एकमेव विषाणू नाही. ३.
३. काही वृद्धाश्रमात बाहेरील व्हीजीटरना मनाई केली, तरीही तीथे सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांकडुन करोना पसरला. करोना कॅरीयर ओळखणे खुप कठीण आहे. तो कॅरीयर आहे हे समजेपर्यंत त्याने बर्‍याचजणींपर्यंत करोना पोहोचवलेला असतो.
करोना असाच सर्वत्र पोहोचायला हवा. जेणेकरून शरीराच्या संरक्षणप्रणालीस त्याची ओळख होऊन परिचयकाठीण्य उत्पन्न होईल. यालाच शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे असंही म्हणतात. आपल्याला रोगाची लस टोचतात तेव्हा अशीच विषाणूची ओळख ( = इंट्रोडक्शन ) करवून दिली जाते. ४.
४, मरणार्‍या लोकांमध्ये तरुण घडधाकट लोकही आहेत. प्रमाण कमी आहे कारण त्यांना वैद्यकीय उपचार वेळेवर मिळत आहेत. पण रुग्णांचे प्रमाण अती वाढले तर वैद्यकीय व्यवस्था अपुरी पडुन तरुण लोकही जास्त प्रमाणात बळी पडतील.
सरसकट टाळेबंदी लादण्याइतकं प्रमाण आजिबात नाही. ५.
"अमेरिकेतले हे जे ८८०००+ लोकं मेलेत ते सगळे वयस्कर आहेत. त्यांच्या अंगात करोनाखेरीज इतर अनेक व्याधी होत्या." ही चुकीची माहीती आहे. यात सर्व वयोगटातील व्यक्ती आहेत.
mean, mode median विदा उपलब्ध आहे, त्याची माध्यमांनी कधी चर्चा केलीये का? नुसतं भयावडंबर माजवायचं. कळू द्या ना लोकांना करोनामुळे मृत झालेल्यांचं सरासरी आयुर्मान काय आहे ते. इथे करोना अंगात असतांना मृत झालेले नव्हे, तर करोनामुळे शरीराची अनावश्यक प्रतिक्रिया येऊन श्वास घुसमटून गतप्राण झालेले लोकंच अभिप्रेत आहेत. याव्यतिरिक्त झालेले इतर मृत्यू हे करोनामुळे झालेले मृत्यू नाहीत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

करोना हा विषाणू हवा, पाणी सर्वत्र असतो. तो अंगात सापडणं हे नैसर्गिक आहे. करोनाखेरीज इतर अनेक प्रकारचे विषाणू सर्वांच्या शरीरात सुखेनैव नांदत असतात. करोना काही एकमेव विषाणू नाही. गापै, करोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत, ज्यातील सध्याच्या विषाणूचे नामकरण कोव्हीड-१९ [ SARS-CoV-2 ]आहे. या विषाणूवर सर्वांनाच अधिक माहिती मिळावी म्हणुन २ व्हिडियो देउन ठेवतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mile

In reply to by गामा पैलवान

गा.मा भाउ, तुम्ही म्हणता "करोना असाच सर्वत्र पोहोचायला हवा. जेणेकरून शरीराच्या संरक्षणप्रणालीस त्याची ओळख होऊन परिचयकाठीण्य उत्पन्न होईल. यालाच शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे असंही म्हणतात. आपल्याला रोगाची लस टोचतात तेव्हा अशीच विषाणूची ओळख ( = इंट्रोडक्शन ) करवून दिली जाते." HIV च्या विषाणुबाबत सुद्धा आपले हेच मत आहे का? जो पर्यंत लस टोचत नाही तोपर्यंत आपले शरीर त्या विषाणुला प्रतिकार करण्यास तयार नसते. देवी, पोलिओ सारख्या विषाणुमुळे फैलावणार्‍या साथी लस सापडल्यावाच आटोक्यात आल्या. लस तयार नसताना, व या विषाणुबाधेवर कसे व काय उपचार करायचे हे नक्की माहीत नसताना त्याचा फैलाव करणे / करायला मदत करणे म्हणजे १०% लोकसंखेचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. हे जगभरातल्या तज्ञ लोकांना समजले आहे, म्हणुनच बहुतेक सर्व देश सोशलडीस्टंसींग सारख्या उपायांनी करोनाचा फैलाव आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमची मते व पॅशन यांचा संपुर्ण आदर करुन सांगावेसे वाटते की वेळ असेल तर तुम्ही अजुन थोडा रीसर्च करा, केवळ बायास्ड, राजकीय अजेंडा असलेल्या मीडीयावर माहीतीसाठी अवलंबुन राहु नका. करोनावरचे रीसर्चपेपर्स व वेगवेळ्या युनिव्हरसीटीनी प्रकाशीत केलेले संशोधन व शास्त्रिय माहीती वाचा. केवळ आपल्या (कदाचित अपुर्ण) माहीतीवर अवलंबुन सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा अनादर करु नका. बाकी आपली मर्जी. बाकी अवांतर पण या संदर्भातले: १. मी रहात असलेल्या शहरात (लॉस एंजेलीस काउंटी) मध्ये अमेरीकेतल्या पश्चिम भागात सर्वाधीक मृत्यु करोनाने झाले आहेत. करोनाने मरणार्‍या लोकांमध्ये आता डॉक्टर्स, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस, फायर फायटर्स, अत्यावश्यक सेवा पुरवणारे, व ईतर फर्स्ट रीस्पाँडर्सही आहेत, जे बहुतेक तरुण, घडधाकट व मेडीकली फीट असतात. टीव्हीवर त्यांची संपुर्ण माहीती समजते. बहुतेकांवर सरकारी ईतमामात अंत्यसंस्कारही होतात. पण ईकडे मेडीकल कंडीशन ही कायद्याने गोपनीय असल्यामुळे दगावलेल्या लोकांना काही कंडीशन होती की नाही हे समजत नाही. दुर्दैवाने एका भारतीय कुटुंबातील कर्ता व्यक्ती आणी त्याचे वडील दोघेही करोनाने दगावलेले माहीती आहेत. त्या भारतीय व्यक्तीविषयी समजलेल्या माहीतीनुसार त्यांना काही मे़जर मेडीकल कंडीशन नव्हती. २. करोनाबाधीत व्यक्तीच्या उपचारासाठी वापरलेली मेडीकल ईक्विपमेंटस लगेच दुसर्‍या रुग्णाच्या उपचारासाठी वापरता येत नाहीत. व्हेंटीलेटरसारखी ईक्विपमेंटस संपुर्ण निर्जंतुक करणे क्लीष्ट व वेळखाऊ काम आहे. त्यामुळॅ हॉस्पीटलसना जवळजवळ १० ते १०० पट जास्त मेडीकल ईक्विपमेंटसची गरज पडत आहे. (जीथे २० व्हेंटीलेटर्स होते अशी हॉस्पिटल्स आता २०० ते २००० व्हेंटीलेटर्स वापरत आहेत). म्हणुन सरकारी आदेशानुसार नासा व फोर्ड सारख्या कंपन्या मेडीकल ईक्विपमेंट डीझाईन व मॅन्युफॅक्चरींग करत आहेत. आणखीही बर्‍याच कंपन्या हे करत आहेत. माझ्या टीमचा सहभाग असलेले नासाचे व्हेंटीलेटर डीझाईनः https://www.nasa.gov/press-release/nasa-developed-ventilator-authorized… फोर्ड तयार करत असलेले व्हेंटीलेटर्सः https://media.ford.com/content/fordmedia/fna/us/en/news/2020/03/30/ford… ३. खरे खोटे माहीत नाही, पण परवा भारतातल्या नातेवाईकाने सांगीतले की भारतात काही धनवान व्यक्ती, विशेषतः दिल्लीकडे, व्हेंटीलेटर्स सारखी महागडी व आता दुर्मीळ होत जाणारी उपकरणे आपल्या कुटुंबाच्या वापरासाठी (वेळ पडली तर म्हणुन) विकत घेउन ठेवत आहेत. सर्वांना हे शक्य नाही, पण सोशल डीस्टंसीग पाळणे, आणी सोशल डीस्टंसीग मुळे हालाखीची वेळ आलेल्यां गोरगरीब लोकांना शक्य ती मदत कारणे एवढे आपण करु शकतो. अन्यथा या विषाणूचा अती फैलाव होउन लोक उपचारावीना मरु शकतात.

In reply to by नेत्रेश

नेत्रेश, माझी मतं मांडतो. १.
HIV च्या विषाणुबाबत सुद्धा आपले हेच मत आहे का?
HIV च्या विषाणूची सर्दीच्या विषाणूसोबत तुलना होत नसते. करोना व सर्दीचा विषाणू हे सजातीय आहेत. हे दोघे मानवी शरीराबाहेर चारसहा तास 'जिवंत' असतात. उलट HIV मानवी शरीराबाहेर आल्यास दोनतीन मिनिटांत मरतो. तसंच HIV रक्तात पोहोचावा लागतो. एड्सच्या रोग्याशी हस्तांदोलन करून काहीही होत नसतं. याउलट सर्दी थेट संपर्क नसतांना नुसत्या हवेतनंही पसरते. २.
लस तयार नसताना, व या विषाणुबाधेवर कसे व काय उपचार करायचे हे नक्की माहीत नसताना त्याचा फैलाव करणे / करायला मदत करणे म्हणजे १०% लोकसंखेचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.
सर्दीने जीव जातो का? तसा जात असेल तर त्यासाठी इतर घटक जबाबदार आहेत. सर्दी हा रोग नव्हे. ३.
तुम्ही अजुन थोडा रीसर्च करा, केवळ बायास्ड, राजकीय अजेंडा असलेल्या मीडीयावर माहीतीसाठी अवलंबुन राहु नका.
करोनाची नेमकी आकडेवारी कोणी द्यायची? मी की मीडियाने? आजपावेतो करोनामुळे जीव घुसमटून किती जण मेले आहेत? त्याप्रमाणे श्वासोत्तेजना लावावी लागलेल्यांची काही आकडेवारी मिळेल काय? ही आकडेवारी का उघड करण्यात येत नाहीये? सरसकट सगळ्यांना करोनाचे रुग्ण म्हणवून भयावडंबर कोण माजवतंय? ४.
सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा अनादर करु नका.
करेक्ट. टाळेबंदी कधी उठवणार? आणि जर सरकारला जर करोनावर आटोक्यात आणण्यापेक्षा टाळेबंदी वाढवण्यात रस असेल तर मी काय करावं? ५.
भारतातल्या नातेवाईकाने सांगीतले की भारतात काही धनवान व्यक्ती, विशेषतः दिल्लीकडे, व्हेंटीलेटर्स सारखी महागडी व आता दुर्मीळ होत जाणारी उपकरणे आपल्या कुटुंबाच्या वापरासाठी (वेळ पडली तर म्हणुन) विकत घेउन ठेवत आहेत.
फाटलीये त्यांची. जे किरकोळ सुरक्षेसाठी आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवायला तयार होतात त्यांच्या सुरक्षा व स्वातंत्र्य दोघांचीही वाट लागते. ६.
१. मी रहात असलेल्या शहरात (लॉस एंजेलीस काउंटी) मध्ये अमेरीकेतल्या पश्चिम भागात सर्वाधीक मृत्यु करोनाने झाले आहेत. करोनाने मरणार्‍या लोकांमध्ये आता डॉक्टर्स, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस, फायर फायटर्स, अत्यावश्यक सेवा पुरवणारे, व ईतर फर्स्ट रीस्पाँडर्सही आहेत, जे बहुतेक तरुण, घडधाकट व मेडीकली फीट असतात.
जरा शोधल्यावर सोकॅल नर्सिंग होमातले ११ पैकी ८ नर्स मरण पावल्याचं आढळून आलं. याला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणतात. जर हा वृद्धाश्रम धोकादायक वास्तू आहे तर योग्य काळजी का घेतली नाही? वृद्धाश्रमत साथीच्या रोगांच्या लागणीचं प्रमाण सर्वाधिक असतं, हे माहीत असूनही ? याव्यतिरिक्त फार काही सापडलं नाही. आ.न., -गा.पै.

लोकहो, जनतेचा संयम संपुष्टात येण्याची चिन्हे दिसंत आहेत. काल मुंबईत अँटॉप हिल परिसरात पोलिसांवर कोयत्याने वार केले गेले : https://lokmat.news18.com/mumbai/attack-with-sharp-object-on-police-at-… पुण्यात खबरदारीसाठी सशस्त्र दलास पाचारण : https://www.esakal.com/pune/coronavirus-crpf-battalion-deployed-pune-ci… करोनाचं थोतांड व टाळेबंदीचं महाथोतांड सर्वसामान्य लोकांना छानपैकी कळू लागलंय. जनतेच्या संयमाची इतकी परीक्षा पाहू नये. आ.न., -गा.पै.

-गा.पै. चला मग दोन तीन गोष्टी सांगा ..होऊनच जाऊदे 1) आपण जे म्हणताय ते भारताबद्दल फक्त कि जगाबद्दल? २) आपलं अनुभव कोणता आहे? इंग्लड मधील असावा असे दिसतंय लिखाणावरून 3) हा रोग पसरू नये म्हणून अति वयस्कर सोडले तर इतर कोणावर हि घरबंदी नको करायला असे तुमचे मत दिसत आहे .. तसे केले असते तर या रोगाचं जो प्रसार झालाय कि ज्याचे काही देशात प्रमाण भीतीदायक आहे ( कारण उपाय अजून नाही म्हणून) ते कसे थांबवता आले असते कि आपण म्हणताय ३०० मिलियन चाय अमेरिकेत ८५ मेल हे काही विशेष नाही? ४) याशिव्या काही इतर "कॉन्स्पिरसी थेअरी " तर आपल्या मनात नाही ना? असेल तर स्पष्ट मांडावी ५) येथे मान्यवर डॉक्टर लोक याला प्रतिसाद देत आहेत हे नुसतेच द्विपदवीधर डॉक्टर नाहीत तर या समूहावर एक संयमित चर्चच करणारे म्हणून त्यांना मन आहे आणि त्यांनी तो गन अनेक वेळा दाखवून दिला आहे मग ते हि आपली विधाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खोडून काढीत आहेत ते १००% चुकीचे का हो? या क्षेत्रात आपण त्यांच्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत काय? ६) आपण म्हणता कि "करोना असाच सर्वत्र पोहोचायला हवा "कारण परिचयकाठीण्य उत्पन्न होईल आणि मग रोग पसरणार नाही..ह...म बर, समजा हा एक उपाय आहे असे धरून चालू ( यावर खरे तर वैद्य आणि संसर्गजन्य रोग तसाच सांगू शकतील ) परंतु ते "परिचयकाठीण्य " उत्पन्न होते पर्यंत किती लोक बळी पडतील? चालेले? सान्गा आपलं थ्रेशहोल्ड! .. ह...म.. जगातील इतक्या देशाचे वैद्यकीय अधिकारी , नेते अगदी मुर्ख आहेत का? कि ज्यांनी तो असा पसरू नये म्हणून धडपड चालवली आहे .. म्हणा ना स्पष्ट कि हो ते मूर्ख आहेत म्हणून

चौकस२१२, माझी मतं सांगतो. १.
1) आपण जे म्हणताय ते भारताबद्दल फक्त कि जगाबद्दल?
प्रामुख्याने भारताबद्दल. करोनामुळे मोदी हा नेता मोडीत निघू नये म्हणून. माझा प्रमुख आक्षेप टाळेबंदी व तज्जन्य नागरीस्वातंत्र्यसंकोचास आहे. २.
२) आपलं अनुभव कोणता आहे? इंग्लड मधील असावा असे दिसतंय लिखाणावरून
हो. पण भारतालाही लागू पडणारा आहे. शिवाय भारतीयांची प्रतिकारशक्ती जास्त असल्याने इंग्लंडइतकी भारताला टाळेबंदीची गरज नाही. मात्र प्रत्यक्षात इंग्लंडमध्ये टाळेबंदी सौम्य आहे, तर भारतात कडक. ३.
3) हा रोग पसरू नये म्हणून अति वयस्कर सोडले तर इतर कोणावर हि घरबंदी नको करायला असे तुमचे मत दिसत आहे .. तसे केले असते तर या रोगाचं जो प्रसार झालाय कि ज्याचे काही देशात प्रमाण भीतीदायक आहे ( कारण उपाय अजून नाही म्हणून) ते कसे थांबवता आले असते कि आपण म्हणताय ३०० मिलियन चाय अमेरिकेत ८५ मेल हे काही विशेष नाही?
करोना हा सर्दीप्रमाणे एक विषाणू आहे. त्याचा प्रसार नैसर्गिकतीत्या होतोच. तो कोणीही थांबवू शकंत नाही. तो अंगात असला की रोगाची लागण होतेच असंही नाही. करोना अंगात असणे, त्यामुळे बाधित असणे, त्याची सौम्य लक्षणं दिसणे, ती लक्षणं तीव्र बनणे आणि त्यांच्यापायी मृत्यू होणे या पाच स्वतंत्र बाबी आहेत. मृताच्या शरीरात करोना सापडणे म्हणजे करोनापायी मरणे नव्हे. ४.
४) याशिव्या काही इतर "कॉन्स्पिरसी थेअरी " तर आपल्या मनात नाही ना? असेल तर स्पष्ट मांडावी
अँथनी फौसी (की फॉसी) हा माणूस आपल्याला करोनावर लस सापडवून देणार आहे म्हणे. या माणसाने एड्सच्या लशीच्या नावाखाली गेली ३६ वर्षं अमेरिकेचा अमाप पैसा ओरबाडला आणि आता हा माणूस व्हाईट हाऊसला करोनाची अक्कल शिकवणार आहे. बिल गेट्स या माणसाशी मोदी करोनाविषयी कसली चर्चा करतात? याच्या पोलियो न्यासाला भारतातनं हाकून लावलं होतं ना २०१७ साली? साथीच्या रोगांना बळी पडलेल्यांसाठी कायदा अमेरिकी सभागृहांत सुमारे १ वर्षाआधी कार्यरत झाला आहोत : https://www.congress.gov/bill/116th-congress/house-bill/748/all-actions… उपरोक्त तथ्यांना "कॉन्स्पिरसी थेअरी" म्हणावं का ? ५.
मग ते हि आपली विधाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खोडून काढीत आहेत ते १००% चुकीचे का हो? या क्षेत्रात आपण त्यांच्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत काय?
मी डॉक्टरांच्या सल्ल्याला आजिबात गौण ठरवंत नाहीये. माझा आक्षेप सरसकट टाळेबंदीस आहे. तिचं समर्थन करण्यासाठी करोना हा गंभीर रोग म्हणून दाखण्यात येत आहे. ६.
परंतु ते "परिचयकाठीण्य " उत्पन्न होते पर्यंत किती लोक बळी पडतील? सान्गा आपलं थ्रेशहोल्ड!
० ७.
जगातील इतक्या देशाचे वैद्यकीय अधिकारी , नेते अगदी मुर्ख आहेत का?
माहीत नाही. पण जनतेला मूर्ख बनवायचं कार्य जोरदारपणे चाललंय. ८.
म्हणा ना स्पष्ट कि हो ते मूर्ख आहेत म्हणून
ते मूर्ख असते तर किती बरं झालं असतं. ते मूर्ख आजिबात नाहीत. मूर्ख आपण जनता बनतो आहोत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

इंग्लंड मधील परिस्थिती आणि युरोप च्या जवळ आपण राहता ते बघून पण जर आपल्याला हे थोतांड आहे आणि जगभरचे नेते काही तरी स्वार्थसाठी जगाला मूर्ख बनवीत आहेत असे आपले ठाम मत दिसतंय... त्यामुळे यावर अजून चर्चा तुमच्याशी करण्यात काही अर्थ नाही नेत्रेश आणि डॉक्टर खरे यांनी आपले बरेच मुद्दे खोदून काढले आहेत... मी अशी आशा करतो कि केवळ कोणत्यातरी पूर्वग्रहामुळे हे जे काय आपण मांडतंय त्व्यावर कोणाचा विश्वास बसू नये . इति

In reply to by गामा पैलवान

गा. मा. एक आवाहन आणि आव्हान… तुम्ही जर इंग्लंड मध्ये असलात तर तिथेच अथवा भारतात असलात तर इकडे ते सुध्दा धारावी सारख्या भागात. स्वतः हुन जसे विटेकर काकांनी आपल्या मुला विषयी लिहले आणि तो सेवा करायला गेला तसे कराल काय आणि ते सुध्दा मास्क न लावता. ना रहेगा बास ना रहेगी बासुरी, कशाला उगाच कळ्फलक बदडवायचा म्हणतो मी. बरोबर? आणि मग १४ दिवसांनी पुन्हा आपला अनुभव लिहायला या इकडे. काय म्हणताय?

केदारनाथ यात्रेतील एक प्रसंग एका जीव वाचलेल्याने सांगितला .... केदारनाथ होऊन परत येताना एका ठिकाणी पाणी वाढत होते. व रस्ता मधेच तुटलेला होता. बसमधील प्रवाशामध्ये दोन तट पडले .काही म्हणाले बसमध्येच थांबू काही म्हणाले नको धोका नको ,आपण टेकडी चढायला लागू . बसमध्ये बसू वाल्यांनी त्यांचे ऐकले नाही. ते बर्यापैकी वर गेले असावेत तो त्यांना बस उभी असलेला भराव बससकट पाण्यात पडल्याचे वरून दिसले .लोंढ्यात त्यांच्या देखत बस वाहून गेली .नंतर हेलिकॉप्टर ने त्यांना मानवी वस्तीत नेण्यात येऊन घरोघरी पोहोचते करण्यात आले.याउलट असेही झाले असते की ती माणसे एकटी पडली वाट चुकली असती व संपर्काचे अभावी मेली असती व बसवाल्याना घेऊन जाणारी दुसरी एक बस पलीकडून आली असती व एकेकाला त्या रेस्क्यू बसमधून मानवी वस्तीत आणण्यात आले असते . वरील प्रकारची सिच्युएशन तुम्ही खास करून ऍडव्हेंचर वा डिझास्टर फिल्म मध्ये पाहिली असेल .काही वाचतात काही मरतात .कोणाचे जजमेंट कसे जिंकेल वा फोल होईल याला काही नियम नाही ! आलेल्या संकटाबद्दल जिथे मेडिकल प्रोफेशन मधील माणसे दिशाभूल करीत आहेत तिथे सामान्य माणसाचे काय ?

In reply to by चौकटराजा

"आलेल्या संकटाबद्दल जिथे मेडिकल प्रोफेशन मधील माणसे दिशाभूल करीत आहेत तिथे सामान्य माणसाचे काय ? कोणत्या देशातील ? निदान मिपावर जे डॉक्टर लिहितात ते तरी तसले काही करीत नाहीत उलट आपल्या परीने यौग्य माहितीच पसरवत आहेत ..इतर देशात हि , हि टीका होत नाहिये .. हा जरूर कि आरोयग्य अधिकाऱ्यांचे काही निर्णय चुकले त्यावर टीका होतीय पण ती अशी नाही कि "तुम्ही दिशाभूल केलीत" तर उलट तुम्ही वेळीच काही गोष्टींवर बंदी आणली नाही ? उदाहरणार्थ ऑस्ट्रेलीतील सिडनी य सर्वात मोठ्या शहरात रुबी प्रिन्सेस या क्रूझ शिप वरील प्रवाश्यांना शहरात लगेच का येऊ दिले? म्हणजे एकूण समाजाचा विश्वास मेडिकल प्रोफेशन वर आहेच उलट त्यांचे कौतुकच चाललंय !

In reply to by चौकस२१२

भरपूर उदाहरणे आहेत. मिपावर असे डॉ लोक नाहीत याचे कारण मिपावर एक तळमळ वाले डॉ सोडले तर दुसरे लिहितच नाहीत. आयुवेदाने करोना बरा होतो पसून होमिओपाथी, हायड्रोक्विनाईन, अंटी वायरल मेदिसिन्स "विर" ने शेवट होणारी, गरम पाणी, काढे एक ना अनेक इथपासून डॉ विशवरूप रोयचौधरी सारखे लोक म्हणतात फन्ड साठी जागतिक आरोग्य सँघटनेचा कट . एवढेच नव्हे सर्वात मोठी दिशानूल की बरेच डॉ., हे ही सांगत आहेत की यात 60 च्या वरचे फारच प्रमाण आहे. खरे तर 60 च्या वरचे भटकणारे नाहीतच .60 च्या वरचा करोनाने आजारी पडून किडनी फेल्ने मेला तरी तो जर करोना वाला ठरत असेलही.

त्याचं प्रथम कौतुक करतो ! सगळा देश लॉकडाऊन करण्यापेक्षा करोनाबाधितांना कसोशिनं शोधून क्वारंटाईन करणं केंव्हाही योग्य ठरलं असतं. या सर्व कळकळीमागे तुमचा हेतू हा आहे > करोनामुळे मोदी हा नेता मोडीत निघू नये मोदी फकिरीवृत्तीचे आहेत त्यांना अशा किरकोळ गोष्टींची फिकीर वाटेल हा समज योग्य नाही. एकदा निर्णय घेतला की ते स्वतः सुद्धा कधी त्यावर अवाक्षर काढत नाहीत. नोटाबंदीवर इतक्या चर्चा झडल्या, १००% चलन परत अर्थव्यवस्थेत आलं. ते स्वतः म्हणाले होते की ४.५० लाख कोटींच्या नोटा लोक गंगेत सोडतील. त्यांचे दिवंगत सहकारी श्रीयुत जेटली त्यांचा बचाव करायला म्हणाले की ४.५० लाख कोटी काय त्यापेक्षा किती तरी अधिक पैसा नष्ट झाला जो फेक करंसीच्या रुपात अर्थव्यवस्थेत सक्रीय होता. तरी मोदींनी त्यांना जरा सुद्धा करेक्ट करायचा प्रयत्न केला नाही. नोटाबंदी ही खर्‍या १४.५० लाख कोटीं पैकी ४.५० लाख कोटी बाद करण्यासाठीची योजना होती. तुम्ही अर्थमंत्री आहात का वनमंत्री ? असं काही सुद्धा मोदी म्हणाले नाहीत. बुलेट ट्रेनसारखी १.१० लाख कोटींची योजना देशाला देण्यापूर्वी ते स्वतः म्हणाले होते की या बुलेट ट्रेनमधे कुणी बसणार नाही, पण आपल्याकडे बुलेट ट्रेन आहे हा दणका जगाला द्यायलाच हवा ! इतका थोर विचार देणारा नेता कर्जाची परतफेड कशी होईल, बुलेट ट्रेनचा उपयोग नक्की कुणाला, पर्यावरणाचं काय होईल इतक्या फालतू गोष्टींचा विचार कशाला करेल ? आता तुम्ही कधी मोदींना बुलेट ट्रेनबद्दल बोलतांना ऐकलंय का ? तो विषय संपला. फकिर कधी मागे वळून बघत नाही. ४ हजार कोटींचा सरदार पटेलांचा पुतळा उभा केला नसता तर देशाला स्टॅट्यू ऑफ लिबर्टीची उंची कळली असती का ? जिएसटीमुळे देशात कमालीची स्वस्ताई होईल. तो स्वातंत्र्योत्तर भारतातला देशाच्या अर्थव्यवस्थेचा गेम चेंजर असेल. रात्री बारा वाजता पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमधे भूतो न भविष्यती असा अपूर्व सोहळा घडवून फुल स्वींगमधे जिएसटी आला. आज तीन वर्ष झाली, व्यावसायिकांनी एमारपीवर जिएसटी लावून, आधीच्या किंमतीत अंतर्भूत असलेला नफा काहीही न करता लाटला. परिणामी जनतेला जिएसटीचा भुर्दंड बसला तो त्यांनी आता आयुष्यभर भोगायचा. अजूनही जिएसटी रिटर्न्स सुरळीत होऊ शकली नाहीत. पण एकदा निर्णय घेतला की घेतला, पुन्हा त्याबद्दल अवाक्षर काढायचं नाही, याला म्हणतात आत्मविश्वास ! फकिराच्या लेखी पश्चात्ताप कधी ऐकलायं का ? ती सामान्यांची वृत्ती झाली. आता तुम्हाला वाटेल की याचा लॉकडाऊनशी काय संबंध ? तर तुम्हाला या फकिरीवृतीच्या निर्णय कौशल्याची कल्पना यावी. २१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन का केला ? ते फक्त विरोधकांना दाखवून द्यायला केला की मी एक उडी मारायला सांगायचा अवकाश जनता शीर्षासन करुन उड्या मारायला तयार आहे. याला म्हणतात पॉवर ! त्या वेळी २४ तारखेला आपण संपूर्ण देश लॉकडाऊन करणार आहोत याची मोदींना कल्पना नव्हती असं तुम्हाला वाटतं का ? त्याच वेळी ३ दिवसांची मुदत देऊन सर्वांना सुखरुप घरी जायला सांगितलं असतं तर इतका मोठा अनर्थ टळला नसता का ? पण असे प्रष्न केवळ सामान्यांना पडतात. मोदींसारखा विज्ञाननिष्ठ नेता कसा विचार करतो ? जेंव्हा बालाकोट एअर स्ट्राईकच्या वेळी तज्ञांनी सांगितलं की ढगाळ हवामानात टार्गेट दिसत नाहीत त्या वेळी मोदींनी काय सांगितलं ? जर आपल्या फायटर प्लेन्सनां त्यांची टार्गेट दिसत नसतील तर त्यांच्या रडारवर आपली प्लेन्स दिसणार नाहीत ! मी तारीख आणि वेळ ठरवली म्हणजे ठरवली. तुम्ही निघा ! खलास, आहे का काही त्यावर पुन्हा चर्चा ? तद्वत, २१ तारखेला आपण जाहीर केलं की २४ तारखेला फुल लॉकडाऊन होणारे आणि ही बातमी करोना वायरसला समजली तर ? तेंव्हा आपण करोनावर गुप्तपणे अचानक स्ट्राईक करायचा ! आता देशहिताचा निर्णय घेतोयं म्हटल्यावर जनतेची फिकीर कशाला, ते कोणताही स्ट्राईक झेलतील. अशा प्रकारे फकिराला कोणत्याही गोष्टीनी काहीही फरक पडत नाही. तो काहीही घेऊन आलेला नसतो, सगळी मालमत्ता देशाची असते आणि फकीर झाल्या गोष्टींचा कधीही विचार करत नाही.

संक्षी आपले "फकिरीवृतीच्या निर्णय कौशल्याची कल्पना आणि त्याचे अपरिणाम" हे लिखाण रोचक वाटले .. थोडक्यात आपले म्हणे असे आहे असे वाटते कि " मोदी हे फकीर वृत्तीचे असल्यामुळे इतरांचा फारसा विचार ना करिता त्यांनी kovida कारणास्तव देशभर बंदी आणणे यासारखे निर्णय घेतले " आपल्या लिखाणावरचे हे माझे निरीक्षण जर बरोबर असेल तर मग तोच तर्क वापरला तर इतर देशातील राष्ट्राध्यक्षांनी कि जे विविध राजकीय विचारसरणी चे आहेत ते "फकीर नसताना" सुद्धा त्यांनी साधारण पाने "देशबंदीचे " निर्णय कसे घेतले २-३ उदाहरणे देतो ( माफी मी परत मला माहिती असलेल्या देसहनबद्दल बोलतोय आणि या दशांची भारताशी तुलना होऊ शकत नाही पण येथे मुद्दा फक्त या "फकीर वृत्तीचा आहे ) १) नू झीलंड , स्त्री पंतप्रधान कौटिम्बक १ मूल, डावी ( दाव्यातील डावी ) विचारसरणी २) ऑस्ट्रेलिया पुरुष पंतप्रधान,बायको + २ मुली उजव्या विचारसरणीचे ( आणि आपण धार्मिक आहोत हे उघडपणे सांगणारे "चर्च गोइंग ") ३) ऑस्ट्रेलाईतील व्हिक्टोरिया राज्याचे मुख्यमंत्री : पुरुष , बायको + ३ मुले डाव्या विचारसरणीचे आणि यांनी इतर राज्यांचं मानाने जास्त कडक बंदी आणली मग हे सगळे फकीर नसताना कसे काय

तिथे जनतेचा काय पाड ? त्यामुळे लॉकडाऊन केला म्हणजे केला ! त्यावर चर्चा होऊ शकत नाही, तो विषय संपला ! आपण फक्त फकीरीवृत्ती म्हणजे काय यावर बोलू शकतो. २१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ? पण इतका फालतू आणि उघड विचार फक्त सामान्य माणूस करतो. फकीराची दूरदृष्टी आणि अंतर्ज्ञान याचा थांग सामान्यांना कसा लागणार ? गटारीतल्या गॅसवर चहा करणारा माणूस हा फकीराचा प्रेरणा स्त्रोत असतो. त्यामुळे फकीराच्या आर्थिक डावपेचांचा कुणालाही थांगपत्ता लागणं मुश्कील. गेल्या ६ वर्षात इतक्या भयानक आर्थिक करामती झाल्या, कित्येक लाख कोटींच नुकसान झालं; पण त्या जनतेला ते दिसेल तर शप्पत ! याला म्हणतात फकीरी किमया. फकीर हा नेहेमी अचानक अ‍ॅटॅक करतो, तो कुणाला सावध होण्याची संधीच देत नाही. २४ तारखेचा लॉकडाऊन नोटाबंदीच्या निर्णयापेक्षाही गुप्त ठेवणं आवश्यक होतं. कारण काय तर जनता कोणताही स्ट्राईक झेलायला तयार आहे; (त्यांना गेली ६ वर्ष आपण याचसाठी तयार केलंय), पण करोना वायरसला बितंबातमी लागता कामा नये. तुम्हाला वाटेल फकीरी वृत्तीचा इतका गहन विचार कसा असू शकेल ? तर स्वतः मोदीजी भर शास्त्रज्ञांच्या काँन्फरान्समधे म्हणाले आहेत, भारतानं प्लास्टिक सर्जरी हजोरो वर्षांपूर्वीच शोधली होती आणि याचा पुरावा आहे आमचा गणपती. खलास ! काय बिशादे कुणाची पुढे बोलायची ?

In reply to by संजय क्षीरसागर

स्वतः मोदीजी भर शास्त्रज्ञांच्या काँन्फरान्समधे म्हणाले आहेत, भारतानं प्लास्टिक सर्जरी हजोरो वर्षांपूर्वीच शोधली होती आणि याचा पुरावा आहे आमचा गणपती
ते भाषण ऐकायला मला खरंच आवडेल. इथे लिंक देता का प्लीज?

In reply to by संजय क्षीरसागर

https://www.youtube.com/watch?v=NeIWu1NLuzE तुम्हाला वाटेल फकीरी वृत्तीचा इतका गहन विचार कसा असू शकेल ? तर स्वतः मोदीजी भर शास्त्रज्ञांच्या काँन्फरान्समधे म्हणाले आहेत, भारतानं प्लास्टिक सर्जरी हजोरो वर्षांपूर्वीच शोधली होती आणि याचा पुरावा आहे आमचा गणपती. खलास ! काय बिशादे कुणाची पुढे बोलायची ?

In reply to by संजय क्षीरसागर

.माझा प्रश्न साधा होता फकिरी वृत्तीचे कारण आपण दिलेले रोचक वाटले होते म्हणून विचारायचा प्रयत्न केला आणि ते कारण जगातील इतर राष्ट्राध्यक्षांचं भूमिकेबरोअबर ताडून बघायचाच प्रयत्न केलं .. म्हणलं जर मोदी फेकीतर म्हणून लोकडोवन तर बाकीचे देश नेते पण फकिराच्या असेल पाहिजेत... पएकूण काय मोदी विरोध... हा अजेंडा दिसतोय.. जाऊ द्या .

In reply to by चौकस२१२

२१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?

In reply to by संजय क्षीरसागर

त्यावेळी इतका प्रसार झालेला देखील नव्हता. पण सर्जिकल स्ट्राईक चे व्यसन लागलेल्या मोदीना ते मान्य कसे व्हावे ? आता त्यात वाईट असे होऊ शकले असते की आज देखील क्लस्टर्स ऑफ इन्फेक्शन ऐवजी कम्युनिटी इन्फेक्शन ही स्थिती देखील येऊ शकली असती. वर मी जे केदारनाथ चे उदाहरण दिले आहे ते त्या अर्थाने .दोन मतप्रवाह निर्माण होणे हे माणसातच घडते पण निसर्ग दोघांच्याही बाजूने कधीच दान टाकीत नाही. शेवटी ज्या मतप्रवाहाच्या पारड्यात निसर्गाचे दान पडते तो शहाणा बाकी मूर्ख . जीता वोही सिकंदर ! माझ्या मते टेस्ट टेस्ट अँन्ड टेस्ट हा एक मार्ग होता पण भारतीय संदर्भात १३० कोटी वगरे टेस्ट अशक्य ! त्यामुळे सामाजिक कायिक अंतर .पण इथे ४० कोटी लोक आज मिळवू आज खाऊ या पातळीला जगत आहेत तिथे सर्व फॉर्म्युले नापास ! आता एकच उरला आहे तुम्ही व तो देव दोघे काय ते बघून घ्या !

In reply to by चौकटराजा

> आता एकच उरला आहे तुम्ही व तो देव दोघे काय ते बघून घ्या ! याचे मोदींनी नवे ब्रँडींग केले आहे "आत्मनिर्भरता अभियान " !

In reply to by संजय क्षीरसागर

खिक्.. :D

In reply to by चौकस२१२

वामन देशमूख, चौकस २१२, आपल्या माहिती साठी ही लिंक पाठवत आहे.. हे संकलन गांधीवीदी विचारसरणीचे श्री धर्मपाल, यांनी, ब्रिटीशांनी १६५० ते १८५० च्या दरम्यान संपूर्ण भारतात केलेल्या अनेक चाचण्यांच्या /अहवालांच्या आधारावर केलेले आहे. लढाईत किंवा शिक्षेत कापले गेलेले नाक व कान प्लास्टिक सर्जरीने परत बसवण्याची विद्या भारताीयांना प्रचीन काळा पासुन अवगत आहे असे ब्रिटीशांनी नमूद कपून ठेवलेले आहे. मूळ वाक्यरचना .( This operation is not uncommon in India, and has been practiced from time immemorial.) https://drive.google.com/open?id=1tN2xMm65nQj0Pn9K8ukwvSUvZVjqlK7t

काही तज्ञांनी मार्क झुकेरबर्गला हे विडीओ काढण्याची विनंती केली होती. यावर मार्क म्हणाला अशा युगपुरुषाचे विडीओज काढणं अवमान होईल. एक वेळ मी स्वतःचा अकाऊंट यू ट्यूबवरुन काढेन पण ते विडीओज काढणार नाही, असं ऐकिवात आहे.

सामान्य भारतीय जनतेला त्रास देऊन मोदींना नक्कीच आसुरी आनंद मिळत असावा, नाही का?

In reply to by वामन देशमुख

नक्कीच , नक्कीच मोदींना आसुरी आनंद मिळत असावा ( अक्यार्डिंग टू सम मिपाकर ) -एक तर ते फकीर आहेत - दुसअरे असे कि त्यांना सर्जिकल स्ट्राईक चे व्यसन लागले आणि त्यांनी हे व्यसन इंग्लड , इटली, ऑस्ट्रेलिया आणि काही प्रमाणात ट्रम्प तात्या यांना लावले त्यामुळे हे सर्व खुले लोक आपल्याच जनतेला ठेचायला उत्सुक आहेत - दुसरे असे कि हे सगळे थोतांड आहे ! - डॉक्टर लोकं सगळे महामूर्ख आहेत , ते लोकांची दिशाभूल करीत आहेत - लवकरच मोदीनं मोडीत काढून तिथे बारामतीच्या राजाची नेमणूक करण्यात येणार आहे ( उदोहोजींची कशी काहीतरी करून संसदेत ढकलणूक केली गेली तशी )आणि ते नुसता एक पत्र लिहणार आणि कारोंना पळून जाणार .. नवीन गृहमंती खाते तब्लिघी जमाती पैकी कोणाकडे तरी दिले जाणार मग सगले आलबेल... चला घराबाहेर पडा राडा घालुयात कसलं काय कारोंना आणि कसला काय सगळं थोडांत ... ताजी बातमी : मला एक गुप्त बातमी लागली ती अशी कि भांडी थाळ्या बनवण्याच्य वयवसायाने मोदींना ना काही तरी गुपचूप मोठी स्पॉन्सरशिप दिली आणि त्यामुळे त्यांनी भांडी थाळ्या वाजवा असे फर्मान काढले .. लोकांनी लगेच केले, भांड्यांना आणि थाळ्यांना पोचे आले ..आणि लोकअन्चे नुकसान झाले .. आणि नवीन भांड्याचा खप वाढला... अर्थत काही शहाण्या लोंकांनी मोदींचे ना ऐकल्या मुळे त्यांच्या भांड्यांना काह्ही झाले नाही आणि त्यांचे पैसे वाचले. याला "थाळी घोटाळा" असे नाव देण्यात येणार आहे आणि पी चंदम्बरम , मणिशंकर अय्यर , इत्यादींची एक चौअक्शी समिती नेमली जाणार आहे ( लल्लू आणि भुजबळ त्याला बहरून कन्सल्टिंग देणार)

In reply to by चौकस२१२

२१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?

In reply to by संजय क्षीरसागर

करोडो लोकांना 3 दिवसात एक जागेवरून दुसरीकडे हलवणे शक्य आहे? आणि त्यामुळे गावाकडे कोरोना पसरला असता त्याच काय?

In reply to by संजय क्षीरसागर

आपआपल्या राज्यात परत जाणार्‍या मजूरांची, जी संख्या सध्या समोर येत आहे तेवढे मजूर, तुम्ही म्हणताय तसे तीन दिवसात आपआपल्या घरी गेले असते ? उगा मोदींचा विरोध करायचा म्हणून काहिही लिहायचे. ---

In reply to by प्रसाद_१९८२

उगा मोदींचा विरोध करायचा म्हणून काहिही लिहायचे.
तीव्र सहमत.. मुळात ३ दिवसात एवढे सगळे मजुर आपापल्या गावी कसे गेले असते. आणि समजा जरी त्याना जावु दिले असते तर परीस्थीती चिघळली नसती याची खात्री कोणी देवु शकतो का? जर तसे झाले असते तर हेच प्रश्न वेगळ्या स्वरुपात मोदिंना विचारले असते. जसे की , "कोरोनामुळे सगळ्या जगात हाहाकार उडालेला दिसत असुन मोदींनी लॉकडाऊन जाहीर करायला ३ दिवस ऊशीर का केला, मजुरांना स्थलांतर करण्याला परवानगी का दिली?, आता जर मजुरांमार्फत इतर ठिकाणी जर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर त्याला जवाबदार कोण" इत्यादी इत्यादी. चीत भी मेरी पट भी मेरा..

In reply to by यश राज

चीत भी मेरी पट भी मेरा.. अगदि बरोबर टोकाचा अन्ध मोदि द्वेश मग सगल बकिच जग जे करत आहे ते मोदिन्नि केल मह्न्जे चुकच ..

In reply to by वामन देशमुख

> सामान्य भारतीय जनतेला त्रास देऊन मोदींना नक्कीच आसुरी आनंद मिळत असावा, नाही का? अजिबात नाही ! फकीर आनंद आणि दु:ख यापलिकडे गेलेला असतो. नोटाबंदीत रांगेत उभे राहून प्रामाणिक लोकांनी हाकनाक प्राण गमावले. पण सर्व जग माया आहे, इथे ये-जा चालूच राहाणार असा विचार फकीर करतो. त्यामुळे जनतेचा छ्ळ वगैरे कसा होईल ? करोडो लोकांना स्वतःच्या घरी पोहोचायला शेकडो मैल पायपीट करावी लागली पण फकीरी वृत्तीला हा सर्व खेळच आहे, त्यात वैषम्य वाटून घेण्यासारखं काही नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मोदिन्न महित नहि पन हे जे काय लिहिताय आणि परिस्थितीवर मात कशी करीत येईल त्याऐवजी फकिरी वृत्तीचे तुणतुणे लावलाय त्यामुळे निश्चितच असुरी आनंद मिळत असावा

In reply to by चौकस२१२

२१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?

In reply to by मामाजी

वैदिक विमान....https://www.washingtonpost.com/news/worldviews/wp/2015/01/04/indians-in… आणि अणूबॉम्ब (जो महाभारतात वापरला होता),दूरचित्रवाणी द्वारे परिषद(video conference)असे असंख्य शोध आपण लावलेले आहेत. या सगळ्याचा डेटाबेस ज्या ढगात(cloud storage) साठवून ठेवला आहे त्याचा फक्त शोध घेतला पाहिजे इस्रो ने बस. आणि आदरणीय मोदीजी हे करुन राहतील यात शंकाच नाही.

ह्या धाग्याचा आवाका बराच मोठा आहे. महर्षी सुश्रुतां पासून ते थोतांडी, फकिरी, नोटाबंदी, घरबंदी, टाळेबंदी, सर्जिकल स्ट्राईक पर्यंत !! चला, मंडळींच्या भावनांचा निचरा तर होतो आहे ह्या निमित्ताने, हे हि नसे थोडके.

In reply to by चामुंडराय

ह्या धाग्याचा आवाका बराच मोठा आहे.

खरंच हसून गार झालो राव!


असे मानणार्‍यांना दोनच प्रश्न १) लॉकडाऊन करण्याचे निकष काय होते ? २) लॉक डाउन मागे घेण्याचे निकष काय होते / असतील. या दोन प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे (आकडेवारी सह) कुणी देवू शकेल काय ?

In reply to by मराठी कथालेखक

वस्तुनिष्ठ उत्तरे (आकडेवारी सह) कुणी देवू शकेल काय ? हो. भारत सरकारला माहितीच्या अधिकाराअंतर्गत हे दोन प्रश्न विचारा.