हातात फक्त आठ वर्षे!

तर्कवादी's picture
तर्कवादी in काथ्याकूट
14 Jun 2022 - 5:22 pm
गाभा: 

भारतीय वृत्तमाध्यमांत पर्यावरणविषयक बातम्या वा चर्चा या खरेतर फक्त हवामान व पर्जन्य याबद्द्लच मर्यादित आहेत.
पावसाचा अंदाज, पावसाचे वृत्त, पूर , भूस्खलन, चक्रीवादळे ईत्यादी बद्दलच्या संक्षिप्त बातम्या इतकंच काय ते पर्यावरणाला मिळणारं फूटेज.

पण सध्याची परिस्थिती पाहता पर्यावरण हा अतिशय महत्वाचा व गंभीर आणि प्राधान्याने ज्यावर विचार व कृती करायला हवी असा विषय बनला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन उत्सर्जन, भूजलाची घटती पातळी, वाढते जल व वायू प्रदूषण, प्लॅस्टीक व इतर कचर्‍याच्या समस्या, घटते जैववैविध्य , वाढते पूर, चक्रीवादळे असे अनेक उपविषय पर्यावरणात सामाविष्ट आहेत. त्यातही ग्लोबल वॉर्मिंग हा नावाप्रमाणेच सर्वात हॉट विषय असावा. आजच ओझोन प्रदूषणाविषयीचा एक धागा मिपावर आलाय.

आपण (सन्माननीय अपवाद वगळता) जरी बहुधा या विषयातले तज्ञ नसलो तरी पर्यावरणाबद्दल जागरुकता असणंही चर्चा करण्याकरिता पुरेस आहे. चर्चा करत हळूहळू आपल्या ज्ञानात भर पडत राहील.

पर्यावरणाचा विषय आला की संबंधित सरकारी धोरण हा महत्वाचा पैलू असणारच. पण तरी राजकारण्यांबद्दलची टिप्पणी (अगदीच आवश्यक असल्याखेरीज) टाळून चर्चा झाल्यास बरे.
पुढचे आठ वर्षे हा धागा जिवंत रहावा ही अपेक्षा !!

चर्चेच्या सुरुवातीला "हातात फक्त आठ वर्षे" या लोकसत्तातील लेखाचा दुवा देत आहे.

प्रतिक्रिया

धाग्यात उल्लेखलेल्या लेखातील काही मुद्दे

२०३० पर्यंत जगातील कर्ब-उत्सर्जन निम्मे केले आणि २०५० पर्यंत ते शून्यावर आणले तरच ही तापमानवाढ २०५० पर्यंत १.६ ‘डिग्री सेंटिग्रेड’पर्यंत रोखता येईल. नाही तर २०३० पासून पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तर ध्रुवामधील समुद्राच्या पोटातील, वरून फक्त शिखरे दिसणारे प्रचंड बर्फाचे पर्वत विरघळायला लागतील. ही प्रक्रिया चक्रवाढ गतीने होऊन जागतिक तापमानवाढ दोन किंवा तीन डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त होईल. त्यावर नियंत्रण आणणे काय वाटेल ते केले तरी अशक्य होईल. एवढय़ा तापमानवाढीमुळे टोकाच्या नैसर्गिक आपत्ती ओढवून या शतकाच्या अखेपर्यंत सुमारे १०० कोटी (!) लोक विस्थापित होतील असे ‘आयपीसीसी’ने (युनोची तज्ज्ञ-समिती) म्हटले आहे. एवढे ‘पर्यावरणीय निर्वासित’ जगात निर्माण झाल्यास त्यातून जगात कल्पनातीत आर्थिक-सामाजिक ताण निर्माण होऊन जगभर अक्षरश: हाहाकार माजेल. तो टाळण्यासाठी जगात यापुढे जास्तीत जास्त ४०० गिगा टन (एक गिगा टन म्हणजे १०० कोटी टन) कर्बवायू वातावरणात सोडला तर चालणार आहे. सध्याच्या कर्बउत्सर्जनात वेगाने घट झाली नाही तर हे उरलेले ‘कार्बन-बजेट’ २०३० पर्यंत संपेल.

वर्षांला कर्बवायू-उत्सर्जन सात टक्क्य़ांनी घटवायची गरज असताना उलट ते १.२ टक्क्य़ांनी वाढले आहे

कर्बवायू हवेतून शोषण्याचे प्रमाणही वाढवायला हवे. त्यासाठीचे अभियांत्रिकी तंत्रज्ञान आज तरी व्यवहार्य नाही. त्यासाठी हरित-क्षेत्रे (जंगले, कुरणे, शेती इ.) वाढवणे हाच सध्या एकमेव पर्याय आहे.

र्षिक, दरडोई कर्ब-उत्सर्जनाचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे – अमेरिका १६ टन, चीन आठ टन, युरोपीय महासंघ सात टन, भारत १.६ टन. गरीब-श्रीमंत सर्वाची मिळून सरासरी काढलेली ही आकडेवारी आहे. आजपर्यंतच्या जगातील एकूण कर्बवायू उत्सर्जनात – अमेरिका- २१ टक्के, युरोपीय महासंघ- १८ टक्के, चीन- १०.७ टक्के, भारत- २.८ टक्के असा वाटा आहे.

कुमार१'s picture

14 Jun 2022 - 6:56 pm | कुमार१

या विषयात सर्वात महत्वाचे काय असेल तर

मी स्वतः २ घटकांबाबत संवेदनशील असून खालील कृती करतो :
( या धाग्यावरून इथे डकवतो)

१. स्वतःचे स्वयंचलित वाहन कमीतकमी वापरणे >>>>>
गेल्या २५ वर्षांत सर्वत्र वाहनजन्य प्रदूषण खूप वाढले. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागला. असे दिसते की या विषयावर लेखन, चर्चा, परिसंवाद आणि परिषदा अगदी भरपूर होतात, पण सर्वात गरजेची असलेली कृती मात्र अत्यल्प असते. बहुतेक सगळा मामला ‘लोका सांगे...’ असा असतो. अधूनमधून कृतीच्या छोट्या लाटा येतात अन लगेच त्या विरूनही जातात. कधी आपण ‘बस डे’ अनुभवतो, कधी सायकलची प्रभातफेरी पाहतो, तर कधी पाच वर्षातून एखाद्याच दिवशी आपले काही अत्यल्प खासदार संसदेत सायकलवरून जाताना फोटोत पाहतो!

पण माझ्या पाहण्यात काही अपवादात्मक असे लोक आले. त्यापैकी काहींना स्वयंचलित वाहन परवडत असतानाही ते आजन्म सायकलनिष्ठ आहेत. मग मलाही काहीसे अपराधी वाटू लागले. पूर्णपणे स्ववाहनरहित आयुष्य जगणे कठीण होते, पण निर्धार केल्यास काही प्रमाणात स्ववाहन-संयम शक्य होता. मग पहिले पाऊल टाकले ते म्हणजे आठवड्यातून एक दिवस फक्त चालत अथवा सायकलचा वापर. सुरुवातीस हा शनिवार ठेवला होता, जेणेकरून दुखऱ्या पायांना रविवारी विश्रांती मिळावी. यातून आणखी एका गोष्टीची जाणीव झाली. शनिवारी कामाच्या ठिकाणीही सायकलवरच गेलो. इथे आपल्याला मात करावी लागते, ती म्हणजे कुठलीही लाज वाटणे याची. कारण आपले सर्व सहकारी स्वयंचलित वाहनातूनच येत असतात. त्यामुळे सुरुवातीस काही शेरे ऐकावे लागतात. त्यांची सवय करून घेणे हाही या निग्रहाचा एक भाग असतो.
पुढच्या टप्प्यात सुटीच्या दिवशी काही कामे ठरवून दुपारच्या वेळात बसने जाऊन करू लागलो. तेव्हा आपण बसमध्ये शिरू शकतो! अखेर, विचारपूर्वक माझे वाहन-धोरण असे ठरले :
१ कि.मी.पर्यंतची कामे चालत, त्यापुढच्या अंतराची बसने आणि फक्त तातडीची कामे स्वतःच्या वाहनाने करणे.

2. जमेल तितकी वीजबचत.
यात काटकसर, चिक्कूपणा हे सर्व आले.

कुमार१'s picture

14 Jun 2022 - 6:57 pm | कुमार१

या विषयात सर्वात महत्वाचे काय असेल तर “ मी काय उपयुक्त कृती करतो व अजून काय करेन?”
असे वाचावे.

सर टोबी's picture

14 Jun 2022 - 7:39 pm | सर टोबी

वैयक्तिक पातळीवर फार मर्यादित स्वरूपात आपण हातभार लावू शकतो. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, गरजे पुरता प्रवास करणे, शक्य तितकं आराम वाटण्यासाठी ऊर्जेचा वापर टाळणं जसे वातानुकूल यंत्र कमीत कमी वापरणे या गोष्टी आपण करू शकतो. पण प्रदूषणाच्या बाबतीत सर्वात मोठा प्रभावी घटक आहे तो म्हणजे सरकारी धोरणं. त्यामुळे या चर्चेत सरकारची प्रशंसा अथवा नालस्ती अपरिहार्य आहे.

विद्यमान सरकारचे पर्यावरण धोरण ज्यामध्ये वन संवर्धन, डोंगर आणि टेकड्या वाचवणे, जल प्रदूषण कमी करणे या बाबतीतला इतिहास भूषणावह नाही. पुण्याच्या संदर्भात बोलायचे तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नव्याने सुरु झाले नाहीत किंवा त्यांची क्षमता वाढली नाही. तसेच कचरा प्रकल्प देखील मागच्या कारभाऱ्यांपेक्षा काही वेगळे राबवले नाही. भरीला मेट्रो सारखा दिखाऊ प्रकल्प तयार करून रस्त्यावरील वाहतुकीला मंदगती करून ठेवले आहे.

जाता जाता: मन्मोहन सरकाराची कुचकामी म्हनून खुप अवहेलना झाली. त्यामागे जयन्ति नटराजन यान्चे पर्यावरन मन्त्रि असणे कारणीभूत होते. ती टीका कशी अनाठायि होती ते लक्शात यावे.

त्यामागे जयन्ति नटराजन यान्चे पर्यावरन मन्त्रि असणे कारणीभूत होते.

जयन्ति नटराजन की जयराम रमेश ?

तर्कवादी's picture

14 Jun 2022 - 8:12 pm | तर्कवादी

आपण पर्यावरण बदल फक्त बातम्यांत वाचत आहोत असे नाही, आपल्या पैकी अनेकांनी गेल्या काही वर्षात पर्यावरणातले बदल अनुभवले असतील
आपण स्वतः पर्यावरणातले काय बदल अनुभवले आहेत ते मिपाकर लिहू शकतात.

काही महिने वगळता माझे पुर्ण आयुष्य पिंपरी-चिंचवड शहरात गेले. इथे पर्जन्यमानात होणारा बदल खूप ठळकपणे दिसतो आहे. गेले काही वर्षापासून वळवाचा पाऊस असा पडतच नाही. पुर्वी एप्रिल किंवा मे महिन्यात वादळी वार्‍यांसह मुसळधार वळवाचा पाऊस पडायचा. तसेच पावसाची सुरुवात जूनच्या पहिल्या आठवड्यात व्हायची. आज १४ जून आहे पण पाऊस अजून जवळपास पडलाच नाही. पावसाळा सुरु झाल्यावर मध्ये अनेक दिवस उघडीप असते आणि पावसाचे दिवस कमी झालेत हे ही जाणवते.

दुसरा बदल (बहुधा) - मला आठवते त्याप्रमाणे मी लहानपणी वटवाघळे फारशी कधी बघितली नव्हती. पण मागील वर्षी मी निगडीत एकदा सायंकाळी आकाशात हजारो वटवाघळांचे थवे उडताना पाहिले. हा बदल पर्यावरणातील बदलाशी संबंधित असेल काय ?

प्रचेतस's picture

14 Jun 2022 - 8:58 pm | प्रचेतस

माझेही आतापर्यंतचे आख्खे आयुष्य पिंपरीच चिंचवडमध्येच गेलंय. आपले निरीक्षण बरोबर आहे, यावर्षी वळीव बरसलाच नाही, शिवाय गेली दोन वर्षे अगदी कमी प्रमाणात होता.

पण मागील वर्षी मी निगडीत एकदा सायंकाळी आकाशात हजारो वटवाघळांचे थवे उडताना पाहिले. हा बदल पर्यावरणातील बदलाशी संबंधित असेल काय ?

ह्याबद्दल मात्र असहमत. येथे हजारो वटवाघुळांचे थवे आहेत. ह्यांची प्रमुख वस्ती चिंचवड टेल्कोच्या आवारातील झाडांत आहे. दररोज सायंकाळी तेथल्या आकाशात मावळतीला हे थवे बाहेर पडल्याचे वर्षानुवर्षे पाहतोय.

तर्कवादी's picture

15 Jun 2022 - 12:29 pm | तर्कवादी

दररोज सायंकाळी तेथल्या आकाशात मावळतीला हे थवे बाहेर पडल्याचे वर्षानुवर्षे पाहतोय

शक्य आहे... मग कदाचित वटवाघळांचा उडण्याचा मार्ग थोडाफार बदलला असल्याने पुर्वी मला ते निगडीला दिसले नाहीत व आता दिसलेत असं झालं असावं.
पण तुम्हला चिंचवड टेल्कोच म्हणायचं आहे की पिंपरी टेल्कोच्या समोरील सुमंतसागर तळं आणि परिसर ?

प्रचेतस's picture

15 Jun 2022 - 2:02 pm | प्रचेतस

पण तुम्हला चिंचवड टेल्कोच म्हणायचं आहे की पिंपरी टेल्कोच्या समोरील सुमंतसागर तळं आणि परिसर ?
चिंचवड टेल्कोच, मोरे प्रेक्षागृहाच्या समोरचं.

प्रसाद गोडबोले's picture

14 Jun 2022 - 9:06 pm | प्रसाद गोडबोले

पर्यावरण वगैरे फार लांबच्या चिंता करता राव तुम्ही , इथे आमच्यासारख्या सामान्य माणसांना आहे ह्या जिंदगीची गणिते सोडवता सोडवता नाकी ९ आले !

आर. टी. ओ सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यात अडवुन चिरिमीरी छापायचे थांबवतील त्यानंतर विचार करु !
पेट्रोल डिझेल अन अल्कोहोल जी. एस. टी च्या अखत्यारित येईल तेव्हा विचार करु !
टॅक्सेशन ऑन टॅक्स / डबल टॅक्सेशन बंद होईल तेव्हा विचार करु !
सबसीडी पॉलिटिक्स बंद होईल तेव्हा विचार करु !
पुराव्याने शाबित करता येतात ती सर्व मंदिरे हिंदुंना परत मिळतील तेव्हा विचार करु !
हाय वे वरचे टोलनाके बंद होतील किंव्वा आधीच उकळलेल्या रोड टॅक्स मधुन क्रेडिट्स घ्यायला लागतील तेव्हा विचार करु !

थोडक्यात काय तर सामान्य माणसाची जिंदगी तशीही झंड आहे , आता आठ वर्षांनी ती अजुन झंड झाली तरी काही जास्त फरक पडनार नाहीये !

सौन्दर्य's picture

14 Jun 2022 - 10:46 pm | सौन्दर्य

मार्क साहेब, तुमचे म्हणणे खरे आहे. जिंदगी अजूनही वाईट (झंडचा अर्थ वाईट असावा असे धरून) झाली तर आपल्याला जरी फरक नाही पडला तरी आपल्या पुढच्या पिढीला तरी नक्की फरक जाणवेल, तेंव्हा त्यांच्या दृष्टीने तरी आपण काहीतरी करूया.

तर्कवादी's picture

14 Jun 2022 - 11:24 pm | तर्कवादी

थोडक्यात काय तर सामान्य माणसाची जिंदगी तशीही झंड आहे , आता आठ वर्षांनी ती अजुन झंड झाली तरी काही जास्त फरक पडनार नाहीये !

हो पण जिंदगी राहिलीच नाही तर ?
आणि टॅक्स, पेट्रोलच्या किमती, सबसिडी वगैरे मुळे जिंदगी झंड झाली आहे असे तुम्ही समजता ?

आमच्या सोसायटित साधारण तीन वर्षापुर्वी जुन्या सडक्या पाईपलाईनमुळे वापरायच्या पाण्याचा पुरवठा खूप विस्कळीत झाला होता .. वरच्या टाक्या भरायला इतका प्रचंड वेळ लागे की त्यामुळे कधी पाणी असेल कधी नसेल याची शाश्वती नसायची. सर्व रहिवाशांत खूप अस्वस्थता होती. आमच्या या तात्कालिक समस्येच्या अनेक पटीने गंभीर समस्या आताच अनेक गावांत दरवर्षी असते ..

तुम्ही राहता त्या भागात जर पाण्याचे गंभीर दुर्भिक्ष्य झाले तर झंड ची व्याख्या तुम्ही नव्याने कराल आणि आता ज्या जिंदगीला तुम्ही झंड म्हणता ती स्वप्नवत सुंदर वाटू लागेल.

प्रसाद गोडबोले's picture

15 Jun 2022 - 12:17 am | प्रसाद गोडबोले

झंड ची व्याख्या तुम्ही नव्याने कराल आणि आता ज्या जिंदगीला तुम्ही झंड म्हणता ती स्वप्नवत सुंदर वाटू लागेल.

एकझ्यॅक्टली!

म्हणुनच म्हणतो की हे ग्लोबल वॉर्मिंग हे ब्लेसिंग इन डिसगाईज आहे ! होऊ दे चांगली पाणे पातळी मध्ये वाढ अन पोहचु दे समुद्राचे पाणी मुंबईच्या विधानभवनात . =))))

ह्या अलम दुनियेला शतअब्जावधी वर्षांचा काळ ओलटुन गेलाय , त्यात "जिंदगी " हा प्रकार इनमीन ४ अब्ज वर्ष जुना आहे , त्यातही मानवी अस्तित्व म्हणजे फार्फार्तर पन्नस लाख वर्षे असेल. म्हणजे अगदीच समंदर मे खसखस प्रकारचा.

त्यामुळे - जिंदगी राहिली नाही तर खुप काही तरी महाभंयंकर होत आहे असे नाही. शांत व्हा .

कॉमी's picture

15 Jun 2022 - 9:04 am | कॉमी

निरुपयोगी प्रतिसाद

sunil kachure's picture

15 Jun 2022 - 4:45 pm | sunil kachure

एकदम योग्य आहे तुमचे मत

तर्कवादी's picture

15 Jun 2022 - 12:25 pm | तर्कवादी

त्यामुळे - जिंदगी राहिली नाही तर खुप काही तरी महाभंयंकर होत आहे असे नाही. शांत व्हा .

सहमत. पण जीवन संपण्याची प्रक्रिया एका झटक्यात नसेल तर खूपशी त्रासदायक असेल.
ज्या गावात रोज दूरवरुन , तास न तास घालवून पाण्याचे हंडे भरुन आणावे लागतात तेथील लोकांना मरण परवडले असे कदाचित वाटत असेल पण त्रास सहन करत जगावे लागते.
बाकी इथे अनेक लोक चाळिशी ओलांडलेले असतील, २०३० पर्यंत पन्नाशी ओलांडतील. बहुतेक जण आतापर्यंत आयुष्य भरभरुन जगलेही असतील पण तरीही "जिंदगी राहिली नाही" तरी काही हरकत नाही हे म्हणण्याचं धैर्य विनापत्य (चाईल्डफ्री) जीवनशैली जगणार्‍यांकडेच बहुधा असू शकेल.

प्रसाद गोडबोले's picture

15 Jun 2022 - 1:34 pm | प्रसाद गोडबोले

पण तरीही "जिंदगी राहिली नाही" तरी काही हरकत नाही हे म्हणण्याचं धैर्य विनापत्य (चाईल्डफ्री) जीवनशैली जगणार्‍यांकडेच बहुधा असू शकेल.

असं काही नाही , तुम्ही ह्या दुनियेकडे अलिप्तपणे पहायला शिकलात तर तुम्हालाही जमेल .

आता आहे तैसा दिसतो प्रकार | पुढीला विचार देव जाणे || असं तुकोबा म्हणुन गेले आहेत त्यांनाही ३ पोरं होती की !

कल्पना करा , क्ष अक्सिस वर काळ घ्या आणि य अक्सिस वर १/एन्ट्रॉपी घ्या . आणि आता हा जो स्मूद कर्व्ह प्लॉट केला आहे ना त्यावर घसरगुंडीसारखे घरंगळत चालले आहे जग . अन त्या जगात आपल्या गमजा चालु आहेत ! तुम्ही वाट्टेल ते करु शकता पण ह्या घसरगुंडीवरुन घसरत जाणे थांबवु शकत नाही ! आणि घसरगुंडी संपली अन सगळं क्षणार्धात नष्ट झालं , हवेत विरुन गेलं तरी काय फरक पडतो , आपल्या परिप्रोक्ष्यातुन तो घसरगुंडीचा शेवट असेल बस्स, त्या नंतर नवीन घसरगुंडी सुरु होईल त्यावर घरंगळत जाणारे आपण तिथं नसु बस्स इतकाच फरक आहे !

न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ २-१२ ॥

इतक्या अलिप्तपणे दुनियेकडे बघायला शिकलात तर त्रासदायक त्रासदायक म्हणत आहात तो त्रास नक्कीच कमी होइल.

असो.

अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥

बस इतके बोलुन मी माझे चार शब्द संपवतो.

तर्कवादी's picture

15 Jun 2022 - 1:51 pm | तर्कवादी

असं काही नाही , तुम्ही ह्या दुनियेकडे अलिप्तपणे पहायला शिकलात तर तुम्हालाही जमेल .

मघाच्या माझ्या वाक्याचा पुढचा भाग सांगतो.. तर अशी विनापत्य जीवनशैली जगणार्‍यांपैकी मी एक आहे.छान मजेत जगतोय. पण तरीही पुढच्या पिढीचा विचार करायला हवा असे मला वाटते.
मुळात जीवन संपत असले तरी ते संपण्याचे दु:ख नाहीये . उद्या एखादा ग्रह वा भली मोठी उल्का येवून पृथ्वीला धडकली तर जीवन संपेलही कदाचित.. तसेही ते कधीतरी संपणार आहेच. पण जीवन शक्य असूनही मानवाच्या चुकांमुळे ते अकाली संपावे असे वाटत नाही .एखादा व्यक्ती नैसर्गिकरित्या आजाराने वा वृद्धापकाळाने मरण पावतोच पण आत्महत्या, खून, अपघात यामुळे आलेला अकाली मृत्यू जास्त वेदनादायी वाटतो तसेच काहीसे.
अवांतर : विनापत्य राहण्याचा निर्णय अतिशय पर्यावरणपूरक असल्याने पर्यावरण रक्षणातला मी माझा वाटा आधीच उचललाय असे म्हणता येईल :)

कोहंसोहं१०'s picture

16 Jun 2022 - 12:12 am | कोहंसोहं१०

> अवांतर : विनापत्य राहण्याचा निर्णय अतिशय पर्यावरणपूरक असल्याने पर्यावरण रक्षणातला मी माझा वाटा आधीच उचललाय असे म्हणता येईल :)

हे मात्र पुर्णपणे खरयं!

सामान्य नागरिक

सायकलवर जाऊ
दोन झाडे लाऊ
गणपतीला घरच्याच
बादलीत बुडवून ठेऊ

असामान्य नागरिक

दोन टेकड्या फोडीन
हजार झाडे तोडीन
पंधराव्या पिढीसाठी
"आदर्श " घरे बांधीन

सामान्य नागरिक फार काही करू शकेल आशी परीस्थीती नाही.

विजुभाऊ's picture

14 Jun 2022 - 9:59 pm | विजुभाऊ

कपडे धुणे या साध्या क्रिये मधून कित्येक टन प्लास्टीक हे जलप्रदुषन करीत आहे. ( आपल्या बहुतेक कपड्यांच्या धाग्यात रेयॉन नायलॉन वगैरे प्लास्टीक असते) हे प्लास्टीक आता समुद्री जीवांच्या शरीरात पोहोचले आहे. ते मायक्रो प्लास्टीक स्वरूपात मानवी रक्तातही सापडायला लागले आहे.
इतकेच नव्हे तर हे प्लास्टीकचे मायक्रो कण आता थेट पावसातही सापडायला लागले आहेत.
इतके करूनही कोणतेच सरकार प्लास्टीक बंदी करत नाही.
तंबाखूपासून कर मिळतो म्हणून माहीत असतानादेखील त्यावर बंदी आणली जात नाही त्यातलाच हा प्रकार.

Trump's picture

15 Jun 2022 - 8:03 pm | Trump

कपडे धुणे या साध्या क्रिये मधून कित्येक टन प्लास्टीक हे जलप्रदुषन करीत आहे. ( आपल्या बहुतेक कपड्यांच्या धाग्यात रेयॉन नायलॉन वगैरे प्लास्टीक असते) हे प्लास्टीक आता समुद्री जीवांच्या शरीरात पोहोचले आहे. ते मायक्रो प्लास्टीक स्वरूपात मानवी रक्तातही सापडायला लागले आहे

धन्यवाद. हा मुद्दा बर्याच वेळा सुटला जातो. कपडेधुवक पावडरमुळे जलपर्णिका नदीत आणि तळ्यात वाढल्या आहेत.

sunil kachure's picture

14 Jun 2022 - 10:25 pm | sunil kachure

पर्यावरण हानी ह्याला पूर्ण जबाबदार माणूस प्राणी.
माणसं व्यतिरिक्त कोणताच प्राणी पर्यावरण साठी हानिकारक नाही.
म्हणजे माणसांची संख्य खूप खूप कमी झाली तर पर्यावरण आपोआप वाचेल.
पृथ्वी चे वातावरण बिघडले तर त्याची झळ सर्वांना नक्की बसेल.
गरीब ,श्रीमंत,हा भेद असणार नाही जेव्हा तीव्र प्रमाणात पर्यावरणात बदल होईल.
पावूस न पडणे,तापमानात वाढ ,प्रदूषित हवा, ह्या वर माणसांकडून उपाय शोधले जातील.
तसे दावे इथेच काही आयडी काहीच दिवसात करतील.
पाणी आम्ही बनवू .
Ac च वापर वाढवू.
ऊर्जा fusion नी निर्माण करू.
पण पर्यावरण बदलाचा फक्त इतकाच परिणाम होणार नाही..
झाडांना फळं येणे बंद होतील.
माती मध्ये कोणतीच पीक येणार नाहीत.
आज पर्यंत जे विषाणू जिवाणू निद्रा अवस्थेत आहेत ते जागे होतील.
अनेक महाभयंकर रोग माणसाला हैराण करतील.
ऑक्सिजन चे प्रमाण कमी होईल.
अगदी माणसाचा मेंदू विकसित होणे पण बंद होईल..हे सर्व निसर्ग करेल माणसाला काही करायची गरज नाही.
आणि एक दिवस ही पृथ्वी निर्मनुष्य होईल.

सौन्दर्य's picture

14 Jun 2022 - 11:03 pm | सौन्दर्य

मी काय करतो -
१. रेनवॉटर हार्वेस्टिंग सुरु केलंय.
२. नेहेमीचे शॉवर हेड्स बदलून पाण्याची बचत होईल असे हेड्स लावलेत.
३. जेवण बनवताना भाजीपाला, तांदूळ, डाळ वगैरे धुतल्यावर पाणी बादलीत जमा करून झाडांना घालतो.
४. कन्व्हेन्शनल दिवे बदलून एल इ डी दिवे लावलेत.
५. कारचा वापर अगदी गरजेपुरताच करतो.
६. वॉशिंग मशीन आठवड्यातून एकदाच वापरतो.
७. घरामागच्या छोट्या जागेत लहानमोठी झाडे लावलीत.
८. घरातील खिडक्यांना तीव्र प्रकाश रोखण्यासाठी फिल्म तसे पडदे लावलेत. विजेचे बिल १०% तरी कमी झाले.
९. घरच्या घरीच कंपोस्ट खत बनवतो ज्या योगे घरातून थोडाही ओला कचरा घराबाहेर जात नाही. म्युनिसिपालटीचा ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च, इंधन वाचते.
१०. स्मार्ट थर्मोस्टॅट लावल्यामुळे घरी नसताना वातानुकूलित यंत्र आपोआपच ऑप्टिमल लेव्हलवर सेट होते, विजेचा खर्च कमी झाला.

काही कामे करायची अजून जी बाकी राहिलीत ती खालील प्रमाणे -

१. टॉयलेटच्या ३.५ गॅलनच्या टाक्या बदलून, दोन कम्पार्टमेन्टच्या नवीन टाक्या बसवायच्या आहेत. छोटी टॅंक लघुशंकेनंतर वापरण्यासाठी व मोठी टॅंक इतर कामांसाठी. पाण्याची भरपूर बचत होईल अशी आशा आहे.
२. घरावर सोलर पॅनल लावायचे आहेत.

तर्कवादी's picture

14 Jun 2022 - 11:13 pm | तर्कवादी

कन्व्हेन्शनल दिवे बदलून एल इ डी दिवे लावलेत.

आता बहुतेक सर्वच लोक एल इ डी दिवे वापरत असावेत.
मी ही कारचा वापर खूप कमी करतो. बाईक मात्र थोडी वापरत असतो. अजून वर्क फ्रॉम होम चालू आहे त्यामुळे तसाही रोजचा प्रवास खूप कमी होतो.

स्मार्ट थर्मोस्टॅट लावल्यामुळे घरी नसताना वातानुकूलित यंत्र आपोआपच ऑप्टिमल लेव्हलवर सेट होते,

पण घरात कुणी नसतानाही वातानुकूलन यंत्र चालू ठेवता का ?

हे अधिक फायदेशिर असते म्हणुन. समजा बाहेर ४८ डिग्री तापमान आहे, घरात तुम्ही २८ डिग्री ठेवताय. आता समजा बाहेर गेले व यन्त्र बन्द केले तर तापमान परत ४५~४८ डिग्री ला जाईल व ते परत २८ डिग्री ला आणायला जास्त वीज वापर होतो. याउलट ते स्वनियन्त्रित असेल तर (२८ चे ३० झाले की सुरु, परत २८ आले की बन्द ) वापर कमी होते , असा अभ्यास आहे. अर्थात दिवस-रात, किती वेळ बाहेर आहात, यावर पण बरेच अवलम्बुन असते हेवेसानला...

तर्कवादी's picture

15 Jun 2022 - 11:04 am | तर्कवादी

हे अधिक फायदेशिर असते म्हणुन

असा विचार केला नव्हता. पण शक्य आहे. त्या त्या प्रदेशातील हवामान, वार्‍यांचा वेग, इमारतीची रचना यावर पण अवलंबून असेल.
मी वातानुकिलित खोलीत होणारी उष्णतेची गळती थांबवण्याकरिता अ‍ॅमेझॉनवररुन ही टेप बोलावली आणि संलग्न न्हाणीघराच्या दरवाजाला , खोलीच्या दरवाजाला आणि एका खिडकीला लावली आहे. ही टेप लावण्यास सोपी आहे. यामुळे बाहेरुन आत येणारी उष्ण हवा किंवा खोलीतून बाहेत जाणारी थंड हवा अडवली जाते त्यामुळे वातानुकूलन यंत्राचा उर्जा खर्च कमी होतो.

Bhakti's picture

15 Jun 2022 - 11:46 am | Bhakti

स्तुत्य _/\_

निनाद's picture

15 Jun 2022 - 5:11 am | निनाद

गणपती सारखे सणवार सुरू झाले की नियमित पणे पर्यावरणाची काळजी करणारे असले लेख येतात. त्याची सुरुवात या वर्षी जरा आधी झाली असे दिसते आहे. म्हणजे मागच्या वर्षी फार काही उपद्व्याप या खोट्या पर्यावरणावाद्यांना करता आले नव्हते. त्यामुळे या वर्षी धोरणात्मक काही बदल झाला यांच्या बापांच्या संस्थांमध्ये झाला असावा. तो बदल आता पाझरतो आहे लेखांच्या रुपात. हाच लेख इंग्रजी भाषेत इतरत्र कुठे आला आहे का ते पण तपासा म्हणजे यांची पाळेमुळे लक्षात येतील.

हे सगळे पेन्सिल पुशर्स स्वतः काहीही करत नाहीत. फक्त तुमचे आयुष्य कसे वाईट होणार आहे. हा निराशावद मनात भरण्यात मात्र तत्पर असतात.

ज्यांनी १० झाडे लाऊन दहाच्या दहा झाडे दहा वर्षे जगवली आहेत. अशा लोकांनाच लेख लिहायला परवानगी दिली, तर हाताच्या बोटावर मोजण्या इतके लेख या विषयावर येतील. एखादा जादेव पायेंग असतो - पण असा माणूस लेख वगैरे लिहित नाही - विषयावर काम करतो.

बाकी या फालतू लेखांना फाट्यावर मारायला आता आम्ही शिकलो आहोत. काम करणारे लोक आम्हाला माहित आहेत.

तर्कवादी's picture

15 Jun 2022 - 11:05 am | तर्कवादी

बाकी या फालतू लेखांना फाट्यावर मारायला आता आम्ही शिकलो आहोत

फालतू प्रतिसादांना फाट्यावर मारायचं मी आता शिकत आहे :)

आनन्दा's picture

15 Jun 2022 - 4:09 pm | आनन्दा

निनाद यांचा प्रतिसाद लोकसत्तामध्ये आलेल्या लेखाला होता.
तुम्ही का उडत्या बाणावर बस्ताय?

sunil kachure's picture

15 Jun 2022 - 4:38 pm | sunil kachure

तर्क वादी ह्यांचे विचार योग्य आहेत
निनाद हे कोणत्या तरी विचाराचे गुलाम आहेत.त्यांना स्वतःचे एक पण मत नाहीं

गुलामगिरी,त्यांच्या रक्तात आहे.

sunil kachure's picture

15 Jun 2022 - 4:48 pm | sunil kachure

तर्क वादी ह्यांचे मत अगदी योग्य आहे निनाद म्हणून जो आयडी आहे त्या ला स्वतःचे काहीच मत नाही
कोणाची तरी गुलामगिरी तो आयडी करत आहे.

sunil kachure's picture

15 Jun 2022 - 4:48 pm | sunil kachure

तर्क वादी ह्यांचे मत अगदी योग्य आहे निनाद म्हणून जो आयडी आहे त्या ला स्वतःचे काहीच मत नाही
कोणाची तरी गुलामगिरी तो आयडी करत आहे.

तर्कवादी's picture

15 Jun 2022 - 5:00 pm | तर्कवादी

निनाद यांचा प्रतिसाद लोकसत्तामध्ये आलेल्या लेखाला होता.
तुम्ही का उडत्या बाणावर बस्ताय?

ओके.. आता मुद्देसूद प्रतिवाद
१)

गणपती सारखे सणवार सुरू झाले की नियमित पणे पर्यावरणाची काळजी करणारे असले लेख येतात. त्याची सुरुवात या वर्षी जरा आधी झाली असे दिसते आहे.

लोकसत्तातील लेखात कुठेही गणेशोत्सवाचा संदर्भ नव्हता. त्यामुळे धार्मिक बाबींशी संबंध जोडण्याचे कारण नव्हते. तसेच लेख प्रसिद्ध झाला त्याला निमित्त ५ जून च्या जागतिक पर्यावरण दिनाचे असू शकते. निनाद यांनी म्हंटल्याप्रमणे कुठेतरी इंग्लिशमध्ये अशा प्रकारचा लेख प्रसिद्ध झालाही असेल कदाचित पण त्यामुळे केवळ लेख बिनमहत्वाचा ठरत नाही. आणि तरीही लेखातील मुद्दे पटले नसल्यास त्याचे मुद्देसूदपणे खंडन केले जावू शकते.
२)

हे सगळे पेन्सिल पुशर्स स्वतः काहीही करत नाहीत. फक्त तुमचे आयुष्य कसे वाईट होणार आहे. हा निराशावद मनात भरण्यात मात्र तत्पर असतात

सत्य परिस्थिती माहित करुन घेणे त्याबद्दलची माहिती इतरांना याला निराशावाद म्हणावे का ? उद्द्या माझ्या घराच्या छताला ओल लागलीये ही दिसून आले , पुढे अधिक गळती लागण्याची शक्यता निर्माण झाली तर मी निराशावद नको म्हणत त्याकडे दुर्लक्ष करावे की उपाययोजना चालू कराव्यात ?

sunil kachure's picture

15 Jun 2022 - 5:12 pm | sunil kachure

अगदी योग्य उत्तर
१)पर्यावरण म्हणजे का
२)निसर्ग चक्र म्हणजे काय
३)माणसाला जगण्यास सर्वात महत्वाच्या गोष्टी कोणत्या
पैसा,हिरे,संपत्ती नाही ..ह्या सर्व फालतू गोष्टी आहेत
ऑक्सिजन,शुध्द पाणी,अन्न, योग्य तापमान हे माणसाला जगण्यास अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत ,हे सर्व नसेल तर संपत्ती,पैसा, माणसाला एक मिनिट पण जिवंत ठेवू शकत नाही.

पर्यावरण,निसर्ग त्याचे महत्व फक्त स्वतःची बुद्धी आहे,जो ह्या पृथ्वी वर प्रेम करतो आणि फालतू स्वार्थ ह्याच्या मनात नाही तोच मानव हे पर्यावरण,निसर्ग ह्याचे महत्व समजू शकतो .

कॉमी's picture

15 Jun 2022 - 6:17 pm | कॉमी

आत्ता गणपती आहे, का हे संस्थळ लोकसत्ता आहे इथे हा प्रतिसाद द्यायला ?!

निनाद's picture

16 Jun 2022 - 5:03 am | निनाद

जाम हसलो!
नेमके शब्द लिहिल्याबद्दल धन्यवाद!

कर्नलतपस्वी's picture

15 Jun 2022 - 6:32 am | कर्नलतपस्वी

स्वसंरक्षण आणी पुनर्जीवन हे निसर्गाचे दोन मुख्य गुणधर्म आहेत व त्या नियमा प्रमाणे प्रकृती आपले स्वस्थ जपत आसते.ते जपत असताना कधी कधी टोकाची भूमीका घेऊ शकते.जसे सुनामी,वर्षातून वगैरे, त्यामुळेच जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होतो.

पूर्वजांनी हे ओळखून निसर्ग पुजा व धर्म ,सामाजिक चालीरीती यांची सांगड घातली आहे.

उत्तर भारतात श्रावणात हरियाली तीज या सणाला वृक्षारोपण हा एक मोठा सोहळा आसतो.

आसे मला वाटते.

साहना's picture

15 Jun 2022 - 1:15 pm | साहना

> विनाशकारी जागतिक तापमानवाढीचे महा-अरिष्ट येऊ घातले आहे. औद्योगिक क्रांतीनंतर ‘विकासा’सोबत वाढत गेलेल्या कर्बवायू-उत्सर्जनामुळे भारतात आणि इतर काही ठिकाणी आता जागतिक तापमान एक अंश सेंटिग्रेडने वाढले आहे.

ह्या विषयावर मी इथे आणि इतर ठिकाणी विपुल लेखन केले आहे. ह्या प्रकारचे अवाजवी भीती पसरवणारे लेखन आणि "तज्ञ" मते वारंवार माध्यमातून पसरवली जातात. मजेची गोष्ट म्हणजे हा बागुलबुवा फारच जुना म्हणजे किमान ४० वर्षे जुना आहे. ह्यांची बहुतेक भाकिते पूर्णपणे तोंडघशी पडली आहेत. ह्या आधी लोकसंख्या विस्फोट, ओझोन लेयर गायब होणे इत्यादी बागुलबुवे येऊन गेले. आता "तापमान वाढ" हा बागुलबुवा निर्माण झाला आहे आणि त्याच्या असून आधुनिक वसाहतवाद पसरवला जात आहे.

पर्यावरण रक्षण, सर्व गोष्टी काटकसरीने वापरणे, कुठल्याही गोष्टीला वाया जाऊ न देणे, वृक्ष आणि प्राणिजगताशी चांगले संबंध ठेवून राहणे इत्यादी गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तापमान बदल हो किंवा ना हो, आपण ह्या पृथ्वीवर जबाबदार पणे वागणे महत्वाचे आहे. पण त्याच वेळी कुणी तरी अतिशय टोकाची माहिती पसरवत असेल तर त्याच्याकडे संशयास्पद नजरेने पाहणे आवश्यक आहे.

युक्रेन-रशियन युद्धांतून रशियाने कश्या प्रकारे युरोप मध्ये पर्यावरणवादी संघटनांना हाताशी धरून आपला अजेंडा पुढे रेटला हे आपण पहिले आहे. भारतांत सुद्धा चर्च तसेच शांतताप्रिय समाज ह्यांनी विविध ठिकाणी महत्वाच्या आणि काही ठिकाणी राष्ट्रीय सुरॆषेच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पना पर्यावरणाचा विषय घेऊन कसा खो घातला आहे हे सुद्धा आपण पहिले आहे. मेधा पाटकर किंवा पूर्वीं केजरीवाल ह्यांनी आपली राजकीय खेळी पर्यावरण संबंधित विषयांना हाताशी धरूनच केली. मेधा पाटकर ह्यांचे नर्मदा आंदोलन फुसके निघाले. श्री लंका हे एक ज्वलंत उदाहरण आहे. ऑर्गेनिक च्या नदी लागून देशांत खायचे वांधे झाले.

अमेरिकेत प्रचंड प्रमाणात शेतजमीन हि इथेनॉल साठी लागणाऱ्या मक्याच्या निर्माणासाठी वापरली जाते. पेट्रोल मध्ये इथेनॉल टाकायची गरज नाही पण पर्यावरणाच्या नावाखाली कंपन्यांवर हि जबरदस्ती केली गेली. ह्यामुळे अन्नाचे भाव विनाकारण वाढले. आज युद्ध परिस्थितीत हीच जमीन अन्नासाठी वापरून इतर देशांना अन्नपुरवठा केला जाऊ शकला असता.

हवेंतील कार्बन वाढल्याने फक्त वाईट गोष्टी होतात असे नाही चांगल्या गोष्टी सुद्धा होतात. त्यामुळे वृक्षांची वाढ वेगाने आणि चांगली होते. शेतीला फायदा होतो.

फ्रीमन डायसन ह्या महाविद्वान भौतिकशास्त्रज्ञांचे विचार एका : https://www.youtube.com/watch?v=fmy0tXcNTPs

तर्कवादी's picture

15 Jun 2022 - 1:34 pm | तर्कवादी

"तापमान वाढ" हा बागुलबुवा निर्माण झाला आहे

तापमान वाढ हा बागुलबुवा म्हणायचा तर बदलते पर्जन्यमान, वाढते पूर, भूस्खलन, हिमस्खलन , ढगफूटी वा त्या सदृश घटना, चक्रीवादळे हे आपण अनुभवले ते खोटे म्हणायचे का ? २०२१ मध्ये भारतातील जवळपास प्रत्येक राज्याला पुराचा फटका बसला आहे. २०१० पुर्वी इतके व्यापक प्रमाणात पूर येत होते का ?

"तापमान वाढ" झालीच नाही असे आपणास म्हणायचे आहे की ? तापमान वाढीचे दुष्परिणाम फारसे नाहीत असे आपणास म्हणायचे आहे.

बदल हा वातावरणात नेहमीच होत राहिला आहे. हे बदल नेहमीच मानवी हस्तक्षेपाने होतात असे नाही तर नैसर्गिक कारणांनी सुद्धा होऊ शकतात. तथाकथित तापमानवाढीने पूर, वादळे वगैरे जास्त होतात आणि हे वाईट आहे असे सांगितले जाते.

तापमान वाढीने पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते त्यामुळे पाऊस जास्त पडतो.

आता हि गोष्ट वाईट आहे का ? तर हि गोष्ट चांगली असण्याची शक्यता जास्त आहे. जगांत बहुतेक ठिकांणी पाण्याची कमतरता आहे तिथे पाऊस जास्त पडणे हि चांगली गोष्ट आहे. हा बदल होणार असे गृहीत धरून आम्ही आमच्या शहरातींल पायाभूत सुविधा विकसित केल्या पाहिजेत नाही तर प्रत्येक वेळी मुंबईत गटारे तुंबली कि त्याचे खापर हवामान बदलावर फोडले जाते. ह्याच प्रमाणे वातावरण बदलणे जगांत ज्या विविध गोष्टी बदलत आहेत त्या फक्त "बदल" म्हणून पाहण्याची गरज आहे "संकट" म्हणून नाही. मानवासाठी आणि पृथ्वीसाठी हे बदल नवीन नाहीत.

"बागुलबुवा" अश्यासाठी शब्प्रयोग केला आहे कि तथाकथित हवामान तञ् अत्यंत बिनडोक पणे statistics वापरत आहेत. दररोज ५ पाकिटे सिगारेट फुंकणाऱ्याला ऑरगॅनिक खा म्हणजे कँसर होणार नाही असे सांगून फायदा आहे का ?

मानवजातीला अनेक संकटाना/बदलांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे हवामान बदलला "संकट" म्हणून पाहण्याआधी इतर सर्व संकटांचा आढावा घेतला पाहिजे. त्यांच्या तुलनेने हा तथाकथित हवामान बदल किती मोठा आहे हे पाहणे महत्वाचे आहे.

उदाहरण म्हणजे अमेरिकेतील येलोस्टोन ज्वालामुखी. हा अगदी कधीही म्हणजे उद्यासुद्धा फुटू शकतो आणि तो फुटला तर अर्धी अमेरिका बेचिराख होईलच पण त्यातून उत्पन्न होणाऱ्या राखेने संपुन मानवजातीचे अस्तित्व धोक्यांत येईल.

कोविडचेच उदाहरण पहा. काही कोटी लोक थेट ह्यांच्यामुळे मृत्युमुखी पडले तरी ह्याच्या आर्थिक परिणामांनी आणखीन कोट्यवधी लोक येत्या ३-५ वर्षांत मरणार आहेत.

हवामान बदलाने १० दशलक्ष लोक बेहगर होतील आशय प्रकारची आवई उठवली जाते. तथाकथित हवामान बदलाच्या भयाने पाश्चात्य राष्ट्रांनी आपले तेल खनन कमी केले. त्याचा परिणाम म्हणून रशियाची मुजोरी वाढली आणि त्यामुळे युद्ध उध्दभवले. ह्या युद्धांत असंख्य लोक मारले गेले आहेत आणि कोट्यवधी लोक बेघर आधीच झाले आहेत. एका अर्थाने ह्याचे खापर तथाकथित पर्यावरण वादी मंडळींवर फोडायला नको का ?

टीप : पर्यावरण रक्षणात आघाडीवर असणारी मंडळी उद लिओनार्दो, आलं गोर इत्यादी मंडळींनी आपले समुद्रकिनाऱ्यावरचे बंगले अजून तरी विकले नाहीत.

टीप २: आधी लिहिल्या प्रमाणे पर्यावरणाचे रक्षण आवश्यक आहे आणि आम्ही सर्वानी आपल्या परीने सर्व प्रकारचे कष्ट घेतले पाहिजेत. पण तारतम्य पाहिजे आणि तोडकाच्या भूमिका पसरवणार्यांना संशयास्पद नजरेने पाहणे गरजेचे आहे.

तर्कवादी's picture

17 Jun 2022 - 4:09 pm | तर्कवादी

म्हणजे तापमानवाढ होत आहे हे तुम्हाला मान्य आहे पण ते तितकेसे मोठे संकट नाही असे तुम्हाला वाटते.
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.

पण तारतम्य पाहिजे आणि तोडकाच्या भूमिका पसरवणार्यांना संशयास्पद नजरेने पाहणे गरजेचे आहे.

तारतम्य पाहिजे याबद्दल सहमत पण कुणाला तरी संशयास्पद नजरेने बघण्याची गरज आहे का ? त्या ऐवजी केवळ न पटणार्‍या मुद्द्यांचे खंडन करणे जास्त योग्य ठरेल.
मागच्या एका प्रतिसादात तुम्ही ओझोन लेयरचा उल्लेख केला. पण शास्त्रज्ञांनी वेळीच सावध केले आणि ओझोन लेयरला हानिकारक अशा रेफ्रिजरेंट वायूंचा (क्लोरो फ्लोरो कार्बन , हाय्ड्रो क्लोरो फ्लोरो कार्बन) उपयोग टप्प्याटप्प्याने कमी केला त्यामुळे धोका टळला.

ह्या युद्धांत असंख्य लोक मारले गेले आहेत आणि कोट्यवधी लोक बेघर आधीच झाले आहेत. एका अर्थाने ह्याचे खापर तथाकथित पर्यावरण वादी मंडळींवर फोडायला नको का ?

पण पर्यावरण्वाद्यांनी युद्ध करा असे सांगितले नव्हते ना. पर्यावरणवादी पर्यावरणाच्या दृष्टीने काय योग्य काय अयोग्य हे सुचवत राहतात. काय केल्याने भविष्यात काय घडू शकेल हे दाखवतात. पण योग्य प्रकारे निर्णय घेण्याचे काम सरकारांचेच आहे ना.
आपला निर्णय अर्थिक , राजकीय परिप्रेक्ष्यातून तपासून घ्यायला हवे. सहपरिणामांचा विचार करुन अंमलबजावणी करायला हवी. बाकी पर्यावरण वाद्यांचा कोणत्याही युद्धाला पाठिंबा असूच शकत नाही.

मानवजातीला अनेक संकटाना/बदलांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे हवामान बदलला "संकट" म्हणून पाहण्याआधी इतर सर्व संकटांचा आढावा घेतला पाहिजे. त्यांच्या तुलनेने हा तथाकथित हवामान बदल किती मोठा आहे हे पाहणे महत्वाचे आहे

.
काही अंशी सहमत. हा ही एक बदल असेल आणि पृर्थ्वी त्याला सामोरी जाईल, तो निभावून नेईल, जीवसृष्टीही टिकेल. अल्पायुषी प्रजातींचे म्युटेशन्स वेगाने होवून , उत्क्रांती होवून त्या प्रजाती बदलाशी लवकर जुळवून घेवू शकतील. पण मानवासारख्या दीर्घायुषी प्रजातींत उत्क्रांती व्हायला मोठा अवधी लागेल तोपर्यंत मानवाचे जीवन जास्त सघर्षमय असेल. अर्थात मानवानेही यापुर्वी संघर्ष केला आहे. पण गेल्या काही पिढ्यांत भौतिक पातळीवरचा संघर्ष वेगाने कमी होत गेला आहे. बहुसंख्य लोकांची खडतर आयुष्य जगण्याची सवय तुटली आहे.
आणि सर्वात महत्वाचा मुद्दा हा की जर आपण हे संकट प्रयत्नपुर्वक टाळू शकणार असू किंवा त्याची तीव्रता कमीत कमी ठेवणे आपल्याला शक्य होणार असेल तर त्या दृष्टीने विचार, नियोजन व कृती का करु नये ?
उपाययोजना अगदीच शक्य नसल्यास एखाद्या संकटांचा जास्त विचार करण्यात अर्थ नाही पण उपाययोजना शक्य असूनही एखाद्या संकटाकडे दुर्लक्ष करणे अयोग्य होईल.

उदाहरण म्हणजे अमेरिकेतील येलोस्टोन ज्वालामुखी. हा अगदी कधीही म्हणजे उद्यासुद्धा फुटू शकतो आणि तो फुटला तर अर्धी अमेरिका बेचिराख होईलच पण त्यातून उत्पन्न होणाऱ्या राखेने संपुन मानवजातीचे अस्तित्व धोक्यांत येईल.

हे माहित नव्हते, याबद्दल अधिक माहिती घेतो. पण हा फुटण्याची शक्यता किती आहे ?
तो लवकर फुटू नये किंवा फुटण्याची शक्यता कमीत कमी व्हावी म्हणून काही उपाययोजना शक्य आहेत काय ?

> पण पर्यावरण्वाद्यांनी युद्ध करा असे सांगितले नव्हते ना.

पर्यावरणवादी लोकांच्या बागुलबुव्याने जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे युद्धाची शक्यता वाढली. माझा मुद्धा असा आहे कि प्रत्येक निर्णयाचे प्राथमिक परिणाम असतात तसेच दुय्यम पातळीवरचे परिणाम सुद्धा असतात. बहुतेक तद्न्य मंडळी फक्त प्राथमिक परिणाम काही अंशी पाहू शकतात पण दुय्यम स्तरावरचे परिणाम है त्यांच्या शक्तीच्या पलीकडले असतात. विनाकारण सौर, पवन ऊर्जेच्या मागे धावणे, जबरदस्तीने तेल वापर कमी करणे, नको तिथे टॅक्स वाढवणे, ESG हे प्रकार जे ह्या बागुलबुव्याने निर्माण झाले आहेत त्यामुळे असंख्य लोक आत्ताच काही वर्षांत मरणार आहेत.

ओझोन लेयर चा बागुलबुवा खोटा होता. आम्ही बागुलबुवा निर्माण केला म्हणून संकट आले नाही असे हि मंडळी म्हणतील पण प्रत्यक्षांत संकट नव्हतेच, आणि ह्यांची भाकिते ऐकली असती तर ती एकदम पराकोटीची होती. ती अंशतः सुद्धा खरी ठरली नाहीत. मॉन्ट्रिअल मध्ये करार झाला तेंव्हाच ओझोन अचानक वाढू लागला, CFC च्या वापरत मोठे बदल येण्याच्या आधीच अचानक ओझोन वाढू लागला. त्याशिवाय ओझोन च्या कमतरतेमुळे पृथीववर जास्त UVB येतील हे सुद्धा भाकीत खोटे ठरले.

पर्यावरण महत्वाचे आहे आणि त्यामुळे आम्ही त्याच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत ह्या मुद्द्यावर आम्हा दोघींचे एकमत होईल. फक्त इतके मला म्हणायचे आहे कि हे तथाकथित तञ् जी भाकिते करत आहेत आणि जे तोडगे सुचवत आहेत ते बरोबर आहेत असे आपण गृहीत धरू शकत नाही.

भारतांत असंख्य महिला लाकूड किंवा शेणी जाळून अन्न बनवायच्या. ह्यांना LNG (नैसर्गिक वायू) दिल्यास त्यांचे आरोग्य सुधारेल. त्याशिवाय हवामानातील एकूण CO२ कमी होईल. पण बहुतेक पर्यावरण वादी LNG किंवा केरोसीन वर जास्त कर किंवा एकदम बंदीची मागणी करत आहेत. कारण ह्या लोंकाना फक्त आपले प्राथमिक परिणाम दिसतात, मानवी समाज किती क्लिष्ट आहे आणि कुठल्या निर्णयाचे काय परिणाम होतील हे जाणून घेण्याची त्यांची (किंवा इतर कुणाची) कुवत नाही.

अमेरिकेने एकीं २२% CO२ उत्सर्जन कमी केले. हे LNG मुळे साध्य झाले, सौर किंवा nuclear मुळे नाही. बहुतेक पर्यावरण वाद्यांना ह्याची अजिबात अपेक्षा नव्हती आणि ह्या मंडळींनी आधीपासून शेल गॅस, फ्रॅकिंग ह्याला कडाडून विरोध केला आहे.

> हे माहित नव्हते, याबद्दल अधिक माहिती घेतो. पण हा फुटण्याची शक्यता किती आहे ?
> तो लवकर फुटू नये किंवा फुटण्याची शक्यता कमीत कमी व्हावी म्हणून काही उपाययोजना शक्य आहेत काय ?

काहीही करणे शक्य नाही. हा कधीही फुटू शकतो.

तुषार काळभोर's picture

17 Jun 2022 - 4:31 pm | तुषार काळभोर

पर्यावरण बदलाच्या बाबतीत माझे वैयक्तिक मत असेच असल्याने वरील प्रतिसादाशी सहमत. पृथ्वीच्या शेकडो कोटी वर्षांच्या वयात जे वातावरण आणि पर्यावरणात बदल झालेत, त्यात तीनशे वर्षांच्या मानवी हस्तक्षेपाने होणाऱ्या बदलांचा हिस्सा कणभरही नसेल.
नदीचे प्रवाह बदलल्याने सिंधू संस्कृती विलुप्त झाली. (किंवा जे काही झालं असेल ते) त्यामुळे काही लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले. कदाचित ते नष्ट सुद्धा झाले असतील. त्यात तर काहीच मानवी हस्तक्षेप नव्हता. थोडक्यात मानवी हस्तक्षेपाशिवाय सुद्धा वातावरणीय आणि पर्यावरणीय बदल होत असतात. आपण निसर्गाचं फार काही वाटोळं करतोय अशातला भाग नाही.
याचं अजून एक उदाहरण : गणपती मूर्ती. आकडे अंदाजे आहेत, पण लॉजिक (पन इंटेंडेड) समजण्यासाठी पुरेसे आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून लोकसंख्या चाळीस लाखाच्या आसपास. कुटुंबे आठ लाख. मराठी हिंदू पाच लाख. तीन लाख घरात गणपती मूर्ती आणतात असं गृहीत धरू. एका मूर्तीचं सरासरी वजन तीन किलो. एकूण मूर्ती वजन नऊ लाख किलो. पूर्णांक दहा लाख किलो. एक हजार टन.
पन्नास ट्रक भरून माती. याच्या कित्येक पट माती आणि गाळ मुळा मुठा , पवना आणि इंद्रायणी नद्या जुलै ऑगस्ट मध्ये रोज वाहून नेतात.

दुसरी एक गोष्ट.
माणूस आणि निसर्ग असं नेहमी द्वैत केलं जातं. माणूस हा निसर्गाचाच भाग आहे, हे विसरतात लोक.
समजा एखाद्या माकडाच्या, वाघाच्या, कोंबडीच्या, गोगलगायीच्या चुकीने अमेझॉन जंगल जळून नष्ट झाले आणि त्यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणावर (मानवासाठी) प्रतिकूल परिणाम झाला, तर ....? किंवा या सगळ्या प्राण्यांच्या वागण्यामुळे निसर्गावर जो (मानवासाठी प्रतिकूल) परिणाम होतो त्याचा विचार कोणत्या पर्यावरणीय अभ्यासात केला जातो?

कार्बन उत्सर्जनामुळे (कदाचित) तापमान वाढून समुद्र पातळी वाढल्याने अनेक लोकांना कदाचित विस्थापित व्हावे लागेल. पण उत्सर्जन कमी करताना भारतातील इंधन वापरावर बंधने आल्याने कोट्यवधी लोकांच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम होईल त्याचं काय?

मानवी हस्तक्षेपाने पर्यावरणात फार मोठे बदल घडून येवू शकत नाही असे वाटत असल्यास अरल समुद्राचे उदाहरण बघा.
१९६० च्या दशकामध्ये सोव्हिएत संघाने अरल समुद्राला मिळणाऱ्या अनेक नद्या सिंचनासाठी इतरत्र वळवल्या. ह्या कारणास्तव एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या सरोवरांपैकी एक असणारा अरल समुद्र घटत चालला आहे. २००७ सालाअखेरीस ह्या सरोवराच्या मूळ आकाराच्या केवळ १० टक्केच पाणी अस्तित्वात आहे. ह्यामुळे येथील मच्छीमारी व्यवसाय पूर्णपणे उध्वस्त झाला आहे

याचे परिणामः
या समुद्राच्या आसपासचे वातावरण बदलले,. उन्हाळा कडक आणि हिवाळा अतिथंड बनला.. समुद्राची जमीन जी आता कोरडी आहे, ती खारट बनली आहे. वारे वाहताना आपल्याबरोबर येथील मीठयुक्त रेती घेऊन जातात. ही रेती शेजारील मोठ्या जमिनींवर पसरत जाऊन जमिनी क्षारयुक्त बनल्या आहेत. त्यामुळे शेतीचे उत्पन्‍न घटत आहे व त्याचा दर्जा घसरत आहे. शेतकरी (अज्ञानापोटी आणि दीर्घदृष्टीने विचार न करता) क्षाराचा परिणाम कमी करण्यासाठी शेताला जास्त पाणी देताहेत. त्यामुळे शेते अजूनच खारट बनत आहेत. श्वासावाटे क्षार शरीरात गेल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

(संदर्भ)

आग्या१९९०'s picture

17 Jun 2022 - 6:34 pm | आग्या१९९०

नदीजोड प्रकल्प हे पण हवामान बदलाला कारणीभूत आहेत.

तुषार काळभोर's picture

18 Jun 2022 - 7:32 pm | तुषार काळभोर

सिंधू संस्कृतीचे उदाहरण पाहा. सिंधू संस्कृती विलुप्त झाली ती नदीचा प्रवाह बदलल्याने.
तिथे कोणताही मानवी हस्तक्षेप नव्हता. (किंवा नसावा. Conspiracy theory वाल्यांकडे त्याचीही एखादी गोष्ट असेल).
सहारा वाळवंटाचे उदाहरण पाहा. आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट काही हजार वर्षांपूर्वीपर्यंत आताच्या तुलनेत जास्त ओलावा असलेले क्षेत्र होते. सहारा वाळवंटाच्या उत्तरेस असलेल्या अल्जीरिया देशाच्या दक्षिणेतील प्रदेशात, जो सहाराच्या अंतर्गत भागात येतो, तिथे काही भित्तीचित्रांत मगरी आहेत. त्याशिवाय काही dinosaurs चे जीवाश्म वाळवंटात सापडले आहेत. म्हणजे कोट्यवधी वर्षांपासून ते काही हजार वर्षांपूर्वीपर्यंत त्या प्रदेशात पुरेसा पाऊस व्हायचा. जमिनीवर वनस्पती होत्या. मानवी हस्तक्षेपाशिवाय आज तिथे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
पृथ्वीवर सुरुवातीला वातावरणात ऑक्सिजन नव्हता म्हणे. तेव्हा जे काही जीव होते ते मिथेन, नायट्रोजन वापरून जगायचे. मग कोठून तरी काही जीव आले, जे दणादण ऑक्सिजन निर्माण करू लागले. त्यांनी इतका ऑक्सिजन निर्माण केला की तोपर्यंत अस्तित्वात असलेले जीव तितका ऑक्सिजन सहन करू शकले नाहीत. त्यांच्याकरता तो विषारी वायू होता. पण त्यातूनच पुढे उत्क्रांती मार्गे आपण आता आहोत तिथे पोहचलो आहोत.

अजून एक वाचलं आहे. आता संदर्भ उपलब्ध नाही, पण स्रोत विश्वसनीय होता. एखाद्या शहराच्या मध्यभागी हवेत जितका ऑक्सिजन असतो आणि अमेझॉनच्या जंगलात मध्यभागी दिवसा जितका ऑक्सिजन असतो, त्यात काही ppm (दहा लाख भागात काही कण) इतका फरक असतो.

पृथ्वीवर मागील ४२० कोटी वर्षात आलेली सर्वात मोठी संकटे मानवी हस्तक्षेपाशिवाय आली आहेत. तरी पृथ्वी तिथेच आहे, वातावरण तिथेच आहे, पर्यावरण तिथेच आहे आणि जीवसृष्टी तिथेच आहे.

तर्कवादी's picture

18 Jun 2022 - 11:19 pm | तर्कवादी

पृथ्वीवर मागील ४२० कोटी वर्षात आलेली सर्वात मोठी संकटे मानवी हस्तक्षेपाशिवाय आली आहेत

मानवी हस्तक्षेपामुळे नवीन संकटे येण्याचा वेग वाढतो आहे. आणि ही संकटे सहन करणे मानवालाच कठीण जाईल हे पण महत्वाचे

निनाद's picture

16 Jun 2022 - 5:10 am | निनाद

ह्यांची बहुतेक भाकिते पूर्णपणे तोंडघशी पडली आहेत. ह्या आधी लोकसंख्या विस्फोट, ओझोन लेयर गायब होणे इत्यादी बागुलबुवे येऊन गेले. आता "तापमान वाढ" हा बागुलबुवा निर्माण झाला आहे आणि त्याच्या असून आधुनिक वसाहतवाद पसरवला जात आहे.

अतिशय टोकाची माहिती पसरवत असेल तर त्याच्याकडे संशयास्पद नजरेने पाहणे आवश्यक आहे.
हेच सत्य दाखवले की समर्थक लोक अचानक आंधळेच होऊन जातात असा अनुभव आहे. :)
मग हे लोक अनेकदा अंगावर पण धावून येतात. किंवा हे फोल आहे मिथ्या आहे. पर्यावरणवादी संघटनांना हाताशी धरून वेगळाच अजेंडा पुढे रेटला जातो हे दाखवून देणाराच 'डिस्क्रेडिट' करण्याचे प्रयत्न होतात. त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले सुरू केले जातात.

वर प्रतिसादात हे सहजतेने दिसून येते आहे.

मी सीएसटीम वरून ठाणे साठी लोकल ट्रेन पकडली
दोन्ही सीट मध्ये कोणी तरी संडास केली होती.
पाहिले स्टेशन गेले जागा रिकामी होती सर्व शी शी करून त्या सीटवर बसले नाहीत
दादर मध्ये सर्व सीट पॅक झाल्या .
पर्याय उपलब्ध नव्हता.
लोक त्या संडास वर पाय ठेवून त्या सीटवर बसली
काही तत्व नाहीत,काही स्वतःचे विचार नाहीत.
फक्त स्वार्थ
मी त्यांच्या लक्षात आणून दिले तरी ती लोक काही तेथून उठले नाहीत.
.अनेक इमारती मध्ये पाणी वाहून जाते .कोणाला काही पडलेली नसते.
पण दोन दिवस पाणी आले नाही तर गटार चे पाणी पण पितील.
पण सुधारणार नाहीत.
भारतीय लोक पर्यावरण साठी काहीच करू शकणार नाहीत
अपेक्षा ठेवू नका.

sunil kachure's picture

15 Jun 2022 - 1:48 pm | sunil kachure

सहना सारखे अती शाहने जगात खूप आहेत.
त्यांचे आयुष्य तर गेले.
कारण वातावरणात आज पण २५% ऑक्सिजन आहे,आज पण माणसाची खोगीर भरती चे पोट भरण्या इतका पावूस आणि अन्न धान्य पिकते.
त्या मुळे सर्व मिळत आहे.
म्हणून sahana सारखे विचार करणारे जिवंत आहेतं
निसर्ग बदलला तर माणूस काही ही करू शकणार नाही.
माणसाची exist जवळ आलेली आहे.
Sahana सारख्या विचार करणाऱ्या लोकांना सहार चे वाळवंट मध्ये शिफ्ट केले तर च खरी झळ पोचेल आणि सर्व निसर्गाचे देणे स्वतः वापरून ऐश करून निसर्गावर वर च उलटनारे विचार मेंदूत येणार नाहीत

1) जल स्तर खोल जात आहे.

त्याला पाण्याचा उपसा हे कारण नाही.

उपसा केल्या मुळे जल स्तर खोल जात आहे हे अशास्त्रीय कारण आहे.
सामान्य लोकांवर नियंत्रण ठेवून त्यांना दोषी ठरवण्याचे..
आणि पाण्यावर उद्योगपती ह्या अती स्वार्थी लोकांचा हक्क स्थापित करण्याचा.
खरे कारण आहे जल भरणी होत नाही.
काँक्रिट ची जंगल उभी राहिली त्या मुळे पाणी वाहून जात आहे.
जमिनीत मुरत नाही वृक्ष तोड प्रचंड आहे.वृक्षाची मुळ पाणी धरून ठेवतात आणि जमिनीत ते पाणी मुरावतात.
ह्या सर्व जल भरणी चे मार्ग बंद झाले आहेत.
फडणवीस सरकार नी अमीर खान ला बरोबर घेवून छान योजना आखली .
खड्डे खणले,बांध घातले त्या मुळे जलस्तर वाढला हे सत्य आहे.
२) गोड्या पाण्याचे जे मूळ source आहेत.
त्या नद्या.
फालतू आयएएस ऑफीसर बिनडोक राजकीय नेते ह्या मुळे कित्येक शहरांचे सांड पाणी नदीत सोडले जाते .खूप अमूल्य असा नैसर्गिक खजिना त्या मुळे खराब होतो.
Ai वर आधारित आयएएस ऑफिसर हवा आणि थोडा तरी देशावर प्रेम करणारा
नेता हवा.
३)गंगा,यमुना ह्या महत्वाच्या नदी ची पूर्ण वाट लागलेली आहे.
४) उद्योगपती पती त्यांचे chemical युक्त सांडपाणी नदीत सोडतात.
मूर्ख नेते आणि स्वार्थी प्रशासन ह्यांच्या कृपेने.
५) डिझेल,पेट्रोल आता बंद होणे गरजेचे आहे .
पर्यायी इंधन व्यवस्था होणे खूप गरजेची आहे.

गावचे सांडपाणी नदीत सोडायचे हे ज्याने रुजवले त्या महात्म्याला लाख सलाम.
या एकाच विचाराने नद्यांची पूर्ण वाट लागली आहे.
बहुतेक सर्वच महापालीकांनी याचा पूरेपूर वापर करत सांडपाण्याची स्वतःची जाबाबदारी ढकलून दिली आहे.
पुण्यात तर मुळा मुठा नद्यांची गटारे पालिकेने स्वतःच केली आहेत. त्यात भर म्हणून की काय नद्यांचे तळ सिमेंट ने भरुन टाकले आहेत.
सिमेंटचे रस्ते हे वापरायला चांगले असले तरी पर्यावरणासाठी वाईट आहेत. त्यामुळे पाणी मुरणे पूर्ण बंद होते.
पण कोणीच हे मुद्दे पुढे आणत नाही

तर्कवादी's picture

16 Jun 2022 - 3:44 pm | तर्कवादी

गावचे सांडपाणी नदीत सोडायचे हे ज्याने रुजवले त्या महात्म्याला लाख सलाम.
या एकाच विचाराने नद्यांची पूर्ण वाट लागली आहे

इकडे चिंचवडमध्ये पालिकेने काही ठिकाणी पुलांवर वगैरे उंच जाळ्या बसवल्या आहेत तसेच बाजूला निर्माल्य कुंड ठेवले आहेत , अपेक्षा ही की लोकांनी निर्माल्य नदीत टाकू नये पण तरीही काही महाभाग जाळ्याच्या वरुन हवेत उंच फेकून निर्माल्य नदीतच टाकतात ते ही प्लॅस्टीकच्या पिशवीतून.

पुण्यात तर मुळा मुठा नद्यांची गटारे पालिकेने स्वतःच केली आहेत. त्यात भर म्हणून की काय नद्यांचे तळ सिमेंट ने भरुन टाकले आहेत.

सर्व सरकारी अधिकार्‍यांना (आता कामावर असलेले व नव्याने रुजू होणारे) अतिशय विस्तृत व खोलवर असे पर्यावरण विषयक प्रशिक्षण द्यायला हवे. म्हणजे यातल्या किमान दहा टक्के अधिकार्‍यांची जरी मानसिकता बदलली आणि ते पर्यावरणाचा विचार प्राधान्याने करत कामांना परवानगी देवू लागले तर काहीतरी सुधारणा होईल. सर्व लोकप्रतिनिधिनांही असे प्रशिक्षण सातत्याने द्यायला हवे.

सिमेंटचे रस्ते हे वापरायला चांगले असले तरी पर्यावरणासाठी वाईट आहेत. त्यामुळे पाणी मुरणे पूर्ण बंद होते.
पण कोणीच हे मुद्दे पुढे आणत नाही

तस पाहिलं तर कोणतीही भूमी ज्यावर इमारती उभ्या आहेत तेवढे क्षेत्रफळ पाणी मुरण्यास अनुपलब्ध असणारं. पण रेन वॉटर हार्वेस्टींग (मराठी शब्द ?) सारख्या उपाययोजनांतुन याची भरपाई किंबहूना अधिकच भरपाई करता येवू शकते. मोठ्या रस्त्याच्या कडेला पाणी मुरण्याकरिता कृत्रिम व कार्यक्षम व्यवस्था तयार केल्या जावू शकतात. बहूधा समृद्धी महामार्गात ही योजना केली आहे.

1) जल स्तर खोल जात आहे.

त्याला पाण्याचा उपसा हे कारण नाही.

उपसा केल्या मुळे जल स्तर खोल जात आहे हे अशास्त्रीय कारण आहे.
सामान्य लोकांवर नियंत्रण ठेवून त्यांना दोषी ठरवण्याचे..
आणि पाण्यावर उद्योगपती ह्या अती स्वार्थी लोकांचा हक्क स्थापित करण्याचा.
खरे कारण आहे जल भरणी होत नाही.
काँक्रिट ची जंगल उभी राहिली त्या मुळे पाणी वाहून जात आहे.
जमिनीत मुरत नाही वृक्ष तोड प्रचंड आहे.वृक्षाची मुळ पाणी धरून ठेवतात आणि जमिनीत ते पाणी मुरावतात.
ह्या सर्व जल भरणी चे मार्ग बंद झाले आहेत.
फडणवीस सरकार नी अमीर खान ला बरोबर घेवून छान योजना आखली .
खड्डे खणले,बांध घातले त्या मुळे जलस्तर वाढला हे सत्य आहे.
२) गोड्या पाण्याचे जे मूळ source आहेत.
त्या नद्या.
फालतू आयएएस ऑफीसर बिनडोक राजकीय नेते ह्या मुळे कित्येक शहरांचे सांड पाणी नदीत सोडले जाते .खूप अमूल्य असा नैसर्गिक खजिना त्या मुळे खराब होतो.
Ai वर आधारित आयएएस ऑफिसर हवा आणि थोडा तरी देशावर प्रेम करणारा
नेता हवा.
३)गंगा,यमुना ह्या महत्वाच्या नदी ची पूर्ण वाट लागलेली आहे.
४) उद्योगपती पती त्यांचे chemical युक्त सांडपाणी नदीत सोडतात.
मूर्ख नेते आणि स्वार्थी प्रशासन ह्यांच्या कृपेने.
५) डिझेल,पेट्रोल आता बंद होणे गरजेचे आहे .
पर्यायी इंधन व्यवस्था होणे खूप गरजेची आहे.

dadabhau's picture

15 Jun 2022 - 5:04 pm | dadabhau

sunil kachure ह्या आयडी च्या डोक्यात fault आहे असे जाणवते...अजूनही कुणाला तसं वाटतं का?

शाम भागवत's picture

16 Jun 2022 - 11:53 am | शाम भागवत

मला अजिबात तसे वाटत नाही.
कारण मी त्यांच्या पोस्ट वाचतच नाही.
:))

तुम्ही इतरांना सुधरवू शकत नाही.
पण
तुम्ही तुमच्यात बदल करू शकता.
;)

स्वधर्म's picture

15 Jun 2022 - 6:17 pm | स्वधर्म

प्रथमत: लेखाबद्दल तर्कवादी यांचे आभार. लेख लिहून आपली जनता सुधारली असे होणार नाही, पण जे काही करू पाहतात त्यांना तरी निदान आपण काही चांगले करतो आहोत याची पावती मिळते. विषय खूप मोठा आहे आणि पर्यावरण रक्षण ही मानवाची खरी जबाबदारी आहे इथपासून ते हा एक बागुलबुवा आहे इथपर्यंत सर्व मते यात आहेत. खूप दिवसांपूर्वी मायकेल क्रिच्टन या लेखकाचे ‘स्टेट ऑफ फिअर’ हे पर्यावरणवादी अतिरेकी याविषयीचे पुस्तक वाचले होते, आणि याकडे अशाही दृष्टीने पाहणारे आस्तित्वात असल्याचा शोध लागला होता. असो.
तापमानवाढीचे सर्वात मोठे कारण कोणते, हे बर्याच लोकांना माहित नसते. वाहने, औद्योगिकरण, शहरीकरण, जंगलाचा र्हास इ. गोष्टी मुख्यत्वे यासाठी जबाबदार असाव्यात असाच सार्वत्रिक समज असतो. तथापि तापमानवाढीचे सर्वात मोठे कारण मांसाहार हे आहे, हे संशोधनाने सिध्द झालेले आहे. संदर्भ शोधून देऊ शकेन. मानवाच्या पोषणासाठी जी शेती लागते, त्यात प्राण्यांचे पोषण करणे आणि प्राणी खाणे हे तापमानवाढीला सर्वाधिक जबाबदार आहे, आणि आपली लोकसंख्या आधिकाधिक मांसाहाराकडे वळत आहे.

तर्कवादी's picture

15 Jun 2022 - 7:47 pm | तर्कवादी

प्रथमत: लेखाबद्दल तर्कवादी यांचे आभार

धन्यवाद स्वधर्म जी.

लेख लिहून आपली जनता सुधारली असे होणार नाही, पण जे काही करू पाहतात त्यांना तरी निदान आपण काही चांगले करतो आहोत याची पावती मिळते

बरोबर.. पण निदान सर्वप्रथम या विषयातले जास्तीत जास्त पैलू, मुद्दे चर्चिले जावे व ज्ञानात भर पडावी (किंवा अज्ञान दूर व्हावे असेही म्हणू शकतो) हे महत्वाचे. लोक पर्यावरणाबद्दल बोलू लागले, प्राधान्याने विचार करु लागलेत की तो विषय ट्रेण्डिंग होईल आणि राजकारण्यांनाही त्यात तातडीने लक्ष घालावे लागेल.. आधी आपण पर्यावरणाला पुरेसे फुटेज तरी देवूयात (सध्या राजकारणाला देतोय तितके तरी किमान)

तथापि तापमानवाढीचे सर्वात मोठे कारण मांसाहार हे आहे, हे संशोधनाने सिध्द झालेले आहे.

हे कसे ? अधिक विस्ताराने सांगू शकता का ? हे जर खरे असेल तर मला माझ्या शाकाहारी असण्याचा अधिकच अभिमान वाटू लागेल.

हे दोन प्रकारे सांगता येईल. पहिले म्हणजे सामान्यज्ञान आणि दुसरे शास्रीय संशोधन. सामान्य ज्ञानानुसार जायचे तर आपण एका कोंबडीचे उदाहरण घेऊ. एक कोंबडी एका माणसाला अन्न म्हणून किती पुरेल? साधारण त्याची दोन वेळची किंवा तीन वेळची भूक एका कोंबडीतून भागू शकेल. आता कोंबडी कापण्याएवढी मोठी होईपर्यंत तिने किती धान्य खाल्ले असेल याचा विचार करू. अंदाजे ९० दिवस पाळल्यावर ती कापली असे मानले व रोज तिला खायला पाव किलो धान्य लागते; असे समजले तर २२.५ किलो धान्य तरी तिने खाल्ले असणार. एवढ्या धान्यावर माणूस किती दिवस भूक भागवू शकेल? निदान १०-१५ दिवस तर सहजच. हीच आकडेमोड जर शेळी, गाय इ. वरच्या स्तरातील प्राण्यांसाठी केली, तर याहून मोठा फरक पडतो. यात जमिनीचा वाढीव वापर, जनावराचा मिथेन, वाहतूक इ. मुळे झालेले अधिक उत्सर्जन धरलेलेच नाही. त्यामुळे तुंम्ही शाकाहार करून फार तापमानवाढ रोखण्यासाठी खूप मदत करत आहात, याचा आनंद मानायला आजिबात हरकत नाही. आकडे ढोबळ आहेत, पण तत्व समजण्यासाठी नक्कीच पुरेसे अचूक आहेत.

शास्रीय संशोधन तर यावर खूप झालेलेच आहे. सहज गुगल केले तरी अनेक संदर्भ मिळतील.
खालील संदर्भानुसार हरितवायू उत्सर्जनातील २५% हा वाटा केवळ अन्न उत्पादनासाठी जमिनीचा वापर याचा आहे, तर वीज निर्मिती २५%, औद्योगिकरण २१%, वाहतूक १४% इमारती ६% व इतर सर्व १०% आहे. म्हणून हे तापमानवाढीचे सर्वात मोठे कारण आहे. पण अन्न उत्पादन तर आपण थांबवू शकत नाही. म्हणून मग त्यातला मांसाहाराचा परिणाम कसा आहे हे पहावे लागेल.
https://globalecoguy.org/the-three-most-important-graphs-in-climate-chan...

या दुसर्या संदर्भात मुख्यत्वे औद्योगिक रित्या प्राणी उत्पादन करण्यामुळे कसे हरित वाय़ू उत्सर्जन वाढते व त्याचा तापमानवाढीतील वाटा किती आहे हे सिध्द करण्यात आलेले आहे. बीबीसीच्या लेखानुसार एकून अन्न उत्पादनाचा उत्सर्जनातील वाटा २६%, त्या २६%तील ५८% वाटा हा प्राणिज पदार्थांचा व त्यातील ५०% वाटा हा शेळ्या, मेंढ्या व गाय यांच्या पदार्थांचा आहे. हा लेख आयपीसीसीच्या संशोधनावर आधारित आहे.
https://www.bbc.com/news/science-environment-49238749

तिसरा एक संदर्भ सायंटिफिक अमेरिकन या विख्यात मासिकातील आहे. त्यानुसार बीफ खाण्यामुळे चिकन खाण्यापेक्षा १३ पट (टक्के नव्हे) अधिक उत्सर्जन होते, तर बटाटा खाण्यामुळे झालेल्या उत्सर्जनापेक्षा ते ५७ पट अधिक आहे. एका साधारण अमेरिकन माणसाच्या बीफ खाण्यामुळे एक कार १८०० मैल (२९०० किमी) चालवण्याइतके हरितवायू उत्सर्जन होते.
https://www.scientificamerican.com/article/the-greenhouse-hamburger/

म्हणून मांसाहार हे तापमानवाढीचे सर्वात मोठे व महत्वाचे कारण आहे, हे वरील संदर्भावरून स्पष्ट झाले आहे.

तर्कवादी's picture

16 Jun 2022 - 3:17 pm | तर्कवादी

तिसरा एक संदर्भ सायंटिफिक अमेरिकन या विख्यात मासिकातील आहे. त्यानुसार बीफ खाण्यामुळे चिकन खाण्यापेक्षा १३ पट (टक्के नव्हे) अधिक उत्सर्जन होते, तर बटाटा खाण्यामुळे झालेल्या उत्सर्जनापेक्षा ते ५७ पट अधिक आहे. एका साधारण अमेरिकन माणसाच्या बीफ खाण्यामुळे एक कार १८०० मैल (२९०० किमी) चालवण्याइतके हरितवायू उत्सर्जन होते.

हे भयंकरच म्हणावं लागेल. हा विषय का चर्चिला जात नाही ते कळत नाही. बहूधा हा विषय घेतला तर त्यावर धार्मिक गोष्टी जोडल्या जावून प्रचंड विरोध होण्याची भिती वाटत असावी.
निदान जागतिक वसुंधरा परिषद वा पर्यावरण विषयक इतर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय बैठकांच्या वेळेला फक्त शाकाहारी भोजन दिले जावून एक उदाहरण घालून द्यावे.
थेटपणे मांसाहार कमी करा वा करु नका असा प्रचार करणे शक्यच नाही पण शाकाहारी पदार्थांना "पर्यावरणपूरक" (इको फ्रेंडली वा एन्व्हाय्रोन्मेंट फ्रेंडली) स्न्मान दिला जावा म्हणजे हळूहळू शाकाहाराकडे कल वाढू लागेल.
पण अर्थातच दूध व दूग्धजन्य पदार्थांचे सेवनही कमी करावे लागेल.

sunil kachure's picture

16 Jun 2022 - 3:37 pm | sunil kachure

तर्क वादी ती जाहिरात आहे .त्या वर चर्चा झाली तर underpant पण अंगावर राहणार
नाही पूर्ण नागडे होतील संशोधक
आणि पोकळ बांबू चे फटके बसतील..
म्हणून चर्चा होत नाही

स्वधर्म's picture

16 Jun 2022 - 4:05 pm | स्वधर्म

सुनीलजी, वरील संदर्भ चुकीचे अथवा खोटे आहेत असे संदर्भ तुंम्ही द्या. अन्यथा ते तुमचे मतच राहील. सत्याचा किंवा तथ्याचा त्याच्याशी काही संबंध नाही.

नाही पूर्ण नागडे होतील संशोधक
आणि पोकळ बांबू चे फटके बसतील..

अशी भाषा टाळत मुद्देसूद प्रतिवाद केलात तर लोक तुमची मतं , तुमचे प्रतिसाद अधिक गांभीर्याने घेतील असं नाही वाटत का तुम्हाला ?

स्वधर्म's picture

16 Jun 2022 - 4:00 pm | स्वधर्म

>> बहूधा हा विषय घेतला तर त्यावर धार्मिक गोष्टी जोडल्या जावून प्रचंड विरोध होण्याची भिती वाटत असावी.

एकदा धार्मिक बाजू आली, की सगळा विषय दिशाच हरवून बसतो. विज्ञानाला, निसर्गाच्या नियमांना मानवाच्या धार्मिक समजूतीचे किंवा भावनांचे काहीही पडलेले नाही. मानवासहित, किंवा मानव नष्ट झाला, तरी ती प्रक्रीया अव्याहतपणे चालूच राहणार. तुंम्ही हानी करत राहिलात, तर तुंम्हीच संपाल, निसर्गात त्या ध्वस्त पर्यावरणातही तग धरेल अशी प्रजाती अस्तित्वात येतील. त्यामुळे ‘निसर्ग वाचवा, पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा’ असल्या घोषणा संपूर्णपणे निरर्थक आहेत. खरं तर मानवी जीवन वाचवा हेच पर्यावरणाची काळजी असलेल्यांसाठी महत्त्वाचं आहे.
धार्मिक बाजूची गंमत म्हणजे भारतात जे शाकाहारी आहेत, ते धार्मिक कारणानेच बहुसंख्य शाकाहारी आहेत. मांसाहारामुळे होणारी पर्यावरणाची हानी समजून घेऊन शाकाहारी बनलेले फारसे कोणी माझ्या माहितीत तरी नाहीत.

परदेशातील लोकांबरोबर बोलत असताना एकाने गमतीशीर मुद्दा माडला. म्हणे आजकाल मुलांना प्राण्याविषयी ‘रिस्पेक्ट’च नाही. त्यांना वाटतं चिकन हे सुपरमार्केटमध्ये किंवा फॅक्टरीत तयार होतं. आणि अगदी साबण, चपला, इ. सारखं गाई बैलांचे अवयव तिथे यांत्रिकपणे मांडले जातात, वजन केले जातात, पॅक केले जातात. त्यामुळे जिवंत प्राण्याला आपण काय यातना देत वाढवतो व कापतो ते घेणार्याला समजतच नाही. सगळी दृष्टीआड सृष्टी. त्यांना भावनिक दृष्ट्या शाकाहारी बनण्यासारखी परिस्थिती तिथेही नाही अन इथेही. शेवटी ‘ज्यूसी’ चवीला पर्याय नाही.

Nitin Palkar's picture

15 Jun 2022 - 7:46 pm | Nitin Palkar

मूळ लेख आणि त्यावरील अनेक प्रतिक्रिया खूपच चांगल्या आणि गांभीर्याने विचार करण्यायोग्य आहेत. काही जणांची विचारधाराच तिरकी असल्याने लेखातील कोणत्याही मुद्द्याचा योग्य प्रतिवाद न करता केवळ पिंक टाकण्याच्या उद्देशानेही आलेल्या प्रतिक्रियांना फाट्यावर मारावे.

तर्कवादी's picture

15 Jun 2022 - 7:51 pm | तर्कवादी

धन्यवाद नितीन जी
आपण चर्चा सुरु ठेवू .. हळूहळू ज्ञान वाढत जाईल, नवीन गोष्टी सगळ्यांसमोर येतील तशी काही लोकांची उदासीनता कमी होईल.

sunil kachure's picture

15 Jun 2022 - 8:12 pm | sunil kachure

ब्रह्मांड निर्मिती बिग बँग,
पृथ्वी ची निर्मिती,सजीव निर्मिती,माणसाची निर्मिती.वनस्पती निर्मिती.
हा काळ खूप जुना आहे
खुप किचकट जैव रासायनिक घडणा घडल्या आणि जैव सृष्टी अस्तित्वात आली.
तेव्हा पासून माणूस जे अन्न खातो त्या वनस्पती आहेत.खूप सारे मांसाहारी प्राणी आहेत,सस्तन प्राणी आहेत.
ही सर्व निसर्गाची निर्मिती आहे.
निसर्गात एक पण जीव किंवा वनस्पती अशी नाही ज्या मुळे पर्यावरण हानी होईल आणि पृथ्वी वरची जीव सृष्टी धोक्यात येईल.
प्रायोजक केलेल्या संशोधक लोकांची मत मांडू च नका.
आम्हाला माहीत आहेत.
माणसाने निसर्गात बदल केला.
डिझेल,पेट्रोल,कोळसा ,लोखंड,विविध धातू हे पृथ्वीच्या पोटात होते..ते माणसाने बाहेर काढले.
जैव इंधन माणसाने बाहेर काढले त्याचे ज्वलन केले हे कृत्य निसर्गाच्या विरुद्ध होते आणि आहे.
विविध रसायने माणसाने निर्माण केली ती पृथ्वी वर अस्तित्वात नव्हती..
हे पण निसर्ग विरोधी कृती आहे.
रबर,प्लास्टिक माणसाने निर्माण केले ते निसर्गात नव्हते...खूप .मोठी लिस्ट आहे माणसाच्या काळ्या कर्तुत्वाची.
त्याचा एकत्रित परिणाम म्हणून पर्यावरण धोक्यात आले.
पृथ्वी ची निर्मिती अब्ज वर्ष होवून गेली.पर्यावरण ह्या दोन शे वर्षात धोक्यात आले.
उगाच प्रायोजित केलेले संशोधक आणि त्यांची मतं मनावर घेवू नका.

मागील काही वर्षात विज्ञान विषयातील मासिकात संशोधनाच्या नावाखाली बातम्या येत होत्या .
गाई,म्हैस अशा रवंध करणाऱ्या जनावर मुळे कार्बन चे प्रमाण वातावरणात वाढत आहे अशा आशयाच्या त्या बातम्या होत्या.
पण हे प्राणी अनाधी काळापासून पृथ्वी वर आहेत आणि त्यांची संख्या आज च्या पेक्षा पूर्वी जास्त होती .तेव्हा माणूस लपून रह्याचा.
तेव्हा नाही कार्बन वाढला वातावरणात..
खरे तर ते संशोधन नव्हते जाहिरात होती
जाहिरात आणि खरे संशोधन ह्या मधील फरक समजणे खूप अवघड आहे..
विचार केल्या शिवाय समजणार पण नाही.
प्राणी जे मांस किंवा दूध देतात त्यांना बदनाम करायचे.
त्यांना पाळण्यावर निर्बंध आणायचे हा हेतू होता.
ही जाहिरात वजा संशोधन नेहमी प्रसिद्ध करून अनुकूल वातावरण बनवून आपले प्रॉडक्ट बाजारात आणयचे हा हेतू.
पण हा प्रयत्न अयशस्वी झाला.
काहीच वर्षात कृत्रिम मांस बाजारात आले , सिंथेटिक दूध बाजारात आले.
खरे प्रायोजक समोर आले .
पण लोकांनी कृत्रिम मांस पण नाकारले आणि सिंथेटिक दूध पण नाकारले.

तर्कवादी's picture

15 Jun 2022 - 8:55 pm | तर्कवादी
सौन्दर्य's picture

15 Jun 2022 - 11:14 pm | सौन्दर्य

आजच्या घडीला संपूर्ण जगात रिन्यूएबल एनर्जी फक्त ३०% आहे व उरलेली खनिज तेलाद्वारे उत्पन्न केलेली. ह्या व्हिडियोत म्हंटल्या प्रमाणे कार्बन टॅक्स लावला तरी तो भरून आपले उत्पादन चालू ठेवणे हेच कंपन्यांना फायदेशीर आहे. त्यामुळे खनिज तेल किंवा कोळश्याचा उपयोग करून वीज उत्पन्न करणे हे फायदेशीर ठरू शकतं. हल्लीच आलेल्या बातमीवरून असे दिसतंय की भारत सरकार अदानी ग्रुपकडून त्यांच्या ऑस्ट्रेलियातील खाणीतील ८३०८ करोड रुपयांचा कोळसा आयात करणार आहे.

जरी सामान्य माणसाने त्याच्या त्याच्या व्यक्तिगत पातळीवर पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा थोडाफार प्रयन्त जरी केला तरी काहीतरी फरक हा नक्कीच पडेल. रामसेतू बंधनातला हा खारीचा वाटा जरी असला तरी तो स्वागतार्ह आहे.

तर्कवादी's picture

16 Jun 2022 - 11:00 am | तर्कवादी

जरी सामान्य माणसाने त्याच्या त्याच्या व्यक्तिगत पातळीवर पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा थोडाफार प्रयन्त जरी केला तरी काहीतरी फरक हा नक्कीच पडेल. रामसेतू बंधनातला हा खारीचा वाटा जरी असला तरी तो स्वागतार्ह आहे.

बरोबर आहे. व्यक्तिगत प्रयत्न करत रहायला हवेत. मी एकट्याने केल्याने काय होईल असा विचार न करता प्रयत्न सुरु ठेवायला हवेत. तसेच पर्यावरण विषयक जागरुक असलेल्या लोकांची संख्या वाढत राहिक्यास उद्योगांवरही पर्यावरणपूरक उत्पादने बाजारात आणण्याकरित अप्रत्यक्ष दबाव निर्माण होईल.

sunil kachure's picture

15 Jun 2022 - 9:20 pm | sunil kachure

जलस्तर खाली गेला ह्या विषयी पण सर्रास खोटी माहिती पसरवली जाते.
उपसा वाढल्यामुळे जलस्तर खाली जात आहे.
ते कारण आहेच पण त्या पेक्षा पण बाकी करणे जास्त महत्वाची आहेत पण त्याचा उच्चार कोणी करत नाही किंवा ती कारण चर्चेत पण येऊ दिली जात नाहीत.
१) मोकळ्या जागा कमी झाल्या . काँक्रिट करणं वाढले त्या मुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जावू लागले.
२)दलदली च्या जागा नष्ट झाल्या ह्या दलदलीच्या जागा नैसर्गिक रित्या जळभरण करत होत्या.
३) जंगल कमी झाली.
झाडांची मुळं पाणी धरून ठेवतात पाणी वाहून देत नाहीत.
त्या मुळे जमिनीत पाणी मुरते.
उपसा नाही केला तरी जमिनीतील पाण्याची पातळी ठराविक पॉइंट च्या वर कधीच येणार नाही...
नाहीतर एक दोन हजार वर्षापूर्वी जमिनीवरून पाणी वाहत असते..पण तसे काही पूर्वी घडल्याची नोंद नाही .
आमचा आड होता माझ्या आजोबांच्या काळातील १५० वर्ष तरी जुना असेल त्याची खोली ५० फूट होती.
आणि आज पण त्याच अंतरावर पाणी लागते.
कारण जल भरन करणारी नैसर्गिक स्थिती आज पण जास्त बदलेली नाही.
आणि विविध सरकार नी थोडे फार प्रयत्न पण केले आहेत
तलाव बांधणे,खड्डे खोदणे,झाडे लावणे ह्या योजना राबवल्या आहेत.

https://www.bbc.com/marathi/india-61808395

पर्यावरण बदलाचा असा पण परिणाम होईल.मी माझ्या अगोदर च्या पोस्ट मध्ये उल्लेख केला होता झाडे फळं देणे बंद करतील.
त्याची सुरुवात आहे जे कोकणातील हापूस आंब्य विषयी घडतं आहे.

विवेकपटाईत's picture

16 Jun 2022 - 9:11 am | विवेकपटाईत

1. मी आंघोळीला 5 लीटर पेक्षा कमी आणि जेंव्हा शेंपू लावला तरीही 10 लीटर पेक्षा कमी पाणी वापरतो. बाकी साबण शेंपू सर्व हिरवे निशाण वाले वापरतो. फरशीसाठी गोनाईल. कपडे दर तीन दिवसांनी. मशीन सेमी ऑटो. कपडे व्यवस्थित पिळून ड्रायर मध्ये टाकतो. पाणी कमी लागते. बाकी फ्री पाण्यामुळे सकाळी 4 वाजता उठावे लागते. तरच सरासरी 300 लीटर पाणी भरणे शक्य होते. एक फायदा योग आणि व्यायाम करण्याची सवय जडली. याचे श्रेय माननीय केजरिवाल यांना देता येईल.
2. घरात मोठ्या गमल्यांत एक विदेशी पाम ( एक लहान गमल्यात), मधुमालतीची, गिलोय, मोगर्‍याची वेल, जास्वंद, कढी पत्ता 3 (एक मोठ्या आणी 2 लहान), पारिजात, सदाफुली, तुळशी 3, दोन मध्ये गुलाबाची वेल, दोन आयातकर कमी उंचीच्या गमल्यांत नेहमीच पुदिना राहतो. दोन मध्ये वेळोवेळी हिवाळ्यात टोमॅटो, मिरची, वांगी, पालक, कोथिंबिर झेंडू इत्यादि. झेंडू अजूनही जीवंत आहे. पुन्हा ऑक्टोबर मध्ये लावतो. इत्यादि. रोज तीस लीटर पाण्यात हे सर्व जमते. हिवाळ्यात कमी लागते. जेंव्हा पाणी मुबलक मिळत होते. तेंव्हा जास्त गमले ठेवले होते. पूजेसाठी फुले क्वचितच विकत घेतो.

तर्कवादी's picture

16 Jun 2022 - 11:02 am | तर्कवादी

मी आंघोळीला 5 लीटर पेक्षा कमी आणि जेंव्हा शेंपू लावला तरीही 10 लीटर पेक्षा कमी पाणी वापरतो

हा प्रयत्न करुन बघेन. काही वेळा सवयी मोडणं कठीण जातं पण तरी प्रयत्न करेन.

सुक्या's picture

16 Jun 2022 - 3:32 pm | सुक्या

5 लीटर?? आंघोळ 5 लीटर मधे ?
कायतरी चुकतयं

५ लिटर पाण्यात अंघोळ करणे शक्य नाहीच. आपण मांजर तर नाही ना ?

आग्या१९९०'s picture

18 Jun 2022 - 11:31 am | आग्या१९९०

ते एकतर झिरो ग्रॅविटी मध्ये आंघोळ करत असतील किंवा पाण्याचे सर्फेस टेन्शन कमी करून आंघोळ करत असतील. तसं असेल तर ५ लिटर पाणी म्हणजे पाण्याचा अपव्यय करतात ते.

sunil kachure's picture

16 Jun 2022 - 1:08 pm | sunil kachure

सरकार ही अशी यंत्रणा आहे त्यांना सुनियोजित कारभार व्हावा आणि लोकांचे आयुष्य ठीक चालावे म्हणून निर्माण केले आहे
सरकार मध्ये सामील असणाऱ्या सर्व दर्जा च्या लोकांना जनता त्यांच्या कुटुंब सहित सांभाळते..मग पंतप्रधान असून किंवा साधा शिपाई.
देशाला धोकादायक अशी स्थिती पर्यावरण हानी मुळे होत असेल तर जे जनतेच्या पैशावर गुजराण करतात त्यांनी उपाय शोधले पाहिजेत.
सरकारी यंत्रणेने हुशार लोकांची मत विचारत घेवून सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून ...उपाय योजले पाहिजेत..जनता पैसा पुरवत आहे स्वतः कष्ट करून ...त्या पैश्याच्या जोरावर सरकार कडे अनेक यंत्रणा आहेत जे जनतेच्या पैशावर उदर निर्वाह करत आहेत...त्यांनी योजना आखून उपाय करावेत..
पाहिले तर नदीत सांडपाणी सोडणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकावे
सरकारी विभाग असेल bmc वैगेरे तर महापौर आणि आयुक्त ह्यांना तुरुंगात टाकावे.जर सांडपाणी नदीत जात असेल तर
अनवशक्या चैनी चे प्रॉडक्ट पूर्ण बंद करावेत.. two wheeler ल ६५० cc che इंजिन ..फालतू गिरी
असे प्रॉडक्ट निर्माण करणाऱ्या लोकांना आजन्म तुरुंगात टाकावे .सरकारी यंत्रणा नी प्रामाणिक पने काम केले आणि आपण जनतेच्या पैस्यावर दोन खास खात आहे आणि ऐश करत आहे ह्याची जाणीव ठेवली तर
सर्व अडचणी काहीच वर्षात दूर होतील.

कर्नलतपस्वी's picture

16 Jun 2022 - 6:14 pm | कर्नलतपस्वी

नऊशे सदनिका,सत्तर दुकाने .

सिवेज ट्रीटमेंट प्लान्ट ट्रीटेड पाणी फ्लश आणी बागेत वापरतात
डोमेस्टिक वेस्ट मॅनेजमेंट प्लांट,उर्वरक बागेत वापरतात.
रेन हार्वेस्टिंग काही प्रमाणात
इ वेस्ट डिस्पोजल कॅम्प
हे सर्व व्यवस्थित राबवले आहे. परीसरात झाडे,फुलबागा आसल्यामुळे गारवा राहून उन्हाळ्यात वातानुकूलित यंत्रांचा तुलनात्मक वापर कमी.

तर्कवादी's picture

18 Jun 2022 - 11:20 pm | तर्कवादी

स्तुत्य उपाययोजना

सुरसंगम's picture

17 Jun 2022 - 2:09 pm | सुरसंगम

सामान्य माणूस करतो हो पण सरकारी जेवढं कार्यलये आहेत तिकडेच बोंब आहे.
पाणी, वीज, जेवण याची अक्ष्म्य हेळसांड चालू आहे.

संक्षिप्त
अमेरिका
अमेरिकेत मुख्य पाणीपुरवठा यंत्रणेने गाठलेला तळ, युरोपातील बहुतांश देशांत पडलेला भीषण दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा यांमुळे कृषी उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे असून त्याचे दुष्परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. आफ्रिका खंडातील २२ दशलक्ष लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागण्याच्या भीतीसह २०२२-२३मध्ये जगात अन्नधान्यांची दरवाढ, टंचाई निर्माण होण्याची शक्यता विविध अहवालांतून व्यक्त केली जात आहे.
‘वल्र्ड इकॉनॉमिक फोरम’ आणि अमेरिकेच्या ‘नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ने (नासा) जाहीर केलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील सुमारे २५ दशलक्ष लोकांना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ‘लेक मीड’ या जलाशयाने तळ गाठला आहे. अशी स्थिती १९३७ नंतर प्रथमच निर्माण झाली आहे. कमी पाऊस आणि उष्णतेच्या लाटांमुळे अमेरिकेतील दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, टेक्सास, ओरेगॉन, नेवाडा, उटाह आणि न्यू मेक्सिको या राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती सर्वात गंभीर आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुष्काळाचा अमेरिकेच्या कृषी आणि पशूधनावर विपरीत परिणाम होणार आहे. दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेमुळे गवतांच्या कुरणांचे मोठे नुकसान झाल्यामुळे पशुधनाचे उत्पादन कमी होऊ शकते
युरोप
युरोपातील अनेक देशांना वर्षांच्या सुरुवातीपासून दुष्काळाच्या झळा बसत आहेत. जुलै, ऑगस्ट महिन्यात या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. युरोपातील नद्या कोरडय़ा पडल्या आहेत. पिण्याचे पाणी, शेतीसाठीेचे पाणी आणि जलविद्युत क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे.
हाईन, डॅन्यूब, ओडर, लोरी, पो, वाल या प्रमुख नद्यांसह अनेक नद्या कोरडय़ा पडल्या आहेत.
युरोपात गेल्या पाचशे वर्षांतील सर्वात मोठा भीषण दुष्काळ पडला आहे.
चीन
चीन ६१ वर्षांतील भीषण दुष्काळाचा सामना करीत आहे. यांगत्से नदीचा प्रवाह रोडावला आहे.
शांघायसह अन्य प्रमुख शहरातील दिवे रात्री बंद केले जात आहेत, इतण्या भीषण वीज टंचाईला चीन सामोरे जात आहे. टेस्ला, टोयाटो सारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विजेअभावी आपले प्रकल्प बंद केले आहेत.

पूर्ण बातमी /लेख

शाम भागवत's picture

4 Sep 2022 - 7:45 am | शाम भागवत

यांच्या यांच्या नेमके उलट, भारतामध्ये भरपूर पाऊस पडायला लागलेला आहे. चार महिन्याची सरासरी दोन-तीन महिन्यात गाठली जात आहे. कधी न भरणारी धरणे सुद्धा भरून वहायला लागली आहेत.
भारताच्या सध्याच्या राज्यकर्त्यांना अनुकूल अशी भूमिका निसर्ग का घेत आहे काही कळत नाही.

या शेवटच्या वाक्यावरती हा धागा जोरदार पळायला आता काही हरकत नसावी.
:)

तर्कवादी's picture

4 Sep 2022 - 1:21 pm | तर्कवादी

यांच्या यांच्या नेमके उलट, भारतामध्ये भरपूर पाऊस पडायला लागलेला आहे.

हवामान बदलाचाच हा ही एक भाग आहे. कुठे सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर कुठे सरासरीपेक्षा कमी.
पण जास्त पावसाच्याबाबत ही एक निरीक्षण असे आहे की पावसाचे दिवस कमी झालेत आणि प्रत्येक दिवशी पडणारा पाऊस खूप जास्त असे होत आहे. माझे पुर्ण आयुष्य पिंपरी चिंचव॑ड शहरात गेले आहे आणि हे निरीक्षण अगदी खात्रीने मलाही जाणवत आहे गेले ३-४ वर्षांपासून.

शाम भागवत's picture

4 Sep 2022 - 2:37 pm | शाम भागवत

मी पण थोडासा सहमत आहे.

कधी न भरणारी धरणे सुद्धा भरून वहायला लागली आहेत.

वर्षानुवर्षे धरणांतील गाळ उपसला न गेल्यामुळे त्यांची साठवणक्षमता पुर्वीपेक्षा कमी झाली असेल आणि त्यामुळे ती लवकर भरत असतील अशी काही शक्यता असू शकते काय ?

थोडासा परिणाम गाळामुळे होणार हे नक्की.

अमेरिकेत सध्या उष्णतेची लाट आली आहे. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कॅलिफोर्निया राज्यातही सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमध्ये 53 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

निसर्गाची हानी होत असल्यानं, निसर्गाने आपला प्रकोप केला आहे. आपल्याला उष्णतेच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याची माहिती कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजम यांनी दिली. पृथ्वीला तीव्र पूर आणि वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचे गेविन यांनी सांगितले. राज्यातील ग्रीड ऑपरेटर्संनी वीज तोडण्याचा इशारा दिल्याने लोकांच्या अडचणी वाढू शकतात. ग्रीड ऑपरेटरने संभाव्य वीज संकटाचा इशारा देखील दिला आहे. त्यामुळं वीज खंडित होत असल्याने ई-वाहन चालकांना त्यांच्या वाहनांचे शुल्क न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याने जनतेसाठी कूलिंग सेंटरही उभारले आहेत. 2020 च्या उन्हाळ्यापासून कॅलिफोर्नियाच्या ग्रीडसाठी ही सर्वात मोठी चाचणी आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यातील काही भागात भीषण वीज संकट होते. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळं युरोपमधील ऊर्जा संकट वाढत असताना सध्याचे संकट आले आहे. यासह, जगभरातील हवामान बदलामुळं विक्रमी तापमानात वाढ होत आहे.

पूर्ण बातमी

ही थोडी जुनी बातमी आहे
सध्या ब्रिटनमध्ये उष्णतेचा कहर सुरु आहे. देशातील बहुतांश जलस्रोत आता कोरडे पडत आहेत. उष्णतेच्या लाटेचा थेम्स नदीवर देखील परिणाम झाला आहे.
बातमी