Skip to main content

ग्लोबल वॉर्मिंग

हातात फक्त आठ वर्षे!

लेखक तर्कवादी यांनी मंगळवार, 14/06/2022 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय वृत्तमाध्यमांत पर्यावरणविषयक बातम्या वा चर्चा या खरेतर फक्त हवामान व पर्जन्य याबद्द्लच मर्यादित आहेत. पावसाचा अंदाज, पावसाचे वृत्त, पूर , भूस्खलन, चक्रीवादळे ईत्यादी बद्दलच्या संक्षिप्त बातम्या इतकंच काय ते पर्यावरणाला मिळणारं फूटेज. पण सध्याची परिस्थिती पाहता पर्यावरण हा अतिशय महत्वाचा व गंभीर आणि प्राधान्याने ज्यावर विचार व कृती करायला हवी असा विषय बनला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन उत्सर्जन, भूजलाची घटती पातळी, वाढते जल व वायू प्रदूषण, प्लॅस्टीक व इतर कचर्‍याच्या समस्या, घटते जैववैविध्य , वाढते पूर, चक्रीवादळे असे अनेक उपविषय पर्यावरणात सामाविष्ट आहेत.