Skip to main content

ताज्या घडामोडी जून २०२२

लेखक निनाद यांनी बुधवार, 01/06/2022 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
मूर्तीची तोडफोड का? अज्ञात हल्लेखोरांनी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यात एका हिंदू मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. या घटनेने परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पाकिस्तान नसून भारतात घडते आहे हे लक्षात घेतले पाहिजे. मूर्ती तोडफोडीचे वृत्त पसरताच हिंदू कार्यकर्ते आणि भाविक मंदिर परिसरात जमा झाले. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या आधीही याच वर्षी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत काही अज्ञात हल्लेखोरांनी सरस्वती देवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती. कर्नाटकातील मंगळुरू येथे बैकमपाडी करकेरा मूलस्थान जरंदया दैवस्ताना आणि नागा ब्रह्म पीताची नासधूस झाली होती. असे दिसते आहे की येथे कुणीतरी हिंदूंच्या स्थानांना क्षति करण्यासाठी व्यवस्थित पणे प्रोत्साहन देते आहे. हे षडयंत्र आहे असे वाटते. सगळे हल्लेखोर अज्ञात कसे राहतात? मेनस्ट्रीम मिडिया मध्ये या घटना का दिसत नाहीत? देशभरातले हिंदू जोवर संघटीत आवाज उठवणार नाहीत. तोवर हे प्रकार थांबणार नाहीत असेच दिसते आहे.

वाचने 31623
प्रतिक्रिया 259

प्रतिक्रिया

*संघ भाजपाच्या लोकांची खानदानी ईमानदारी*... विरुद्ध *नेहरू घराण्याचा महाभ्रष्टाचार(?)* ___________________________ #भ्रष्टाचारी_नक्की_कोण...? ...मेंदू नावाचा अवयव वापरून थोडा सारासार विचार तर कराल? म्हणजे बघा ना... *नितीन गडकरी, लुना वरून पिग्मी गोळा करत फिरत होते म्हणतात! पण आज त्यांची वौयक्तिक संपत्ती शेकडो कोटी रुपयांच्या घरात आहेच ना...?* *देवेंद्र फडणीस यांच्या वडिलांचा राजवाडा नव्हता... अतिशय काष्टातुन त्यांचं नेतृत्व वर आलंय म्हणतात! मग आज त्यांची सांपत्तिक समृद्धता इतकी मोठी कशी?* *चंद्रकांत दादांचे वडील तर गिरणी कामगार होते म्हणे...* *अन मुंबईचे आशिष शेलार यांचे वडील कोकणातून मुंबईला नोकरीला आले होते म्हणतात...!* *पियुष गोयल चे वडील... "आडवाणी-वाजपेयींचा वाढदिवस आहे.. चंदा द्या.." म्हणत, हिंद माता मधल्या कापड व्यापाऱ्यांकडून शंभर दोनशे रुपये गोळा करत होते! तरी आज गोयल यांची सांपत्तिक स्थिती कोणीही पाहावी... वास्तव काय?* *गोपीनाथ मुंडे यांचे वडील ऊस तोडणी ला जात होते म्हणतात... अन मुंढे साहेबानी तर अख्खे आयुष्य राजकीय जीवनात व्यतीत केलं! मग ...???* *प्रमोद महाजन यांचे वडील मास्तरकि करत होते! आज त्या घराण्याची संपत्ती मोजलीत कधी??* . . . . *...पण, ज्या राहुल गांधी च्या पणजोबाचं, 1920 साली उत्पन्न महिना 25 हजारच्या घरात होते... त्यांच्या आजोबा, पणजोबांनी स्वतःच्या 200 कोटी मालमत्तेतील अंदाजे तब्बल 196 कोटी म्हणजेच एकूण संपत्तीच्या 98% मालमत्ता "तेव्हाच्या काळात" या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दान केली...जीची आजची किंमत मोजणं केवळ अशक्य! ...तुरुंगवास भोगले...!* *...इतकंच नाही, तर, इंदिरा, राजीव यांच्या रूपाने 2 बलिदान दिली... त्या राहुल गांधीवर मात्र भ्रष्टाचारचे आरोप होतात...अन आंधळे लोक त्यावर विश्वास पण ठेवतात?* *...मग या भाजपवाल्या सगळ्यांचे आजचे जे वाडे बंगले मोटारी आहेत, ते महाराष्ट्र राज्य लॉटरी लागल्याने, का मटका लागल्याने मिळाले?* (एक फेसबुक वरून आलेली पोस्ट.. साभार from Gopal Upadye)

नजीकच्या भविष्यकाळात काश्मीरमध्ये मोठी लष्करी कारवाई होईल असा माझा अंदाज आहे. दिवा विझताना मोठा होतो तसेच काश्मीरमध्ये अचानक हत्यासत्र सुरू झाले आहे. सरकार गेले, ३७० वे कलम गेले, राज्याचे विभाजन झाले, यासीन मलिक बरेच दिवस तुरूंगात पडतोय, हुरियत कॉन्फरन्सचा प्रभाव संपला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिरेक्यांचा शस्त्रे व आर्थिक मदतीचा सर्वात मोठा पुरवठादार पाकिस्तान अत्यंत वाईट अवस्थेत गेलाय. काश्मीर ् मधील दहशतवाद संपविण्याचे व पंडितांना परत आणण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न यशस्वी होताना दिसताहेत. त्या नैराश्यातून व हतबलतेतून काश्मीरमधील उरल्यासुरल्या अतिरेक्यांनी शेवटचा उपाय म्हणून हत्याकांड सुरू केले आहे. त्यांच्यावर आता शेवटचा निर्णायक घाव बसण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. पुलवामा हत्याकांडानंतर भारतातील निधर्मांध आनंदाने बेभान होऊन विजयोत्सव साजरा करीत होते कारण त्यामुळे मोदी अडचणीत क्षाले होते. How is the Jaish अशा कुत्सित प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. आताही तसेच सुरू झाले आहे. बालाकोट कारवाईने सर्व निधर्माधांना जोरदार थोबाडीत बसली. आताही तसेच होणार आहे आणि हा घाव निर्णायक असेल.

In reply to by श्रीगुरुजी

१०००००% सहमत !! काश्मिरचा विकास होतोय. काश्मीरला पर्यटकांचा ओघ वाढत आहे. ह्या सिझन मध्ये हॉटेलची एक रुम रु. ६०,०००/रात्र अश्या विक्रमी कींमतीत गेलेली होती. पण त्याच बरोबर हुरीयत संपली आहे. यूएई सारख्या देशाने केलेल्या गुंतवणीकी विरुद्ध अतीरेकी कारवाया पाकीस्तानला करता येणार नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

गुरूजी ह्या असल्या थापा ८ वर्षापासून मारल्या जाताहेत. अमूक होनार आहे ढमूक होनार आहे. पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. ह्या अश्या थापा भाऊंच्या करमनूत प्रधान तुनळी चॅनलवरच शोभतात.

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, स्मार्ट सिटी, २०२४ पर्यंत ५ ट्रिलियनची इकॉनॉमी सारखी फसलेली मुंगेरेलालची स्वप्ने. पंडित फ्री काश्मिर मात्र नक्कीच करणार.

With a GDP of $3.1 trillion, India is the world's sixth-largest economy. The country has one of the highest GDP growth rates in the world. India's GDP will likely grow by 8-8.5% in FY22, according to the 2021-22 Economic Survey.09-Feb-2022 India's GDP grew by 4.1% in the fourth quarter of FY22. Meanwhile, the overall growth recorded for the financial year 2021-22 is estimated at 8.7% as against the contraction of 6.6% in FY21. The estimate of 8.7% for FY22 is the highest in 22 years in terms of back series data. India's economic growth estimated at 8.7% in FY22, Q4 GDP slows to 4.1%

१० जूनला होणार्‍या राज्यसभा निवडणुकांमध्ये मतदानात फाटाफूट व्हायला नको म्हणून महा(भ)विकास आघाडीने आपल्या सगळ्या आमदारांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेले आहे. राजस्थानातही काँग्रेसचे आमदार त्याच कारणाने उदयपूरच्या पंचतारांकित हॉटेलात तीन-चार दिवस राहणार आहेत. फाटाफूट व्हायला नको म्हणून अशा कुठल्यातरी हॉटेलात नेणे हा प्रकार त्यामानाने कालबाह्य झाला आहे असे वाटते. १९९५ मध्ये शंकरसिंग वाघेलांनी केशुभाई पटेलांविरोधात बंड केले होते तेव्हा त्यांचे सगळे आमदार खजुराहोला असे एका रिसॉर्टमध्ये राहिले होते. पण त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते. आताच्या काळात एखाद्या माणसाशी संपर्क साधायची कित्येक माध्यमे उपलब्ध असताना दुसर्‍या पक्षातील लोकांमध्ये फाटाफूट करायला त्या माणसाला भेटायलाच पाहिजे असे अजिबात नाही. तसेच अशी फाटाफूट व्ह्यायची असेल तर ती मतदानाच्या दोन-तीन दिवस आधीच होते का? ती आधी पण होऊ शकते. मग आपल्या आमदारांना असे किती दिवस हॉटेलात नेऊन ठेवणार? आणि त्यांचे मोबाईल फोन काढून घेणार की त्यांच्याबरोबरच ठेवणार?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भामटे बॅंकेतील अतिसुरक्षीत तिजोरीही फोडतात. म्हणून आपण आपल्या घरातील दागीने ऊघडे ठेवत नाही. हा प्रकारही तसाच आहे. भामटे चोरी करनारच, होईल तेवढी सुरक्षा करणे आपले कर्तव्य.

तुर्की नी गव्हाची टंचाई असून पण भारतीय गहू परत पाठवला. आता अशी बातमी वाचली आहे की भारतीय चहा पण अनेक देशांनी परत पाठवला कारण त्या मध्ये कीटक नाशकांची मात्र जास्त आहे. हापूस आंब्याची अवस्था भारतीय लोकांनी काय केली आहे ते समोर च आहे. त्या फळाची मूळ चव च गायब झाली आहे. देशात जी संस्था दर्जा नियंत्रण आणि भेसळ,किंवा बाकी घातक घटक आहेत की नाही ह्याची तपासणी करते ती यंत्रणा तिचे काम योग्य रित्या करत नाही..असेच बाकी देश भारताचे सामान ,अन्न धान्य परत पाठवायला लागले तर अगोदर च एक्सपोर्ट मध्ये पण कमजोर आहे अजून कमजोर होवू.

In reply to by sunil kachure

https://www.loksatta.com/pune/indian-mangoes-shipped-to-us-for-first-ti… भारतीय आंबा प्रथमच समुद्रामार्गे अमेरिकेला रवाना, साडेसोळा टन आंब्यांची निर्यात पुणे: भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप ॲग्रो ॲनिमल्स प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नांनी शुक्रवारी (ता.3) प्रथमच भारतीय आंबे समुद्रमार्गे अमेरिकेला पाठवले आहेत. भारतीय आंब्याच्या निर्यातीमधील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी केले.

In a major boost to agricultural products exports, First consignment of Ladakh Apricot exported to Dubai , 2nd September 2021 In a move which could boost agricultural and food products exports from Ladakh, first commercial shipment of Apricot sourced from region of Union Territory (UT) of Ladakh has been exported to Dubai. The consignment of Apricot was transhipped from Leh, Ladakh to Mumbai prior to being exported to Dubai. APEDA has been working to establish an export value chain for Ladakh Apricot in association with an importer Group based in Dubai. The shipment was exported by APEDA registered Exporter from Mumbai. Ladakh Apricots have a unique soothing taste and texture with high sugar contents and total soluble solids. UT of Ladakh produces several varieties of Apricots out of which four to five varieties are taken up for commercial cultivation and export opportunities exist for these varieties. लडाखच्या जर्दाळुची चव भारतालाच माहीती नव्हती तो आता जगातल्या मोठ्या बाजारपेठेत उपलब्ध होतोय. तुर्कीने भारताच्या गव्हाची खेप रिजेक्ट केली आणी त्यात भारत सरकारची हार आहे असा कांगावा लोक करत आहेत. मूळात भारत सरकारने अशी कोणतीही डील केलेली नव्हती. जी शिपमेँट टर्कीला पोहोचली ती मुळात नेदरलँड्सला, ITC ह्या कंपनीने पाठवली होती, ती तुर्किला कोणी वळवली ह्याचा शोध भारत सरकार करत आहे.

जरदाळू आणि आंबे ह्याची पोस्ट का चिकटवले आहेत इथे.. आंबे तर 16 टन च आहेत..म्हणजे तसे किरकोळ च. गहू आणि चहा का reject करून परत पाठवला ..त्याची कारणे शोधणे गरजेचे आहे. उगाच काही तरी चिल्लर उदाहरणे देवून प्रसंगाचे गांभीर्य कमी होत नाही.

In reply to by sunil kachure

सुनिल, दोन्ही देशांचे राजदूत आंब्यांवर ताव मारत आहेत. आपण कशाला एवढे टेन्शन घ्यायचे? mango https://timesofindia.indiatimes.com/world/us/indian-mangoes-return-to-a…

कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याने चहा परत आला. Both international and domestic buyers have rejected a series of tea consignments due to the presence of pesticides and chemicals beyond permissible limits, Indian Tea Exporters Association (ITEA) chairman Anshuman Kanoria said on Friday https://economictimes.indiatimes.com/news/economy/agriculture/high-in-p… हापूस आंबा मात्र स्वस्त दरात मिळायला लागला त्याची कारणे नक्की माहित नाहीत. ३०० रुपये डझन मिळत होता गेल्या आठवड्यात

दुसरे देश गहू,चहा सारख्या वस्तू परत पाठवत आहेत कारण त्या योग्य दर्जा च्या नाहीत. हा गंभीर प्रकार आहे जागतिक पातळीवर देशाचे नाव खराब होत च आहे. जपान ची इलेक्ट्रॉनिक वस्तू असली लोक डोळे झाकून घेत होते.कारण त्यांनी दर्जा राखला होता. चहा,आणि गहू परत आला कारण त्या मध्ये कीटक नाशकाचे प्रमाण जास्त आहे म्हणजे मानवी शरीरास हानिकारक आहे. तोच गहू,चहा भारतीय लोक वापरत आहेत म्हणजे भारतातील लोकांना पण चुकीचे अन्न खावे लागत आहेत. भारतीय बाजारात पण भारतीय उत्पादनाची चाचणी होणे गरजेचे आहे. दूध खात्री नी शुध्द असेल काही खात्री नाही. बटर शुध्द असेल की पाम तेला पासून बनवले आहे काही खात्री नाही. मिरची पावडर मध्ये लाकडाचा भुस्सा आहे की ती शुध्द आहे काही खात्री नाही. तूर डाळ मध्ये पण बंदी असलेली खासरी(नक्की नाव माहीत नाही यूपी,बिहार,mp मध्ये ही तूर डाळी सारखी दिसणारी च डाळ असते)मिक्स असण्याची शक्यता जास्त .हापूस आंबा म्हणून कोणता ही आंबा सर्रास विकला जातो. हापूस आंबा योग्य रित्या पिकवला जात नाहीं खात्री नी योग्य रीती नी पिकवला गेलेला हापूस मिळणे भारतात पण अवघड जाते. सरकार नी अशा गोष्टी वर कठोर नियंत्रण ठेवलेच पाहिजे.

गेल्या १५-१६ वर्षांत आमच्या कडे (आम्रविका पश्चिम किनारपट्टी) बहुदा ३ ते ४ वेळाच आंबे खाल्ले आहेत. बहुतांश वेळा भारतातुन आलेला आंबा पुर्व किनारपट्टी ला येत असे व तिथेच संंपत असे. कॉस्ट्को सारख्या महाकाय दुकानांनी पण भारतीय आंबे (हापुस) आयात केली होते पण ते पश्चिम किनारपट्टी ला पोहोचलेच नाहीत. शेवटी काही लोकांनी पुढाकार घेउन एक कंटेनर मागवला पण त्यातही बरेच आंबे खराब निघाले. तेव्हापासुन मेक्सिको चे पाणचट आंबे खाउन ताकावर तहान भागवत होतो. या वर्षी मात्र भारतीय आंबे (हापुस , पायरी, लंगडा, बांगन पल्ली वगेरे) मुबलक प्रमाणात उपलब्द्ब आहेत. त्यांचा खप ही उत्तम आहे. म्हणजे दुकानात आलेला आंबा (१ ते २ पॅलेट) एका दिवसात संपतो. दर्जा सुद्धा उत्तम आहे. ठाणे ईथली केबी एक्सपोर्ट ही संस्था कतार एयरवे मार्गे गेल्या २ महिण्यांपासुन हा बिझिनेस करते आहे. आता तर बरेच अमेरिकन ज्यांना मेक्सिको चे आंबे खायची सवय होती ते पण दर बुधवारी भारतीय मालाच्या दुकानात आंबे घ्यायला दिसतात. माझ्या मते महिन्याला १० - १२ टन आंबा सिअ‍ॅटल भागातच खपत असेल. माझे सांगायचे तर हापुस आंबा मी जवळ्पास ४ वर्षांनी मनसोक्त खाल्ला. ह्या एक्सपोर्ट चा फायदा भारतिय शेतकर्‍यांना मिळाला असेल अशी आशा आहे. बार्क चे प्रयत्न ही यात उल्लेखणीय आहेत.

संघाने हिंदूरक्षणार्थ आपले कोट्यवधी स्वयंसेवक काश्मीरमध्ये नेमावेत! कुणाची टाप आहे गोळ्या घालायची? https://www.aksharnama.com/client/article_detail/6088

In reply to by काड्यासारू आगलावे

काडुसार्या, माजी कमीशनर रिबेलो ह्यानी "माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनीनो ' अशी भाषणाची सुरुवात करणार्या हिंदुह्रुदयसम्राटांना विनंती केली होती की काही शिवसैनिक कश्मीरमध्ये पाठवावेत. मोफत ट्रेनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एकही शिवसैनिक फिरकला नाही रिबेलोंकडे.(१९९०-९१ ची गोष्ट आहे ही) मुंबईत मात्र अमचे शिवसैनिक 'पाकिस्तान मुर्दाबाद'म्हणत पाकिस्तानची प्रतिक्रुती जाळायचे. सध्याचे नव-हिंदुह्रुदयसम्राट राज ठाकरे ह्यांनाही अशी विनंती करता येईल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काही पुरावा आहे का माई?? की आय टी सेलची ढकलगाडी? बाकी ३ दिवसातं तयार होनार्या आर्मी बद्दल स्वत: भागवतच बोलले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यांचे एक नेते सांगायचे की "फक्त एक दिवसासाठी पंतप्रधान करा. चोवीस तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवितो.". यांचे काश्मीर प्रश्न सोडविण्याचे धोरण म्हणजे पाकिस्तानवर एक अणुबॉम्ब टाकून दिला की सुटला प्रश्न. हे स्वतः घरातून बाहेर न पडता चोवीस तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडविणार होते.

In reply to by श्रीगुरुजी

चिनचा हल्ला झेलायला आपली ५६ ईंच छाती आहे वगैरे सांगनारे आज चिनचं नाव घ्यायला ही घाबरतात. ह्यांच्या कडून कश्मिरप्रश्न सोडवण्याची अपेक्षा करनार्याना ७ तोफांची सलामी द्यायला हवी.

देश स्वतंत्र झाला तेव्हा खुप भारत अनेक समस्या नी ग्रस्त होता. दोन तुकडे झाले च होते. हिंदू मुस्लिम संघर्ष चालू होता. गरिबी प्रचंड होती. राज्य ,वतनदार,जहागीरदार ह्यांचे वेगळेच काही चालले होते. अशा अनेक गंभीर समस्या देशासमोर असून पण देशाला योग्य दिशा दिली गेली, जहागिरी दार,वतनदार,राज्यातील समस्या शांत डोक्याने सोडवल्या गेल्या एक संघ भारत राखला गेला अनेक महत्वाच्या संस्था काहीच वर्षात उभ्या केल्या गेल्या.. एक उत्तम राज्य घटना निर्माण केली गेली.. तेव्हाचे नेते खरेच खुप ग्रेट होते. आता अनेक positive points असून पण आताच्या नेत्यांना ना राजकीय समस्या सोडवता येत. ना पर राष्ट्र धोरण नीट ठरवता येत. फक्त एक दुसऱ्या वर आरोप करणे हे एकमेव काम फक्त उत्तम रीत्या येते. काश्मीर वर भारत सरकार ची सत्ता आहे आता 370 पण नाही. भारत सरकार लं कश्मिर मधील कायदा सुव्यवस्था पण इतके सर्व असून राखता येत नसेल तर अवघड आहे आता जनतेने च तिथे जावून शस्त्र हातात घेवून अतिरेकी लोकांशी लढावे ही अपेक्षा असेल. तर सरकार काय करणार. काहीच करणार नसेल तर सरकार हवं च कशाला. लोक सोडवतील प्रश्न.

पैगबरावर टिपण्णी केली म्हणून भाजप प्रवत्ता सस्पेंड. https://www.aajtak.in/amp/india/politics/story/bjp-spokesperson-nupur-s…

In reply to by काड्यासारू आगलावे

युरोपिअन विषयावर असंबद्ध बडबड करून IT सेल द्वारे आपल्याला जणू आधुनिक हेन्री किंसिग्नर बतावणारे श्री जयशंकर आणि त्यांचे धनी माप्रमंश्रीनमोजी ह्यांनी कतार सारख्या देशाच्या निव्वळ पत्रावर पूर्णपणे लोटांगण घातले. त्याचे मला आश्चर्य वाटत नाही दोन्ही व्यक्ती प्रसिद्धीलोलुप आणि तोंड जास्त चालविणारे आहेत हे मला ठाऊक होते. मजेची गोष्ट म्हणजे अगदी काल पर्यंत नुपूर ह्यांची बाजू घेऊन "अभिव्यक्ती स्वातंत्र्य" नावाने बोंब मारणारे IT सेल वाले हि शरणागती कशी भारताच्या आर्थिक आणि त्या देशामध्ये मजुरी करणाऱ्या भारतीयांच्या हितासाठी आहे हे अचानक पोट तिडकीने जगाला समजावून सांगत आहे. ह्या मंडळींचा अबाऊट टर्न जास्त मजेशीर आणि मनोरंजक आहे.

शेतकरी आंदोलकांना वर्षभर तंगवणाऱ्या सरकारला आखाती देशांनी भारतीय मालावर बहिष्कार टाकून नमवले. बीजेपीने दोन प्रवक्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. व्वा रे विश्र्वगुरु!

In reply to by आग्या१९९०

नाही उगाच अफवा पसरवू नका. बहिष्कार सुद्धा घालायची गरज पडली नाही. एक साधे पत्र कतार ने पाठवले होते आणि विश्वगुरू आणि ५६ छाती वाल्यानी थेट "घालीन लोटांगण वंदीन चरण" केले. युरोपिअन देशांना जाऊन कुणीही विचारले नसताना भारत कसा कणखर आणि स्वतःचे हित पाहणारा देश आहे वगैरे आपल्या झकास इंग्रजीत सांगणाऱ्यांची तोंडे फुटकळ कतार सारख्या देशाच्या एका निव्वळ चिट्टीवरून वाचाविरहित झाली.

In reply to by साहना

कतार,ओमान, ह्या देशात अमेरिका पासून अनेक देशांचे हीत संबंध आहेत. अमेरिका पण ह्या देशात काही बाह्य आक्रमण होतील असे वाटले की सावध होते. लाडक्या उद्योगपती चे कल्याण हेच देश करत आहेत त्याला फुटकळ देश म्हणू नका.

Bjp ची प्रवक्ते आहे.तिने खूप जबाबदारी नी मीडिया समोर बोलले पाहिजे.bjp सत्ता धारी पक्ष. प्रवक्त्या चे वक्तव्य हे सरकार चे अधिकृत वक्तव्य समजले जावू शकतं. हे प्रकरण अंगलट येईल म्हणून bjp नी कारवाई केली आहे सामान्य लोक किंवा सामान्य कार्यकर्ते हे काही ही बोलले तरी चालते.पण प्रवक्त्या ने ते पण सत्ताधारी खूप विचार करून बोलवे लागते. काँग्रेस चे जुने जाणते लोक bjp मध्ये घ्या आणि त्यांना प्रवक्ते बनवा असा सल्ला देता येईल. म्हणजे अशी वेळ येणार नाही.

In reply to by sunil kachure

केतकी चितळे वेळी बोलण्याचं स्वातंत्र्य वगैरे म्हणून गळे काढनारे ईथले काही मिपाआयडी आता नूपूर शर्मा प्रकरणावर तोंड बंद करून बसलेत.

आता भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि अब्दुल कलाम ह्यांचे वॉटर मार्क किंवा चित्र छापले छापणार. आता महात्मा गांधी हळू हळू चलनी नोटांवरून हटवले जाणार.

In reply to by आग्या१९९०

टागोरांचं कशाबद्दल?? जन गणं मनं हे पंचम जाॅर्ज च्या स्वागतासाठी गाणं लिहीलं म्हणून?

केवढी मोठी संधी लोकांनी bjp ल दिली होती. 2014,2019 लागोपाठ पूर्ण बहुमत . ह्या संधी चे सोने करायला पाहिजे होते. कायद्या च्या कक्षेत राहून आणि बिलकुल भडकावू भाषा न वापरता हिंदू चे आणि त्याच बरोबर भारताचे हीत जपता आले असते. अनधिकृत व्यवसाय, बंद करता आले असते. गुन्हेगारी वृत्तीचे जे मुस्लिम आहेत त्यांच्यावर कारवाई करता आली असती.मौलाना ,जे मशीद मध्ये मुस्लिम लोकांना भडकवत असतात त्यांच्या वर कायद्याने च नियंत्रण ठेवता आले असते. देशाच्या आर्थिक प्रगतीत अडथळा निर्माण करणारे नियम बदलले असते. प्रशासनात असलेल्या भ्रष्ट अधिकारी कर्मचारी ह्यांना घरचा रस्ता दाखवत आला असता. एक आदर्श सरकार कसे असावे हे देशाला दाखवून देता आले असते. पण आलेली आणि जनतेने दिलेली संधी चा फायदा bjp ल करता आला नाही. फक्त विरोधी पक्षांच्या राज्य सरकार ना त्रास देणे,केंद्रीय एजन्सी चा गैर वापर ,चुकीची आर्थिक धोरणे,आणि सर्वात ठळक बाब. हिंदी न्यूज चॅनेल वर पूर्ण नियंत्रण ते फक्त 24 तास bjp चाच अजेंडा चालवत आहेत. त्यांच्यावर काही तरी प्रचंड दबाव आहे. कोणताही हिंदी चॅनेल कोणत्या ही वेळी लावा.फक्त धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या चर्चा किंवा बातम्या.आणि bjp चे गुणगान हे च चालू असत. हे इतके उघड पहिल्यांदाच बघायला मिळत आहे.

खुप मोठ्या प्रमाणात भारतीय गल्फ मधील देशात नोकऱ्या करत आहेत गवंडी,bigari ह्या कष्टकरी वर्गाला चांगले दिवस त्याच देशांनी दाखवले आहेत Sony ब्रँड चे टीव्ही वापरायची कुवत त्याच देशांनी दिली. एक्सपोर्ट पण आपण तिथे करतो. ते आपल्या भांडणात पडत पण नाहीत पाकिस्तान बरोबर असलेल्या. तेच नाराज झाले आणि बायकॉट इंडिया गूड्स अशी घोषणा त्यांनी केली म्हणून लगेच नुपूर आणि जिंदाल वर कारवाई केली. अंबानी,अडाणी ह्यांचे पण प्रोजेक्ट नाहीतर धोक्यात आले असते. मित्र फर्स्ट ही तर bjp ची निती आहे.

कारण भारत हा सक्षम देश नाही.१४०, कोटी लोकसंख्या असलेला अतिशय गरीब देश देशातील प्रतेक आर्थिक गटा मधील लोकांचे जीवन कान कसे सुधारेल ह्याची बिलकुल अक्कल नसलेले सरकार ,दर्जा हिन प्रशासन. स्वार्थी आर्थिक तज्ञ,आणि विचारवंत. अमेरिका,रशिया,चीन किंवा बाकी प्रगत देश ह्यांची तुलना फक्त महामूर्ख च करू शकतात. अमेरीकेत शेती विषयी काय धोरण आहे,रशिया चे आर्थिक धोरण काय आहे चीन मध्ये कास कामगार च पगार कमी आहेत ज्या मधील काहीच तिथे तसे नाहीं चीन मध्ये जीवन व्यवस्थित चालावे इतके पगार तिथे आहेत अमेरिका मध्ये शेतकरी खुश आहेत त्यांचे हीत जपले जाते. रशियन लोक भारतीय लोकांपेक्षा खूप सुखी आहेतं पण बकवास तज्ञ,फालतू अर्थ तज्ञ, स्वार्थी नेते,स्वार्थी उद्योगपती ह्यांनी भारताची वाट लावली आहे शेती विषयक कायदे ह्या बकवास अविचारी लोकांचे ऐकून च अपरिपक्व bjp सरकार नी आणलें कतार काय उद्या नेपाळ पण भारताला दम देईल. तयारी ठेवा

आयएएस आणि आयपीएस ह्यांची निवड च चुकीच्या पद्धतीने होत आहे. ते प्रशासन चालविण्यास योग्य व्यक्ती नाहीत.. निवड पद्धत पूर्ण पने बदलली पाहिजे. मोदी सरकार चा एक निर्णय ह्या बाबत योग्य वाटतो. सरकार स्वतः योग्य व्यक्ती निवडेल. राजकीय असला तरी तो व्यक्ती नक्की सक्षम असेल.

In reply to by sunil kachure

आयएएस आणि आयपीएस ह्यांची निवड च चुकीच्या पद्धतीने होत आहे. ते प्रशासन चालविण्यास योग्य व्यक्ती नाहीत..
येऊ द्यात तुमच्या तर्फे काही सुधारणा निवडप्रक्रियेमध्ये.

In reply to by काड्यासारू आगलावे

ही शांतता जाणवण्यासारखी आहे खरी. वरचे सगळे आय डी हुषार आणि बोलके आहेत. आता निदान काहीतरी मत यावं किंवा आपला समज चुकीचा होता हे मोठ्या मनाने सांगावं, ही किमान अपेक्षा. नाहीतर भाऊ आणि यांच्यात काय फरक?

जे स्वतःला शहाणे समजतात ह्यांची हीच अवस्था होते. कतार ,मुंबई इतका पण नसेल पण ह्यांना पूर्ण शरण यायला लावले. आज पर्यंत बाकी सरकार कोणत्या ही ही पक्षाची असू ध्या... महत्वाचे निर्णय प्रतेक व्यक्ती चे मत ऐकून घेत होते. भले तो विरोधी पक्षातील असेल तरी. Bjp चे अती शहाणे फक्त जय मोदी आणि जय अमित शाह. हेच करत राहिले. पुढे अजून नालस्ती होणार आहे. ही फक्त झलक होती.

In reply to by श्रीगुरुजी

लोचट माणसांच्या नादी लागत नाही पण, खालील वाक्यांत त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे ..... Mipa चा वापर करून आर्थिक फायदा करून घेत आहेतं.... अशावेळी, गप्प बसलो तर, संशयाला वाव राहतो ...

In reply to by मुक्त विहारि

तुमचे एककल्ली प्रतिसाद पाहीले की तसेच वाटते. म्हणजे पुणे महापालीकेतील (जिथे भाजपची सत्ता आहे) गैरव्यवहारासाठी तुम्ही राज्य शासनाला जबाबदार धरले होते. तेव्हा पासून बर्याच मिपाकरांना ही शंका वाटतेय.

In reply to by श्रीगुरुजी

मुद्द्यात हरलो की विषय भरकटवायचा म्हणूनसमोरच्याला मुर्ख ठरवण्याची तुमची कला वाखाणणिया जोगी आहे.

आधी - शिवसैनिकांनीच बाबरी पाडली. (अर्थात मुंबईत घरात बसून रिमोट कंट्रोल वापरून बाबरी पाडली) आता - श्रीराममंदीरासाठी हजारो शिवसैनिकांनी बलिदान दिले. (अर्थात अयोध्येत पाऊल न ठेवता मुंबईत बसून जिवंत राहून बलिदान दिले) नंतर - शिवसैनिकांनीच समुद्रावर सेतू बांधून लंकेत जाऊन रावणाचा वध करून सीतेला रावणाच्या बंदीवासातून मुक्त केले.

In reply to by श्रीगुरुजी

हा हा हा .. त्यांच्या टिवटिवाटाखाली मस्त प्रतिसाद आहेत. मजा येते वाचायला ... बाकी मोजुन १५ लोक आहेत.

त्या मध्ये सेना च मुंबई मध्ये हिंदू रक्षणासाठी रस्त्यावर होती bjp कार्यकर्ते आणि नेते कुठेच नव्हते. हे १००% सत्य आहे.

जुलै मध्ये भारताचे राष्ट्र पती निवडले जातील. Dr. कलाम सहेबांसारखे च कर्तुत्व वान राष्ट्रपती भारताला लाभावे अशी इच्छा. सर्व राजकीय पक्षांनी ...सर्व राजकीय हेतू बाजूला ठेवून बैल राष्ट्र पती न निवडता. भारतातील अतिशय हुषार आणि स्व बुद्धी असणाऱ्या गैर राजकीय व्यक्ती ला सर्व समंतीने राष्ट्रपती म्हणून निवडावे . बैल आणि राजकीय व्यक्ती बिलकुल नकोत.

In reply to by sunil kachure

तुमच्या सारख्या सर्वज्ञानी व अभ्यासू माणसाने राष्ट्रपती निवडणुकीला उभे राहायला हवे. तुमची निवडून यायची शक्यता ९९.९९ टक्के नक्कीच आहे. सातार्‍यातील अभिजीत बिचकुले राष्ट्रपती निवडणुकीला उभा राहु शकतो तर तुमच्या सारखा सर्वज्ञानी का नाही?

In reply to by प्रसाद_१९८२

बिचुकले आणि राऊत यांच्यापैकी कोणाला निवडाल असे विचारले तर तुमचे उत्तर काय असेल

In reply to by sunil kachure

राष्ट्रपती सारख्या सन्माननीय पदाच्या समोर बैल अस शब्द लिहीताना किंवा विचार करतान तुम्हाला अजिबातच लाज शरम वगैरे काहीच वाटत नाही कां?

बकवास,भावनिक, बिन कामाचे विषय इथे मांडणारे महत्वाचे विषय कधीच मांडत नाही. एलआयसी ची share बाजारात एन्ट्री झाल्या बरोबर आणि सरकार त्यांचे शेअर विकणार हे जाहीर पने सरकार नी सांगितल्या मुळे. एलआयसी शेअर च भाव रोज कमी कमी होत आहे.. हे हर्षद मेहता सारखे दलाल करत असणार हे नक्की. म्हणजे अगदी फालतू किमतीत lic ताब्यात घेण्याचा डाव आखलेला आहे.

आज संध्याकाळी महाराष्ट्रातील सहा राज्यसभा जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल लागेल. या निवडणुकीत आमदारांनी मत दिलेली मतपत्रिका पक्षाने नियुक्त केलेल्या निरीक्षकाला दाखवावी लागत असल्याने समजा कोणा आमदाराने पक्षाच्या उमेदवाराला मत न देता अन्य कोणा उमेदवाराला मत दिले तर ते लगेच जगजाहीर होणार असल्याने या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग व्हायची शक्यता त्या मानाने कमी वाटते. अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांनी आयत्या वेळेस मत बदलले तर तीच एक शक्यता आहे. तरीही या निवडणुकीत महाविकास आघाडीची चलबिचल मात्र लगेच जाणवत होती. जर आपले चारही उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येतील ही खात्री असेल तर मग भाजपने आपला तिसरा उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती करायला फडणवीसांची भेट घेणे तसेच जिंकून यायला पहिल्या पसंतीची ४१ मते गरजेची असतानाही काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगडींना सगळ्या ४४ काँग्रेस आमदारांना मत द्यायला सांगणे वगैरे गोष्टी महाविकास आघाडीत पसरलेली भिती दर्शवितात. जर काँग्रेसला आपल्या सगळ्या आमदारांवर विश्वास असेल तर मग ४१ आमदारांना प्रतापगडींना मत द्यायला सांगून उरलेल्या तीन आमदारांना शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना मत द्यायला सांगता आले असते. पण तसे होताना दिसत नाही. तसेच शिवसेनेने सगळ्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलात उतरविणे आणि इतकेच नाही तर हॉटेलभोवती शिवसैनिकांचा गराडा ठेऊन आमदारांवर लक्ष ठेवणे हे प्रकार आपल्याच आमदारांवर विश्वास नसल्याचे लक्षण आहे. २० जून रोजी होणार्‍या विधानपरिषद निवडणुकांमध्ये पूर्णपणे गुप्त मतदान असणार आहे आणि त्या निवडणुकीत आमदारांना आपली मतपत्रिका कोणालाही दाखवावी लागणार नाही. तसेच १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीत मतदान होणार आहे. त्या निवडणुकीतही असे गुप्त मतदान असणार आहे. त्यामुळे जर क्रॉस व्होटिंग व्हायचे असेल तर त्या निवडणुकांमध्ये व्हायची शक्यता जास्त. त्यातून विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपच्या ४ जागा निवडून येणार्‍यातल्या असल्या तरी पक्षाने ६ उमेदवार दिले आहेत. त्यामुळे तिथे क्रॉस व्होटिंग होईल अशी शक्यता पक्षाला वाटते असे दिसते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भाजपच्या धनंजय महाडिक यांनी सेनेच्या संजय पवारांचा पराभव करून राज्यसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीत धक्कादायक विजय मिळविला. मविआच्या ९ ते १० आमदारांनी महाडिकांना मत दिल्याने संजय पवार हरले. पवार-ठाकरे यांच्या कूटनीतिला फडणवीसांनी धोबीपछाड देऊन सपशेल लोळवून विजय खेचून आणला. मागील काही दिवस उर्मठपणे बरळून फुशारक्या मारणारे संजय राऊत घोडेबाजार वगैरे आरोप करून नैतिक विजय आमचाच झाला अशा फुशारक्या मारतीलच. आता तर राष्ट्रपती पदावर सेनेचाच माणूस बसणार अशी फुशारकी राऊतांनी कालच ट्विटरवर मारली. भविष्यात राष्ट्रपती पदाबरोबर उपराष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख, क्रिकेट संघाचा कर्णधार, अमेरिकेचा अध्यक्ष, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस . . . इ. पदांवरही सेनेचाच माणूस बसणार हे नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

फडवणीसांचे आजारपण , मविआ चे रेसॉर्ट प्रेशर टॅक्टिस , अपक्ष तसेच सपा व ईतर मुस्लिम पक्षांचे मविआ ला मत वगेरे बाबी बघुन मला महाडिक यांचा पराभव होइल असे वाटले होते. त्यात ठाकरे यांचे नंतर पार्टी करु वगेरे विधान यामुळे आजचा हा निकाल खुप अनपेक्षित होता. पाण्यासारखा पैसा ओतुनही शेवटी सेनेचा दुसरा उमेदवार हरलाच. संभाजी राजांना पाठिंबा दिला असता तर नाक वाचवता आले असते. आता तेल गेले तुप गेले हाती धुपाटणे अशी अवस्था झाली आहे. दुसरी मला न समजलेली बाब म्हणजे प्रतापगडी यांना पडलेली ४४ मते. विजयासाठी ४१ मते आवश्यक असताना ४४ मते द्यायला लावणे म्हणजे मविआ मधेच एकमत नाही हे अधोरेखित होते.

In reply to by सुक्या

संभाजी राजांना पाठिंबा दिला असता तर नाक वाचवता आले असते. पक्षात आला तरच पाठिंबा देऊ ही ठाकरेंची भूमिका योग्य होती. मागील सहा वर्षात संभाजीराव भोसलेंनी कोणत्याही पक्षात प्रवेश न करता आपल्याला हवे तेव्हा मोदींना विरोधही केला होता . त्याविरूद्ध भाजपला काही करता येत नव्हते. अपक्ष म्हणून निवडून गेले असते तर ते प्रत्येक वेळी सेनेला पाठिंबा देण्याची कोणतीच शाश्वती नव्हती. मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा पण मी कोणत्याही पक्षाशी बांधील राहणार नाही, ही भूमिकाच चमत्कारिक होती. मला कंपनीने पगार, भत्ते, बोनस, रजा, निवृत्तीवेतन वगैरे सर्व फायदे द्यावे परंतु मी कंपनीच्या पेरोलवर येणार नाही व नोटीस पिरीयड वगैरे नियम पाळणे माझ्यावर बंधनकारक नाही, असे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बाबतीत कोणतीही कंपनी करीत नाही. त्यामुळेच या संदर्भात ठाकरेंनी योग्य भूमिका घेतली होती.

In reply to by श्रीगुरुजी

केवळ एका घराण्यात जन्माला आले म्हणून लोकांनी त्यांना मन द्यावा किंवा त्यांना कोणतेही प्रश्न न विचारता निवडून द्यावे हि गोष्ट अनाकलनीय आहे. हे म्हणजे महात्मा गांधीजींच्या मुलांनी आम्हाला खासदारकी मंत्रिपद द्या म्हणण्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून जनतेने त्यांना नमस्कार करणे इतपत ठीक आहे. केवळ त्या घराण्यात जन्माला आले म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देणे हे अमान्य आहे

In reply to by सुबोध खरे

छत्रपती घराण्याचा दबाव, मराठा संघटनांचा दबाव, पक्षांतर्गत दबाव, सहकारी पक्षांचा दबाव, माध्यमांचा दबाव अशा कोणत्याही दबावाखाली न झुकता ठाकरे ठाम राहिले हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ठाकरेंच्या जागी फडणवीस असते तर नक्की दबावाखाली झुकले असते.

In reply to by श्रीगुरुजी

खासदारकीसाठी एखाद्या पक्षाकडे मते मागण्यात काहीही चूक नाही, बर ही मत मागताना मी राज घराण्यातील आहे म्हणून मलाच मत दिली पाहिजे अशी कोणतीही मागणी त्यांनी केल्याचं मलातरी माहिती नाही. सध्यातरी राज्यात आशा कोणत्याही पावरफुल मराठा संघटना नाहीत ज्या आहेत त्या कोणत्यातरी पक्षच्या दावणीला बांधलेल्या आहेत. राजघराण्यातील असल्या मुळे लोक फार फार तर त्यांना आदर देतात, उद्या निवडणुकीला उभे राहिले तर पडण्याचीच शक्यता जास्त आहे.

धनंजय महाडिक = एकूण मते ४१.८६ संजय पवार = एकूण मते ३८.५८ मविआच्या मलिक व अनिल देशमुख यांना न्यायालयाने मत देण्याची परवानगी दिली नाही, तर सेनेच्या सुहास कांदेंचे मत बाद झाले. या तिघांची किंवा किमान दोघांची मते असती तर संजय पवार यांची प्रथम व द्वितीय क्रमांकाची मते मिळून नक्की जिंकले असते.

In reply to by श्रीगुरुजी

राज्यसभा निवडणुकीत आलेले मतांच्या आकड्यांमध्ये थोडे जास्त डोकावून बघून काही निष्कर्ष निघतात का हे तपासून बघू. एकूण मतदारः २८४ पहिल्या फेरीत मिळालेली मते: पियूष गोयलः ४८ अनिल बोंडे: ४८ इम्रान प्रतापगढी: ४४ प्रफुल पटेलः ४३ संजय राऊतः ४१ संजय पवारः ३३ धनंजय महाडीकः २७ याचा अर्थ महाविकास आघाडीला १६१ तर भाजप आघाडीला १२३ मते मिळाली आहेत. भाजपचे स्वतःचे १०६ आणि रवी राणा, विनय कोरे वगैरे अपक्ष मिळून भाजप आघाडीकडे ११३ मते होती असे सगळे न्यूज चॅनेल्स सांगत होते. याचा अर्थ भाजप आघाडीने महाविकास आघाडीची १० मते फोडली आहेत. हे गणित दिसते तितके साधे आहे का? भाजप आघाडीला आपल्या सगळ्या ११३ मतांवर पूर्ण विश्वास असेल आणि जिंकून यायला आवश्यक कोटा ४१ मतांचा असेल तर भाजपचे तीन उमेदवारांसाठी ४१+४१+३१ किंवा फार तर ४२+४२+२९ असे गणित असायला हवे होते. जर धनंजय महाडीकांना पहिल्या फेरीत २७ मते मिळाली असतील आणि भाजप आघाडीचे एकही मत फुटले नाही हे गृहित धरले तर भाजपचे गणित ४३+४३+२७ असे होते असे म्हणायला हवे. पण पियूष गोयल आणि अनील बोंडेंना प्रत्येकी ४८ मते मिळाली आहेत. याचाच अर्थ प्रत्येकी कमितकमी ५ (आणि जास्तीतजास्त ७) जास्तीची मते या दोन उमेदवारांना मिळाली आहेत. म्हणजे भाजप आघाडीला जास्तीची १० ते १४ मते मिळाली. जर जास्तीची १० मते भाजप आघाडीला मिळाली असतील तर त्यांचे एकही मत फुटले नाही. पण जास्तीची ११/१२/१३/१४ मते भाजप आघाडीला मिळाली असतील तर त्यांचीही अनुक्रमे १/२/३/४ मते फुटली असे म्हणायला हवे. भाजप आघाडीचे एक मत फुटले असे शरद पवारांनी म्हटले ते पूर्ण तथ्यहिन नसावे असे वाटते. समजा सुहास कांदेंचे मत जरी ग्राह्य धरले गेले असते तरी त्यांनी संजय राऊतांना पहिल्या क्रमांकाचे मत दिले असल्याने त्यामुळे निकालात फरक पडला नसता. त्यातही एक महत्वाची गोष्ट म्हणजे सुहास कांदे निवडून आले आहेत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मधून पंकज भुजबळांना हरवून. पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये समजा महाविकास आघाडी राहिली तर छगन भुजबळ ती जागा हट्टाने राष्ट्रवादीसाठी मागून घेतील (जशी १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ठाण्याची जागा ठाकरेंनी शिवसेनेसाठी मागून घेतली होती आणि प्रमोद महाजनांच्या भाषेत भाजपने तो 'राजहट्ट' पुरवला होता) ही शक्यता ध्यानात घेऊन सुहास कांदेंनी पुढे भाजपात जायचा मार्ग मोकळा असावा म्हणून आपले मत बाद होईल अशी कृती मुद्दामून केली होती का? कल्पना नाही. जर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांची मतेही संजय पवारांना मिळाली असती तर कदाचित ते विजयी झाले असते. पण याविषयी दोन गोष्टी लिहाव्याशा वाटतात- एक तर जर-तर ला अर्थ नसतो. त्या दोघांना न्यायालयाने मतदान करायला जायची परवानगी दिली नाही ही सत्य परिस्थिती आहे ती नाकारून काहीच अर्थ नाही. आणि जर-तर चे तर्क लढवायचेच असतील तर मग १९९९ च्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस ओरिसाचे मुख्यमंत्री असलेले गिरीधर गोमांगो लोकसभेत उपस्थित राहून त्यांनी वाजपेयी सरकारविरोधात मत दिले नसते तर वाजपेयींचे सरकार एका मताने पडायच्या ऐवजी एका मताने वाचले असते असाही तर्क लढवता येऊ शकेल. पण असे तर्क लढवायला शून्य अर्थ असतो. दुसरे म्हणजे समजा अगदी ती दोन मते मिळून संजय पवार जिंकले जरी असते तरी महाविकास आघाडी वाटते तितकी आणि जितके चित्र उभे केले आहे तितकी अभेद्य नाही, त्यांच्यात भरपूर अंतर्विरोध आहेत हे चित्र लोकांपुढे आणायचा भाजपचा हेतू असेल तो साध्य झालाच. धनंजय महाडीक जिंकणे ही लॉटरी आहे.

सेनेचा गेम सर्व पक्षांनी मिळून वाजवला.. सेनेकडे कोणीही चाणक्य नाही हे प्रकर्षाने दिसून आले . सेनेत सगळा सावळा गोंधळ आहे..

In reply to by श्रीगुरुजी

राऊत पाचकळ वाचाळवीर आहे.. त्याची लायकी चंपा , शेलार, संबित पात्रा एवढीच आहे पवार स्वतः मैदानात उतरले नाहीत कारण त्यांना ह्याचा आधीच अंदाज आला होता

मुकेश पटेल यांना एक मत जास्त मिळाले आहे आणि ते आघाडीचे नाही .ते कोठून आले आहे जे मला माहित आहे असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. म्हणजे bjp मध्ये पण एक फुटीर आहे. पण तो कोण? असा प्रश्न निर्माण करून पवार साहेबांनी फडणवीस ह्यांना धंद्याला लावले आहे.

नूपूर शर्माच्या समर्थनार्थ एक ऑनलाइन पिटीशन सुरू झाली आहे. समर्थकांनी पिटीशन उघडून सिग्नेचर करावी. https://chng.it/NRJTGtWQ

In reply to by श्रीगुरुजी

काय ते दुर्दैवं. देशात हिंदूंचं सरकार हवं होतं. एका खरं बोलनार्या स्त्री ला पाठींबा द्यायला पेटीशन काढावी लागतेय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Link ओपन करून बघितली 6 दिवसापूर्वी ही सह्यांची मोहीम कोणी तरी सिन्हा आहे त्यांनी चालू केली आहे 113 लोकांनीच सही केली आहे. येथील bjp समर्थन करणाऱ्या लोकांनी पण सही केली नसणार.

पण राजकारणातील धोरण ठरवतात का? २) मविआच्या ९ ते १० आमदारांनी महाडिकांना मत दिल्याने संजय पवार हरले. - या महाडिकांचे पक्षातीत मैत्रीसंबंध आहेत काय?