Skip to main content

ताज्या घडामोडी मे २०२२(भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी सोमवार, 16/05/2022 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. काल (१५ मे २०२२ रोजी) त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते माणिक साहा यांनी शपथ घेतली. मार्च २०१८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला आणि बिप्लब देब यांना मुख्यमंत्री केले गेले. सुरवातीचा महिना-दीड महिना मुख्यमंत्री झाल्याचं वारं या गृहस्थांच्या अंगात इतकं शिरलं होतं की ते विनाकारण बाष्कळ आणि अनावश्यक बडबड करत सुटले. महाभारत काळात इंटरनेट होतं ही त्या मानाने बरीच निरूपद्रवी बडबड होती. सगळ्यात आक्षेपार्ह बडबड होती १९९७ मधील विश्वसुंदरी डायना हेडन विषयी. बिप्लब देब यांनी म्हटले होते- डायना हेडनचे सौंदर्य ऐश्वर्या रायप्रमाणे 'भारतीय सौंदर्य' नाही. त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले. एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्‍याला मुख्यमंत्री केले. विजय रूपाणींकडून राजीनामा घेतल्यावर नवा नेता निवडायला झालेल्या आमदारांच्या बैठकीत हे भूपेंद्र पटेल शेवटच्या रांगेत बसायला चालले होते तेव्हा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले गेले असे बातम्यांमध्ये आले होते. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्येही पक्षाने नवे मुख्यमंत्री नेमले. आता १० महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होते ते बघायचे.

वाचने 30442
प्रतिक्रिया 265

प्रतिक्रिया

एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे.
एक वर्ष अशी सुधारणा हवी.

त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले. मोदी शहांनी असाच दम महाराष्टरातील भाजप नेत्याना भरायला हवा. कधी सांगतात निवडणूक हरलो की हिमालयात जाईन. पण हरल्यावरही महाराष्ट्रातच ठाण मांडून आहेत. अजूनही काही काही बोलत असतात समाज माध्यमांवर. मोदींच्या गुरूंवर टिका करणे तर रोजचेच झालेय. मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. आपल्या ताब्यातल्या नी आपल्या ईशार्यावर चालनारा मामू मोशांना हवा असतो. एक प्रकारे हुकूम शाहीच आहे ही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

:) गली गली तेरी राह चल्ली

ह्या वर तर bjp चे वरिष्ठ नेते जाम खुश झाले असणारं. त्या वरून मोदी ,शाह त्यांना दम देतील असे वाटत नाही. ताटा खालचे मांजर हा व्यक्ती बनू शकणार नाही म्हणून यांना हटवून गुलामी ची सवय असलेल्या व्यक्ती ल मुख्य मंत्री केले गेले आहे. यूपी मध्ये bjp नीच योगी ना डोक्यावर घेतले पण आता . वरिष्ठ नेत्यांना सहन पण होत नाही आणि सांगता पण येत नाही अशा स्थिती त राहण्याची वेळ आली आहे. राज ठाकरे दौरा,ब्रीज भूषण विरोध.राज ठाकरे नी काहीच कॉमेंट न करणे सरळ ब्रीज भूषण लं इंगोर करून दौऱ्याची तयारी करणे,काही तरी राजकीय उलथापालथ यूपी मध्ये नक्की होणार.

कचरे बुवा आपला लिहिणारा डावा मेंदू आणि विचार करणारा उजवा मेंदू यात सामंजस्य आणि संवाद नाही हे आपण परत परत का सिद्ध करताय?

In reply to by काड्यासारू आगलावे

हायला त्यानि खालीच लिहिलेले प्रतिसाद वाचून सुद्धा तुम्हाला असं वाटतंय का कि त्यांचे प्रतिसाद लिहायच्या अगोदर काही खोल विचार असतील? तसं असेल तर धन्य आहे तुमची आणि कचरेबुवांची सुद्धा. कोणती तरी ज्ञान दीप मशीद. आता गहू देशातून गायब होण्याच्या मार्गावर आहे पूजा अर्चा करण्याला आक्षेप नाही. गोदी मीडिया ही पूजा अर्चा highlite करतं आहे. देशाचे पंत प्रधान आहात .दोन्ही देशातील नात्यावर काय करता येत आहे का. त्या वर चर्चा करा. उभय पक्षी दोन्ही देशांना फायद्याचे करार करा,चर्चा करा. उत्तर प्रदेश हे राज्य देशासाठी डोके दुखी च आहे. मुस्लिम आक्रमक मंदिर तोडत होती तेव्हा हे नक्कीच सत्ताधारी लोकांची स्तुती करत असणार . स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी. दक्षिणेत विजापूर लं मुघल राज्य होते तिथे नाही मंदिर पाडून मशिदी निर्माण झाल्या,महाराष्ट्रात नाही झाल्या..बाकी कोणत्या राज्यात नाही झाल्या ..जे काय झाले ते यूपी मध्येच.

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब. जागतिक मानदंडाच्या पार पलिकडे गेलेले आहे.

मशीद मंदिर असले वाद लगेच थांबणे गरजेचे आहे आता नवीनच उकरून काढले आहे कोणती तरी ज्ञान दीप मशीद. आता ती वेळ नक्कीच नाही. देशात इंधन चे दर प्रचंड वाढले आहेत.त्या साठी नेहरू ,इंदिरा गांधी ह्यांना दोष देवून झाले. खाद्य तेल, डाळी सर्व गरजेच्या वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत आता गहू देशातून गायब होण्याच्या मार्गावर आहे. देश गंभीर स्थिती मध्ये आहे..युक्रेन रशिया युद्ध मुळे हो स्थिती आली असा दावा करणे बेजबाबदार पना आहे. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. पक्ष भेद विसरून लोकांनी केंद्रीय सरकार जी चुकीची धोरण राबवत आहे त्या वर विचार व्यक्त करणे गरजेचे आहे. नाहीतर श्री लंका शी जवळ जाणारी स्थिती भारतात निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे. हनुमान चालीसा,मंदिर,भोंगे आता बाजूला ठेचा. देशाची आर्थिक स्थिती सुधारली की मग खेळत बसू. तो खेळ.

असे वक्तव्य दिल्लीत काश्मिरी पंडित च्या नेत्याने केले आहे.ती बातमी वाचली पण आता मिळत नाही .नाहीतर लिंक दिली असती. काश्मिरी पंडितांना काश्मीर मध्ये परत बसवण्याची कोणतीच ठोस योजना सरकार कडे नाही. आता ज्या काश्मिरी पंडिता ची काश्मीर मध्ये हत्या अतिरेकी लोकांनी केली. त्यांनी मागणी करून पण त्यांना सुरक्षा दीली नव्हती. काश्मीर पंडित राजकीय साठे मारी चे बळी ठरत आहेत.

भारताचे पंत प्रधान नेपाळ मध्ये गेले आणि तिथे गेल्यावर तेथील एका मंदिरात जावून पूजा अर्चा केली. पूजा अर्चा करण्याला आक्षेप नाही. गोदी मीडिया ही पूजा अर्चा highlite करतं आहे. देशाचे पंत प्रधान आहात .दोन्ही देशातील नात्यावर काय करता येत आहे का. त्या वर चर्चा करा. उभय पक्षी दोन्ही देशांना फायद्याचे करार करा,चर्चा करा. धार्मिक यात्रेला नंतर जा. युरोपियन देशांचे प्रमुख भारतात येतात ते त्यांच्या देशाचा फायदा बघतात की चर्च मध्ये जावून प्रार्थना करतात.

भारताचे पंत प्रधान नेपाळ मध्ये गेले आणि तिथे गेल्यावर तेथील एका मंदिरात जावून पूजा अर्चा केली. पूजा अर्चा करण्याला आक्षेप नाही. गोदी मीडिया ही पूजा अर्चा highlite करतं आहे. देशाचे पंत प्रधान आहात .दोन्ही देशातील नात्यावर काय करता येत आहे का. त्या वर चर्चा करा. उभय पक्षी दोन्ही देशांना फायद्याचे करार करा,चर्चा करा. धार्मिक यात्रेला नंतर जा. युरोपियन देशांचे प्रमुख भारतात येतात ते त्यांच्या देशाचा फायदा बघतात की चर्च मध्ये जावून प्रार्थना करतात.

वाराणशीमध्ये तथाकथित ग्यानव्यापी मशिदीत न्यायालयाच्या आदेशावरून केलेल्या सर्वेक्षणात एक शिवलिंग सापडले आहे. ती जागा सील करायचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. https://indianexpress.com/article/cities/lucknow/gyanvapi-mosque-case-v… ती (आणि इतर अनेक ठिकाणच्या) मशिदी मुळातील हिंदू मंदिरे उध्वस्त करून बांधलेल्या आहेत हे निधर्मीपणाची फुकाची झापडे लावलेल्या विचारवंत मंडळीसोडून सगळ्यांना कळू शकते. ते या निमित्ताने जगजाहीर होत आहे ही चांगली गोष्ट आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मला तर वाटते की ज्ञानवापी मशीद इशू हा मुस्लिम समाजाला आलेला एक मोठा चान्स आहे, ज्ञानवापी ही औरंगजेबाने हिंसा करून मिळवलेली जागा होय हे तर ऐतिहासिक सत्य होय, ती परत हिंदूंना मिळणे इष्ट, अश्या प्रसंगी अतिशय दिलदारपणे स्वतःच्या सेक्युलरीजमचे उदाहरण ठरेल अशी कृती करत मुस्लिम समाजाने ती मशीद अन तिच्यावरचा हक्क लागलीच सोडला तर १. त्यांचे सेक्युलरीजम बेगडी नाही कळकळ असणारे आहे, हे सिद्ध होईल २. मुसलमान समाजाला बळी पाडणारा तथाकथित संघ भाजपचा एजंडा मुळात नष्ट होईल ३. इतके बंधुभाव जपल्यामुळे पोलरायजेशन होणार नाही अन त्या इशुचा भाजपसारख्या फॅसिस्ट पक्षाला निवडणुकीत फायदा होणार नाही ;)

In reply to by जेम्स वांड

हा प्रश्न मला अयोध्या आंदोलनाच्या वेळेसही पडायचा. मुळातील मंदिरे पाडून मशिदी बांधल्या अशी कित्येक ठिकाणे देशात आहेत. त्यापैकी फक्त तीन ठिकाणे मागितली जात असतील तर ती दिलदारपणे द्यायला मुस्लिम समाजाला नक्की कोणती अडचण होती? तसे झाले असते तर मग अयोध्या प्रश्नावरून इतकी वर्षे आंदोलन झाले, कित्येक लोकांचे बळी त्या प्रकरणात गेले हे सगळे टाळता आले नसते का? इतकेच नव्हे तर विचारवंत मंडळींनीही सगळ्यांनी एकजात हिंदूंनाच लेक्चरबाजी केली. त्यापैकी एकानेही मुस्लिम समाजाला- या तीन जागा तुम्ही आपण होऊन सोडून का देत नाही हा प्रश्न विचारला नाही. अयोध्या आंदोलन चालू होते तेव्हा तर एक गोष्ट वारंवार सांगितली जायची की तथाकथित बाबरी मशिदीत १९३६ की १९३८ पासून नमाज पढली गेलेली नाही. तसे असेल तर मग ती जागा सोडायला नक्की कोणती हरकत होती? अगदी कल्याणसिंगांनी स्वतः म्हटले होते की मुस्लिम समाजाने ती जागा सोडल्यास पंचक्रोशीबाहेर मशिद बांधू आणि त्यासाठी पहिली वीट मी स्वतः नेईन. पण अशी सामंजस्याची भूमिका मुस्लिम समाजातून घेतली गेली नाही. आणि तशी घ्यायचा प्रयत्न जरी कोणी केला असता तर मुल्लामौलवींपेक्षा अति शिकलेल्या विचारवंतांनीच तो आवाज दाबायचा प्रयत्न केला असता हे नक्की.

In reply to by जेम्स वांड

जावून काही शे वर्ष झाली,त्या नंतर अनेक लोकांनी भारतावर सत्ता गाजवली ब्रिटिश आले आणि गेले 75 वर्ष स्वतंत्र होवून झाली. यूपी मध्ये इतके हिंदू बाहुबली ,गुंड आहेत ते पण हिंदू ह्यांनी फक्त हिंदू लोकांनाच लुटले... राज्यातील हिंदू देवस्थान ची मालकी मुस्लिम लोकांकडे आहे त्यांच्या विरुद्ध आपल्या गुंड ताकती चा वापर केला नाही. फक्त राज ठाकरे ने दम देण्यात च ह्यांची फुस्की मर्दांगी आहे.. कोण कुठले मुघल ह्यांनी उत्तर भारत काबीज केला .तेव्हा ह्या श्री रामाच्या वंशजांना शुर पना कुठे गेला होता. मला तर यूपी मधील कोणत्याच हिंदी देवालय च्या इश्यू शी लक्ष द्यावे असे पण वाटत नाही. 2024 जवळ आले की असे मुद्दे येणार आणि नंतर 2028 पर्यंत सर्व शकतं

उत्तर प्रदेश हे राज्य देशासाठी डोके दुखी च आहे. बेरोजगार लोकांच्या फौजा निर्माण करणारे,जातीय द्वेष मध्ये पूर्ण बुडालेले,गुन्हेगारी वृत्ती ची लोक जास्त असणारे,देश भर करोडो बेरोजगार पाठवणारे आणि देशातील सुंदर शहरांना बकाल बनवणारे. हे तर आहेच आणि हे पण आहे बाबरी मशीद,आता ही कोणती ज्ञाध ््ज्ञा न व्यापी मशीद. हिंदू मंदिर पाडून त्याचे मशिदीत रूपांतर . ही अशी स्थान पण ह्याच राज्यात. देशाने का स्वतःचे लक्ष तिकडे द्यावे. मुस्लिम आक्रमक मंदिर तोडत होती तेव्हा हे नक्कीच सत्ताधारी लोकांची स्तुती करत असणार . स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी. जसे पूर्ण देश केंद्रीय सरकार च्या आर्थिक निती चा विरोध करत आहे आणि यूपी त्यांनाच प्रचंड मतदान करत आहे . दक्षिणेत विजापूर लं मुघल राज्य होते तिथे नाही मंदिर पाडून मशिदी निर्माण झाल्या,महाराष्ट्रात नाही झाल्या..बाकी कोणत्या राज्यात नाही झाल्या ..जे काय झाले ते यूपी मध्येच.

In reply to by धनावडे

पाहिले स्पष्टीकरण देवून कसे चुकीचे आहे ते सिद्ध करा आणि नंतर . 'hya माणसाला काय लिहत आहे ते स्वतःलाच कळत नाही" हा पारंपरिक डायलॉग मारा.. अजून देश द्रोही हे लेबल लावलं नाही हे नशीब. शेतकरी देश द्रोही,शीख देश द्रोही,काँग्रेस देश द्रोही,ममता देश द्रोही, मुस्लिम देश द्रोही आणि हेच फक्त देश प्रेमी रुपया चे मूल्य ८० रुपये प्रति डॉलर होण्यासाठी वाटचाल करणारे.

In reply to by धनावडे

पाहिले स्पष्टीकरण देवून कसे चुकीचे आहे ते सिद्ध करा आणि नंतर . 'hya माणसाला काय लिहत आहे ते स्वतःलाच कळत नाही" आणि नंतर हा पारंपरिक डायलॉग मारा.. अजून देश द्रोही हे लेबल ला यवलं नाही हे नशीब. शेतकरी देश द्रोही,शीख देश द्रोही,काँग्रेस देश द्रोही,ममता देश द्रोही, मुस्लिम देश द्रोही आणि हेच फक्त देश प्रेमी रुपया चे मूल्य ८० रुपये प्रति डॉलर होण्यासाठी वाटचाल करणारे.

In reply to by धनावडे

पाहिले स्पष्टीकरण देवून कसे चुकीचे आहे ते सिद्ध करा आणि नंतर . 'hya माणसाला काय लिहत आहे ते स्वतःलाच कळत नाही" आणि नंतर हा पारंपरिक डायलॉग मारा.. अजून देश द्रोही हे लेबल ला लावले नाही हे नशीब. शेतकरी देश द्रोही,शीख देश द्रोही,काँग्रेस देश द्रोही,ममता देश द्रोही, मुस्लिम देश द्रोही आणि हेच फक्त देश प्रेमी रुपया चे मूल्य ८० रुपये प्रति डॉलर होण्यासाठी वाटचाल करणारे.

प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्‍याला मुख्यमंत्री केले.
ह्यात अजून एक महत्वाचा मुद्दा जोडायचा राहिलाय तो म्हणजे भुपेंद्रभाई प टे ल आडनाव अन जात असलेले असणे, २०१७ निवडणुकीनंतरच तर नितीन पटेल खूप इच्छूक होते मुख्यमंत्री पदाला, पण समहाऊ ते नरेंद्रभाई आणि अमितभाईंना इतके अपील झाले नाहीत, राज्य भाजप अध्यक्ष सी आर पाटील हे नाव पण खूप चर्चेत होते अर्थात मराठी माणूस गुजरातेत इतका वर पोचला हेच खूप झाले, जय जय गर्वी गुजरात पंचलाईनला सी आर पाटील फिट बसले नसते, त्यामुळे भुपेंद्रभाई ह्यांची वर्णी लागलेली दिसते एकदम तडकाफडकी, अर्थात सत्तालक्ष्मी त्यांना लाभदायी ठरो ह्या शुभेच्छा आहेतच कायम :)

In reply to by जेम्स वांड

भूपेंद्र पटेल यांना एकदम मुख्यमंत्री बनविण्यामागे आणखी एक गणित होते. गुजरातमध्ये भाजप मार्च १९९५ पासून (ऑगस्ट १९९६ ते मार्च १९९८ हा काळ वगळता) सतत सत्तेत आहे. त्यामुळे प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसायची शक्यता कमी व्हावी म्हणून पूर्वीपासून सत्तापदे भूषविलेल्या लोकांना दूर ठेवणे हे एक कारण होते असे दिसते. नितीन पटेल पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत पण ते १९९५ मध्ये केशुभाई पटेलांचे पहिले भाजप सरकार स्थापन झाले त्या मंत्रीमंडळातही होते. मला वाटते त्यांचा २००२ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने ते २००२-२००७ या काळात मंत्री नव्हते पण तो काळ सोडला तर १९९५ पासून अगदी २०२१ पर्यंत नितीन पटेल प्रत्येक भाजप मंत्रीमंडळात होते. त्यांनाच परत मुख्यमंत्री केले असते तर प्रस्थापितविरोधी मते टाळणे हा उद्देश सफल झाला नसता असे मोशांना वाटले असावे. बहुदा त्याच कारणाने आताही भूपेंद्र पटेलांच्या मंत्रीमंडळात पूर्वी एकदाही मंत्रीपद न मिळालेली अशी सगळी नवीन टीम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे २०१७ मध्ये मुख्यमंत्री केले न गेल्यामुळे ते नाराज होते अशा बातम्या होत्या. पक्षातील आतल्या गोष्टी मोशांना आपल्यापेक्षा नक्कीच जास्त माहित असतील. ते पण नितीन पटेलांना डावलण्याचे एक कारण असू शकेल. भूपेंद्र पटेलांना मुख्यमंत्री बनविण्यामागे जात हे कारण किती महत्वाचे होते याची कल्पना नाही. २०१६ मध्ये पटेल आरक्षण आंदोलन जोरात असताना विजय रूपाणी या जैन व्यक्तीला मुख्यमंत्री बनविले होते. तसेच महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणातही त्या राज्यातील संख्येने अधिक असलेल्या जातींमधील मुख्यमंत्री न करता दुसर्‍या जातींमधला मुख्यमंत्री बनविला होता. पण कर्नाटकात मात्र येडियुराप्पा या लिंगायत मुख्यमंत्र्यानंतर बसवराज बोम्मई हा पण दुसरा लिंगायत मुख्यमंत्रीच केला. तेव्हा भूपेंद्र पटेल आणि बसवराज बोम्मई यांना जातीच्या कारणाने मुख्यमंत्री केले की त्यांना अन्य कारणाने मुख्यमंत्री केले आणि ते त्या जातींचे असणे हा योगायोग होता याची कल्पना नाही.

P1 P2

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- नागेन्द्रहाराय त्रिलोचनायभस्माङ्गरागाय महेश्वराय । नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय॥

ज्ञानवापी मस्जिद, मथुरा तसेच अयोध्या सारख्या हिंदु समाजासाठी अती पवित्र स्थळांना मुक्त करण्यासाठी जन आंदोलनातुन तब्बल ७५ वर्षे लागली. मूसलमानांना पाकिस्तान वेगळा काढुन दिल्यानंतरही मुसलमानांचे तुष्टीकरण करताना हिंदु समाजाचे अहित भारतातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी केले. हिंदु विरोध सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धार सरकारी तिजोरीतुन होऊ देणार नाही अस म्हणणार्या नेहरुंनी सोमनाथ मंदिराच्या समारंभाला देशाच्या राष्ट्रपतींनीं जाउ नये अशी भूमिका घेतली होती पण स्व:ता मुसलमानांनी दिलेल्या ईफ्तार पार्ट्या मध्ये जात असत. ह्याच नेहरुंनी "Disvovery of India " पुस्तकात मुघलांची तारीफ करत भारतातल्या हिंदु मंदिराच्या विध्वंसाला दुसरेच जवाबदार होते अस म्हंटलय. अयोध्येच्या राम मंदिराच्या आंदोलनात उ प्र च्या मुख्य मंत्री असताना मुलायम सिंगांनी कित्येक कित्येक साधु संतांना गोळ्या घालण्याचे आदेश दिलेले होते. मुसलमानांच्या तुष्टीकरणाची राजनीती करणार्या ह्या नेत्याची आजची परीस्थीती खरच वाईट आहे. सबका साथ सबका विकास म्हणत सर्वांना योजनेच्या लाभात सहभागी करणार्या मा योगी आदित्यनाथांना सुद्धा कळले आहे की सरकारच्या योजनेत घर घेणार्या मुसलमानांनी आपले अमुल्य व्होट जेल मध्ये बंद असलेल्या सपा च्या मुसलमान उमेदवारालाच दिले. चक्क जेल मधुन निवडणुका लढणारे मुसलमान उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. सरकार कोणाचही असो, कितीही कल्याणकारी असो, काफिराला व्होट न करता आपल्या धर्माच्या उमेदवारालाच व्होट करुन विजयी करतात हे लोक. सरते शेवटी अतिरेक्यांना धर्म नसतो पण पकडलेल्या अतिरेक्यांचा धर्म ईस्लामच निघतो. मुंबई IIT मध्ये Engineer झालेला अतिरेकी गोरखपुर हल्ल्यात जेंव्हा पकडला जातो तेंव्हा " हा समाज शिकला नसल्याने तिथला युवा अतिरेकी होतो" हा भाबडा युक्तिवाद गळुन पडतो. शेवटी हिंदु म्हणुन निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. ।। धर्म रक्षती रक्षित: ।।

In reply to by डँबिस००७

ह्याच नेहरुंनी "Disvovery of India " पुस्तकात मुघलांची तारीफ करत भारतातल्या हिंदु मंदिराच्या विध्वंसाला दुसरेच जवाबदार होते अस म्हंटलय.
ह्याचा नेमका पृष्ठक्रमांक, ओळ किंवा प्रकरण सांगितल्यास आमचेही वाचन बरोबर दिशेने नेता येईल.

In reply to by डँबिस००७

आपण पहिले तुम्ही केलेल्या दाव्याबद्दल बोलू, नंतर मला कुठले आरोप मंजूर नामंजूर तो ताळेबंद करता येईल, बाकी तुम्हाला आम्हाला काहीही मंजूर किंवा नामंजूर असणे नसणे हा तुमचा आमचा वैयक्तिक भाग झाला

जालावर उपलब्ध असलेल्या पं नेहरुवरील स्फोटक माहीती बरहुकुम , जन मागणी मुळे सादर. प्रखर श्रीवास्तवच्या शो मध्ये पं नेहरुंचे पुराव्यानीशी असे चेहरे समोर आणलेत की आता पर्यंत ज्ञात असलेला प्रस्थापीत ईतीहासाला मुठ माती देणे भाग पडेल! नेहरु आणि मूस्लिम पार्ट १ https://youtu.be/rkpeqeCQUYw नेहरु आणि मूस्लिम पार्ट २ https://youtu.be/KGIac6UkBJM नेहरु आणि मूस्लिम पार्ट ३ https://youtu.be/przexVvRZEo आंतरजालावरुन .....

In reply to by डँबिस००७

माझ्या माहीतीप्रमाणे, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक बॅन झालेले नाहीये, तरीही जर आपण यु-ट्युब वरील विडिओ न देता जर डिस्कव्हरी ऑफ इंडिया मधील पृष्ठक्रमांक अन प्रकरण सांगितले तर वाचन सोपे होईल मला, तुम्ही दिलेल्या विडिओ मधेच दुसऱ्या विडिओत आंबेडकरांनी जे लेखन केले आहे त्याचे पान क्रमांक अन इतर तपशील साद्यंत दिले आहेत, तुम्ही केलेल्या विधानाला समर्थनार्थ नक्कीच काहीतरी असेल डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये लेखी, त्याचा तितका रेफरन्स द्या, हे विडिओ वगैरे काय असतीलही उत्तम पण ह्यात थर्ड पार्टी व्यु होऊन जातात, मला त्याची सवय नाही वाचनाची आहे, मजबूत पुरावा असतो दस्तुरखुद्द लेखी शब्द, म्हणजे बघा तुम्ही मला एकदाचा तो डिस्कव्हरी ऑफ इंडिया मधला लेखी पुरावा देऊन टाका रेफरन्स सहित म्हणजे मी तो नेहरू समर्थकांना दाखवून देईन त्यांच्या नेत्याचे कर्म त्यांच्याच पदरात घालताना. कळावे - वांडो

Discovery of India या नेहरुन्च्या पुस्तकाची pdf download केली. त्यात पान २४१ वर हे सापडले Synthesis and Growth of Mixed Culture Purdah. Kabir. Guru Nanak. Amir Khusrau It is thus wrong and misleading to talk of a Moslem invasion of India or of the Moslem period in India, just as it would be wrong to refer to the coming of the British to India as a Christian inva- sion, or to call the British period in India a Christian period. Islam did not invade India; it had come to India some centuries earlier. There was a Turkish invasion (Mahmud's), and an Afghan invasion, and then a Turco-Mongol or Mughal invasion, and of these the two latter were important. The Afghans might well be considered a border Indian group, hardly strangers to India, and the period of their political dominance should be called the Indo-Afghan period. The Mughals were outsiders and strangers to India and yet they fitted into the Indian structure with remarkable speed and began the Indo-Mughal period

हे सापडले. I have no doubt at all that among the causes of India's decay in recent centuries, purdah, or the seclusion of women, holds an important place. I am even more convinced that the complete ending of this barbarous custom is essential before India can have a progressive social life. That it injures women is obvious enough, but the injury to man, to the growing child who has to spend much of its time among women in purdah, and to social life generally is equally great. Fortunately this evil practice is fast disappearing among the Hindus, more slowly among the Moslems. आणि नेहरुन्ची पणती प्रियान्का गान्धी म्हणते बुर्खा, हिजाब घालणे मुस्लीम स्त्रियान्चा अधिकार आहे.

Widespread and apparently easy as the Arab conquests were, they did not go far beyond Sind in India, then or later. Was 228 this due to the fact that India was still strong enough to resist effectively the invader? Probably so, for it is difficult to explain otherwise the lapse of several centuries before a real invasion took place. Partly it may have been due to the internal troubles of the Arabs. Sind fell away from the central authority at Baghdad and became a small independent Moslem state. But though there was no invasion, contacts between India and the Arab world grew, travellers came to and from, embassies were exchanged, Indian books, especially on mathematics and astro- nomy, were taken to Baghdad and were translated into Arabic. Many Indian physicians went to Baghdad. These trade and cultural relations were not confined to north India. The southern states of India also participated in them, especially the RSshtra- kutas, on the west coast of India, for purposes of trade. This frequent intercourse inevitably led to Indians getting to know the new religion, Islam. Missionaries also came to spread this new faith and they were welcomed. Mosques were built. There was no objection raised either by the state or the people, nor were there any religious conflics. It was the old tradition of India to be tolerant to all faiths and forms of worship. Thus Islam came as a religion to India several centuries before it came as a political force. T

एकटा माणूस नेहरू सारखा हिंदू चा इतिहास बदलत असेल त्यांना दाबून ठेवत असेल तर नेहरू काळात जे हिंदू होते ते सर्व नालायक असले पाहिजेत स्वार्थासाठी विरोध न करणारे महा स्वार्थी असले पाहिजेत ह्या मध्ये नेहरूंचा दोष नाही हिंदू समाजाचा दोष आहे. नेहरूंना दोष देवून स्वतः आपण नालायक नव्हतो हे सिद्ध होत नाही . उलट आपण नालायक च होतो हे सिध्द होतें

Maharshtra मध्ये तरी हिंदू मंदिर पाडून तिथे मशीद उभी केल्याची उदाहरणे नाहीत.आणि तसा दावा पण आज पर्यंत कोणी केल्याचे ऐकिवात नाही. तमिळ nadu, कर्नाटक,केरळ,आंध्र मध्ये पण असे काही ऐकण्यास येत नाही. ज्या काही समस्या आहेत त्या यूपी मध्ये. पण फक्त कल्पना म्हणून महाराष्ट्र मध्ये कोणत्या ही मंदिरावर मुस्लिम लोकांनी दावा केला. अगदी शस्त्र घेवून ते रस्त्यावर आले तर. बाकी राज्य जास्त करून यूपी आणि बाकी हिंदी भाषा असणारी राज्य. हिंदू म्हणून महाराष्ट्र ची बाजू घेतील का? हिंदी न्यूज चॅनेल पण घेणार नाहीत. लोक सोडा. आपण का यूपी मधील मंदिर ,मशीद वादात स्वतःला गुंतवून घेत आहे हे समजत नाही. मुंबई पावसात बुडली तेव्हा महाराष्ट्र च्या मदतीला हे राज्य आली होती का? कोणी मदत केली नाही. अगदी मुंबई मधील अमराठी उद्योगपती नी पण मदत केली नाही. आपल्या मध्येच जास्त किडा का वळवळतो.

In reply to by कपिलमुनी

मग पुण्यात राहणारे ::::::: आहेत .शब्द टाकत नाही.समजून घ्या. स्वतःची कातडी वाचवणे,स्वतःला काहीच नुकसान न होता कोणी तरी ह्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर यावं आणि ह्यांनी घरात बसून मजा घ्यावी ह्या वृत्ती चे आहेत त्यांचे कौतुक का सांगत आहात.

In reply to by sunil kachure

+१ स्वत:चे मूलंबाळं अमेरीकेत पाठवून ईतरांनी स्वतची डोकी फोडून घ्यावी.

In reply to by कपिलमुनी

इ.स.१२९० मधे जेंव्हा पुणे मुसलमानांच्या ताब्यात गेले तेव्हा पुणेश्वर आणी नारायणेश्वर ला दर्गा बनवला जो आज धाकटा व थोरला शेखसल्ला या नावानेओळखतात. संदर्भ-"पुण्यातल्या पेठा", लेखक वि वि करमरकर,बि ए एल एल बी, प्रकाशित १९२५. पान-११-१२.

In reply to by कर्नलतपस्वी

अटकेपार झेंडे रोवनारे “शूरवीर” पेशवे पुण्यात पुन्हा मंदीर बनवू शकले नाहीत??

In reply to by काड्यासारू आगलावे

मल्हार राव होळकर तिथे मंदिर बांधणार होते. पण तिथल्या हिंदूंनीच विरोध केला. कारण तुम्ही गेल्यावर आम्हाला कोण वाचविणार. देवी अहल्याबाई होळकर ने मंदिर बांधले पण तिथले ब्राह्मण पुजारी बनण्यास ही तैयार नव्हते. शेवटी मध्यप्रदेशातून पुजारी ही पाठवावा लागला. बाकी रघुनाथ राव पेशव्यांनी मोठ्या प्रमाणात ओडिशा आणि बंगाल मध्ये तोडफोड केली होती.

In reply to by विवेकपटाईत

रघुनाथ राव पेशव्यांनी मोठ्या प्रमाणात ओडिशा आणि बंगाल मध्ये तोडफोड केली होती. हो. बंगालच्या ग्रामीण भागात आजही मराठ्यांना "बरगी" (लुटारु) म्हणुन ओळ्लखले जाते. बंगालच्या विष्णुपुर वगेरे सारख्या ठिकांणी देव जमीनीवर आला व त्याने बरगींना पळवुन लावले वगेरे दंतकथा अजुनही सांगितल्या जातात.

In reply to by सुक्या

जिथे जिथे मराठे बंगाल मध्ये पोहचले होते तोच भाग भारतात राहिला. जगन्नाथ पुरीच्या मंदिरात पुन्हा रथ महोत्सव ही रघुनाथ रावांनी सुरू केला. मुस्लिम नवाबांसाठी मराठे लुटारूच होते. बाकी रघुनाथ रावांना इतिहासात जे स्थान मिळाला पाहिजे होते ते मिळाले नाही. जर ते पेशवा झाले असते तर शाहू महाराज दिल्लीचे बादशाह निश्चित झाले असते. दुर्भाग्य ते लहान बंधु होते.

हिंदी न्यूज चॅनेल प्रत्येक व्यक्ती नी ब्लॉक केले तर एक लक्षात येईल. देशात . महागाई,बेरोजगारी, infrastructure, फास्ट भ्रष्ट्राचार विरहित प्रशासन , ह्या व्यतिरिक्त काहीच समस्या नाहीं. देश पातळीवर विचार केला तर. अंतर राष्ट्रीय स्तरावर विविध देशांशी आपण योग्य ते संबंध स्थापित करू शकलो नाही. सर्वच देश संशयाने भारताकडे बघतात. ही सर्वात मोठी समस्या आहे.

थँक्स, मला नेमके हेच हवे होते, रेफरन्स असलेले कधीही उत्तम नाहीतर नुसतं बोलण्याचा अधिकार वापरण्यात काही पॉईंट नसतो.

In reply to by जेम्स वांड

पण तुम्ही त्या डॅंबिस यांची गोती केलीत ना? त्यांनी ठोकून तर दिलॅ पण पान नंबर मागीतले तर युट्युब विडीओज घेऊन आलेत. :) ऊद्या ते भाऊ तोसरेकरांच्या विडीओज ही देतील. खीक्क.

In reply to by काड्यासारू आगलावे

तुम्ही जे कोणी असाल ते, तुमचे ते कोण डॅंबिस आहेत त्यांच्याशी काही वाकडे असले तर समोरासमोर बघा आपापसात, वाटल्यास एकमेकांची डोकीही फोडा, मला काहीच हरकत नाही, फक्त त्यांची मापं काढून गोळी घालायला माझा खांदा वापरण्याचे फालतू प्रकार बंद करा पाहू त्वरित. मी काही इथे तुमचे स्कोर सेटल करण्याच्या सुपाऱ्या वाजवायला येत नाही, डॅंबिस ह्यांच्याशीही माझे वाकडे नाही काही किंवा तुमच्याशीही काही वाकडे नाही, त्यामुळे बोलायचे असले तर मुद्दे आधारित बोला नाहीतर दुसऱ्या कोणाला तरी काड्या सारा.

एका विशिष्ठ समुदायाविषयी आगलावे विचार खऱ्याखुऱ्या आयडीने मांडता येत नाहीत म्हणून डुप्लिकेट आयडी काढावा लागला असे दिसतेय.

In reply to by कॉमी

प्रत्सेक समाजात चांगले वाईट लोक असतात, जगातूल कुठलाच समाज ह्याला अपवाद नाही. कुणाचे वाईट गुण दाखवले म्हणजे त्याच्या समाजाबद्दल आगलावे विचार पसरवले असे होत नाही. बुध्दी कम्प्युटर गेम पलीकडे कधी वापरली नाही का?

देशापुढील समस्या काय आहेत? सगळ्या मशीदींचा ईतिहास तपासुन तिकडे मंदिर होते का ते पाहणे? रस्त्यांची/शहरांची नावे बदलणे? की महागाई/बेरोजगारी/स्टार्ट अप इन्डिया? रूपया जो घसरत आहे तो १ डॉलर-९० पर्यंत जाणार आहे अशी चर्चा आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

देशाचं माहिती नाही, पण काही ओळी लिहिलेल्या एका २९ वर्षीय मुलीच्या मागे सर्व पोलिसयंत्रणा लावून, प्रत्येक पोलिस ठाण्यात तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून, तिला पकडायला अनेक पोलिस पाठवून तिला विनाजामीन आयुष्यभर तुरूंगात डांबणे ही राज्यापुढील सर्वात महत्त्वाची समस्या आहे. तिच्या फोन, लॅपटॉपची फोरेन्सिक तपासणी करून तिला अतिरेकी सिद्ध करणे हेच राज्याचे प्रमुख ध्येय आहे.

In reply to by श्रीगुरुजी

केतकी चितळे विरुद्ध डझनभर केसेस करणे,ह्ल्ला करणे हे निषेधार्हच आहे. खरे तर त्या संजय राउतला जो किरीट सोमय्यांना टी.व्ही.वर येउन शिविगाळ करत होता, महिनाभर जेलमध्ये टाकायला हवा होता पण आमचे पत्रकार जे आता केतकीला "विक्रुती" म्हणत आहेत तेव्हा मात्र माना डोलवत होते.

तुमचा मता शी सहमत.जग आर्थिक मंदीत जाण्या सारखी स्थिती आता आहे.भारत पण त्या मधून सुटणार नाही. आज मंदिर,मशीद,हिंदू ,मुस्लिम ह्या पेक्षा देशाचे आर्थिक आरोग्य चांगले राहवे ह्या वर च लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे आहे... इतके पोट तिडके नी हेच परत परत लिहीत आहे.. बरेच येथील आयडी त्या मुळे नाराज होत आहेत मानहानी करत आहेत..तरी हेच परत लिहीत आहे. आम्हला ह्याच देशात राहायचे आहे.अमेरिका किंवा बाकी परदेशात राहण्याची व्यवस्था नाही. त्या मुळे हा आपला देश आर्थिक बाबतीत कसा powerful होईल तेच ध्येय असावे.. ३० कोटी भारतीय मुस्लिम आहेत ते इथेच राहणार आहेत . त्या मध्ये बदल होणार नाही. द्वेष करण्या पेक्षा न्यायचे आणि कठोर कायद्याचे राज्य निर्माण करणे हाच एकमेव मार्ग आहे.. मंदिर ,मशीद नंतर बघू जेव्हा सर्व समस्या सुटतील तेव्हां

In reply to by sunil kachure

काय काय आणि कसं कसं ते डिटेलवार मध्ये सांगा बघू आपण ते भावी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू मग झालाच भारत बलसागर आणि श्रीमंत हा का ना का

In reply to by sunil kachure

अरे .. तुम्ही अर्थतज्ज्ञ पण आहेत का ? जग आर्थिक मंदीत जाणार म्हणता ? आम्ही जरा युरोप प्रवास करावा म्हणत होतो ... मग आता कसे करावे ?

In reply to by sunil kachure

असं कसं असं कसं ? उलट आता तर प्रत्येक मशिद खोदुन बघावी लागेल. अगदी दिल्लीतील जामा मशिदसुध्दा खरं तर औरंग्याच्या आणि इतरांच्याही काळात नुसत्या खुल्या जागेवर मशिद बांधल्याची उदा. च नाहियेत काय?

रशिया युक्रेन युद्धामुळे पुर्ण जगावर परिणाम झालेले आहेत. १. रशियातुन तेल व वायु निर्यातीवर परिणाम. त्यामुळे खनिज तेलाच्या व नैसर्गिक वायुच्या किमती वाढु लागल्या . अश्या परिस्थीतीत भारताने रशियाला सपोर्ट केल्या बद्द्ल रशियाने भारताला विषेश सवलतीच्या दरात खनिज तेल व नैसर्गिक वायु उपलब्ध करुन दिला. ह्यावरुन अमेरीकेच्या पोटात मुरडा पडला. भारताच्या परराष्ट्रमंत्री श्री जयशंकर यांनी अमेरिकेला चांगलेच सुनावले की रशियाकडुन भारत जितका खनिज तेल व नैसर्गिक वायु महिन्या भरात विकत घेत आहे तितका एकटा युरोप एका दुपारी विकत घेत आहे. २. युक्रेन जगातील सर्वात मोठा गहु उत्पादक देश आहे. खाद्य तेलाच्या बाबतीत सुद्धा तो जगातल्या सर्वात मोठ्या उत्पादक देशापैकी एक आहे. युद्धामुळे युक्रेन वर या दोन्ही वस्तुसाठी अवलंबुन असलेले सर्व देश आता दुसर्या गहु उत्पादक देशाकडे बघु लागले आहेत. टर्की, ईजित्प सारखे युक्रेन कडुन गहु विकत घेत असत पण आता गव्हासाठी त्यांना भारता कडे बघावे लागत आहे. केन्या सारखा गरिब देशा भारताच्या गव्हाला खालच्या दर्ज्याचा समजत असे. भारतीय गव्हात किडे, फंगस आहे अश्या सबबी खाली केन्याने भारतीय गव्हाला कधीच पसंती दिली नव्हती. पण रशिया युक्रेन युद्धामुळे परिस्थिती बदलली. आता केन्याच्या सरकारला भारतीय गव्हाची चाचणी करण्यासाठी आपल्या अधिकार्यांना पाठवायचे आहे. भारतीय गव्हा शिवाय दुसरा पर्याय केन्याकडे नसल्याने त्यांना भारतीय गव्हाला पसंती द्याविच लागेल. ३. जागतीक पातळीवर गव्हाच्या कमतरतेमुळे भारताच्या गव्हाला चांगला दर मिळत आहे. गव्हाला आता चां गलीच मागणी आहे. अश्या निर्यात ऑर्डर असताना कोणतीही पैश्याच पाठबळ नसलेला गहु उत्पादक भारतीय शेतकरी अश्या संधीचा फायदा घेऊ शकणार नाहीत. पण ह्याचा खुप मोठा फायदा गव्हाच्या बिझनेस मधले आडते घेऊ शकतात. ते सर्व गहू सरकारला विकण्याएवजी निर्यात करुन टाकतील पण गहु उत्पादक भारतीय शेतकरी मात्र निर्धनच राहील. ह्याचा सारसार विचार करुनच भारत सरकारने गहु निर्यातीवर बंदी आणलेली आहे.

In reply to by डँबिस००७

एव्हाना कृषी कायदे अमलात आले असते तर प्राप्त परिस्थितीचा गहु उत्पादक शेतकर्‍यांना फायदा झाला असता काय? कदाचीत थोडाफार झाला असता असं वाटतं.

युक्रेन जगातील सर्वात मोठा गहु उत्पादक देश आहे. खाद्य तेलाच्या बाबतीत सुद्धा तो जगातल्या सर्वात मोठ्या उत्पादक देशापैकी
. वरील तक्त्यानुसार युक्रेन हा टॉप टेन प्रोड्युसर्स मध्ये आहे गव्हाच्या पण टॉपला नाही. तो आठव्या क्रमांकावर असून डबघाईला आलेला पाकिस्तान सुद्धा त्याच्यापेक्षा एक पायरी वर आहे गहू उत्पादनात, आकडे २०२० चे आहेत २०२१च्या एका हंगामात युक्रेन आलाच असला तर एखाद पायरी वर पाकिस्तानच्या जागी आला असेल, असे नसल्यास एकाच मोसमात युक्रेन जागतिक गहू उत्पादनात अव्वल झाला असल्यास २०२२ ची युक्रेनियन गव्हाची आकडेवारी आपण मांडावीत.

In reply to by जेम्स वांड

वांड साहेब , चुक निदर्शनास आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या मते, रशिया युक्रेन युद्धा मुळे गहु , खनिज तेल, नैसर्गिक वायु, खाद्य तेलाच्या बाजारपेठेचे संतुलन बिघडले हे मान्य करायला काही हरकत नसावी.

In reply to by डँबिस००७

अफघाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यावर अमेरिकेने अफघाणिस्तानचे डॉ अकॉंउट गोठवले. त्यामुळे तिथे अन्न धान्याचा तुटवडा झालेला होता. अश्या परीस्थितीत भारताने व पाकिस्तानने हजारो टन गहु अफघाणिस्तानला पाठवला. निकृष्ट दर्जाचा गहु म्हणुन पाकिस्तानच्या गव्हाला अफघाणिस्तानच्या सरकारने नाकारले होते. भारताच्या गव्हाची अशीच स्थिती केन्यात झाली होती. जेंव्हा व्यापारी थोड्या फायद्यासाठी हलक्या दर्ज्याचा माल निर्यात करतात त्यावेळेला तो व्यापारी ब्लॅकलिस्ट होतोच पण देशाच नाव खराब होत. निर्यात मालाच्या गुणवत्तेच्या बाबती सरकारचे बँधनकारी निकष असावेत. ज्यामूळे अश्या प्रकारांना आळा बसेल. केन्याच्या बाबतीत हेच झाल होत. हल्लीच नायजेरीयाने भारतीय औषध निर्मात्याबद्दल भारत सरकार कडे आरोप केलेले आहेत. भारतीय औषधाला बॅन करु अशी धमकीही नायजेरीयाने दिलेली आहे. १९९०-१९९५ साली कापुस उत्पादक शेतकर्याची परिस्थिती कशी होती हे सर्वांनाच माहिती असेल. जीव देणार्या शेतकर्यात कापुस पिकवणार्या शेतकर्याचा नंबर मोठा होता. पण आज देशात पिकणार्या कापसापैकी ८०% निर्यात होतो. कापड बनवणार्या कंपन्यांना लागणारा कापुस मिळवण्यात कंपन्यांची दमछाक होत आहे. आयत केलेला कापुस महाग असतो. जगात सर्वात जास्त कापुस पिकवणारा देश असुन सुद्धा तयार कापड व शिवलेले कपडे निर्यातीच्या रेस मध्ये भारत कुठेच नाही. उलट भारतातले कापड कारखाने बंद व्हायच्या मार्गावर आहेत. जगात सर्वात जास्त कापुस पिकवणारा देश आज सर्वात जास्त कापुस निर्यात करत आहे. पण कापुस पिकवणारा शेतकरी ? तो निर्धनच राहीला. ह्या कापुस निर्यात धंद्यातले दलाल मात्र गब्बर झाले. तरी सुद्धा भाजपा सरकारच्या शेती विषयीच्या कायद्याच्या बाजुने जनता व शेतकरी उभे राहिले नाहीत. " शेती विषयक कायदा "केला तर पंजाब मधिल "अकाली दलाचा" पाठिंबा रहाणार नाही व त्याचे दूरागामी परीणाम होतील ह्याची खात्री असुनही भाजपा सरकारने हा कायदा आणला. भाजपाला कायदा मागे घ्यावा लागला, पंजाबची निवडणुक हरावी लागली. पण ह्या पेक्षा मोठ नुकसान शोतकर्यांनी स्व:ताच करुन घेतल, आता ह्या पुढे कोणतेही सरकार शेतकर्याचा विचार करायला कचरतील.

In reply to by डँबिस००७

मी थोडा वेगळ्या फॅक्टमध्ये शिरलो पण तुमचा मुद्दा मान्य करण्यास मला काहीच प्रत्यव्याय नाही.