Skip to main content

ताज्या घडामोडी मे २०२२(भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी सोमवार, 16/05/2022 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. काल (१५ मे २०२२ रोजी) त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते माणिक साहा यांनी शपथ घेतली. मार्च २०१८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला आणि बिप्लब देब यांना मुख्यमंत्री केले गेले. सुरवातीचा महिना-दीड महिना मुख्यमंत्री झाल्याचं वारं या गृहस्थांच्या अंगात इतकं शिरलं होतं की ते विनाकारण बाष्कळ आणि अनावश्यक बडबड करत सुटले. महाभारत काळात इंटरनेट होतं ही त्या मानाने बरीच निरूपद्रवी बडबड होती. सगळ्यात आक्षेपार्ह बडबड होती १९९७ मधील विश्वसुंदरी डायना हेडन विषयी. बिप्लब देब यांनी म्हटले होते- डायना हेडनचे सौंदर्य ऐश्वर्या रायप्रमाणे 'भारतीय सौंदर्य' नाही. त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले. एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्‍याला मुख्यमंत्री केले. विजय रूपाणींकडून राजीनामा घेतल्यावर नवा नेता निवडायला झालेल्या आमदारांच्या बैठकीत हे भूपेंद्र पटेल शेवटच्या रांगेत बसायला चालले होते तेव्हा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले गेले असे बातम्यांमध्ये आले होते. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्येही पक्षाने नवे मुख्यमंत्री नेमले. आता १० महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होते ते बघायचे.

वाचने 30442
प्रतिक्रिया 265

प्रतिक्रिया

In reply to by जेम्स वांड

पाकिस्तान जगातला ७ वा मोठा गहु उत्पादक देश आहे. २५.२ मिली टन च्या हिशेबाने २५ कोटी पाकिस्तान जनतेला पर डोई १०० किलो गहु बसतो. निर्यात तर सोडा पाकीस्तान गेले कित्येक वर्ष गहु आयात करतोय. त्याविरुद्ध भारत जनसंख्येच्या हिशेबाने पाकीस्तानच्यापाच पट आहे आणि गहु उत्पादना प्रमाणे पाकीस्तानच्या चारच पट आहे. तरी सुद्धा गेले अनेक वर्षे भारत गहु निर्यात करत आहे.

In reply to by डँबिस००७

यात लोकांच्या खाण्याच्या सवयी/पद्धती यांचा वाटा असेल का? भारतात दक्षिणेत, अगदी महाराष्ट्रात सुद्धा तांदूळ खायचे प्रमाण बरेच आहे. सामान्यतः किनारट्टीवरील प्रदेशात तांदूळ जास्त खातात. पाकिस्तान पेक्षा भारताला अधिक प्रमाणात किनारपट्टी आहे. त्याउलट पाकिस्तानात अर्धी लोकसंख्या पंजाबमध्ये आहे. आपल्या पंजाबमध्येही गहू खायचे प्रमाण बरेच जास्त आहे. तसेच तिकडच्या पंजाबमध्ये असेल याची कल्पना करता येते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भ्रष्टाचार .... सरकारने गहू खरेदी करायचा आणि तो सडवायचा... आणि मग आयात केलेल्या गव्हात कमीशन खायचे ...

उत्पादनात नाही पण निर्यातीत रशिया पहिला आणि युक्रेन पाचवा क्रमांक असलेले देश आहेत. https://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_wheat_exports आता पहिल्या आणि पाचव्या देशाने निर्यात बंद केली म्हटल्यावर गव्हाची किंमत वाढणे आपोआप होणारच

In reply to by सुबोध खरे

खरे भले माझ्या नावाचा विकृत रुपांतर करत असलं तरी त्यांच्या काही पोस्ट शी प्रामाणिक पणाने(जे पटत तेच लिहणे मला आवडत) गहू उत्पादन करणारे पहिले दहा देश ह्या मध्ये युक्रेन पाठी असेल . चीन आणि भारत पुढे असेल पण चीन आणि भारताची लोकसंख्या पण खूप मोठी आहे . देशातील नागरिकांचे पोट भरण्यासाठी लागणारा गहू बाजूला केला तर एक्सपोर्ट करायला काय शिल्लक राहणार. देशाच्या साधन संपत्ती वर पाहिले देशातील नागरिकांचा हक्क. युक्रेन मध्ये उत्पादन कमी होत असले तरी त्यांची देशांतर्गत गरज कमी आहे त्या मुळे तो मुख्य गहू निर्यातदार आहे. युक्रेन,रशिया युद्ध मुळे जगात अन्न धान्य ची टंचाई निर्माण होईल असा इशारा दिला गेलेला आहे.

दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविल्याबद्दल यासिन मलिकला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. https://www.ndtv.com/india-news/kashmiri-separatist-yasin-malik-convict… आणि असल्या माणसाला एकेकाळी आपले पंतप्रधान मानाने दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात बोलावून घेत असत. असला घाणेरडा माणूस आपला १० वर्षे पंतप्रधान होता याची खरोखरच लाज वाटली. manmohan

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शाळेत असताना तरूण भारतमध्ये आलेल्या लेखांचे संकलन असलेली एक 'झेलमची हाक' म्हणून पुस्तिका वाचली होती.त्यात उल्लेख होता की यासिन मलिकला हृदयविकार आहे. या प्रकाराला आता ३० वर्षे होऊन गेली आहेत. तेव्हापासून हा लेकाचा कधी गचकतो याची वाट बघत आहे. तरी तो अजूनही जिवंतच आहे :(

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असले राक्षस लवकर गचकत नाही हो. बाकी आता तमाम भेदी लोक हा कसा न्याय व्यवस्थेचा दुरुपयोग आहे / कश्मीरी लोकांवर अन्याय आहे वगेरे वगेरे रुदन चालु करतील. काश्मीरात पुर आला होता तेव्हा ह्यानेच भारतीय सैनिका कडुन मदत सामग्री हिसकाउन आपली म्हणुन लोकांना वाटली होती .. काश्मीरातल्या तथकथीत नेते लोकांचे मुखवटे गळत आहेत हे खुप चांगले आहे ... अजुन २/३ वर्षात काश्मीर मुळ प्रवाहात येईल अशी आशा आहे ...

“मंदिर-मशिदीवर वणवा पेटवताना…”; ‘ज्ञानवापी हे २०२४ साठीचे उत्खनन’ असल्याचं म्हणत शिवसेनेचा BJP, RSS वर निशाणा https://www.loksatta.com/desh-videsh/gyanvapi-mosque-case-is-preparatio… उदारमतवादी शिवसेना ...... शिवसेनेची, हिंदू हितवादी भुमिका, काही वर्षांपुर्वी होती ... ------- ग्यानव्यापी मशीद प्रकरण: ३१ वर्षांपूर्वी लोकसभेत काय म्हणाल्या होत्या उमा भारती? https://www.loksatta.com/politics/uma-bharti-said-31-years-ago-in-parli… लोकसभेमध्ये २१ सदस्यांनी यात सहभाग घेतला आणि फक्त भाजपाच्या चार व शिवसेनेच्या अशोक आनंदराव देशमुख या एका खासदाराने विधेयकाला विरोध केला... -------- तेंव्हा शिवसेना हिंदू हितवादी भुमिका घेत होती आणि सध्या उदारमतवादी भुमिका घेत आहे ....

In reply to by मुक्त विहारि

मंदीर मशीदीचे मुद्दे ऊकरून हळूच गॅस सिलेंडर चे रेट वाढवून हिंदूंचे कंबर मोडमार्यांबद्दल आपले काय मत?

In reply to by काड्यासारू आगलावे

हायला म्हणजे गॅस सिलेंडर चे रेट वाढले तर फक्त हिंदूंचं कंबरडं मोडतं? रुपये २००० चा सिलिंडर झाला तरी मुसलमानांचं कंबरडं मोडत नाही का? तुमच्या मुदलातच खोट आहे.

In reply to by सुबोध खरे

हिंदूंच मोडत नाही का?? तुमच्या माहीतीसाठी सांगतो मुसेलिम फक्त १५ टक्के आहेत. हिंदूनाही पोट असतं.

In reply to by काड्यासारू आगलावे

तुमच्या आणि माझ्या, विचारसरणीत फरक आहे... आणि, वादे वादे जायते संवादः, असे होत नसेल तिथे मी, प्रतिसाद-उपप्रतिसाद, असा अनावश्यक खेळ करत बसत नाही .... त्यामुळेच, काही लोकांच्या प्रतिसादाला मी उपप्रतिसाद, देत बसत नाही. अशा लोकांच्या यादीत, आपले पण नांव सामील आहेच ..... आपण देखील, शक्यतो, माझ्या बरोबर हा, प्रतिसाद-उपप्रतिसाद, खेळ नाही खेळलात तरी चालेल .... तुमच्या बरोबर केलेला हा माझा पहिला आणि शेवटचा, प्रतिसाद-उपप्रतिसाद ..

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जमीनीवर बेकायदेशीर खोदाई https://www.esakal.com/pune/illegal-excavation-land-of-senior-actress-u… काय बोलणार? .... एका स्त्रीवर, भर सभेत चप्पलफेक ते आता एका स्त्रीच्या शेतात, जबरदस्तीने खोदकाम...

आज हा सिनेमा झी 5 वर बघितला .विषय छान मांडला आहे. 370 कलम राज्य घटनेत आहे त्याची गरज असेल पण तेव्हाची स्थिती लक्षात घेवून. घटनेत ते कलम टाकण्याचं हेतू चांगला असेल. पण त्याचा गैर वापर खूप झाला. काश्मीर मधील लोकांचे काश्मिरी पण टिकावे ,त्यांच्या वर सांस्कृतिक आक्रमण होवू नये. हे मला पण पटत. काश्मीर च काय अगदी दहा लोक जरी वेगळ्या संस्कृती,भाषेची असतील आणि एकाध्या लहान गावात राहत असतील तरी. पण काश्मीर मध्ये खूप वेगळे घडले काश्मिरी पंडित हे काश्मीर चेच ते परके नव्हते. त्यांच्या मुळे काश्मिरी संस्कृती ला धोका नव्हता . त्यांची हत्या होत असेल आणि 370 च च्य मागे लपणार असाल तर निषेध आहे. भारत सारख्या मजबूत राष्ट्र नी ही देश द्रोही ,अन्यायकारक वृत्ती अतिशय क्रूर पने मोडून काढली पाहिजे होती

In reply to by sunil kachure

घरातला कर्ता मेला की घराची जशी वाट लागते अगदी तशीच ईंदिरा गांधी मेल्यावर देशाची लागली. नंतर आलेले सर्वच पंतप्रधान कमजोर/दुबळे होते/आहेत. ही मालिका अजूनही खंडीत झालेली नाहीये. ईंदिरा गांधी असत्या तर हे असले प्रश्न सहज सोडवले असते. भाजपेयींचा राज्यपाल त्यावेळी कश्मिरात होता तरी पंडीतांचं शिरकाण झालं, कारण भाजपचा प्रेफरंस सत्तेला आहे हिंदू किंवा देशाला नाही हे ज्यादिवशी अंधांना समजेल तो सूदिन. ईंदिरा गांधीं सारखा पंतप्रधान मिळायला ह्या भारतभूला किती दिवस/वर्षे/शतके लागतील देव जाणे. तोपर्यंत वाचाळवीर झेलायचे हेच ह्या देशाच्या नशिबी.

In reply to by काड्यासारू आगलावे

तोपर्यंत वाचाळवीर झेलायचे हेच ह्या देशाच्या नशिबी.
जसे तुमच्यासारखे एकाहून एक अज्ञानमूलक प्रतिसादांचा विक्रम करणारे मिपा सदस्य झेलणे हे इतर सदस्यांच्या नशिबी आले आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

खिक

In reply to by काड्यासारू आगलावे

घरातला कर्ता मेला की घराची जशी वाट लागते अगदी तशीच ईंदिरा गांधी मेल्यावर देशाची लागली हायला म्हणजे इंदिरा गांधींच्या अगोदर देश अगदी खातेऱ्यातच होता म्हणताय काय? आणि त्यांनीच तो सुजलाम सुफलाम केला काय?

In reply to by सुबोध खरे

तसंच समजा. त्या गांधीबाईंनीच पाकिस्तानवर हल्ला करायची हिंमत दाखवली. ना कधी आधीचानी ना कधी नंतरच्यानी.

In reply to by काड्यासारू आगलावे

हायला कारगिल, उडी, बालाकोट हि नावे तुमच्या नकाशातून गायबच आहेत म्हणा कि. काय पाकिस्तानात छापलेला नकाशा वापरताय का?

In reply to by सुबोध खरे

आणि आपले एक लाल बहादूर शास्त्री नावाचे पंतप्रधान सुद्धा होते. ते पण स्मरणशक्तीतून नाहीसे झाले म्हणा की

नॉर्थ कोरियाचे नशीब कि आज त्यांना इंदिरा गांधींच्या तोलामोलाचा, काकणभर जास्तच कणखर नेता लाभला आहे.

In reply to by डँबिस००७

ज्यांची बुध्दी कम्प्युटर गेम पलिकडे कधी चालली नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करनार?

In reply to by काड्यासारू आगलावे

ज्यांची बुध्दी कम्प्युटर गेम पलिकडे कधी चालली नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करनार?
संमं - सदर id ला प्रतिबंध करण्यात यावा ही विनंती.

In reply to by वामन देशमुख

संमं- लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या थोर पंतप्रधान आदरणीय ईंदिरा गांधी ह्यांची तूलना किम जोंग ऊन ह्या हुकूमशहाशी करनार्या काॅमी ह्या आयडीची तसेच द्वेषातून माझ्या आयडीवर बंदी घाला असं सांगनार्या “वामन“ ह्या आयडीवरदेखील बंदी घालावी अशी विनंती करतो.

1) राज ठाकरे ची मराठी पना सोडून हिंदू वादी भूमिका घेतली भोंगे, मशीद,मुस्लिम हे राज ठाकरेंच्या यादीत कधीच नव्हती अचानक आता च भूमिका बदलली २) अयोध्या दौरा करावा अशी इच्छा राज ठाकरे ह्यांनी व्यक्त केली त्याला प्रसिध्दी दिली. हा दौरा होणारच नव्हता. ह्या मुळे एक मोठं राजकारण साध्य झाले. ब्रिजभुषण ह्या bjp आमदार की खासदार नी जुना उत्तर भारतीय मुद्धा उकरून काढत आला. उत्तर भारतीय लोकांच्या भावना भडकावून त्याचा फायदा मुंबई महानगर पालिकेत घ्यायचा हा bjp च डाव ,राज ठाकरे ना पुढे करून ब्रीज भूषण ल त्या वर बोलायला लावून साध्य झाला. महाराष्ट्र मधील bjp नेते हा विषय उकरून काढू शकतं नाहीत नाही तर मराठी मत जातील. हा विषय चर्चेत तर आला पाहिजे,राज ठाकरे काही आता उत्तर भारतीय आक्रमण विरुद्ध बोलायला तयार नाहीत.. मग इतका भारी राजकीय मुद्धा वाया जाईल. भावना भडकावून निवडणुका जिंकणे ही bjp ची कला आहे. म्हणून हे सर्व ठाकरे, ब्रीज भूषण तमाशा कम नाटक . रचले गेले

कदाचित राजकारण यालाच म्हणत आतील. काही ब्राम्हणांबद्द्ल वाटेल ते बोलून भाषणात टाळ्या घेतात व त्यांचे आका ब्राम्हण सघांला भेट देतात. या देशाचे दुर्दैव आहे कदाचित, जाती,धर्माच्या गंगेत सर्वच हात धुवून घेतायत आणी जनता शिक्षित अजुनही अशिक्षित आसल्या सारखी वागतेय. कदाचित यात दोन्ही चा फायदा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.

नॅशनल हायवे ऑथारीटीच्या कर्जात २०१४ पासून १४ पट वाढ झाली आहे.. बातमी.. आपण पेट्रोल मध्ये प्रती लिटर १८ ₹ रोड आणि इन्फ्रा सेस भरतो.. शिवाय गाडी घेताना रोड टॅक्स भरतो आणि शिवाय जाता येता ४-४ वेळा रांगेत थांबून टोल भरतो.. तरीही एवढी कर्जवाढ मग गडकरी एवढ्या पैशाचा करतात काय ??

In reply to by कपिलमुनी

+१ भरमसाठ टोल आकारणी पेट्रोल-डिझेल वर जवळपास लिटरमागे ६० ते ७० रूपये कर आकारूनही हे केंद्र सरकार कर्ज करतंय म्हणजे ईतका पैसा जातो कुठेय?? भाजपला सत्ता देऊन लोकांनी चुक केलीय, कोरोनानिधीचा हिशेब नाही, रोड टॅक्स ती वसूलू कधी संपत नाही. काय चाललंय देव जाणे.

In reply to by कपिलमुनी

आणि पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार, सध्याचे बांधकाम मंत्री, देशावर इतका मोठा कर्जाचा बोजा लादून ठेवतील की येणाऱ्या कित्येक पिढ्या त्यांच्या नावाने बोटे मोडतील.

In reply to by कपिलमुनी

बांधा ,वापरा आणि हस्तांतरित करा. हे तत्व नक्की काय आहे हे खोलवर जावून अभ्यास केल्या शिवाय NHA चे कर्ज का वाढले हे लक्षात येणे अवघड आहे. बांधा,वापरा,आणि हस्तांतरित करा ही पद्धत वाजपेयी सरकार नी चालू केली.त्या अगोदर हा प्रकार नव्हता त्या मुळे टोल पण नव्हता. टोल चा टोला वाजपेयी सरकार नी च जनतेला पहिला लावला. खासगी कंपन्या हायवे बांधणार.तो खर्च आणि नफा हे वसूल होई पर्यंत टोल लावणार तो पैसा ह्या खासगी कंपन्यांचा.सरकार ला अधिकृत काहीं मिळत असेल असे वाटत नाही. ब्लॅक नी मिळत असेल सत्ता धारी लोकांना. किती तरी वर्ष टोल वसूल करतात. खर्च निघून,नफा वसूल होवून पण हस्तांतर मात्र सरकार कडे होत नाही. हा एक पॉइंट. आणि दुसरा ह्या खासगी कंपन्यांना road बांधण्यासाठी NHA कशावरून कर्ज देत नसेल. आणि ते कर्ज वसूल होत नसल्याने NHA स्वतचं तोट्यात जात असेल. पैसा सरकार चा पण फायदा टोल वसूल करून तिसराच घेत आहे.असे होत असावे. हे माझे अंदाज आहेत.चुकीचे असू शकतात.

In reply to by sunil kachure

बांधा,वापरा,आणि हस्तांतरित करा ही पद्धत वाजपेयी सरकार नी चालू केली.त्या अगोदर हा प्रकार नव्हता त्या मुळे टोल पण नव्हता. कचरे बुवा अभ्यास वाढावा सांगूनही तुम्ही सुधारत नाही आणि जे पाहिजे ते टंकून मोकळे होता. One of India's first tollways comes up in Madhya Pradesh १९९३ https://www.indiatoday.in/magazine/economy/story/19950331-one-of-india-… १९९३ साली वाजपेयी सरकार नव्हते.

In reply to by सुबोध खरे

,15 डिसेंबर 1992, लं मध्यप्रदेश चे bjp सरकार बरखास्त केले गेले आणि नोव्हेंबर 1993 मध्ये निवडणूक झाली आणि काँग्रेस निवडून आली. तेव्हा केंद्रात काँग्रेस सरकार होते. पण एक वर्षे राष्ट्रपती राजवटीची होती.त्या काळात निर्णय घेवुन त्याची अमलबजावनी करून रोड तयार होणे शक्य नाही. टोल घेवून खासगी कंपन्यांनी रोड तयार करावा हा निर्णय bjp सरकार चाच् होता. Mp मध्ये डिसेंबर 1992 पर्यंत bjp चे सरकार होते.

In reply to by सुबोध खरे

,15 डिसेंबर 1992, लं मध्यप्रदेश चे bjp सरकार बरखास्त केले गेले आणि नोव्हेंबर 1993 मध्ये निवडणूक झाली आणि काँग्रेस निवडून आली. तेव्हा केंद्रात काँग्रेस सरकार होते. पण एक वर्षे राष्ट्रपती राजवटीची होती.त्या काळात निर्णय घेवुन त्याची अमलबजावनी करून रोड तयार होणे शक्य नाही. टोल घेवून खासगी कंपन्यांनी रोड तयार करावा हा निर्णय bjp सरकार चाच् होता. Mp मध्ये डिसेंबर 1992 पर्यंत bjp चे सरकार होते.

In reply to by sunil kachure

अजून तुम्हाला समजावे म्हणून. तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये सरळ लिहले आहे टोल वे च निर्णय pwd चा होतं Pwd ही राज्य सरकार ची एजन्सी आहे. Cpwd हि केंद्र सरकार ची योजना आहे. Dec 1992 पर्यंत bjp सरकार mp मध्ये सत्तेवर होते त्या नंतर ते बरखास्त केले गेले.

In reply to by sunil kachure

कशाला थुंकी या बोटांवरून त्या बोटावर करताय? त्यापेक्षा अभ्यास वाढवा टोल चा टोला वाजपेयी सरकार नी च जनतेला पहिला लावला. हे तुमचंच वाक्य आहे. आता कशाला शब्दांचा डोंगर रचून सारवा सारव करताय?

In reply to by सुबोध खरे

अभ्यासे प्रगट व्हावे । नाही तरी झाकोन असावे । प्रगट होवोनि नासावें । हे बरें नव्हे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

In reply to by कपिलमुनी

युपीए काळात तब्बल 384 रस्त्याचे प्रोजेक्ट बंद झाले होते. (2012 ते 2015 या काळात प्रधानमंत्री कार्यालयात रस्त्याचे कार्य पाहणार्‍या आयएएस अधिकार्‍याचा पीएस होतो. (आरटीआय करून खात्री करू शकतात).अधिकान्श पर्यावरण आणि पैशया अभावी. त्यातले प्रोजेक्ट पुन्हा सुरू कारायला एकाच बंकेला 80000 कोटी ओतावे लागले. (च्यायंला एप्रिल 2016 ते 2018 परिवहन मंत्रालयात रस्त्याचे कार्य पाहणार्‍या अधिकारीचा पीएस होतो ) आज अत्यंत कमी व्याजावर पैसे घेऊन रास्ते बांधले जातात आहे. या नवीन रस्त्यांमुळे पेट्रोल आणि डिझेल खपत 20 टक्के निश्चित कमी झाली आहे. माझे जिजाजी निवृतिंनंतर अर्थात गेल्या 7 वर्षांत वर्षातून चार महीने कार सोबत रस्त्यातच असतात. करोंना काळांत ही किमान 20,000 किमी फिरले असेल ही त्यांच्या सोबत काही हजार किमी निश्चित फिरलो आहे. पूर्वी पेक्षा डिझेल खपत कमी होतो.

In reply to by कपिलमुनी

युपीए काळात तब्बल 384 रस्त्याचे प्रोजेक्ट बंद झाले होते. (2012 ते 2015 या काळात प्रधानमंत्री कार्यालयात रस्त्याचे कार्य पाहणार्‍या आयएएस अधिकार्‍याचा पीएस होतो. (आरटीआय करून खात्री करू शकतात).अधिकान्श पर्यावरण आणि पैशया अभावी. त्यातले प्रोजेक्ट पुन्हा सुरू कारायला एकाच बंकेला 80000 कोटी ओतावे लागले. (च्यायंला एप्रिल 2016 ते 2018 परिवहन मंत्रालयात रस्त्याचे कार्य पाहणार्‍या अधिकारीचा पीएस होतो ) आज अत्यंत कमी व्याजावर पैसे घेऊन रास्ते बांधले जातात आहे. या नवीन रस्त्यांमुळे पेट्रोल आणि डिझेल खपत 20 टक्के निश्चित कमी झाली आहे. माझे जिजाजी निवृतिंनंतर अर्थात गेल्या 7 वर्षांत वर्षातून चार महीने कार सोबत रस्त्यातच असतात. करोंना काळांत ही किमान 20,000 किमी फिरले असेल ही त्यांच्या सोबत काही हजार किमी निश्चित फिरलो आहे. पूर्वी पेक्षा डिझेल खपत कमी होतो. आज रास्ते मोठ्या प्रमाणात मोठ्या गतीने बनत आहे त्यासाठी पैसा हा लागणारच.

In reply to by कपिलमुनी

युपीए काळात तब्बल 384 रस्त्याचे प्रोजेक्ट बंद झाले होते. (2012 ते 2015 या काळात प्रधानमंत्री कार्यालयात रस्त्याचे कार्य पाहणार्‍या आयएएस अधिकार्‍याचा पीएस होतो. (आरटीआय करून खात्री करू शकतात).अधिकान्श पर्यावरण आणि पैशया अभावी. त्यातले प्रोजेक्ट पुन्हा सुरू कारायला एकाच बंकेला 80000 कोटी ओतावे लागले. (च्यायंला एप्रिल 2016 ते 2018 परिवहन मंत्रालयात रस्त्याचे कार्य पाहणार्‍या अधिकारीचा पीएस होतो ) आज अत्यंत कमी व्याजावर पैसे घेऊन रास्ते बांधले जातात आहे. या नवीन रस्त्यांमुळे पेट्रोल आणि डिझेल खपत 20 टक्के निश्चित कमी झाली आहे. माझे जिजाजी निवृतिंनंतर अर्थात गेल्या 7 वर्षांत वर्षातून चार महीने कार सोबत रस्त्यातच असतात. करोंना काळांत ही किमान 20,000 किमी फिरले असेल ही त्यांच्या सोबत काही हजार किमी निश्चित फिरलो आहे. पूर्वी पेक्षा डिझेल खपत कमी होतो. आज रास्ते मोठ्या प्रमाणात मोठ्या गतीने बनत आहे त्यासाठी पैसा हा लागणारच.

In reply to by विवेकपटाईत

बांधा, वापरा, हस्तांतरण करा या योजनेमध्ये सरकारवरील कर्जाचा बोजा वाढण्याचे कारण काय? जी कंपनी रस्ते बांधते ती कर्जाऊ पैसे उभे करते ना? आणि अत्यंत कमी व्यादराने कर्ज उपलब्ध आहे यात सरकारचा काय मोठेपणा आहे? व्याज दर पडलेत ही गुंतवणूकदारांच्या दृष्टीने वाईट बाब आहे ना? सरकारी पक्षावरील प्रेम उतू न जाऊ देता प्रतिसाद द्याल ही अपेक्षा.

In reply to by सर टोबी

तुमच्या प्रश्नाचे इथे समर्थक उत्तर देणार नाहीत. ते उत्तर त्यांच्या गैर सोयी चे आहे. विषयांतर मात्र नक्की करतील.

आज संजय निरुपम ह्यांची थोडी मुलाकात बघितली. हिंदी चॅनेल वर..राज ठाकरे वर प्रतिक्रिया घेत होती ती निवेदिका. १) ह्या प्रकरणात तुमचे मत काय आहे राज ठाकरे नी माफी मागितली पाहिजे का? उत्तर .मागितली पाहिजे त्यांनी उत्तर भारतीय लोकांना पिडा पोचवली आहे. निवेदिका. तुमची भूमिका आणि ब्रीज भूषण ची भूमिका एकच आहे. पण तुमचे पक्ष वेगळे आहेत मग तुम्ही ब्रीज भूषण च्या बाजूला जावून का बोलत आहात. सिक्सर च मारला. त्याचे कारण सरळ आहे संजय निरुपम हा उत्तर भारतीय लोकांच्या मतावर च निवडून येण्याची शक्यता आहे म्हणून. पण हे उत्तर त्यांनी दिले नाही.. इतके मुंबई मध्ये उत्तर भारतीय नेते आणि त्यांच्या राजकीय संघटना आहेत उत्तर भारतीय म्हणजे यूपी बिहारी. पण ..फक्त राजकीय. सामाजिक काम काय?.मुंबई मध्ये पुर आला तेव्हा ह्या सर्व उत्तर भारतीय राजकीय संघटना कुठे होत्या? मुंबई मध्ये गरीब यूपी,बिहार उपचार साठी येतात रस्त्यावर झोपतात. त्यांना बाकी समाज संघटना मदत करतात. ह्या यूपी ,बिहारी राजकीय संघटना तिथे पण समाजासाठी काम करत नाहीत. फक्त राजकीय फायदा मिळवणे ह्या पलीकडे ह्यांचा काही हेतू नाही जे उत्तर भारतीय लोकांचे हीत वादी असण्याचे नाटक करतात त्या सर्व उत्तर भारतीय राजकीय संघटनांचा. आता covid काळात. ब्रीज भूषण नी किती उत्तर भारतीय लोकांस त्यांच्या राज्यात सुखरूप परत येण्यास मदत केली. संजय निरुपम नी किती केली? असे प्रश्न उत्तर भारतीय लोकांना पडले तर त्यांचे भले होईल.

In reply to by sunil kachure

ऊत्तर भारतीय मुद्द्यावर काॅंग्रेस भाजपच्या भूमीका सारख्याच आहेत. ऊत्तर भारतीय का मराठी ह्यांच्यात एक निवडायला सांगीतले की भाजप नी काॅंग्रेस एका सेकंदात ऊत्तर भारतीय निवडतील. मागे भाजपचे थोर नेते हरलो तर “हिमालयात जाईन” ची गर्जना करून हरले तरी महाराष्ट्रातच ठाण मांडून असनारे चंद्रकांत पाटील म्हणाले होते “मनसेला युती करायची असेल तर ऊत्तर भारतीयांचा मुद्दा सोडावा लागेल. ह्यानुळे मराठी माणसाने ह्या दोन्हीही पक्षांपासून सावध रहावे, सेना, राष्ट्रवादी, मनसे मराठीमाणसा साठी कधीही चांगले.

In reply to by काड्यासारू आगलावे

सेना, राष्ट्रवादी, मनसे मराठीमाणसा साठी कधीही चांगले. @ काड्यासारू आगलावे ज्या सरकारचा गृहमंत्री एक वर्षांपासून खंडणी खोरीसाठी आत आहे. ज्या सरकारमध्ये मुंबईचा पोलीस आयुक्त फरार होता अल्पसंख्य विकास मंत्री सुद्धा आत आहे. दहशतवाद्यांशी साटे लोटे करण्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे न्यायालयाने सांगून सुद्धा त्यांचा राजीनामा घेतलेला नाही( कि शरद पवारांच्यात त्यांचा राजीनामा घेण्या एवढी हिम्मत नाही). जनाची नाही तरी निदान मनाची लाज असेल तर श्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. तेंव्हा या सरकारकडून काय कुणाच्या भल्याची अपेक्षा करणार?

In reply to by सुबोध खरे

सेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस हे पक्ष मराठी माणसासाठी कधीही चांगले कारण - सेनेचे राज्यसभेतील खासदार आहेत/होते राम जेठमलानी, चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, संजय निरूपम, प्रियांका चतुर्वेदी, प्रीतिश नंदी, रामकुमार धूत, राहुल बजाज - राष्ट्रवादीचे राज्यसभेतील खासदार तारिक अन्वर, डी पी त्रिपाठी - कॉंग्रेसचे महाराष्ट्रातून राज्यसभेतील खासदार पी चिदंबरम्, राजीव शुक्ला, अबिद अली जाफरभाई, व्हायोलेट अल्वा, गुलाम नबु आझाद, एम सी छागला, युसुफ खान, जोसेफ डिसुझा, नजमा हेपतुल्ला इ. आणि भाजप मराठी माणसासाठी कधीही वाईटच कारण - भाजपचे महाराष्ट्रातील खासदार अमर साबळे, भागवत कराड, प्रकाश जावडेकर, उदयन भोसले, नारायण राणे, संभाजी भोसले, विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे, रामदास आठवले, प्रमोद महाजन इ.

In reply to by श्रीगुरुजी

@ श्री गुरुजी आणि खरे सर कचुरे बुवांना तुम्ही कितीही counter केले तरी ते अजिबात उत्तर देत नाहित तेंव्हा त्यांच्या पोस्ट न वाचणेच ईष्ट. आपली उर्जा इतर विधायक लेखानात खर्च करणे योग्य ठरेल.

In reply to by श्रीगुरुजी

- भाजपचे महाराष्ट्रातील खासदार अमर साबळे, भागवत कराड, प्रकाश जावडेकर, उदयन भोसले, नारायण राणे, संभाजी भोसले, विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे, रामदास आठवले, प्रमोद महाजन इ. ह्यातील एकाने तरी कधी मराठी साठी कार्य केलंय का? सेनेत असताना राणे सोडले तर, फक्त आडनाव मराठी असून भागत नाही. मोदीशहांनी मुंबईतील कार्यालये गुजरातला हलवण्याचा कट रचला होता तेव्हा जावडेकर बोलले की सहस्त्रबुध्दे?? तेव्हा शिवयेनाच बोलली होती.

In reply to by काड्यासारू आगलावे

नावाने फक्त मराठी.एक शब्द पण राज्य सभेत मराठी हितासाठी किंवा महारष्ट्र साठी बोलले नाहीत. त्या पेक्षा सेना किंवा काँग्रेस किंवा राष्ट्र वादी ह्यांच्या अमराठी प्रतिनिधी नी महारष्ट्र,मुंबई ह्यांच्या हितासाठी चार शब्द तरी बोलले आहेतं. मराठी आडनाव म्हणजे मराठी नव्हे . जे महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे हीत जपतो तो मराठी. बाळासाहेब पण हेच सांगत असतं

In reply to by सुबोध खरे

ह्या सरकारचे भ्रष्ट मंत्री तुरूंगात आहेत ह्याचा अर्थ कायदा सुव्यवस्था चांगलीय राज्यात. आठवा भाजपचा काळ खिरापती सारखी क्लिनचीट वाटली गेली. “भाजपत येता की जेलात जाता?” ह्या तत्वावर मेगाभरती केली भाजपने.

In reply to by सुबोध खरे

उपाधी सह नाव लिहाली आहेत. कारण आमच्यावर संस्कार चांगले आहेत. गुन्हेगारी आणि राजकीय नेते,मंत्री ह्या वर बोलणे टाळावे. काही अर्थ नाही त्या मुळे नवाब मलिक किंवा अनिल देशमुख ही उदाहरणें देवू नका. डेटा बघा देशभर अट्टल गुन्हेगार खासदार आमदार,मंत्री आहेत. मीडिया नी किती तरी वेळा गुंड आमदार ,खासदार ह्यांची माहिती दिली आहे. ब्रीज भूषण अट्टल गुन्हेगार आहे दाऊद च्या साथीदार ना त्यांनी लपवले होते .tada च गुन्हेगार आहे आज bjp च मुख्य मंत्री पण त्याचा गुलाम आहे. गुंड च आहे तो. यूपी ,बिहार मध्ये असंख्य गुंड नेते आहेत मंत्री आहेत. Bjp चे जास्त लोक प्रतिनिधी आहेत म्हणजे गुंड लोकांची संख्या bjp मध्ये जास्त आहे. देशातील प्रतेक राज्यात गुंड आमदार ,खासदार आहेत. महाराष्ट्र मध्ये गुंड आमदार खासदार असण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. अजून बोलायला लावू नका.नाही तर अवघड होईल.

पहाटे पहाटे शपथ विधी करून जशी bjp ची फजिती झाली तशी परत राज ठाकरे नी ह्यांची फजिती केली आहे. सहन होत नाही आणि सांगता पण येत नाही अशी अवस्था. २)राज ठाकरे ह्यांची जाहीर मुस्लिम विरोधी भूमिका आणि bjp नेत्यांचे तत्काळ राज ठाकरे ह्यांना पाठिंबा. म्हणजे राज ठाकरे ह्यांची भूमिका ही bjp ची अधिकृत भूमिका आहे हा संदेश ३) ब्रीज भूषण ह्यांचा राज ठाकरे ना विरोध आणि धमकी पण. राज ठाकरे कोणी ही असोत पण मराठी लोकांचे प्रतिनिधित्व करतात. ब्रीज भूषण ह्या bjp खासदार राज ठाकरे ना धमकी देतो म्हणजे मराठी लोकांस धमकी देतों. हा पण संदेश गेला. आणि bjp चे महारष्ट्र मधील नेते,राष्ट्रीय पातळीवर चे नेते ब्रीज भूषण ह्यांच्या विरोध मध्ये एक शब्द बोलत नाहीत. ह्याचा अर्थ bjp ही मराठी विरोधी आहे. ४) उत्तर भारतीय लोकात १० टक्के तरी मुस्लिम आहेत आणि मुस्लिम लोकांचं विरोध ,सेना,राष्ट्र वादी,काँग्रेस ह्यांनी केला नाही.तर उत्तर भारतीय असले तरी महा आघडी लाच मत देणार. दक्षिण भारतीय हिंदी वरून bjp वर नाराज आश्रय च ये बोलत नाहीत पण तर bjp विरोधी मतदान करणार च. Bjp च स्वतचं डाव स्वतःवर च उलटला आहे. सेना bjp युती होती तेव्हा कोणाचीच गरज नव्हती मारवाडी,गुजराती,मराठी लोकांच्या जिवावर आरामात निवडणूक जिंकणे शक्य होते

राज ठाकरे,ब्रीज भूषण ह्या तमाशा मुळे एक स्पष्ट संदेश महाराष्ट्रात गेला . Bjp मराठी लोकांच्या विरुद्ध अशें अमित शाह ह्यांच्या हिंदू वरील स्टेटमेंट मुळे एक स्पष्ट संदेश गेलं Bjp दक्षिण भारतातील प्रतेक राज्य विरोधी आहे.. बसा हिंदी हिंदी आणि राम राम करत.

In reply to by sunil kachure

अशा स्पष्ट आणी कडक संदेशामुळे महाराष्ट्रातलीच काय पण उर्वरित भारतातील समस्त जनता भाजपला पुन्हा एकदा २०१४ आणी २०१९ सारखा चांगलाच धडा शिकवेल. याबाबत मी तुमच्याशी सहमत आहे. १००० %.

राज ठाकरे,ब्रीज भूषण ह्या तमाशा मुळे एक स्पष्ट संदेश महाराष्ट्रात गेला . Bjp मराठी लोकांच्या विरुद्ध अशें अमित शाह ह्यांच्या हिंदी भाषे वरील स्टेटमेंट मुळे एक स्पष्ट संदेश गेलं Bjp दक्षिण भारतातील प्रतेक राज्य विरोधी आहे.. बसा हिंदी हिंदी आणि राम राम करत.

उद्धव ह्या ना कसलेला न समजणे सर्वात मोठा मूर्ख पना. १) सुशांत सिंग . आरोपी खान लोक मुस्लिम. सेना त्याच्या डावात फसली नाही. २) कंगना,अर्णव राम राम वाले सेना त्या मध्ये फसली नाही. ३) राज ठाकरे भोंगे ,नवनीत राणा हनुमान चालीसा . सेना ह्या मध्ये फसली नाही. मुंबई महानगर पालिका निवडणूक ही फक्त मुंबई चे उज्ज्वल भविष्य आणि मराठी हीत ह्या वर लढली गेली पाहिजे. सर्व दक्षिण भारतीय राज्य आज सुपात असतील तर उद्या जात्यात आहेत .हे अमित शाह ह्यांच्या हिंदी वर जे वक्तव्य केले आहे त्या वरून त्यांच्या लक्षात आले आहे. ह्या वर च जोर देवून प्रचार अगदी आक्रमक पने केला तर हिंदी भाषा हा अडसर दूर होईल.

ठाकरेंनी पेट्रोल डिझेल दरकपातीचा निर्णय घेतलाच नाही, मे महिन्यात 'एप्रिल फूल' केलं : फडणवीस https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/devendra-fadnavis-… -------- हे राज्य सरकार म्हणजे, "आयजीच्या जीवावर बायजी उदार ...."

In reply to by मुक्त विहारि

फडणवीस नेहमी “सत्य“ बोलत असल्याचा महाराष्ट्रातील जनतेला विश्वास आहे. :)

In reply to by काड्यासारू आगलावे

जास्त लिहीत नाही... जमल्यास, खालील पुस्तके जरूर वाचा ... कर्हेचे पाणी, भाग 1 ते 5.... त्यातील एका भागांत, "आयजीच्या जीवावर बायजी उदार"... ह्या शिवसेनेच्या गुणाबाबतीत, पुरेशी माहिती मिळेल...