भाषा
१
१
त्यांनी हिंदीत का बोलावं?
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif…
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे.
भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.
नुकताच एका परिचितांनी ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.
या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात.
सीमावादात महाजन आयोगाचा महाराष्ट्रावर अन्याय
http://www.misalpav.com/node/47884 इथल्या चर्चेच्या संदर्भाने काही जणांना(विशेषत: सध्याच्या तरुण पिढीला किंवा द.महाराष्ट्रात राहत नसलेल्यांना) महाराष्ट्राचा सीमाप्रश्न नक्की काय आहे? महाराष्ट्र त्यासाठी का लढतो आहे? नक्की काय अन्याय महाराष्ट्रावर झाला आहे हे समजावे यासाठी हा धागा!
--------------------------------------------------
ऋणनिर्देश : पत्रकार शांताराम बोकील _/\_
महाजन अहवालावर प्रकाशझोत - शांताराम बोकील
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादातून मार्ग काढण्यासाठी सत्तावन्न वर्षापूर्वी न्या.
मराठी ही अभिजात भाषा होण्यात अडचणी कोणत्या?
http://www.misalpav.com/node/47611
या धाग्यावर मधेच मराठी अभिजात भाषा आहे का या विषयावर चर्चा सुरु होती.ती स्वतंत्रपणे व्हावी यासाठी हा धागा.
मराठी भाषा ही अभिजात व्हावी यासाठी काहीजण प्रयत्न करत असतानाच ती अभिजात होऊ नये यासाठी काही मराठी लोकच प्रयत्न करत असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात होते.याची दोन प्रमुख कारणे म्हणजे मराठी ही संस्कृतोद्भव नाही हे सिद्ध झाल्यास त्यातला आर्य प्रभाव कमी होईल म्हणून काही ब्राह्मणद्वेष्टे साहित्यिक आणि संघटना यासाठी प्रयत्न करत असल्याचे काही साहित्यिकांना विशेषत: संस्कृतप्रेमी साहित्यिकांना वाटते आहे.हे एक कारण.
त्याकाळी ते का शक्य झालं नसावं?
मराठी ही भाषाकुळानुसार 'इंडो-आर्यन' भाषाकुलात येते.म्हणजेच मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे.महाराष्ट्राच्या पूर्वेला तेलंगण आणि महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व भागाला जोडून असणारा प्रदेश कर्नाटक आहे.तेलंगणात तेलुगू तर कर्नाटकात कन्नड या भाषा बोलल्या जातात.कन्नड आणि तेलुगू या दोन्ही भाषा द्रविड या भाषाकुलात येतात.
उत्तरेकडून आर्यांच्या टोळ्या महाराष्ट्रात आल्या आणि येताना त्यांनी सोबत स्वत:ची संस्कृत भाषा सुद्धा आणली.ती महाराष्ट्रात पसरवली किंवा लादली किंवा देवाणघेवाणीतून पसरली असे समजू.
मराठी अजूनही अन्याय सोसतेच आहे !
हिंदी भाषेच्या ज्या बोली आहेत त्यामधे खडी बोली सर्वात प्रभावी असल्याने तिचा वापरही सर्वाधिक आहे.विशेषत: दिल्लीसारख्या महानगरात आणि आसपासच्या प्रदेशात.
देवनागरी लिपीत ै या दोन मात्रांचा उच्चार ऐ असा केला जातो.पैलवान , दैव इ.
पण याच दोन मात्रांचा खडी बोलीतला उच्चार मात्र इंग्रजीतल्या ॲ सारखा आहे.
हिंदीला पर्याय असू शकतो?
मराठी तसेच अन्य हिंदीतर भाषांवर हिंदीचे आक्रमण वाढते आहे.आपल्या मराठी बाबत सांगायचे झाले तर तरसणे,बातचीत असे कितीतरी मराठी नसलेले शब्द वृत्तवाहिन्यांमुळे मराठीत शिरतायत.हिंदी व्याकरणाचाही प्रभाव पडून 'मी बोलली',मी आली,मी गेली,आवाज दिला का?(हाक मारली का?) हे असे कितीक हाल मराठी सोसतेय.वर्धा महाराष्ट्रात असूनही तिथे हिंदी विद्यापीठ आहे.
केवळ मराठीच नव्हे तर बाकीच्याही हिंदीतर भारतीय भाषांबाबतही होतंय.फेसबुकवर या हिंदीच्या आक्रमणाची खंत मांडणारी पाने,समूह सुरु झाली आहेत.खालील दुव्यांवर आपण ते पाहू शकता.
मातृभाषेबाबत आग्रही राहण्याचं एक उदाहरण म्हणून तामिळनाडूचं नाव नेहमी पुढं केलं जातं.त्य
व्यावहारिक नुकसान काय?
आज 'मराठी राजभाषा दिन'.नेहमीप्रमाणे मराठीची काळजी करण्याचा दिवस. :)
दरवेळी भावनिक आवाहन करुन मराठी जपण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा यावेळी थोडासा उलटा विचार करुन पाहिला तर?
म्हणजे मराठीत बोला,मुलांना मराठी शाळेत घाला,आपली मातृभाषा आहे वगैरे वगैरे भावनिक आवाहन करण्यापेक्षा मराठी भाषा येत्या १०० वर्षात लोप पावली तर व्यावहारिक/आर्थिक स्तरावर(भावनिक नव्हे)काय नुकसान होईल याचा अंदाज बांधला तर?
मिसळपाव