✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पी एम केअर फंड- लपवा छपवी?

श
शुर यांनी
Mon, 09/27/2021 - 21:37  ·  लेख
लेख
सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पीएम केयर्स फंडाला एनडीआरएफमध्ये ट्रान्सफर करण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही, असं न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, प्राईम मिनिस्टर्स सिटीझन असिस्टेंट्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स (पीएम केअर्स) फंडाला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अर्थात नॅशनल डिझॅस्टर रिलीफ फंड (एनडीआरएफ)मध्ये विलीन करण्याची आवश्यकता नाही. पी एम केअर फंड ची स्थापना कोरोना काळात करण्यात आली. आताच सरकारने जाहीर केलेय की तो निधी सरकारी नाही. किती पैसे जमा झाले? किती खर्च करण्यात आले? ह्याचा कुठलाही हिशेब देण्यास नकार देण्यात आलाय. कोरोना संकटात भरभरून दान देण्यात आलेल्या पैशांचे काय झाले ह्याचा हिशेब देण्याची नैतिक जबाबदारी भारत सरकारची आहे. ही जबाबदारी सरकार का पार पाडत नसावे?? नेमकं काय आणी का लपवण्यात येत आहे?? पैसे खर्च केलेत तर तसं देशातील जनतेस दाखवण्यात नेमकी काय समस्या आहे?? पीएम केअर्स या फंडातील ५० हजार कोटी रुपये गेले कुठे? असा प्रश्न कोंग्रेसने ऊपस्थित केलेत. ह्यात गोपनीय ठेवण्यासारखे नेमके काय आहे? https://www.loksatta.com/desh-videsh/pm-care-fund-is-not-a-government-fund-affidavit-of-the-center-in-the-high-court-akp-94-2601089/ https://www.bbc.com/marathi/india-53838492
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22304 वाचन

💬 प्रतिसाद (149)

प्रतिक्रिया

प्रभु

रंगीला रतन
Tue, 09/28/2021 - 13:10 नवीन
तुमचे अर्थशास्त्रीय ज्ञान पृथ्वीतलावरचे नसल्याने पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

Bjp चे समर्थन का करावे

Rajesh188
Tue, 09/28/2021 - 15:09 नवीन
इंदिराजी नी दोन वर्ष च जाहीर पने आणीबाणी लावली पण त्या काळात गरीब ,सर्व सामान्य लोकांना काहीच त्रास झाला नाही उलट फायदाच झाला. आता मोदी सरकार च्या काळात ed,cbi, आणी केंद्रीय यंत्रणा खुले आम् विरोधी पक्ष वर राजकीय हेतू नी कारवाई करत आहेत दबावखली. सर्व न्यूज चॅनल वर इतका दबाव आहे की ते शेतकऱ्या चे आंदोलन पण दाखवत नाहीत . दाखवलं तर Ed, CBI, त्यांच्या पाठी लागतील. सामान्य लोकांचे खडतर झाले आहे. इंदिराजी chya आणीबाणी पेक्षा आता ची अवस्था खराब आहे. जे इथे अती शहणे bjp चे गुणगान करत असतात त्यांची संपत्ती मोदी च्या काळात किती वाढली हे कॉमेंट मध्ये सांगावे. हे पण धंद्याला लागले आहेत..फक्त विशिष्ट धर्म द्वेष,जाती द्वेष इतका तीव्र आहे की आर्थिक बाबतीत वाट लागली तरी मोदी च ग्रेट अशी विचार सरणी आहे भक्तांची.
  • Log in or register to post comments

जे इथे अती शहणे bjp चे गुणगान

सुबोध खरे
Tue, 09/28/2021 - 19:39 नवीन
जे इथे अती शहणे bjp चे गुणगान करत असतात त्यांची संपत्ती मोदी च्या काळात किती वाढली हे कॉमेंट मध्ये सांगावे. तुमची संपत्ती वाढली नाहीये का? उगी उगी तुम्ही हवे ते बेफाट आरोप करा. पण शेवटी २०२४ मध्ये श्री मोदीच परत येणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मोदी येणार मोदी येणार

hrkorde
Tue, 09/28/2021 - 19:43 नवीन
ते एवढेच लिहितात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कारण ते "खरे " आहेत! :-)

नावातकायआहे
Tue, 09/28/2021 - 23:24 नवीन
कारण ते "खरे " आहेत! :-) आणि मोदी येणार तर आहेतच! इथे कळफडक बडवुन कुणा वाचकाचे मत बदलेल असे मला तरी वाटत नाही. बाकी लगे रहो.... निरीक्षणः "तिकडे" राजकिय धाग्यांना पंख लावल्याने "टोळ"धाड इकडे आली आहे असे दिसते. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hrkorde

निरीक्षणः "तिकडे" राजकिय धाग्यांना पंख लावल्याने "टोळ"धाड इकडे आ

प्रसाद_१९८२
Wed, 09/29/2021 - 12:46 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

"तिकडे" म्हणजे कोठे?

श्रीगुरुजी
Wed, 09/29/2021 - 22:03 नवीन
"तिकडे" म्हणजे कोठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

होय !

प्रसाद गोडबोले
Wed, 09/29/2021 - 11:17 नवीन
फक्त विशिष्ट धर्म द्वेष,जाती द्वेष इतका तीव्र आहे की आर्थिक बाबतीत वाट लागली तरी मोदी च ग्रेट अशी विचार सरणी आहे भक्तांची.
होय ! १. सर्वप्रथम , जो विभक्त नाही तो भक्त ! भक्त हा हिंदु संस्कृती हिंदु परंपरेतील एक अत्यंत पवित्र शब्द आहे , भक्तीला पंचम पुरुषार्थ मानले गेलेले आहे. ज्ञानयोग कर्मयोग आणि राजयोग ह्या तिन्ही वैदिक योगांपेक्षा जास्त महत्व सर्वच संतानी भक्तीयोगाला दिलेले आहे. इतक्या पवित्र शब्दाचा तुम्ही इतक्या कोत्या मानसिकतेतुन वापर करता ह्यातुनच तुमचा हिंदु द्वेष प्रकट होतो. आपण कितीही वाईट छ्टा द्यायचा प्रयत्न केलात तरीही भक्त ह्या शब्दाचे पावित्र्य कमी होणार नाहीये , कारण सोन्याला कधीही गंज लागत नसतो ! होय, मी भक्त आहे आणि मला त्याचा अभिमान आहे ! २. होय. हजार वर्षे आमची मंदिरे उध्वस्त करण्यात आलीत , आमची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगदी स्वातम्त्र्यानंतरही खणखणीत दगडात कोरलेले पुरावे असुन आम्हाला आमचे हक्काचे राममंदिर बांधायला ७० वर्ष लागली. अजुनही काशीविश्वनाथ मंदिराचे खांबही ओरडुन ओरडुन सांगत आहेत इतिहास. मथुरेच्या कृष्णमंदिरा पाडण्याबाबत तर खुद्द आलमगीर चे पत्रच उपलब्ध आहे. तब्बल ३० जैन आणि कित्येक मंदिरे तोडुन बनवलेला कुतबमिनार आजही तुमच्या छाताडावर उभा आहे ! इतके खणाखणीत पुरावे असुन आम्हाला अजुनही न्याय मिळत नाही ! ही असली तुमची न्याय व्यवस्था ! किमान ३०-४० कोटी लोकं आजही हा अन्याय सहन करत न्यायाच्या आशेने जगत आहेत त्यांना न्याय मिळेलच. कारण सत्यमेव जयते हे केवळ शो ला म्हणुन तुम्ही वापरत असलात तरी मुळात ती आमची संस्कृती आहे आमची श्रध्दा आहे ! सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः। येनाक्रमंत्यृषयो ह्याप्तकामो यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्॥ हे सर्व प्रश्न इनमीन ६०-७० वर्षाच्या आपल्या आयुष्याचे नाहीत , हे हजार वर्षांचे प्रश्न आहेत ! ते सोडवायचा संयम हवाच , त्या साठी नजीकच्या काळात कष्ट भोगायला लागले तरीही हरकत नाही. ह्या सर्व अन अन्य भ्रष्ट केलेल्या हजार मंदिरांचे पुनर्निर्माण होणार असेल तर त्या नादात शॉर्ट टर्मसाठी अर्थव्यवस्था संपुर्ण डबघाईला गेली तरी बेहत्तर ! (आणि तशीही ती जाणार नाहीये ह्याची आम्हाला फुल्ल ग्यॅरंटी आहे ! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

छान

hrkorde
Wed, 09/29/2021 - 11:31 नवीन
तुमचे राजेशाहीचे राजे ह्याला जबाबदार आणि बोम्बलायचे लोकशाईच्या नावाने, ते पाडत होते, तेण्व्हा तुमचे राजे महाराजे प्रधानजी सेनापती होते ना ? कि सगळी बुजगावणी होती ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

१००% सहमत

गामा पैलवान
Wed, 09/29/2021 - 13:17 नवीन
मार्कस ऑरेलियस, तुमच्या प्रत्येक मुद्द्याशी शंभर टक्के सहमत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

५०० वर्षा आधी झालेल्या

शुर
Wed, 09/29/2021 - 13:28 नवीन
५०० वर्षा आधी झालेल्या घटनांचा दाखला देऊन भ्रष्टाना पक्षात घेवून पवित्र करून घेणार का?? पेट्रोल दर ११० करून हिंदूंचे कंबरडे मोडनार का?? हिंदूंकडून कोरोनाच्या नावाने पैसा घेवून पैसा सरकारी नाही आमचा खासगी आहे असं सांगून हिंदूंच्याच तोंडाला पाने पुसनार का?? गॅस चे दर वाढवून हिंदू घरांचं आर्थिक कंबरडं मोडनार का? रस्तावंर टोल नावाची भरमसाट लूटमार करनार का?? निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधनार का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सरकार चे काम

Rajesh188
Wed, 09/29/2021 - 13:40 नवीन
मंदिर,मशीद ,चर्च बांधणे नाही.सरकार चे काम आहे शेवटच्या स्तरातील लोकपर्यंत विकास च्या संध्या निर्माण करणे. शहरी अर्थ व्यवस्था मजबूत करणे हे कर्तव्य च आहे पण सुनियोजित ,स्वच्छ,सर्व सोयी नी युक्त राहण्यास उत्तम शहर निर्माण करणे बकाल, कचरा पट्टी युक्त शहर नाहीत. ग्रामीण अर्थ व्यवस्था अतिशय मजबुत करणे त्यांना शहरात येण्याची गरज च लागली नाही पाहिजे. जशी काँग्रेस नी महाराष्ट्र मधील ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत केली होती (पण त्या क्षमतेचे नेते आता कोणत्याच पक्षात नाहीत) भ्रष्टाचार मुक्त प्रशासन. इथे लष्कराला लागणाऱ्या हत्यार चे pvt करीन चालू आहे . हे अविकसित विचार क्षमतेचे लक्षण आहे. मंदिर बांधून देश मजबुत,प्रबळ होत नाही. पाकिस्तान मध्ये गलोगल्ली मशिदी आहेत . कुत्रा विचारात नाही त्यांना जगात. तीच भारताची अवस्था करायची आहे का अज्ञानी bjp सरकार ल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तुम्ही गट क्रमांक २ काय ?

प्रसाद गोडबोले
Wed, 09/29/2021 - 14:25 नवीन
अभ्यास वाढवण्याची नितांत गरज आहे तुम्हाला
मंदिर,मशीद ,चर्च बांधणे नाही.
तिकडे तुर्कस्तान ने हगिया सोफिया ला परत मशीद बनवले आहे . ९११ नंतर ट्विन टॉवर च्या पाडलेल्या जागी १ वर्ल्ड ट्रेड सेंटर गर्वाने उभे आहे ! इतं लांबचे कशाला , खुद्द श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे जिथे मंदिरे उध्वस्त करुन मशीदी निर्माण झालेल्या होत्या ते पाडुन पुनः मंदिरांची स्थापना केलेली आहे. गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिर आज अभिमानाने उभे आहे ! राजाराम महाराजांच्या पत्रात काशीविश्वनाथाचे मंदिर पुनर्निर्माण करण्याचा ही उल्लेख आहे . तुम्ही अल्पदृष्टी आहात म्हणुन जग अख्खे अल्प दृष्टी ठरत नाही . इन अ लाँग टर्म , सगळे रिक्लेम करायचेच आहे !
जशी काँग्रेस नी महाराष्ट्र मधील ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत केली होती
ओ शेठ , कुठल्या जगात जगताय तुम्ही ? तुम्ही फिरलाय का कधी गावात ? काँग्रेसने अन राष्ट्रवादीने काय अर्थव्यवस्था मजबूत केली होती हे आता अख्ख्या दुनियेला कळुन चुकलं आहे . कृषी कायद्यानंतर बाजार समीतीतील कोणत्या पक्षाचे वर्चस्व संपले ? नोटाबंदी नंतर सहकारी बँकात जे काही झोल चालले होते ते कोण करत होतं ? सहकार मंत्रालय स्थापन केल्यावर कोणाची अवस्था बिकट झाली ? सगळ्यांनाच आमदारकीचे तिकिट देता येत नाही म्हणुन आपलेच चमचे सहकारी बंका, साखरकारखाने , बाजार्समीत्यात बसवुन ठेवायचे तेही खुष अन रितसर विना तक्रार मलिदा खाता येत असल्याने आपणही खुष. ही कोणत्या पक्षाची मोडस ऑपरेंडी होती हे आता अख्ख्या दुनियेला कळुन चुकले आहे ! उगाच वेड पांघरुन पेडगावाला जायचं असेल तर खुषाल जावा ! बाकी भक्त ह्या श्ब्दावर काही बोलला नाहीत हे एक बरे वाटले , हिंदुंच्या श्रध्दांचे आता तरी विद्रुपीकरण थांबवाल अशी आशा आहे. कारण कसे आहे की हे भाजप कॉम्ग्रेस , उजवे डावे , सत्तेत येतील जातील , पण उगाच आवेशाच्या नादात तुम्ही तुमची कोती मानसिकता अन हिंदु द्वेष दाखवुन देत आहात बस्स इतकेच ! शुभं भवतु !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

सहकारी चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली

Rajesh188
गुरुवार, 09/30/2021 - 13:42 नवीन
ती त्या काळातील दूर दृष्टी असणाऱ्या काँग्रेस नेत्यानं मुळे. सहकारी बँका,दूध उत्पादक संघ,साखर कारखाने,शाळा,कॉलेजेस उभी राहिली. देशातील बाकी राज्यांपेक्षा महाराष्ट्र मधील ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत होती. बाकी सर्व राज्यात जमीन दारी आणि गुलामगिरी चालू होती. तुम्ही arthvat माहिती वर सल्ले देत असत. विविध धरण,सिंचन योजना ,राज्याचे विद्युत करण काँग्रेस नीच केले. आता सहकार क्षेत्र कमजोर झाले आहे कारण लायकीचे नेतृत्व कोणत्याच पक्षात नाही . आणि समर्थक तर पण उंटा वरून शेळ्या हकणारे आहेत..मुंबई पुण्यात मराठी लोकांची संख्या कमी असण्याचे कारण महाराष्ट्रात ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत आहे . Bjp ल काहीच दूर दृष्टी नाही.bjp मध्ये लायकीचे नेते नाहीत.. सर्व चोर,lutere, badmash मिळून bjp स्थापन झाली आहे. चेहरा बदलण्या साठी विविध पक्षातून कर्तुब वान नेते आमिष दाखवून ,भीती दाखवून म्हणून तर bjp जमा करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ऑऑऑ

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 09/30/2021 - 13:56 नवीन
ऑऑऑ कित्ती क्युट , चो च्वीट ! कसला बाळबोध प्रतिसाद आहे हो तुमचा. तुम्ही म्हणजे विनोबा भावे अन साने गुरुजींना टफ फाईट द्याल. =)))) पण झोपेतुन जागे व्हायची इच्छा असल्यास एकदा इकडे पश्चिम महाराष्ट्रात येऊन जावा कधीतरी साखर कारखान्यांच्या किंव्वा दुधसंघाच्या निवडणुकीच्या वेळेला =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

तुम्ही नीट वाचला नाही प्रतिसाद

Rajesh188
गुरुवार, 09/30/2021 - 14:29 नवीन
दूरदृष्टी असणारे नेतृत्व आता कोणत्याच पक्षात नाही. सहकार क्षेत्राचे रोपटे लावून त्याचा वट वृक्ष त्या काळच्या नेत्यांनी केला. आता ते दिवस गेले. मराठी वादी सेने नी मुकेश पटेल राज्य सभ्येवर पाठवला.निष्ठावंत कार्यकर्त्या ना बाजूला सारून विविध पक्षातून आलेल्या नेत्यांना bjp नी मंत्रिपद दिली. आता राजकारण म्हणजे फक्त व्यवसाय आहे. आणि ह्या बाजारात विकणारा माल ह्या भावना आहेत. भारतात सर्वात जास्त उत्पादन हिरो ,आणि धार्मिक नेते ह्यांचे होतें बाकी कोणत्याच क्षेत्रात उत्पादन होत naslya मुळे आयात वाढली आहे. हिरो आणि धार्मिक नेते फक्त आयात होत नाहीत. जनतेने डोळे उघडे ठेवणे गरजेचे आहे. काँग्रेस ची परंपरा विकासाची आहे थोडेफार तरी ते गुण त्या पक्षात आहेत. Bjp ची परंपरा च धर्मीक उन्माद ही आहे त्यांच्या हातून विकास कधीच होणार नाही. ज्यांनी सहकार क्षत्रच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो ची

धनावडे
गुरुवार, 09/30/2021 - 15:05 नवीन
मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो ची वेगाने झालेली काम पाहिली नाहीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

सर

इरसाल
Wed, 09/29/2021 - 14:52 नवीन
शेवटच्या स्तरातील लोकपर्यंत विकास च्या संध्या निर्माण करणे. संध्या ??????? खरच कां. सर तुम्ही ऑनलाईन शिकवणी घेता कां?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मंदिर,.......................

चौथा कोनाडा
Wed, 09/29/2021 - 17:21 नवीन
मंदिर,........................शेवटच्या स्तरातील लोकपर्यंत विकास च्या संध्या निर्माण करणे.
मला तर हीच संध्या आठवली बुवा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

घसरण

प्रदीप
Wed, 09/29/2021 - 16:16 नवीन
जे इथे अती शहणे bjp चे गुणगान करत असतात त्यांची संपत्ती मोदी च्या काळात किती वाढली हे कॉमेंट मध्ये सांगावे. हे पण धंद्याला लागले आहेत..फक्त विशिष्ट धर्म द्वेष,जाती द्वेष इतका तीव्र आहे की आर्थिक बाबतीत वाट लागली तरी मोदी च ग्रेट अशी विचार सरणी आहे भक्तांची.
रा.रा. १८८ मुद्दामहून विषय भरकटावताहेत, असा आरोप करणे म्हणजे, इतकी का होईना, त्यांच्यात काही चलाखी आहे, असे मान्य करणे होईल. तेव्हा ते मी करत नाही. पण तुम्ही त्यांच्या, ह्या धाग्याच्या मूळ विषयाशी काहीही संबंध नसलेल्या टिपण्णीवर प्रत्युत्तर देऊन हा धागा भरकटावयास, कळत नकळत हातभार लावला आहे. आता कृपया थांबावे, ही विनंति.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ह्याच विषयावरची आज आलेली

मराठी_माणूस
Tue, 09/28/2021 - 15:26 नवीन
ह्याच विषयावरची आज आलेली पत्रे https://www.loksatta.com/sampadkiya/lokmanas/letter-to-an-editor-letters-from-readers-zws-70-2606400/
  • Log in or register to post comments

ह्या हा हा

Rajesh188
Tue, 09/28/2021 - 15:39 नवीन
Ed chya भीती नी प्रसार माध्यम मोदी सरकार विरोधी कॉमेंट प्रसिद्ध च करत नाहीत .त्यांना भीती आहे . महाराष्ट्रात सर्व सत्ताधारी नेत्यांवर ed धाड takat आहे पण एका पण bjp नेत्यांवर टाकत नाही . डोळे उघडा.पुढचे टार्गेट भक्त पण असतील. केरळ,महाराष्ट्र,बंगाल ह्या राज्यांना केंद्र सरकार टार्गेट करत आहे..तमिळ nadu केंद्रीय सत्तेला काडी ची किंमत देत नाही आणि त्या राज्यात राज्य द्रोही लोक नाहीत.. महाराष्ट्रात राज्य द्रोही लखोबा लोखंडे ची संख्या कमी नाही.. म्हणून अजुन पण ह्यांना bjp च गोड वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

शिवसेनेला विरोध म्हणजे

धनावडे
Tue, 09/28/2021 - 20:30 नवीन
शिवसेनेला विरोध म्हणजे महाराष्ट्राला विरोध का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

धनावडे

Rajesh188
Wed, 09/29/2021 - 14:16 नवीन
ते सेनेला विरोध करत नाहीत महाराष्ट्र ल बदनाम करत आहेत जो महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन आहे. कंगना,अर्णव,राणे,राम कदम,फडणवीस,चंपा हे सर्व मिळून महाराष्ट्र ल बदनाम करत आहेत. राज्यातील लोकांच्या समस्या,अडचणी,विकास काम,सिंचन योजना,अशा विषयावर bjp virodhi पक्ष म्हणून कधी काही बोलली आहे जा? ह्यांना त्या सुशांत ची काळजी,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे

आवरा, खरेच आवरा =))))

प्रसाद गोडबोले
Wed, 09/29/2021 - 14:33 नवीन
आवरा, खरेच आवरा =)))) तुम्हाला खरेच कळत नाहीये की मुद्दामुन करताय ? महाराष्ट्राची बदनामी १०० कोटीच्या हप्ते वसुलीने होते, भर मुंबईत साकीनाक्यावर होणार्‍या रेप ने होते . मंत्र्याची जाहीरपणे प्रेमप्रकरणे आहेत अन तरीही त्यांना पाठीशी घातले जाते हे पाहुन होते , सरळ सरळ मंत्र्याशी गप्पा मारणार्‍या युवतीच्या आतमहत्येने होते , पोलिसांच्या देखत २ सांधुंची जमावाकडुन हत्या होते अन सरकार गप्प बसते ह्यामुळे होते ! आणि सगळ्यात जास्त बदनामी तर मेडीकल सायन्स चा अभ्यास नसणार्‍या माणसाला डब्ल्यु. एच. ओ. च्या अध्यक्षापेक्षा जास्त कळते असे म्हणण्याने होते ! आवरा , आवरा स्वतःला . हिंदुद्वेष / भाजपा द्वेष करा पण मर्यादित करा , इतकाही करु नका की स्वतःचे नुकसान होईल ! काळजी घ्या .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

कशाला त्रागा करून घेताय?

श्रीगुरुजी
Wed, 09/29/2021 - 14:43 नवीन
कशाला त्रागा करून घेताय? तुम्ही जे लिहिलंय ते समजणं या इसमाच्या आवाक्यातलं आहे का? '***पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता' हा वाक्प्रचार माहिती आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मजा

प्रसाद गोडबोले
Wed, 09/29/2021 - 15:15 नवीन
त्यांना कळणार नाही , त्यांच्या आवाक्याचा बाहेर आहे हे तर अख्ख्या मिसळपाव ला माहीत आहे =)))) ते एका मागुन एक फुल्ल्टोस्स टाकत आहेत आणि आपल्याला मस्त ब्यॅटींग करता येत आहे म्हणुन मजा येत आहे , बाकी काही नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हिंदू द्वेष

Rajesh188
Wed, 09/29/2021 - 14:48 नवीन
मी स्वतःच हिंदू अभिमानी आहे हिंदू द्वेष का करेन.पण bjp ही जर हिंदू हित वादी पार्टी आहे तर ज्यांच्या सात वर्षाच्या काळात हिंदू आर्थिक ,सामाजिक ,शैशनिक बाबतीत मजबुत झाले पाहिजे होते. काँग्रेस काळा पेक्षा कमजोर झाले. चार हिंदू नाव धारण केलेले उद्योग पती श्रीमंत झाले म्हणजे हिंदू आर्थिक बाबतीत मजबुत झाले असे नाही .ते उद्योगपती आहेत देश सोडून कधी ही बाहेरच्या देशात जावून स्थायिक होतील. आकडेवारी ध्या . किती सिंचन योजना bjp काळात निर्माण झाल्या किती वीज जोडण्या शेतकऱ्यांना दिल्या. किती शेतमाल एक्सपोर्ट करण्यासाठी सरकार सक्रिय होते. ग्रामीण अर्थ व्यवस्था bjp काळात किती सुधारली. बकाल शहर आहे तशीच आहेत ,स्थलांतर bjp काळात किती कमी झाले प्रशासन भ्रष्ट आहे तसेच आहे,न्याय मिळण्यास विलंभ अजुन पण आहे तसाच आहे उलट वाढला आहे . काय देशात बदल झाला BJP येवून..फक्त राम मंदिर संपत्ती विवादात आताच एकाने आत्न हत्या केली ..राम भक्त खरा तरी कोणी आहे का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मी स्वतःच हिंदू अभिमानी आहे

प्रसाद गोडबोले
Wed, 09/29/2021 - 16:15 नवीन
मी स्वतःच हिंदू अभिमानी आहे हिंदू द्वेष का करेन.
दूरदृष्टी नसलेले हिंदु हिंदुंचा द्वेष करतात हे ऐतिहासिक पुराव्याने शाबित करता येण्यासारखे सर्वज्ञात विधान आहे. शिवाजी महाराजांना हरवले तो राजा जयसिंगच होता, मल्हारबा काशीविश्वनाथाचे मंदिर उभारणार होते त्यांना विरोध करणारे वाराणासीतील हिंदुच होते ! आणि हे फक्त हिंदुंच्या बाबतीच दिसुन येते , औरंगजेब मंदिरे पाडत होता तेव्हा कोण्या सुफी संताने त्याला विरोध केल्याचा पुरावा नाही, पोर्तुगीज गोव्यात इन्क्विसिशन करत होते त्याला कोणत्याही ख्रिश्चन माणासाने विरोध केल्याचे ऐकिवात नाही. इतकं कशाला, तालिबान सत्तेत आल्यापासुन कोणीतरी त्याला जाहीर विरोध केलाय का ? आत्मघातकी वृत्ती ही प्रकर्षाने हिंदुमध्येच दिसुन येते !
पण bjp ही जर हिंदू हित वादी पार्टी आहे तर ज्यांच्या सात वर्षाच्या काळात हिंदू आर्थिक ,सामाजिक ,शैशनिक बाबतीत मजबुत झाले पाहिजे होते. काँग्रेस काळा पेक्षा कमजोर झाले.
ते झालेलेच आहे , तुम्ही मोदी द्वेषाचा चष्मा घातल्याने तुम्हाला दिसत नाहीये. इथे साधा पाणीप्रीवाला सुध्दा "सर छुट्टा नही है, जी.पे कर दो , डायरेक्ट अकाऊंट मे जाता है" असे म्हणायला लागलाय . किती लोकांची बँक अकाऊट उघडलीत , किती लोकांना गॅस कनेक्शन मिळाले आहे , किती नवीन रस्ते तयार झालेत ह्याची आकडेवारी जगजाहीर आहे , फक्त तुम्ही जरा चष्मा काढुन नीट गुगल सर्च करा , तुम्हालाही नक्की सापडेल. हे पाहा आमचा क्शेत्रातील संबंधित व्यक्तीचा एक व्हिडीओ देतो उदाहरण म्हणुन : वेळ 56:30 to 58:00 पहा !
चार हिंदू नाव धारण केलेले उद्योग पती श्रीमंत झाले म्हणजे हिंदू आर्थिक बाबतीत मजबुत झाले असे नाही .ते उद्योगपती आहेत देश सोडून कधी ही बाहेरच्या देशात जावून स्थायिक होतील.
तुमचं शिक्षण काय ? हा प्रश्ण उपरोधिक नाहीय. मी सीरीयसली विचारत आहे कारण पुढील वाक्य कळणे हे त्यावर अवलंबुन आहे : तुम्ही परेटो डिस्ट्रिब्युशन विषयी ऐकले आहे का ? कोणत्याही "अन बायस्ड" आणि "फेयर" सिस्टिम मध्ये मल्टिपल आयटेरशन नंतर ८०:२० चा रुल अ‍ॅप्लाय होतो, २०% लोकांकडे ८०% संसाधने असतील आणि ८०% लोकांकडे २०% संसाधने असतील . तेच अजुन जास्त आयटरेशन्स केले तर हेच गुणोत्तर ९५:५ असे होत जाईल ! बरं हे शोधणारा कोणी आरेसेस चा किंव्वा बजरंग दल चा कार्यकर्ता नाही, हे परेटो नावाच्या एका इटालियन संशोधकाने इटली मध्ये किती लोकांकडे किती जमीन आहे ह्यावरुन शोधुन काढले आहे ! हे फक्त माणासात लागु होते असे नाही हे प्राण्यातही लागु होते , झाडातही लागु होते , एखादे झाड मोठ्ठे झाले की ते जास्त जास्त उन खाते अन अजुन मोठ्ठे होत जाते अन त्याच्या खाली सगळी झाडे छोटी छोटीच होत जातात. हे तितकेच माणासांच्या बाबतीत खरे आहे . संपत्तीचे विभाजन फक्त भारतातच स्क्युड आहे असे नाही , हे सर्व जगात आहे , अगदी कम्युनिस्ट चायना मध्ये देखील. सांगायचा मुद्दा इतकाच की भाजप असो की काँग्रेस , काही मोजक्या लोक श्स्रीमंत असणार अन काही मोजके गरीब . ही परिस्थिती अशीच रहाणार ! तुमची स्वतःची शैक्षणिक कुवत नसेल तर तुम्हाला हे कळणार नाही .
काय देशात बदल झाला BJP येवून..फक्त राम मंदिर
हीच खुप मोठ्ठी अचिव्हमेंट आहे. तब्बल चारशे वर्षांचा अन्याय पुसुन काढला आहे . तुमच्या लक्षात येत नाहीये की सर्वसामान्य भोळ्या भाबड्या हिंदुंसाठी हा किती जिव्हाळ्याचा मुद्दा होता ते . ५ ऑगस्ट्ला अक्षरः दिवाळी साजरी झालेली पाहिली आहे मी ! आजही ५ ऑगस्टला "स्वतंत्रता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" असे संदेश येतात . फक्त ह्या एका मुद्द्यावर निवडणुक लढवली तरीही भाजप परत सत्तेत येतील. सर्वसामान्य हिंदुंच्या श्रध्दांचा अपमान करायची घोडचुक काँग्रेसने केली होती , आजही करत आहेत . ह्यातुन जोवर जागे होणार नाहीत तोवर काही खरं नाही त्यांचे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हं

hrkorde
Wed, 09/29/2021 - 16:50 नवीन
काँग्रेसने भ्रष्टयाचार केला म्हणून ओरडणार्याच्या राज्यातच नोटांबंदीत सगळ्यात जास्त काळा पैसा गोळा झाला, तेंव्हा त्या राज्याची बदनामी होत नाही. गुजरातमध्ये 9000 कोटीचे ड्रग आल्याने बदनामी होत नाही. गायिवरून हात फिरवल्याने बीपी कमी होतो म्हणणारी बाई कोर्टाच्या तारखेला स्वतः मात्र बीपी वाढल्याचे कारण देते , तेंव्हा न्यायाची बदनामी होत नाही. मुसलमान से खतरा है असे जन्मभर म्हणणारा साधू त्याच्या शिष्याकडूनच ठार होतो , तेंव्हा त्या राज्याची बदनामी होत नाही. का, ही राज्ये बिजेपीची आहेत म्हणून का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ढं

प्रदीप
Wed, 09/29/2021 - 16:54 नवीन
ह्या सगळ्याचा व शुर (वेलांटी नको तिथे गेलेली) ह्यांच्या सदर धाग्याचा संबंध काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hrkorde

बाजार उठवणे

नावातकायआहे
Wed, 09/29/2021 - 17:58 नवीन
काळ्या मांजराचा धाग्याचा "बाजार उठवणे" हा एकमेव हेतू आहे. सोनीया ,राहुल ,रॉबर्ट , प्रियांका, मीराया , रेहनजी यांचे सरकार कुणाचाही पाठिंबा न घेता (५४३/५४३) सत्तेवर येवो आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पं.प्र, उप पं.प्र पासून विरोधी पक्षनेते (?) पर्यंत आणि त्या खाली / वर / मधे असतील ती सर्व पदे मिळोत हि ईश्वर चरणी प्रार्थना! इत्यलम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

चान चान !

नावातकायआहे
Tue, 09/28/2021 - 16:20 नवीन
-------
  • Log in or register to post comments

रोचक विषय आणि उद्बबोधक चर्चा

चौथा कोनाडा
Wed, 09/29/2021 - 12:56 नवीन
रोचक विषय आणि उद्बबोधक चर्चा ! आणखी जाणकार प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत !
  • Log in or register to post comments

खालील केस वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे

Rajesh188
Wed, 09/29/2021 - 15:30 नवीन
https://www.sumanasa.com/go/TGrZn6 अडाणी ह्यांच्या मालकीच्या बंदरात करोडो रुपयांचे ड्रग आयात केले गेले .ह्या मध्ये अडाणी ग्रुप च किती आर्थिक फायदा झाला ह्याची चौकशी करण्याचे आदेश गुजरात न्यायालयाने दिले आहेत. एक तर त्या न्यायाधीश ची बदली होईल किंवा वरचे न्यायालय तो आदेश रद्ध करतील. भारतीय मीडिया दबाव मुळे काही बोलू शकणार नाही विदेशी मीडिया आणि जनतेने ह्या प्रकरणावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे
  • Log in or register to post comments

विदेशी मीडिया आणि जनतेने ह्या

सुबोध खरे
Wed, 09/29/2021 - 18:57 नवीन
विदेशी मीडिया आणि जनतेने ह्या प्रकरणावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे वा ! काय सुपीक डोकं आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

संबंध

प्रदीप
Wed, 09/29/2021 - 19:25 नवीन
धागा: पी. एम. केयर ह्यावरचा. हे तुंबाडतनू इथे लिहीतायत 'अदानी, गुजरात, न्यायाधिश, मीडिया' वगैरे असंबंध विषयांवर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मोदी केअर फंडात किती पैसे

hrkorde
Wed, 09/29/2021 - 22:14 नवीन
मोदी केअर फंडात किती पैसे आहेत ? गंमत म्हणून जीपे उघडले त्यात डोनेशन सेक्शन उघडला पी एम केअर सर्च केला, तर त्यावर इतकी रक्कम दिसत आहे, ही टोटल रक्कम आहे की फक्त जीपेद्वारे दिलेली रक्कम आहे ? Image removed.
  • Log in or register to post comments

ही टोटल रक्कम आहे की फक्त

सुक्या
Wed, 09/29/2021 - 22:29 नवीन
ही टोटल रक्कम आहे की फक्त जीपेद्वारे दिलेली रक्कम आहे ?
आम्हाला नाय बॉ म्हाईत. ते गुगल ला ईचारा की ? आमास्नी बी सांगा. गुगल जर न्हाय म्हनलं तर या हिकडं, कोर्टात केस लाउ. आमच्या गावचं भोकरे वकील लय भारी हाय . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hrkorde

पारदर्शक भ्रष्टाचार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/30/2021 - 08:53 नवीन
मोदीसरकार म्हणजे, पारदर्शक भ्रष्टाचार कसा करावा त्याचा आदर्श रुप आहे. करोनाच्या नावावर पैसे गोळा केले, करीत आहेत. करोनाच्या काळात साडेचारलाख दररोज रुग्ण होत होते, कितीतरी लोक दररोज मरत होते. तेव्हा तेव्हा पंतप्रधान आणि मंत्रीमंडळाने काय काय दिवे लावले ते सर्व भारतीय लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. मंत्रीमंडळ आहे की नाही, खासदार आहेत की नाही, एक बोलत नाही. इतकी दहशत. लोकांनी दिलेल्या पैशाला सार्वजनिक फ़ंड म्हणायचा नाही. ती काय खासगी मालमत्ता आहे का ? अनेक वर्षांपासून सरकारी पीएम रिलीफ फंड तसंच प्रंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधी कोश असताना नव्या फंडाची आवश्यकता का आहे ? आलेला पैसा किती आणि त्याचा विनियोग किती केला, हे लोकांना समजू नये. कोणी हिशेब मागू नये म्हणून त्यासाठीचं हा नवा फ़ंडा घोटाळा असावा असे वाट्ते. भारतीय लोकांच्या भावनेच्या आधार घेऊन लूटमार चालू ठेवा..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hrkorde

किती हा दाह! काहीतरी शीतल

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/30/2021 - 09:03 नवीन
किती हा दाह! काहीतरी शीतल लावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरे व्हा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/30/2021 - 09:16 नवीन
विचाराला, चर्चेला घाबरायचं नाही. चूक असो की बरोबर. व्यक्तिगत तर अजिबात व्हायचं नाही. इतकं भान सार्वजनिक संस्थळावर लिहिता बोलतांना असलं पाहिजे. आपणास ते भान येणार नाही हे माहिती आहे, आपल्या प्रतिसादाकडे कायमच दुर्लक्ष करतो . एकदा सांगून पाहावे वाटले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आपल्या प्रतिसादातून

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/30/2021 - 09:34 नवीन
आपल्या प्रतिसादातून वस्तुस्थिती कधीच नसते. कायमच दाह दिसतो. म्हणून विचारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे
गुरुवार, 09/30/2021 - 09:49 नवीन
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर्व सामान्य जनतेचा श्री मोदींवर विश्वास आहे म्हणून एवढी जळजळ होते आहे. काही इलाज नाही. करा तुम्ही पाहिजे ते बिनबुडाचे आरोप. श्री मोदींना ना आगा ना पिछा, मुलबाळ नाही स्वतः शाकाहारी गुजराती जेवण जेवतात. त्यासाठी तीन आमदारकी आणि दोन खासदारकी मधून मिळणार पगार आणि नंतर आयुष्यभर मिळणारे निवृत्तीवेतन हे सडाफिटिंग माणसाला कसेही पुरून उरेल एवढी लुटमार केलेला पैसे कुठे ठेवला आहे याचे उत्तर काही कुणाला देता आलेले नाही. बाकी तुमचे बिनबुडाचे आरोप चालू द्या जनतेला शष्प पडलेली नाही. आणि २०२४ मध्ये परत श्री मोदीच येणार आहेत. तुम्ही कितीही शंख करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्कार डॉक्टर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/30/2021 - 11:07 नवीन
डॉक्टरसाहेब, नमस्कार. आपल्या प्रतिसादाला फाट्यावर मारणे शक्य नाही. ब-याचदा आपले प्रतिसाद, लेखन माहितीपूर्ण असते ते नेहमीच आवडतात, आणि आपली मैत्री आहेच, म्हणून ही पोच.
सर्व सामान्य जनतेचा श्री मोदींवर विश्वास आहे म्हणून एवढी जळजळ होते आहे. काही इलाज नाही.
अजून काही लोकांचा विश्वास आहे, ही लोकशाही आहे, लोक योग्यवेळी योग्य उपचार करतात. काही लोक बाजू घेतात काही लोक व्यवस्थेतील खोट्या-अपप्रचारी गोष्टींवर आणि ज्या हेतूसाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ते जर होत नसेल तर लोक हे बोलणारच. त्यालाही काही विलाज नाही. >>> करा तुम्ही पाहिजे ते बिनबुडाचे आरोप. असं कसं ! पैसे दिले तर हिशेब विचारले पाहिजे की नाही. लोकांकडून तुम्ही रडवेले चेहरे करुन, दु;खाच्या कष्टाच्या काळातला दु:खी कष्टी चेहरा करुन लोकांकडून पैसे जमा करणार आणि पैशाचे काय करीत आहात ? काय करणार आहात ? किती खर्च करणार आहात ? कुठे खर्च करणार आहात ? हे विचारलं पाहिजे की नाही. मला व्यक्तीगत वाटतं, पैशाचा योग्य विनियोग झाला पाहिजे.
स्वतः शाकाहारी गुजराती जेवण जेवतात. त्यासाठी तीन आमदारकी आणि दोन खासदारकी मधून मिळणार पगार आणि नंतर आयुष्यभर मिळणारे निवृत्तीवेतन हे सडाफिटिंग माणसाला कसेही पुरून उरेल
हे असले गळेदाटू विधानी कामाची नाहीत. लोकांनी आपणास जी जवाबदारी दिलेली आहे त्यातून पळवात काढू नये. राहीलं सडाफटींग या सर्व बाता आहेत. पक्षीय निधी वाढवता येतो. पक्षीय निवडणूका जिंकता येतात. कार्यकर्ते, नेते उभे राहतात. पक्षीय पाठीशी बळ मिळतं त्यामुळे या वाक्याला काहीही अर्थ नाही. लोकांच्या गरजा, लोकांचे प्रश्न, महागाई, बेकारी, रोजगार, यावर फोकस केला पाहिजे. गादी सांभाळायला तर लोकांनी मतदान केलेले नाही.
२०२४ मध्ये परत श्री मोदीच येणार आहेत. तुम्ही कितीही शंख करा
नो प्रॉब्लम. आपण भारतीय म्हणून तो पर्यंत भिकेला लागलेले असू पण त्याची आपल्याला अजिबात काळजी नाही . लोकशाहीत लोक बजबजपुरीला कंटाळले की योग्य जागा दाखवतात हा इतिहास आहे. मोदीसेठ, कधीतरी त्या पदावरुन पायउतार होणारच आहेत. तो पर्यंत, आपण जे आपल्याला पटणार नाही त्यावर पुढेही टीका करीत राहू. एवढेच. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पैसे दिले तर हिशेब विचारले

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/30/2021 - 11:18 नवीन
पैसे दिले तर हिशेब विचारले पाहिजे की नाही. लोकांकडून तुम्ही रडवेले चेहरे करुन, दु;खाच्या कष्टाच्या काळातला दु:खी कष्टी चेहरा करुन लोकांकडून पैसे जमा करणार आणि पैशाचे काय करीत आहात ? काय करणार आहात ? किती खर्च करणार आहात ? कुठे खर्च करणार आहात ? हे विचारलं पाहिजे की नाही. विचारा की. पण न विचारता, हिशेब अजिबात माहिती नसतानाही जमलेल्या पैशातून मोदींनी भ्रष्टाचार केला हा आरोप कोणत्या आधारावर केलात? आपण भारतीय म्हणून तो पर्यंत भिकेला लागलेले असू पण त्याची आपल्याला अजिबात काळजी नाही . अशी व अशासारखी भविष्यवाणी अनेक जण २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान होण्याच्या आधीपासूनच करीत आहेत. Modi as PM will be disastrous for India अशी भविष्यवाणी भ्रष्टाचारशिरोमणी मनमोहन सिंहांनी जानेवारी २०१४ मध्ये केली होती. मागील साडेसात वर्षात ना कोणी भिकेला लागले ना काही डिझास्ट्रस झाले. ज्यांना असह्य दाह होत आहे तेच अशी भविष्यवाणी करीत आहेत. म्हणून म्हणतो की ईनो, जेलुसिल, बर्नॉल वगैरे वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्री गुरुजी

Rajesh188
गुरुवार, 09/30/2021 - 15:18 नवीन
तुम्ही मोदी ह्या विषयावर न बोलणेच उत्तम. तुमच्या पोस्ट मुळे bjp ही ब्राह्मण आणि शेठ लोकांची पार्टी आहे बाकी लोकांशी ह्या पक्षाचा काहीच संबंध नाही हा विचार प्रबळ होतो. Bjp हितासाठी तुम्ही bjp चे समर्थन करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खरे साहेब

Rajesh188
गुरुवार, 09/30/2021 - 12:35 नवीन
तुमच्या पोस्ट ला काही अर्थ नाही. मोदी ना मूलबाळ नाहीत म्हणजे त्यांना संपत्ती ची हाव नाही. हे आयटी सेल नी लोकांचा बुध्दी भेद करण्यासाठी सोडलेले पिल्लू आहे. माणसाच्या जीवनाचा काहीच भरवसा नाही मरण कधी ही कोणत्या ही वयात येवू शकतो. तरी माणूस हत्या,हिंसा,भ्रष्टाचार,लुटालूट करत च असतो. मोह माया सोडा असे सर्व धर्म सांगतात पण ते सांगणारे संत च करोडो रुपयांची माया जमवावतात. सर्व धर्मातील . धर्मा साठी मेल्या वर स्वर्ग मिळेल ही मौलाना सांगत असतात पण स्वतः मात्र धर्मासाठी कधीच मरत नाहीत. आसाराम बापू मोह माया सोडा सांगतात आणि करोडो ची संपत्ती जमा करतात. इर्षा,द्वेष,वर्चस्व,स्वार्थ हे गुण माणसात पक्के असतात. मोदी काय देशसेवा करण्यासाठी विविध डावपेच खेळून, साम, दाम,दंड वापरून पंतप्रधान झाले नाहीत वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांनी हे सर्व उद्योग केले आहेत ..आणि त्यासाठी पैसा हवाच तो ते कोणत्या ही मार्गाने मिळवणारच . सरळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी एक तुम्हाला साधा प्रश्न

सुबोध खरे
गुरुवार, 09/30/2021 - 14:13 नवीन
मी एक तुम्हाला साधा प्रश्न विचारला हे लुटालूट केलेले पैसे कुठे ठेवले आहेत याचा काहीतरी पुरावा द्या. त्यावर तुम्ही तोंड उघडायला तयार नाही. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

.

hrkorde
गुरुवार, 09/30/2021 - 15:41 नवीन
यांच्या आधीची 70 वर्षेही लोकनियुक्तच सरकार होते, मग त्याच्याबद्दल भाजपयाना का जळजळ होते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा