चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१
उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या सरचिटणीस आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या कन्या आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भगिनी प्रियांका वाद्रा यांना मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. एक तर राहुल किंवा प्रियांकांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार घोषित करा हा आग्रह प्रशांत किशोरने २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेसही धरला होता. तो त्यावेळी पूर्ण केला गेला नव्हता पण यावेळी तसे होत आहे असे दिसते.
प्रियांकांनी २०१७ पर्यंत केवळ आपल्या आईच्या रायबरेली आणि भावाच्या अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भागातच प्रचार केला होता. २०१७ मध्येही या लोकसभा मतदारसंघांच्या भागात असलेल्या १० पैकी अवघ्या २ जागा काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रियांकांवर राज्याच्या पूर्व भागातील मतदारसंघांमध्ये प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती.
मागच्या वर्षी लॉक डाऊनच्या दरम्यान काँग्रेस पक्षातर्फे इतर राज्यात अडकलेल्या मूळच्या उत्तर प्रदेशातील मजुरांना राज्यात परत आणायला म्हणून शेकडो बस आणल्या पण त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सरकारने राज्याच्या सीमेवर अडवून ठेवल्या असा दावा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला. त्या तथाकथित बसपैकी अनेक अस्तित्वात नव्हत्या तर अनेक नंबर प्लेट दुचाकींचे होते हे नंतर स्पष्ट झाले. असल्या नौटंकीवर पक्षाच्या रायबरेलीच्या आमदार अदिती सिंग यांनी प्रियांकांवर टीका केली. त्यानंतर अदिती सिंगना पक्षाने काढून टाकले. आता कदाचित २०२४ मध्ये अदिती सिंग भाजपकडून रायबरेली लोकसभा मतदारसंघातून सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवतील.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशात स्वतः सोनिया गांधींची रायबरेली वगळता एकही दुसरी जागा मिळाली नव्हती. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ४ दिवसांनी म्हणजे २७ मे २०१९ रोजी नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त लखनौच्या प्रदेश पक्ष कार्यालयात कार्यक्रम झाला होता त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण द्विवेदी यांनी राहुल-प्रियांकांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर रामकृष्ण द्विवेदींना तडकाफडकी पक्षातून काढून टाकले गेले. रामकृष्ण द्विवेदी हे हाडाचे काँग्रेसवाले होते. जानेवारी १९७१ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग यांच्याविरोधात गोरखपूर जिल्ह्यातील मनीराम विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवली होती आणि त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांपेक्षा दुप्पट मते मिळवून मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आणि खळबळ उडवली. त्यांनी कधीही पदाचा लोभ ठेवला नाही आणि केवळ पक्षाचेच काम केले. जवळपास ८८ वय असलेल्या रामकृष्ण द्विवेदींना प्रियांका-राहुलच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला हे महान पातक केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही आठवड्यातच रामकृष्ण द्विवेदींना कॅन्सरचे निदान झाले. पूर्ण जन्म काँग्रेसमध्ये घालवलेल्या द्विवेदींना आयुष्याच्या शेवटी पक्षातून काढून टाकले गेलेले जिव्हारी लागले. शेवटी मरताना तरी मला काँग्रेसवाला म्हणूनच मरू द्या अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर त्यांना पक्षात घेण्यात आले पण त्यांना काढले ही चूक झाली याविषयी चकार शब्द न बोलता त्यांना दुर्धर आजार झालेला असल्याने दया दाखवायला पक्षात घेतले गेले आहे अशाप्रकारचे स्टेटमेन्ट पक्षाकडून काढले गेले होते असे वाचल्याचे आठवते. त्यानंतर काही दिवसातच- २०२० मधील लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी चार दिवस रामकृष्ण द्विवेदींचे निधन झाले.
तर अशा आहेत प्रियांका वाद्रा. त्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर प्रदेशात काय होते हे बघायचे.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
बातमीची लिंक
निवडणुकी वरून
??
दमाने ?
उशीरा सुचलेले शहाणपण
केंद्राकडे संपूर्ण देशासाठी लस उत्पादन करण्याची क्षमता नाही
न्याय
नोबेल
हो
राजीव गांधी खेलरत्न
पुरूष खेळाडूंसाठी मेजर
३ ऑलिंपिक गोल्ड
भारतरत्न पुरस्कार
ऑ!!!!
Nehru was awarded Bharat
राक्षस डकैत च्या गोल गोल
राजीव गांधींचे खेलरत्न या
खेळ रत्न पुरस्कार
Why did india have to
महस 40 करोड डॉलर्स के लिये
महस 40 करोड डॉलर्स के लिये
महस 40 करोड डॉलर्स के लिये
श्री मोदी,
हरकत नाही. ज्या ज्या
एक प्रश्न
चंद्र सूर्य कुमार
एक गोंधळ
नाव बदल्या न्या पेक्षा
त्या स्मार्ट सिटी बननार
गूगल नावाचे एक सर्च ईंजीन आहे
नुसत्या पोकळ गप्पा. स्मार्ट
आप तो आप हो . . .
व्हॉटबाउटिझम
*“अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले
श्रेयः श्रीगुरुजी
असं कसं .. असं कसं ?
खरंय.
पत्ता सांगा. बरनॉल, ईनो,
बरनॉल, ईनो, जेलुसिल ने काही होणार नाही...
पवित्र शीख ध्वज निशान साहिब जबरदस्तीने काढून टाकला
रस्ते अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा निधी
लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरही
लसीकरणाचे प्रमाणपत्र
I challenge you to read till
हे दोन राहिलेच
बरीच मोठी लिस्ट आहे
काय सांगताय?
काँग्रेस सरकार नी निर्माण
स्टेडम देखील मोदींच्या पैशाने
स्टेडियम ला श्री मोदी यांचे