Skip to main content

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 05/08/2021 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या सरचिटणीस आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या कन्या आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भगिनी प्रियांका वाद्रा यांना मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. एक तर राहुल किंवा प्रियांकांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार घोषित करा हा आग्रह प्रशांत किशोरने २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेसही धरला होता. तो त्यावेळी पूर्ण केला गेला नव्हता पण यावेळी तसे होत आहे असे दिसते. प्रियांकांनी २०१७ पर्यंत केवळ आपल्या आईच्या रायबरेली आणि भावाच्या अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भागातच प्रचार केला होता. २०१७ मध्येही या लोकसभा मतदारसंघांच्या भागात असलेल्या १० पैकी अवघ्या २ जागा काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रियांकांवर राज्याच्या पूर्व भागातील मतदारसंघांमध्ये प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. मागच्या वर्षी लॉक डाऊनच्या दरम्यान काँग्रेस पक्षातर्फे इतर राज्यात अडकलेल्या मूळच्या उत्तर प्रदेशातील मजुरांना राज्यात परत आणायला म्हणून शेकडो बस आणल्या पण त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सरकारने राज्याच्या सीमेवर अडवून ठेवल्या असा दावा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला. त्या तथाकथित बसपैकी अनेक अस्तित्वात नव्हत्या तर अनेक नंबर प्लेट दुचाकींचे होते हे नंतर स्पष्ट झाले. असल्या नौटंकीवर पक्षाच्या रायबरेलीच्या आमदार अदिती सिंग यांनी प्रियांकांवर टीका केली. त्यानंतर अदिती सिंगना पक्षाने काढून टाकले. आता कदाचित २०२४ मध्ये अदिती सिंग भाजपकडून रायबरेली लोकसभा मतदारसंघातून सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशात स्वतः सोनिया गांधींची रायबरेली वगळता एकही दुसरी जागा मिळाली नव्हती. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ४ दिवसांनी म्हणजे २७ मे २०१९ रोजी नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त लखनौच्या प्रदेश पक्ष कार्यालयात कार्यक्रम झाला होता त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण द्विवेदी यांनी राहुल-प्रियांकांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर रामकृष्ण द्विवेदींना तडकाफडकी पक्षातून काढून टाकले गेले. रामकृष्ण द्विवेदी हे हाडाचे काँग्रेसवाले होते. जानेवारी १९७१ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग यांच्याविरोधात गोरखपूर जिल्ह्यातील मनीराम विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवली होती आणि त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांपेक्षा दुप्पट मते मिळवून मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आणि खळबळ उडवली. त्यांनी कधीही पदाचा लोभ ठेवला नाही आणि केवळ पक्षाचेच काम केले. जवळपास ८८ वय असलेल्या रामकृष्ण द्विवेदींना प्रियांका-राहुलच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला हे महान पातक केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही आठवड्यातच रामकृष्ण द्विवेदींना कॅन्सरचे निदान झाले. पूर्ण जन्म काँग्रेसमध्ये घालवलेल्या द्विवेदींना आयुष्याच्या शेवटी पक्षातून काढून टाकले गेलेले जिव्हारी लागले. शेवटी मरताना तरी मला काँग्रेसवाला म्हणूनच मरू द्या अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर त्यांना पक्षात घेण्यात आले पण त्यांना काढले ही चूक झाली याविषयी चकार शब्द न बोलता त्यांना दुर्धर आजार झालेला असल्याने दया दाखवायला पक्षात घेतले गेले आहे अशाप्रकारचे स्टेटमेन्ट पक्षाकडून काढले गेले होते असे वाचल्याचे आठवते. त्यानंतर काही दिवसातच- २०२० मधील लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी चार दिवस रामकृष्ण द्विवेदींचे निधन झाले. तर अशा आहेत प्रियांका वाद्रा. त्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर प्रदेशात काय होते हे बघायचे. Priyanka

वाचने 52001
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

https://www.loksatta.com/maharashtra-news/tokyo-olympic-maharashtra-cm-… "मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो" असे एक राजकीय नेते म्हणाले आहेत. बाकी मराठ्यांचा संबंध इथपर्यंत आहे हे मल माहीत नव्हते. महाराष्ट्र शासनाने नीरज चोप्रा यास १२ कोटी रुपये (हरियाना पेक्षा जास्त असावे. आम्हाला अभिमान डबल आहे) बक्षिस म्हणौन द्यावे असे सुचवतो. सत्कार पण करणार आहेत म्हणे.

In reply to by सुक्या

नीरज चोप्राने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले म्हणून भारतातील एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने अभिनंदनाचा फोन करणे समजू शकतो. पण तो रोड मराठा आहे म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने अभिनंदनाचा फोन करणे हे अगदीच महालोल वाटले. रोड मराठा म्हणजे पानिपतच्या युध्दाच्या वेळी महाराष्ट्रातून उत्तरेत गेलेले पण युध्दानंतर तिथेच राहिलेल्या मराठ्यांचे वंशज. नीरज चोप्राचे काही पिढ्यांपूर्वीचे पूर्वज महाराष्ट्रात राहात होते म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला अभिनंदनाचा फोन केला. मानवजातीची सुरवात आफ्रिकेत झाली ना? मग त्याच न्यायाने आफ्रिकेच्या सगळ्या देशांच्या अध्यक्षांनी सतत कोणालातरी अभिनंदनाचे फोन करायला फोनशेजारीच बसायला हवे. जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांचे अनेक पिढ्यांपूर्वीचे पूर्वज आफ्रिकेत होते म्हणून जो चे अभिनंदन नको करायला?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मानव प्राणी निर्माण आफ्रिकेत झाला असे इथे काही सभासद सांगत असतात.पण तेव्हा आफ्रिका खंड कुठे होता हे मात्र सांगत नाहीत. अर्थवट माहिती देवू नये ही विनंती.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

खरयं. यश मिळाले की नातेवाईक वाढतात तसे आहे हे. जात / पात काढुन मग तो कसा आपला आहे वगेरे वगेरे ...

In reply to by सुक्या

"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो" असे एक राजकीय नेते म्हणाले आहेत. "फक्त एक दिवस पंतप्रधान करा. चोवीस तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवितो." अशी गोष्ट एका मराठ्याने सांगितली होती. पण पूर्ण हयातीत इतिहास काही रचला नाही. शेवटी एका गुजराती माणसाने कोणतीही गोष्ट न सांगता इतिहास रचला.

In reply to by श्रीगुरुजी

शेवटी एका गुजराती माणसाने कोणतीही गोष्ट न सांगता इतिहास रचला.>>>> कोणतीही गोष्ट न सांगता?? खरं??;)

In reply to by श्रीगुरुजी

काश्मीर प्रश्न सुटला,कधी? कोणालाच कसे माहीत नाही. शेवटी ही गुप्त बातमी mipa वर माहीत पडली. मग रोज तिथे निरपराध सैनिकांचे रोज बळी जात आहेत त्याचे काय कारण आहे. प्रश्न सुटला तर हल्ले का होत आहेत अजुन.

In reply to by सुक्या

"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो" असे एक राजकीय नेते म्हणाले आहेत. जे ५-६ डिसेंबरच्या थंडीत आपल्या मुंबईतील घरात उबदार पांघरूणात गाढ झोपले होते, ते आम्हीच हातोडे घालून बाबरी पाडली अशी गोष्ट सांगत फिरत असतात. पण त्यांनी इतिहास काही रचला नाही. तो इतिहास रचला दुसऱ्यांंनीच. म्हणजे एका अर्थी गोष्टी न सागणाऱ्यांनीच इतिहास रचला आणि विनोदी फुशारक्या आय मीन गोष्टी सांगणाऱ्यांना कधीच इतिहास रचता आला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आयत्या पिठावर रेघोट्या .. "जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे" असे बोलले होते ... यात ठळक केलेल्या शब्दांना खुप महत्त्व आहे ...

कल्पना चावला ला भारतीय वंशाची म्हणजे भारतीय च असे दावे केले जायचे तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. अमेरिके ची vice-president कमला हॅरिस हिला पण भारतीय म्हणून गुणगान गायले जात होते तेव्हा आफ्रिका कोणाला आठवला नाही. पण ठाकरे सरकार नी नीरज ला मराठा असे संबोंधित केले की लगेच आक्षेप. हेच वाक्य फडणवीस बोलले असते तर कोणी आक्षेप घेतला नसता. अमेरिकेत इतके डॉक्टर भारतीय आहेत असे जेव्हा फेकले जाते तेव्हा आफ्रिका आठवत नाही. जे अमेरिकेत गेले तिथे स्थायिक झाले ते अमेरिकन च आहेत ते पण स्वतःला भारतीय म्हणत नसतील.

In reply to by Rajesh188

ऊध्दव ठाकरेनी भाजपचे पुन्ही राज्य बळकावण्याचे स्वप्न धुळीस मिळवल्याच्या रागातून वरील प्रकार घडत असावेत.

In reply to by Rajesh188

मुदलात घोळ आहे साहेब तुमच्या .. (सगळीकडे घोळ्च असतो .. पण ते जौ दे) एखाद्याला भारतीय वंशाचे म्हणणे आणी एखाद्याला जात, पात, पंथ, धर्म यात गोवुन आम्ही कसे मोठे असे करणे यात जमीन आस्मात इतका फरक आहे. कमला हॅरिस स्वतः ला भारतीय वंशाची पण म्हणत नाही ... ती स्वतःला अफ्रिकन अमेरिकन म्हणवते. बाकी नीरज चोप्रा महाराणा प्रताप यांचा वंशज आहे असेही काही महाभाग बोलत आहेत. तेही असेच महालोल आहेत. कालपरवा पर्यंत नीरज चोप्रा कोण हे पण कित्येकांना माहीत नव्हते. आज लगेच चालले बादरायण संबंध जोडायला .. जौ दे.. ज्याची त्याची जाण ... ज्याची त्याची समज ... तुम्ही टेंशन नका घेउ ...

In reply to by सुक्या

पण मी काय म्हणतो- प्रिती झिंटा पण रोड मराठा आहे ना? मग तिचा कोई मिल गया किंवा कल हो ना हो ला बर्‍यापैकी प्रतिसाद मिळाल्यावर किंवा किंग्ज ११ पंजाबची टीम घेतल्यावर म्हाराष्ट्राचा अभिमान असलेल्यांनी तिला फोन केला होता ना? मान्य आहे की चित्रपट चालणे हे ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळण्यापेक्षा बरीच कमी कामगिरी आहे. मग मातोश्रीमधून फोन गेला नाही तरी एखाद्या नेत्याने/उपनेत्याने/शाखाप्रमुखाने/नगरसेवकाने किंवा गेलाबाजार सतरंज्या उचलणार्‍या एखाद्या कार्यकर्त्याने तरी तिला अभिनंदनाचा फोन केला होता का? आताच बघितले की २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा मनोज कुमार हा पण रोड मराठा आहे. त्याला मातोश्रीमधून फोन गेला होता का? नसेल तर हा अन्याय आहे- खूप मोठा अन्याय.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ज्जे बात !! आता ते प्रिती झिंटा / मनोज कुमार हे रोड मराठा नाहीत हे सिद्ध करतील . . . :-) (२०१० मधे मनोज कुमारला फोन करु नका असे मोदींनी सांगितले होते असे आमच्या गावातला एक पत्रकार सांगत होता. नक्की कोणते मोदी ते काय त्याला माहीत नाही.)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गेला बाजार प्रियांका चतुर्वेदी या भय्यीणीऐवजी प्रीति झिंटाला तरी राज्यसभेची खासदारकी द्यायची. आम्ही मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढतो असा डंका पिटता आला असता.

रोड मराठा आहेत. रोड मराठा ही दंत कथा नाही पानिपत चे युद्ध सत्य आहे पराजय सत्य आहे. पराजित पानिपत मध्ये च राहिले हे सत्य आहे. पेशवाई अस्तित्वात होती हे सत्य आहे. हे सर्व असत्य आहे असे कबूल करा . आणि नंतर ह्या विषयावर विरोधी मत व्यक्त करा. तुम्ही मान्य केले की बाजीराव हा कोणी पेशवा अस्तित्वातच नव्हता. मराठी साम्राज्य च्या फौजेने कधी पानिपत मध्ये युद्ध केलेच नाही. सर्व बकवास आहे. असे आम्ही म्हणायला मोकळे होवू.

नीरज चोप्रा हा मूळचा मराठा असल्याने आम्ही महाराष्ट्रात बोलावून त्याचा सत्कार करणार असे मराठा क्रांती मोर्चाने सांगितलेय. नीरज चोप्रा मूळचा धनगर आहे असे महाराष्ट्रातील धनगर सांगताहेत. तो मूळचा वैश्य आहे, ब्राह्मण आहे असे शोध लागत आहेत. नीरज चोप्राने महाराष्ट्रात येऊन या मूर्खपणात सहभागी होऊ नये.

In reply to by श्रीगुरुजी

नीरज चोप्राने महाराष्ट्रात येऊन या मूर्खपणात सहभागी होऊ नये.
+१११११११११११११११११११११११११

महस 40 करोड डॉलर्स के लिये भारत को अपना सोना और अपना आत्मसम्मान गिरवी रखना पडा था! उसके बारे मे कभी आपने पढा था की इसका जिम्मे दार कौन है? बस यही पढाया गया की डॉ मनमोहन सिंह ने भारत की आर्थिक खाई से बाहर निकाला! (श्री नरसिम्ह राव को श्रेय नही दिया गया) मगर देश को आर्थिक खाई मे किसने धकेला यह कही नही बताया जाता! ____________________________________________- खरे साहेब खरे आहे कि
महस 40 करोड डॉलर्स के लिये भारत को अपना सोना और अपना आत्मसम्मान गिरवी रखना पडा था!
तुमचा आणि अंधभक्तांचा प्रश्न काय आहे कळत नाहि. काँग्रेसचे अवगुण गाऊन भाजपाला तुम्हि चांगले बोलणे सोपे , काँग्रेसचे एखादे चांगले काम सांगितले तर गांधी घराण्याला असभ्य व्यक्तिसारखे टोंमणे मारणे तर त्याहुन सोप्पे. विक्रम साराभाई यांच्या नावाचे अंतरीक्ष संशोधन संस्था, तारापूरचं अनु संशोधन केंद्र हे काँग्रेसने उभारलेले थोतांड आहे. काँग्रेस काहि करत नाहि....... आता आपण ४० करोड वर बोलु १९८९-९० किंवा १९९०-१९९१ मध्ये काँग्रेस सरकारने ४० करोड डॉलर्स साठी सोने आणि आत्मसन्मान गहाण ठेवले, हे खरे आहे. तुम्ही स्वतः भारतीय नौदलात काम केले आहे, तुम्हास संरक्षण क्षेत्रासंबंधात काहि सविस्तर बोलु शकता. मग मला सांगा IOCL HPCL BPCL सारख्या तेलकंपन्या १९७१ च्या युध्दानंतर सरकारकडुन ( काँग्रेस सरकार) का स्थापन झाल्या ??? १९८९-९० किंवा १९९०-१९९१ मध्ये काँग्रेस सरकारने ४० करोड डॉलर्स साठी जे सोने गहाण ठेवले ते भाजपाने तर नक्किच परत आणले नाहि त्यासाठी मनमोहन सिंगानी प्रयत्न केले, ( तुमच्या " डॉ मनमोहन सिंह ने भारत की आर्थिक खाई से बाहर निकाला" या वाक्यावरून मी बोलत आहे.). आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावा हे तुमच्या सारखा अंधभक्त नक्कीच सांगेल ? आत्मसन्मान काँग्रेस सरकारने ४० करोड डॉलर्ससाठी सोने गहाण ठेवुन तुमच्या आत्मसन्मानाला नक्किच ठेच पोहोचवली असणार पण कोरोना काळात परमभक्त मोदिभक्त रामदेवबाबाने जे अ‍ॅलोपैथिक डॉ़क्टरांवर अपमानजनक वक्तव्य केले ज्यामुळे IMA कोर्टात गेले त्या वक्तव्याने तुमचा आत्मसन्मानाला निश्चित ठेच लागली नसणार. असो लोभ असावा

In reply to by लिओ

आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावा हे तुमच्या सारखा अंधभक्त नक्कीच सांगेल ?
सरकार या कंपनी ला disinvest करणार आहे. थोडक्यात सांगायचे तर भारत सरकार या कंपनी मधले स्वतः चे शेअर्स स्टॉक मार्केट वर विकेल. मी स्वतः सुद्धा इन्व्हेस्ट करणार आहे. माझ्याप्रमाणे लाखो रिटेल इन्व्हेस्टर्स पण शेअर्स विकत घेतील. थोडक्यात सांगायचे तर ही कंपनी नंतर जो फायदा देईल तो सरकारपुरता मर्यादित न राहता तो सामान्य जनतेला डिव्हिडंड म्हणून पण मिळेल. फक्त disinvestment म्हणजे काय हे न कळणारे आणि तो घ्यायला न परवडणारे मरगट्टे जिओ चे सिम वापरून मिसळपाव सारख्या sites वर सरकारला शिव्या देत पुढच्या disinvestment ची शिव्या देण्यासाठी वाट पहात राहतील.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

कायच्या काय पोस्ट.तुम्ही काय शेअर विकत घेणार ? जोक करताय काय. शेअर मित्र च विकत घेणार आणि तुमच्या सारख्या अंध लोकांना सर्व मिळून १टक्का पण भागीदारी मिळणार नाही. मंदिरा समोर अंध भिकारी व्यक्ती ना पन्नास पैसे भीक म्हणून दिले जातात त्या प्रमाणे. Jio जिवंत आहे कारण मोदी मित्र आहेत. बाकी काही कारण नाही. म्हणून व्होडाफोन , idea' चे खच्ची करणं भारताचे दिव्य सरकार करत आहे. दूरसंचार क्षेत्रात भारताचे दरवाजे पूर्ण उघडे करा jio चे अस्तित्व पण शिल्लक राहणार नाही.

In reply to by Rajesh188

जीओ ला असे काय फुकट मिळते आहे ते आईडीया किंवा व्होडाफोन ला मिळत नाही? जरा सवीस्तर सांगता काय? म्हणजे ग्राउंड लेवल ला काय फरक आहे. पोकळ कोस्परसी थेरी नको.

In reply to by Rajesh188

फालतू आणि बिनबुडाची अर्ग्युमेंट्स करू नयेत असा नियम तुम्हाला लागू नाहीच. शक्यतो मी कुणाचे प्रबोधन करायला जात नाही. तरी पण या लिंक वर तुम्ही जे म्हणताय त्या संदर्भात माहिती आहे. https://www.kotaksecurities.com/ksweb/ipo/4-different-types-ipo-investo…

In reply to by लिओ

आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावा
हा असा dance

In reply to by लिओ

@ लिओ नफ्यातील सार्वजनिक तेल कंपन्यांचे खाजगीकरण हे निर्णय डॉ मनमोहन सिंह यानीच घेतलेले आहेत. मोदी सरकारला दोष देण्याच्या अगोदर मूलभूत अभ्यास तरी करून पहा कोणत्याही गोष्टीवर भाष्य करण्या अगोदर थोडं वाचून तरी पहा अन्यथा १८८ सारखा दिशाहीन गोळीबार होईल. Manmohan supports public sector disinvestment https://www.thehindu.com/business/Economy/Manmohan-supports-public-sect… Cabinet clears disinvestment of 10 % in IOC It posted a net profit of Rs.5,005 crore in 2012-13, up from Rs.3,954 crore in the previous year. https://www.thehindu.com/business/Industry/cabinet-clears-disinvestment… आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावा हे तुमच्या सारखा अंधभक्त नक्कीच सांगेल ? HPCL या कंपनीचे खाजगीकरण केलेले नसून ते ओ एन जी सी या सरकारी कंपनीलाच विकलेली आहे. बेफाट वक्तव्ये करण्याच्या अगोदर निदान थोडा तरी अभ्यास करत चला. आणि मला अंध भक्त म्हणण्याची आपली काय लायकी आहे? बाकी चाचा नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी यांनी स्वतःला भारत रत्न देण्यासाठी स्वतःच शिफारस केली आणि श्री राजीव गांधी याना आपले सरकार आल्यावर शिफारस केली ते हि बरोबरच आहे. बाकी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न देण्यासाठी गांधी घराण्याची तळी उचलणाऱ्या काँग्रेसला वेळ झाला नाही तो निर्णय श्री चंद्रशेखर यांच्या औटघटकेच्या सरकारला घ्यावा लागला आणि तो सुद्धा त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या ३४ वर्षांनी. आणि वल्लभभाई पटेल याना भारतरत्न देण्यासाठी ४१ वर्षे उजाडावी लागली आणि तो निर्णय सुद्धा श्री नरसिम्ह राव यांच्या सरकारने घेतला. गांधी घराण्याने नाहीच. राहिली गोष्ट भाभा अणुकेंद्र किंवा इसरो स्थापन केल्याची शेखी मिरवायची गरज नाही. तुमचा टिनपाट शेजारी सुद्धा अणु बॉम्ब बनवतो आणि इराणने पण आपला उपग्रह बनवलेला आहे. तेंव्हा काँग्रेसने यंव केलं त्यंव केलं असली डिंग मारणं हे भंपक पणाचं आहे. तिथे हुकूमशहा आला असता किंवा कम्युनिस्ट सरकार आले असते तरी त्यांनी हे केलंच असतं. कोणताही राज्यकर्ता आपल्या देशाचा थोडाफार तरी विकास करतोच. गांधी घराण्याने अशी कोणतीही क्रांती केलेली नाही. सोनं गहाण ठेवायची स्थिती येईपर्यंत दुर्लक्ष केलं हि मुळीच स्तुत्य गोष्ट नाही. काँग्रेसच्या काळातीलच नव्हे तर एकंदर भारताच्या इतिहासात श्री नरसिम्ह राव हे एक अत्यंत उत्कृष्ट पंतप्रधान होते यात शंका नाही

In reply to by सुबोध खरे

एकंदर भारताच्या इतिहासात श्री नरसिम्ह राव हे एक अत्यंत उत्कृष्ट पंतप्रधान होते यात शंका नाही
श्री नरसिम्ह राव हे सर्वोत्कृष्टपंतप्रधान होते. गांधी घराण्याला पक्षात अवास्तव फुटेज द्यायची गरज काय आशा आशयाचे त्यांचें वक्तव्य देखील बाहेर आले होते सीताराम केसरीयांच्या सौजन्याने.

In reply to by सुबोध खरे

बाकी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न देण्यासाठी गांधी घराण्याची तळी उचलणाऱ्या काँग्रेसला वेळ झाला नाही तो निर्णय श्री चंद्रशेखर यांच्या औटघटकेच्या सरकारला घ्यावा लागला आणि तो सुद्धा त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या ३४ वर्षांनी. माझ्या आठवणीप्रमाणे आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार वि. प्र. सिंह सरकारने दिला होता.

In reply to by श्रीगुरुजी

डॉ. आंबेडकर हयात असतानाही काँग्रेसने त्यांना कोणती वागणूक दिली होती? १९४७ मध्ये पहिल्या मंत्रीमंडळात नेहरूंनी काँग्रेससोडून इतर विचारांच्या लोकांनाही सामावून घेतले होते. त्यात अर्थमंत्री षण्मुखम चेट्टी, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी होतेच पण त्याबरोबरच कायदामंत्री डॉ.आंबेडकर पण होते. पण हिंदू कोड बिलाच्या प्रश्नावरून डॉ.आंबेडकरांनी राजीनामा दिला त्यानंतर काँग्रेसनी त्यांना दिलेली वागणूक खूपच वेगळी होती. १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने त्यांच्याविरोधात नारायण सदाशिव काजरोळकर हा फारसा कोणाला परिचित नसलेला उमेदवार दिला होता आणि त्याने डॉ. आंबेडकरांना पराभूत केले होते. काँग्रेसच्या नावावर कोणीही निवडून यायचा तो काळ होता. त्यानंतर त्यांना त्यांच्या पक्षाने- शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने राज्यसभेवर पाठवले. या दोन्ही वेळी त्यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही असे काही काँग्रेसने म्हटले नाही. इतकेच नाही तर १९५४ मध्ये डॉ.आंबेडकरांनी भंडारा मतदारसंघातून लोकसभेची पोटनिवडणुक लढवली होती. त्यावेळी प्रजा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांच्याविरोधात उमेदवार दिले होते. अन्यथा दलितांसाठी तोंडपाटीलकी या दोन्ही पक्षांनी भरपूर केली पण डॉ. आंबेडकरांना लोकसभेवर निवडून जाऊ दे- त्यांच्यासारखा सदस्य लोकसभेच्या सभागृहात असला तर तो सभागृहाचाच नाही तर पूर्ण देशाचा गौरव होईल असे काही दोन्ही पक्षांनी म्हटले नाही. १९५६ मध्ये डॉ.आंबेडकरांची राज्यसभेची मुदत संपली (१९५२ मध्ये राज्यसभेवर निवडून गेलेल्या सदस्यांपैकी एक-तृतियांश सदस्य १९५४ आणि १९५६ मध्ये निवृत्त होणार होते. ते निवृत्त होणारे सदस्य कोण असतील हे चिठ्ठ्या टाकून ठरवले गेले होते). त्यानंतरही त्यांना परत त्यांच्याच पक्षाने एस.सी.एफने राज्यसभेवर निवडून दिले. काँग्रेसने मात्र त्यांच्याविरोधात उमेदवार न देणे किंवा त्यांना राज्यसभेवर नियुक्त करणे यापैकी काहीही केले नाही. मग डॉ. आंबेडकरांचे त्यानंतर काही महिन्यातच निधन झाले. थोडे अवांतर- १९४८ मध्ये जयप्रकाश नारायणांबरोबर आचार्य नरेंद्र देव काँग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. १९४६ मध्ये नरेंद्र देव काँग्रेसचे उमेदवार म्हणून फैजाबादमधून उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते. आपण काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून गेलो तेव्हा आपण पक्षाबाहेर पडत असू तर तो आपल्याला निवडून देणार्‍या मतदारांशी प्रतारणा ठरेल म्हणून आचार्य नरेंद्र देव आणि इतर ११ जणांनी आमदारपदाचे राजीनामे दिले आणि पोटनिवडणुक लढवली होती. त्यावेळी नरेंद्र देवांविरूध्द काँग्रेसने बाबा राघवदास या संन्याशाला उमेदवारी दिली होती. आचार्य नरेंद्र देव हे डाव्या विचारांचे आणि नास्तिक होते. असा नास्तिक माणूस अयोध्येतून निवडून देणार का अशाप्रकारचा प्रचार बाबा राघवदासांनी त्यांच्याविरोधात केला होता. तसेच उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनीही बाबा राघवदासांच्या बरोबरीने नरेंद्र देवांविरोधात धर्माच्या आधारावर प्रचार केला होता. स्वतः नेहरूंना हा प्रकार मान्य नव्हता असे वाचले होते. नरेंद्र देवांसारखा सदस्य विधानसभेत असू दे त्यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उभा करू नये असे नेहरूंचे म्हणणे होते पण त्यांचा तो आग्रह उत्तर प्रदेश काँग्रेस समितीने झुगारून दिला. उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये एकाहून एक जातीय लोक भरले आहेत असे नेहरूंचे मत होते. शेवटी त्या समाजवादी पक्षाच्या १२ च्या १२ उमेदवारांचा पोटनिवडणुकांमध्ये पराभव झाला. तेव्हा सांगायचा मुद्दा- आचार्य नरेंद्र देवांविरोधात उमेदवार देऊ नये असे नेहरूंना निदान वाटत तरी होते. पण डॉ.आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये असे नेहरूंना वाटत असल्याचे निदान मी तरी कुठे वाचलेले नाही. त्याप्रमाणेच जे.बी.कृपलानी, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविरोधातही काँग्रेसने उमेदवार दिला होता. तेव्हा १९४७ मध्ये सर्वसमावेशक मंत्रीमंडळ बनवावे हा नेहरूंचा आग्रह तेवढ्यापुरता होता का? अर्थात त्यांनी कायमच सगळ्यांना मंत्रीमंडळात घ्यायला हवे होते असे नाही पण ज्यांना आपण अशा उत्युंग व्यक्तीमत्वांना एकेकाळी मानाने मंत्रीमंडळात बोलावून घेतले होते त्यांचा लोकसभा प्रवेशाचा मार्ग सुकर केला असता तर तो एक चांगला पायंडा नक्कीच पडला असता हे नक्की.

सरकारने खरीप किंवा रब्बी हंगामात एमएसपीवर शेतकऱ्यांकडून आतापर्यंतची सर्वात मोठी खरेदी केली आहे. यासह, सुमारे १ लाख ७० हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात आणि सुमारे ८५ हजार कोटी रुपये गहू उत्पादकांच्या खात्यात पोहोचले आहेत.

भारताच्या इतिहासात प्रथमच भारतीय पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषद UNSC च्या बैठकीचे अध्यक्ष असतील. पहिल्या आठवड्यात यूएनएससीच्या अध्यक्षपदाच्या भारताने अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी यूएनएससीच्या सर्व सदस्यांची तातडीची बैठक बोलावली. विशेष म्हणजे शुक्रवारी झालेल्या बैठकीला भारताने पाकिस्तानला आमंत्रित करण्याची तसदी घेतली नाही आणि त्याऐवजी अफगाणिस्तानमधील वातावरण बिघडवण्यासाठी दहशतवाद पुरस्कृत राज्यावर हल्ला करण्याचा मुद्दा मांडला. अध्यक्षपदाच्या दुसऱ्या आठवड्यात भारत सागरी सुरक्षेवर एक बैठक घेईल. या मुळे चीनवर दबाव तयार होत आहे. पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषद बैठकीचे अध्यक्ष - या निमित्ताने भाराताला मोठी राजकीय भुमिका प्राप्त झाली आहे असे दिसून येते आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चीनला कायमस्वरूपी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची जागा देण्याची धोरणात्मक चूक केली नसती तर गेल्या ७० वर्षांत भारताने जागतिक राजकारणात किती महत्त्वाची जागा घेतली असती याची आपण या निमित्ताने कल्पना करू शकतो.

In reply to by निनाद

जवाहरलाल नेहरू यांनी चीनला कायमस्वरूपी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची जागा देण्याची धोरणात्मक चूक केली
असल्या थापा मारणे बंद करा. वाचन वाढवा. इथेच इतर धाग्यांवर याची चर्चा झाली आहे

In reply to by कपिलमुनी

थापा तुमच्याच सुरू आहेत. भारताला १९५० च्या दशकात सुरक्षा परीषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळत असताना नेहरूंनी ते नाकारून भारताऐवजी चीनचे नाव पुढे केले, यासंबंधीचे पुरावे मी २-३ महिन्यांपूर्वीच एका धाग्यात दिले होते. "Letters to Chief Ministers 1947-1964, Vol 4" या ७०४ पानांच्या पुस्तकात नेहरूंनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांचा संग्रह दिला आहे. या खंडाचे संपादन १९८८ मध्ये जी. पार्थसारथी या माजी राजदूतांनी केले असून प्रकाशन Oxford Press या नामवंत प्रकाशन संस्थेने केले आहे. या नेहरूंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने भारत सरकारने हा खंड प्रकाशित केला आला होता व त्यास राजीव गांधींंनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यामुळे या खंडाच्या सत्यतेविषयी तिळमात्र शंका नाही. त्यातील पान क्रमांक २३७ वर नेहरूंनी २ ऑगस्ट १९५५ या दिनांकास लिहिलेले पत्र दिले आहे. त्यात खालील वाक्ये आहेत. " Informally, suggestions have been made by the United States that China should be taken into the United Nations but not in the Security Counal, and that India should take her place in the Security Council." "We cannot of course accept this as it means falling out with China and it would be very unfair for a grrat country like China not to be in the Secunty Council. We have, therefore, made it clear to those who suggested this that we cannot agree to this suggestion. We have even gone a little further and said that India is not anxious to enter the Security Counal at this stage, even though as a great country she ought to be there. The first step to be taken is for China to take her rightful place and then the question of India might be considered separately." या वाक्यांवरून असे स्पष्टपणे दिसते की भारताला चीनऐवजी सुरक्षा परीषदेचे स्थायी सदस्यत्व देण्याचे अमेरिकेने सुचविले होते. परंतु भारताने चीनच्या प्रेमात ही सूचना नाकारली. नेहरूंच्या अनेक निर्णयात अजिबात दूरदृष्टी नव्हती व निर्णय घेताना ते बऱ्याचदा भाबडेपणाने निर्णय घ्यायचे, हे अनेकदा दिसले होते. त्यामुळे त्यांनी सुरक्षा परीषदेचे स्थायी सदस्यत्व मिळत असूनही नाकारणे अगदी स्वाभाविक होते.

In reply to by श्रीगुरुजी

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://ia801606.u… या पीडीएफमधील पृष्ठ क्र. २६४ (म्हणजे खंडाचे पृष्ठ क्रमांक २३७. हा क्रमांक २३७ वर उजव्या कोपऱ्यात छापला आहे) वरील २ ऑगस्ट १९५५ या दिवशी लिहिलेल्या पत्रात वरील परिच्छेद आहेत.

In reply to by कपिलमुनी

म्हणजे नेहरू खोटे सांगत होते का? इथे नेहरू स्वत:हून सांगताहेत आणि नेहरूंचे अंधभक्त त्यांनाच खोटे ठरवताहेत. घोर कलियुग, दुसरं काय!

In reply to by कपिलमुनी

बादवे, आपले वाचन शून्य असून सर्व प्रतिसाद केवळ पूर्वग्रहातून खरडले जातात हे आज पुन्हा एकदा दृग्गोचर झालंय. At the UN's founding in 1945, the five permanent members of the Security Council were the French Republic, the Republic of China, the Soviet Union, the United Kingdom, and the United States. There have been two seat changes since then, although these have not been reflected in Article 23 of the United Nations Charter, as it has not been accordingly amended: China's seat was originally held by the Nationalist government of the Republic of China (ROC). However, it lost the Chinese Civil War and retreated to the island of Taiwan in 1949. The Chinese Communist Party won control of mainland China and established the People's Republic of China (PRC). In 1971, UN General Assembly Resolution 2758 recognised the PRC as the legal representative of China in the UN, and gave it the seat on the Security Council that had been held by the ROC, which was expelled from the UN altogether. Both the ROC and the PRC continue to claim de jure sovereignty over the entirety of China (including Taiwan). However, only 15 states continue to officially recognise the ROC as the sole legitimate government of China. https://en.m.wikipedia.org/wiki/Permanent_members_of_the_United_Nations…

In reply to by श्रीगुरुजी

Informally, suggestions have been made by the United States that China should be taken into the United Nations but not in the Security Counal, and that India should take her place in the Security Council.
हे वाचून काही वाचकांचा गोंधळ उडू शकतो. चीन जर संयुक्त राष्ट्राचाच सदस्य नसेल तर सुरक्षा परिषदेत तरी कुठून येणार आणि सुरक्षा परिषदेतील चीनची जागा भारताने घ्यायचा प्रश्न कुठे येतो? चीन मधील चिअँग कै शैकच्या सरकारला अमेरिकेची मान्यता होती. त्या सरकारने दुसर्‍या महायुध्दात जपानविरूध्द लढाईत भागही घेतला होता. त्यामुळे दुसर्‍या महायुध्दातील दोस्त राष्ट्रांना सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळाले होते त्यात अमेरिका, रशिया, इंग्लंड आणि फ्रान्सबरोबर चीनलाही ते मिळाले होते तसेच चीन हा संयुक्त राष्ट्रांच्या संस्थापक सदस्यांमध्ये एक होता. दुसर्‍या महायुध्दानंतर चीनमधील यादवी युध्द परत सुरू झाले आणि त्या युध्दात माओने चिअँग कै शैकचा पराभव केला आणि चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन झाले. त्यामुळे चिअँगला तैवानला पळून जावे लागले. माओ १९४९ मध्ये चीनमध्ये सत्तेत आला. माओच्या नेतृत्वाखाली चीनच्या मुख्य भूमीला 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' तर चिअँग कै शैकच्या नेतृत्वाखालील तैवानला 'रिपब्लिक ऑफ चायना' असे म्हटले गेले. १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानात तालीबान सत्ताधारी असले तरी जगाची मान्यता बुर्‍हानुद्दिन रब्बानींच्या तालिबान पूर्वी सत्तेत असलेल्या सरकारला होती आणि तालीबानने अफगाणिस्तान बेकायदेशीरपणे कबजात घेतला आहे असे म्हटले जात होते. तसाच काहीसा प्रकार चीनच्या बाबतीतही होता. सत्तेत माओ असला तरी त्याने बेकायदेशीरपणे सत्ता ताब्यात घेतली आहे आणि चीनचा खरे सरकार हे चिअँग कै शैकचे सरकार आहे असे अमेरिकेचे म्हणणे होते. त्यामुळे चीनची संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा परिषद या दोन्हींमधली जागा चिअँग कै शैकच्या सरकारकडे होती. ती सुरक्षा परिषदेतील जागा भारताला द्यावी असा प्रस्ताव होता. १९७१ मध्ये सुरवातीला हेनरी किसिंजर आणि १९७२ मध्ये रिचर्ड निक्सन यांनी चीनचा दौरा केल्यावर चीनचा विजनवास संपला आणि माओच्या चीनला संयुक्त राष्ट्रात घेण्यात आले. इतकेच नाही तर चिअँग कै शैकच्या सरकारकडे असलेली सुरक्षा परिषदेची जागाही माओच्या सरकारला देण्यात आली आणि तैवानची सुरक्षा परिषदेतूनच नाही तर संयुक्त राष्ट्रांमधूनही हकालपट्टी करण्यात आली.

In reply to by कपिलमुनी

मे महिन्यात ह्याच विषयावर अगदी सविस्तर चर्चा झाली होती. त्या दरम्यान, हाच उल्लेख आल्यावर तुम्ही हे अगदी असेच म्हणाले होतात. त्यावरून श्रीगुरुजी व चंद्रसूर्यकुमार ह्यांच्यात मिळून जी चर्चा झाली (व जिच्यात तुम्ही काहीच सहभाग घेतला नाहीत) त्यांत अगदी तपशिलासकट व दुव्यांसह बरीच माहिती देण्यात आली होती. ती इथून पुढे पहावी. आणि आता शक्य झाल्यास त्याचा प्रतिवाद करावा. (जोंवर चर्चा सुसंकृतरीत्या सुरू राहील, तोंवर, मिपा संचालकांचा त्यावर काही आक्षेप नसावा. तेव्हा ती भीति नको).

In reply to by प्रदीप

अत्यंत बिनबुडाचे द्वेषी आरोप करून Hit and run करणारा हा सदस्य असल्याने प्रतिवाद येणार नाही. मे महिन्यातील चर्चेत बिनतोड पुरावे समोर आणल्यानंतर या सदस्याने प्रतिवाद न करता धाग्यावरून काढता पाय घेतला होता. या धाग्यावरूनही पलायन करण्यात आले आहे. धागा कोणताही असला तरी बिनबुडाचे आरोप करणे आणि तडाखा मिळाल्यानंतर धूम ठोकणे हे या सदस्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या पैकी कोणीही सुरक्षा परीषदेचे कायम सदस्यत्व रद्द करायला काय प्रोव्हिजन आहे हे वाचले नाहिये . इन्फोर्मल म्हणणे आणि फोर्मल ओफर यात फरक कळत नसेल तर धन्य आहे. कोणी मला तू या जॉब साठी फिट आहेस , जॉईन करशील का आणि हातात ओफर लेटर असणे यात जेवढा फरक आहे तो समजून मग बोला. बाकी हिट अँड रन वगैरे वैयक्तिक टीका झाल्यास इथून पुढे तशाच स्वरुपात उत्तर दिले जाइल.

In reply to by कपिलमुनी

कोणत्याही ऑफरची सुरूवात नेहमीच अनौपचारिक पद्धतीने असते. सुरूवातीपासून कोणी वकील, कायदेशीर करारनामा वगैरे बरोबर घेऊन ऑफर देत नाही. दोन कंपन्या एकत्र येणे, एखाद्या मोठ्या पोस्टसाठी एखाद्या अनुभवी माणसाची चाछपणी करणे, नवीन बिझनेस डील वगैरे अनौपचारिक चर्चेतूनच सुरू होतात. एकमेकांचे हेतू, त्यातून कोणते फायदेतोटे होऊ शकतात याची चाचपणी केली जाते. जर दोन्ही बाजूंकडून अनुकुलता दिसत असेल तर मग शेवटी औपचारिक कायदेशीर प्रक्रिया सुरू होते. अर्थात हे ज्ञान असण्याची शक्यता नाहीच.

In reply to by श्रीगुरुजी

सुरक्षा परीषदेचे कायम सदस्यत्व रद्द करायला काय प्रोव्हिजन आहे याबाबत वाचा

In reply to by श्रीगुरुजी

संयुक्त राष्ट्र समिती,सुरक्षा परिषद ह्यांचे दरवाजे काही आता बंद झालेले नाहीत. साठ सत्तर वर्षा पूर्वी झालेल्या घटनेचे (ते पण काल्पनिक) आता काय भांडवल करत आहात. स्वतःच्या हिम्मती वर,कर्तुत्व वा वर संयुक्त राष्ट्र परिषद आणि सुरक्षा समिती ह्या मध्ये स्थान मिळवा आणि ५६ इंची छाती कधी कामाला येणार. आमच्या पण बापाने आमच्या साठी संपत्ती सोडली नव्हती आम्ही त्यांना दोष देत बसलो नाही स्वतःच्या हिंमती वर संपत्ती कमावली.

भारत लडाखमध्ये ४ विमानतळ आणि ३७ नवीन हेलिपॅड बांधत आहे. हे हेलिपॅड जड चिनूक सीएच ४७ हेलिकॉप्टर हाताळण्यास सक्षम असतील. चार नवीन विमानतळांसाठी जमीन बनवणे आदि तयारी वाइड-बॉडी विमानांच्या लँडिंगसाठी योग्य पूर्ण झाली आहे. सरकार लेह शहरासाठी पर्यायी हवाई क्षेत्र आणि झांस्कर व्हॅलीला थेट जोडण्याची योजना आखत आहे.

नरेंद्र मोदी सरकार नागरी आणि लष्करी सागरी क्षेत्रामध्ये संवाद साधण्यासाठी राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक नियुक्त करणार. बहुदा भारतीय नौदलाचे सेवारत किंवा नुकतेच निवृत्त व्हाइस एडमिरल यांची नोकरीच्या पदावर नियुक्ती केली जाईल. राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक , भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या अधीन काम करेल आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात सरकारचे मुख्य सल्लागार असतील. पुर्ण अभ्यासा अंती राष्ट्रीय सागरी आयोगाची (एनएमसी) संघटनात्मक रचना ही आंतर-मंत्रालयीन सल्लामसलतीनंतर तयार केली गेली आहे. यामुळे आता केंद्रीय मंत्रालये आणि विभाग (गृह, शिपिंग, मत्स्यव्यवसाय इ.) आणि राज्य सरकारांपासून नौदल, तटरक्षक दल, सीमाशुल्क, गुप्तचर संस्था आणि बंदर प्राधिकरणांपर्यंत विविध भागधारकांमध्ये समन्वय साधला जाईल. मोदी सरकारने आता ‘एनएमएससी’ची स्थापना करून नौदलाच्या मजबुतीकरणाचे कामही हाती घेण्यात आल्याचे यावरून दिसून येते.

वादग्रस्त इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्सने नवी दिल्लीतील विंडसर प्लेस येथील सरकारी जागेचे भाड्याचे पैसेच भरलेले नाहीत असे उघडकील आले आहे. त्यामुळे प्रेस कॉर्प्सला (IWPC) सरकारने दिलेले निवासस्थान वाटप रद्द केल्याची नोटीस दिली. या जागेची मुदत या वर्षी जानेवारीत संपली असल्याने निवासस्थान रद्द करण्यात आले आहे. सरकारने इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्सला थकबाकी त्वरित भरण्यास सांगितले. इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्स ने पाकिस्तानी राजदूत मुत्सद्द्यांना या पुर्वी पार्ट्या दिल्या आहेत. आणि नंतर हेच मुत्सद्दी आणि राजदूत नंतर भारतात आयएसआय साठी काम करतांना पकडले गेले होते.

गाझियाबादमधील दासना मंदिराचे पुजारी स्वामी नरशानंद सरस्वती यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोरांनी घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास मंदिराची भिंत तोडून आवारात प्रवेश केला. या पुर्वी महंत याच मंदिराचे यती नरसिंहानंद सरस्वती यांना यापूर्वी अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. हा हल्ला त्यांच्यासाठीच असावा पण स्वामी नरशानंद सरस्वती यांच्यात हल्ले खोरांना फरक करता आला नसावा. महत्त्वाचे म्हणजे यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळले आहेत. याआधी मे महिन्यात दिल्ली पोलिसांनी पहाडगंज भागातून २४ वर्षीय मोहम्मद दार उर्फ ​​जहांगीरला नावाच्या दहशतवाद्याला अटक करून दासना देवी मंदिराचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद सरस्वती यांच्याविरोधात हत्येचा कट उघडकीस आणला होता. ​​जहांगीरला दासना देवी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला मारण्यासाठी देण्यासाठी रुपये देण्यात आले होते. भारतात हिंदु साधूसंतांवर चिंताजनक प्रमाणात हल्ले होत आहेत. या आधी पालघर येथे साधूंची हत्या झाली आहे आणि नंतर त्यांची केस लढवणार्‍या वकीलाचा ही मृत्यु झाला आहे.

महंत नरसिंहानंद यांची एक मुलाखत काही काळा पूर्वी मी इथे दिली होती. त्यांनी हे वारंवार सांगितले आहे आणि होते की त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मंदिराच्या आधिच्या महंतांची देखील बहुतेक हत्या झालेली आहे. जयपुर डायलॉग्सवर यांच्या २ मुलाखती आहेत. त्या इथे देत आहे. जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatre

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे आज वयाच्या ८१ वर्षी निधन झाले. ऋषीतुल्य व्यक्तीमत्व असणार्‍या बालाजी तांबे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली _/\_ अगदी २ दिवसांपूर्वीच त्यांचा एक व्हिडियो पाहिला होता, तो इथे देतो.

मदनबाण.....


केंद्र सरकार नी राज्य घटनेत बदल करून कोणत्या जातींना कोणत्या वर्गात टाकायचे ह्याचे अधिकार राज्य सरकार ना दिले आहेत. ह्या निर्णय मुळे राज्याराज्यांत जातीचे राजकारण जोर धरेल असे मला वाटत. जाती जाती मधील भेद कमी होणे गरजेचे आहे पण ह्या निर्णय मुळे जाती अजून मजबुत होतील.आणि नेहमी संघर्ष वाढेल. आणि ही हिंदू धर्मासाठी चांगली गोष्ट नाही.

बिहार मध्ये सुदर्शन न्यूजच्या पत्रकाराची हत्या, अरसद आलम ला अटक करण्यात आली आहे. देशात पत्रकाराची हत्या झाली असूनही कोणत्याही पत्रकार संघटनेने याची दखल घेतलेली नाही. मनीषला सातत्याने धमक्या येत होत्या. त्याने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मनीष बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी हरसिध्दी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस तपास करत असताना त्यांना स्थानिकांना एक अज्ञात मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. असे म्हणतात की खुन्यांनी मनीषचे डोळे काढले होते, आणि त्याच्या चेहऱ्यावर जखमा आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी सरकार निवडून आल्यापासून सरकारच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री बोगन राजेंद्रनाथ यांनी इमाम आणि ख्रिश्चन धर्मगुरूंसाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक पैशांचे वाटप केले. सरकारने अर्थसंकल्पात अल्पसंख्याक कल्याण योजनांसाठी एकूण २१०६ कोटी रुपये आता पर्यंत दिले आहेत. आंध्र प्रदेशचे मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मगुरूंचा पगार किमान रु. २०,००० करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. वायएस जगनमोहन रेड्डी एका ख्रिश्चन कुटुंबातून आले आहेत. त्यांचे वडील दिवंगत वायएस राजशेखर रेड्डी हे ही ख्रिश्चन होते. ते काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनीही अशाच धर्तीवर अल्पसंख्यांक तुष्टीकरण स्वीकारले . रामनवमी सारख्या प्रमुख सणाच्या राज्य सरकारने मंजूर केलेल्या सुट्ट्या काढून टाकण्यात आल्या आहेत. आणि त्याच वेळी सर्व ख्रिश्चन सणांच्याच्या सुट्ट्या वाढवण्यात आल्या आहेत. तसेच तिरुमाला मंदिराचा कारभार राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने तेथे ही वायएसआरने ख्रिश्चन धर्मातील ख्रिश्चन धर्मियांना मंदिरांच्या प्रशासनात नियुक्त केले. आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी हजारो कोटी सरकारी रुपये धर्मांतरावर खर्च केले असाही आरोप केला जात आहे.

महा भकास आघाडी सरकार आता म्हणे महाराष्ट्रात राजीव गांधींच्या नावाने नवीन पुरस्कार देणार. ३ दिवसांपूर्वी मोदींनी खेलरत्न पुरस्काराला ध्यानचंदांचे नाव दिल्यानंतर दोन्ही तळव्यांना चुना लावून संजय राऊत मोदींच्या नावाने ठणाणा करीत होता व पुरस्कारासाठी खाशाबा जाधवांचे नाव का दिले नाही, मोदी मराठीविरोधी आहेत अश्या शिव्या घालत होता. मग आता या पुरस्काराला खाशाबा जाधवांचे नाव न देता राजीव गांधींचे नाव का दिले? https://www.loksatta.com/maharashtra-news/award-in-the-name-of-rajiv-ga…

महा भकास आघाडी सरकार आता म्हणे महाराष्ट्रात राजीव गांधींच्या नावाने नवीन पुरस्कार देणार. ३ दिवसांपूर्वी मोदींनी खेलरत्न पुरस्काराला ध्यानचंदांचे नाव दिल्यानंतर दोन्ही तळव्यांना चुना लावून संजय राऊत मोदींच्या नावाने ठणाणा करीत होता व पुरस्कारासाठी खाशाबा जाधवांचे नाव का दिले नाही, मोदी मराठीविरोधी आहेत अश्या शिव्या घालत होता. मग आता या पुरस्काराला खाशाबा जाधवांचे नाव न देता राजीव गांधींचे नाव का दिले? https://www.loksatta.com/maharashtra-news/award-in-the-name-of-rajiv-ga…

जेव्हा पासून महाराष्ट्रात ह्यांची सत्ता गेली आहे तेव्हा पासून हे मानसिक रोगी झाले आहेत. ह्यांच्या तोंडात नेहमी शिवराळ भाषा असते. राणे,त्यांचे पुत्र हे नमुने काय आहेत पूर्ण राज्य बघत च आहे. समर्थक पण त्याच दर्जा चे आहेत. सेने मुळे हे सत्तेत होते तेव्हा सेना चांगली होती आणि आता ह्यांना सत्ता मिळाली नाही म्हणून सेना वाईट झाली. स्वार्थी कुठले.

देशातील सर्व मदरसे RTE अंतर्गत यायला हवेत – NCPCR सर्व्हेतील निष्कर्ष! हे व्हायलाच हवे ! भाजपाला जर त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचे रक्षण करता येणार नव्हते तर त्यांनी या कार्यकर्त्यांना बंगाल मध्ये मृत्युच्या खाईत का लोटले ? आता या कार्यकर्त्यांच्या बायकाही तृणमुल कॉग्रेसच्या गुंडांच्या तावडीतुन सुटल्या नाहीत ! धक्कादायक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार आरोपी सगळे अशांती दुत आहेत :- शेख सय्यद आणि जोयनाल मुल्लिक व रहमत अली आणि महबूल तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला सहा वर्षांच्या नातवासमोर सामूहिक बलात्कार; महिलेची सुप्रीम कोर्टात धाव आपल्या देशात आता इतके बलात्कार होउ लागले आहेत की या परिस्थीतीत देशात स्त्रियांना अभय असे उरलेले नाही असे दिसते ! कोणीही यावे आणि कोणत्याही वयोगटाच्या स्त्रियांवर बलात्कार करुन जावे ! लहान मुलीं पासुन १०० वर्ष वृद्ध महिलेवर देखील बलात्काराच्या घटना वाचायला मिळत आहेत. हा देश आता स्त्रियांसाठी सुरक्षित राहिलेला नसुन, बहुतेक देशातील बंगाल राज्य हिंदू स्त्रियांसाठी तर अजिबात राहण्याच्या लायकीचे उरलेले नाही. बलात्कारी पुरुषांचे हात पाय छाटुन त्यांना लाचारीत जिवंत ठेवणे ही शिक्षा आता आपल्या देशात दिली गेली पाहिजे, फाशीची भिती उरलेली नाही... निदान चौरंगा झालेले पुरुष पाहुन इतर नराधम असले घृणास्पद कृत्य करण्यास धजावणार नाहीत असे गृहित धरुया. पीआर मिडियाचा रोजचा हैदोस... पीआरवाले कराचीवुड वाल्यांकडुन कोट्यावधी रुपये घेतात आणि न्युजपेपर वाल्यांच्या भिकार झोळीत टाकतात... यामुळे रोज आपल्याला तैमूरसत्ता मध्ये त्याच्या व त्याच्या अब्बा आणि अम्मीच्या कथा दिसतात. असेच इतर पेपर मिडिया देखील आहेत. हा नेक्सस करोडो रुपयांचा... स्वतःला रोज प्रसिद्धीत ठेवायचे मग जाहिरातवाले यांच्याच बरोबर कोट्यावधीचे करार करणार, मग त्याच कोट्यावधी मधले काही कोटी पीआर मिडियाच्या खिशात टाकणार आणि ते न्युज पेपर आणि इतर मिडियांच्या खिशात थोडेसे टाकणार आणि आपल्याला मनोरंजन या सदराखाली तैमूर ने शी केली असे वाचायला मिळणार. किळस वाटते हल्ली इतपत ही व्यवस्था लयाला गेली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - MISERLOU - William Joseph & Caroline Campbell (feat Tina Guo) EXPLOSIVE cover from Pulp Fiction

In reply to by मदनबाण

देशात होणाऱ्या बलात्कार च्या केस मध्ये अर्ध्या खूप पेक्षा जास्त केसेस ह्या खोट्या असतात. त्या मुळे कोणतेच कायदे भावनेच्या आहारी जावून केले जावू नयेत. बलात्कारी व्यक्ती ला फाशी ही मागणी जशी केली जाते तशी मागणी खोटी केस केली आणि तसे सिद्ध झाले तर आरोप करणाऱ्या व्यक्ती ल सुद्धा फाशी च झाली पाहिजेत

In reply to by Rajesh188

खूप पेक्षा जास्त केसेस ह्या खोट्या असतात. काय संगाता ? मग इतक्या बलात्कराच्या बातम्या रोज येतात त्या पण खोट्याच का ? सगळ्यात जास्त बलात्कार होणार्‍या देशांच्या यादीत आपले स्थान बहुतेक ३ किंवा ४ थे आहे. --- -- - थोड्या वेळा पूर्वी हा लेख वाचला :- ‘या’ सरकारचे डोके ठिकाणावर असल्याची ‘चिन्हे’ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जी नेमकी भूमिका मांडली आणि कळीच्या प्रश्नांना हात घातला, ते पाहताना लोकमान्य टिळकांच्या ‘त्या’ प्रश्नाची आठवण झाली आणि असे वाटले, की या सरकारचे डोके ठिकाणावर असल्याचे दिसते आहे! आता अजुन अजुन काही बातम्या :- 'त्या' ५६ हजार जणांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली; पण सरकारकडे त्यांची यादीच नाही मुंबई लोकलसाठी पास मिळण्यास सुरुवात; तुम्ही पात्र आहात का? कोणती कागदपत्रं हवीत? मोठी बातमी! हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास ठाकरे सरकारची परवानगी दोन लस घेतलेल्या लोकांना परत करोना होत नाही का ? तर होतो... मग सरकारने कुठलं डोकं वापरुन ही अट ठेवली ? भाजी मार्केट इतर दुकाने सुरु आहेत मग तिथे दोन लशींच्या पात्रतेची अट का नाही ? मुंबईची रेल्वे या आर्थिक राजधानाची धमनी समजली जाते, लाखो लोक या सेवेवर फार मोठ्या प्रमाणात अवलंबुन आहेत. रेल्वेत बॉम्ब स्फोट घडवुन झाल्यावर देखील ती सेवा सुरळीत केली होती हे आपल्याला माहितच आहे. लोकांचा संयम आता सुटला आहे, आज व्हॉटअ‍ॅपवर मुंबईतील एका स्त्रीचा व्हायरल झालेला व्हिडियो पाहिला तीला ५०० रु दंड आकारल्यावर तिच्या असंतोषाचा भडकाच उडाला ! मा. मुख्यंत्र्यांचे तीने तोंड भरुन कौतुक केले आहे. जो पर्यंत लोक आणि व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरुन हिंसक होत नाही तो पर्यंत या सरकारचे डोके ठिकाणावर येणार नाही असंच दिसतय ! जाता जाता :- मनोरंजन » “तैमूरच्या जन्मानंतर स्तनपान करताना…”; करीना कपूरने केला ‘या’ गोष्टीचा खुलासा प्रेग्नंसीदरम्यान; सेक्स लाइफविषयी पहिल्यांदाच उघडपणे बोलली करिना

In reply to by मदनबाण

> देशातील सर्व मदरसे RTE अंतर्गत यायला हवेत – NCPCR सर्व्हेतील निष्कर्ष! > हे व्हायलाच हवे ! मज्जा आहे. करून दाखवावेच सुप्रीम लीडर नी, > धक्कादायक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार फक्त तृणमूल ला दोष देऊन फायदा नाही. ३०३ चे बहुमत असलेले केंद्र सरकार ह्या महिलेचा नंतर शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करील आणि ट्विटर वरून बंगाली हिंदूंना शिव्या देईल. शेफाली वैद्य ह्यांनी तर ह्याचे खापर हिंदूवरच फोडले आहे. म्हणे भाजपाला मत दिले नाही म्हणून असे होत आहे.

In reply to by साहना

मज्जा आहे. करून दाखवावेच सुप्रीम लीडर नी, खरंय... आता सत्तेत आहेत तर कोणते बहाणे करतात तेच पहायचे आहे. शेफाली वैद्य ह्यांनी तर ह्याचे खापर हिंदूवरच फोडले आहे. म्हणे भाजपाला मत दिले नाही म्हणून असे होत आहे. वैद्य बाईंना कोणत्या तरी वैद्याला दाखवायला हवे ! :))) मदरश्यांमध्ये काय शिकवले जाते ? Do you know that this book is compulsory teaching in all madarsas of Indian sub-continent? This is Fatawa Alamgiri. It was commissioned by a Sufi - Aurangzeb. Head and deputy of the project were also Sufis - Sheikh Burhanpuri and Shah Abdul Rahim. Some excerpts :- T1 T2

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Little Mix - Black Magic (Official Video)

ट्विटरने राहुल गांधींबरोबर अजय माकन, रणदीप सुरजेवाला वगैरे काँग्रेस नेत्यांची खाती काही काळासाठी बंद केली. आता तर ट्विटरने काँग्रेस पक्षाचे अधिकृत खातेही 'लॉक' केले आहे अशा बातम्या आहेत. दोनेक महिन्यांपूर्वी ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात चकमक चालू असताना सगळे विचारवंत हिरीरीने ट्विटरच्या बाजूने उभे होते आणि ट्विटर करत आहे ते योग्यच आहे असे उच्चरवाने बोलत होते. त्यांची मात्र या प्रकाराने गोची झाली आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

त्यावेळी ट्विटरचा उच्च रवाने विरोध करणारे आणि ऑफिसवर धाडी टाकणारे ह्यांची नाही का गोची होणार? का आता ट्विटर सुधारले एकदम

In reply to by सुरिया

यामुळे ट्विटरविषयी पहिल्यापासून वाईट मत असलेल्यांना चांगले वाटेल त्यापेक्षा ट्विटरविषयी सुरवातीपासून चांगले मत असलेल्यांना नक्कीच अधिक वाईट वाटेल. रस्त्यावरच्या गुंडाने क्वचितप्रसंगी एखादी चांगली गोष्ट केली तर त्यामुळे जितके चांगले वाटेल त्यापेक्षा एखाद्या सज्जन आणि प्रामाणिक माणसाने खून केल्यानंतर अधिक वाईट वाटेल त्याप्रमाणेच. आमच्यासाठी ट्विटर पहिल्यापासूनच हलकट होते (रस्त्यावरच्या त्या गुंडासारखे) पण विचारवंतांसाठी ते खूप खूप चांगले होते (त्या सज्जन आणि प्रामाणिक माणसासारखे). आणि विचारवंतांची एखाद्याला चांगले म्हणायची व्याख्या एकदम साधीसरळ असते. आणि ती म्हणजे मोदी सरकारविरोधात असणे. तेव्हा इतके दिवस ट्विटर मोदी सरकारविरोधात होते म्हणून चांगले होते पण आता काँग्रेसवरच कारवाईचा बडगा उगारला आहे म्हणून त्याला वाईट ठरवावे की नाही ही गोची नक्कीच या विचारवंतांची होणार. अर्थात विचारवंतांकडे सगळ्या गोष्टींकडे उत्तर असतेच. आता ट्विटरने मोदी सरकारच्या दबावाखाली ही कारवाई केली आहे असा प्रचार ते करायला लागले आहेत. काही का असेना- पूर्वी मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात बाणेदारपणे उभे राहिलेल्या ट्विटरने शेपूट घातलीच हे तरी विचारवंतांना कबूल करावेच लागेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ट्विटरविषयी पहिल्यापासून वाईट मत असलेल्यांना चांगले वाटेल त्यापेक्षा ट्विटरविषयी सुरवातीपासून चांगले मत असलेल्यांना नक्कीच अधिक वाईट वाटेल. रस्त्यावरच्या गुंडाने क्वचितप्रसंगी एखादी चांगली गोष्ट केली तर त्यामुळे जितके चांगले वाटेल त्यापेक्षा एखाद्या सज्जन आणि प्रामाणिक माणसाने खून केल्यानंतर अधिक वाईट वाटेल त्याप्रमाणेच...
अरेरे, फुरोगामी विचारवंतांना नावे ठेवत तुम्हीही त्यांचीच भाषा बोलायला लागलात की. विरोधी भक्ती म्हणावी की अनुकरण?