Skip to main content

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 05/08/2021 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या सरचिटणीस आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या कन्या आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भगिनी प्रियांका वाद्रा यांना मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. एक तर राहुल किंवा प्रियांकांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार घोषित करा हा आग्रह प्रशांत किशोरने २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेसही धरला होता. तो त्यावेळी पूर्ण केला गेला नव्हता पण यावेळी तसे होत आहे असे दिसते. प्रियांकांनी २०१७ पर्यंत केवळ आपल्या आईच्या रायबरेली आणि भावाच्या अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भागातच प्रचार केला होता. २०१७ मध्येही या लोकसभा मतदारसंघांच्या भागात असलेल्या १० पैकी अवघ्या २ जागा काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रियांकांवर राज्याच्या पूर्व भागातील मतदारसंघांमध्ये प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. मागच्या वर्षी लॉक डाऊनच्या दरम्यान काँग्रेस पक्षातर्फे इतर राज्यात अडकलेल्या मूळच्या उत्तर प्रदेशातील मजुरांना राज्यात परत आणायला म्हणून शेकडो बस आणल्या पण त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सरकारने राज्याच्या सीमेवर अडवून ठेवल्या असा दावा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला. त्या तथाकथित बसपैकी अनेक अस्तित्वात नव्हत्या तर अनेक नंबर प्लेट दुचाकींचे होते हे नंतर स्पष्ट झाले. असल्या नौटंकीवर पक्षाच्या रायबरेलीच्या आमदार अदिती सिंग यांनी प्रियांकांवर टीका केली. त्यानंतर अदिती सिंगना पक्षाने काढून टाकले. आता कदाचित २०२४ मध्ये अदिती सिंग भाजपकडून रायबरेली लोकसभा मतदारसंघातून सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशात स्वतः सोनिया गांधींची रायबरेली वगळता एकही दुसरी जागा मिळाली नव्हती. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ४ दिवसांनी म्हणजे २७ मे २०१९ रोजी नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त लखनौच्या प्रदेश पक्ष कार्यालयात कार्यक्रम झाला होता त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण द्विवेदी यांनी राहुल-प्रियांकांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर रामकृष्ण द्विवेदींना तडकाफडकी पक्षातून काढून टाकले गेले. रामकृष्ण द्विवेदी हे हाडाचे काँग्रेसवाले होते. जानेवारी १९७१ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग यांच्याविरोधात गोरखपूर जिल्ह्यातील मनीराम विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवली होती आणि त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांपेक्षा दुप्पट मते मिळवून मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आणि खळबळ उडवली. त्यांनी कधीही पदाचा लोभ ठेवला नाही आणि केवळ पक्षाचेच काम केले. जवळपास ८८ वय असलेल्या रामकृष्ण द्विवेदींना प्रियांका-राहुलच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला हे महान पातक केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही आठवड्यातच रामकृष्ण द्विवेदींना कॅन्सरचे निदान झाले. पूर्ण जन्म काँग्रेसमध्ये घालवलेल्या द्विवेदींना आयुष्याच्या शेवटी पक्षातून काढून टाकले गेलेले जिव्हारी लागले. शेवटी मरताना तरी मला काँग्रेसवाला म्हणूनच मरू द्या अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर त्यांना पक्षात घेण्यात आले पण त्यांना काढले ही चूक झाली याविषयी चकार शब्द न बोलता त्यांना दुर्धर आजार झालेला असल्याने दया दाखवायला पक्षात घेतले गेले आहे अशाप्रकारचे स्टेटमेन्ट पक्षाकडून काढले गेले होते असे वाचल्याचे आठवते. त्यानंतर काही दिवसातच- २०२० मधील लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी चार दिवस रामकृष्ण द्विवेदींचे निधन झाले. तर अशा आहेत प्रियांका वाद्रा. त्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर प्रदेशात काय होते हे बघायचे. Priyanka

वाचने 52001
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

In reply to by सुरिया

ट्विटर ने काँग्रेस ची खाती लॉक केल्याने आनंद नक्कीच झाला नाही, फक्त गंमत वाटली. बाकी ज्या अतिरेक्यांचे समर्थन काँग्रेस पक्ष करतो त्यांच्याकडून एखाद्या पुरोगाम्याला यमसदनाला धाडले जाते तेव्हा आनंद नक्कीच होत नाही. फक्त त्या फुरोगाम्याची दया येते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

विरोधकांची अजिबात गोची झालेली नसावी. चीवचीवाट सरकारच्या एकुण डिझेल-पेट्रोलच्या विरोधात होत होता, पॅगसीस काय म्हणतात म्हणे ते सरकार जी हेरगिरी करत होते त्यामुळे सरकारविरुद्ध चिवचिवाट होता होता. मोदी सरकारने जो जो मिडिया सरकार विरोधात बोलेल तिथे तिथे कायद्याचा बडगा दाखवून तो आवाज दाबला, दाबण्याचा प्रयत्न केला. आता मुख्यविषय ट्वीटरकडे वळु, ट्वीटरने राहुल गांधीचं खातं काही काळासाठी रद्द केलं, काही वेळासाठी बंद केलं, वगैरे बातम्या येत होत्या पण ट्वीटरने राहुल गांधी यांचं खातं बंद केलं नाही, पण एका पिडितेचं छायाचित्र टाकलेलं होतं ते चित्र ट्वीटरने हट्वले होतं. इतकीच माहिती आहे. (संदर्भासाठी हेही पाहावे) आपण तर पहिल्यापासून कोणत्याही माध्यमाच्या स्वातंत्र्याच्या बाजूने आहोतच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर, तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये तर लिहिलेय की अकाउंट काही काळासाठी बंद केले होते म्हणून.. आणि तुम्ही तर गोषवारा म्हणून काहीतरी वेगळेच लिहिलेय. स्वातंत्र्य मला पण आवडते, पण इतके?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्वीटरने राहुल गांधी यांचं खातं बंद केलं नाही, पण एका पिडितेचं छायाचित्र टाकलेलं होतं ते चित्र ट्वीटरने हट्वले होतं. इतकीच माहिती आहे. स्वत:चे गलिच्छ राजकारण चालविण्यासाठी बलात्कार पिडितेच्या कुटुंबियांची प्रकाशचित्रे प्रसिद्ध करून त्यांची ओळख जाहीर करणे हे अत्यंत घृणास्पद कृत्य असून हा फौजदारी गुन्हा आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी ओरपणे, बलात्कार पीडितांचा राजकारणासाठी वापर करणे, मतांसाठी अत्यंत खालची पातळी गाठणे हे कॉंग्रेससाठी नेहमीचीच गोष्ट आहे.

In reply to by श्रीगुरुजी

भारतीय राजकारणात गलिच्छ राजकारण आणि त्याची सुरुवात मोदी आणि भाजपांनी २०१४ पूर्वी आणि नंतर इतकी केली की त्याची काही लिमिट राहीली नाही. आता तो गलिच्छपणा सांगून आणि लिहूनही काही उपयोग नाही. आत्ताही काही भाजपाच्या बाजार बुनग्यांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोकडे तक्रार करायला लावून सरकारच्या माध्यमातून दबाव आणून काँग्रेस नेत्यांची ट्विटर खाती बंद करायला लावली असा आरोप सरकारवर केला जात आहे. लोक बदल करायला आणि फेकाफेकूवर विश्वास ठेवायला एकच वेळ झाली आणि नवे पंतप्रधान म्हणून मोदींना भारतीयांना झेलावे लागले, सहन करावे लागले आहेत. मोदी आणि त्यांचे सहकारी धुतल्या तांदळाचे नाहीत हे सर्व भारतियांना माहिती आहे. मतांसाठी उत्तरप्रदेशच्या सभा असो की देशातल्या सभा असो भाजपाने राजकारणासाठी काय काय केले ते सांगून उपयोग नाही. आज सत्ता आहे म्हणून असंख्य गलिच्छ गोष्टी मोदी आणि सरकारी यंत्रणेचा उपयोग करून दाबल्या जातात. एकदा सत्ता गेली की सर्व बाहेर येईलच. काळ हेच औषध. भारतीय जनतेला सोसणे आणि वाट पाहणे आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी विद्यावाचस्पती प्राध्यापकांची केविलवाणी अवस्था झाली आहे. त्यातून थोडासा दिलासा मिळण्यासाठी ईनो, जेलुसिल इ.चे सेवन करा.

In reply to by श्रीगुरुजी

सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था खरी तर बिजेपी भक्तांची झाली आहे. पेट्रोल दरवाढ, महागाई त्यांनाही सोसावी लागतेय. केंद्र सरकारच्या लस धोरणाचा फटका भक्तांनाही बसतोय,पण केंद्र सरकारवरील आंधळ्या प्रेमामुळे सहन करत आहेत बिच्चारे! केंद्राचे गप्पबसिंग धोरण निमूटपणे पाळत आहेत.

*पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकाच्या पत्नीला अटक; योगी सरकारच्या कारवाईने देशात संताप* उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या राज्यभरात दौरे करत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूका जवळ आल्या आहेत. असे असताना आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या कौशल किशोर रावत यांची पत्नी ममता रावत यांना रविवारी मुख्यमंत्र्यांना भेटून दिले नाही. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, अद्याप त्यांना जमीन वाटप झालेली नाही. तसेच मोफत वीज जोडणी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मिळालेला नाही. यामुळे त्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटायचे होते. दोन वर्षांपूर्वी जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. आतापर्यंत सरकारने दिलेल्या आश्वासनांची अनेक आश्वासने पूर्ण झाली नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. यासंदर्भात कुटुंबही धरणेवर बसले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री डॉ दिनेश शर्मा यांनी त्यांच्याशी फोनवर बोलून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. परंतु आतापर्यंत फक्त शाळेचे नाव हुतात्म्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे. https://mulukhmaidan.com/wife-soldier-killed-pulwama-attack-arrested-yo…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्याला न्याय मिळत नाही तर सामान्य माणसाला काय न्याय मिळत असावा ऊत्तर प्रदेशात?? ऊत्तर प्रदेशची जनता आगीतून फूफाट्यात पडलीय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

खालील चेपू पोस्ट. वाचा!! Dear all , me and my mother was on protest . I belive this page haven't collected proper information, and as well as we have received our all rights from government. Thank you for the postv बाकी चालू द्या. ...........

Bjp नी चमच्याना दूर करून स्वतः देशाची bjp विषयी काय मत आहेत ह्यांची दाखल घ्यावी.. बुध्दी चातुर्य दाखवून bjp बद्द्ल लोकांची मत चांगली आहेत असे चमचे दाखवत आहेत पण सामान्य जनता बिलकुल ह्या पक्षावर विश्वास ठेवत नाही. Bjp काळात हिंदू आर्थिक बाबतीत बिलकुल सक्षम झाला नाही. हिंदू आर्थिक बाबतीत जवढे काँग्रेस काळात सक्षम होते ते आता bjp काळात कमजोर झाले. Bjp हिंदू हित वादी आहे ह्याची कोणतीच ग्राउंड रिॲलिटी अस्तित्वात नाही.. इंदिराजी नी कधीच चमचे पाळले नाहीत.चांडाळ चोकटी ला त्यांनी कधीच जवळ येवून दिले नाही. पण मोदी साहेब च्या बाजूला सर्व चमचे,चांडाळ chokati जमा झाली आहे.

In reply to by Rajesh188

ह्या प्रतिसादांतील काही मौतिके: * हिंदू आर्थिक बाबतीत जवढे काँग्रेस काळात सक्षम होते ते आता bjp काळात कमजोर झाले. *इंदिराजी नी कधीच चमचे पाळले नाहीत.चांडाळ चोकटी ला त्यांनी कधीच जवळ येवून दिले नाही. ह्या प्रतिसादाचा अमूल्य ठेवा, सर्वांनी जपून ठेवावा असा आहे.

In reply to by प्रदीप

*इंदिराजी नी कधीच चमचे पाळले नाहीत.चांडाळ चोकटी ला त्यांनी कधीच जवळ येवून दिले नाही.

ह्याला तोडच नाही! सुवर्ण अक्षरांनी लिहुन ठेवावा असाच दावा आहे. सलाम!!!

http://dhunt.in/kti6a?s=a&uu=0xcae9973ebb9f99bd&ss=wsp कोरोना निर्बंधांचा पंचतारांकित हॉटेलांना फटका, पुण्यातील दोन पंचतारांकित हॉटेल चक्क विकायला. हिंजवडी तील हॉटेल फक्त 200 कोटी रुपयाला आहे. मुनिश्वर, 188, प्राडॉ, भुजबळ साहेब, आणि कोणकोण, कुणाला हवंय का? नंतर बोंबाबोंब नको की अदानी अंबानी ने विकत घेतलं म्हणून. आता आहे संधी तर घेऊन मोदींच्या मित्रांना दूर ठेवा महाराष्ट्रापासून. नंतर म्हणू नका सांगितलं नाही म्हणून.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

आमच्याकडे काही सरकारी मालमत्ता पडून असत्या तर त्या तर त्या विकून घेतली असती ही हॉटेलं. जनता का बिस्वास, जनता का प्यार, और जनता का लिये नियमित थापा-थुपा यही हमारा काम है. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयडी वळखला
भारीच हुशार तुम्ही.
आमच्याकडे काही सरकारी मालमत्ता पडून असत्या तर त्या तर त्या विकून घेतली असती ही हॉटेलं. जनता का बिस्वास, जनता का प्यार, और जनता का लिये नियमित थापा-थुपा यही हमारा काम है. :)
भगवान आपको ऐसी मालमत्ता आपको जलदी ही दे यही हमारी प्रार्थना हय. फिर जब आपको हॉटेल मिलेंगा तो हमको जबरी डिस्काउंट देना आपकी डूटी हय.

नंतर बोंबाबोंब नको की अदानी अंबानी ने विकत घेतलं म्हणून. व्होडा - आयडिया घेता का? बिर्लाची ऑफर सरकारला स्वीकारायला सांगा. फुकट मिळतेय.

तालिबान एक एक शहर काबीज करत आहे हे आश्चर्य च आहे.अफगाणिस्तान ची सैन्य,पोलिस, एअरफोर्स मिळून तीन लाखाच्या आसपास सशस्त्र सेना आहे.अमेरिका,ब्रिटन, नाटो कडून त्या सैन्याला उत्तम प्रशिक्षण आणि उत्तम हत्यार पुरवलेली आहेत तरी ते तालिबान विरूद्ध लढताना दिसत नाहीत.सहज पराभव स्वीकारत आहेत.आणि सैन्याला दिलेली आधुनिक हत्यार तालिबान च्या हातात सूवत आहेत. अफगाणी सैन्य लढत च नाही. तालिबानी सर्व ग्रुप मिळून दोन लाख पण तालिबानी नाहीत.. तालिबान ला कोणी तरी नक्की मदत करत आहेत. अफगाणिस्तान नेहमी अशांत असावा ,तालिबान च्या ताब्यात असावा ह्या मध्ये मोठमोठ्या देशांचा अंतस्थ हेतू असावा . अशीच शंका येतेय . नाही तर दोन लाख असलेले आणि अत्याआधूनिक हत्यार पण जवळ नसलेल्या तालिबानी अतिरेक्यांना कधीच जमीनदोस्त केले गेले असते.

अमेरिकन सैनिक 20 वर्ष तिथे राहून आणि 1 ट्रेलियन डॉलर खर्च करून पण तालिबान ला हरवू शकले नाही, यातच सर्व काही आले.

In reply to by टीकोजीराव

अमेरिकन सैन्य हे जगातले सर्वात ताकदवान सैन्य आहे. त्यांचे सैनिक सर्वात जास्त अनुभवी, स्कील्ड, सामानाचा भरपूर पुरवठा केले जाणारे आणि सर्वात जास्त disciplined आहेत. पण बहुधा राजकीय पाठिंबा नसावा. जेणेकरून सैन्याचे हात बांधले गेले असावेत. तुम्हाला परकीय देशात आक्रमणकारी नाही असं दाखवायचं असेल तर तुमच्यावर बरीच बंधने येतात. अफगाणिस्तान हा एक धर्मशाळा प्रदेश आहे जिथे टोळीवाले, वेगवेगळ्या जमाती, त्यांचे वेगवेगळे अंतःस्थ उद्देश आणि एकमेकांबद्दल मुळातच वैर आहे. अमेरिकेशिवाय ते एकत्र राहणे अवघड आहे. मुळात हा देश असाच होता. त्यांना कोणीही वल्लभभाई पटेल मिळाला नाही. अमेरिकेच्या अथक प्रयत्नानंतर ही अफगाण सैन्याला आपण आपल्या देशासाठी लढतोय असं वाटत असण्याची शक्यता कमी आहे, कारण आक्रमणकारी त्यांचेच भाईबंद आहेत आणि मानसिकदृष्ट्या सबळ आहेत. हे कधी तरी होणारच होतं. अमेरिकेच्या राजकीय नेतृत्वाने मात्र आपली पुरती नाचक्की जगात करून घेतली आहे.

In reply to by टीकोजीराव

सहज तालिबानी अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या असत्या हे स्वच्छ आहे. पण कुठे तरी पाणी मुरत आहे. अत्याधुनिक हत्यार ,अत्याधुनिक टेहळणी यंत्रणा,पैश्याचा पुरवठा,हा बाबतीत अफगाणी खूपच मागास आहेत. कोणावर तरी अवलंबून आहेत. पण हे मदत करणारे नक्की कोण? पाकिस्तान असा पण भिकारी देश आहे त्यांची इतकी कुवत नाही. बलाढ्य देशांचा तालिबानी लोकांना मर्यादित support असण्याची शक्यता जास्त आहे. तालिबानी नी मर्यादा ओलांडून रशिया,अमेरिका,ब्रिटन ,चीन ,अशा बलाढ्य देशांना जेव्हा नुकसान पोचवेल त्या नंतर एका तासात च अफगाणिस्तान जगाच्या नकाशावर नसेल. राख करून टाकतील हे देश. आशिया हा नेहमीच अस्वस्थ असावा अशी इच्छा खूप रथी महा रथी न ची सुप्त इच्छा आहे. आणि हेच कारण आहे तालिबान अस्तित्वात अजुन असण्याचे.