✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
गुरुवार, 08/05/2021 - 14:51  ·  लेख
लेख
उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या सरचिटणीस आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या कन्या आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भगिनी प्रियांका वाद्रा यांना मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. एक तर राहुल किंवा प्रियांकांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार घोषित करा हा आग्रह प्रशांत किशोरने २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेसही धरला होता. तो त्यावेळी पूर्ण केला गेला नव्हता पण यावेळी तसे होत आहे असे दिसते. प्रियांकांनी २०१७ पर्यंत केवळ आपल्या आईच्या रायबरेली आणि भावाच्या अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भागातच प्रचार केला होता. २०१७ मध्येही या लोकसभा मतदारसंघांच्या भागात असलेल्या १० पैकी अवघ्या २ जागा काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रियांकांवर राज्याच्या पूर्व भागातील मतदारसंघांमध्ये प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. मागच्या वर्षी लॉक डाऊनच्या दरम्यान काँग्रेस पक्षातर्फे इतर राज्यात अडकलेल्या मूळच्या उत्तर प्रदेशातील मजुरांना राज्यात परत आणायला म्हणून शेकडो बस आणल्या पण त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सरकारने राज्याच्या सीमेवर अडवून ठेवल्या असा दावा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला. त्या तथाकथित बसपैकी अनेक अस्तित्वात नव्हत्या तर अनेक नंबर प्लेट दुचाकींचे होते हे नंतर स्पष्ट झाले. असल्या नौटंकीवर पक्षाच्या रायबरेलीच्या आमदार अदिती सिंग यांनी प्रियांकांवर टीका केली. त्यानंतर अदिती सिंगना पक्षाने काढून टाकले. आता कदाचित २०२४ मध्ये अदिती सिंग भाजपकडून रायबरेली लोकसभा मतदारसंघातून सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशात स्वतः सोनिया गांधींची रायबरेली वगळता एकही दुसरी जागा मिळाली नव्हती. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ४ दिवसांनी म्हणजे २७ मे २०१९ रोजी नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त लखनौच्या प्रदेश पक्ष कार्यालयात कार्यक्रम झाला होता त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण द्विवेदी यांनी राहुल-प्रियांकांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर रामकृष्ण द्विवेदींना तडकाफडकी पक्षातून काढून टाकले गेले. रामकृष्ण द्विवेदी हे हाडाचे काँग्रेसवाले होते. जानेवारी १९७१ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग यांच्याविरोधात गोरखपूर जिल्ह्यातील मनीराम विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवली होती आणि त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांपेक्षा दुप्पट मते मिळवून मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आणि खळबळ उडवली. त्यांनी कधीही पदाचा लोभ ठेवला नाही आणि केवळ पक्षाचेच काम केले. जवळपास ८८ वय असलेल्या रामकृष्ण द्विवेदींना प्रियांका-राहुलच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला हे महान पातक केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही आठवड्यातच रामकृष्ण द्विवेदींना कॅन्सरचे निदान झाले. पूर्ण जन्म काँग्रेसमध्ये घालवलेल्या द्विवेदींना आयुष्याच्या शेवटी पक्षातून काढून टाकले गेलेले जिव्हारी लागले. शेवटी मरताना तरी मला काँग्रेसवाला म्हणूनच मरू द्या अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर त्यांना पक्षात घेण्यात आले पण त्यांना काढले ही चूक झाली याविषयी चकार शब्द न बोलता त्यांना दुर्धर आजार झालेला असल्याने दया दाखवायला पक्षात घेतले गेले आहे अशाप्रकारचे स्टेटमेन्ट पक्षाकडून काढले गेले होते असे वाचल्याचे आठवते. त्यानंतर काही दिवसातच- २०२० मधील लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी चार दिवस रामकृष्ण द्विवेदींचे निधन झाले. तर अशा आहेत प्रियांका वाद्रा. त्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर प्रदेशात काय होते हे बघायचे. Priyanka
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51627 वाचन

💬 प्रतिसाद (163)

प्रतिक्रिया

तोल गेलाय का डॉ. खरे तुमचा?

सर टोबी
Sat, 08/07/2021 - 19:52 नवीन
ती लिस्ट तुम्हीच दिली आहे ना? निदान संस्था निर्माण केल्या याचे श्रेय द्यायला फार जड जाते का? लगोलग मोदींनी निर्माण केलेल्या संस्था सांगा बरं. आता जरा इतर नावांकडे वळू या. विक्रम साराभाई यांच्या नावाचे अंतरीक्ष संशोधन संस्था, तारापूरचं अनु संशोधन केंद्र. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईतील शामाप्रसाद मुखर्जी चौकाचे नाव बदलेलं नाही याची पण नोंद घ्यावी. मोदींना अरे तुरे केल्यावर तुम्हाला राग येतो. भारताच्या तीन माजी पंतप्रधांनां हलकट असे म्हणताना लाज वाटली नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माजी पंतप्रधानांना हलकट

सुबोध खरे
Sat, 08/07/2021 - 20:45 नवीन
माजी पंतप्रधानांना हलकट म्हणणे ही माझी चूक झाली. मला केवळ स्वतःचेच गोडवे गाणाऱ्या काँग्रेसी संस्कृतीला हलकट म्हणायचं होतं. क्षमस्व लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

ज्यांनी भारताला आर्थिक

सुबोध खरे
Sat, 08/07/2021 - 21:15 नवीन
ज्यांनी भारताला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढलं त्या श्री नरसिम्ह राव यांची "नाही चिरा नाही पणती" अशी स्थिती करणाऱ्या गांधी खानदानाची जितकी आरती ओवाळावी तितकी कमी आहे. आणि ज्या राजीव गांधींनी देशाला अशा अरिष्टात आणून ठेवलं त्यांना मरणोत्तर भारतरत्न दिलं गेलं आणि केवळ मोदी द्वेषापायी त्या खानदानाचीच तळी उचळणार्या मिपावरील दिगगजांचे कौतुक ही जितके करावे तितके थोडे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

राजीव गांधी नाव दिसले की १९८४

श्रीगुरुजी
Sat, 08/07/2021 - 21:22 नवीन
राजीव गांधी नाव दिसले की १९८४ मधील हजारो शिखांचे हत्याकांड, शहाबानो, बोफोर्स, पाणबुड्या, भोपाळ दुर्घटना, श्रीलंकेत मारले गेलेले १२०० भारतीय सैनिक याच गोष्टी आठवितात. खेळांचा व त्यांचा दुरूनही संबंध नव्हता. तरीसुद्धा खेलरत्न पुरस्काराला कोणत्याही खेळाडूचे नाव न देता राजीव गांधींचे नाव दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

क्या बात करते श्रीगुरुजी,

अनन्त अवधुत
Tue, 08/10/2021 - 02:25 नवीन
तुम्हीच दिलेल्या उदाहरणांवरून सिद्ध होते कि ते चांगले खेळाडू होते. ह्या देशाच्या राजकारणाचा, समाजकारणाचा, प्रशासनाचा, न्यायव्यवस्थेचा, सैन्याचा त्यांनी कसा खेळखंडोबा केला. आणि म्हणून त्यांच्या नावाने खेळक्षेत्रातील पुरस्कार दिला जात होता. पण मोदींना काही ते पाहवले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आहे त्या बंद पाडून?

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 08/09/2021 - 05:14 नवीन
;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

महाराष्ट्रात मागील २०

श्रीगुरुजी
Sat, 08/07/2021 - 14:35 नवीन
महाराष्ट्रात मागील २० महिन्यात बाळासाहेब ठाकरे नाव असलेल्या किमान १० योजना सुरू केल्या आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजून अनेक वर्षे लागणार आहेत. पण त्यालाही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. नवी मुंबई विमानतळ २०२४ पूर्वी होण्याची अजिबात शक्यता नाही. परंतु त्यासही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे. कॉंग्रेसकडे नाव देण्यासाठी किमान ३ नावे आहेत. चिवशेणाकडे फक्त एकच नाव आहे. त्यामुळे तेच नाव सगळीकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

महाराष्ट्रात मागील २०

श्रीगुरुजी
Sat, 08/07/2021 - 14:45 नवीन
महाराष्ट्रात मागील २० महिन्यात बाळासाहेब ठाकरे नाव असलेल्या किमान १० योजना सुरू केल्या आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजून अनेक वर्षे लागणार आहेत. पण त्यालाही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. नवी मुंबई विमानतळ २०२४ पूर्वी होण्याची अजिबात शक्यता नाही. परंतु त्यासही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे. कॉंग्रेसकडे नाव देण्यासाठी किमान ३ नावे आहेत. चिवशेणाकडे फक्त एकच नाव आहे. त्यामुळे तेच नाव सगळीकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आवांतर . .

सुक्या
Sat, 08/07/2021 - 14:53 नवीन
चालु घडामोडी आता मोदींवर घसरल्याणे चर्चा भरकटल्याचे पातक डोक्यावर घेउन लिहितो. आज समाजमाध्यमांवर फिरत २ व्हीदीयो क्लिप पाहिल्या. दोन्ही क्लिप मोदींनी केलेल्या दुरभाष संभाषणाच्या आहेत. त्यातली एक पुरुष होकी संघाला विजयी झाल्यावर व दुसरी महिला होकी संघाला पराभुत झाल्यावरची आहे. त्या दोन्ही संभाषणात एका देशाचा पंतप्रधान खेळाडुंचे मनोबल वाढवण्यात किती प्रयत्न करु शकतो याचे उदाहरण आहे. त्यातही मोदी खेळाडुंच्या सतत संपर्कात होते असेही जाणवते. एका खेळाडुच्या आयुष्यात "जिंकल्यावर पाठीवर पडलेली थाप" व "हरल्यावर केलेली सांत्वना" किती महत्वाच्या असतात हे एक खेळाडुच जाणतो. त्यामुळे खेळाडुला दिला जाणारा पुरस्कार खेळाडुच्या नावेच असावा म्हणुन जर पुरस्काराचे नाव बदलले असेल तर त्यात वावगे काहीही नाही. बाकी ज्याला यात फक्त नाव बदललेले दिसते आहे त्याला काहीही करु शकत नाही. No one can make Everybody happy.
  • Log in or register to post comments

त्या हाॅका संघांना स्पाॅन्सर

अमरेंद्र बाहुबली
Sat, 08/07/2021 - 15:30 नवीन
त्या हाॅका संघांना स्पाॅन्सर ओरीसा ह्या राज्याने केले होते. क्रेडीट पटनायक हियानी घ्यायला हवे होते, पण दुसर्याचं श्रेय लाटनारच मी मग काहीही होवो. चर्चा नेहरू, ईंदिरा गांधी ह्यांच्यावर घसरली तर चालेल पण मोदींलर घसरू नये बरका मिपाकरानो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

चर्चा

सॅगी
Sat, 08/07/2021 - 15:53 नवीन
नेहरू, ईंदिरा गांधी ह्यांच्यावर घसरली नाही पाहीजे...पण मोदीजींच्या कोट, दाढी यांच्यावर मात्र जरूर घसरली पाहीजे बरंका विरोधकांनो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

दाढीवाढवून ही काय मिळाले??

अमरेंद्र बाहुबली
Sat, 08/07/2021 - 15:59 नवीन
दाढीवाढवून ही काय मिळाले?? निवडणूकीत हार आणी कार्यकर्त्याना मार. खीक्क.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

घसरले परत...

सॅगी
Sat, 08/07/2021 - 16:09 नवीन
खिक्क... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ह्यात निरज चोप्रांनी

अमरेंद्र बाहुबली
Sat, 08/07/2021 - 18:47 नवीन
ह्यात निरज चोप्रांनी मिळवलेल्या पदकाबद्दल मोदीजींचे आभार व्यक्त करायचे पाहीले होते सुक्या जी विसरल्यीने मी व्यक्त करतो. ;) हर हर मोदी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

आयएसआय एजंट गुलाम नबी फाई ला हाकलले

निनाद
Sat, 08/07/2021 - 15:42 नवीन
भारत सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त, ५ ऑगस्ट रोजी वॉशिंग्टन डीसी मधील भारतीय दूतावासासमोर आयएसआय एजंट गुलाम नबी फाई यांने निदर्शने केली. तथापि, भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी निदर्शकांना काही भाव दिला नाही. त्यांना दूतावासातून परत पाठवले. फाई ला बहुदा निदेन द्यायचे अव्सावे. पण दूतावासाने काही कागदपत्रे स्वीकारण्यास नकार दिला आणि त्याला हाकलून दिले. मोदी सरकार २०१४ मध्ये आल्यापासून अमेरिकेतील भारतीय दूतावासाने कडक धोरण स्विकारले आहे व असल्या प्रकारांना थारा दिलेला नाही. ISI कडून ३.५ दशलक्ष डॉलर्सचे हस्तांतरण लपवल्याबद्दल फाईला जुलै २०११ मध्ये व्हर्जिनिया येथून अटक करण्यात आली होती आणि हा माणूस तुरुंगाची वारी करून आलेला आहे.
  • Log in or register to post comments

कागदपत्रे स्वीकारायला नकार

रावसाहेब चिंगभूतकर
Mon, 08/09/2021 - 11:08 नवीन
कागदपत्रे स्वीकारायला नकार दिला म्हणजे हा माणूस दूतावासाच्या आत आला होता? आणि त्याला परत जाऊ दिला? दूतावासाची जमीन ज्या देशाचा दूतावास असतो त्याची असते आणि त्याचे कायदे आणि त्याचे मिलिटरी रुल्स तिथे चालतात ना? मग संरक्षणासाठी असणाऱ्या एखाद्या सैनिकाला याचा गळा चिरणे काय अशक्य होते? भारताने अशा प्रकारचे उद्दाम प्रदर्शन करायला सुरुवात करायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

मोजुन १५ लोकं होती . .

सुक्या
Mon, 08/09/2021 - 12:04 नवीन
मोजुन १५ लोकं होती . . दुतावासाच्या कर्मचार्‍याने स्पष्ट शब्दात "मी हे घेणार नाही .. पाठवायचे असेल तर पोष्टाने पाठवा म्हणुन बोळवण केली" दरवाज्याच्या बाहेरच ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

लडाख पर्यटकांना इनर लाइन परमिट घेण्याची गरज नाही!

निनाद
Sat, 08/07/2021 - 15:50 नवीन
जम्मू -काश्मीरमधील कलम 370 च्या तरतुदी रद्द केल्यामुळे आणि लडाखच्या रूपात स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण झाल्यामुळे लोकांना बदल दिसू लागले. लडाखमध्ये प्रवास करण्यासाठी पर्यटकांना आयएलपी (इनर लाइन परमिट) घेण्याची गरज नाही हा आदेश लडाखच्या उपराज्यपाल कार्यालयाने दिला आहे. यासह, लेफ्टनंट गव्हर्नर आर के माथूर यांनी लडाख पोलिसांच्या 'टूरिस्ट विंग' ची स्थापना केली. पोलिसांची ही शाखा पर्यटकांशी संबंधित समस्यांकडे लक्ष देईल आणि त्याचबरोबर पर्यटकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे काम करेल. पर्यटकांना कोणतीही वैद्यकीय आणीबाणी असल्यास किंवा ते कुठेतरी अडकले तर लडाख पोलिसांचे 'टूरिस्ट विंग' त्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने मदत करेल. त्यांना पर्यटक आणि पर्यटन संस्थांशी संवाद साधण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
  • Log in or register to post comments

प्रथम गोल्ड मेडल निरज चोप्रा.

अमरेंद्र बाहुबली
Sat, 08/07/2021 - 18:24 नवीन
प्रथम गोल्ड मेडल निरज चोप्रा.
  • Log in or register to post comments

राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार चे नाव बदलेले

Rajesh188
Sat, 08/07/2021 - 21:48 नवीन
ह्या वर कोणाचाच तीव्र आक्षेप नाही अगदी काँग्रेस चा पण नाही.उगाच नाव बदललं म्हणून विरोध होतोय असे वातावरण तयार करण्यात काही अर्थ. नाही. कोणी विरोध करत नाही.
  • Log in or register to post comments

आयत्या पिठावर रेघोट्या ???

सुक्या
Mon, 08/09/2021 - 02:55 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/tokyo-olympic-maharashtra-cm-uddhav-thackeray-call-to-gold-medalist-neeraj-chopra-sgy-87-2556776/ "मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो" असे एक राजकीय नेते म्हणाले आहेत. बाकी मराठ्यांचा संबंध इथपर्यंत आहे हे मल माहीत नव्हते. महाराष्ट्र शासनाने नीरज चोप्रा यास १२ कोटी रुपये (हरियाना पेक्षा जास्त असावे. आम्हाला अभिमान डबल आहे) बक्षिस म्हणौन द्यावे असे सुचवतो. सत्कार पण करणार आहेत म्हणे.
  • Log in or register to post comments

मराठा

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 08/09/2021 - 05:12 नवीन
महाराष्ट्रातून बाहेर गेल्यावर खरच इतिहास रचतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

महालोल

चंद्रसूर्यकुमार
Mon, 08/09/2021 - 08:25 नवीन
नीरज चोप्राने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले म्हणून भारतातील एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने अभिनंदनाचा फोन करणे समजू शकतो. पण तो रोड मराठा आहे म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने अभिनंदनाचा फोन करणे हे अगदीच महालोल वाटले. रोड मराठा म्हणजे पानिपतच्या युध्दाच्या वेळी महाराष्ट्रातून उत्तरेत गेलेले पण युध्दानंतर तिथेच राहिलेल्या मराठ्यांचे वंशज. नीरज चोप्राचे काही पिढ्यांपूर्वीचे पूर्वज महाराष्ट्रात राहात होते म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला अभिनंदनाचा फोन केला. मानवजातीची सुरवात आफ्रिकेत झाली ना? मग त्याच न्यायाने आफ्रिकेच्या सगळ्या देशांच्या अध्यक्षांनी सतत कोणालातरी अभिनंदनाचे फोन करायला फोनशेजारीच बसायला हवे. जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांचे अनेक पिढ्यांपूर्वीचे पूर्वज आफ्रिकेत होते म्हणून जो चे अभिनंदन नको करायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

मंजव प्राणी निर्माण झाला

Rajesh188
Mon, 08/09/2021 - 08:58 नवीन
मानव प्राणी निर्माण आफ्रिकेत झाला असे इथे काही सभासद सांगत असतात.पण तेव्हा आफ्रिका खंड कुठे होता हे मात्र सांगत नाहीत. अर्थवट माहिती देवू नये ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

नावडतीचे मीठ अळणी

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/09/2021 - 09:09 नवीन
नावडतीचे मीठ अळणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

खरयं.

सुक्या
Mon, 08/09/2021 - 11:26 नवीन
खरयं. यश मिळाले की नातेवाईक वाढतात तसे आहे हे. जात / पात काढुन मग तो कसा आपला आहे वगेरे वगेरे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

"मराठा गोष्टी सांगत नाही, तर

श्रीगुरुजी
Mon, 08/09/2021 - 09:07 नवीन
"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो" असे एक राजकीय नेते म्हणाले आहेत. "फक्त एक दिवस पंतप्रधान करा. चोवीस तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवितो." अशी गोष्ट एका मराठ्याने सांगितली होती. पण पूर्ण हयातीत इतिहास काही रचला नाही. शेवटी एका गुजराती माणसाने कोणतीही गोष्ट न सांगता इतिहास रचला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

शेवटी एका गुजराती माणसाने

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/09/2021 - 09:10 नवीन
शेवटी एका गुजराती माणसाने कोणतीही गोष्ट न सांगता इतिहास रचला.>>>> कोणतीही गोष्ट न सांगता?? खरं??;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काश्मीर प्रश्न सुटला!!!!!!

Rajesh188
Mon, 08/09/2021 - 09:26 नवीन
काश्मीर प्रश्न सुटला,कधी? कोणालाच कसे माहीत नाही. शेवटी ही गुप्त बातमी mipa वर माहीत पडली. मग रोज तिथे निरपराध सैनिकांचे रोज बळी जात आहेत त्याचे काय कारण आहे. प्रश्न सुटला तर हल्ले का होत आहेत अजुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हल्ले अजिबात बंद झाले आहेत.

सुबोध खरे
Mon, 08/09/2021 - 09:41 नवीन
हल्ले अजिबात बंद झाले आहेत. पत्रकारच रचून खोट्या बातम्या देत आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

"मराठा गोष्टी सांगत नाही, तर

श्रीगुरुजी
Mon, 08/09/2021 - 10:27 नवीन
"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो" असे एक राजकीय नेते म्हणाले आहेत. जे ५-६ डिसेंबरच्या थंडीत आपल्या मुंबईतील घरात उबदार पांघरूणात गाढ झोपले होते, ते आम्हीच हातोडे घालून बाबरी पाडली अशी गोष्ट सांगत फिरत असतात. पण त्यांनी इतिहास काही रचला नाही. तो इतिहास रचला दुसऱ्यांंनीच. म्हणजे एका अर्थी गोष्टी न सागणाऱ्यांनीच इतिहास रचला आणि विनोदी फुशारक्या आय मीन गोष्टी सांगणाऱ्यांना कधीच इतिहास रचता आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

आयत्या पिठावर रेघोट्या ..

सुक्या
Mon, 08/09/2021 - 11:16 नवीन
आयत्या पिठावर रेघोट्या .. "जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे" असे बोलले होते ... यात ठळक केलेल्या शब्दांना खुप महत्त्व आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कल्पना चावला

Rajesh188
Mon, 08/09/2021 - 09:56 नवीन
कल्पना चावला ला भारतीय वंशाची म्हणजे भारतीय च असे दावे केले जायचे तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. अमेरिके ची vice-president कमला हॅरिस हिला पण भारतीय म्हणून गुणगान गायले जात होते तेव्हा आफ्रिका कोणाला आठवला नाही. पण ठाकरे सरकार नी नीरज ला मराठा असे संबोंधित केले की लगेच आक्षेप. हेच वाक्य फडणवीस बोलले असते तर कोणी आक्षेप घेतला नसता. अमेरिकेत इतके डॉक्टर भारतीय आहेत असे जेव्हा फेकले जाते तेव्हा आफ्रिका आठवत नाही. जे अमेरिकेत गेले तिथे स्थायिक झाले ते अमेरिकन च आहेत ते पण स्वतःला भारतीय म्हणत नसतील.
  • Log in or register to post comments

ऊध्दव ठाकरेनी भाजपचे पुन्ही

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/09/2021 - 10:46 नवीन
ऊध्दव ठाकरेनी भाजपचे पुन्ही राज्य बळकावण्याचे स्वप्न धुळीस मिळवल्याच्या रागातून वरील प्रकार घडत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मुदलात घोळ आहे साहेब तुमच्या

सुक्या
Mon, 08/09/2021 - 11:12 नवीन
मुदलात घोळ आहे साहेब तुमच्या .. (सगळीकडे घोळ्च असतो .. पण ते जौ दे) एखाद्याला भारतीय वंशाचे म्हणणे आणी एखाद्याला जात, पात, पंथ, धर्म यात गोवुन आम्ही कसे मोठे असे करणे यात जमीन आस्मात इतका फरक आहे. कमला हॅरिस स्वतः ला भारतीय वंशाची पण म्हणत नाही ... ती स्वतःला अफ्रिकन अमेरिकन म्हणवते. बाकी नीरज चोप्रा महाराणा प्रताप यांचा वंशज आहे असेही काही महाभाग बोलत आहेत. तेही असेच महालोल आहेत. कालपरवा पर्यंत नीरज चोप्रा कोण हे पण कित्येकांना माहीत नव्हते. आज लगेच चालले बादरायण संबंध जोडायला .. जौ दे.. ज्याची त्याची जाण ... ज्याची त्याची समज ... तुम्ही टेंशन नका घेउ ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

अन्याय

चंद्रसूर्यकुमार
Mon, 08/09/2021 - 11:35 नवीन
पण मी काय म्हणतो- प्रिती झिंटा पण रोड मराठा आहे ना? मग तिचा कोई मिल गया किंवा कल हो ना हो ला बर्‍यापैकी प्रतिसाद मिळाल्यावर किंवा किंग्ज ११ पंजाबची टीम घेतल्यावर म्हाराष्ट्राचा अभिमान असलेल्यांनी तिला फोन केला होता ना? मान्य आहे की चित्रपट चालणे हे ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळण्यापेक्षा बरीच कमी कामगिरी आहे. मग मातोश्रीमधून फोन गेला नाही तरी एखाद्या नेत्याने/उपनेत्याने/शाखाप्रमुखाने/नगरसेवकाने किंवा गेलाबाजार सतरंज्या उचलणार्‍या एखाद्या कार्यकर्त्याने तरी तिला अभिनंदनाचा फोन केला होता का? आताच बघितले की २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा मनोज कुमार हा पण रोड मराठा आहे. त्याला मातोश्रीमधून फोन गेला होता का? नसेल तर हा अन्याय आहे- खूप मोठा अन्याय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

ज्जे बात !!

सुक्या
Mon, 08/09/2021 - 11:49 नवीन
ज्जे बात !! आता ते प्रिती झिंटा / मनोज कुमार हे रोड मराठा नाहीत हे सिद्ध करतील . . . :-) (२०१० मधे मनोज कुमारला फोन करु नका असे मोदींनी सांगितले होते असे आमच्या गावातला एक पत्रकार सांगत होता. नक्की कोणते मोदी ते काय त्याला माहीत नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

गेला बाजार प्रियांका

श्रीगुरुजी
Mon, 08/09/2021 - 14:12 नवीन
गेला बाजार प्रियांका चतुर्वेदी या भय्यीणीऐवजी प्रीति झिंटाला तरी राज्यसभेची खासदारकी द्यायची. आम्ही मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढतो असा डंका पिटता आला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

यशाचे अनेक बाप असतात

सुबोध खरे
Mon, 08/09/2021 - 12:06 नवीन
यशाचे अनेक बाप असतात आणि अपयश अनौरस असतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

अडचण काय आहे

Rajesh188
Mon, 08/09/2021 - 13:04 नवीन
रोड मराठा आहेत. रोड मराठा ही दंत कथा नाही पानिपत चे युद्ध सत्य आहे पराजय सत्य आहे. पराजित पानिपत मध्ये च राहिले हे सत्य आहे. पेशवाई अस्तित्वात होती हे सत्य आहे. हे सर्व असत्य आहे असे कबूल करा . आणि नंतर ह्या विषयावर विरोधी मत व्यक्त करा. तुम्ही मान्य केले की बाजीराव हा कोणी पेशवा अस्तित्वातच नव्हता. मराठी साम्राज्य च्या फौजेने कधी पानिपत मध्ये युद्ध केलेच नाही. सर्व बकवास आहे. असे आम्ही म्हणायला मोकळे होवू.
  • Log in or register to post comments

नीरज चोप्रा हा मूळचा मराठा

श्रीगुरुजी
Mon, 08/09/2021 - 14:20 नवीन
नीरज चोप्रा हा मूळचा मराठा असल्याने आम्ही महाराष्ट्रात बोलावून त्याचा सत्कार करणार असे मराठा क्रांती मोर्चाने सांगितलेय. नीरज चोप्रा मूळचा धनगर आहे असे महाराष्ट्रातील धनगर सांगताहेत. तो मूळचा वैश्य आहे, ब्राह्मण आहे असे शोध लागत आहेत. नीरज चोप्राने महाराष्ट्रात येऊन या मूर्खपणात सहभागी होऊ नये.
  • Log in or register to post comments

नीरज चोप्राने महाराष्ट्रात

शलभ
Mon, 08/09/2021 - 15:23 नवीन
नीरज चोप्राने महाराष्ट्रात येऊन या मूर्खपणात सहभागी होऊ नये.
+१११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खर आहे.

लिओ
Mon, 08/09/2021 - 15:40 नवीन
महस 40 करोड डॉलर्स के लिये भारत को अपना सोना और अपना आत्मसम्मान गिरवी रखना पडा था! उसके बारे मे कभी आपने पढा था की इसका जिम्मे दार कौन है? बस यही पढाया गया की डॉ मनमोहन सिंह ने भारत की आर्थिक खाई से बाहर निकाला! (श्री नरसिम्ह राव को श्रेय नही दिया गया) मगर देश को आर्थिक खाई मे किसने धकेला यह कही नही बताया जाता! ____________________________________________- खरे साहेब खरे आहे कि
महस 40 करोड डॉलर्स के लिये भारत को अपना सोना और अपना आत्मसम्मान गिरवी रखना पडा था!
तुमचा आणि अंधभक्तांचा प्रश्न काय आहे कळत नाहि. काँग्रेसचे अवगुण गाऊन भाजपाला तुम्हि चांगले बोलणे सोपे , काँग्रेसचे एखादे चांगले काम सांगितले तर गांधी घराण्याला असभ्य व्यक्तिसारखे टोंमणे मारणे तर त्याहुन सोप्पे. विक्रम साराभाई यांच्या नावाचे अंतरीक्ष संशोधन संस्था, तारापूरचं अनु संशोधन केंद्र हे काँग्रेसने उभारलेले थोतांड आहे. काँग्रेस काहि करत नाहि....... आता आपण ४० करोड वर बोलु १९८९-९० किंवा १९९०-१९९१ मध्ये काँग्रेस सरकारने ४० करोड डॉलर्स साठी सोने आणि आत्मसन्मान गहाण ठेवले, हे खरे आहे. तुम्ही स्वतः भारतीय नौदलात काम केले आहे, तुम्हास संरक्षण क्षेत्रासंबंधात काहि सविस्तर बोलु शकता. मग मला सांगा IOCL HPCL BPCL सारख्या तेलकंपन्या १९७१ च्या युध्दानंतर सरकारकडुन ( काँग्रेस सरकार) का स्थापन झाल्या ??? १९८९-९० किंवा १९९०-१९९१ मध्ये काँग्रेस सरकारने ४० करोड डॉलर्स साठी जे सोने गहाण ठेवले ते भाजपाने तर नक्किच परत आणले नाहि त्यासाठी मनमोहन सिंगानी प्रयत्न केले, ( तुमच्या " डॉ मनमोहन सिंह ने भारत की आर्थिक खाई से बाहर निकाला" या वाक्यावरून मी बोलत आहे.). आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावा हे तुमच्या सारखा अंधभक्त नक्कीच सांगेल ? आत्मसन्मान काँग्रेस सरकारने ४० करोड डॉलर्ससाठी सोने गहाण ठेवुन तुमच्या आत्मसन्मानाला नक्किच ठेच पोहोचवली असणार पण कोरोना काळात परमभक्त मोदिभक्त रामदेवबाबाने जे अ‍ॅलोपैथिक डॉ़क्टरांवर अपमानजनक वक्तव्य केले ज्यामुळे IMA कोर्टात गेले त्या वक्तव्याने तुमचा आत्मसन्मानाला निश्चित ठेच लागली नसणार. असो लोभ असावा
  • Log in or register to post comments

आज मोदि सरकार वर्षाला १०६६३

रावसाहेब चिंगभूतकर
Mon, 08/09/2021 - 16:49 नवीन
आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावा हे तुमच्या सारखा अंधभक्त नक्कीच सांगेल ?
सरकार या कंपनी ला disinvest करणार आहे. थोडक्यात सांगायचे तर भारत सरकार या कंपनी मधले स्वतः चे शेअर्स स्टॉक मार्केट वर विकेल. मी स्वतः सुद्धा इन्व्हेस्ट करणार आहे. माझ्याप्रमाणे लाखो रिटेल इन्व्हेस्टर्स पण शेअर्स विकत घेतील. थोडक्यात सांगायचे तर ही कंपनी नंतर जो फायदा देईल तो सरकारपुरता मर्यादित न राहता तो सामान्य जनतेला डिव्हिडंड म्हणून पण मिळेल. फक्त disinvestment म्हणजे काय हे न कळणारे आणि तो घ्यायला न परवडणारे मरगट्टे जिओ चे सिम वापरून मिसळपाव सारख्या sites वर सरकारला शिव्या देत पुढच्या disinvestment ची शिव्या देण्यासाठी वाट पहात राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिओ

कायच्या काय

Rajesh188
Mon, 08/09/2021 - 16:59 नवीन
कायच्या काय पोस्ट.तुम्ही काय शेअर विकत घेणार ? जोक करताय काय. शेअर मित्र च विकत घेणार आणि तुमच्या सारख्या अंध लोकांना सर्व मिळून १टक्का पण भागीदारी मिळणार नाही. मंदिरा समोर अंध भिकारी व्यक्ती ना पन्नास पैसे भीक म्हणून दिले जातात त्या प्रमाणे. Jio जिवंत आहे कारण मोदी मित्र आहेत. बाकी काही कारण नाही. म्हणून व्होडाफोन , idea' चे खच्ची करणं भारताचे दिव्य सरकार करत आहे. दूरसंचार क्षेत्रात भारताचे दरवाजे पूर्ण उघडे करा jio चे अस्तित्व पण शिल्लक राहणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

जीओ ला असे काय फुकट मिळते आहे

सुक्या
Tue, 08/10/2021 - 00:17 नवीन
जीओ ला असे काय फुकट मिळते आहे ते आईडीया किंवा व्होडाफोन ला मिळत नाही? जरा सवीस्तर सांगता काय? म्हणजे ग्राउंड लेवल ला काय फरक आहे. पोकळ कोस्परसी थेरी नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

फालतू आणि बिनबुडाची

रावसाहेब चिंगभूतकर
Tue, 08/10/2021 - 08:34 नवीन
फालतू आणि बिनबुडाची अर्ग्युमेंट्स करू नयेत असा नियम तुम्हाला लागू नाहीच. शक्यतो मी कुणाचे प्रबोधन करायला जात नाही. तरी पण या लिंक वर तुम्ही जे म्हणताय त्या संदर्भात माहिती आहे. https://www.kotaksecurities.com/ksweb/ipo/4-different-types-ipo-investors
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हा असा

चंद्रसूर्यकुमार
Mon, 08/09/2021 - 17:24 नवीन
आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावा
हा असा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिओ

@ लिओ

सुबोध खरे
Mon, 08/09/2021 - 20:27 नवीन
@ लिओ नफ्यातील सार्वजनिक तेल कंपन्यांचे खाजगीकरण हे निर्णय डॉ मनमोहन सिंह यानीच घेतलेले आहेत. मोदी सरकारला दोष देण्याच्या अगोदर मूलभूत अभ्यास तरी करून पहा कोणत्याही गोष्टीवर भाष्य करण्या अगोदर थोडं वाचून तरी पहा अन्यथा १८८ सारखा दिशाहीन गोळीबार होईल. Manmohan supports public sector disinvestment https://www.thehindu.com/business/Economy/Manmohan-supports-public-sector-disinvestment/article16887020.ece Cabinet clears disinvestment of 10 % in IOC It posted a net profit of Rs.5,005 crore in 2012-13, up from Rs.3,954 crore in the previous year. https://www.thehindu.com/business/Industry/cabinet-clears-disinvestment-of-10-in-ioc/article4978348.ece आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावा हे तुमच्या सारखा अंधभक्त नक्कीच सांगेल ? HPCL या कंपनीचे खाजगीकरण केलेले नसून ते ओ एन जी सी या सरकारी कंपनीलाच विकलेली आहे. बेफाट वक्तव्ये करण्याच्या अगोदर निदान थोडा तरी अभ्यास करत चला. आणि मला अंध भक्त म्हणण्याची आपली काय लायकी आहे? बाकी चाचा नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी यांनी स्वतःला भारत रत्न देण्यासाठी स्वतःच शिफारस केली आणि श्री राजीव गांधी याना आपले सरकार आल्यावर शिफारस केली ते हि बरोबरच आहे. बाकी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न देण्यासाठी गांधी घराण्याची तळी उचलणाऱ्या काँग्रेसला वेळ झाला नाही तो निर्णय श्री चंद्रशेखर यांच्या औटघटकेच्या सरकारला घ्यावा लागला आणि तो सुद्धा त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या ३४ वर्षांनी. आणि वल्लभभाई पटेल याना भारतरत्न देण्यासाठी ४१ वर्षे उजाडावी लागली आणि तो निर्णय सुद्धा श्री नरसिम्ह राव यांच्या सरकारने घेतला. गांधी घराण्याने नाहीच. राहिली गोष्ट भाभा अणुकेंद्र किंवा इसरो स्थापन केल्याची शेखी मिरवायची गरज नाही. तुमचा टिनपाट शेजारी सुद्धा अणु बॉम्ब बनवतो आणि इराणने पण आपला उपग्रह बनवलेला आहे. तेंव्हा काँग्रेसने यंव केलं त्यंव केलं असली डिंग मारणं हे भंपक पणाचं आहे. तिथे हुकूमशहा आला असता किंवा कम्युनिस्ट सरकार आले असते तरी त्यांनी हे केलंच असतं. कोणताही राज्यकर्ता आपल्या देशाचा थोडाफार तरी विकास करतोच. गांधी घराण्याने अशी कोणतीही क्रांती केलेली नाही. सोनं गहाण ठेवायची स्थिती येईपर्यंत दुर्लक्ष केलं हि मुळीच स्तुत्य गोष्ट नाही. काँग्रेसच्या काळातीलच नव्हे तर एकंदर भारताच्या इतिहासात श्री नरसिम्ह राव हे एक अत्यंत उत्कृष्ट पंतप्रधान होते यात शंका नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिओ

थोडी सुधारणा काँक्लुजनमधे

गॉडजिला
Mon, 08/09/2021 - 20:57 नवीन
एकंदर भारताच्या इतिहासात श्री नरसिम्ह राव हे एक अत्यंत उत्कृष्ट पंतप्रधान होते यात शंका नाही
श्री नरसिम्ह राव हे सर्वोत्कृष्टपंतप्रधान होते. गांधी घराण्याला पक्षात अवास्तव फुटेज द्यायची गरज काय आशा आशयाचे त्यांचें वक्तव्य देखील बाहेर आले होते सीताराम केसरीयांच्या सौजन्याने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा