✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

देव

अ — अनुस्वार, Wed, 05/05/2021 - 15:01
देव म्हणजे हवा, नाही अगरबत्तीचा सुगंध तो अन्नात आहे, उपवासात नाही. देव दानशूर मोठा, लाचार नाही न्यायी आहे देव, नवसाचा व्यापारी नाही. देव आहे सदाचारात, अन्यायाचा शत्रू देव मुहूर्त नाही, अनंत काळ आहे. देवही भक्त आहे, भावाचा भुकेला देव नाही खजिनदार-पुजारी. देव देवळात नाही फक्त, आहे सगळीकडे देव दाढीत नाही, शेंडीतही नाही. जीवन देव आहे, मृत्यूही तोच प्रचारात देव नाही, तो प्रकांड आहे. देव म्हणजे गंभीर गोष्ट माणूस त्याची गंमत करतो. गुलाबजाम जणू पाकातला हलवायाची व्याख्या करतो. देव म्हणजे साधा माणूस जरा अधिक जरा उणा. देव म्हणजे तुम्ही-मी आपल्या आईच्या नजरेतले.

प्रतिक्रिया द्या
4826 वाचन

💬 प्रतिसाद (6)

देव

कॉमी
Fri, 05/14/2021 - 17:17 नवीन
देव मदतीत, देव आहे परदुःखविनाषात देव नाही फुटीत, देव नाही द्वेषात देव आहे की नाही नक्की माहीत नाही, पण असला तर नक्की कॉमी आहे. ज्योक आहे बरका कॉमी निर्दालकहो. उगाच ईनोदाचा प्रतिवाद नका करत बसू. ;) कविता आवडली अनुस्वार यांची.
  • Log in or register to post comments

राम हृदय में हैं मेरे, राम ही

गॉडजिला
Sun, 05/16/2021 - 20:39 नवीन
राम हृदय में हैं मेरे, राम ही धड़कन में हैं राम मेरी आत्मा में, राम ही जीवन में हैं राम हर पल में हैं मेरे, राम हैं हर श्वास में राम हर आशा में मेरी, राम ही हर आस में राम ही तो करुणा में हैं, शान्ति में राम हैं राम ही हैं एकता में, प्रगती में राम हैं राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हाहा

कॉमी
Sun, 05/16/2021 - 21:14 नवीन
मी लिहिलेल्या टुकार ओळींचा सुद्धा दोन प्रकारे अर्थ लावता येतो ! भारीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

सहमत

अनुस्वार
Sat, 05/15/2021 - 21:25 नवीन
आपण सारे‌‌ विश्वाचे किंवा विश्व-निर्मात्याचे सूक्ष्मरूप आहोत.‌ त्यामुळे तुम्हालाही प्रणाम.
  • Log in or register to post comments

:)

कॉमी
Sat, 05/15/2021 - 21:46 नवीन
कॉमी म्हणजे "मी देव आहे" असे म्हणणे नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुस्वार

आररर...

अनुस्वार
Sat, 05/15/2021 - 22:43 नवीन
'कॉमी'चा अर्थ आपली वैयक्तिक माहिती पाहून‌ कळला. देव 'कॉमी' ही असेल नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा