Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 14/04/2021 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे. यासंबंधी एक इंग्लिश परिपत्रक मला सापडले. त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत कुणी समजावून सांगितला तर बरे होईल. युरोमेरिकेतील चर्चेस विकत घेऊन त्यांचे मशिदींत रूपांतर करणे यासंबंधित ही एक बातमी इथे दिसली. हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गुरुग्राममध्ये दिसून आला आहे. पाच राज्यांतील निवडणुका सुरु असल्या तरी माध्यमांचा रोख मुख्यतः बंगालवरच आहे असे दिसते. तथापि, तेलंगणातील नागार्जुनसागर या उप निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही महिन्यांत हैदराबाद पालिकेत मिळवलेल्या अभूतपूर्ण यशाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी तेरास आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे. या निवडणुकीत सगळ्याच पक्षांत झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष ठेऊन आहेत याची ही एक मजेशीर बातमी. अगदीच अनपेक्षित नव्हते, पण सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, बारावीच्या पुढे ढकलल्या. ... ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा.

वाचने 70447
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा. +१

सीबीएसई ने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावीचे प्रवेश कोणत्या आधारावर होणार समजत नाही. हा निर्णय नक्कीच वादग्रस्त ठरणार असून त्याला कोर्टात आव्हान दिले जाईल/ दिले पाहिजे. दुसर्‍या बाजूने विचार केला तर कोरोनाचे आकडे इतके वाढलेले असताना यापेक्षा वेगळे काय करता येणार होते हे पण समजत नाही. अकरावी प्रवेशासाठी प्रत्येक ठिकाणी काही टॉपची कॉलेजेस असतात तिथे प्रवेश मिळवायला विद्यार्थी धडपडत असतात. मुंबईत रूपारेल असे एक कॉलेज आहे. दरवर्षी रूपारेलमधील कित्येक विद्यार्थी १२ वी नंतर आय.आय.टीत दिसतील. कलकत्त्याचे प्रेसिडेन्सी कॉलेज असेच. या ठिकाणी नक्की कोणत्या आधारावर प्रवेश देणार की लकी ड्रॉ काढून सर्वांना समान संधी असा समाजवाद आणणार हे समजत नाही. एकूणच आता विद्यार्थी असलेले चुकीच्या वेळेस जन्माला आले असे म्हणायला हवे. महाराष्ट्रात ११ वी चे प्रवेश तसेच बोंबलले. २०२१ ची एम.बी.ए साठीची सी.ई.टी परीक्षा अजून झालेली नाही. इंजिनिअरींगच्या सी.ई.टीचे काय होत आहे कोणास ठाऊक. अजून एक वर्ष असेच जाणार का? आणि हे बोलायला ठिक वाटते पण पुढच्या वर्षी एकदम दुप्पट विद्यार्थी झाले तर सगळ्यांना प्रवेश मिळेल का? जुन्या पध्दतीत ११ वी एस.एस.सी होती पण १९७६ मध्ये १० वी एस.एस.सी करण्यात आली. त्यामुळे १९७६ साली जुनिअर कॉलेजला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची अशीच दुप्पट संख्या झाली होती असे मागे मनोगतवर वाचल्याचे आठवते. एकूणच सगळी परिस्थिती बिकट दिसते. यातून मार्ग कसा निघणार कोणास ठाऊक.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ही खरंच खूप जटील अन दूरगामी परिणाम करणारी समस्या आहे!

In reply to by चंद्रसूर्यकुमार

इंजिनियरिंग सी ई टी बारावी परीक्षेनंतर होईल..साधारण जुलै मध्ये. पण जे ई ई ठरल्याप्रमाणे झाल्या आहेत आणि पुढील दोन्ही होतील असे वाटते. त्यांचं आयोजन पाहिलं. खूप शिस्तीत चालू आहे. मेडिकल पदव्युत्तर प्रवेश चाचणी या रविवारी 18 एप्रिल रोजी होत आहे. व्यवस्थेला कशाही स्वरूपात डॉक्टर्स हवे आहेत म्हणून ही परीक्षा लांबणार नाही. एकूणच नियोजन असेल तर परीक्षा घेणे अवघड नाही.

In reply to by खेडूत

आयोजन व्यवस्थित होत असेल आणि तसे केले गेले तर चांगलेच होईल. पण जुलैत परीक्षा मग ऑगस्टमध्ये निकाल आणि त्यानंतर प्रवेश म्हणजे कॉलेज सुरू व्हायला ऑक्टोबर उजाडेल. त्यातही कॉलेज ऑनलाईन असेल ही शक्यताच जास्त. आय.टी वगैरे शाखांना ऑनलाईन-ऑफलाईन असले तरी फार फरक पडणार नाही. पण इतर अनेक शाखा अशा आहेत की त्यात ऑनलाईन कॉलेज कसे असेल याची कल्पना करवत नाही. इंजिनिअरींगमध्ये सीव्हीलच्या विद्यार्थ्यांना सर्व्हे करायला आलाच पाहिजे तो ऑनलाईन कसा करणार? मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना वर्कशॉप पण असेच महत्वाचे. इलेक्ट्रीकल-इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना सर्कीट जोडणीसाठी आता काही सॉफ्टवेअर आली आहेत असे ऐकले आहे. अर्थात माझी माहिती ऐकिवच आहे. माझ्यासारखे विद्यार्थी कॉलेजात जाऊनही फार दिवे लावतात असे नाही पण अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी अशा काही शाखांमध्ये कॉलेजात असणे सगळ्यात महत्वाचे असेल. एम.बी.ए कॉलेजांमध्ये क्लास पार्टीसिपेशन महत्वाचे असते आणि ग्रुप असाईनमेंट असतात. विद्यार्थी हे सगळे घरी बसून ऑनलाईन कसे करत असतील काय माहित. इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडच्या विद्यार्थ्यांना कार्गो जहाजे जा-ये करतात अशा कांडला वगैरे मोठ्या बंदराच्या तिथे घेऊन जातात आणि आठवडाभर बंदराचे काम कसे चालते हे त्यांना अभ्यासायचे असते. असे सगळे ऑनलाईन करता येणेच अशक्य. ऑनलाईन शिक्षणामुळे अशा काही अनुभवांना हे विद्यार्थी नक्कीच मुकत असतील.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पण ऑनलाईन परीक्षेचा मार्ग सीबीएसईने याबाबत विचारच केला नाही.आणि महाराष्ट्र बोर्डही असेच पावले उचलण्याची शक्यता आहे.

In reply to by Bhakti

ऑनलाईन परीक्षेचा मार्ग नाही निवडला तरी इथे कोणी कण्हत नाही. तेच राज्य सरकार नी केले असते तर बुध्दी तेजाचे अटॅक आले असते.

In reply to by Bhakti

NIOS बोर्डाने ऑफलाईन परीक्षेसाठी २४,००० चे कीट विद्यार्थी घेऊ शकतात ज्यामध्ये त्यांचा कॅमेरा वैगरे आहे,असे माझ्या एका विद्यार्थ्याने सांगितले.याविषयी मी जालावर शोधले पण दुवा सापडला नाही.

In reply to by Bhakti

NIOS बोर्डाने ऑफलाईन परीक्षेसाठी २४,००० चे कीट विद्यार्थी घेऊ शकतात ज्यामध्ये त्यांचा कॅमेरा वैगरे आहे,असे माझ्या एका विद्यार्थ्याने सांगितले.याविषयी मी जालावर शोधले पण दुवा सापडला नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हे नक्की खरे आहे का? जरा चेक करून घ्या. ऑनलाईन प्रवेश आणि ऑनलाईन लेक्चर ,परीक्षा सर्व चालू आहे.

सीबीएसई ची १२ वी ची परीक्षा पुढे ढकलली आहे पण १० ची परीक्षा रद्द केली आहेअशी बातमी आहे. नक्की काय निर्णय झालाय?

In reply to by श्रीगुरुजी

नक्की काय निर्णय झालाय?
ही एक बातमी - यंदाच्या वर्षी CBSE च्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं देखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. त्यामुळे वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि ११वीच्या प्रवेशांचं काय? अशी चर्चा सुरू झाली असून त्यांच्या गुणपत्रिका ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियानुसार तयार करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आणि हे एक ट्विट -

In reply to by श्रीगुरुजी

+१ राज्य भाजप चुकीच्या लोकांच्या हाताखाली गेल्याने अनेक भाजप समर्थक नाराज आहेत.

In reply to by सॅगी

कधी समजेल असं वाटत नाही. पात्रता नसताना उच्च पदावर बसविले की शोकांतिका होते. भाजपचा मताधार घटण्यामागे फडणवीसांचे चुकीचे निर्णय आणि चंपाचा आचरटपणा यांचा सिंहाचा वाटा आहे.

राज्य संकटात असताना सरकार आज पडेल उद्या पडेल असल्या फालतू कमेंट करून फडणवीस आणि चंपा bjp चे बारा वाजवत आहेत. समर्थक सुद्धा आता ह्यांचे समर्थन करत नाहीत. एकदाचे सरकार पाडा आणि करा तुमचे समाधान. राज्य bjp म्हणजे राज्याला लागलेली वाळवी आहे.

तर सरकार कधी पडेल ह्याची वाट बघत बसली नसती . आणि दर दोन दिवसांनी तारीख देत बसले नसते. आपल्या १०५ आमदारांना त्यांच्या मतदार संघात पाठवून आप आपल्या मतदार संघातील लोकांच्या अडचणी सोडवायला सांगितले असते. राज्य संकटात आहे आणि हे बेधुंद.

मागील दोन दिवसांपासून बारामतीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ही बाब समजताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामतीकरांसाठी तब्बल ४५० रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले.

केंद्र सरकारच्या टीका उत्सवात आता पर्यंत ११ कोटी लोकांचे लसिकरण झाले. लस उत्सव म्हणा किंवा काहीही ... लसिकरण होणे महत्वाचे आहे. अजुन काही दिवसात ह्या लोकांना दुसरा डोस द्यावा लागेल. बहुदा लसिकरणाचा नंबर वाढणार नाही परंतु संपुर्ण लसिकरण केलेले लोक वाढतील. त्याचा आरोग्य सेवेवर निस्चितच सकारात्मक परिणाम दिसुन येइल. यात महाराष्ट्र / राजस्तान / उत्तर प्रदेश या राज्यांनी १ कोटी लसिकरणाचा टप्पा पार केला त्याबद्दल ह्या राज्यांचे अभिनंदन. https://timesofindia.indiatimes.com/india/over-31-39-lakh-vaccine-doses… जाता जाता: महारष्ट्रात अजुनही गोंधळ चालुच आहे. ३ किलो गहु २ किलो तांदुळ कुणाला मिळेल यावर अजुन ठोस निर्णय आला नाही. भुजबळ साहेब लगेच केंद्राच्या दिशेने कटोरा घेउन उभे आहेत. नंतर बहुदा केंद्राच्या नावाने शिमगा होइलच. लस साठा देण्यात केंद्र गैर भाजपा सरकारांच्या बाबतीत दुजाभाव करते अशी ओरड होत होती. आता १ कोटी लसिकरणाचा टप्पा पार केलेल्या राज्यात दोन गैर भाजापा सरकारे आहेत. मग ती ओरड का होती?

In reply to by सुक्या

केंद्र महाराष्ट्र समोर नेहमी कटोरा घेवून उभे असते.सर्वात जास्त टॅक्स ह्या राज्यातून जातो नाही तर पंतप्रधान ना मारुती ८०० मधून फिरावे लागेल तीच वापरायला परवडेल. महाराष्ट्र केंद्र समोर कटोरा घेवून जात नाही हक्काचे मागत असतो.

धक्कादायक! ऑक्सिजन-व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णाची २४ तासात अ‍ॅम्ब्युलन्समधून ४०० किमी वणवण! ----------- https://www.loksatta.com/maharashtra-news/patient-made-to-travel-400-km… -------- आता ही चुकी पण केंद्राचीच, असेही काही टक्केवाले म्हणणारच...

In reply to by मुक्त विहारि

गुजरात, चतुर प्रदेश मध्ये बेड खाली आहेत,ऑक्सिजन बेड एवढे आहेत की एकच बाधित दिवसातून चार पाच बेड वापरत आहे. काय करायचे एवढ्या सुविधेचा असा प्रश्न चतुर प्रदेश आणि गुजरात मध्ये भेडसावत आहे. एका बाधित साठी दहा dr chi सोय गुजरात आणि चतुर प्रदेश नी केली आहे. काय ती सुंदर व्यवस्था वर्णावी.

कोरोनाबाधितांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी कचऱ्याच्या पिशव्यांचा वापर.... "VIDEO | ठाण्यातील संतापजनक प्रकार, कोरोनाबाधितांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी कचऱ्याच्या पिशव्यांचा वापर | Plastic Garbage Bags use for Pack COVID Deadbody" https://www-tv9marathi-com.cdn.ampproject.org/v/s/www.tv9marathi.com/ma… ----------------- आता ही पण चुकी केंद्राचीच, असेही काही टक्के जनता म्हणणारच....

In reply to by मुक्त विहारि

केंद्र असल्या किरकोळ चुका करत नाही त्यांच्या साऱ्या घोड चुका असतात .गेली सात वर्ष देश त्यांच्या चुकांचीच फळ भोगत आहे.

In reply to by मुक्त विहारि

या दोन्ही महोदयांना उत्तर देऊ नये ही नम्र विनंती. धाग्याचे पानिपत होते. त्यांना लिहायचे असले तर लिहू देत. चटकन अंगठा वापरून प्रतिसाद वर ढकलता येतो. बाकीच्यांनी प्रतिसाद दिला तर धागा वाहवत जातो. एक इंग्लिश म्हण सांगतो. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच. Never wrestle with a pig. You just get dirty and the pig enjoys it.

In reply to by पिनाक

प्रचंड सहमत. या दोनतीन सदस्यांचे ९९% प्रतिसाद दुर्लक्ष करण्यासारखे असतात. चुकून एखादा उत्तर देण्यासारखा दिसला तरच त्याला उत्तर द्यावे अन्यथा या मंडळींचे मिपावरील अस्तित्वच ध्यानात घेऊ नये. या सदस्यांना उगीच उत्तर देऊन विनाकारण धाग्याचा टी.आर.पी वाढवू नये- अशा प्रतिसादांमधून अर्थबोध कसलाही होत नाही आणि माहितीत भरही काही पडत नाही. हे आवाहन यापूर्वी मी दोनदा केले होते पण मुविकाकांसारखे ज्येष्ठ सदस्य परत परत असल्या सदस्यांच्या तोंडी लागतात. ते का हे मला तरी समजण्याच्या पलीकडचे आहे.

सर्वप्रथम एक लिहितो, कोणत्याही धर्माच्या सण उत्सव यात्रा, प्रार्थना आदिंमुळे होणार्‍या गर्दीला नियंत्रण करायलाच हवे, करोनाकाळात गर्दी होणा-या कोणत्याही प्रकारच्या गर्दीला आवरायला हवे. कालच्या एका धाग्यात एक मिपाकर म्हणाले, तसे फारच आवश्यक असेल तर प्रतिनिधी म्हणून चार-पाच लोकांना अशा गोष्टींना परवानगी द्यायला हरकत नाही. काल कुंभमेळ्यात नियम धुडकावून ला़खोंची शाहींचे स्नान झाले. सर्वप्रकारच्या नियमांना तिलांजली दिल्या गेली आणि लाखोंच्या संखेने भाविक आणि साधुंनी हरिद्वार येथे ’हर पौड’ घाटावर गंगास्नान केले. करोनाचा संसर्गाने बाधित काही भाविक सापडले हे लिहिलेच होते परंतु गंगामय्याचे आशिर्वाद घेऊन कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी जावे. भाविकांची गंगामय्यावर श्रद्धा आहे, गंगामातेच्या कृपेमुळे करोनाचा फ़ैलाव होणार नाही, असा दावा मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी केला आहे. (बातमी) शिक्षणाने माणूस चांगलं वाईट असा विचार करु शकतो. श्रद्धेचा भाग सोडून द्या, पण जेव्हा किमान करोनाचा वाढता जागतिक धोका पाहता अशी विधाने करीत राहणे आणि ते ऐकत राहणे म्हणजे, आपल्याला अजूनही शिक्षणाची, समाजप्रबोधनाची किती गरज आहे हे दिसून येते. दुसरी गोष्ट, मुस्लीमांचा रमझान महिना सुरु झाल्यामुळे दक्षिण मुंबैतील काळाबादेवी जांजीकर स्ट्रीत येथील मशीद सुरु करण्यास आणि पन्नास जणांच्या उपस्थितीत दिवसातून पाचवेळा नमाज पठण करु देण्यास परवानगी देण्यात यावी अशा विनंती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फ़ेटाळुन लावली. राजघटनेच्या अनुच्छेद २५ अन्वये सर्वांना आपापल्या धर्म आचरणाचा मूलभूत हक्क असला तरी सार्वजनिक आरोग्य बाजूला सारणे शक्य नाही तसेच धर्म आचरणापेक्षा नागरिकांचे आरोग्य व सुरक्षा महत्वाची आहे, असा शेरा मा. न्यायमुर्तींनी मारला आहे. (बातमी : आजचा छापील महाराष्ट्र टाइम) सध्याचा करोनाचा वाढता संसर्ग पाहता, सर्व प्रकारची गर्दीला आवरले पाहिजे. संसर्गाला थांबवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न होत असतांना अशा गर्दीमुळे सर्वच यंत्रणेवर तान पडतो. संसर्ग वाढतो, मृत्यु वाढतात, तेव्हा कायद्याने गर्दीवर नियंत्रण आणून अशा सर्वच व्यक्तींवर-संस्थेवर मग ती कोणत्याही जाती-धर्माची असली तरी कडक कार्यवाही व्हायला हवी, असे माझे व्यक्तीगत मत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हरिद्वारहून परतलेल्या सज्जनांपासून दूर रहावे नाही तर परत आपल्याला (अस्थी) लोट्यातून हरिद्वारला न्यायची पाळी येईल.

In reply to by मुक्त विहारि

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/130th-birth-annive… ------------ बौद्ध बांधवांनी अतिशय उत्तम केले... इतर धर्मियांनी हा आदर्श नक्कीच घ्यायला हवा...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कडक कारवाई बेजबाबदारपणा दाखवणा-या प्रत्येकावर व्हावी. रावतांपासूनच सुरुवात करावी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राध्यापक डॉक्टर बिरूटे सरांशी पूर्ण सहमत. २१ तारखेला कृषी कायद्यांविरूद्ध आंदोलन करणारे दलाल दिल्लीत संसदेवर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चावरही बंदी हवी.

In reply to by श्रीगुरुजी

COVID ची साथ देशांमधून पूर्ण जात नाही तो पर्यंत केंद्र सरकार नी एक पण नवीन कायदा करू नये किंवा आहे ते कायदे बदलू नयेत. lockdown च फायदा घेवून जे नवीन कायदे केले आहेत ते सर्व रद्द करावेत. कशाला कोण मोर्चा काढेल संसदेवर. लोक हितविरोधी कायदे केंद्र करणार आणि लोकांनी विरोध करायचा नाही ही कोणती विचारधारा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

शेतकरी कायद्याविरुद्ध निघणा-या शेतक-यांच्या संभाव्य मोर्चाला परवानगी अजिबात देऊ नये, असे माझेही मत आहे. पण आदर्श सर्वांची उभे करायला हवे. देशाच्या गृहमंत्र्यांनी जे वीना मास्क, लोकांना पैसे देऊन रॅलीत बोलावू जयजय करुन घेतला, रोड शो केले. (दुवा) आदरणीय पंतप्रधानांनी करोना काळात ज्या महासभा घेतल्या त्या जर घेतल्या नसत्या, तर देशासमोर एक आदर्श पायंडा पडला गेला असता. परंतु दोघेही सत्तेचे प्रचंड भुकेले आहेत, सत्ता लोभी आहेत. लोक मेले तरी चालतील, त्या मढ्यावरही आपलं साम्राज्य पसरलं पाहिजे, अशी जी ही भूमिका घेऊन फिरणारे सत्तालोभी काय आदर्श ठेवणार म्हणा....या अशा रॅलींवरही बंदी घालायला पाहिजे होती, किंवा प्रचार केला नसता तर दरदिवशी खराब होत असलेल्या प्रतिमा सुधारायला दोघांनाही थोडीफार मदत झाली असती असे वाटते. दुसरीकडे, जगभर थैमान घालणा-या करोनाच्या संदर्भात. नॉर्वेमधे दहापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही, परंतु तेथील पंतप्रधानांनी आपल्या वाढदिवसाला कुटूंबीयांना बोलावले त्यात एकूण संख्या तेरा झाली, फक्त तीन लोक वाढले. परंतु त्यामुळे नियम मोडल्या गेला. कायद्यासमोर सर्व समान असतात म्हणून त्यांना तेथील पोलिसप्रमुखांनी दंड ठोठावला. (बातमी दुवा ) इतरवेळी सामान्य लोक असते तर कदाचित आम्ही असा दंड ठोठावला नसता परंतू प्रधानमंत्री एक जवाबदार व्यक्ती आहे, नियमांचे पालन करण्याची त्यांचीही जवाबदारी आहे, हा विश्वास लोकांमधे उभा राहावा म्हणून आम्ही असे केल्याचे त्यांनी म्हणाले. आपल्याकडे असा विश्वास भरण्याच्या करोना काळात आपले पंतप्रधान अपयशी ठरले. गेल्या वर्षी महिनाभर झाला की 'बहनो और भाइयो' म्हणून लोकांना प्रवचन सॉरी प्रबोधन करणारे गुरुवर्य, सध्या टीव्हीवर येत नाहीत. पश्चिम बंगालमधील निवडणूकीचा कार्यक्रम आटोपला की काही तरी नव्या घोषणा करायला येतील, आपल्या महाराष्ट्रात त्यांचं लक्ष जावून आपल्या लशीचा पुरवठा बंद व्हायच्या आत आपण सर्वांनी लशीत्सोवात सहभागी होऊन लशी टोचून घ्याव्यात ही नम्र विनंती. जाता जाता : कुंभमेळ्यात सहभागी निर्वाणी आखाड्याचे महामंड्लेश्वर कपिल देव यांचं करोनाने निधन झाल्याच्या बातमीबरोबर आज २१०० भाविकांना संसर्ग झाल्याची बातमी वाचनात आली. दुर्दैवी आहे हे सर्व... (बातमी दुवा) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंढरपूर, तामिळनाडू आणि केरळ मध्ये सुद्धा निवडणूक आहेत आणि तेथे पण प्रचाराचा धुरळा बराच उडाला आहे पण त्यावर फुरोगामी लोक आक्षेप घेताना दिसत नाहीत. ते गैरसोयीचे आहे

In reply to by सुबोध खरे

सर्वच निवडणुकांवर, प्रचारांवर मग तो महाराष्ट्र असो की केरळ बंदीच हवी, पक्ष कोणताही असो आणि त्यांचा प्रमुख कोणीही असो. नीट जेलात नेऊन बसवले पाहिजेत. >>>> पण त्यावर फुरोगामी लोक आक्षेप घेताना दिसत नाहीत. सहमत, या पुरोगामी लोकांचा त्रास हल्ली फार वाढला आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गृहमंत्री, पंतप्रधान यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे असे वाटते. ममता यांच्या आक्रस्ताळ्या शैलीला तेवढेच आक्रस्ताळ्या प्रचाराने उत्तर देण्यासाठी सरकारमधील नंबर एक आणि दोन कोरोना, गर्दी, आर्थिक परिस्थिती इ. कसलाही विचार न करता जात आहेत, हे आजिबात शोभादायक नाही.

बिरुटे सरांशी सहमत, प्रत्येक राज्याने धार्मिक गर्दीला आवर घातलाच पाहिजे. कुंभ मेळ्याच्या गर्दीला आवर घालायला पाहिजे होता.

In reply to by गणेशा

+१ ह्या चांगल्या व्यक्तीला आता भक्तगण देशद्रोही ठरवतील.

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर बंगालमधील चार फेर्‍यांमधील उरलेल्या मतदानाचे काय करायचे याविषयी चर्चा करायला निवडणुक आयोगाने आज म्हणजे १६ एप्रिलला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे मतदान एकत्र घेण्यात यावे ही मागणी केली आहे. तसे करता येणे कठीण आहे कारण जनप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ३० (ड) प्रमाणे अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवसापासून प्रत्यक्ष मतदानाचा दिवस यात कमीतकमी १४ दिवसांचा अवधी असणे गरजेचे असते. हा कायदा https://legislative.gov.in/sites/default/files/04_representation%20of%2… वरील पीडीएफ फाईलमध्ये बघता येईल. पुढच्या फेर्‍यांमधील मतदान एकत्र केले तर हा अवधी १४ दिवसांपेक्षा कमी राहिल त्यामुळे मतदानाच्या कायदेशीर वैधतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिल. दुसरा पर्याय म्हणजे मतदान लांबणीवर टाकणे. राजीव गांधींची हत्या झाली २१ मे १९९१ रोजी तर दहाव्या लोकसभेसाठी मतदान होणार होते २०, २३ आणि २६ मे रोजी. राजीव गांधींची हत्या होण्यापूर्वी मतदानाची एक फेरी झाली होती. पण ती हत्या झाल्यानंतरच्या परिस्थितीत दुखवटा लागल्याने(*) उरलेल्या दोन फेर्‍यांसाठीचे मतदान १२ आणि १५ जून रोजी घेण्यात आले. तेव्हा कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्याने बंगालमधील मतदान पुढे ढकलणे हा पर्याय असू शकतो. पण पुढे ढकलून किती दिवस पुढे ढकलणार? मागच्या वर्षीचा कोरोनाचा अनुभव लक्षात घेता ही परिस्थिती सावरायला काही महिने जाऊ शकतील. तसेच सध्याच्या बंगाल विधानसभेची मुदत २९ मे रोजी संपत आहे. तेव्हा तोपर्यंत मतदान आणि मतमोजणी पूर्ण करून नवी विधानसभा अस्तित्वात आली तर ठीक अन्यथा २९ मे या दिवशी विधानसभा आपोआप विसर्जित होईल आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना राजीनामा द्यावा लागेल. अशा परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. तिसरा पर्याय म्हणजे मतदानाच्या तारखांमध्ये बदल करायचा नाही पण जाहीर प्रचारावर- सभा, मिरवणुका, रोड शो वगैरेंवर बंदी आणायची. आताच्या काळात प्रचार ऑनलाईन पण होऊ शकतोच त्यामुळे प्रत्यक्ष सभा घेऊन प्रचार केला नाही तरी काही बिघडणार नाही. पण जाहीर प्रचारावर बंदी घालायचा प्रस्ताव माझ्या माहितीप्रमाणे राज्य (किंवा केंद्र?) सरकारकडून यावा लागेल. अशी प्रचारावर बंदी घालायचा अधिकार निवडणुक आयोगाकडे आहे का याविषयी साशंक आहे. *: दुखवटा लागल्याने मतदान पुढे ढकलले गेले असेल तर नक्की कोणाच्या मृत्यूमुळे दुखवटा लागल्याने असे मतदान पुढे ढकलावे याविषयी नियम काय आहेत याची कल्पना नाही. हत्या झाली तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान नव्हते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या राजीव गांधी आणि मोरारजी देसाई हे त्यावेळी एकाच गटातील होते- माजी पंतप्रधान. मोरारजी देसाईंचे निधन १९९५ मध्ये झाले ते १९९१ मध्ये झाले असते (किंवा माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग आणि निलम संजीव रेड्डींचे निधन अनुक्रमे १९९४ आणि १९९६ मध्ये झाले त्याऐवजी मे १९९१ मध्ये झाले असते) तर अशी निवडणुक पुढे गेली असती का?

City Bank भारत व इतर १२ देशातून व्यवसाय बंद करून भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात या बँकेच्या ३५ शाखा असून ४००० कर्मचारी आहेत. Retail banking, credit cards, wealth management हे या बॅंकेचे भारतातील प्रमुख व्यवसाय आहेत. https://www.indiatoday.in/business/story/explained-why-citigroup-is-shu…

In reply to by श्रीगुरुजी

सिटीबँकेने भारतातील त्यांचे फक्त रिटेल बँकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, जो त्यांना फायदेशीर नाही. भारताप्रमाणेच इतरही १२ देशांतील रिटेल व्यवसाय बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे, असे बातमी म्हणते. प्रायव्हेट बँकिग व इतर व्यवसाय ते सुरूच ठेवणार आहेत.

गुरुजी बातमी देताना पुर्ण देत जा. काही वेळेला मिडीया नाही तर आपही अर्धवट बातमी देउन /पसरवुन उगाचच लोकांमध्ये घबराट निर्माण करत असतो. त्या बातमीत पुढे असंही म्हंटलंय की The group has said that its banking services in the country will not be affected in the country from the time being and added that no employees in India will be let go. याने खातेधारकंना जरा तरी दिलासा मिळेल.

In reply to by पिनाक

खासगी बँक आहे ती सावळा गोंधळ तिथे होणार नाही तुम्ही बँकेत नाही गेलात तरी तुमचे पैसे घरपोच सुरक्षित पोचवून च ते व्यवसाय बंद करतील. रोजच्या घडामोडी ची माहिती पण देतील. मेल चेक करून बघा सर्व माहिती दिली असेल.शेवटी खासगी बँक आहे ती .निर्धास्त राहा