चालू घडामोडी एप्रिल भाग २

साहना's picture
साहना in काथ्याकूट
7 Apr 2021 - 1:46 am
गाभा: 

चालू घडामोडीच्या जुन्या धाग्यावर बराच राजकीय धुराळा उडत असल्याने बिन राजकीय घडामोडीचा हा दुसरा धागा.

- कपिल शर्माला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव तृषान असे ठेवले आहे. हे नाव पूर्ण पणे निरर्थक आहे. आपल्या अपत्यांना चांगली नवे द्यावीत. गुगल वर अवलंबून राहू नये. आमचे मित्र श्री नित्यानंद मिश्रा ह्यांचे सुनाम हे पुस्तक विकत घ्यावे आणि अपेक्षित पालकांना भेट म्हणून द्यावे.

- बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आणि डॉक्टर श्रीमती स्वप्ना पाटकर ह्यांनी महाराष्ट्रांतील थोर, साक्षांत वाचस्पती श्री संजयजी राऊतजी ह्यांच्यावर खूप आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याला अश्लील कॉल केले, मानसिक छळ केला इत्यादी. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. अक्ख्या महाराष्ट्राला विद्वत्ता पुरवणाऱ्या ह्या माणसाला काय काय सहन करावे लागते हे वाचून डोळे पाणावतात.

- फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला. आपण सुद्धा ह्यांत आहात तर इथे तपासून पहा : https://haveibeenfacebooked.com/

- चीन ने सायबर युवान ह्या १००% डिजिटल पैश्यांची सिस्टम सुरु केली आहे. (ह्याचा क्रिप्टो करन्सी शी संबंध नाही). https://www.wsj.com/articles/china-creates-its-own-digital-currency-a-fi...

- आनंद महिंद्रा ह्यांनी आपला शब्द पाळत इडली अम्माला तिचे स्वतःचे घर आणि किचन बनवून दिले
https://indianexpress.com/article/trending/trending-in-india/tamil-nadu-...

- बायजु ह्या कंपनीने आकाश ट्युटोरिअल ह्या कंपनीला १ अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले. भारतीय शिक्षण क्षेत्रांत ज्या गोष्टी सुदैवाने अद्याप सरकारी नियंत्रणाखाली नाहीत तिथे भारत वेगाने प्रगती करत आहे.

- पुनावाला ह्यांनी आपली कंपनी प्रचंड मेहनत करून दिवसाला २ दशलक्ष व्हॅक्सीन्स बनवत आहे असे सांगितले. सध्या भारत दिवसाला २-३ दशलक्ष वॅक्सीन देऊ शकत आहे त्यामुळे वॅक्सीन ची निर्यात बंद झाली आहे. वॅक्सीन क्षमता वाढवण्यासाठी ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे असं SSI ने सांगितले.

- मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे.

- एप्रिल २०२३ मध्ये भारतीय रेलवे वर खाजगी रेल्वे ऑपरेटरच्या रेलवे धावतील अशी अपेक्षा आहे. साधारण १५१ रूट्स वर खाजगी ऑपरेटर आपल्या रेल्वे चालवतील.

- सौदी अरेबिया ने कृत्रिम रित्या तेलाच्या किमती वर ठेवल्याने भारतीय कंपन्यांनी सौदी कडून तेल घेणे ३०% नि कमी केले आहे.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

11 Apr 2021 - 11:31 am | मुक्त विहारि

माध्यमानी सतत गर्दीची ठिकाणे दाखवली....

गर्दी झाली होती, आता ही माध्यमांची चूक कशी काय?

आता तर अजिबातच गर्दी नाही आहे...उद्या पासून परत उत येणार...

मराठी_माणूस's picture

11 Apr 2021 - 12:08 pm | मराठी_माणूस

सतत हीच ठिकाणे दाखवली. शुकशुकाट असलेल्या ठिकाणांची दखल घेतली नाही.

मुक्त विहारि's picture

11 Apr 2021 - 7:03 pm | मुक्त विहारि

अशीच ठिकाणे दाखवायला हवीत....

मराठी_माणूस's picture

12 Apr 2021 - 11:24 am | मराठी_माणूस

ते एकांगी होइल. माध्यंमा कडुन ही अपेक्षा नाही.

आज मात्र त्यांनी बर्‍याच निर्मनुष्य जागांची छायाचित्रे दाखवली आहेत.

त्यामुळे, चहा-बिस्कीट खाता खाता, पेपर वाचायचे...

शाम भागवत's picture

11 Apr 2021 - 2:37 pm | शाम भागवत

ममा,
अशा पध्दतीने कामे करणारी माणसे भारताला मिळायला पाहिजेत व त्यांना काम करू दिलं पाहिजे.
असं काही वाचलं की प्रथम मिझाईल मॅनच आठवतो.
🙏

https://www.loksatta.com/desh-videsh-news/jammu-kashmir-encounter-broke-...

खंबीर सरकार असेल तर, सैन्य जबरदस्त कामगिरी करणारच...

चंद्रसूर्यकुमार's picture

11 Apr 2021 - 11:57 am | चंद्रसूर्यकुमार

जनेयु आणि पुरोगामी विचारवंतांच्या गोटात १३० दिवसाच्या दुखवट्याची घोषणा झाली का?

https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/thane-news/guardian-minist...

खरं तर, आयुक्त अतिशय उत्तम काम करत आहेत...
------------

दत्तनगर चौकामधील ‘ते’ बांधकाम 22 तासांत तोडले...

https://www.google.com/amp/s/m.lokmat.com/kalyan-dombivli/construction-t...

>> खरं तर, आयुक्त अतिशय उत्तम काम करत आहेत
>>>
हे कारण बदलीसाठी पुरेसे नाही का?

उपयोजक's picture

11 Apr 2021 - 11:47 am | उपयोजक

https://darshanpolicetime.com/पत्रकाराची-हत्या-राष्ट्/

रात्रीचे चांदणे's picture

11 Apr 2021 - 12:25 pm | रात्रीचे चांदणे

महाराष्ट्रा मध्ये व्हेंटिलेटर्स ची वाढती मागणी पाहून केंद्र सरकार राज्याला 1041 व्हेंटिलेटर्स देणार आहे. त्यातील 700 ही गुजरात मधून येणार तर उरलेली आंध्रप्रदेश मधून येणार, अशी माहिती प्रकाश जवडेकराणी काल पुण्यात दिली.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Apr 2021 - 2:08 pm | अमरेंद्र बाहुबली

Remdesivir deficiency : *धक्कादायक! एकीकडे देशात रेमडेसिविरचा तुटवडा; भाजप कार्यालयात सापडले ५ हजार डोस*

http://dhunt.in/dYq4Z?s=a&uu=0xf030105c4b903d72&ss=wsp
Source : "लोकमत"

सुखीमाणूस's picture

12 Apr 2021 - 4:19 am | सुखीमाणूस

रेमडेसिविर औषध आहे त्याला लसीकरण का म्हणले आहे?
या औषधाचा पुरवठा सरकारच्या ताब्यात आहे का?
भाजपा गुजरात कार्यालयाला सरकार कडुन हे औषध फुकट मिळाले आहे का?

चौकस२१२'s picture

12 Apr 2021 - 5:29 am | चौकस२१२

आरे किती हा द्वेष.. अरे बातमी तरी नीट वाचा ... मोफत वाटत असले स्वतःचं खर्चाने तर तुमच्या पिताश्रींएचे काही जाते का?
आणि दुसरे जर "साठेबाजी" असती तर असा फोटो किंवा ..स्वतःच जाहिरात कशाला केली असती
भाजप सत्तेत आल्यापासून जी वैचारिक बुळकी तुम्च्य्सारख्यांना लागली आहे ना त्याला औषध नाही

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 6:53 am | मुक्त विहारि

सहमत आहे

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2021 - 3:30 pm | श्रीगुरुजी

>>> एकीकडे देशात रेमडेसिविरचा तुटवडा; भाजप कार्यालयात सापडले ५ हजार डोस

या औषधाचा कोरोनासाठी काहीच उपयोग नाही, असे त्याच बातमीत २-३ ठिकाणी लिहिलंय.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Apr 2021 - 9:58 pm | अमरेंद्र बाहुबली

या औषधाचा कोरोनासाठी काहीच उपयोग नाही, असे त्याच बातमीत २-३ ठिकाणी लिहिलंय. >>>>
तर मग भाजप कार्यालयात त्याचा साठा का?

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2021 - 10:16 pm | श्रीगुरुजी

तो त्यांचा प्रश्न आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Apr 2021 - 10:28 pm | अमरेंद्र बाहुबली

त्यांचा म्हणजे कुणाचा?

विकत घेउन गरजुना दिली असली तर ती समाज् सेवा होइल.
अर्थात रजकिया पक्श करतात ती समाज् सेवा नसते तर मतान्ची सोय असते.
असली घाणेरडी पद्धत समाजात रुजवायचे श्रेय अर्थात वर्षानुवर्षे देशसेवेद्वारे राज्य करणार्या एकमेव पक्शाला नक्किच द्यायला हवे.
लोकाना अशिक्शीत आणी अन्कीत ठेउन निवडुन यायचे हेच यान्चे राजकारण

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 6:50 am | मुक्त विहारि

+1

या औषधाचा कोरोनासाठी काहीच उपयोग नाही>>>>> हे पुण्यातील डॉक्टरांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले पाहिजे, डॉक्टर्स उगाच प्रेसक्रिबशन देत आहेत आणि नातेवाईक मूर्खासारखे सगळीकडे या औषधांसाठी हेलपाटे मारत आहेत

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Apr 2021 - 10:31 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Apr 2021 - 10:36 pm | अमरेंद्र बाहुबली

भाजपने अतिशय खालचा स्तर गाठलाय. अतिशय संतापजनक आहे हे. कोरोना रूग्नांचे नातेवाईक जिवाचे रान करत असताना पक्श कार्यालयात साठा? तोही तब्बल पाच हजार डोस चा. जनता हे पाहतेय. योग्य वेळी धडा शिकवायला हवा. बाकी भक्त लोकांनी साॅरी राष्ट्रप्रेमी लोकांनी ह्या कडे लक्श द्यावे.

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2021 - 12:00 am | श्रीगुरुजी

क़रोना रूग्णांचे नातेवाईक हे औषध मिळविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत असताना यांनी रेमेडिसिवरची ७५ इंजेक्शने कोठून मिळविली?

https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/ncp-leader-sharad-pawar...

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2021 - 12:05 am | श्रीगुरुजी

म्हणजे भाजप हे इंजेक्शन गरजूंना फुकट देतो हा महाभयंकर गुन्हा, पण पवार तेच इंजेक्शन देतात तेव्हा ती गरजूंना मदत आणि ते गरीबांचे मसीहा !

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 6:50 am | मुक्त विहारि

+1

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Apr 2021 - 10:36 pm | अमरेंद्र बाहुबली

भाजपने अतिशय खालचा स्तर गाठलाय. अतिशय संतापजनक आहे हे. कोरोना रूग्नांचे नातेवाईक जिवाचे रान करत असताना पक्श कार्यालयात साठा? तोही तब्बल पाच हजार डोस चा. जनता हे पाहतेय. योग्य वेळी धडा शिकवायला हवा. बाकी भक्त लोकांनी साॅरी राष्ट्रप्रेमी लोकांनी ह्या कडे लक्श द्यावे.

बिटाकाका's picture

11 Apr 2021 - 11:35 pm | बिटाकाका

तुम्ही (आणि ती बातमी) असे चित्र निर्माण करताय जणू ते औषध सरकार (लसीसारखं) वाटप करतंय आणि अचानक त्याचा साठा भाजप कार्यालयावर पोलिसांनी धाड टाकून शोधलाय. ते औषध ओपन मार्केट मध्ये डिस्त्रीब्यूटर्स काढून येते. ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार, मेडिकल वाले १२०० चं एक इंजेक्शन २०,००० रुपयांना एक विकत आहेत. भाजपने त्यांचे डिस्त्रीब्युटर्स सोर्सेस वापरून तो साठा विकत घेऊन ज्यांना गरज आहे त्यांनी भाजप कार्यालयातून मोफत घेऊन जावेत असं सांगितलं तर यात कुणाची जळायचं कारणच काय? उद्या मास्कचा तुटवडा झाला आणि कुणीतरी एखाद्या डिस्त्रीब्यूटर्स कडून विकत घेऊन मास्क मोफत वाटले तर त्यालाही आक्षेप घ्याल का? व्हाट्सऍप ग्रुप ह्या औषधाच्या चौकशीसाठी ओसंडून वाहत आहेत, ढिगानी पोस्ट्स फिरत आहेत इथे मिळेल, तिथे मिळेल अशा, कॉल केला तर कुठेच मिळत नाही. मिळाली तर अव्वाच्या सव्वा किमतीला. अशा वेळेला पॉलिटिकल पॉवर वापरून कुणीऔषध खात्रीपूर्वक आणि तेही मोफत सामान्यांना मिळवून देत असेल तर सामान्यांनी त्याचं स्वागत करावं, सगळ्याच पक्षांनी असा प्रयत्न करावा असं म्हणावं की भाजपचा द्वेष करावा हे ज्याचे त्याने ठरवावे. खालचा स्टार गाठालाय खरंतर भाजप चा द्वेष करणाऱ्यांनी. कुठंही भाजपच्या विरोधात जरा काही खुट्ट वाजलं की स्वतः काहीही माहिती न घेता बाह्या सरसावून द्वेष बाहेर काढायला तयारच असतात. एवढा द्वेष करण्याआधी दोन्ही बाजूची माहिती घ्यावी न वाटणे हे अतिशय गमतीशीर आहे.

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2021 - 11:48 pm | श्रीगुरुजी

+ १

चौकस२१२'s picture

12 Apr 2021 - 5:32 am | चौकस२१२

+१
एवढा द्वेष करण्याआधी दोन्ही बाजूची माहिती घ्यावी न वाटणे हे अतिशय गमतीशीर आहे.
गमतीशीर नाही संतापजनक

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 6:49 am | मुक्त विहारि

+2

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2021 - 10:53 pm | श्रीगुरुजी

जागतिक आरोग्य संघटनेनेच प्रयोगांती हे औषध फारसे उपयुक्त नाही असे सांगितले आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Apr 2021 - 10:59 pm | अमरेंद्र बाहुबली

मग तरी भाजपने साठा का केला?

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2021 - 11:17 pm | श्रीगुरुजी

भाजपने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे.

Rajesh188's picture

12 Apr 2021 - 1:05 am | Rajesh188

काळाबाजार करावा का bjp नी.
सर्व च खुटी वर गुंडाळून ठेवली आहे वाटत.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 6:44 am | मुक्त विहारि

1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?

2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?

ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....

जागतिक आरोग्य संघटनेनेच प्रयोगांती हे औषध फारसे उपयुक्त नाही असे सांगितले आहे.>>>>>> असे असले तरी भारतात सगळे डॉक्टर्स पहिल्या 5 दिवसात ताप उतरला नाही तर हे औषध देत आहेत, बऱ्याच लोकांचे प्राण याने वाचले आहेत. रुग्ण किंवा नातेवाईक स्वतः हे औषध दया म्हणून डॉक्टरांना सांगत नाहीयेत, डॉक्टर्स हे औषध देत आहेत आणि केंद्र सरकारने या निरुपयोगी औषधांवर निर्यात बंदी का केली आहे की आता केंद्र सरकारलाही काही कळत नाही असे तुम्हाला वाटते

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2021 - 11:27 pm | श्रीगुरुजी

जागतिक आरोग्य संघटनेने प्रयोगांती तसे सांगितले आहे.

https://www.google.com/amp/s/www.forbes.com/sites/jvchamary/2021/01/31/r...

A large-scale analysis by the World Health Organization’s Solidarity trial consortium has cleared-up the confusion. Based on interim results from studying more than 5000 participants, the international study concluded that remdesivir “had little or no effect on hospitalized patients with Covid-19, as indicated by overall mortality, initiation of ventilation, and duration of hospital stay.”
As a consequence of being mostly ineffective, WHO recommends against the use of remdesivir in Covid-19 patients.

या औषधाचा फारसा उपयोग नाही हे सांगणारे अजून काही अहवाल -

https://www.statnews.com/2020/11/19/who-recommends-against-remdesivir-co...

https://www.healthline.com/health-news/study-finds-antiviral-meds-like-r...

बिटाकाका's picture

12 Apr 2021 - 7:43 am | बिटाकाका

आवडत्या बाजूच्या वर्तमानपत्रातील समजतंय का बघुयात! आजची बातमी -
https://www.lokmat.com/maharashtra/remedivir-has-nothing-do-death-task-f...

Rajesh188's picture

12 Apr 2021 - 1:03 am | Rajesh188

म्हणून विषयांतर करू नका bjp च्या ऑफिस मध्ये जो स्टॉक सापडला ह्याचा अर्थ आहे .
काळाबाजार bjp च करत होती.
पंधरा ते पंचवीस हजार rupya ल विकुन जनतेची लूट चालू होती.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 6:45 am | मुक्त विहारि

1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?

2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?

ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....

Rajesh188's picture

12 Apr 2021 - 1:11 am | Rajesh188

औषधाचा साठा bjp ऑफिस मध्ये मिळाला तरी कशी आयडी सर्व लाज लज्जा सोडून एकतर विषयांतर करत आहे किंवा त्या गोष्टी चे समर्थन करत आहेत.
किती तो आंधळे पना .
म्हणून हे अंध भक्त.
असल्या आंधळ्या शिक्षित लोकांपेक्षा कमी शिकलेली पण व्यवहारी आणि समतोल विचार करणारी डोळस लोक खूप great आहेत.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 6:46 am | मुक्त विहारि

1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का?

2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का?

ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....

श्रीगुरुजी's picture

12 Apr 2021 - 8:45 am | श्रीगुरुजी

कशी आयडी सर्व लाज लज्जा सोडून एकतर विषयांतर करत आहे

संपादक,

एकतर या व्यक्तीला अजिबात वाचता येत नाही, दुसरं म्हणजे वाचता येत असेल तर ते अजिबात समजत नाही, तिसरं म्हणजे काही सदस्यांवर वैयक्तिक टीका सुरू आहे आणि चौथं म्हणजे ही व्यक्ती प्रत्येक धाग्यावर अत्यंत निर्बुद्ध व गरळ ओकणारे प्रतिसाद देत आहे.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 9:40 am | मुक्त विहारि

वाचन कमी असलेल्या व्यक्तींना, माहिती देणे उत्तम...

सुखीमाणूस's picture

12 Apr 2021 - 4:09 am | सुखीमाणूस

तरी इथे काही जण असे आहेत की बातमी पुर्ण न वाचता केवळ टिका करत सुटणार.
अन्ध भक्त आणि मन्द गुलाम याना तोड नाही हे खरेच. आणि त्यातही मन्द गुलाम खरच अडाणीपणे वागत असत्तात, फक्त एकच उद्दिष्ट मोदि द्वेष...
जर औषध मोफत देतायत तर काळाबाजार कसा झाला? आणि बातमी पुर्ण वाचायचे कष्ट का घेत नाहीत लोक?
मन्द गुलामान्चे खरे दुखणे हे आहे की राष्ट्रवादीला फक्त ७५ देता आली आणि भाजपा ला ५०००....
पवारानी केले की समाजसेवा आणी भाजपाने केले की काळाबाजार
महाराष्ट्र सरकार जानेवारी नन्तर बेफिकीर झाल्यामुळे, नीट पुरेशी काळजी न घेतल्यामुळे लसीकरण सुरु झाले, तिथे गर्दी झाली आणि कोरोना वाढला.

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 6:46 am | मुक्त विहारि

सहमत आहे

बिटाकाका's picture

12 Apr 2021 - 7:41 am | बिटाकाका

काही मंदभक्त आयडींना उत्तर देणे अजिबात गरजेचे नसते पण तरीही. मोफत औषध वाटण्यात काळाबाजार कसा हे मंदभक्त त्यांची सुशिक्षित, व्यवहारी समतोल बुद्दी लावून सांगतील का आम्हाला? अजिबात माहिती न घेता सतत गरळ ओकणे आणि स्वतःच्या बुद्धीचे माप प्रत्येक प्रतिसादातून दिसत असताना इतरांना शहाणपणा शिकवणे हे तर मंद भक्तांचे आणि गुलामांचे विशेष लक्षण असावे असे मला वाटते. धन्य ती मंदभक्ती आणि धन्य ती गुलामगिरी. असला व्यवहारी आणि समतोल विचार मंदभक्तांकडेच असू दे रे महाराजा!

80% लोकांनी नाकारलेला पक्ष म्हणजे शिवसेना

माझे म्हणणे एवढेच आहे की रॅमिडीसीविर जर काहीच उपयोगी नसेल तर डॉक्टरांनी ते रुग्णांना precribe करू नये, काळाबाजार, निर्यातबंदी वगैरे सगळे थांबेल.

सौंदाळा's picture

12 Apr 2021 - 9:30 am | सौंदाळा

सी. आर. पाटील या गुजरातच्या भाजप खासदाराने त्याचे सोर्सेस वापरून ५००० रेमडेसीवीर मिळवली. वर्तमानपत्रात पानभर जाहिरात देऊन त्यात स्वतःचा नंबर देऊन कार्यालयातुन मोफत घेऊन जावे असे सांगितले होते.
लिंक
आरडाओरडा करणाऱ्या चहा बिस्कीट पत्रकारांना काळाबाजार या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का?
माहिती नसेल तर सांगतो
चोरून, गपचूप, चढ्या भावाने विक्री करणे
आणि याच पत्रकारांची ही बातमी बघा लिंक

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 9:38 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

परमपूज्य राहुल गांधी, यांचे समर्थन करणार्या लोकांना पाठवतो...