✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चालू घडामोडी एप्रिल भाग २

स
साहना यांनी
Wed, 04/07/2021 - 01:46  ·  लेख
लेख
चालू घडामोडीच्या जुन्या धाग्यावर बराच राजकीय धुराळा उडत असल्याने बिन राजकीय घडामोडीचा हा दुसरा धागा. - कपिल शर्माला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव तृषान असे ठेवले आहे. हे नाव पूर्ण पणे निरर्थक आहे. आपल्या अपत्यांना चांगली नवे द्यावीत. गुगल वर अवलंबून राहू नये. आमचे मित्र श्री नित्यानंद मिश्रा ह्यांचे सुनाम हे पुस्तक विकत घ्यावे आणि अपेक्षित पालकांना भेट म्हणून द्यावे. - बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आणि डॉक्टर श्रीमती स्वप्ना पाटकर ह्यांनी महाराष्ट्रांतील थोर, साक्षांत वाचस्पती श्री संजयजी राऊतजी ह्यांच्यावर खूप आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याला अश्लील कॉल केले, मानसिक छळ केला इत्यादी. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. अक्ख्या महाराष्ट्राला विद्वत्ता पुरवणाऱ्या ह्या माणसाला काय काय सहन करावे लागते हे वाचून डोळे पाणावतात. - फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला. आपण सुद्धा ह्यांत आहात तर इथे तपासून पहा : https://haveibeenfacebooked.com/ - चीन ने सायबर युवान ह्या १००% डिजिटल पैश्यांची सिस्टम सुरु केली आहे. (ह्याचा क्रिप्टो करन्सी शी संबंध नाही). https://www.wsj.com/articles/china-creates-its-own-digital-currency-a-first-for-major-economy-11617634118 - आनंद महिंद्रा ह्यांनी आपला शब्द पाळत इडली अम्माला तिचे स्वतःचे घर आणि किचन बनवून दिले https://indianexpress.com/article/trending/trending-in-india/tamil-nadu-idli-amma-new-home-workspace-promise-anand-mahindra-7256916/ - बायजु ह्या कंपनीने आकाश ट्युटोरिअल ह्या कंपनीला १ अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले. भारतीय शिक्षण क्षेत्रांत ज्या गोष्टी सुदैवाने अद्याप सरकारी नियंत्रणाखाली नाहीत तिथे भारत वेगाने प्रगती करत आहे. - पुनावाला ह्यांनी आपली कंपनी प्रचंड मेहनत करून दिवसाला २ दशलक्ष व्हॅक्सीन्स बनवत आहे असे सांगितले. सध्या भारत दिवसाला २-३ दशलक्ष वॅक्सीन देऊ शकत आहे त्यामुळे वॅक्सीन ची निर्यात बंद झाली आहे. वॅक्सीन क्षमता वाढवण्यासाठी ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे असं SSI ने सांगितले. - मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे. - एप्रिल २०२३ मध्ये भारतीय रेलवे वर खाजगी रेल्वे ऑपरेटरच्या रेलवे धावतील अशी अपेक्षा आहे. साधारण १५१ रूट्स वर खाजगी ऑपरेटर आपल्या रेल्वे चालवतील. - सौदी अरेबिया ने कृत्रिम रित्या तेलाच्या किमती वर ठेवल्याने भारतीय कंपन्यांनी सौदी कडून तेल घेणे ३०% नि कमी केले आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
54288 वाचन

💬 प्रतिसाद (205)

प्रतिक्रिया

काही मंदभक्त आयडींना उत्तर

बिटाकाका
Mon, 04/12/2021 - 07:41 नवीन
काही मंदभक्त आयडींना उत्तर देणे अजिबात गरजेचे नसते पण तरीही. मोफत औषध वाटण्यात काळाबाजार कसा हे मंदभक्त त्यांची सुशिक्षित, व्यवहारी समतोल बुद्दी लावून सांगतील का आम्हाला? अजिबात माहिती न घेता सतत गरळ ओकणे आणि स्वतःच्या बुद्धीचे माप प्रत्येक प्रतिसादातून दिसत असताना इतरांना शहाणपणा शिकवणे हे तर मंद भक्तांचे आणि गुलामांचे विशेष लक्षण असावे असे मला वाटते. धन्य ती मंदभक्ती आणि धन्य ती गुलामगिरी. असला व्यवहारी आणि समतोल विचार मंदभक्तांकडेच असू दे रे महाराजा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस

80% लोकांनी नाकारलेला पक्ष म्हणजे शिवसेना...

मुक्त विहारि
Mon, 04/12/2021 - 08:02 नवीन
80% लोकांनी नाकारलेला पक्ष म्हणजे शिवसेना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

माझे म्हणणे एवढेच आहे की

Vichar Manus
Mon, 04/12/2021 - 09:07 नवीन
माझे म्हणणे एवढेच आहे की रॅमिडीसीविर जर काहीच उपयोगी नसेल तर डॉक्टरांनी ते रुग्णांना precribe करू नये, काळाबाजार, निर्यातबंदी वगैरे सगळे थांबेल.
  • Log in or register to post comments

सी. आर. पाटील या गुजरातच्या

सौंदाळा
Mon, 04/12/2021 - 09:30 नवीन
सी. आर. पाटील या गुजरातच्या भाजप खासदाराने त्याचे सोर्सेस वापरून ५००० रेमडेसीवीर मिळवली. वर्तमानपत्रात पानभर जाहिरात देऊन त्यात स्वतःचा नंबर देऊन कार्यालयातुन मोफत घेऊन जावे असे सांगितले होते. लिंक आरडाओरडा करणाऱ्या चहा बिस्कीट पत्रकारांना काळाबाजार या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? माहिती नसेल तर सांगतो चोरून, गपचूप, चढ्या भावाने विक्री करणे आणि याच पत्रकारांची ही बातमी बघा लिंक
  • Log in or register to post comments

माहिती बद्दल धन्यवाद

मुक्त विहारि
Mon, 04/12/2021 - 09:38 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद परमपूज्य राहुल गांधी, यांचे समर्थन करणार्या लोकांना पाठवतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा