Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चंद्रसूर्यकुमार on गुरुवार, 04/01/2021 - 09:34
एप्रिल महिना सुरू झाला असल्याने चालू घडामोडींसाठी नवीन भाग सुरू करत आहे. पी.पी.एफ आणि अन्य योजनांवरील व्याजदरात कपात करायचा वादग्रस्त निर्णय केंद्र सरकारने काही तासांत मागे घेतला आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/govt-withdraws-cut-in-interest-rates-of-small-savings-schemes/articleshow/81811525.cms जून २००४ मध्ये त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची हत्या करायला आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांबरोबर इशरत जहान या मुंब्र्याच्या २० वर्षीय तरूणी चकमकीत मारली गेली ती चकमक खोटी नव्हती असा निर्णय कोर्टाने दिला आहे. इशरत जहान प्रकरणावरून युपीए सरकारने जे काही किळसवाणे राजकारण केले त्याला तोड नाही. हिंदू दहशतवादाचे थोतांड उभे करणे, संघाच्या शाखांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्याविषयी गुप्तचरखात्याचे रिपोर्ट आपल्याकडे आहेत हे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी जाहीरपणे म्हणणे इथपर्यंत मजल गेली. हुतात्मा तुकाराम ओंबळेंनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी आपल्या प्राणांची आहुती देऊन कसाबला जिवंत पकडले म्हणून नाहीतर २६/११ चे हल्ले हा पण हिंदू दहशतवादच होता हे सिध्द करायची सगळी तयारी युपीए सरकारने केली होती. किंबहुना २६/११ चे हल्ले हा रा.स्व.संघाचा कट होता याविषयी एका पुस्तकाचे प्रकाशन दिग्विजयसिंगांनी केले होते. गुप्तचर विभागाचे प्रमुख मणी यांनी हिंदू दहशतवाद खरा आहे हे सिध्द करायला खोटे पुरावे उभे करायला विरोध केला त्यांना प्रचंड त्रास दिला गेला. आता चिदंबरम, शिंदे, शरद पवार, दिग्विजयसिंग वगैरे काँग्रेस नेते आणि त्यांची तळी उचलून धरणारे पुरोगामी विचारवंत यावरून देशाची माफी मागणार का? याच लोकांनी आणि युपीए सरकारने नरेंद्र मोदी आणि अमित शहांना यात गोवून त्यांची राजकीय कारकिर्द खतम करायचा प्रयत्न केला पण मोदी-शहा प्रचंड खमके निघाले आणि त्यांनी युपीए सरकारचा डाव त्यांच्यावरच उलटवला हे चांगलेच झाले. मात्र या प्रकरणात अनेक पोलिस अधिकार्‍यांना जवळपास १७ वर्षे खूप म्हणजे खूपच त्रास झाला याचे वाईट वाटते.
  • Log in or register to post comments
  • 52038 views

प्रतिक्रिया

Submitted by मुक्त विहारि on Mon, 04/05/2021 - 16:49

In reply to हे पुस्तक जरूर वाचा .... by अमर विश्वास

Permalink

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 04/05/2021 - 16:48

Permalink

अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा

https://www.loksatta.com/maharashtra-news/anil-deshmukh-resigned-as-home-minister-after-mumbai-high-court-decision-bmh-90-2437111/
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Mon, 04/05/2021 - 17:33

In reply to अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा by मुक्त विहारि

Permalink

आता पुढचा नंबर कोणाचा?

सचिन वाझे फार उत्तम काम करत आहेत असे ठाकरेंच्या महाभकास आघाडी सरकारने विधानसभेत म्हटले. तीच गोष्ट परमवीर सिंगांची. गृहमंत्री अनिल देशमुख हे उत्तम काम करत आहेत असेच सरकारने म्हटले होते. या तिघांच्याही विकेट्स पडल्या. आता पुढचा नंबर कोणाचा? एकूणच या प्रकाराने महाभकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला काळिमा फासला हे नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 04/05/2021 - 19:30

In reply to आता पुढचा नंबर कोणाचा? by चंद्रसूर्यकुमार

Permalink

संजय राठोडची सुद्धा विकेट

संजय राठोडची सुद्धा विकेट गेली. नाना पटोलेने सभापतीपद सोडले. अजून काही विकेट्स पडणार हे नक्की. एकूणच या प्रकाराने महाभकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला काळिमा फासला हे नक्की. पूर्ण सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by श्रिपाद पणशिकर on Tue, 04/06/2021 - 02:13

In reply to आता पुढचा नंबर कोणाचा? by चंद्रसूर्यकुमार

Permalink

माझ्या कडे नका बघु बे मि फक्त

माझ्या कडे नका बघु बे मि फक्त समान सन्मान द्या म्हटले होते :- बाळासाहेब थोरात
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Mon, 04/05/2021 - 20:20

Permalink

खळबळजनक ! राफेल करारात

French aircraft manufacturer Dassault Aviation had paid one million euros to an Indian company owned by a middleman, being investigated for another defence deal in India, in connection with the €7.87-billion Rafale deal between India and France in 2016, French anti-corruption agency Agence Française Anticorruption (AFA) found in its audit, according to a French media report. https://www.thehindu.com/news/national/rafale-deal-french-anti-corruption-agency-afa-found-dassault-paid-1-million-euros-to-middleman-report/article34243196.ece
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Mon, 04/05/2021 - 20:25

In reply to खळबळजनक ! राफेल करारात by गोंधळी

Permalink

दोन मुद्दे

दोन मुद्दे: १. सगळीकडे फ्रेंच मिडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे असेच वाचायला मिळत आहे. पण कोणीही त्या फ्रेंच मिडियाचे नाव/लिंक का दिली नसावी? खरं तर त्या फ्रेंच भ्रष्टाचारविरोधी एजन्सीच्या मुळातल्या अहवालाचा स्क्रीनशॉट टाकायला हवा होता. किमान लिंक तरी द्यायला हवी होती. त्यापैकी काहीही कसे झाले नाही? २. १९८५-८६ सालच्या बोफोर्स प्रकरणात एकूण ६४ कोटी रूपयांची लाच दिल्याचा आरोप होता. त्यानंतर ३०-३२ वर्षांनंतर एक मिलिअन युरो म्हणजे फक्त साडेसात-आठ कोटी रूपयांचा टेबलाखालून व्यवहार झाला? छ्या. थापा मारताना निदान हे गुणोत्तर लक्षात ठेऊन तरी थापा मारायच्या.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 04/05/2021 - 21:03

In reply to दोन मुद्दे by चंद्रसूर्यकुमार

Permalink

रफाल विमान व्यवहार हा भारत

रफाल विमान व्यवहार हा भारत सरकार व फ्रान्स सरकार यांच्यात झाला आहे. दोन सरकारांमध्ये झालेल्या व्यवहारात मध्यस्थ नसतो. हा व्यवहार एकूण ६०,००० कोटी रुपयांचा आहे. १० लाख युरो मध्यस्थाचे कमिशन म्हणजे जेमतेम ८-९ कोटी रूपये होतात. ६०,००० कोटींच्या व्यवहारात ८-९ कोटी म्हणजे १०,००० रूपयांच्या व्यवहारात जेमतेम १ रूपया कमिशन. अत्यंत हास्यास्पद आरोप आहे हा.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Mon, 04/05/2021 - 21:17

In reply to दोन मुद्दे by चंद्रसूर्यकुमार

Permalink

मिडियापार्ट नावाचं मीडिया

मिडियापार्ट नावाचं मीडिया पोर्टल आहे ते. सबस्क्रिप्शन असल्यामुळे नसेल मूळ लेख. खालील लिंक आहे. हा काही त्यांचा पहिला दावा नाही. आणि आरोप त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी तपास संस्थेच्या विरोधात लावला आहे. जगातील कुणीही भारत सरकारच्या विरोधात बोललं की त्याची विश्वासार्हता न बघता तळी उचलायला जायची फॅशन आहे सध्या आपल्याकडे. https://www.mediapart.fr/en/journal/international/040421/sale-french-rafale-jet-fighters-india-how-state-scandal-was-buried?_locale=en&onglet=full
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Mon, 04/05/2021 - 21:42

In reply to मिडियापार्ट नावाचं मीडिया by बिटाकाका

Permalink

तिकडचे वायर?

तिकडचं वायर किंवा स्क्रोल किंवा गेलाबाजार अक्षरनामा सारखे पोर्टल दिसते :) पण एक गोष्ट समजत नाही फ्रेंच सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी ब्युरो किंवा जे काही असेल त्याची वेबसाईट तर पेड नसेल. गोपनीय नसलेले सगळे सरकारी रिपोर्ट पब्लिक डोमेनमध्ये कोणालाही वाचता येतात. मग तिकडच्या वेबसाईटवरील अमक्यातमक्या पीडीफ फाईलमध्ये पान क्रमांक अमुकतमुकवर हा उल्लेख आहे असा संदर्भ द्यायला काय हरकत आहे? दुसरी गोष्ट म्हणजे असा उल्लेख आल्यानंतर फ्रेंच सरकारने कोणती चौकशी सुरू केली आहे का? उगीच बोफोर्स प्रकरणासारखे हे प्रकरण आहे असे ओढूनताणून संबंध जोडून धुरळा उडवून दाखवायचा प्रयत्न दिसतो. पण बोफोर्स प्रकरणाच्या वेळेस स्वीडीश नॅशनल रेडिओवरून ही बातमी प्रसारीत झाली होती उगीच कोणत्या तरी विश्वासार्हता वादात असलेल्या सोर्सकडून नाही हा फरक आहे. बाकी काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या नॅशनल हेराल्डमधूनही राफेल हे मोदींचे बोफोर्स आहे असे म्हटले होते. म्हणजे बोफोर्स प्रकरणात काहीतरी काळेबेरे होते हे काँग्रेसने स्वतःच मान्य केले असे म्हणायचे का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 04/06/2021 - 21:56

In reply to खळबळजनक ! राफेल करारात by गोंधळी

Permalink

तथाकथित कमिशन दिल्याच्या

तथाकथित कमिशन दिल्याच्या आरोपाचा फुगा फुटला. https://www.indiatoday.in/india/story/indian-firm-in-rafale-controversy-denies-irregularities-releases-proof-1787934-2021-04-06
  • Log in or register to post comments

Submitted by स्वलिखित on Wed, 04/07/2021 - 19:21

In reply to तथाकथित कमिशन दिल्याच्या by श्रीगुरुजी

Permalink

इतक्या फाड फाड इंग्रजीचे दुवे

इतक्या फाड फाड इंग्रजीचे दुवे देऊ नका राव , आईच्यान समजत नाही ,
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 04/06/2021 - 00:03

Permalink

केंद्राचा अजून एक स्तुत्य निर्णय

आघाडीच्या कर्मचाऱ्यांची लसीकरण नोंदणी बंद काही लोक फेक नोंदणी करतात म्हणून सर्वच ४५ खालील कर्मचार्‍यांच्चे लसीकरण बंद करुन मोठ्या भ्रष्टाचारास आळा घातला आहे. यात बरेचसे प्रामणिक फ्रंट लाइन वर्कर बाधित होतील , काही मरतील , लस न मिळाल्याने त्यांचे मनोबल कमी होइल असल्या फालतू गोष्टींची आणि माणसांची तमा ना बाळगता हा कठोर निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन ! मागच्या ७० वर्षात फ्रंट लाइन वर्कर चा डेटाबेस तयार ना केल्याबद्दल निकम्म्या कॉम्ग्रेस सरकारचा तीव्र निषेध !!
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Tue, 04/06/2021 - 00:49

Permalink

काहीच चोकशी

काहीच चोकशी नाही,पूर्ण माहिती नाही तरी राफेल मध्ये दलाली दिली नाही असे वाटणे हे शुद्ध आंधळे पना आहे. उगाचच कोणाचेच समर्थन करायची गरज नाही. मेंदू वापरला नाहीत तर उत्क्रांती च्या नियमा नुसार माणसाचा मेंदू लहान होत जाईल मग मारा जंगलात झाडांवर उड्या
  • Log in or register to post comments

Submitted by श्रिपाद पणशिकर on Tue, 04/06/2021 - 01:58

Permalink

मेंदूचा वापर केल्यास

मेंदूचा वापर केल्यास किंवा करायचा झाल्यास तार्किक शक्यतांचा विचार करावा लागेल. लाच कदाचित तेंव्हाही दिली गेलेली असु शकेल जेंव्हा युरोफायटर आणि रफाल मध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी UPA सरकारच्या काळात चुरस सुरू होती.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रिपाद पणशिकर on गुरुवार, 04/08/2021 - 20:22

In reply to मेंदूचा वापर केल्यास by श्रिपाद पणशिकर

Permalink

अपेक्षेप्रमाणे रफाल पुन्हा

अपेक्षेप्रमाणे रफाल पुन्हा एकदा बुमरॅंग झालय. जसे मी वरील प्रतिक्रियेमध्ये शक्यता वर्तवली होती लाच युपिए सरकारच्या काळातच दिली गेली होती. हा एक थ्रेड आहे व्टिटरवर तसे बरीच माहिती अव्हेलेबल आहे. ""According to an spreadsheet belonging to Sushen Gupta, an entity called “D” (Dassault), paid 14.6million€ to Interdev in Singapore over the period 2004-2013. Interdev transferred just 2.6M€ to the Indian company IDS, while 11.9M€ was transferred to Interstellar in Mauritius"" https://twitter.com/AnttonRouget/status/1380096164779937795?s=20
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 04/08/2021 - 21:33

In reply to अपेक्षेप्रमाणे रफाल पुन्हा by श्रिपाद पणशिकर

Permalink

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष .....

यांच्यावर माझा कधीच विश्र्वास नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by श्रिपाद पणशिकर on Tue, 04/06/2021 - 02:08

Permalink

आज इतक्या घडामोडी झाल्या पण

आज इतक्या घडामोडी झाल्या पण गरीबों का गालिब एका सेकंदा करता सुद्धा कॅमेरा समोर आला नाही ना त्या राष्ट्रीय मुद्यांवर आक्रमक पणे बोलणार्या आंतरराष्ट्रीय महापौर कुठे दिसल्या. कोणीतरी कोणालातरी ह्यांना कोंडुन ठेवायचे आदेश तर नव्हते ना दिले ;) उशिरा सुचलेले शहाणपण :)
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 04/06/2021 - 19:23

Permalink

विश्वविक्रम

९० रजिस्टर्ड मतदार असतना तब्बल १७१ मतांची नोंद करुन निवडणूक आयोगाने जो विश्वविक्रम केला आहे , त्याबद्दल अभिनंदन !
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Tue, 04/06/2021 - 20:02

In reply to विश्वविक्रम by कपिलमुनी

Permalink

बातमी सनसनाटीत देणे वगैरे ठीक

बातमी सनसनाटीत देणे वगैरे ठीक आहे, पण असे का झाले तेही सोबत मांडावे असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Tue, 04/06/2021 - 20:22

In reply to बातमी सनसनाटीत देणे वगैरे ठीक by राघव

Permalink

त्याच्याशी त्यांना काही घेणं

त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही, ती बातमी वाचली असती तरी काय घोळ झाला ते कळलं असतं. कुठून तरी इलेक्शन कमिशन बोगस आहे हे दाखवून द्यायचं. तरी बरं इलेक्शन कमिशनने स्वतःच हा घोळ शोधलाय आणि कारवाई केलीय. १७१ पैकी कुठल्या पक्षाला किती हे कळलं तर मजा येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Tue, 04/06/2021 - 21:38

In reply to त्याच्याशी त्यांना काही घेणं by बिटाकाका

Permalink

तुम्ही लिहिलेत ते बरं केलं.

तुम्ही लिहिलेत ते बरं केलं. त्यानिमित्ताने बातमी वाचली पुर्ण. निवडणूक आयोगाची काही चुकी नव्हती. हेडींग चुकीची दिलीय.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 04/06/2021 - 19:29

Permalink

जय योगीं

ट्वीटर योगींनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेस चुतीया असे संबोधून त्यांचा सन्मान वाढवला आहे. संतांची दुषणे ही सुद्धा आशिर्वाद असतात म्हणून ANI ने व इतर सर्व राष्ट्रप्रेमी पत्रकारांनी यावर भाष्य टाळले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Wed, 04/07/2021 - 00:42

In reply to जय योगीं by कपिलमुनी

Permalink

योगी महोदयांशी ह्या बाबतीत

योगी महोदयांशी ह्या बाबतीत अनेक मतदार सहमत असतील असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 04/07/2021 - 09:51

In reply to योगी महोदयांशी ह्या बाबतीत by साहना

Permalink

कुमार केतकर, संजय राऊत,

कुमार केतकर, संजय राऊत, प्रसन्न जोशी, निखिल वागळे, विजय चोरमारे, बरखा दत्त, रवीश कुमार, राजदीप सरदेसाई, सागरिका घोष वगैरे विकाऊ बातमीदार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत या कल्पनेनेच हसू आवरले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Wed, 04/07/2021 - 10:13

In reply to कुमार केतकर, संजय राऊत, by श्रीगुरुजी

Permalink

गोदी मिडीया

https://youtu.be/XiqW-4kB0Tk
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Wed, 04/07/2021 - 10:39

In reply to कुमार केतकर, संजय राऊत, by श्रीगुरुजी

Permalink

"आदरणीय "

आणि त्या बरोबर खालील "आदरणीय " नावे हि घेण्यात यावीत मेधा पाटकर अरुंधती रॉय शेखर गुप्ता विजय राज अधून मधून कमल हसन महेश भट्ट
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 04/07/2021 - 10:47

In reply to "आदरणीय " by चौकस२१२

Permalink

आणि ते अभिसार, अंजुम,

आणि ते अभिसार, अंजुम, पुण्यप्रसून, आशुतोष, रॉयसाहेब, कंवलसाहेब वगैरे मंडळी राहिलीच.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 04/07/2021 - 10:47

In reply to "आदरणीय " by चौकस२१२

Permalink

आणि ते अभिसार, अंजुम,

आणि ते अभिसार, अंजुम, पुण्यप्रसून, आशुतोष, रॉयसाहेब, कंवलसाहेब वगैरे मंडळी राहिलीच.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Wed, 04/07/2021 - 11:21

In reply to आणि ते अभिसार, अंजुम, by बिटाकाका

Permalink

आणखी दोन

तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर सुध्दा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 04/07/2021 - 07:08

In reply to जय योगीं by कपिलमुनी

Permalink

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेस फिदी फिदी फिदी . . .
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Wed, 04/07/2021 - 09:37

In reply to जय योगीं by कपिलमुनी

Permalink

भावी पं.प्र.

भावी पं.प्र. आहेत ते भक्तांचे मोदींनंतर त्याची गादी चालवायला.
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Wed, 04/07/2021 - 00:38

Permalink

आत्ताच्या कठिण काळात सुशोभीकरणासाठी कशाला खर्च करतायत?

https://www.lokmat.com/politics/aditya-thakare-sanctioning-dpdc-funds-43-shivsena-corportors-says-congress-janardan-chandurkar-a629/
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 04/07/2021 - 10:41

In reply to आत्ताच्या कठिण काळात सुशोभीकरणासाठी कशाला खर्च करतायत? by सुखीमाणूस

Permalink

पुढे विलेक्शन येऊ घातलेले

पुढे विलेक्शन येऊ घातलेले आहेत! त्यांचा सहयोगी पक्ष काय म्हणतोय यावर बघा. https://youtu.be/GRAhJqSk-uw
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 04/07/2021 - 19:29

Permalink

अनिल देशमुखांनी २ कोटी

अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले, अनिल परबांनी ५० कोटी वसुलीचे लक्ष्य दिले. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/anil-deshmukh-anil-parab-asked-me-to-extort-over-rs-100-crore-sachin-vaze-claims-in-letter/articleshow/81952718.cms सचिन वाझे आता इतरांनाही बुडविणार.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Wed, 04/07/2021 - 20:15

In reply to अनिल देशमुखांनी २ कोटी by श्रीगुरुजी

Permalink

जे काही लेखी म्हणणे मांडायचे

जे काही लेखी म्हणणे मांडायचे असेल ते कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच मांडावे, असे सांगून कोर्टाने ते नोंदीवर घेण्यास नकार दिला. आणि पत्र सोशल मीडिया वरती viral झाले.. यामध्ये कोणालाच कसला हात वाटत नाहीये का? उद्या मी पण असे आरोप करून काहीही viral करू शकेल.. म्हणजे जर evm गाडीत सापडले तर आपण दोन्ही बाजूने विचार करतो.. येथे काय सांगावे खरे काय खोटे काय.. कोर्टाने केस चा निर्णय देई पर्यंत कोणाचे खरे हे कसे सिद्ध होईल? सोशल मीडिया वर पत्रे पसरवून result थोडाच लागेल..? बाकी जे दोषी असतील त्यांना शिक्षा व्हावी.. पण ते दोष सोशल मीडिया वर नाही कोर्टात सिद्ध करायचे आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 04/07/2021 - 20:28

In reply to जे काही लेखी म्हणणे मांडायचे by गणेशा

Permalink

यामध्ये कोणालाच कसला हात वाटत

यामध्ये कोणालाच कसला हात वाटत नाहीये का? या सर्व प्रकारात प्रचंड रहस्ये लपलेली दिसतात. एकापाठोपाठ एक रहस्ये आता बाहेर येत आहेत. आतापर्यंत बाहेर आलेली प्रकरणे म्हणजे हिमनगाचे टोक वाटते. यातील खरे किती आणि खोटे किती हे सांगता येणे अवघड आहे. आता राष्ट्रीय तपास संस्था, केंद्रीय तपास संस्था यात उतरल्याने कपाटातील बरेच सापळे बाहेर येण्याची शक्यता आहे. आता अंमलबजावणी संचलनालय सुद्धा यात येईल. एकंदरीत यात बऱ्याच जणांचा बळी जाणार असं वाटतंय. ही प्रकरणे वापरून ठाकरेंना पायउतार होण्यास लावणे किंवा राष्ट्रवादीने बाहेर पडून भाजपला पाठिंबा देऊन आपली कातडी वाचविणे हा या प्रकरणाचा तार्किक शेवट असेल. एकंदरीत महाराष्ट्रात आपले सरकार आणण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार या प्रकरणाचा पुरेपूर वापर करून घेणार हे नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Wed, 04/07/2021 - 20:52

In reply to यामध्ये कोणालाच कसला हात वाटत by श्रीगुरुजी

Permalink

केंद्रीय तपास यंत्रणा

केंद्रीय तपास यंत्रणा ह्या सक्षम,निःपक्ष,हुशार,आहेत हा मोठा गैरसमज आणि अंध विश्वास आहे.केंद्रीय तपास यंत्रणा वापरून केंद्र सरकार स्व पक्षाचे नावडते सरकार आणि विरोधी पक्षांचे अती नावडते सरकार ज्या राज्यात आहे तेथील सरकार ना अडचंतीत आणायचे उद्योग केंद्र सरकार निरंतर करत असते.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 04/07/2021 - 20:56

In reply to केंद्रीय तपास यंत्रणा by Rajesh188

Permalink

हा शोध २०१४ ला लागला की आधीच?

हा शोध २०१४ ला लागला की आधीच??
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Wed, 04/07/2021 - 20:56

In reply to यामध्ये कोणालाच कसला हात वाटत by श्रीगुरुजी

Permalink

श्रीगुरुजी,

श्रीगुरुजी, Ipl मुळे केबल घेतली शेवटी बऱ्याच वर्षांनी, आता बातम्या बघेल बहुतेक एक वर्षानंतर.. बघू काय डोकेदुखी दाखवतात.. बरे होते इतके पुर्ण वर्षे.. हिंदी बातम्या शक्यतो पाहत नाही, मराठी बातम्या देणारे खुप boar करतातच.. त्यात तसल्या महाचर्चा अवघड.. Ipl २०२१ धागा काढा राव. यावेळेस dream ११ जोरात
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 04/07/2021 - 21:02

In reply to श्रीगुरुजी, by गणेशा

Permalink

९ एप्रिलला आयपीएलचा धागा सुरू

९ एप्रिलला आयपीएलचा धागा सुरू करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 04/07/2021 - 21:07

In reply to जे काही लेखी म्हणणे मांडायचे by गणेशा

Permalink

हा आरोप 'कुणीही' केलेला आहे

हा आरोप 'कुणीही' केलेला आहे का? खरंच तुम्हाला तसे वाटते? आश्चर्य आहे. सोशल मीडियावर कुणीच काही सिद्ध करत नाहीये. एक माहितीचा स्रोत बाहेर आला, जसे अनेक इतर हजारो गोष्टी बाहेर येतात (अधिकृत वृत्तसंस्थेचे ऑफलाईन बाईट वगैरे वगैरे), ज्याने त्याने ठरवावे की त्या माहितीवर विश्वास ठेवावा की नाही. निर्णय शेवटी कोर्टातच होईल, जसा पत्रावरून काय करायचं यावर काही दिवसांपूर्वी झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 04/07/2021 - 20:17

Permalink

कोर्टाने ते नोंदीवर घेण्यास

कोर्टाने ते नोंदीवर घेण्यास नकार दिला. हा तांत्रिक मुद्दा आहे कारण न्यायालयात जे काही सांगायचे आहे ते शपथपत्रावर( AFIDAVIT) सांगायचे असते. एकदा तुम्ही शपथपत्रावर सही केली कि नंतर मी असे म्हणालोच नव्हतो किंवा दबावाखाली होतो असल्या सबबी चालत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Wed, 04/07/2021 - 20:24

In reply to कोर्टाने ते नोंदीवर घेण्यास by सुबोध खरे

Permalink

बरोबर, म्हणुन सोशल मीडिया वर

बरोबर, म्हणुन सोशल मीडिया वर पब्लिश करणे, ते हि असे पुरावे ज्याच्यात नेत्यांची नावे आहेत.. हे मला तरी योग्य वाटत नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 04/07/2021 - 23:03

In reply to बरोबर, म्हणुन सोशल मीडिया वर by गणेशा

Permalink

ते पत्र श्री वाझे यांनी

ते पत्र श्री वाझे यांनी आपल्या वकिलामार्फत न्यायालयात दिले होते न्यायालयाने ते तसे घेण्यास नकार दिला आहे म्हणून त्यांनी ते पत्र वकिलामार्फत सर्व पत्रकारांना दिले आहे. जे पत्र स्वतः वाझे यांनीच प्रसिद्धीसाठी दिले आहे त्याचे जालावर वितरण होणे चूक कसे म्हणता येईल? वाझे याना एखादे वेळेस जीवाची भीती असेल त्यासाठी त्यांनी स्वतः च्या हस्ताक्षरात लिहिलेले पत्र दिले आहे. सत्य कदाचित बाहेर येईलही किंवा साटेलोटे करून दाबून टाकले जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Wed, 04/07/2021 - 20:56

Permalink

भारतात

भारताच्या आता पर्यंत च्या इतिहासात केंद्र सरकार नी सर्व राज्यांशी समान संबंध कधीच ठेवले नाहीत. नेहमीच राज्यसरकार अडचणीत आणयाचे उद्योग केंद्र करत आलेले आहे. केंद्र आणि राज्य ह्यांच्या सलोख्याचे संबंध त्या मुळे भारतात निर्माण च झाले नाहीत. लोकांना केंद्र सरकार पेक्षा राज्य सरकार जास्त जवळचे वाटणे हे नैसर्गिक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 04/07/2021 - 22:06

Permalink

८-१० दिवसांपूर्वी पवार शहांना

८-१० दिवसांपूर्वी पवार शहांना कर्णावती शहरात गुपचुप भेटले होते. फडणवीसांऐवजी दुसरा कोणी मुख्यमंत्री करीत असाल तर पाठिंबा देऊ, असे पवारांनी शहांना सांगितले असे एक पत्रकार सांगत आहे. शहांनी त्यावर कोणतेच आश्वासन न देता २ मे पर्यंत थांबायला सांगितले म्हणे. आता फडणवीस पवारांची भेट घेणार आहेत. प्रकृतीची चौकशी करणार म्हणे. एकंदरीत काही तरी शिजताना दिसतंय. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/opposition-leader-devendra-fadnavis-will-meet-ncp-president-sharad-pawar/articleshow/81954514.cms
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Wed, 04/07/2021 - 22:38

In reply to ८-१० दिवसांपूर्वी पवार शहांना by श्रीगुरुजी

Permalink

त्या पत्रकाराला कोणी सांगितले

त्या पत्रकाराला कोणी सांगितले? गपचूप भेट म्हणल्यावर, पवारांनी कि शहा यांनी? फडणवीस व्यापारी लोकांची बाजू हि मांडण्यासाठी जात आहे असे आत्ताच news ला सांगत होते.. असो.. बीजेपी ला आता राष्ट्रवादी ने निवडणुकी अगोदर कोणत्याही कारणाने पाठींबा दिला तरी मी कायम राष्ट्रवादी विरोधी मतदान करेल.. आणि असे होणार नाही हे मला माहित आहे.. Bjp ला आणि खास करून फडणवीस यांना हे का मान्य नाही कि आपण करोना काळात तरी खुर्ची खुर्ची करून महाराष्ट्राचा मध्यप्रदेश करू नये.. बस ना आता २ वर्षे होतील.. सारखे त्या खुर्ची साठी किती आटापिटा? उलट ते राष्ट्रवादी काँग्रेस, इतक्या वर्षे सत्तेत असताना मागच्या टर्म ला बाहेर होते त्यांनी हि इतकी आदळ आपट केली नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 04/07/2021 - 22:46

In reply to त्या पत्रकाराला कोणी सांगितले by गणेशा

Permalink

फडणवीस नेमकी काय आदळआपट करत

फडणवीस नेमकी काय आदळआपट करत आहेत ते सविस्तर लिहा. सात्ताधाऱ्यांच्या भानगडी उघड्या पडणे म्हणजे खुर्ची खुर्ची करणे असते होय. बादवे, कोणाला आवडो न आवडो, जनतेने त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले होते, त्यामुळे माझ्यामते तरी, भाजप ने हे सरकार घालवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेच करावे. *********** भाजप ने राष्ट्रवादी किंवा शिवसेनेची कास धरली तर भाजपला मतदान न करण्याचा मानस माझी बरीच परिचित मंडळी बाळगून आहेत असे जाणवले, माझाही साधारण तोच विचार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Wed, 04/07/2021 - 23:42

In reply to फडणवीस नेमकी काय आदळआपट करत by बिटाकाका

Permalink

बिटाकाका,

बिटाकाका, खरेच आता राजकीय जास्त लिहीत नाहीये, एक गोष्ट लिहिली कि पुढे धागेच्या धागे लिहावे लागतात.. आणि मग खुप वेळ जातो.. फडणवीस यांचे वागणे वयक्तिक रित्या मला, कुराघोडीचे वाटते.. राजकारण विषय आल्यावर खुप बोलावे लागते.. आणि कोणीच आपली बाजू सोडत नाही.. जे चूक वाटते ते चूक हि साधी गोष्ट पण लोक एकच बाजू कायम बरोबर धरतात.. म्हणुन कोणाला पटवून सांगण्यासाठी नको लिहायला वाटते आहे.. आणि वयक्तिक हेवेदावे खुप होतात.. म्हणुन राजकीय मी खुप सौम्य आणि कधीतरी लिहितोय.. Else मला राजकारण खुप आवडते.. आणि राजकीय मते मांडायला हि..
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com