✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ७)

श
श्रीगुरुजी यांनी
Fri, 03/19/2021 - 07:59  ·  लेख
लेख
उत्तर प्रदेश मधील पुढील विधानसभा निवडणुक फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल. एबीपी सी-व्होटरने नुकत्याच केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा दोन तृतीयांश बहुमत मिळविण्याची शक्यता आहे. परंतु भाजप ३६ जागा गमावून ४०३ पैकी २८९ जागा मिळवू शकतो. सप (४७ वरून ५९) व बसपला (१९ वरून ३८) थोडा फायदा होईल. परंतु कोणताही पक्ष ६० हा आकडा पार करू शकणार नाही. कॉंग्रेस या राज्यातून फार पूर्वीच संपली आहे. https://news.abplive.com/news/india/abp-news-cvoter-up-survey-election-seat-projection-uttar-pradesh-seat-projection-bjp-vs-inc-vs-sp-vs-bsp-1449077
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53106 वाचन

💬 प्रतिसाद (168)

प्रतिक्रिया

सचिन वाझे चेकमेट, CIU मधील अधिकारी माफीचा साक्षीदार होणार?

मुक्त विहारि
Fri, 03/19/2021 - 08:08 नवीन
https://www.tv9marathi.com/crime/ciu-unit-officer-riyaz-kazi-may-become-witness-against-sachin-vaze-sachin-waze-in-ambani-bomb-case-420766.html/amp नक्की काय होईल? ते सांगता येत नाही...
  • Log in or register to post comments

बुद्धिमान

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 03/19/2021 - 09:05 नवीन
मनसुख हिरेन ह्यांचा खून वाझे ह्यांनी का केला ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. एन आय ए ने प्रामाणिक्पणे काम करुन वाझे ह्यांनी हिरेन ह्यांना का मारले ते सांगावे. अन्यथा ह्या संस्थेवरीलही लोकांचा विश्वास उडेल. मीडिया,पत्रकार हा मुद्द्दा सोडुन वेगळ्याच विषयावर बोलत आहेत. दया येतेय ती स्वयंघोषित बुद्धिमंतांची. शिवसैनिकांनी काळे फासले म्हणून अग्रलेख लिहिणारे हत्या झाली तरीही गप्पच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

दीड दिवसांत काय झाले?

मुक्त विहारि
Fri, 03/19/2021 - 09:52 नवीन
हे जसे कधीच समजणार नाही, तसेच काही प्रकरणांच्या बाबतीत, सर्वच देशांत, कमी-अधिक प्रमाणात होते... परदे में रहने दो, परदा ना उठाओ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

पूर्वेतिहास

चंद्रसूर्यकुमार
Fri, 03/19/2021 - 09:07 नवीन
मतदानाला एक वर्ष राहिलेले असताना घेतलेल्या अशा चाचण्यांवर फार विश्वास ठेवावा असा त्यांचा पूर्वेतिहास नाही. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांसाठी केलेल्या अशा चाचण्यांचे अंदाज पुढे देत आहे: DatePolling AgencyBSPBJPSPINCOthersMar 2016ABP News Opinion Poll18512080135Jul-Aug 2016ABP News-Lokniti103-113 (108)124-134 (129)141-151 (146)8-14 (11)6-12 (9)Aug 2016India TV-CVoter95-111 (103)134-150 (142)133-149 (141)5-13 (9)4-12 (8)Oct 2016India Today-Axis115-124 (120)170-183 (177)94-103 (99)8-12 (10)2-6 (4)Jan 2017ABP News-Lokniti-CSDS93-103 (98)129-139 (134)141-151 (146)13-19 (16)N/AJan 2017India Today-Axis79-85 (82)206-216 (211)92-97 (95)5-7 (6)7-11 (9)Polls Average116152118117 (संदर्भ: https://www.india.com/news/india/uttar-pradesh-assembly-elections-2017-opinion-poll-results-1761164/) मतदान सुरू व्हायला एक महिना राहिलेला असताना इंडिया टुडे-अ‍ॅक्सिसने भाजपला २०६ ते २१६ जागा दिल्या होत्या. इतर कोणतीही चाचणी भाजपला साधे बहुमतही देत नव्हती. मतदानाला एक वर्ष राहिलेले असताना एबीपीने तर बसपला १८५ आणि भाजपला १२० जागा मिळतील असा पूर्ण फसलेला अंदाज व्यक्त केला होता. मतदान झाल्यानंतरच्या एक्झिट पोलमध्येही सगळ्यांनी बरोबर अंदाज व्यक्त केले होते असे नाही. चाणक्यने भाजपला २५२ तर इंडिया टुडे-अ‍ॅक्सिसने २८५ जागा दिल्या होत्या. त्यातल्या त्यात इंडिया टुडे-अ‍ॅक्सिसचा अंदाज सगळ्यात जवळ होता. पण त्यांचाच एक वर्ष आधी केलेल्या चाचणीचा अंदाज पूर्ण फसला होता.
  • Log in or register to post comments

मी अशा चाचण्यांवर संपूर्ण

श्रीगुरुजी
Fri, 03/19/2021 - 09:44 नवीन
मी अशा चाचण्यांवर संपूर्ण विश्वास कधीच ठेवत नाही. परंतु यातून साधारण कल समजू शकतो. वरीलपैकी २०१६ मधील चाचण्या व २०१७ मधील चाचणी यादरम्यान नोव्हेंबर २०१६ मध्ये निश्चलनीकरण हा महत्त्वाचा निर्णय झाला होता व तो निर्णय भाजपला बराच फायदेशीर ठरला असणार. विशेषतः २०१६ च्या तुलनेत २०१७ मधील भाजपच्या जागांचा अंदाज एकदम वाढलेला दिसतो यावरून हा निष्कर्ष काढता येईल. प्रत्यक्ष निवडणुकीत बसप वेगळा लढणे आणि सप-कॉंग्रेस युतीमध्ये कॉंग्रेसला ४०३ पैकी तब्बल १०३ जागा मिळणे (त्यातील फक्त ७ जागा कॉंग्रेस जिंकू शकला) हे सुद्धा भाजपच्या पथ्यावर पडले होते. बिहारमध्ये २०२० च्या निवडणुकीत राजदने कॉंग्रेसला तब्बल ७६ जागा देण्याची घोडचूक केली होती कारण कॉंग्रेस फक्त १७ जागा जिंकले. तीच चूक अखिलेशने सुद्धा केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

उत्तराखंड मधील पुढील विधानसभा

श्रीगुरुजी
Fri, 03/19/2021 - 21:22 नवीन
उत्तराखंड मधील पुढील विधानसभा निवडणुक फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल. एबीपी सी-व्होटरने नुकत्याच केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार उत्तराखंडमध्ये भाजप फक्त २७ जागा मिळवून सत्ता गमाविण्याची शक्यता आहे व कॉंग्रेस ३५ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनण्याची शक्यता आहे. या राज्यात दर ५ वर्षांनी सत्ताबदल होतो. त्यामुळे या अंदाजात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. यातील रोचक अंदाज म्हणजे आआपला ९.२ टक्के मिळून ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. https://www.google.com/amp/s/news.abplive.com/news/india/abp-news-cvoter-uttarakhand-survey-election-seat-vote-share-projection-uttarakhand-seat-projection-bjp-vs-inc-vs-others-1449068/amp
  • Log in or register to post comments

या राज्यात दर ५ वर्षांनी सत्ताबदल होतो.

मुक्त विहारि
Fri, 03/19/2021 - 21:48 नवीन
जबरदस्त माहिती.... अभ्यास करतो आणि मग प्रश्र्न विचारतो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पंजाबमधील पुढील विधानसभा

श्रीगुरुजी
Fri, 03/19/2021 - 22:23 नवीन
पंजाबमधील पुढील विधानसभा निवडणुक फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल. एबीपी सी-व्होटरने नुकत्याच केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार पंजाबमध्ये ११७ पैकी ५१-५७ जागा मिळवून आआप सर्वात मोठा पक्ष बनण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसला ४३-४९, अकाली दलाला १२-१८ व भाजपला ०-५ जागा मिळण्याची शक्यता आहे. २०१७ च्या निवडणुकीपूर्वी काही सर्वैक्षण संस्थांनी आआप ९०-१०० जागा मिळविण्याचे भाकीत केले होते. परंतु प्रत्येक्ष निवडै कॉंग्रेसने ७२ तर आआपने २० जागा जिंकल्या होत्या. https://m.lokmat.com/politics/opinion-poll-after-delhi-aap-will-now-be-biggest-party-punjab-too-if-elections-are-held-today-a301/
  • Log in or register to post comments

फेल्युअर ऑफ गवर्नमेंट

मदनबाण
Sat, 03/20/2021 - 00:19 नवीन
वाझे यांना [ त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब असुन देखील ] परत घेण्यासाठी २०१८ मध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव होता,स्वतः उद्धव ठाकरे [ सध्याचे मुख्यमंत्री ] यांनी फोन केला होता आणि त्यांचे मंत्रीगण देवेंद्र फडणवीस यांना याच कारणासाठी भेटले होते असे देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले आहे. कोरोनाचा कारण देउन त्यांना परत घेण्यात आले. आता हे उघड झाले आहे की सत्तेत असलेली शिवसेना वाझे यांना परत आणण्यासाठी अस्वस्थ होती आणि संधी मिळताच त्यांनी त्यांना परत आणलेच आणि अत्यंत महत्वाच्या पदावर बसवुन हायप्रोफाइल केसेस त्यांच्याचकडे जातील हे देखील पाहिले गेले. आता या प्रकरणात वाझे यांचे नाव आल्या पासुन मुख्यमंत्र्यां पासुन त्यांच्या पक्षातील इतर जणांनी त्यांचा बचाव करण्याचा उघड प्रयत्न केलाच नव्हे त्यांना प्रामाणिक अधिकारी असल्याचे प्रशस्ती पत्रक देउन वाझे म्हणजे लादेन नाही असे म्हणणा पर्यंत सत्ताधिशांची मजल गेली. आता वाझे आणि परमबीर सिंग यांना "आदेश" देणारे जे कोणी आहेत त्यांना शोधुन काढणे अत्यंत महत्वाचे ठरते कारण हे दोघही केवळ आज्ञेचे पालन करणारी प्यादी आहेत,वझिर आणि राजा अजुनही मोकळेच आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस यांनी या सर्व प्रकरणातुन स्वतःच्या अंगावर कुठलेही शिंतोडे उडु नये म्हणुन शिवसेने पासुन अंतर ठेवण्यास सुरु केले आहे. एकंदर घटनाक्रम पाहता यापुढे गृहमंत्री यांना राजिनामा ध्यायला सांगितला जाईल [ जो त्यांनी या आधीच ध्यायला हवा होता ] आणि परमबीर सिंग यांची सुद्धा चौकशी होउन त्यांना अटक होइल असे दिसते. एकंदर स्थिती पाहता हे सरकार आता अधिक काळ टिकणार नसुन, पक्ष म्हणुन शिवसेना पूर्णपणे लयास जाणार आहे. आता सरकार पडणे किंवा राष्ट्रपती राजवट लागु होणे या दोनच ठळक शक्यता समोर दिसतात. वाझे आणि परमबीर यांनी हाताळलेल्या प्रत्येक केस ची आता चौकशी होणे गरजेचे झाले असुन हे आता अगदी सुशांत सिंग हत्या प्रकरणा पर्यंत देखील जाउ शकते. का कोणास ठावुक पण आज मला चाणक्य मालिके मधील एक सीन आठवला, तो इथे देउन जातो :- जाता जाता :- कंगना राणावतचे घर उखाड दिया म्हणुन जल्लोश केल्यावर कंगना म्हणाली होती [ तिच्याच शब्दात ] :- उद्धव ठाकरे तुझे क्या लगता है, की तुने फिल्म माफिया के साथ मिलके मेरा घर तोडके मुझसे बोहत बडा बदला लिया है ? आज मेरा घर टुटा है, कल तेरा घमंड टुटेगा. ये वक्त का पहिया है, याद रखना हमेशा एक जैसा नही रहता.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Wo bhooli dastaan... :- Sanjog
  • Log in or register to post comments

फडणवीसांनी आता ह्या विषयावर

साहना
Sat, 03/20/2021 - 01:03 नवीन
फडणवीसांनी आता ह्या विषयावर मुक्ताफळे उधळण्यात काहीही अर्थ नाही. खंडणीखोर शिवसेना जोपर्यंत भाजपाची शय्या सोबत करत होता तो पर्यंत तो पतिव्रता, धार्मिक आणि देशप्रेमी होता. आता शिवसेनाच वाघ काँग्रेसची घंटा घालून बसलाय तर अचानक ह्यांना शिवसेनेचे प्रॉब्लेम दिसायला लागले ? उद्या उद्धव ह्यांनी युती करायचा प्रस्ताव दिला तर हेच फडणवीस लाळ घोटत जातील. शिवसेनेची गुंडगिरी आणि खंडणीखोर प्रवृत्ती ह्याला आळा घालण्यासाठी फडणवीसांनी काय केले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

का नाही?

सुक्या
Sat, 03/20/2021 - 04:05 नवीन
मी तर म्हणतो की फडणवीसांनी हे प्रकरण आणी बाकीची प्रकरणे (पुजा राठोड वगेरे) जोर लाउन धरावी ... आणी शिवसेनेने / किंवा महाविकास आघाडी ने फडणवीसांच्या काळातली प्रकरणे बाहेर काढावीत. कळु दे लोकांना काय खरे काय खोटे ते!! शिवसेना सत्तेत होती तेव्हा .. त्यांनाही माहीत असतील आतली अंडी पिली. "राजकारणात कुणीही कायम शत्रु किंवा मित्र नसतो" हे आपल्या राजकारणी मंडळींनी इतके ठासुन ठासुन सांगीतले आहे की आपण त्या सार्‍या गोष्टी ग्रुहीत धरतो. कुणीही राजकारणी १००% पवीत्र आहे असे नाही परंतु चुकीच्या गोष्टीचे जेव्हा असे खुले समर्थन केले जाते तेव्हा डोक्यात तीडीक जाते. मग ते वाझे प्रकरण असो किंवा मुंडे यांचे विवाह्बाह्य संबंधांचे प्रकरण. शिवसेनेची गुंडगिरी आणि खंडणीखोरी काही आज काल सुरु झाली नाही. तरीही मुंबई महानगर पालिकेत शिवसेना का निवडुन येते? जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीचीच असते. मग ते कालचे सहकारी असणारे काढत असली तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

फडणवीसांनी आता ह्या विषयावर

श्रीगुरुजी
Sat, 03/20/2021 - 07:38 नवीन
फडणवीसांनी आता ह्या विषयावर मुक्ताफळे उधळण्यात काहीही अर्थ नाही. खंडणीखोर शिवसेना जोपर्यंत भाजपाची शय्या सोबत करत होता तो पर्यंत तो पतिव्रता, धार्मिक आणि देशप्रेमी होता. आता शिवसेनाच वाघ काँग्रेसची घंटा घालून बसलाय तर अचानक ह्यांना शिवसेनेचे प्रॉब्लेम दिसायला लागले ? + ९९९९९९९९ . . . शिवसेना १९८९ पर्यंत मुंबई महापालिकेच्या काही प्रभागांच्या बाहेर क्वचितच गेली असेल. भाजपनेच सेनेला मुंबईबाहेर नेऊन मोठे केले. भाजपनेच बाळ ठाकरेंची larger-than-life प्रतिमा निर्माण करण्यात सिंहाचा वाटा उचलला. सेनेने वाजपेयी, अडवाणी, मोदी, शहा अशांवर अनेकदा शिवराळ टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी उधोजींनी शहांचाही उल्लेख निर्लज्ज असा केला. परंतु भाजपने बाळ ठाकरेंविरूद्ध आजतागायत चकार शब्द काढलेला नाही. बाळ ठाकऱ्यांनी व नंतर उधोजींनी सामना किंवा जाहीर सभेतून केलेल्या अर्वाच्य टीकेचे "ठाकरी भाषा" या शब्दात भाजप कौतुक करायचा. २०१४-२०१९ या काळात तर सेनेची चाटुगिरी करण्याचा कळस झाला होता. उधोजींची प्रत्येक मागणी मान्य केली गेली. उद्या उद्धव ह्यांनी युती करायचा प्रस्ताव दिला तर हेच फडणवीस लाळ घोटत जातील. १०१ टक्के असेच होईल. ४-५ महिन्यांपूर्वीच राऊत व फडणवीसांची यासंदर्भात २ तास भेट झाली होती. अजून डील जमलेले दिसत नाही. सेनेने मविआतून बाहेर पडून आमच्याशी पुन्हा युती करावी, हा प्रस्ताव पाटलांनी पूर्वीच दिला आहे. शिवसेनेची गुंडगिरी आणि खंडणीखोर प्रवृत्ती ह्याला आळा घालण्यासाठी फडणवीसांनी काय केले ? शिवसेना व इतर पक्षांची गुंडगिरी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी फडणवीसांनी ५ वर्षे काहीही केले नाही. आपले आसन सुरक्षित ठेवण्यासाठी लाचारी करणे व भ्रष्टांना अभय देणे एवढेच काम त्यांनी ५ वर्षे केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

भाजपने सेनेला मोठे करून

रात्रीचे चांदणे
Sat, 03/20/2021 - 12:14 नवीन
भाजपने सेनेला मोठे करून नक्कीच चूक केली आहे. त्याचबरोबर फडणवीसांनी सुद्धा सत्तेत असताना सेनेची गुंडशाही सहन केलेली आहे आणि त्यात दोष हा फडणवीस यांचा नक्कीच आहे. परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे प्रकरण, पूजा, मुंढे प्रकरण यांत शांत बसून एक प्रकारे सेनेलाच मदत करावी अशी तुमचा मानस आहे का? साध्याला सेना सत्तेत आहे तर भाजपा विरोधात आहे, सत्ता धारांच्या चुका काढण्याचे काम हे विरोधकांचे आहे आणि ते फडनविन करत आहेत. यात कहीही चूक नाही. पुर्वी फडणवीसांनी शांत बसून चुका केल्या म्हणून आत्ताही केल्या च पाहिजेत हे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मुळात ....

मुक्त विहारि
Sat, 03/20/2021 - 12:30 नवीन
भाजप मध्ये, एकाधिकारशाही नाही, ही वस्तुस्थिति आहे... फडणवीस यांना वकीलपत्र देऊन, भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी, त्यांना हालचाल करायला सांगीतली... काही गोष्टी उघडपणे कुणीच अंगावर घेत नाही, कुणाला तरी कमीपणा घ्यावाच लागतो आणि ह्या कमीपणाचे फळ, योग्य वेळ येताच, फडणवीस यांना केंद्रीय मंत्रीमंडळात घेऊन, नक्कीच देतील...(माझ्या अंदाजाने, गृहखाते, कारण बिहारमध्ये फडणवीस यांना उगीच पाठवले न्हवते..) अपयशातून, भाजप आणि शरद पवार, फार लवकर सावरतात... छोट्या चकमकी जरूर हरतात, पण ऐनवेळी बरोबर खेळी करतात... /strong> दीड दिवसांत काय झाले, हे कधीच कळणार नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

सेनेच्या नेमक्या कोणत्या चुका

बिटाकाका
Sat, 03/20/2021 - 12:57 नवीन
सेनेच्या नेमक्या कोणत्या चुका फडणवीसांनी नेमक्या कशा दुर्लक्ष केल्या आणि (भाजप कडे बहुमतापासून 23 जागा कमी होत्या जे गृहीत धरून) फडणवीसांनी सेनेला धडा शिकवण्यासाठी नेमके काय करायला हवे होते यावर कुणी प्रकाश टाकेल का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे

श्रीगुरुजी
Sat, 03/20/2021 - 15:00 नवीन
परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे प्रकरण, पूजा, मुंढे प्रकरण यांत शांत बसून एक प्रकारे सेनेलाच मदत करावी अशी तुमचा मानस आहे का? नक्कीच नाही. ही प्रकरणे बाहेर काढलीच पाहिजेत. परंतु एकीकडे असल्या प्रकरणावरून बेंबीच्या देठापासून आरडाओरडा करायचा आणि दुसरीकडे पुन्हा एकदा एकत्र सरकार स्थापण्यासाठी चुंबाचुंबी करायची हे कसं चालणार? २०१४-२०१९ या काळातील सेना आताच्या सेनेपेक्षा वेगळी होती का? मग त्या काळात फडणवीस का शांत होते? सत्तेत नसताना इतर पक्षांची प्रकरणे बाहेर काढून आरडाओरडा करून गुन्हेगारांना चक्की पिसायला तुरूंगात टाकण्याची आश्वासने द्यायची आणि सत्ता मिळाली सर्व आश्वासने बासनात गुंडाळून क्लीन चिट देऊन सेना, राष्ट्रवादी वगैरे पक्षांची खुशामत करत बसायचे या दुटप्पी भूमिकेला विरोध आहे. यामुळेच त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

सत्तेत नसताना इतर पक्षांची

बापूसाहेब
Sat, 03/20/2021 - 16:02 नवीन
सत्तेत नसताना इतर पक्षांची प्रकरणे बाहेर काढून आरडाओरडा करून गुन्हेगारांना चक्की पिसायला तुरूंगात टाकण्याची आश्वासने द्यायची आणि सत्ता मिळाली सर्व आश्वासने बासनात गुंडाळून क्लीन चिट देऊन सेना, राष्ट्रवादी वगैरे पक्षांची खुशामत करत बसायचे या दुटप्पी भूमिकेला विरोध आहे. यामुळेच त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे.
सहमत. अजित पवार, तटकरे इ यांना तुरुंगात डांबु अशी जाहीर वक्तव्ये यांनीच केली होती. पण सत्तेत आल्यावर लगेचच विसर पडला.. आणि नंतर त्यांच्याच हातात हात घालून दीड दिवसाचा संसार थाटला. मी जरी फडणवीस यांचा चाहता असलो तरी तो प्रकार मला आवडला नव्हता. त्याचसोबत खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे इ लोकांचे महत्व कमी करून पक्षात एकाधिकारशाही आणली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही खाती स्वतःकडे ठेवली. सेनेला किंवा इतर घटक पक्षांना उपमुख्यमंत्री पद देता आले असते पण तसंही होऊ दिले नाही.. महाराष्ट्रात BJP म्हणजे फक्त फडणवीस हेच समीकरण चालू केले. खडसे शेवटपर्यंत विचारत होते कि नक्की माझा गुन्हा काय त्यावर देखील कोणतेही पटेल असं उत्तर देता आले नाही. शेवटी त्यांनी आपली राजकीय गरज NCP मध्ये जाऊन पूर्ण केली.. पण हे टाळता आले असते. आजही BJP म्हणले कि फडणवीस च दिसतात. त्यांच्या मागे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन, मुनगंटीवार हे लोकं असतात पण यांना पक्षात किती स्थान आहे हा संशोधनाचा विषय आहे. असंच चालु राहिले तर पुढच्या निवडणुकीत यांचा जनाधार कमी होईल हे नक्की. तो होऊ द्यायचा नसेल तर पक्षात आजून नव्या दमाची माणसं तयार केली पाहिजेत. इतरांना संधी दिली पाहिजे, त्यांना जनतेसमोर पक्षाची मत आणि भूमिका मांडायला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला पाहिजे.. एकच नेता पूर्ण महाराष्ट्र हाताळू शकणार नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अजून कोणा कोणाला अटक करू असे

बिटाकाका
Sat, 03/20/2021 - 18:49 नवीन
अजून कोणा कोणाला अटक करू असे मोदी पण म्हणाले होते पण तसं काही झालं नाही. प्रथम दर्शनी पुरावे असल्यावर असले खटले दाखल होत असावेत आणि त्यावर आधारित असले राजकीय दावे निवडणुकीच्या तोंडावर सगळेच पक्ष करत असतात. लोकं त्याला भुलून मतदान करत असतील असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे उगाच फडणवीसांवर राग काढण्यात काहीच अर्थ नाही. त्यांचं बहुमत नसताना त्यांनी काय नेमकं काय करायला हवं होतं हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. *********** दिड दिवसांच्या संसारावर बोलताना ती क्रियेवर प्रतिक्रिया होती हे दुर्लक्षित का केले जात असावे? भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष जनादेश डावलून सरकार स्थापण्याचा घाट घालत असताना भाजप ने धुतल्या तांदळासारखं राहावं अशी अपेक्षा कशाला ठेवायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष

कानडाऊ योगेशु
Sat, 03/20/2021 - 19:04 नवीन
भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष जनादेश डावलून सरकार स्थापण्याचा घाट घालत असताना भाजप ने धुतल्या तांदळासारखं राहावं अशी अपेक्षा कशाला ठेवायची?
आय डिफर. सुरवात भाजपाने केली मग शिवसेनेलाही आयती संधी मिळाली. तसेही राष्ट्रवादी सोबत युती कदापि शक्य नाही हे त्यांच्याच मी पुन्हा येईन हे तीनतीनदा बोलण्याच्या स्टाईलमध्ये एका चॅनेल्वर ही बोलुन झाले होते. इरव्ही राजकारणांची विधाने कोणी इतक्या गंभीरपणाने घेत नाही पण देवेंद्र फडणवीसांची उगाच शुचितेचा आव आणुन अशी काही बाही विधाने केली आणि त्यावर त्वरीत घुमजाव केले. मी पुन्हा येईन,तेल लावलेला पैलवान,अजित पवार चक्की पिसिंग, राष्ट्रवादी सोबत युती नाही अशी विधाने केली नसती तर कदाचित त्यांचे अपयश इतके हायलाईट झाले नसते. ह्याबाबतीत काका बिलंदर आहेत. मोजकेच बोलतात आणि त्यातुन अनेक अर्थ निघतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

युतीबाहेरचे सरकार स्थापन

बिटाकाका
Sat, 03/20/2021 - 19:17 नवीन
युतीबाहेरचे सरकार स्थापन करण्याची सुरुवात भाजप ने कशी केली यावर थोडा प्रकाश टाकावा. *********** निवडणुकांधीचे प्रचारातील वक्त्यव्ये हा स्वयंत्र अभ्यासाचा विषय आहे. आणि यात कुठलाही नेता पास होणार नाही. मी पुन्हा येईन हे वक्तव्य त्यांनी केले आणि ते परत आलेही आणि तेही बहुमतात, ही वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

हेच म्हणतो..

बापूसाहेब
Sat, 03/20/2021 - 19:23 नवीन
हेच म्हणतो.. मतदार म्हणजे काय बायको आहे का.. कि लग्नाच्या आधी तुला हे देईन. ते देईन.. इकडे घेऊन जाईन फुलासारखं जपीन अश्या टैईपची आश्वासन द्यायला. मत द्यायच्या आधी आश्वासने देणे, पब्लिकली काही कमिटमेंट करणे ( जसे कि NCP शी युती नाही नाही नाही.. ) आणि नंतर विसरून जाणे हा एक प्रकारचा विश्वासघात च आहे... अर्थातच प्रत्येक राजकीय पक्ष तेच करत आला आहे. काहींनी तर 70-70 वर्षे जनतेला उल्लू बनवले पण जे बोलतात त्यातलं 50 % तरी करा ना राव.. !! फडणवीस यांचा राग एवढयासाठी येतो कि त्यांनी नाही नाही नाही म्हणून शेवटी अजित पवार यांच्याशी हातमिळवणी केली. परंतु त्यांनी त्याआधीच्या 5 वर्ष्यात इतर बरीच चांगली कामे केली. NCP आणि इतर पक्षांनी मिळुन त्यांना त्यांच्या जातीवरून डिवचण्याचा बराच प्रयत्न केला. मराठा आंदोलनाला हवा त्यामूळेच दिली गेली. सर्व परिस्थिती बिकट असताना देखील सलग 5 वर्षे मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवण्यात ते यशस्वी झाले.. याआधीचे जवळपास सर्व मुख्यमंत्री हे दिल्लीच्या आणि 10 जनपथ च्या आदेशाचे गुलाम होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

मत द्यायच्या आधी आश्वासने

श्रीगुरुजी
Sat, 03/20/2021 - 19:50 नवीन
मत द्यायच्या आधी आश्वासने देणे, पब्लिकली काही कमिटमेंट करणे ( जसे कि NCP शी युती नाही नाही नाही.. ) आणि नंतर विसरून जाणे हा एक प्रकारचा विश्वासघात च आहे... + १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

भाजपचे (फडणवीसांचेच का म्हणून

बिटाकाका
Sat, 03/20/2021 - 19:52 नवीन
भाजपचे (फडणवीसांचेच का म्हणून?) अजित पवारांसोबत जाणे (एनसिपी सोबत नाही) हे सर्वसाधारणपणे कुणालाच आवडले नाही हे तर स्पष्टच आहे आणि त्याबद्दल दुमत असायचे काही कारण नाही. पण ती हातमिळवणी ही जणूकाही भाजपने शिवसेनेचा पर्याय डावलून केली असे चित्र जाणूनबुजून केले जाते. २४ ऑक्टो ते १० नोव्हें काय काय झाले हे सर्वांनी पाहिलेले आहे. ********* प्रचारातील वक्तव्ये सोडा, छापील जाहिरनाम्यातूनही इतकी वर्षे खोटे बोलूनही जनतेला वेडे बनवले गेलेच की. तरीही जनतेने वर्षानुवर्षे त्यांनाच निवडून दिले ना? त्यामुळे, नेते काहीही बोलले तरी दर पाच वर्षांनी (आणि वर्षभर इतर ढिगभर निवडणुकांमध्ये) जागा दाखवण्याची संधी जनता तरी कुठे वापरते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

NCP आणि इतर पक्षांनी मिळुन

श्रीगुरुजी
Sat, 03/20/2021 - 19:57 नवीन
NCP आणि इतर पक्षांनी मिळुन त्यांना त्यांच्या जातीवरून डिवचण्याचा बराच प्रयत्न केला. मराठा आंदोलनाला हवा त्यामूळेच दिली गेली. आपण मराठ्यांच्या बाजूने आहेत, आपली जात मराठ्यांच्या हिताआड येत नाही हे सिध्द करण्यासाठी त्यांनी ब्राह्मणांवर अन्याय केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

देवेंद्र फडणवीसांची उगाच

श्रीगुरुजी
Sat, 03/20/2021 - 19:46 नवीन
देवेंद्र फडणवीसांची उगाच शुचितेचा आव आणुन अशी काही बाही विधाने केली आणि त्यावर त्वरीत घुमजाव केले. मी पुन्हा येईन,तेल लावलेला पैलवान,अजित पवार चक्की पिसिंग, राष्ट्रवादी सोबत युती नाही अशी विधाने केली नसती तर कदाचित त्यांचे अपयश इतके हायलाईट झाले नसते. + १ ह्याबाबतीत काका बिलंदर आहेत. मोजकेच बोलतात आणि त्यातुन अनेक अर्थ निघतात. फडणवीस भाजपतील पवार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

> परंतु अत्ता फडणवीस यांनी

साहना
Tue, 03/23/2021 - 23:49 नवीन
> परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे प्रकरण, पूजा, मुंढे प्रकरण यांत शांत बसून एक प्रकारे सेनेलाच मदत करावी अशी तुमचा मानस आहे का? फडणवीसांनी विरोधांत राहून कितीही नृत्य केले तरी महाराष्ट्रातील जनता आणि एकूण कायदा सुव्यवस्था ह्यावरील त्याचा परिणाम शून्य आहे. वझे प्रकरण घेऊन उधोजींना ब्लॅकमेल करून सत्ता संपादन करणे हि शाह मोदी ह्यांची चाल आहे आणि फर्नाडिस साहेब हिस मॅजेस्टीस व्हॉईस प्रमाणे काम करत आहेत. लोकांनी त्यांना गांभीर्याने घेऊ नये. मुकेश अंबानी करोडोंचे पोशिंदे आहेत आणि तारतम्य दाखवून त्यांनी सर्वांबरोबर चांगले संबंध ठेवले आहेत आणि मुंबई शहर आणि राष्ट्र ह्यांच्या विकासात प्रचंड हातभार लावला आहे. काहीही भिकार राजकारण असले तरी त्याच्या परिवाराला धोका उत्पन्न होईल असले काहीही कृत्य करणे मुंबई पोलीस खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना सुद्धा शोभा देत नाही. शेवटी चोरांची म्हणून सुद्धा काही नैतिकता असते. त्यातून एकदा प्रकरण बाहेर आले कि उधोजींनी संतापून वझे ह्यांना अत्यंत कठोर शिक्षा करायला पाहिजे होती. पण उलट वझेना वाचविण्याचे प्रयत्न केले गेले. फर्नाडिस साहेबाना खरोखर कायद्याची चाड असेल तर त्यांनी मोदींच्या मदतीने NIA ला उधोजी आणि बाळ पेंग्विन च्या मागे लावावे. पाहू मग किती हाडाचे सापळे बाहेर पडतात. मी पैसे लावून सांगते कि फडणवीसांच्या छाती बडविण्याच्या ह्या नाटकातून काहीही निष्पन्न होणार नाही. इथे सामान्य लोकांनीच हट्ट केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

वझे प्रकरण घेऊन उधोजींना

श्रीगुरुजी
Wed, 03/24/2021 - 00:00 नवीन
वझे प्रकरण घेऊन उधोजींना ब्लॅकमेल करून सत्ता संपादन करणे हि शाह मोदी ह्यांची चाल आहे आणि फर्नाडिस साहेब हिस मॅजेस्टीस व्हॉईस प्रमाणे काम करत आहेत. + १ सुशांतसिंग राजपूत, पूजा चव्हाण, मनसुख हिरेन ही प्रकरणे केवळ उधोजींवर दबाव आणून राजीनामा द्यायला लावण्यासाठी भाजपने उचलली आहेत. उद्या उधोजींनी राजीनामा देऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला तर ही सर्व प्रकरणे बासनात गुंडाळून ठेवली जातील. मी पैसे लावून सांगते कि फडणवीसांच्या छाती बडविण्याच्या ह्या नाटकातून काहीही निष्पन्न होणार नाही. इथे सामान्य लोकांनीच हट्ट केला पाहिजे. + १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

उद्या उधोजींनी राजीनामा देऊन

बिटाकाका
Wed, 03/24/2021 - 12:08 नवीन
उद्या उधोजींनी राजीनामा देऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला तर ही सर्व प्रकरणे बासनात गुंडाळून ठेवली जातील.
याच्यासाठी भाजपने काहीच करू नये असे तुमचे म्हणणे आहे का? २०१९ ला हेच करण्याचा जनतेचा कौल होता. जनतेच्या आदेशाचा अनादर झालेला असताना, गंभीर प्रकरणे घडत असताना, भाजप विरोधी पक्षात असतानाही त्यांनी आवाज उठवू नयेच ही अपेक्षा हास्यास्पद आहे. आणि ते करताना स्वतःचा अंधविरोध कुरवाळण्यासाठी भाजप सत्तेत येण्यासाठी करतंय असे म्हणणे म्हणजे अजून च हास्यास्पद!! या आलम दुनियेतील प्रत्येक लोकशाही ही अशीच चालते. सत्तेत असणाऱ्यांच्या चुका उचलून धरून आपण सत्तेत येणे यात गैर ते काय? भाजप तेच करत आहे, हे सरकार जावे हाच उद्देश आहे आणि त्यात काहीही नवीन नाही. शिवसेनेने पाठिंबा द्यावा म्हणून ते हे करत आहेत हे तुमचे गृहीतक झाले. कदाचित काँग्रेसने यातून बाहेर पडावे आणि निवडणुका लागव्यात हेही उद्देश असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

असहमत ...

सुक्या
Wed, 03/24/2021 - 02:08 नवीन
फडणवीसांनी विरोधांत राहून कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्रातील जनता आणि एकूण कायदा सुव्यवस्था ह्यावरील त्याचा परिणाम शून्य होत असेल तर मग निवड्णुका तरी का घ्या. जो पायंडा आताच्या सरकारने सरपंच / ग्राम्पंचायत निवडणुकीत पाडला तोच राज्यातही राबवु. म्हणजे प्रत्येक पदाची एक ठरावीक किंमत. पैसे भरा किंवा लिलाव करा. चालेल? आता जी गोष्ट जगजाहीर झाली (सरकाची हप्ता वसुली) ती या अगोदर उघड गुपीत होते. मग त्यावर कुणी आवाज उठवु नये का? जो आवाज उठवतो त्यला एक नागरीक म्हणुन पाठिंबा देउ नये का? या अगोदर मी म्हट्ल्या प्रमाणे जर फडणवीस मविआ चे प्रकरण बाहेर काढत असेल तर शिवसेना/राष्ट्रवादी / कांग्रेस यांनी पण फडणवीस किंवा भाजप चे प्रकरणे बाहेर काढावीत. अगदी पुराव्या सहीत. तसेही दोन मंत्री बोलले आहेत की त्यांच्याकडे पुरावे आहेत. मग ते त्यावर बसुन अंडी देत आहेत का? "मोदींच्या मदतीने NIA ला उधोजी आणि बाळ पेंग्विन च्या मागे लावावे" हे कुठल्या आधारावर करावे? म्हणजे काही कारण असावे लागेल ना? काहीतरी पुरावा? नाहीतर सगळे बोलायला तयार असतात की हे "मला संपवायचे कारस्थान आहे" / "राजकीय षडयंत्र आहे" वगेरे वगेरे .. बाकी ... वाझे आता व्हीलन झाले आहेत. मग सारे मंत्री अगदी मुख्यमंत्री त्यांना सपोर्ट का करत होते? काही कारण असेल ना? की असेच? या सर्व प्रकरणावर आमचे मामु काय करता आहेत काय माहीत. अजुन आदेश वगेरे आला नाही ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

मी CD ची वाट बघत आहे

मुक्त विहारि
Wed, 03/24/2021 - 06:28 नवीन
खडसे यांनी, CD लावली की, मग समजेलच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

आता जी गोष्ट जगजाहीर झाली

श्रीगुरुजी
Wed, 03/24/2021 - 12:34 नवीन
आता जी गोष्ट जगजाहीर झाली (सरकाची हप्ता वसुली) ती या अगोदर उघड गुपीत होते. मग त्यावर कुणी आवाज उठवु नये का? उठवा की. नाही कोण म्हणतंय? पण हेच लोक आपल्या काळात अगदी हेच करीत असताना आपण त्यावेळी का गप्प होतो हे आधी सांगा. आता जे आवाज उठवित आहेत त्यांचा पूर्वोतिहास जनता जाणते व त्यांच्या आवाजातील सत्यता किती हे सुद्धा जनता जाणते. त्यामुळे त्यांनी उठविलेल्या आवाजाने जनता हुरळून जाणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

सामान्य माणसाने दोन्ही

साहना
Wed, 03/24/2021 - 13:01 नवीन
सामान्य माणसाने दोन्ही पक्षाकडून जास्त स्टॅंडर्ड ची मागणी करावी, अर्थांत हे राखी सावंत कडून शालीनतेची अपॆक्षा ठेवण्यासारखे आहे पण दुसऱ्या बाजूला ह्या संपूर्ण प्रकरणात भरपूर तेल ओतून मोठी आग लावावी असे काही तरी जनतेने करावे. टू जी प्रकरण हे असेच होते. खांडव वन दहना प्रमाणे ह्यांत बरीच छोटी मोठी श्वापदे जाळून खाक झाली तर महाराष्ट्र थोडा स्वच्छ होईल. आणि ह्या श्वापदांच्या समूहात शवसेना, मोदिशाः पक्ष, खानग्रेस आणि काका साहेबांचा पक्ष हे सर्व होरपळवेत अशी माफक अपेक्षा जनता म्हणून मी ठेवते. काही लोकांची जरी राजकीय कारकीर्द आणि पोलीस सेवा बंद झाली तरी आनंद आहे. शेवटी अंबानीला धमकावणे आणि हजारो रेस्टोरंट वाल्याना धमकावणे ह्याची काही तरी किंमत ह्या नालायक लोकांना द्यायला पाहिजेच कि नाही ? फर्नांडिस साहेबाना ह्या संपूर्ण प्रकरणात फार तर युजफूल इडियट ची भूमिका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

प्रत्येक मुद्द्याशी सहमत आहे.

रंगीला रतन
Wed, 03/24/2021 - 13:08 नवीन
प्रत्येक मुद्द्याशी सहमत आहे. वरचा शायना यांचा प्रतिसाद हास्यस्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

काही ही झाले तरी

Rajesh188
Sat, 03/20/2021 - 01:29 नवीन
आघाडी सरकार पडत नाही. महाराष्ट्रात जे घडतं आहे ते राजकीय डावपेच आहेत. आणि असे पण ह्या देशातील अनेक राज्यात राजकिय पक्षांची गुंडागर्दी एवढी जबरदस्त चालते की ह्या महाराष्ट्र मधील घटना अतिशय किरकोळ आहेत. गुजरात मध्ये एवढी गुंडागर्दी झाली होती की अमेरिकेने अनेक वेळा व्हिसा दिला नाही गुजरात मधील राजकीय पक्षां च्या नेत्याला यूपी,बिहार मध्ये कशी गुंडागर्दी चालते हे लोकांना माहीतच आहे. त्या मानाने maharashtra अतिशय न्याय प्रिय राज्य आहे.
  • Log in or register to post comments

गुजरात मध्ये एवढी गुंडागर्दी

बापूसाहेब
Sat, 03/20/2021 - 05:28 नवीन
गुजरात मध्ये एवढी गुंडागर्दी झाली होती की अमेरिकेने अनेक वेळा व्हिसा दिला नाही गुजरात मधील राजकीय पक्षां च्या नेत्याला आपले ज्ञान खरेच अगाध आहे.. हे सगळं तुम्हाला गूगल आणून देत कि कुठला कोर्स केला आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

किती ही उड्या मारल्या तरी

Rajesh188
Sat, 03/20/2021 - 01:37 नवीन
येथून पुढे कधीच bjp maharashtra मध्ये सत्तेवर येणार नाही
  • Log in or register to post comments

येथून पुढे कधीच bjp

बापूसाहेब
Sat, 03/20/2021 - 05:38 नवीन
येथून पुढे कधीच bjp maharashtra मध्ये सत्तेवर येणार नाही प्रत्येक धाग्यावर तुम्ही हेच पटवून देता.. झोपेत सुद्धा असच बडबडता का?? BTW स्वामीभक्ती/ स्वामिनीभक्ति (राजमाता भक्ती ) जास्त अंगावर आली कि मग आपला आदर्श भारतीय नागरिकाचा वेश परिधान करायचा, ज्याला एकूणच सर्व राजकारणाचा उबग आलेला आहे... आणि मग सांगायचं कि सगळे पक्ष कसे सारखे आहेत.. राजकारणी सगळेच खराब आहेत.. लोकांनी निवडणुकीत चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावे etc etc.. अगदी जास्तच गोची होत असेल तर असे प्रतिसाद दुर्लक्ष करायचे आणि नवीन ठिकाणी जाऊन परत आपलं पालुपद चालू करायचे. BJP ह्याव आहे त्याव आहे.. सत्तेत नको, मोदी ने त्याव केले.. परत सत्त्तेत येणार नाही.. वगैरे वगैरे.. तुम्हाला अश्या प्रकारचे अतार्किक प्रतिसाद देण्यासाठी कोणी पैसे देत का . एका प्रतिसादाला काही ठराविक रक्कम सेट केलीय का? कारण तुमचे प्रतिसाद निव्वळ एकाच अजेंड्यावर बेतलेले असतात जो मी वर स्पष्ट केलाय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

BJP नको ....

मुक्त विहारि
Sat, 03/20/2021 - 07:37 नवीन
हा, एकच मुद्दा मुख्य .... आधी बाण मारायचा आणि मग वर्तुळे काढायची, ही माणसांची फार जुनी वृत्ती आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

लोकांसमोर असलेले चेहरे

कंजूस
Sat, 03/20/2021 - 06:01 नवीन
हे वेगवेगळ्या बलवान गटांंची प्यादी आहेत. काम होत नसले तर पटावरून बाजूला काढतात. यांच्यामिगे कोण आहे ते तर्कानेच समजेल.
  • Log in or register to post comments

भारत सरकारचे अभिनन्दन केले पाहिजे

सुखीमाणूस
Sat, 03/20/2021 - 07:38 नवीन
नुकतीच बातमी वाचनात आली https://www.esakal.com/sampadakiya/dr-shantanu-abhyankar-writes-about-progressive-step-abortion-law-420612 सरकारने नक्किच योग्य पाउल उचलले आहे. यात काही लोकाना हिन्दु जनसन्ख्या कमी होइल अशी भीती वाटेल पण आधुनिक काळाच्या प्रमाणे हे योग्य आहे. गर्भपात अयोग्य म्हणणार्या लोकानी खरतर स्वता आजारी पडल्यावर कोणतीही उपचार पद्धती न वापरता देवाच्या इच्छेपुढे मान तुकवली पाहिजे. सजीवाचा जन्म जर देवाची इच्छा आहे तर आजार आणि म्रुत्यु पण. सगळ्याला निमुट सामोर गेले पाहिजे. पुरोगामी लोकानी कौतुक करायला पाहिजे केन्द्र सरकारचे...
  • Log in or register to post comments

हिंदू जनसंख्या ह्यामुळे कमी झालेली नाही ....

मुक्त विहारि
Sat, 03/20/2021 - 08:06 नवीन
हम दो, हमारे दो ..... पासून DINK पर्यंत प्रगती झालेली आहे... ह्या कायद्यांमुळे, व्याभीचार वाढेल, असेही काही नाही... (1978-79 पासूनच, पौंगडावस्थेतील कुमारी माता, गर्भपात करून घेत होत्या, असे ऐकीवात आहे, ह्या घटना डोंबोलीतल्या आहेत, जे जे डोंबोलीत, तेते जगांत.... अशा गोष्टी कुणीच उघडपणे, आजही करत नाही, कारण कौटुंबिक आणि त्या मुलीची बदनामी होतेच...) फक्त एकच गोष्ट हवी आणि ती म्हणजे, कुमारी माता असेल तर, नांव गुप्तच हवे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस

भाजपला मात देत गोध्रा नगरपालिकेवर 'एआयएमआयएम'.....

मुक्त विहारि
Sat, 03/20/2021 - 11:54 नवीन
https://maharashtratimes.com/india-news/aimim-wins-and-prevents-bjp-from-returning-to-power-in-godhara-nagar-palika/articleshow/81583976.cms MIMचे पाऊल पडते पुढे...
  • Log in or register to post comments

आणि तरीही, भारतात लोकशाही

बिटाकाका
Sat, 03/20/2021 - 13:03 नवीन
आणि तरीही, भारतात लोकशाही अस्तित्वात नाहीये असे गळे काढले जातात हे विशेष!!! सध्यातरी लोकशाही फक्त आपली विधानसभा, केरळ/पंजाब वगैरे भाजपेतर विधानसभा, गोध्रा नगरपालिका, जळगाव महानगरपालिका इ.ठिकाणी शिल्लक राहिलेली दिसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बरोबर.. जिथे BJP आहे तिथे

बापूसाहेब
Sat, 03/20/2021 - 13:24 नवीन
बरोबर.. जिथे BJP आहे तिथे हुकूमशाही, झुंडशाही, जातीवाद इ इ असते.. पण महाराष्ट्र जिथे लोकमत डावलून फक्त संख्याबळाच्या आधारावर लोकांनी नाकारलेले पक्ष सरकार चालवतात तिथे लोकशाही असते... !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

त्याला पर्याय नाही

Rajesh188
Sat, 03/20/2021 - 13:39 नवीन
आपल्या राज्यघटनेत ते बेकायदेशीर कृत्य नाही. प्रतेक सभासद हा स्वतंत्र विचाराचा असावा हेच लोकशाही ला अपेक्षित आहेत.पक्षीय दबावाखाली त्याने सभागृहात मतदान करूच नये चुकीचे असेल तिथे विरूद्ध मतदान केलेच पाहिजे. व्हिप हा प्रकार सुद्धा चुकीचा आहे असे मला वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

हे एकदा कुणीतरी एका युवा

बिटाकाका
Sat, 03/20/2021 - 13:57 नवीन
हे एकदा कुणीतरी एका युवा नसलेल्या युवा नेत्याच्या आणि अशा प्रत्येकवेळी जेव्हा भाजप विजयी बाजूला असतो त्यावेळी गळे काढणाऱ्यांच्या कानात तेल टाकून ऐकवायला हवे. ********* क्षुल्लक स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी, कुठल्यातरी देशाच्या खाजगी, अजेंडा चालवणाऱ्या संस्थांच्या रिपोर्टचा हवाला देऊन देशाच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या लोकांना जनता आसूड ओढून घरी बसवत आहे हेच या देशाच्या लोकशाहीचे यश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

अमृता फडणवीस ह्या

Rajesh188
Sat, 03/20/2021 - 13:33 नवीन
Bjp च्या पद अधिकारी पण नाहीत फक्त फडणवीस ह्यांच्या सौभाग्यवती आहेत तरी त्या राजकीय भाष्य का करत असतात ह्याची काही उकल होत नाही. त्यांना राजकारणातील अ, ब, क, ड पण कळत नाही असे त्यांच्या प्रतेक राजकीय कमेंट वरून वाटत. आज पर्यंत ह्या राज्याच्या इतिहासात mrs मुख्यमंत्री असलेल्या व्यक्ती नी कधीच राजकीय कमेंट केल्याचे उदाहरण नाही. त्यांच्या कमेंट राणे पितापुत्र च्या कॉमेंट सारख्या असतात. निरर्थक.
  • Log in or register to post comments

कारण आमच्या देशात लोकशाही

पिनाक
Sat, 03/20/2021 - 13:58 नवीन
कारण आमच्या देशात लोकशाही असून स्त्री पुरुषांना समान अधिकार, ज्यात व्यक्त होण्याचा अधिकार पण येतो, आहेत. बाकी राजकारणातील abcd न कळणारी एक व्यक्ती इथे प्रतिक्रिया देतेच की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

कारण आमच्या देशात लोकशाही

Rajesh188
Sat, 03/20/2021 - 14:25 नवीन
इथे" आमच्या देशात" हा शब्द चुकीचा वापरला गेला आहे ह्याची दखल घ्यावी ही विनंती(म्हणजे स्वतः पोस्ट कर्त्याणी दखल घ्यावी) आमचा आणि तुमचा असे वेगवेगळे देश नसतात. "आपल्या देशात " असा शब्द प्रयोग करावा. आम्ही पण ह्याच देशाचे नागरिक आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनाक

राजकारणातील अ ब क ड न कळणारा

बिटाकाका
Sat, 03/20/2021 - 14:01 नवीन
राजकारणातील अ ब क ड न कळणारा एक युवा नसलेला युवा नेता दिवसरात्र निरर्थक ट्विट करत असतो, त्याच्यावर आक्षेप आहे की नाही? ************* राजकीय भाष्य करणाऱ्या सर्वांना, अ ब क ड येतं की नाही याचं सर्टिफिकेट कुठं मिळतं म्हणे? तुमच्याकडे आहे का? आम्हालाही सांगा, आम्हीपण मिळतंय का बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा