भरपूर पैसे मिळवावेत असे कोणाला वाटणार नाही? बहुतांश लोकांना तसे वाटते तरी किंवा भोवतालची परिस्थिती तरी त्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडते. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. साहजिकच इथे संघर्ष खूप आहे, भ्रष्टाचारसुद्धा बराच आहे. शिवाय भारतात श्रममूल्य हे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीतून प्रयत्न करुन आर्थिक समृद्धी आणण्याचे महत्कार्य पार पाडावे लागते.
थिंक अँड ग्रो रिच हे श्रीमंत कसे व्हावे या विषयावर बरेच गाजलेले पुस्तक विशेषत: अमेरिकन जनता डोळ्यासमोर ठेवून लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिले होते. यालाही साधारण ८४ वर्षे होऊन गेली.
चर्चेचा विषय हाच आहे की भारतासारख्या देशात श्रीमंत होण्यासाठीचे काही ठाशीव नियम असू शकतात का? अर्थात प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. ते व्यक्तिपरत्वे थोडे बदलूही शकतात. ते कायम तसेच राहतात असेही नाही. पण अपवादानेच नियम सिद्ध होतात हे ही खरे आहे. ते अपवाद गृहित धरुन श्रीमंत होण्यासाठीचे काही ठराविक नियम असू शकतात का? हेच पहायचे आहे.
आता श्रीमंत कोणाला म्हणावे? तर एका त्रिकोणी कुटूंबाला ज्यातल्या कुटूंबप्रमुखाचे पुण्यासारख्या शहरात, वयाच्या तिशीच्या आत किमान ६० हजार रुपये वैयक्तिक मासिक उत्पन्न असेल तर तो सुद्धा श्रीमंत म्हणायला हरकत नसावी. यात त्याच्याकडे बाईक आहे पण चारचाकी नाही, कसलेही खर्चिक व्यसन नाही असे गृहित धरले आहे. ही झाली किमान मर्यादा. आता याउपर ही मर्यादा कितीही असू शकते. जसे उत्पन्न वाढेल तसतसे चारचाकी किंवा खर्चिक व्यसन किंवा अजून खर्चायला लावणार्या बाबी उत्पन्नाच्या प्रमाणात अॅड करायला हरकत नाही.
धाग्याचा उद्देश प्रामुख्याने उपरोल्लिखित किमान कमाईपेक्षा कमी उत्पन्न असणार्यांना श्रीमंत होण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चा हाच असावा. आधीच भरपूर कमवणार्यांना अजून कसे कमवता येईल यासाठी हा धागा नाही. _/\_
विषयानुषंगाने काही प्रश्न की जेणेकरुन चर्चेला दिशा मिळेल.
१) नशीब हा फॅक्टर श्रीमंतीसाठी किती महत्वाचा आहे?
२) मराठी लोक व्यापारात फारशी जोखीम घेत नसल्याने त्यांना पंगुसिंमा (पंजाबी, गुजराती, सिंधी, मारवाडी) इतके यश व्यापारात मिळत नाही असे म्हटले जाते. पण पंगुसिंमांच्या व्यापाराच्या अशा काही पद्धती किंवा ट्रिक्स असू शकतात का की ज्यामुळेच ते व्यापारात यशस्वी होतात? उदा. एका मारवाडी व्यक्तीने दुसर्या मारवाड्याला धंद्यासाठी कर्ज दिले. ते व्याजासहीत वसूल होण्याचा कालावधी हा मराठी माणसाने दुसर्या मराठी माणसाला धंद्यासाठी दिलेल्या कर्जवसूलीच्या कालावधीपेक्षा जास्त असू शकतो का? पंगुसिंमा हा तग कसा धरु शकतात? अशाच अजून काही युक्त्या असू शकतात का पंगुसिंमांच्या?
३) शहर जितके मोठे तितकी आर्थिक समृद्धी जास्त असे काही असते का?
४) काही क्षेत्रे अशी आहेत ज्यातील कौशल्यातून चांगले पैसे मिळतात. ते कौशल्य शिकण्यासाठी गुंतवलेल्या पैशाच्या तुलनेत परतावा जास्त आहे. काही मिपाकरांशी चर्चा करुनच ही यादी बनवली आहे. यात अजून काही सुधारणा किंवा वाढ करता येईल का?
१. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लागणारं कोणतंही कौशल्य
२. कॉम्प्युटर हार्डवेअर इन्स्टॉलेशन,फिक्सिंग
३. सेल्स अँड मार्केटिंग
४. कायिक आरोग्यसेवांतर्गत येणारे कोणतेही कौशल्य
५. गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय शिकवता येणे.
६. आर्थिक गुंतवणूकीचे सल्लागार
७. रसायनशास्त्र (कॅटॅलिस्टस्)
८. विद्युत अभियांत्रिकी (कॅप्टीव्ह जनरेशन)
९. लोगो डिझाईनिंग
१०. चारचाकी किंवा जड वाहन सफाईदारपणे चालवता येणे.
११. धार्मिक,अध्यात्मिक सेवा पुरवणे
१२. कार, बाईक दुरुस्ती, स्वच्छता
१३. न्यायिक सेवा (वकील वगैरे)
१४. स्पर्धापरीक्षा उत्तम गुणांनी पास होणे.
१५. वातानुकूलन यंत्र दुरुस्ती,निगा
१६. चेतनकला
१७. स्टँडअप कॉमेडी
वर्गीकरण
वाचने
75839
प्रतिक्रिया
180
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी आता future रिटायरमेंट चा
@गणेशा
In reply to मी आता future रिटायरमेंट चा by गणेशा
मी करत असलेली आणि माझ्या
In reply to @गणेशा by उपयोजक
:-)
In reply to @गणेशा by उपयोजक
साधा नियम
In reply to :-) by राघव
हा फंडा वाचला होता ...
In reply to साधा नियम by राजेंद्र मेहेंदळे
आपल्या कडे आधीही श्रीमंती होतीच की...
तुम्ही लेखात दिलेल्या
बरोबर,मी इंटरनेटवरून फिटनेस
In reply to तुम्ही लेखात दिलेल्या by आंद्रे वडापाव
आंद्रे वडापाव
In reply to तुम्ही लेखात दिलेल्या by आंद्रे वडापाव
आताच जानेवारी २०२१ मध्ये माझा
In reply to आंद्रे वडापाव by उपयोजक
कारखाने आणि वाहनउद्योग यातले
In reply to आंद्रे वडापाव by उपयोजक
तुमच्या या प्रश्नाचे उत्तर ....
In reply to आंद्रे वडापाव by उपयोजक
बघा ह उद्या गुगल कार घेऊन आले
In reply to तुम्ही लेखात दिलेल्या by आंद्रे वडापाव
प्रवासात गप्पा मारुन मनोरंजन पण करतो.
In reply to बघा ह उद्या गुगल कार घेऊन आले by मराठी कथालेखक
एक रात्रीत नक्कीच बदलणार नाही पण ....
In reply to बघा ह उद्या गुगल कार घेऊन आले by मराठी कथालेखक
Ai आणि मशीन learning
In reply to तुम्ही लेखात दिलेल्या by आंद्रे वडापाव
डॉक्टर,वकील,न्यायाधीश, ह्यांची पण गरज लागणार नाही.
In reply to Ai आणि मशीन learning by Rajesh188
डॉक्टर,वकील,न्यायाधीश,
In reply to डॉक्टर,वकील,न्यायाधीश, ह्यांची पण गरज लागणार नाही. by चौकटराजा
अत्यंत बाळबोध विचार आहेत.
मी ज्या सोनोग्राफी उपकरणावर काम करतो ते सेकंदाला ७० प्रतिमा निर्माण करते म्हणजे एका रुग्णाचे यकृत मी तपासतो त्याला ३ मिनिटे लागतात गृहीत धरले तर १२६०० प्रतिमा माझा मेंदू ३ मिनिटात पाहून ते माझ्या मेंदूत साठवलेल्या आणि ३१ वर्षाच्या अनुभवाने सिद्ध झालेल्या प्रतिमांशी पडताळून हे व्यवस्थित आहे कि आजारी आहे हे ठरवतो. हे केवळ एका अवयवा बद्दल आहे. असे केवळ एका रुग्णाच्या एका व्यवस्थित अवयवाबद्दल लक्षात घेतल्यास प्रत्येक अवयवासाठी आणि प्रत्येक आजारासाठी संगणकाला अब्जावधी प्रतिमा शिकवाव्या लागणार आहेत. या प्रतिमा पडताळून त्या रुग्णाचे अवयव ठीक आहेत का हे ठरवल्या जाईल. आणि ठीक नसेल तर कोणता आजार असू शकेल त्याच्या प्रतिमांशी संगणकाला तुलना करून अशा आजाराची शक्यता वर्तवावी लागेल यासाठी काही खर्व निखर्व प्रतिमा संगणकाला शिकवाव्या लागतील . हे काम रेडिओलॉजिस्ट सोडून दुसरा कोणीही करू शकणार नाही. असे झाल्यावर आजार किती गंभीर आहे हे ठरवण्यासाठी अजून फार मोठा पल्ला गाठावा लागेल. उदा. माझ्या मित्राच्या आईला स्तनात गाठ होती ती पाहून मागच्या आठवड्यात मी त्यांना तो कर्करोगाच आहे परंतु तुमच्याकडे १०-१२ वर्षे तरी आहेत एवढे अनुभवाने सांगितले. ८० वर्षाच्या स्त्रीला हा फार मोठा दिलासा आहे. असा दिलासा संगणक देऊ शकेल असे पुढच्या २५ वर्षात तरी शक्य आहे असे वाटत नाही. तेंव्हा येणाऱ्या २५ वर्षात तरी कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाला पर्याय होणार नाही. माझ्या सोनोग्राफी उपकरणात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते उदाहरणार्थ बाळाच्या डोक्याची प्रतिमा घेतली तर त्याचा व्यास आणि परिमिती संगणक मोजून देतो. पण डोक्याचा आकार वेगळा असेल तर संगणक गोंधळतो. हे मी अहंभाव दुखावला गेला आहे म्हणून लिहितो आहे असे नसून वस्तुस्थिती आहे. साधा संगणकीय ई सी जी घ्या, जो गेली २० वर्षे तरी प्रचलित आहे त्यावर संगणक आपला अहवाल (रिपोर्ट) देतो. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचाच एक अवतार आहे. त्या अहवालाबद्दल हृदयरोग तज्ज्ञ दुजोरा देत नाही तोवर त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. राहिली गोष्ट. जी गोष्ट बिनडोकपणे वारंवार करावी लागते अशा कमी कौशल्याच्या गोष्टी मध्ये संगणक पुढे येईल याबद्दल शंका नाही. पण एखाद्या स्त्रीला तू सुंदर दिसतेस हे संगणकाने सांगितले तर तिला त्याचे समाधान होईल का? बाकी चालू द्यातुमचा संगणक आणि त्याचे
In reply to डॉक्टर,वकील,न्यायाधीश, by सुबोध खरे
किती प्रचंड गतीने कॉम्प्युटर
In reply to तुमचा संगणक आणि त्याचे by पिनाक
च
बायकोचं समाधान होतं. याने कितीही गुगल वाचून संप्रेरकांच्या उलथापालथीने होते असे सांगून तिला काही फरक पडत नाही तेंव्हा त्याला हतबल वाटतं. जाता जाता -- २०१० च्या ३६५ पट वेगाने काम करणारा संगणक अजूनही करोनाची १०० % गुणकारी लस निर्माण करू शकलेला नाही. असोराजेश जी, चौराकाका, पिनाक..
In reply to डॉक्टर,वकील,न्यायाधीश, by सुबोध खरे
ए आय(आर्टिफिशियल ईंटेलिजन्स) आणि एम एल(मशिन लर्निन्ग)
In reply to राजेश जी, चौराकाका, पिनाक.. by गणेशा
नक्कीच.. बरोबर..
In reply to ए आय(आर्टिफिशियल ईंटेलिजन्स) आणि एम एल(मशिन लर्निन्ग) by राजेंद्र मेहेंदळे
सर्वात कडक व अभ्यासपूर्ण प्रतिसाद ..
In reply to ए आय(आर्टिफिशियल ईंटेलिजन्स) आणि एम एल(मशिन लर्निन्ग) by राजेंद्र मेहेंदळे
माझा विषय रेडिओलॉजी ज्यात
In reply to सर्वात कडक व अभ्यासपूर्ण प्रतिसाद .. by चौकटराजा
हे ए आय आणि ऑटोमेशन इतकं
In reply to Ai आणि मशीन learning by Rajesh188
मला मटार सोलायचे मशीन हवे आहे...
In reply to हे ए आय आणि ऑटोमेशन इतकं by मराठी कथालेखक
तेच ना.. इथे लोक ऑटोमेशनचे
In reply to मला मटार सोलायचे मशीन हवे आहे... by मुक्त विहारि
काही काळापूर्वी CGI
In reply to तेच ना.. इथे लोक ऑटोमेशनचे by मराठी कथालेखक
18 व्या शतकात रेल्वे नवीन
In reply to काही काळापूर्वी CGI by आग्या१९९०
हो.
In reply to तेच ना.. इथे लोक ऑटोमेशनचे by मराठी कथालेखक
आजही शहरात रस्ते खणायला मशिन
In reply to हे ए आय आणि ऑटोमेशन इतकं by मराठी कथालेखक
त्याचे कारण ..
In reply to आजही शहरात रस्ते खणायला मशिन by आग्या१९९०
प्रश्न तो नाही
In reply to त्याचे कारण .. by चौकटराजा
असे आहे ..
In reply to हे ए आय आणि ऑटोमेशन इतकं by मराठी कथालेखक
राजेश जी, चौराकाका, पिनाक..
In reply to Ai आणि मशीन learning by Rajesh188
नाही
इतर सर्व खर्च भागवून जर
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
१,४०,००० तरी महिन्याला आले पाहिजेत.....
In reply to इतर सर्व खर्च भागवून जर by साहना
कायिक आरोग्यसेवा
कायिक म्हणजे शरीराची
In reply to कायिक आरोग्यसेवा by Bhakti
युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणे
@चंद्रसूर्यकुमार
In reply to युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणे by चंद्रसूर्यकुमार
सर्वात श्रीमंत युट्यूबर रायन
In reply to युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणे by चंद्रसूर्यकुमार
श्रीमन्त म्हणजे नक्की काय ..?
श्रीमंतीतही ट्विस्ट दिसतेय.
In reply to श्रीमन्त म्हणजे नक्की काय ..? by चौकटराजा
चौकटराजा
In reply to श्रीमन्त म्हणजे नक्की काय ..? by चौकटराजा
भारत ..... ?
In reply to चौकटराजा by उपयोजक
इंटेलेक्चुअल लेवल चांगली असली
In reply to भारत ..... ? by चौकटराजा
असे आहे ... का ?
In reply to इंटेलेक्चुअल लेवल चांगली असली by उपयोजक
प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा
In reply to भारत ..... ? by चौकटराजा
आर्थिक सुबत्तेने माणसाला
In reply to प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा by साहना
फक्त इतकेच कारण न्हवते ....
In reply to आर्थिक सुबत्तेने माणसाला by कानडाऊ योगेशु
कानडाउ बाबा ,
In reply to आर्थिक सुबत्तेने माणसाला by कानडाऊ योगेशु
अशा किती
In reply to प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा by साहना
अजब शोध .. सुबत्ता प्रतिभेची जननी ... ?
In reply to प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा by साहना
मी नुकतेच अनुवाद केलेले हे
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to मी नुकतेच अनुवाद केलेले हे by जयंत कुलकर्णी
धन्यवाद जयन्त कुलकर्णी
In reply to मी नुकतेच अनुवाद केलेले हे by जयंत कुलकर्णी
पैशाचे मानसशास्त्र
In reply to मी नुकतेच अनुवाद केलेले हे by जयंत कुलकर्णी
जयंत कुलकर्णी
आता श्रीमंत कोणाला म्हणावे?
आता श्रीमंत कोणाला म्हणावे?माझी व्याख्या - यापुढील आयुष्यात कोणत्याही मार्गाने एकही रूपया सुद्धा मिळाला नाही तरी ज्याला आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवता येईल तो श्रीमंत.सहमत आहे...
In reply to आता श्रीमंत कोणाला म्हणावे? by श्रीगुरुजी
आता श्रीमंत कोणाला म्हणावे?
In reply to आता श्रीमंत कोणाला म्हणावे? by श्रीगुरुजी
+१
In reply to आता श्रीमंत कोणाला म्हणावे? by श्रीगुरुजी
वैचारिक आहे.
जाणकारांचे प्रतिसाद
माझी डिग्री मला हाती मिळाली
ह्यावर कधी विस्ताराने लिहीन.
In reply to माझी डिग्री मला हाती मिळाली by साहना