Skip to main content

श्रीमंतीचे नियम??

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 20/03/2021 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
भरपूर पैसे मिळवावेत असे कोणाला वाटणार नाही? बहुतांश लोकांना तसे वाटते तरी किंवा भोवतालची परिस्थिती तरी त्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडते. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. साहजिकच इथे संघर्ष खूप आहे, भ्रष्टाचारसुद्धा बराच आहे. शिवाय भारतात श्रममूल्य हे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीतून प्रयत्न करुन आर्थिक समृद्धी आणण्याचे महत्कार्य पार पाडावे लागते. थिंक अँड ग्रो रिच हे श्रीमंत कसे व्हावे या विषयावर बरेच गाजलेले पुस्तक विशेषत: अमेरिकन जनता डोळ्यासमोर ठेवून लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिले होते. यालाही साधारण ८४ वर्षे होऊन गेली. चर्चेचा विषय हाच आहे की भारतासारख्या देशात श्रीमंत होण्यासाठीचे काही ठाशीव नियम असू शकतात का? अर्थात प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. ते व्यक्तिपरत्वे थोडे बदलूही शकतात. ते कायम तसेच राहतात असेही नाही. पण अपवादानेच नियम सिद्ध होतात हे ही खरे आहे. ते अपवाद गृहित धरुन श्रीमंत होण्यासाठीचे काही ठराविक नियम असू शकतात का? हेच पहायचे आहे. आता श्रीमंत कोणाला म्हणावे? तर एका त्रिकोणी कुटूंबाला ज्यातल्या कुटूंबप्रमुखाचे पुण्यासारख्या शहरात, वयाच्या तिशीच्या आत किमान ६० हजार रुपये वैयक्तिक मासिक उत्पन्न असेल तर तो सुद्धा श्रीमंत म्हणायला हरकत नसावी. यात त्याच्याकडे बाईक आहे पण चारचाकी नाही, कसलेही खर्चिक व्यसन नाही असे गृहित धरले आहे. ही झाली किमान मर्यादा. आता याउपर ही मर्यादा कितीही असू शकते. जसे उत्पन्न वाढेल तसतसे चारचाकी किंवा खर्चिक व्यसन किंवा अजून खर्चायला लावणार्‍या बाबी उत्पन्नाच्या प्रमाणात अॅड करायला हरकत नाही. धाग्याचा उद्देश प्रामुख्याने उपरोल्लिखित किमान कमाईपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍यांना श्रीमंत होण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चा हाच असावा. आधीच भरपूर कमवणार्‍यांना अजून कसे कमवता येईल यासाठी हा धागा नाही. _/\_ विषयानुषंगाने काही प्रश्न की जेणेकरुन चर्चेला दिशा मिळेल. १) नशीब हा फॅक्टर श्रीमंतीसाठी किती महत्वाचा आहे? २) मराठी लोक व्यापारात फारशी जोखीम घेत नसल्याने त्यांना पंगुसिंमा (पंजाबी, गुजराती, सिंधी, मारवाडी) इतके यश व्यापारात मिळत नाही असे म्हटले जाते. पण पंगुसिंमांच्या व्यापाराच्या अशा काही पद्धती किंवा ट्रिक्स असू शकतात का की ज्यामुळेच ते व्यापारात यशस्वी होतात? उदा. एका मारवाडी व्यक्तीने दुसर्‍या मारवाड्याला धंद्यासाठी कर्ज दिले. ते व्याजासहीत वसूल होण्याचा कालावधी हा मराठी माणसाने दुसर्‍या मराठी माणसाला धंद्यासाठी दिलेल्या कर्जवसूलीच्या कालावधीपेक्षा जास्त असू शकतो का? पंगुसिंमा हा तग कसा धरु शकतात? अशाच अजून काही युक्त्या असू शकतात का पंगुसिंमांच्या? ३) शहर जितके मोठे तितकी आर्थिक समृद्धी जास्त असे काही असते का? ४) काही क्षेत्रे अशी आहेत ज्यातील कौशल्यातून चांगले पैसे मिळतात. ते कौशल्य शिकण्यासाठी गुंतवलेल्या पैशाच्या तुलनेत परतावा जास्त आहे. काही मिपाकरांशी चर्चा करुनच ही यादी बनवली आहे. यात अजून काही सुधारणा किंवा वाढ करता येईल का? १. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लागणारं कोणतंही कौशल्य २. कॉम्प्युटर हार्डवेअर इन्स्टॉलेशन,फिक्सिंग ३. सेल्स अँड मार्केटिंग ४. कायिक आरोग्यसेवांतर्गत येणारे कोणतेही कौशल्य ५. गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय शिकवता येणे. ६. आर्थिक गुंतवणूकीचे सल्लागार ७. रसायनशास्त्र (कॅटॅलिस्टस्) ८. विद्युत अभियांत्रिकी (कॅप्टीव्ह जनरेशन) ९. लोगो डिझाईनिंग १०. चारचाकी किंवा जड वाहन सफाईदारपणे चालवता येणे. ११. धार्मिक,अध्यात्मिक सेवा पुरवणे १२. कार, बाईक दुरुस्ती, स्वच्छता १३. न्यायिक सेवा (वकील वगैरे) १४. स्पर्धापरीक्षा उत्तम गुणांनी पास होणे. १५. वातानुकूलन यंत्र दुरुस्ती,निगा १६. चेतनकला १७. स्टँडअप कॉमेडी

वाचने 75839
प्रतिक्रिया 180

प्रतिक्रिया

मी आता future रिटायरमेंट चा विचार करुन आणी सध्य स्तिथीतील नोकरी लवकरच म्हणजे अजून ७-८ वर्षात सोडत आहे. त्यामुळे आत्ताच साईड बाय साईड व्यवसायात उतरलो आहे. म्हणजे नंतर जम बसलेला असु शकतो. तरी पैसे कमवणे हा उद्देश असला तरी Ethically व्यवसाय करणे कधी हि ईस्ट ठरते. त्याने भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होतोच होतो. आणि भविष्यात तुमच्याकडे client एक योग्य व्यक्ती किंवा कंपनी म्हणुन जास्त पैसे देऊनही sarvise घेऊ शकतो.. बाकी श्रीमंत - गरीब असले कुठलेही parameter व्यवसायाला नसले पाहिजेत असे वाटते..

In reply to by गणेशा

अभिनंदन! पूर्वी बनवलेली एक यादी आपल्यासहित इतरांनाही उपयोगी पडावी. भरपूर पैसे देणारी+अल्प कालांतराने उत्पादनाची पुनर्निमिती करावी लागणारी उत्पादने आणि भरपूर पैसे देणारे+अल्प कालांतराने पुन्हा सेवा द्यावी लागणारे सेवा उद्योग यांची यादी. यासाठी स्टॅटेस्टीकल डेटा गोळा केलेला नाही.साधारण अंदाज बांधून ही यादी बनवली आहे.त्यामुळे यात उणीवा असण्याची शक्यता असू शकते.मिपावरच्या तज्ञांनी यादी वाढवण्यास/संपादन करण्यास कृपया मदत करावी. १. शेती २. गाय/म्हैस/शेळी/मेंढी/खाण्यायोग्य पक्षीपालन ३. स्थानिक अन्नपदार्थ निर्मिती केंद्रे (हॉटेल,फास्टफूड,रेस्टॉरंट,खानावळ,बेकरी पदार्थ इ.) ४. अन्नपदार्थ विक्री. (दुग्धजन्य पदार्थ,स्नॅक्स प्रकारातले पदार्थ,लोणची,पापड,चटण्या,आईस्क्रिम इ.) ५. प्राशनयोग्य द्रव पदार्थ (दूध,दारु,कोल्ड्रिंक्स,दुग्धसमाविष्ट द्रव पदार्थ उदा.चहा,कॉफी इ.) ६. मिनरल वॉटर ७. सौंदर्यप्रसाधने ८. कागद आणि प्लॅस्टीकवरील छपाई ९.राज्य/देश/आंतरराष्ट्रीय स्तरावरील टिव्ही चॅनलसाठी व्हिडिओ शुटींग/व्हिडिओ एडीटींग १०. पॅकेजिंग उद्योग ११. बँकींग १२. ड्रायक्लिनिंग १३. मनोरंजन उद्योग १४. वाहनांची स्वच्छता/दुरुस्ती १५. खनिज तेल उद्योग १६. कारखाने/मोठी हॉटेल्स यांची विद्युतीय देखभाल १७. वीजनिर्मिती उद्योग १८. पर्यटन १९. हॉटेल मॅनेजमेंट २०. प्लॅस्टीक आणि रबरी वस्तूंची निर्मिती २१. सलून/ब्युटीपार्लर २२. रसायन निर्मिती/प्रक्रिया उद्योग २३. औषध निर्मिती २४. औषध वितरण

In reply to by उपयोजक

मी करत असलेली आणि माझ्या आवडीचे काही सांगतो.. Finance , Book keeping , health/ wealth planner , share market, Teaching, Trek/outing planner , event management , photography .......................

In reply to by उपयोजक

या क्षेत्रातल्या चांगल्या कंपन्या बघून त्यांच्यात शेअर्स च्या माध्यमातून गुंतवणूक करणे हाही एक चांगला व्यवसाय होऊ शकतो.

In reply to by राघव

जी उत्पादने आपण आणि आजुबजुचे लोक वापरतात त्याच कंपनीचे समभाग घ्यावे

उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नौकरी आणि सार्वकालिन सर्वोत्तम म्हणजे, सल्लागार.... परकीय आक्रमण झाले आणि आपण ही चतुःसुत्री, हरवून बसलो.. मराठी माणूस नौकरी करत असेल तर लग्न लगेच होते किंवा मग तो अतिशय श्रीमंत तरी हवा

तुम्ही लेखात दिलेल्या लिस्टमधील पर्यायांवर, खालील थंब रुल लावून काट मारा वा नका मारू. निर्णय तुमचा... "ज्या गोष्टी (ए आय /मशीन लर्निंगने) ऑटोमायझेशन करता येतील त्या नको..." उदा. वाहन चालवणे... बघा ह उद्या गुगल कार घेऊन आले, तर सध्या जे ड्रायवर आहेत, ते रात्रीतून बेरेजगार होणार... "ज्या गोष्टी (ए आय /मशीन लर्निंगने) ऑटोमायझेशन करता येणार नाही त्यावर फोकस करा..." उदा. स्टँडअप कॉमेडी, कोणतीही कला.. गुगल, अँपल यांचे तीर्थरूप जरी आज आले, तरी (ए आय /मशीन लर्निंगने) ते घंटा जास्त काही करू शकत नाही साध्याला....

In reply to by उपयोजक

आताच जानेवारी २०२१ मध्ये माझा बालमित्र असलेला एक जन मेकॅनिकल अ‍ॅटोमेशन मध्ये आला आहे, आणि प्रगती पण चांगली आहे. भारी आहे फिल्ड ते.. त्याचे प्रोजेक्ट पाहुन भारी वाटले...

In reply to by उपयोजक

कारखाने आणि वाहनउद्योग यातले ऑटोमेशन हे भारताय कितीजणांना परवडणारे असेल?
कोणा सामान्य भारतीयाला ऑटोमेशन परवडणारे नाही, म्हणूनच मी म्हटले, की अश्या प्रकारावर फोकस करा, की जे उद्या ऑटोमेशन होणार नाही/ होऊ शकणार नाही.

In reply to by उपयोजक

भारत देशातून किती वहाने निर्यात होतील त्याच्या आकारमानावर ते अवलम्बून असेल. आपल्याकडे गोव्याचे बाजूला काजूच्या सम्बन्धित कारखाने आहेत तसे ते टर्की मधी देखील आहेत. दोन्ही चे विडिओ यू ट्यूब वर आहेत. ते पाहून तुम्हाला कळेल की आपले कारखाने पूर्ण यान्त्रिक नाहीत. मानवी हाताचे काम इथे आहे. उलट तर्की येतील कारखान्यात ९० टक्के काम यन्त्रच करते. पण तेथील उत्पादन खूप जास्त आहे. त्याना ते त्यामुळे परवडते. मोठ्या कारखान्याची युनिफॉर्मची मागणी मिळत असल्याने पुण्यात बाहेती यान्चे कारखान्यात बरीचशी कामे यन्त्रे करीत असतात. अतिशय गुन्तागुन्तीची किचकट कामे असतील तर ती माणूस ठेवून करणे बरे ठरते. रोबो हा पर्याय तिथे असत नाही. आता ड्रोन जसे स्वस्त होत आहेत तसे रोबोही असे माझा शेजारी जो या क्षेत्रात आहे तो सांगतो.

In reply to by आंद्रे वडापाव

बघा ह उद्या गुगल कार घेऊन आले, तर सध्या जे ड्रायवर आहेत, ते रात्रीतून बेरेजगार होणार...
असं एका रात्रीत वगैरे काही होत नाही. अजून पाश्चात्य जगातही विना ड्रायव्हर कारचे प्रयोगच केवळ चालू आहेत. भविष्यात होणारच नाही असे नाही. पण यात खूप गुंतागुंत असेल , तांत्रिक, कायदेशीर, विमा विषयक, अर्थिक गुंतवणूक ई.. अजून तरी ऑटो पायलट तंत्रज्ञान असून वैमानिकाशिवाय देशांतर्गत विमानेही उडत नाहीत. तिथे तर एअर ट्रॅफिक कंट्रोल, अद्ययावत यंत्रणा ई सगळे असून.. वैमानिकांचा पगार तर कार (वा बस, ट्रक ई) चालकाच्या पगाराच्या अनेक पट असतो.. पण वैमानिकाची नोकरी जाण्याची अजून भीती दिसत नाही .. तीच गोष्ट ट्रेन्सची ट्रेन निश्चित ट्रॅकवरुन धावते सिग्नल यंत्रणा असते, मध्ये कुणी घुसत नाही तरी लाख-दोन लाख पगाराचा मोटरमन असतोच. मग पंधरा-वीस हजार पगार असलेल्या ड्रायव्हरनेच काय घोडं मारलंय. बरं तो बिचारा सामान पण उचलून डीकीत ठेवतो, दार उघडतो, प्रवासात गप्पा मारुन मनोरंजन पण करतो.

In reply to by मराठी कथालेखक

कोणतेही नवे तन्त्र आले की त्याला प्रस्थापित ज्याच्या पायाखालची वाळू सरकते त्याचा विरोध असतो ! दुसरे नवे तन्त्र स्वीकारण्यात काही भावनिक गोष्टीचा ही प्रभाव असतो. जसे ज्यावेळी विद्युत दाहिनी आली त्यावेळी हे काय निर्दयपणे प्रेताला एका खोलीत ढकलून द्यायचे किन्वा अहो वीज आणि लाकडाचा अग्नी यात लाकडाचा अग्नी हाच पवित्र आहे वगैरे असे प्रतिपादन करण्यात आले. अपघाती मरण वा हार्ट अटॅक वगळता मरण हे देखील टप्प्याटप्याने येत असते. तांत्रिक बदलाचे तसेच आहे ! बँकेत संगणक आले त्यावेळी युनियन ने केवढा गहजब केला ! आज युनियनच म्हणेल स्टॅण्डबाय संगणक ठेवा बिघडला तर घोळ.नको .आजही ऑन लाईन सत्यनारायण पूजेपेक्षा भाविकाला ओढ आहे ती गुरुजींनी घरी येऊन समक्ष पूजा सांगण्याची ! जाता जाता- इताम्बूल मध्ये आताही एक मेट्रो लाईन ड्रायव्हर शिवाय चालत आहे ! अनेक सामाजिक समस्यांचा विचार करून काही ठिकाणी तांत्रिक प्रगती मुद्दाम होऊन नाकारावी लागते ! भारत याचे फार मोठे उदाहरण आहे !

In reply to by आंद्रे वडापाव

Ai वर आधारित यंत्र ही माणसाला replace करत आहेत. आता पर्यंत जे शोध लागले उपकरण निर्माण झाली ती माणसाला replace करत नव्हती तर माणसाला मदत करत होती. त्या आता पर्यंत जी आधुनिक उपकरण आली नी त्या मुळे जी स्थिती निर्माण झाली ती मानवाच्या प्रगती साठी सकस होती. त्याची आणि Ai वर आधारित तंत्राची तुलना करता येणार. AI वर आधारित तंत्र फक्त माणसाला replace करण्यासाठी वापरले जाणार. १) घरकाम करायला यंत्र २) विविध उत्पादन करणाऱ्या कारखान्यात उत्पादन घेण्यासाठी माणसं ऐवजी यंत्र. ३), बँकेत जास्तीत जास्त AI च वापर करून माणूस विरहित बँक. ४), गाड्या,विमान,रेल्वे, चालवण्यासाठी माणसाची गरज लागणार नाही. ५) रोबोट चे तंत्र अजुन प्रगत झाले तर माणसाची सर्व च्या सर्व काम यंत्र करतील. अगदी डॉक्टर,वकील,न्यायाधीश, ह्यांची पण गरज लागणार नाही. यंत्र माणसापेक्षा ताकत वान होतील . पण यंत्रात चैतन्य,भावना,संवेदना नसतात. खरा प्रश्न हा आहे सर्वच काम यंत्र करू लागतील पण त्यांनी कोणासाठी काम करायचे. माणसा साठीच ना. विविध उत्पादन कोणासाठी माणसासाठी च ना. विविध सेवा कोणासाठी माणसा साठीच ना. जर पूर्ण कामगार वर्ग किंवा जगातील खूप मोठी लोकसंख्या काहीच कामाची नसेल तेव्हा हे प्रचंड उत्पादन कोण खरेदी करणार. खूप कमी लोक . आज १०० टीव्ही जगात विकले जात असतील तर ते २ च विकले जातील. टीव्ही काही जीवन आवशश्य नाही. जर २ टीव्ही ना ग्राहक असेल तर ९८ टीव्ही चे उत्पादन घेवून त्याचे काय करणार. हे उदाहरण अन्न,पाणी,सोडून बाकी सर्व उत्पादन ला लागू होते. अन्न पाणी,हवा असेल तर मानवाला बाकी कशाचीच गरज नाही. नसलेली गरज आपण निर्माण केली आहे. फुल्ल ऑटोमेशन मुळे जागतिक अर्थ व्यवस्था पूर्ण रसातळाला जाण्याची शक्यता च जास्त आहे. ग्राहक वर्ग हा हवाच त्यांची संख्या कमी होणे म्हणजे अर्थ व्यवस्था डब्यात जाणे सरळ हिशोब आहे.

In reply to by Rajesh188

डॉक्टर,वकील,न्यायाधीश, ह्यांची पण गरज लागणार नाही. यावर ए आय फिजिशियन असा लेख मी लिहिणार होतो. माझे एक मित्र रेडिऑलोजिस्ट आहेत .माझ्या सोसायटीतच रहातात . ए आय या विषयावर त्यान्च्याशी गप्पा मारताना त्यानी मला असे सांगितले की येत्या काही वर्षात आमची गरजच लागणार नाही ! हजारेक सोनोग्राफी फोटो यंत्राला फीड करून सम्पूर्ण निरिक्षणे,फिजिशयन व सर्जनला सजेशन ई कामांसकट रिपोर्ट तयार करण्याचे काम यन्त्र करील. अच्युत गोडबोले हे अभ्यासक म्हणतात " बॅंक्स शाल बी म्युझियम्स !! "

In reply to by चौकटराजा

डॉक्टर,वकील,न्यायाधीश, ह्यांची पण गरज लागणार नाही. १९९५ च्या सुमारास संगणक आले त्यात आपली लक्षणे टाकून आपले आजार निदान करता येऊ लागले. २५ वर्षांनी स्थिती काय आहे? डॉक्टरांची गरज अजूनच वाढलेलीआहे. हजारेक सोनोग्राफी फोटो यंत्राला फीड करून सम्पूर्ण निरिक्षणे,फिजिशयन व सर्जनला सजेशन ई कामांसकट रिपोर्ट तयार करण्याचे काम यन्त्र करील.

अत्यंत बाळबोध विचार आहेत.

मी ज्या सोनोग्राफी उपकरणावर काम करतो ते सेकंदाला ७० प्रतिमा निर्माण करते म्हणजे एका रुग्णाचे यकृत मी तपासतो त्याला ३ मिनिटे लागतात गृहीत धरले तर १२६०० प्रतिमा माझा मेंदू ३ मिनिटात पाहून ते माझ्या मेंदूत साठवलेल्या आणि ३१ वर्षाच्या अनुभवाने सिद्ध झालेल्या प्रतिमांशी पडताळून हे व्यवस्थित आहे कि आजारी आहे हे ठरवतो. हे केवळ एका अवयवा बद्दल आहे. असे केवळ एका रुग्णाच्या एका व्यवस्थित अवयवाबद्दल लक्षात घेतल्यास प्रत्येक अवयवासाठी आणि प्रत्येक आजारासाठी संगणकाला अब्जावधी प्रतिमा शिकवाव्या लागणार आहेत. या प्रतिमा पडताळून त्या रुग्णाचे अवयव ठीक आहेत का हे ठरवल्या जाईल. आणि ठीक नसेल तर कोणता आजार असू शकेल त्याच्या प्रतिमांशी संगणकाला तुलना करून अशा आजाराची शक्यता वर्तवावी लागेल यासाठी काही खर्व निखर्व प्रतिमा संगणकाला शिकवाव्या लागतील . हे काम रेडिओलॉजिस्ट सोडून दुसरा कोणीही करू शकणार नाही. असे झाल्यावर आजार किती गंभीर आहे हे ठरवण्यासाठी अजून फार मोठा पल्ला गाठावा लागेल. उदा. माझ्या मित्राच्या आईला स्तनात गाठ होती ती पाहून मागच्या आठवड्यात मी त्यांना तो कर्करोगाच आहे परंतु तुमच्याकडे १०-१२ वर्षे तरी आहेत एवढे अनुभवाने सांगितले. ८० वर्षाच्या स्त्रीला हा फार मोठा दिलासा आहे. असा दिलासा संगणक देऊ शकेल असे पुढच्या २५ वर्षात तरी शक्य आहे असे वाटत नाही. तेंव्हा येणाऱ्या २५ वर्षात तरी कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाला पर्याय होणार नाही. माझ्या सोनोग्राफी उपकरणात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते उदाहरणार्थ बाळाच्या डोक्याची प्रतिमा घेतली तर त्याचा व्यास आणि परिमिती संगणक मोजून देतो. पण डोक्याचा आकार वेगळा असेल तर संगणक गोंधळतो. हे मी अहंभाव दुखावला गेला आहे म्हणून लिहितो आहे असे नसून वस्तुस्थिती आहे. साधा संगणकीय ई सी जी घ्या, जो गेली २० वर्षे तरी प्रचलित आहे त्यावर संगणक आपला अहवाल (रिपोर्ट) देतो. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचाच एक अवतार आहे. त्या अहवालाबद्दल हृदयरोग तज्ज्ञ दुजोरा देत नाही तोवर त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. राहिली गोष्ट. जी गोष्ट बिनडोकपणे वारंवार करावी लागते अशा कमी कौशल्याच्या गोष्टी मध्ये संगणक पुढे येईल याबद्दल शंका नाही. पण एखाद्या स्त्रीला तू सुंदर दिसतेस हे संगणकाने सांगितले तर तिला त्याचे समाधान होईल का? बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

तुमचा संगणक आणि त्याचे सॉफ्टवेअर AI वापरत नाही. या क्षेत्रात प्रचंड बदल झालेले आहेत आणि होताहेत. सध्याचा 1 दिवस हा 2010 मधल्या संपूर्ण वर्षाएव्हढा आहे हे संगीतलं तर किती प्रचंड गतीने कॉम्प्युटर ज्ञान आत्मसात करतो आहे हे लक्षात येईल. शिवाय आता हे सॉफ्टवेअर तुमच्या मशीन वर असण्याची गरजच नाही. त्याचा कित्येक जीबी डेटा क्लाऊड वर ठेवलेल्या सॉफ्टवेअर ला पुरवला जाईल आणि तिथे निर्णय घेऊन तुम्हाला कळवला जाईल. कॉम्प्युटर बिनडोक कामे करणार नाही या पुढे. तो projections करेल, rule based analysis करेल आणि निर्णय घेईल. I am sorry to say this, but most of the human work is doomed in coming decade and yours is the easiest to automate.

In reply to by पिनाक

किती प्रचंड गतीने कॉम्प्युटर ज्ञान आत्मसात करतो संगणक मुळात ढ असतो त्याला अ + ब = क हे मुळात शिकवावे लागते. आज या मूलभूत कल्पना शिकवून काही दशके झाल्यामुळे आपल्याला असे वाटत असते कि संगणकाला सर्व काही येते. मानवी शरीराच्या बाबतीत एक गोष्ट सांगतो कि आपला स्वतःचा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उजव्या हाताच्या अंगठ्याशी जुळत नाही. म्हणजेच आपण प्रत्येक व्यक्ती हि एकमेवद्वितीय ( युनिक) अशीच आहे. असेम्ब्ली लाईन मध्ये उत्पादन झालेली नाही. आई वडिलांचा एखादा अवयव (उदा मूत्रपिंड) मुलाच्या शरीरात रोपण करण्यासाठी आणि तेथे टिकवण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागतात. हेच जीवशास्त्रीयदृष्ट्या अजिबात संबंध नसलेल्या नवऱ्याचे मूल आईच्या गर्भाशयात नुसते जगते नव्हे तर भूमितीय पटीने वाढत जाते ( ९ महिन्यात काही मायक्रोग्रॅम पासून ३ किलोग्रॅम पर्यंत). हे ज्या वेळेस वैद्यकशास्त्रास समजेल तेंव्हा अवयव रोपं अतिसाहय सोपे होईल. दुर्दैवाने अभियांत्रिकीच्या लोकांचे जीवशास्त्राचे मूलभूत ज्ञान हे नगण्यच्या जवळपास असते परंतु प्रत्येक गोष्टीचे गणितीय प्रारूप करता येईल हा अट्टाहास मात्र असतो. हि सतत होत जाणारी वैद्यकशास्त्राची प्रगती संगणकाला सतत शिकवावी लागेल. आणि शेवटी या प्रगतीचा मूळ हेतू हा मानवी जीवन सुलभ करण्यासाठी आहे हेच लोक विसरत आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्न अल्गोरिदमने सोडवणाऱ्या अभियंत्याला गरोदरपणामुळे बायकोच्या पोटात कसं तरी होतंय याचे उत्तर सापडत नाही. त्याची स्वतःची आई आपल्या सुनेला "अगं, गरोदरपणात असं होतंच. याच्या वेळेस माझ्या पोटात पाणी सुद्धा ठरत नव्हतं, तू अजिबात काळजी करू नकोस " हे सांगते आणि त्याने

बायकोचं समाधान होतं. याने कितीही गुगल वाचून संप्रेरकांच्या उलथापालथीने होते असे सांगून तिला काही फरक पडत नाही तेंव्हा त्याला हतबल वाटतं. जाता जाता -- २०१० च्या ३६५ पट वेगाने काम करणारा संगणक अजूनही करोनाची १०० % गुणकारी लस निर्माण करू शकलेला नाही. असो

In reply to by सुबोध खरे

राजेश जी, चौराकाका, पिनाक.. नाही.. मशीन लर्निग algorithms, analysis करतील लाखो images चे, लाखो data चे.. ते माणसांच्या geography वरून, त्याच्या gender वरून किंवा आणखीन कसल्याश्या data वरून अनुमान काढतील की असे झाले तर पुढे भविष्यात काय होईल.. परुंतु, AI डॉक्टरांना replace करू शकणार नाही. AI कितीही intellegent झाले तरी त्याच्या नावापुढे असलेला artificial हा word ते पुसू शकणार नाही. - गणेशा

In reply to by गणेशा

हे दोन विषय जबरदस्त क्रांती करत आहेत. एक उदाहरण म्हणुन पेपर मधे वाचलेल्या लेखाबद्दल सांगतो १९९६ साली आय बी एम कंपनीने डीप ब्ल्यु नावाचा महा संगणक बाजारात आणला होता आणि त्याची जाहिरात म्हणुन त्यावेळचा सुप्रसिद्ध बुद्धीबळपटू कास्पारोव्ह्बरोबर त्याची प्रदर्शनीय मॅच लावली होती. कास्पारोव्हने ती जिंकली आणि मग मानवी मेंदु मशीन पेक्षा नेहमीच श्रेष्ठ असेल वगैरे स्तुती सुमने उधळुन त्या विषयावर पडदा पडला. ह्या पराभवातुन धडा घेउन आय बी एम ने समांतर गणक पद्धती(पॅरलल प्रोसेसिंग) वापरुन एका वेळेस अनेक प्रोसेसर लाखो गणिते करु शकेल असा पुढचा संगणक जन्माला घातला. आणि १९९७ साली पुन्हा तशीच एक मॅच झाली जी यावेळी डीप ब्ल्युने जिंकली. यात कास्परोव्ह जेव्हा चाली खेळताना २० शक्यता(प्रोबॅबिलिटी) विचारात घ्यायचा तेव्हा डीप ब्ल्यु साधारण २० लाख शक्यता विचारात घ्यायचा कारण तो १+१=२ असाच विचार करु शकायचा. पण तो कुठेही गाळणी (एलिमिनेशन) करत नसे. त्यानंतर पुन्हा तशी मॅच झाली नाही पण संगणकाच्या गणन शक्तीला वाढवत बसण्याला असलेल्या मर्यादा ओळखुन शास्त्रज्ञ लोकांनी गाळणी पद्धत वापरायला सुरुवात केली. त्यात २० लाख शक्यतांपैकी किती चाली कास्पारोव्हने कधीच वापरल्या नाहीत, अमुक ओपनिंग केल्यास किती चाली बाद होतात, कितव्या मिनिटाला कुठली चाल होत नाही वगैरे अनेक शक्यता विचारात घेउन संगणक नेमक्या चाली निवडे. थोडक्यात शास्त्रज्ञ लोकांनी त्याला पॅटर्न ओळखायला शिकवले ज्यामुळे फालतु गोष्टी टाळुन नेमका निर्णय घेने त्याला जमेल. शिवाय हे निर्णय लक्षात ठेवुन पुढील वेळेस तो वापरेल म्हणजे दिवसेंदिवस त्याच्या निर्णय क्षमतेमधे सुधारणा होत जाईल. अशी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण यामुळे बुद्धीबळ खेळणे थांबले का? नाही, उलट स्पर्धेसाठी तयारी करताना आज यच्चयावत खेळाडु संगणक वापरतात आणि आजकालची लॅपटॉपवर चालणारी साधी सॉफ्ट्वेअर डीप ब्ल्युपेक्षा कैक पटीने जबरदस्त आहेत. त्यामुळे फक्त तांत्रिक अंगाने विचार केला तर आज आपण करतो ती अनेक कामे भविष्यात बाद होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण नवनव्या संधी उपलब्ध होतील हेही तितकेच खरे आहे.तेव्हा परिस्थितीशी जुळवुन घेणे किवा बाजुला होणे हेच पर्याय आहेत.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आज वैद्यकाला मदत करतात ते इंजिनियर ! एखाद्या रुग्णालयाची पर्चेस ऑर्डर पहा ! त्यात कितीतरी गोष्टीना इंजिनिअर लोकांचा हात लागलेला आहे ! आणि तो पुढे लागण्याशिवाय पर्याय नाही. आज १ वर्षात आपण लस शोधू शकतो यात अनेक अत्याधुनिक उपकरणाची मदत झालेली आहे ! मानवी मेंदूचे गुणगान करताना माणूस आपल्या मेंदूतील प्रोसेसर वापरताना काहीही अडचण येत नाही असे गृहीत असते . पण जरा आजूबाजूला मानवी मेंदूच्या मर्यादांची लिस्ट पाहा . मुख्य म्हणजे अतिशय सूक्ष्म मापन करण्याची क्षमता नसणे हा माणसाचा एका मोठा दोष आहे . हात लावल्याने ताप आहे हे कळते पण तो किती आहे हे संशोधन करणारा इंजिनिअरच असेल ना ? कारण तो किती ताप आहे हे फार महत्वाचे मापन काही निरणयासाठी ठरू शकते.दूसरे महत्वाचे वैगुण्य म्हणजे स्तराधारित स्मृती . त्यामुळे मानवी मेंदूला स्थूलपणे प्रतिमा लक्षात ठेवता येत असलेली पण त्यात अतीसूक्ष्म ता आली की माणूस संगणकासारखे रिझल्ट देऊ शकत नाही ! मी जे हे प्रतिपादन करतो आहे ते मी जेंव्हा पुणे येथील आय एम डी आर् या संस्थेत आज्ञावलीतील पहिले धडे घेतले त्यावेळी जे ऐकले आहे त्यावर आधारित. मी आज जेंव्हा फोटोशॉप हे सॉफ्टवेअर वापरतो त्यावेळी ते तयार करणार्या थॉमस नॉल व त्याचे सहकारी इंजिनीअर यांच्या पुढे आपण किती क्षुल्लक आहोत याचे भान येते.पण .... पण यात एक खास गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फोटोशॉप वापरणारे मेंदू त्या इंजिनिअरांच्या पलीकडचे आहेत . कारण क्रिएटिव्हिटी आली की संगणक ठप्प ! एखादा की बोर्ड काहीतरी वाजवू शकतो पण चाल लावू शकत नाही ! जिथे फक्त गणिती अनुमान आहे त्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमता नक्की पराक्रम गाजविणार ! तिला अगदी अमिताभ सारखा नाही तरी त्यासम ऍनिमेटटेड अमिताभ उभा करता येईल .पण कथा लिहिता येईल काय ? हा प्रष्णाचे उत्तर आजच्या भाषेत नाही असे आहे ! काळाच्या उदरात काय दडवून ठेवले आहे कुणास ठाऊक !

In reply to by चौकटराजा

माझा विषय रेडिओलॉजी ज्यात संगणकाचा सर्वात पहिल्यांदा आणि सर्वात जास्त वापर केला जातो. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय सुद्धा माझ्या शाखेने सर्वात प्रथम उपयोगात आणायला सुरुवात केली. आणि याचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आहेच परंतु यामुळे प्रशिक्षित क्षकिरण तज्ज्ञाची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेईल हे नजीकच्या भविष्यकाळात ( आपल्या आयुष्यभरात) तरी अशक्य आहे. उदा. छातीच्या क्षकिरण प्रतिमेचे विश्लेषण करून त्यात कर्करोग असण्याची शक्यता हि आता संगणक जास्त अचूकतेने करू लागला आहे. परंतु त्यासाठी अक्षरशः हजारो कर्करोगाच्या प्रतिमा संगणकाला शिकवाव्या लागल्या होत्या. असे संगणकाचे प्रशिक्षण केल्याने सर्वात मोठा फायदा सुदूर असणाऱ्या ठिकाणी जेथे प्रशिक्षित मनुष्यबळ नाही तेथे सर्वात जास्त होऊ शकेल. आजसुद्धा अमेरिकेत केलेल्या स्कॅनच्या प्रतिमा भारतातील क्षकिरण तज्ज्ञ आपल्या दिवसा ( अमेरिकेत रात्र असताना विश्लेषण करून त्याचा अहवाल रात्रीत तेथे पाठवून डॉलर्स मध्ये कमाई करत आहेत कारण यंत्र प्रशिक्षण (मशीन लर्निंग) देण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित शिक्षकच लागतात. एकदा यंत्राला शिकवले कि ते तेवढे काम जास्त उत्तम आणि सफाईने करते हे सत्य. आज तरी संगणक स्वतः स्वतंत्र विचार करू शकत नाही. परंतु या यंत्राला कालबाह्य करणारे तंत्रज्ञान विकसित होत जाते तसे नवींन तंत्रज्ञान नव्या यंत्राला शिकवावे लागेलच. त्यासाठी त्या बुद्धीचे मनुष्यबळ लागणारच आहे. यात अशिक्षित आणि अर्ध शिक्षित मनुष्यबळाचा ऱ्हास होईल हि मात्र वस्तुस्थिती आहे. जसे रिक्षा मोटारी आल्या तेंव्हा टांगे नाहीसे झाले आणि संगणक आल्यावर टायपिस्ट/ स्टेनोग्राफरची गरज नाहीशी झाली.

In reply to by मराठी कथालेखक

मटार स्वस्त झाले की आर्थिक दृष्टीने बरे वाटते पण शारिरीक दृष्टीने फायदेशीर पडत नाही....

In reply to by मुक्त विहारि

तेच ना.. इथे लोक ऑटोमेशनचे गोडवे गातात पण प्रत्यक्षात कितीतरी कंटाळवाणी आणि काहीतर घाणेरडी कामं माणसांना करायला लागतात. माझ्याकडे एक व्हिडिओ होता माझ्याच सोसायटीच्या बाहेरचा तुंबलेलं गटार साफ करण्यासाठी एक माणूस (महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी ) कपडे काढून सांडपाण्यात उतरला होता. फारतर वर्ष -दीड वर्षातला असेल व्हिडिओ. माझ्यानं बघितलाही गेला नाही पुर्ण.. डिलीट केला.. पण आता वाटतं ठेवायला हवा होता.. महासत्तेच्या गप्पा मारताना अशा व्हिडिओची आठवण हवी... बरं हे पण कुठल्या खेड्यातलं नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतलं दृष्य... तळागाळातल्या माणसाचं जीवनमान सुधारत नसेल तर त्या ऑटोमेशनचं काय करायचं ?

In reply to by मराठी कथालेखक

काही काळापूर्वी CGI technology चित्रपटातील प्रमुख कलाकारांना बेकार करेल अशा बातम्या यायच्या परंतू तसे काही घडले नाही.

In reply to by आग्या१९९०

18 व्या शतकात रेल्वे नवीन नवीन पाहून भारतातील लोक जशा चर्चा करत असावेत त्याचा हा आधुनिक प्रकार वाटतो.

In reply to by मराठी कथालेखक

पण त्याला आपल्याकडे पर्याय नाही. या कामासाठी बोलावताना मी दोन साबण आणून देत असे आणि आंघोळ करायला लावत असे.

In reply to by मराठी कथालेखक

आजही शहरात रस्ते खणायला मशिन वापरले जात असेल परंतू जेथे वीज , टेलिफोनच्या वायर आणि पाण्याचे पाईप असतात त्याठीकाणी माणसेच टिकाव फावड्याने खोदकाम करतात.

In reply to by आग्या१९९०

एक लक्षात घ्या १९८६ मध्ये मी संगणक वापरीत होतो . माणूस असो वा संगणक त्याला २ अधिक २ बरोबर चार हे शिकवावेच लागते . मानवी रोजगारी मध्ये पाहाल तर ८० टक्केचे वर कामे कोणतीही फार मोठी बुद्धीमत्ता वापरून होत नाहीत. म्हणून तर संगणकाला काही प्रमाणात का होईना माणसाचा पर्याय म्हणतात. १९८६ चे सुमारास फाईल वाच रेकॉर्ड तयार कर व छाप ई . कामे संगणक करीत असे. हार्डवेअर व सॉफ्टवेअर मध्ये जशी प्रगती झाली तसे फिल्टर, सॉर्ट ई गोष्टीही संगणक करू लागला . मग एकच कमांड ना वापरता कमांडचा समूह ( मॅक्रॉस ) करून अधिकाधिक गुंतागुंतीची आज्ञा द्यायची सोय संगणकात झाली. इंटेल व मायक्रोसॉफ्ट यांनी जणू एकमेकांच्या गरजा समजून आपला संशोधनातला मार्ग चोखाळलेला आहे. हा सारा इतिहास संगणक कार्य शिकविताना शिकविला जातो.संगणकाला जशा मर्यादा आहेत तशा मानवी मेंदूला देखील .(मानवी मेंदूच्या मर्यादासंबंधी काही व्हिडीओ यू ट्यूब वर सापडतील ) मुख्य म्हणजे संगणक ,एकाग्रता ह्या हा गोष्टीची गरज नसलेलेभावना शून्य यंत्र आहे. या दोन बाबी माणसाच्या हातून कितीही अनुभव असला तरी चुका घडवून आणू शकतात. ड्रायविंग लायसन्स असलेला माणूसही अपघात करून शकतो नव्हे ज्यांच्या हातून अपघात झाले आहेत यात टक्केवारी लायसन्स असणारांचीच अधिक असते. संगणक गणन विभाग व तर्क विभाग या दोनच्या संकराने चालतो .तर गणक फक्त गणन च करू शकतो . यामुळे संगणक आज्ञावलीला दोन गोष्टीची मदत लागते. संगणकाला ही पंचेंद्रिये असतात ( पेरेफेरल सेन्सर्स ) हे सेन्सर्स जितके अधिक जितके एकमेकांना संवादित तितके आज्ञावलीला मदत अधिक . आज्ञावलीत जितके व्हॅलिडेशन सखोल ,जितके लॉजिक सखोल ( डीप ली एम्बबेडेड इफ्स ( कंडीशनल स्टेटमेंट ) तितका मिळणारा रिझलट अधिक सत्याच्या जवळचा ! एकेकाळी हवामान खात्याची चेष्टा पु ल देशपान्डे आपल्या लेखात करीत ! आता तो विषय तितका चेष्टेचा राहिलेला नाही कारण अधिकाधिक सेन्सरचा शोध ! आज एकट्या फोटोशॉप हा सोफ्ट्वेअर ची प्रगति पाहिली की थक्क व्हायला होते. आवाजावरून टायपिंग हे मला एके काळी अशक्य वाटत असे आज बाजूला आपण माउसने जोडाक्षर काढले तर निमिशार्धात त्याचे रुपान्तर वेक्टर ग्राफिक्स मधे करून तो शब्द कॉपी पेस्ट करायची सोय झाली आहे. आता आपल्या प्रश्नाचे उत्तर. योग्य प्रकारचे सेन्सर असतील तर त्या यन्त्राला अगोदरच समजेल की मी जिथपर्यत खोदाई केली आहे त्यापुढे २ इन्चावर केबल जात आहे. यन्त्र थाबेल .कुठेतरी मानवी निर्णयाची गरज लागली तरी अशा निर्णय घेणार्या मानवी मेंदुन्ची गरज तुलनेने संख्यात्मक द्रुष्ट्या कमी असेल. आजही सी एन नी मशीनवर माणूस असतोच .त्याला फक्त जे रोबोही करू शकत नाही अशी गुन्तागुन्तीची कामे करावी लागतात. आज काय आहे त्या संदर्भात उद्या काय असेल याची कल्पना करता येते ती आजच्या उपलब्ध असलेल्या तन्त्रमाहिती वर . त्यापेक्षा आणखी प्रगत असे काही फिजिक्स ने शोधून दिले तर कोणतेही क्षेत्र नसेल जिथे बेकारी नाही. भावना व नवनिर्मिती इथे मात्र संगणक अपुरा पडणार हे नक्की !

In reply to by चौकटराजा

रोबोट काय करू शकतात ,AI काय करू शकते हा प्रश्न नाही . शेवटी जे काही शोध लागत आहेत,Ai वापरून रोबोट निर्मिती आणि उत्पादन ,सेवा,कामगार विरहित करून त्यांच्या वरचा खर्च तो कंपनीचं फायदा हा एक हेतू आहे . दुसरा हेतू आहे वेग प्रतिस्पर्थी पेक्षा जास्त वेग हवा . आणि तिसरा हेतू आहे दर्जा उत्तम ठेवणे. आणि हे तिन्ही हेतू यांत्रिकी करण आणि AI आधारित तंत्र ,रोबोट, पूर्ण करू शकतात ह्या विषयी बिलकुल शंका नाही . खरा प्रश्न हा आहे की 1) ज्याच्या साठी हे सर्व चालले आहे तो मानव च ह्या सर्व प्रक्रियेत बाहेर जात असेल तर त्याचा फायदा काय . २) उत्तम दर्जा ,असलेल्या आणि पूर्ण यांत्रिक पद्धती नी निर्माण केलेल्या वस्तू,सेवा ह्या तर hundred percent मानव जाती साठीच असणार. ३) यंत्र उत्पादक,सेवा पुरवणारे आणि ग्राहक माणूस हे सत्य कधी बदलू शकत नाही. ४) सेवा घेण्यासाठी,उत्पादित साहित्य घेण्यासाठी हे ग्राहक कसे निर्माण करायचे. ५) कारखानदार, investment करणारे,भांडवलदार,हे उत्पादक किंवा सेवा पुरवणारे असणार पण ह्या व्यतिरिक्त त्या मध्ये माणूस सहभागी नाही. फक्त यंत्र सहभागी आहेत. ६) purchhes पॉवर असणारी लोकसंख्या अशा वेळी वाढेल की कमी होईल. ६) नक्कीच कमी होईल . मग हा सर्व डोलारा नक्कीच कोसळणार आहे. ते उद्या होणारच आहे. माणसाच्या जीवनात यंत्राचा सहभाग किती असावा . काही टक्केच असावा. कोणतेही गोष्ट मर्यादे बाहेर गेली की अनिष्ट परिणाम होणारच. स्किल develop करू ,नवीन संधी मिळतील. हे पोकळ वाक्य आहे. AI च्या पुढे माणसाचे स्किल काय असणार. त्यांची निर्मिती,दुरुस्ती,आणि त्यांचा वापर इथ पर्यंत च मर्यादा आहेत. आणि हे काम काही लाख लोक च पुरेशी आहेत पूर्ण जगात. मग बाकी कित्येक अब्ज लोकांनी काय करायचे. दरोडे,चोऱ्या,हिंसा,नेटवर्क हॅक करणे,system वर हल्ला करणे . ह्या क्षेत्रात स्किल develop karave लगेल. आणि गरज च सर्व शोधाची जननी असते. नेटवर्क कसे हॅक करायचे,रोबोट कसे हॅक करून आपल्या ताब्यात ठेवायचे,ड्रायव्हर लेस गाड्या त्यांची system corrupt करून कुठे कुठे फिरवाय च्या. ह्या विषयात बाकी लोक स्वतः ला झोकून देतील.

In reply to by मराठी कथालेखक

जिथे बुद्धीतील हिशेब वा मापन या भागाचा वापर होतो तिथेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग होईल . जिथे सारासार विचार हाच महत्वाचा आहे इथे यंत्राचे काही काम नाही ! मग मेथी निवडणे हे सारासार विचाराने करण्याचे काम आहे का ? तर एका अर्थाने ते खरे आहे ! मी स्वतः: मेथी निवडताना कधी कात्रीचा वापर करत तर कधी हाताने खुडतो .हा निर्णय मेथीच्या पानाचे स्वरूप ,गड्डी चा ओलेपणा यावर अवलंबून असतो असे अनेक सेन्सर्स मानवी देहात मेंदूला निर्णय घेण्यास मदत करतात तितके यंत्राला लाभत नाहीत .सबब काही कामे दिसायला जरी सोपी असली तरी मशीनच्या दृष्टीने ती गुंतागुंतीची असतात .

In reply to by Rajesh188

राजेश जी, चौराकाका, पिनाक.. नाही.. मशीन लर्निग algorithms, analysis करतील लाखो images चे, लाखो data चे.. ते माणसांच्या geography वरून, त्याच्या gender वरून किंवा आणखीन कसल्याश्या data वरून अनुमान काढतील की असे झाले तर पुढे भविष्यात काय होईल.. परुंतु, AI डॉक्टरांना replace करू शकणार नाही. AI कितीही intellegent झाले तरी त्याच्या नावापुढे असलेला artificial हा word ते पुसू शकणार नाही. - गणेशा

वयाच्या तिशीच्या आत किमान ६० हजार रुपये वैयक्तिक मासिक उत्पन्न असेल तर तो सुद्धा श्रीमंत म्हणायला हरकत नसावी.
नाही हो. साठ हजारात श्रीमंत म्हणावे अशी लाईफस्टाईल नाही ठेवता येणार. त्यात ई.एम.आय वगैरे असेल तर विसराच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

इतर सर्व खर्च भागवून जर महिन्याला ६०,००० रुपये वाचत असतील तर श्रीमंत म्हणू शकतो. साधारण मासिक उत्पन्न : घरचे भाडे emi : ४०,००० फोन, इंटरनेट, वीज इत्यादी : ३५०० आरोग्य : २००० वस्त्र : ३००० चित्रपट, सैरसपाटा : २००० गाडी, पेट्रोल इत्यादी : १०,००० अन्न : ६००० नोकर आणि साफसफाई : ३००० रिटायरमेंट साठी सेविंग : ४०,००० धर्म आणि दान : २००० म्हणजे साधारण कर भरल्यास हातांत १,४०,००० तरी महिन्याला आले पाहिजेत. तरी ह्यांत वर्षाला एकदा प्रदेश प्रवास, इतर कुटुंबीय, लग्न आणि वडीलधाऱ्यांचे आरोग्य, मुलाची फी इत्यादी गोष्टी घातल्या नाहीत.

कायिक आरोग्यसेवा म्हणजे काय? न्यायिक सेवा (वकील हे सगळ्यात बेस्ट आहे... वैयक्तिक सल्ल्यासाठी वकीलाची बडबड १/२ तास म्हणून १००० वगैरे रुपये मोजावे लागतात.

आपला एखाद्या विषयात हातखंडा असेल तर तो कंटेन्ट सरळ युट्यूबवर अपलोड करावा. हल्ली व्हिडिओ बनवायला फार खर्च येत नाही आणि ते फार कठीण काम आहे असेही नाही. आजच्या काळात डेटा हा राजा आहे. एकदा एखाद्या युट्यूब चॅनेलवर मोठ्या प्रमाणावर लोक यायला लागले की त्या जनतेला गुगल जाहिराती दाखवून पैसे कमावते आणि त्यातील काही वाटा त्या चॅनेलवाल्यांना देते. त्यातून भरपूर कमावता यायची संधी आहे. भाऊ तोरसेकरांच्या प्रतिपक्षलाच जवळपास १ लाख ८८ हजार सबस्क्राईबर्स आहेत आणि जवळपास तीन कोटी व्ह्यू त्या चॅनेलचे झाले आहेत. त्यातून लाखांमध्ये (म्हणजे एखाद लाख नाही- १५-२० लाख वगैरे) कमावायची संधी आहे. प्रगत लोकेने मागच्या वर्षी पुढील व्हिडिओ अपलोड केला होता. त्यातून कळेल की त्याला महिन्याला त्यावेळी ५०-६० हजार मिळायला लागले होते. प्रगत लोकेच्या चॅनेलला जितके व्ह्यू त्यावेळी होते त्यापेक्षा भाऊंच्या व्हिडिओंचे व्ह्यू आता चांगले १०-१५ पटींनी जास्त आहेत. म्हणजे यातून किती कमावायची संधी आहे बघा. मी यूट्यूब पर्यटन खूप करतो. नोमॅडिक इंडियन, सॅव्ही फर्नवे हे माझे आवडते चॅनेल्स आहेत. नोमॅडिक इंडियन अफगाणिस्तानला गेला होता आणि तालिबानने ज्या बामियानच्या बुध्दमूर्ती तोफा लावून तोडल्या तिथे तो गेला होता. त्या ठिकाणचा व्हिडिओ आहे. ही मंडळी पण अशीच लाखांमध्ये कमावतात. कोल्हापूरची मुक्ता नार्वेकर पण छान व्हिडिओ अपलोड करते. कोकणी रानमाणूसचे पण व्हिडिओ आवडतात. फक्त युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करताना चांगला कंटेंट देता आला पाहिजे आणि मधूनमधून सारखे काहीतरी अपलोड केले गेले पाहिजे. नाहीतर प्रेक्षक नियमितपणे आले नाहीत तर त्याचा उपयोग नाही. आताच्या काळात स्क्रीन रेकॉर्डिंग करून कोणालाही कोणतेही व्हिडिओ रेकॉर्ड करता येतात. आणि असे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आंतरजालावर कुठे पसरतील यावर व्हिडिओ बनविणार्‍याचे काहीच नियंत्रण राहत नाही. विशाल मलकान आणि त्याची बायको मेघना हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून शेअरमार्केटचे प्रशिक्षण देत आहेत. इतकी वर्षे ते पंचतारांकित हॉटेलांमध्ये सेमिनार घ्यायचे पण लॉकडाऊनमुळे त्यांना ऑनलाईन क्लास घेणे भाग पडले. ते या क्लासेससाठी ६ आकड्यांमध्ये चार्ज करतात. पण एकदा ऑनलाईन क्लास घ्यायला सुरवात केल्यानंतर त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी स्क्रीन रेकॉर्ड करून ते व्हिडिओ पसरवले. अनेक टेलिग्राम चॅनेलवर ते व्हिडिओ बघायला मिळतील. काही टेलिग्राम चॅनेलवाले तर त्याचाही धंदा करतात. म्हणजे विशाल-मेघना लाखांमध्ये चार्ज करत असतील तर आम्ही तुम्हाला तेच व्हिडिओ एक हजारात देतो वगैरे. तेव्हा काही वर्षांनी असा कंटेंट पैसे देऊन विकणे हा धंदा राहणारच नाही. त्यापेक्षा सरळ युट्यूबवर अपलोड करावे, नियमित प्रेक्षक गोळा करावेत आणि त्यातून पैसे कमावावेत. जर प्रेक्षकांना युट्यूबवर फुकटात बघायला मिळत असेल तर असे व्हिडिओ रेकॉर्ड करून विकणे हा प्रकारच बाद होईल. फक्त त्यासाठी नियमितपणे चांगला कंटेंट देता आला पाहिजे आणि चांगले मार्केटिंग जमले पाहिजे.

अगदी गणिती हिशेबाने पहायचे झाले तर ज्याच्या कमाईपेक्षा खर्च कमी आहे तो श्रीमन्त ! ज्याचे बरेचसे पैसे हप्ते भरण्यात जातात तो गरीब ! आता आपण गरीब व्हायचे की श्रीमन्त हे ज्याचे त्याने मला आयुष्याकडून काय हवे त्यावर ठरते. तुम्हाला असे वाटत असेल की माझ्या पुढच्या पिढी ला मी काहीतरी मोठ्ठे देणे लागतो तर तुम्ही अधिक गुन्तत जाता पैसे मिळविण्याच्या खटपटीत रहाता ! तुम्हाला असे वाटत असेल की मरणा पर्यंत मित्र -सरणापर्यंत नातेवाईक बाकी आपण एकटेच येतो व जातो ! तर तुम्ही तुमच्या साठी ठरवलेल्या जीवनशैलीतून पुढे विनासायास जाऊ शकता ! देवाने आपल्याला जशी बुद्धी, शक्ती दिली तशी पुढच्या पिढीलाही तो देईल अशी खात्री असेल तर मुलांसाठी प्लॉट घेतला आहे व त्याचे हप्ते मी माझ्या आवडी निवडी बाजूला ठेवून हप्ते भरत आहे अशी तुमची अवस्था होणार नाही ! कोणत्याही व्यवसायातून पैसा मिळविण्यासाठी कल्पकता ,कष्ट करण्याची तयारी,,काहीशी लबाड वृत्ती व नशीब अशा अनेक गोष्टी लागतात. ज्यात फारसे डोके चालवावे लागत नाही ( उदा झेरॉक्स चे दुकान ) अशा व्यवसायात तीव्र स्पर्धा उत्पन्न होते .केटरींग ची तीच तऱ्हा असू शकते .काही व्यवसाय विशेष पदवी घेतल्याखेरीज ज्ञान असले तरी करता येत नाहीत उदा सी ए ,फार्मासिस्ट ई. एक सर्वसाधारण नियम असा आहे की कोणत्याही व्यवसायात अगदी शिखरावर जायची तयारी व क्षमता असेल तर उज्ज्वल निकम होता येते नाहींतर " ट्रू कॉपी " चा स्टॅम्प मारून सही करणारा नोटरी होता येते ! एक जण बंगल्यात राहातो दुसरा फ्लॅट मध्ये पण रसरसून जगायची वृत्ती असणारा आनंदयात्रीच खरा श्रीमंत असतो . दागिने ,फ्लॅट ,कपडे,,हॉटेलिंग, मोटार ई ला बरेचसे लोक जीवनशैली म्हणतात पण व्यायाम ,संगीत,,संवाद हास्य विनोंद ,प्रेम,,स्नेह,भटकंती हे जीवनशैली नाहीतर काय आहे ,,?

In reply to by चौकटराजा

आपण भारताबद्दल बोलत आहोत. इथे आनंदयात्री असण्याला समाज फारसे महत्व देत नाही. असा आनंदयात्री फारसे पैसे कमवत नसेल,आहे त्यात समाधानाने जगत असेल आणि तो त्याचे समर्थन करत असेल तर 'Loser's philosophy' असा शिक्का मारुन कमवण्याची कुवत नाही ते सांगा ना! हा बोनसही मिळतो. आपल्या भारतीय समाजात जेव्हा एखादी व्यक्ती आपण पैसे मिळवण्यासाठी काय काय कष्ट केले , शून्यातून आर्थिक वैभव कसे निर्माण केले याबद्दल सांगतो त्यावेळी त्याचे भरभरुन कौतुक होते. मग दररोज संध्याकाळी तुडूंब पिल्याशिवाय झोप येत नसली तरीही चालतं. किती लोक त्याला "तू आनंदी आहेस का? आनंदात राहण्यासाठी तू काय काय केलंस?" असा प्रश्न विचारतात? एखाद्या आनंदयात्र्याला आपला समाज फार काळ आनंदात राहू देत नाही. संगणक शाखेतून न शिकलेले कितीतरी अभियंते हे आयटी कंपनीत चांगले पॅकेज मिळते म्हणून काम करतात.किती मायकालाल ठरवतात की मी ज्या शाखेतून शिकलो त्याच्याशी संबंधित क्षेत्रातच एखादा व्यवसाय करुन त्यातून आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईन आणि हे करताना चाळीशी आली तरी चालेल. किती जण हे आपल्या पालकांना सांगू शकतात? २२-२३ पर्यंत शिक्षण, २६ पर्यंत लग्न आणि २७ पर्यंत एखादं अपत्य याच चाकोरीतून जाणारा आपला भारतीय समाज आहे. त्याला विरोध करण्याचे धाडस फार कमी लोकांमधे आहे. अफाट लोकसंख्या असल्याने पावलोपावली स्पर्धा अटळ आहे. मध्यंतरी KBC मधे एक अपंग मुलगी हॉट सीटवर आली होती.तिने आपला संघर्ष सांगितला. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते. "हमारे बाबुजी ने कहा था; के जब तक जीवन है तब तक संघर्ष है।" अमिताभसारख्या अब्जाधीश महानायकाला संघर्ष चुकत नसेल तर आपण कोण? संघर्षाची सवय होणे हेच चांगले असेही कधीकधी वाटते.

In reply to by उपयोजक

आपण भार्ता बद्द्ल खरेच बोलत आहोत का ..... ? मला नाही वाटत ! मी सोनमर्ग पासून कन्याकुमारी पर्यन्त व जेसल्मेर पासून भूवनेश्वर पर्यन्त भारत पाहिलेला आहे. जब तक जीवन है तब तक संघर्ष है हे तर खरेच ! अगदी आपले शरीर देखील लाखो व्हायरसेस ,फंगी ई सह वाईट हवामान याबरोबर संघर्ष करीतच असते. अमिताभ निवॄत्त होत नाही कारण त्रुप्तीशी त्याचा संघर्षच चालू आहे ! १८० किमी चालत जाऊन पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेणारे वारकरी एका बाजूने आपण त्याना आळशी ( आळशी तरी कसे म्हणावे २० १५ ते वीस कि मी चालणे हे काय आळशीपणाचे लक्षण आहे का ?) म्हणू पण त्यान्चा जो जीवनानन्द त्याना मिळत आहे त्याला किती सम्पतीचा त्याग त्याना करावा लागतो. चरितार्थ हा कुणाला चुकलेला नाही. आरोग्य, चांगली हवा, काहीशी करमणूक यासाठी सम्पत्ती अवश्यकच आहे पण एक क्रिकेट सीरीज झाली की आठ दिवसात दुसरी, एक १०० कोटीचा सिनेमा आला की आठ दिवसात दुसरा ,दर आठवड्याला पिकनिक ,आधीचा सदरा फाटला नसला तरी नवीन सदरा हे काय आहे ..? हे सारे उत्तम आहे हे पटविण्यासाठी मग यातून रोजगार निर्मिती होते असा सिद्धात मान्डायचा ! मग आपण दुबाईला राहायचे बायकोला परभणीला ठेवत आयुष्य जगायचे व बख्ख्ळ पैसा कमावायचे असा फोर्म्युला सुरू होतो. वाढत्या रहाणी मानाचे आकर्षण एका बाजूला तर दुसर्या बाजूला प्रचंड स्पर्धा ,यान्त्रिकीकरण , क्रुत्रिम बुद्धीमत्तेचा वाढता वापर याने एक भयानक जग आपल्यासमोर उभे रहाणार आहे ! तरीही एक मुलाला कम्पनी म्हणून दुसरे मूल हवेच हा हट्ट कायम रहाणार आहे ! भारत व इन्डिया यान्चा असा अर्धनारी नटेश्वर होणार आहे !!

In reply to by चौकटराजा

की पैसेही चांगले मिळतात. मिपावर अगदी सगळे नसले तरी बहुतांश मिपाकरांची इंटेलेक्चुअल लेवल ही चांगली आहे. त्यामुळे नोकरी,व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती करुन त्यातून पर्यटन,हौसमौज करणे शक्य होत असावे. चांगले आहे किंबहूना आपण सगळेच मिपाकर पोट भरले आहे म्हणून इथे लेखनासाठी वेळ देऊ शकत आहोत. बर्‍यापैकी पैसा मिळवणे आणि मन आनंदित करणारे काही करायला पुरेसा पैसा शिल्लक राहणे हे चांगलेच आहे. सर्वांना हे जमले तर आनंदच वाटेल. प्रवासाबद्दलचे साद्यंत अनुभव भटकंती विभागात वाचायला आवडतील. :)

In reply to by उपयोजक

बुद्धीमत्ता असली की श्रीमंत होता येते नव्हे २१ व्या शतकात तीच श्रम , भांडवल ई गोष्टीचा पराभव करीत वरचढ ठरणार आहे पण ती आली तरी श्रीमंत कशासाठी व्हायचे याचे निरनिराळ्या माणसाचे निकष फार भिन्न असतात . तसे म्हणाल तर ५ किलो सोन्याचा सदरा घालणारा माणूस हा आनंदयात्रीचा असतो तत्वतः कारण त्याला त्यातून काहीतरी आनंद नक्कीच मिळत असतो पण एवढे सोने जमविण्यासाठी त्याला अपार कष्ट , कल्पकता ,फसवाफसवी ,गुन्हेगारी ई कशाचाही वापर दीर्घकाळ करीत बसावे लागते ते केवळ मी सोन्याचा सदरा घातला या एका आनंदासाठी ! आपल्या धाग्याचे शीर्षक आर्थिक सुरक्षेततेसाठी काय काय केले पाहिजे असे असावयास हवे होते . श्रीमंती, आर्थिक सुबत्ता व आर्थिक सुरक्षितता या तशा वेगळ्या गोष्टी आहेत . उदा जे दुसर्या अनेकांना येत नाही ते तूम्हाला येत असेल व ही प्रक्रिया अव्याहत असेल हा खरा आर्थिक सुरक्षिततेचा मंत्र आहे . आपला एक मिपाकर च सांगत होता त्याला टिकून राहण्यासाठी गेल्या १५ वर्षात तीन वेळा त्याच्या क्षेत्रातील नवीन असे काहीतरी शिकावे लागले . यात त्याच्या बुद्धीमत्तेपेक्षा त्याच्या मानसिकतेचा विजय अधिक आहे . येत्या १० वर्षात आजचे ६० टक्के रोजगार अस्तित्वातच असणार नाहीत अस कयास आहे . १९७० च्य सुमारास टेलिफोन ऑपरेटर , स्टेनोग्राफर या अजरामर लाईन्स आहेत असते म्हटले जात असे ! आज टाईपरायटिंग इन्सटिट्यूट प्रसादाला तरी सापडेल का जगात ? जाता जाता - पियानो वाजविण्यासाठी पियानो विकत घ्यावा लागतो त्यासाठी पैसे लागतात पण संगीताचा आनंद शीळ वाजवूनही मिळविता येतो . मुळात तुम्हाला संगीताचा आनंद लुटण्याची दैवी देणगी आहे की नाही हे महत्वाचे ! ती श्रीमंती मिळविण्याचा कोणताही फार्म्युला जगात नाही !

In reply to by चौकटराजा

प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा अनुभव वेगळा असतो. उपचारासाठी पैसे नसल्याने एकुलता भाऊ गमावला ह्याचे प्रचंड दुःख राजेश्वर ला झाले आणि हीच परिस्तिथी आपल्या मुलांवर ओढवू नये म्हणून हृदयावर दगड ठेवून तो दुबईला गेला आणि बायकोला परभरणीत ठेवले. इतर लोकांची मनस्थिती आपण जणू शकत नाही त्यामुळे विनय ठेवून लोकांना त्यांचे स्वतःचे हित कश्यांत आहे हे समजण्याची टाकत आहे असे मानून चालावे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या चारी गोष्टीचा बॅलन्स अत्यंत आवश्यक आहे. ह्या समाजांत संपन्नता नाही तो समाज काहीही उच्च दर्जाची मूल्ये निर्माण करू शकत नाही. वाल्मिकी पासून कालिदास पर्यंत भारतांतील सुबत्ता, चांगले व्यवस्थापन इत्यादी त्याच्या कार्यासाठी पोषक होते. आर्यभट असो वा ब्रम्हगुप्त सर्वांचे ज्ञान हे भारत समृद्ध होता म्हणून शक्य झाले. आर्थिक सुबत्ता हा अध्यात्माचा सुद्धा पाया आहे. पतिव्रता हे बिरुद सुंदर आणि युवा स्त्रीच मिरवू शकते त्या प्रमाणे वैराग्य सुद्धा ज्याने राजभोग सोडून दिला त्या बुद्धाला शोभा देते. नाहीतर वृद्धा नारी पतिव्रता ह्याला काहीही अर्थ नाही. आर्थिक सुबत्तेने माणसाला मोकळा वेळ मिळतो ज्यातून काव्य शास्त्र विनोद निर्माण होतो. आज शाकाहाराची सर्वांत मोठी चळवळ अमेरिकेत आहे. बीफ का खाऊ नये ह्यावर जास्त रिसर्च अमेरिका प्रकाशित करते. ध्यान मार्गांचे आणि योगा चे महत्वाचे संशोधक आहे अमेरिकेत आहेत. इतकेच नव्हे धर्मादायी, पर्यावरण, बाल आरोग्य, स्त्री अधिकार, मानव अधिकार, पशु अधिकार ह्या अनेक विषयावर खरोखर मन लावून काम करणाऱ्या मोठ्या संघटना अमेरिकेसारख्या श्रीमंत आणि मुक्त समाजांत निर्माण झाल्या (सोव्हिएट मध्ये नाही). > एक भयानक जग आपल्यासमोर उभे रहाणार आहे सर्वच पिढ्या असे भाकीत वर्तवत आल्या आहेत आणि काळपुरुषाने त्यांना चुकीचे ठरवले आहे.

In reply to by साहना

आर्थिक सुबत्तेने माणसाला मोकळा वेळ मिळतो ज्यातून काव्य शास्त्र विनोद निर्माण होतो.
१०० % सहमत. चंदेल राजकाळात झालेली खजुराहो ची शिल्पकला वा अजंठा वेरुळ येथील शिल्पकला ह्याला फार मनुष्यबळ लागले असणार आणि त्याकाळची अर्थव्यवस्था अश्या लोकांचे पालनपोषण करायला सुदृढ होती. किंबहुना ऑलिम्पिक अथवा तत्सम क्रिडा स्पर्धात एखाद्या देशाला मिळणारे यश हे त्या देशाच्या आर्थिक सुबत्तेचे प्रतिक असते.

In reply to by कानडाऊ योगेशु

परकीय आक्रमण नसल्याने, शांतता पण होती .... ------ ऑलिम्पिक अथवा तत्सम क्रिडा स्पर्धात एखाद्या देशाला मिळणारे यश हे त्या देशाच्या आर्थिक सुबत्तेचे प्रतिक असते. आणि शांतता, हा पण एक महत्वाचा भाग आहे...

In reply to by कानडाऊ योगेशु

शिल्पकला व स्थापत्यकला कधीपासून काव्य शास्त्र विनोद या सदराखाली येउ लागली बुवा ? इन्डिया गेट ,ताजमहाल हे सारे भव्य आहे ! मग भारत देश संपन्न हे नक्की का ? आता आठवत नाही पण शहाजहान बादशाहला शिव्या घालणारी एक कविता लिहिली गेली आहे ताज बान्धल्यावर म्हणे त्याने कारागिरान्चे हात तोडून टाकले !

In reply to by साहना

सर्वच पिढ्या असे भाकीत वर्तवत आल्या आहेत आणि काळपुरुषाने त्यांना चुकीचे ठरवले आहे. अशा किती पिढ्याचा अभ्यास तुम्ही केला आहे ? मी वतरवलेला एक केवळ अन्दाज तो ही आज जे तांत्रिक ज्ञान व लोकसंख्येचे स्वरूप यावर आधारित आहे ! तो उलट चुकला तर आनंदच आहे ! तुम्ही मात्र वेळोवेळी कुठल्या पिढीने काय काय वर्तवले व कधी याचा नीट शोध घ्या ! कारण तुमचे विधान घडून गेलेल्या गोष्टीवर आधारित आहे आमचे नाही !

In reply to by साहना

आर्थिक सुबत्तेने माणसाला मोकळा वेळ मिळतो ज्यातून काव्य शास्त्र विनोद निर्माण होतो आरे बाप रे लई भारी शोध आहे ! संत ज्ञानेश्वर , तुकाराम सर्व सुबत्ता भोगणारे होते म्हणायचे !पैसे गाठीशी आल्यावर माणसात काव्य बुद्धी एकदम जन्म घेते ? माडगूळ कर आता याचे कसे उत्तर देणार नि रस्त्यावर सामानसह फेकून दिलेले बाबूजी ( सुधीर फडके ) तरी कसे देणार आता ?

Simple, Free Image and File Hosting at MediaFire मी नुकतेच अनुवाद केलेले हे पुस्तक माझ्यामते उपयोगी पडावे... पैशाचे मानसशास्त्र गेल्या काही दिवसात एका पुस्तकाचा अनुवाद हातावेगळा केला. हे पुस्तक अनुवाद करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः तरूणांसाठी. मी वाचत गेलो आणि झपाट्याने त्याचा अनुवादही पूर्ण केला. अनुवाद सोप्यात सोप्या शब्दात करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. हा अनुवादही तुम्हाला सोपा आणि रंजक वाटेल. असो आता पुस्तकाबद्दल - श्री मॉर्गन हाऊजेल यांनी पैशाच्या संदर्भात आपण कसे वागावे याचा जो धडा घालून दिला आहे तो खरेच डोळ्यात अंजन घालणारा आहे. त्यांनी नुसता उपदेश केलेला नाही तर अनेक चमत्कारिक आणि मजेशीर उदाहरणे देऊन त्यांचे मुद्दे आपल्याला पटवून सांगितले आहेत आणि त्यामुळेच अवघड विषयावरील हे पुस्तक वाचताना एक क्षणही कंटाळा येत नाही. त्यांनी या पुस्तकात प्रस्तावना आणि वीस प्रकरणात हा विषय मांडून एकप्रकारे आपल्याला मदतच केली आहे. ज्याप्रमाणे वॉल्डन आपल्याला जिवनाची काही रहस्यं उलगडून दाखवते त्याचप्रमाणे हे पुस्तक आपल्याला सध्याच्या काळात पैशाशी कसे वागावे याचे धडे देते आणि ते अत्यंत आवश्यक आहेत. कोणाला वाटेल हे पुस्तक शेअरमधे गुंतवणूक करण्यासाठी आहे पण हा विषय फार व्यापक आहे आणि आपल्या आयुष्याच्या सगळ्या अंगांना स्पर्ष करून जातो. यात आपले मन, बुद्धी, समाज, संस्कार, ज्या काळात आपण वाढलो त्याचा परिणाम, सुखाच्या आणि दुःखाच्या कल्पना, गरज, हव्यास, पुरेसे म्हणजे काय... अशा अनेक बाबींचा ऊहापोह आपल्याला आढळेल. उदा. प्रस्तावनेत तो म्हणतो - दोन विषयांचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होतोच मग तुम्ही ते माना किंवा न माना. - तुमची प्रकृती आणि पैसा. तेथेच पुढे त्याने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रकाशात आणली आहे. तो म्हणतो, ‘‘आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या अशक्य वाटणाऱ्या विजयाने माणसाचे आयुर्मान जगभर उंचावले गेले आहे. माणसाच्या शरीराचे कार्य कसे चालते याबाबतीत डॉक्टरांच्या जुनाट ज्ञानाची जागा नवनवीन शोधांनी घेतली आहे आणि मला वाटते त्यामुळे प्रत्येकाचे प्रकृतीस्वास्थ्य आता तुलनेने निरोगी झाले आहे. वित्त उद्योगात म्हणजे - गुंतवणूक, वैयक्तिक वित्तव्यवस्थापन, औद्योगिक व्यवस्थापनात गोष्ट वेगळी आहे. गेल्या वीस वर्षापासून उच्च दर्जाच्या विद्यापिठातून उच्च दर्जाची बुद्धिमत्ता व शिक्षण यात ओढले जात आहे. काही वर्षांपूर्वी फायनांशियल इंजिनियरींग या विषयाचे प्रिन्स्टन विद्यापिठात सगळ्यात जास्त स्तोम माजले होते. पण या विषयाने आपल्याला एक उत्तम गुंतवणुकदार बनवले आहे का? हा खरा प्रश्न आहे. मला तरी तसे काही झाल्याचे दिसत नाही. चुकत माकत आणि अनुभवातून शिकत आपण चांगले शेतकरी झालो, कुशल प्लंबर झालो आणि अत्याधुनिक केमिस्टही झालो. पण चुकत माकत आणि त्यातून शिकत आपण आपल्या पैशाचे चांगले व्यवस्थापन करण्यास शिकलो आहे का? आपली कर्जात बुडण्याची शक्यता कमी झाली आहे का? आपण संकटकाळासाठी पैशाची पुरेशी बचत करण्यास शिकलो आहे का? आपण आपल्या निवृत्तीसाठी आर्थिकदृष्ट्या तयार आहोत का? आपल्या सुखासाठी पैसा काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याबाबतीत आपले विचार स्पष्ट आहेत का? याची उत्तरे होकारार्थी आहेत असे मी दुर्दैवाने म्हणू शकत नाही. म्हणजे तसा ठाम पुरावा माझ्याकडे तरी नाही. आपल्याला पैशाबद्दल जे शिकवले जाते ते पदार्थविज्ञानासारखे (नियम आणि समीकरणे). मानसशास्त्रात शिकवतात तसे नाही (भावना आणि त्याच्या अनेक छटा) आपण काय शिकलो नाही आणि काय शिकायला पाहिजे ते या पुस्तकातून जाणून घेण्यास तुम्हाला आवडेल... आता प्रत्येक प्रकरणात कशावर लिहिले आहे हे पुढच्या लेखात लिहीन पण तोपर्यंत मला खात्री आहे की तुम्ही हे पुस्तक वाचलेले असेल आणि मला पुढे लिहावे लागणार नाही. नव्हे, तुम्ही ते वाचावेच असा माझा आग्रह आहे... - जयंत कुलकर्णी.

आता श्रीमंत कोणाला म्हणावे? माझी व्याख्या - यापुढील आयुष्यात कोणत्याही मार्गाने एकही रूपया सुद्धा मिळाला नाही तरी ज्याला आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवता येईल तो श्रीमंत.

In reply to by श्रीगुरुजी

माझी व्याख्या - यापुढील आयुष्यात कोणत्याही मार्गाने एकही रूपया सुद्धा मिळाला नाही तरी ज्याला आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवता येईल तो श्रीमंत.
++९

In reply to by श्रीगुरुजी

माझी व्याख्या - यापुढील आयुष्यात कोणत्याही मार्गाने एकही रूपया सुद्धा मिळाला नाही तरी ज्याला आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवता येईल तो श्रीमंत.>>>> वा क्या बात है|

माझी डिग्री मला हाती मिळाली तेंव्हा माझ्या संपूर्ण परिवाराचे नेट वर्थ होते ७५ हजार रुपये. पण माझ्या विशीतच मी स्वतःला श्रीमंत म्हणू शकते इतकी लक्षमी देवीची कृपा झाली. ह्याला सरस्वती देवीची कृपा सुद्धा कारणीभूत होती. म्हणून तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकते. १. नशीब प्रचंड प्रमाणात महत्वाचे आहे. पण सर्वच गोष्टी नशिबाने होतात असेही नाही आपले प्रयत्न आवश्यक आहेत. २. मराठी लोक व्यापारात फारशी जोखीम घेत नसल्याने त्यांना पंगुसिंमा असल्या पराभूत मानसिकतेला काहीही अर्थ नाही. ह्या सर्व लोकांना अपंगत्व सुद्धा आहे जी मी इथे मांडणार नाही. मराठी लोक विविध क्षेत्रांत योगदान देतात, बौद्धिक तसेच शारीरिक दोन्ही प्रकारची कामे उत्कृष्ट पणे करतात, पुरोगामी आहेत आणि बुरसटलेल्या विचारणा तिलांजली देण्याची क्षमता सुद्धा ह्यांच्यात आहे. मराठी माणसाने टिळक निर्माण केले तसे आगरकर सुद्धा केले. कान्होजी आंग्रे केले आणि शिवाजी सुद्धा केले. ब्राम्हण पेशवे केले तसेच आंबेडकर प्रमाणे दलित सुद्धा केले. ह्या विविधतेने मराठी माणसाने अमुकच एका क्षेत्राला बळकावले असे दिसत नसले तरी प्रत्येक क्षेत्रांत मराठी माणसाने जबरदस्त ठसा उमटवला आहे. यशस्वी होण्याची काहीही युक्ती नाही. आणि मराठी माणसाने मोठे ध्येय ठेवले पंगुसिमा लोकांना आदर्श मानू नये. महाराष्ट्र राज्याचे किमान ४ तुकडे केले तरी राज्याची प्रगती वेगाने होईल. ३) शहर जितके मोठे तितकी आर्थिक समृद्धी जास्त असे काही असते का? लोक जितके जास्त तितकी समृद्धी जास्त. त्याशिवाय भौगोलिक स्थान आणि हवामान सुद्धा महत्त्वाचे आहे. सर्वाधिक संपत्ती उच्च मूल्याच्या वस्तुंनी निर्माण होते (गाड्या, कम्प्युटर चिप्स, सॉफ्टवेर, इत्यादी) अश्या गोष्टींचे शोध आणि काम फक्त शहरांत होऊ शकते कारण शेकडो प्रकारच्या लोकांची मेहनत त्यांत जाते. (आमच्या पूर्वजांनी सुद्धा हे ओळखले होते आणि गावाच्या संपन्नतेसाठी १८ पगड जाती हव्यात हे त्यांनी हेरले होते. आता समृद्धी साठी १८,००० प्रकारच्या लोकांची गरज भासते हि गरज फक्त शहरे पुरवी शकतात) ४. ते कौशल्य शिकण्यासाठी गुंतवलेल्या पैशाच्या तुलनेत परतावा जास्त आहे. असल्या याद्या बनवून फायदा नाही. कारण त्यांत व्यक्तीची प्रतिभा सुद्धा पाहायला पाहिजे. एक चांगला प्लम्बर मुंबईत एका सुमार दर्जाच्या IT वाल्या पेक्षा कित्येक पटीने जास्त कमावू शकतो. -- माझी टीप तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर गुंतवणूक करायला शिका. गुंतवणूक हि क्षमता, माणसे, बाजार आणि संपत्ती तीन प्रकारची असते. सगळी कडे चक्रवाढ दर हि संकल्पना समजून घ्या. ह्यावर कधी विस्ताराने लिहीन.

In reply to by साहना

नक्की लिहा... काही वेळा, तुमचे विचार पटत जरी नसले तरी, माझेच विचार पारखून घ्यायला मदत होते... वैचारिक मतभेद असणे, हे लोकशाहीचे महत्वाचे लक्षण आहे...आणि हे आपण दोघेही जाणतो...