श्रीमंतीचे नियम??
भरपूर पैसे मिळवावेत असे कोणाला वाटणार नाही? बहुतांश लोकांना तसे वाटते तरी किंवा भोवतालची परिस्थिती तरी त्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडते. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. साहजिकच इथे संघर्ष खूप आहे, भ्रष्टाचारसुद्धा बराच आहे. शिवाय भारतात श्रममूल्य हे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीतून प्रयत्न करुन आर्थिक समृद्धी आणण्याचे महत्कार्य पार पाडावे लागते.
थिंक अँड ग्रो रिच हे श्रीमंत कसे व्हावे या विषयावर बरेच गाजलेले पुस्तक विशेषत: अमेरिकन जनता डोळ्यासमोर ठेवून लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिले होते. यालाही साधारण ८४ वर्षे होऊन गेली.
चर्चेचा विषय हाच आहे की भारतासारख्या देशात श्रीमंत होण्यासाठीचे काही ठाशीव नियम असू शकतात का? अर्थात प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. ते व्यक्तिपरत्वे थोडे बदलूही शकतात. ते कायम तसेच राहतात असेही नाही. पण अपवादानेच नियम सिद्ध होतात हे ही खरे आहे. ते अपवाद गृहित धरुन श्रीमंत होण्यासाठीचे काही ठराविक नियम असू शकतात का? हेच पहायचे आहे.
आता श्रीमंत कोणाला म्हणावे? तर एका त्रिकोणी कुटूंबाला ज्यातल्या कुटूंबप्रमुखाचे पुण्यासारख्या शहरात, वयाच्या तिशीच्या आत किमान ६० हजार रुपये वैयक्तिक मासिक उत्पन्न असेल तर तो सुद्धा श्रीमंत म्हणायला हरकत नसावी. यात त्याच्याकडे बाईक आहे पण चारचाकी नाही, कसलेही खर्चिक व्यसन नाही असे गृहित धरले आहे. ही झाली किमान मर्यादा. आता याउपर ही मर्यादा कितीही असू शकते. जसे उत्पन्न वाढेल तसतसे चारचाकी किंवा खर्चिक व्यसन किंवा अजून खर्चायला लावणार्या बाबी उत्पन्नाच्या प्रमाणात अॅड करायला हरकत नाही.
धाग्याचा उद्देश प्रामुख्याने उपरोल्लिखित किमान कमाईपेक्षा कमी उत्पन्न असणार्यांना श्रीमंत होण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चा हाच असावा. आधीच भरपूर कमवणार्यांना अजून कसे कमवता येईल यासाठी हा धागा नाही. _/\_
विषयानुषंगाने काही प्रश्न की जेणेकरुन चर्चेला दिशा मिळेल.
१) नशीब हा फॅक्टर श्रीमंतीसाठी किती महत्वाचा आहे?
२) मराठी लोक व्यापारात फारशी जोखीम घेत नसल्याने त्यांना पंगुसिंमा (पंजाबी, गुजराती, सिंधी, मारवाडी) इतके यश व्यापारात मिळत नाही असे म्हटले जाते. पण पंगुसिंमांच्या व्यापाराच्या अशा काही पद्धती किंवा ट्रिक्स असू शकतात का की ज्यामुळेच ते व्यापारात यशस्वी होतात? उदा. एका मारवाडी व्यक्तीने दुसर्या मारवाड्याला धंद्यासाठी कर्ज दिले. ते व्याजासहीत वसूल होण्याचा कालावधी हा मराठी माणसाने दुसर्या मराठी माणसाला धंद्यासाठी दिलेल्या कर्जवसूलीच्या कालावधीपेक्षा जास्त असू शकतो का? पंगुसिंमा हा तग कसा धरु शकतात? अशाच अजून काही युक्त्या असू शकतात का पंगुसिंमांच्या?
३) शहर जितके मोठे तितकी आर्थिक समृद्धी जास्त असे काही असते का?
४) काही क्षेत्रे अशी आहेत ज्यातील कौशल्यातून चांगले पैसे मिळतात. ते कौशल्य शिकण्यासाठी गुंतवलेल्या पैशाच्या तुलनेत परतावा जास्त आहे. काही मिपाकरांशी चर्चा करुनच ही यादी बनवली आहे. यात अजून काही सुधारणा किंवा वाढ करता येईल का?
१. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लागणारं कोणतंही कौशल्य
२. कॉम्प्युटर हार्डवेअर इन्स्टॉलेशन,फिक्सिंग
३. सेल्स अँड मार्केटिंग
४. कायिक आरोग्यसेवांतर्गत येणारे कोणतेही कौशल्य
५. गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय शिकवता येणे.
६. आर्थिक गुंतवणूकीचे सल्लागार
७. रसायनशास्त्र (कॅटॅलिस्टस्)
८. विद्युत अभियांत्रिकी (कॅप्टीव्ह जनरेशन)
९. लोगो डिझाईनिंग
१०. चारचाकी किंवा जड वाहन सफाईदारपणे चालवता येणे.
११. धार्मिक,अध्यात्मिक सेवा पुरवणे
१२. कार, बाईक दुरुस्ती, स्वच्छता
१३. न्यायिक सेवा (वकील वगैरे)
१४. स्पर्धापरीक्षा उत्तम गुणांनी पास होणे.
१५. वातानुकूलन यंत्र दुरुस्ती,निगा
१६. चेतनकला
१७. स्टँडअप कॉमेडी
वर्गीकरण
वाचने
75694
वाचनखूण
प्रतिक्रिया
180
In reply to शंभरावा प्रतिसाद! by वामन देशमुख
अवसानघातकी
In reply to शंभरावा प्रतिसाद! by वामन देशमुख
वामनजी
In reply to वामनजी by उपयोजक
मर्सिडीझ मधील माणूस सुद्धा
In reply to मर्सिडीझ मधील माणूस सुद्धा by सुबोध खरे
रस्त्यावर बसून रडण्यापेक्षा मर्सिडीझ मध्ये बसून रडणे जास्त सुखकर
In reply to शंभरावा प्रतिसाद! by वामन देशमुख
समाजात वेगळेच चित्र दिसत
उत्तम चर्चा ...
In reply to उत्तम चर्चा ... by सुक्या
सहमत आहे ....
विषयांतराचा गुन्हा
शिरीमंतीची व्याख्य्या
In reply to शिरीमंतीची व्याख्य्या by चौकस२१२
मिंधेपणा पत्करावा लागत नाही
एक माहिती मिळेल का?
In reply to एक माहिती मिळेल का? by उपयोजक
डोंबिवली येथील ....
https://paulocoelhoblog.com
पैसे हे अनेक मार्गाने आले पाहिजेत
गाभ्यां बाहेर जाऊन व्यवसाय ?
एक गंमतशीर काल्पनिक चित्र
In reply to एक गंमतशीर काल्पनिक चित्र by चौकटराजा
रोबो तिला कोणता ड्रेस
In reply to रोबो तिला कोणता ड्रेस by सुबोध खरे
भावना ...
आधुनिक work culture
पुर्वीच्या पीढीकडे बरेच काही
मुल जगत च नव्हती
मुल जगत च नव्हती
In reply to मुल जगत च नव्हती by Rajesh188
माझ्या आजोबांचा पराक्रम ..
मुल जगत च नव्हती
In reply to मुल जगत च नव्हती by Rajesh188
असे मी म्हणतो
In reply to असे मी म्हणतो by चौकटराजा
या विचारांमागचा विचार चांगला
In reply to या विचारांमागचा विचार चांगला by गणेशा
अगदी ...
In reply to असे मी म्हणतो by चौकटराजा
आजा मेला नातू झाला
माणसाचे खरे वय हे पन्नास वर्ष च असावे.
Please watch "Undercover