Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by उपयोजक on Sat, 03/20/2021 - 08:56
भरपूर पैसे मिळवावेत असे कोणाला वाटणार नाही? बहुतांश लोकांना तसे वाटते तरी किंवा भोवतालची परिस्थिती तरी त्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडते. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. साहजिकच इथे संघर्ष खूप आहे, भ्रष्टाचारसुद्धा बराच आहे. शिवाय भारतात श्रममूल्य हे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीतून प्रयत्न करुन आर्थिक समृद्धी आणण्याचे महत्कार्य पार पाडावे लागते. थिंक अँड ग्रो रिच हे श्रीमंत कसे व्हावे या विषयावर बरेच गाजलेले पुस्तक विशेषत: अमेरिकन जनता डोळ्यासमोर ठेवून लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिले होते. यालाही साधारण ८४ वर्षे होऊन गेली. चर्चेचा विषय हाच आहे की भारतासारख्या देशात श्रीमंत होण्यासाठीचे काही ठाशीव नियम असू शकतात का? अर्थात प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. ते व्यक्तिपरत्वे थोडे बदलूही शकतात. ते कायम तसेच राहतात असेही नाही. पण अपवादानेच नियम सिद्ध होतात हे ही खरे आहे. ते अपवाद गृहित धरुन श्रीमंत होण्यासाठीचे काही ठराविक नियम असू शकतात का? हेच पहायचे आहे. आता श्रीमंत कोणाला म्हणावे? तर एका त्रिकोणी कुटूंबाला ज्यातल्या कुटूंबप्रमुखाचे पुण्यासारख्या शहरात, वयाच्या तिशीच्या आत किमान ६० हजार रुपये वैयक्तिक मासिक उत्पन्न असेल तर तो सुद्धा श्रीमंत म्हणायला हरकत नसावी. यात त्याच्याकडे बाईक आहे पण चारचाकी नाही, कसलेही खर्चिक व्यसन नाही असे गृहित धरले आहे. ही झाली किमान मर्यादा. आता याउपर ही मर्यादा कितीही असू शकते. जसे उत्पन्न वाढेल तसतसे चारचाकी किंवा खर्चिक व्यसन किंवा अजून खर्चायला लावणार्‍या बाबी उत्पन्नाच्या प्रमाणात अॅड करायला हरकत नाही. धाग्याचा उद्देश प्रामुख्याने उपरोल्लिखित किमान कमाईपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍यांना श्रीमंत होण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चा हाच असावा. आधीच भरपूर कमवणार्‍यांना अजून कसे कमवता येईल यासाठी हा धागा नाही. _/\_ विषयानुषंगाने काही प्रश्न की जेणेकरुन चर्चेला दिशा मिळेल. १) नशीब हा फॅक्टर श्रीमंतीसाठी किती महत्वाचा आहे? २) मराठी लोक व्यापारात फारशी जोखीम घेत नसल्याने त्यांना पंगुसिंमा (पंजाबी, गुजराती, सिंधी, मारवाडी) इतके यश व्यापारात मिळत नाही असे म्हटले जाते. पण पंगुसिंमांच्या व्यापाराच्या अशा काही पद्धती किंवा ट्रिक्स असू शकतात का की ज्यामुळेच ते व्यापारात यशस्वी होतात? उदा. एका मारवाडी व्यक्तीने दुसर्‍या मारवाड्याला धंद्यासाठी कर्ज दिले. ते व्याजासहीत वसूल होण्याचा कालावधी हा मराठी माणसाने दुसर्‍या मराठी माणसाला धंद्यासाठी दिलेल्या कर्जवसूलीच्या कालावधीपेक्षा जास्त असू शकतो का? पंगुसिंमा हा तग कसा धरु शकतात? अशाच अजून काही युक्त्या असू शकतात का पंगुसिंमांच्या? ३) शहर जितके मोठे तितकी आर्थिक समृद्धी जास्त असे काही असते का? ४) काही क्षेत्रे अशी आहेत ज्यातील कौशल्यातून चांगले पैसे मिळतात. ते कौशल्य शिकण्यासाठी गुंतवलेल्या पैशाच्या तुलनेत परतावा जास्त आहे. काही मिपाकरांशी चर्चा करुनच ही यादी बनवली आहे. यात अजून काही सुधारणा किंवा वाढ करता येईल का? १. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लागणारं कोणतंही कौशल्य २. कॉम्प्युटर हार्डवेअर इन्स्टॉलेशन,फिक्सिंग ३. सेल्स अँड मार्केटिंग ४. कायिक आरोग्यसेवांतर्गत येणारे कोणतेही कौशल्य ५. गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय शिकवता येणे. ६. आर्थिक गुंतवणूकीचे सल्लागार ७. रसायनशास्त्र (कॅटॅलिस्टस्) ८. विद्युत अभियांत्रिकी (कॅप्टीव्ह जनरेशन) ९. लोगो डिझाईनिंग १०. चारचाकी किंवा जड वाहन सफाईदारपणे चालवता येणे. ११. धार्मिक,अध्यात्मिक सेवा पुरवणे १२. कार, बाईक दुरुस्ती, स्वच्छता १३. न्यायिक सेवा (वकील वगैरे) १४. स्पर्धापरीक्षा उत्तम गुणांनी पास होणे. १५. वातानुकूलन यंत्र दुरुस्ती,निगा १६. चेतनकला १७. स्टँडअप कॉमेडी
  • Log in or register to post comments
  • 75462 views

प्रतिक्रिया

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 03/25/2021 - 17:04

In reply to ज्याचे वय आता पन्नास वर्ष आहे by Rajesh188

Permalink

फक्त .....

फक्त वस्तू च्या खरेदी विक्री वर आधारलेली जीवनशैली स्वीकारली की मग आमची पिढी भाग्यवान आहे असे म्हटले की कुणाकुणाच्या डोक्यात जाते. मग तुम्ही नॉस्टेलज्या नावाच्या रोगाचे पेशंट आहात असे प्रतिपादिले जाते. प्रवास हा अनुभव आहे तो आनंद स्वतः:ची गाडी असली की जसा घेता येतो तसा एस टी च्या गाडीतून देखील कारण चालकाच्या जबाबदारीतून आपण मोकळे होतो . अलीकडे या बाबींकडे लक्ष देऊन काही म्हणू लागलेत " ओला" ने जाऊ !
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 03/25/2021 - 17:06

In reply to ज्याचे वय आता पन्नास वर्ष आहे by Rajesh188

Permalink

मी तुमच्या पेक्षा लहान आहे

मी तुमच्या पेक्षा लहान आहे बराच... पण खेडेगावातील बालपण, जीवन, शेती.. झाडे.. निसर्ग.. मित्र.. वेळ.. निवांत पणा.. भेसळ नसलेले अन्न धान्य मुबलक.. आणि मोठ्यांचा आदर अश्या अनेक बाबतीत जुनी पिढी चांगलीच होती.. प्रत्येकाचे विचार, राहणीमान आणि मत वेगळे वेगळे असु शकते.. तुम्ही म्हणताय. त्यातला मतीत अर्थ बरोबर आहे.. फोन करायला मिळत नव्हता म्हणुन काळ वाईट की फोन मुळे मान दुखते आहे हे वाईट हा हि ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा भाग आहे... पण शुद्ध हवा... आरोग्य.. Stress कमी असणे ह्या चांगल्या गोष्टी जुन्या पिढी कडे होत्या.. प्रत्येक पिढीला काही तरी खास मिळते.. नविन पिढी हि दुसऱ्या गोष्टीं साठी भाग्यवान आहेच... पण आपणाला काय वाटते त्यावर आपले मत बनते.. दुसर्यांना तसे नाही वाटले तरी हरकत काहीच नाही... असो, मुळ धाग्याच्या उद्देशानुसार मात्र, नविन पिढी ला नविन कौशल्य दाखवणे , व्यवसाय करणे आणि इतर जास्त सोप्पे हि आहे, आणि बऱ्याचदा गरजेचे हि आहे.. त्यामुळे नविन गोष्टींना सामोरे जाताना आपण कसे गेले पाहिजे काय काय केले पाहिजे हे सुद्धा योग्यच
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 03/25/2021 - 19:55

In reply to मी तुमच्या पेक्षा लहान आहे by गणेशा

Permalink

पण शुद्ध हवा... आरोग्य..

पण शुद्ध हवा... आरोग्य.. Stress कमी असणे ह्या चांगल्या गोष्टी जुन्या पिढी कडे होत्या.. काय राव विनोद करताय? आपले जुन्या काळाबद्दल भरपूर गैरसमज आहेत असं दिसतंय . आरोग्य -- Life expectancy in India is estimated to have gone up from 31 years in 1947 १९७५ साली भारताची आयुर्मयादा ५० होती. https://www.google.com/search?q=longevity+in+india+in+1975&rlz=1C1CHBD_enIN915IN915&oq=longevity+in+india+in+1975&aqs=chrome..69i57j33i22i29i30l2.7804j0j15&sourceid=chrome&ie=UTF-8 जी आज जवळ जवळ ७० आहे शुद्ध हवा -- चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया किती धूर खात होत्या आणि किती मरत होत्या याची सांख्यिकी आपण पाहिलेली नाही. Over 800 million people in India are affected by indoor air pollution, mainly caused by smoke from burning solid, according to a report by the Global Alliance for Clean Cookstoves. – About one million deaths occur annually in India due to household air pollution, according to a report by The Lancet Respiratory Medicine Commission. https://sites.ndtv.com/breathe-clean/smoke-from-chulahs-biggest-killer-in-rural-india Stress कमी असणे उत्पन्नाचे साधन नाही, गरिबी, शिक्षण नाही किती तरी बाल मृत्यू अपमृत्यु पाहिलेल्या लोकांना स्ट्रेस नव्हता हे म्हणणे किंवा रोजचं जगणं हे ज्याच्या दृष्टीने युद्धाचा प्रसंग आहे त्यांना स्ट्रेस नाही हे म्हणणे हि त्या माणसांची क्रूर थट्टा आहे. poverty and stress हे गुगलून पहा. जितके जास्त लोक तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर आणलं तितका त्यांच्या आयुष्यातील तणाव कमी होईल बाकी तुम्ही "स्ट्रेस" म्हणताय हा शहरी श्रीमंत लोकांच्या चोचल्याचा भाग आहे का? आज रोटीवर लावायला अमूल बटरच नव्हतं प्रकारचं.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on गुरुवार, 03/25/2021 - 20:22

In reply to पण शुद्ध हवा... आरोग्य.. by सुबोध खरे

Permalink

खरे साहेब

तुम्ही गूगल वर अवलंबून तुमची मतं सांगत आहात मी अनुभव सांगत आहे. चुलीवर स्वयंपाक म्हणजे धूर च धूर हा पण तुमचा गैर समज च आहे. चांगली वाळलेली लाकड असतील तर ती जास्त धूर निर्माण करत नाहीत. फक्त चूल पेतवताना धूर निर्माण होतो एकदा पेटली की कमी प्रमाणात निर्माण होतो. लोकांच्या गरजा कमी होत्या त्या मुळे जास्त पैसा पण नको होता. लोकांचे आयुष्य आता वाढलं आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं. फक्त साथी चे रोग आणि काही बाकी रोग(आता corona aahe तसे,मलेरिया,हगवण ) ह्यांनी माणसं मरत असतं. उपास मार होवून नाही. शेती उत्तम उत्पादन देत होती त्या मुले अन्न धान्य ची कमी नव्हती.पैसे फक्त कपडे आणि मीठ,साखर अशा काहीच गोष्टी साठी लागत असत. तेव्हा पण दुग्ध व्यवसाय, poultry व्यवसाय होतच अगदी पूर्ण काळातली उदाहरण देत नाही. केरोसीन रेशन दुकानात मिळत होते च पण खुल्या बाजारात सुद्धा हवं तेवढे मिळत होते. आता पेक्षा नक्कीच चाळीस पन्नास वर्ष पूर्वी जन्म घेतलेल्या लोकांनी आयुष्य सुखात काढले आहे. तुम्ही dr झाला तेव्हा तुम्हाला सहज प्रवेश नक्कीच मिळाला असणार . आणि किती खर्च झाला हो तुम्ही dr होण्यासाठी. काही हजार च खर्च झाले असतील. आता pvt मध्ये dr होण्यासाठी करोड खर्च येतो. पैसे देवून शिक्षण मिळत नाही वस्तू मिळते. भरपूर पावूस,भरपूर शेती ,आणि भरपूर शेती उत्पादन हे होतेच त्या वेळी.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on गुरुवार, 03/25/2021 - 22:15

In reply to थापाडेराव by सुबोध खरे

Permalink

उन्हाळा लागला की

CORONA virus नष्ट होईल इतका भंपक प्रतिसाद तरी माझा नाही. ज्या भागात जास्त तापमान असेल तिथे covid चा व्हायरस वाढणारा नाही असली बकवास मत तरी मी व्यक्त करत नाही. तुमचा पूर्ण लेख मिपा प्रशासन delete केला होता. विसरले की काय. तुमचे प्रतिसाद चुकीचे आणि ऐकीव माहिती वर आधारित आहे . ३० ते ४० वर्ष पूर्वी खेडे गावात सर्व सुविधा होत्या. तुम्ही कोणत्या आदिवासी गावात राहत होता तिथे तुम्ही म्हणता तशी स्थिती असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 03/26/2021 - 09:30

In reply to उन्हाळा लागला की by Rajesh188

Permalink

थापाडेराव

थापाडेराव CORONA virus नष्ट होईल मी असा प्रतिसाद कधीही दिलेला नाही उगाच परत थापा मारू नका बाकी उष्ण प्रदेशात करोना वाढणार नाही हे जागतिक आरोग्य संघटनेने काढलेले अनुमान होते मी नाही आणि माझ्या लेखात मी तसे स्पष्टपणे लिहिलेले होते. अशी पाच अनुमाने चुकीची ठरली आहेत. त्या मी मारलेल्या थापा नव्हत्या. अर्थात आपल्याला त्याचे विविक्षित विस्मरण होईलच. https://timesofindia.indiatimes.com/india/covid-19-in-india-five-predictions-that-turned-out-to-be-false/articleshow/81688495.cms तुमचा पूर्ण लेख मिपा प्रशासन delete केला होता. हा लेख काढून टाकण्यासाठी मीच मिपा प्रशासनाला सांगितले होते. अर्थात त्याचेही आपल्याला बरोबर विस्मरण झाले असेलच.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Fri, 03/26/2021 - 13:53

In reply to थापाडेराव by सुबोध खरे

Permalink

Dr खरे

Dr खरे तुम्ही पाहिले एक dr आहात . आणि भारतीय सशस्त्र दलात तुम्ही कर्तव्यावर होता. एक तर तुम्ही dr आणि त्याच बरोबर तुमचा अनुभव अती प्रचंड. तुमची स्वतःची मतं विकसित होण्यास काहीच अडचण नाही. विविध व्हायरस,जिवाणू ह्यांचा अभ्यासक्रमात अभ्यास झालाच आहे आणि अनुभव पण आहे. तरी who नी corona विषयी जी मत व्यक्त केली त्या वर तुम्ही बुध्दी न वापरता विश्वास का ठेवला तुम्हाला स्वतःची बुध्दी नाही का?, व्हायरस तापमान वाढले की नष्ट होतो हे जगाच्या इतिहासात एकदा पण घडले नाही.. मग तुम्ही who chya पाठी का लपत आहेतं तुम्हाला स्वतंत्र मेंदू आहे की नाही. सरळ सरळ तुम्ही त्या धाग्यावर चुकीचे दावे करत होतात बाकी सभासद तुमची चूक दाखवत होते तरी तुम्ही काही heka सोडत नव्हता . शेवटी mipa प्रशासन नी धागा च delete केला. देवाने मेंदू दिला आहे त्याचा वापर करा. Who नी काही पण बोलू ध्या तुमचा मेंदू वापरा ना.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 03/26/2021 - 20:59

In reply to Dr खरे by Rajesh188

Permalink

तुमचा पूर्ण लेख मिपा प्रशासन

तुमचा पूर्ण लेख मिपा प्रशासन delete केला होता. हा लेख काढून टाकण्यासाठी मीच मिपा प्रशासनाला सांगितले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 03/25/2021 - 20:23

In reply to पण शुद्ध हवा... आरोग्य.. by सुबोध खरे

Permalink

अगदी खर आहे. त्या काळातले

अगदी खर आहे. त्या काळातले प्रश्न ही आरोग्याचे होतेच
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on गुरुवार, 03/25/2021 - 20:48

In reply to अगदी खर आहे. त्या काळातले by प्रकाश घाटपांडे

Permalink

भारतात

१९७० च्या पुढे चांगले डॉक्टर होते,सरकारी हॉस्पिटल होती, गावात dr ची क्लिनिक होती. Medical store होती,उत्तम डॉक्टर होते. साबण पासून कोलगेट पर्यंत,सर्व होते,शाम्पू होते. खरे साहेब कोणत्या काळातील वर्णन करत आहेत हे त्यांनी एकदा तपासून बघावे. राजदूत गाडी होती,बजाज च्या स्कूटर होत्या. सायकल होती,टीव्ही होते. सर्व काही होते. आणि ह्या आधुनिक साधना बरोबर . शुद्ध हवा होती,शुध्द पाणी होते.लोकं सामाजिक भान राखून असायचे . एकमेकाशी उत्तम संबंध होते. लोकांकडे वेळ होता एकमेकाशी गप्पा मारण्यासाठी. त्या वेळी माझ्या गावात चार तालमी होत्या आज एक पण नाही. तरुण पिढी ला व्यायामाची आवड च नाही. मैदानात खेळायला मुलांना आवडत नाही. आम्ही कब्बडी पासून,खो खो पर्यंत बरेच खेळ खेळत असू . आता खेळ फक्त मोबाईल वर. प्रतेक नदी प्रदूषित आहे. हवेच्या प्रदूषण नी सर्वोच्च क्षमता गाठली आहे. मुंबई मध्ये हवेत किती प्रदूषण असते त्याचे आकडे रोज दिले जातात बघत जा. साधं kg मध्ये प्रवेश हवा असेल तरी काही हजार लागतात. आणि शिक्षणाचा दर्जा वाढला आहे असे मत मी तरी व्यक्त करणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on गुरुवार, 03/25/2021 - 21:45

In reply to अगदी खर आहे. त्या काळातले by प्रकाश घाटपांडे

Permalink

काळाप्रमाणे प्रश्नही बदलतात.

पूर्वीच्या चांगल्या गोष्टी १. सरकारी नोकरी आजच्यापेक्षा बरीच सहज मिळायची. पेन्शन होती. सरकारी नोकरीतच काय पण खाजगी नोकरीतही बर्‍यापैकी शाश्वती होती,स्थिरता होती. या आर्थिक स्थिरतेमुळेच तत्कालीन मुलांचे आयुष्य बर्‍यापैकी तणावरहित गेले. २. तत्कालीन मुलांना आजच्याइतकी करिअरची तीव्र स्पर्धा नव्हती. ३. छोट्या शहरातल्या बहुतांश लोकांना त्यांच्याच शहरात किंवा शहरालगत नोकरी मिळायची. मुंपु गाठावे लागत नव्हते. ४. मुंबई/पुण्यात आजच्याइतकी गर्दी नसल्याने दगदग आणि मानसिक तणाव कमी होता. ५. माणूसकी जास्त होती. ६. स्मार्टफोन वगैरे नसल्याने मुले मैदानात जास्त खेळत. त्यामुळे प्रकृती चांगली रहायची. ७. पूर्वी शाळकरी मुलांना अपवादात्मक चष्मा असायचा. ८. घरे आजच्याइतकी महाग नव्हती. ९. वैद्यकीय क्षेत्रात आजच्याइतकी लूट नव्हती कारण फॅमिली डॉक्टर हा प्रकार अस्तित्वात होता. आजच्या चांगल्या गोष्टी १. पूर्वीपेक्षा करिअरचे भरपूर आणि विविध पर्याय उपलब्ध आहेत. आज कलचाचणीद्वारे नेमके करिअर शोधायला मदत मिळते. २. करमणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध. ३. इंटरनेट सहज,कुठेही उपलब्ध असल्याने क्षणात जगाशी जोडले जातो. काहीजणांच्या नोकर्‍या लॉकडाऊन काळात WFH मुळेच टिकल्या , शिक्षण सुरु राहिले. ४. वेगवान वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध. ५. गुगल आणि युट्यूबमुळे कुठेही,केव्हाही दर्जेदार शिक्षण उपलब्ध होते. काहीवेळा तर शाळा/कॉलेजातल्या मास्तरांपेक्षा दर्जा चांगला असतो. ६. माहिती तंत्रज्ञान उद्योगामुळे खाजगी क्षेत्र असूनही अनेकांना चांगले पैसे मिळाले,परदेश पाहता आला. काहीजण अमेरिका,ब्रिटन,ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशात कायमचे स्थिरावले.
  • Log in or register to post comments

Submitted by रंगीला रतन on गुरुवार, 03/25/2021 - 17:25

In reply to ज्याचे वय आता पन्नास वर्ष आहे by Rajesh188

Permalink

भाषा ही व्याकरण शुध्द च असली

भाषा ही व्याकरण शुध्द च असली पाहिजे ह्या विषयी शिक्षक आग्रही असतं. हे फारच आवडले :)
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Mon, 03/22/2021 - 05:54

Permalink

- कमी भांडवल आणि उधार घेणे

- कमी भांडवल आणि उधार घेणे सोप्पे ) - कोणतेही उत्पादन नाही - कोणालाही "माझे उत्पादन/ सेवा घे म्हणून मागे लागावे लागत नाही " असा एक वयसाय म्हणजे आर्थिक "उलाढाल" करण्याचाच व्यवसाय येथे "उलाढाल" हा शब्द महत्वाचाच गुंतवणूक नव्हे, दोन्हीत फरक आहे हे लक्षात घ्यावे यात अर्थात आले ते म्हणजे शेअर मार्केट , किंवा विविध डेरीवेटीव्ह म्हणजे फुचर , ऑप्शन , वॉरंट इत्यादी हे झाले याचे फायदे परंतु यात पडताना "अतिशय " काळजी घेऊन आणि अभ्यास करून मगच उतरावे ... यातील धोके - यात बहुतेकदा उधारी वर किंवा इंग्रजीत ज्याला लिव्हरेज वर धंदा केला जात असल्यामुळे "गुंतवलेलंय पैशापेक्षा कितीतरी अधिक गमावणायची शक्यता पण असते हे वीरू नये - यात "टिप्स देणारे" "ग्यारन्टीड प्रॉफिट पद्धत "असले क्लास किंवा काही साफ्टवेर विकणारे लबाड आणि चालू लोकं / कंपन्या तुम्हाला खूप सापडतील... त्यापासून सावध राहा एक साधं प्रशा असतो जर हे "ट्रेडिंग गुरु" एवढे भारी आहेत तर ती लोक स्वतः टेडिंग करून कमवतात की असले कोर्स विकून जास्त पैसे कमवतात .. बर ते स्वतः ट्रेडिंग करून कमवत असतील तर मग सेबी मध्ये ते परवाना धारक आहेत का? आणि मग एवढे जर चांगले असतील तर सेबी अधिपत्याखाली म्यानेज्ड फंड का नाही चालवत ? असो तो एक वेगळाच विषय आहे दुसरा एक लांब पाल्याचा आणि जास्त भांडवल लागणार व्यास म्हणजे प्रॉपर्टी / वास्तू मधील गुंतवणूक...आणि खास करून यात पण "एकातून दुसरे " असे वर्षानुवर्षे करून आशयवस्तूंची मालकी जमवणे थोडक्यात (अर्हताःत हे त्या त्या देशातील आयकर नियमनवर, तेथील व्याज दार, भांड्यातून मिळणारी रक्कम आणि भांड्यवर देणे हे कितीपत बिनधोक्याचे आहे यावर अवलंवून आहे ) उदाहरण: राहत्या घराशिवाय , गुंतवणुकीचे घर १ घेणे २०% आपले ८०% कर्ज समजा घर १० कोटी CHE काही वर्षांनी त्याचे पुनर्मूल्य कारेन आणि समजा ते ११ कोटी असले तर ११ कोटीच्या ८०% बँक कर्ज द्यायकेल तयार असते म्हणजे तसे करून ते वरील पैसे त्यातून घेणे आणि ते गुंतवणूक क्रमांक २ चाय घरासाठी जे परत २०% लागतील तयासाठी वापराने ( घर क्रमांक विकायचे नाही )
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 03/22/2021 - 06:12

Permalink

हे व्यवसाय निवडा ..

यांत्रिक तांत्रिक प्रगतीने अनेक रोजगार नष्ट होणार आहेत पण जगातील आस्तिकता , देवाच्या कोपाची भीती , पितरे आपल्याला त्रास देण्याची भीती , ईश्र्वरा विषयी वाटणारी कृतज्ञता , सणवार रूढी यांचे आकर्षण ,देवाचे अस्तित्व मान्य केल्यानंतर स्वामी, महाराज , गुरु माँ ,साध्वी या वर्गाविषयी ओढ ही कायम राहाणार आहे ! सबब फुलांची शेती हार करण्याचा व्यवसाय उदबत्या चे उत्पादन देवघरे निर्माण करण्याचा व्यवसाय पौरोहित्य १३ व्या चा स्वयंपाक संक्रान्तीचा तिळगूळ सुगडी तयार करणे देऊळ व्यवसाय कीर्तने पूजा साहित्य निर्मिती नारळ देवीसाठी साड्या दसऱ्याला आपट्याची पाने विक्री खंडेनवमीला झेंडूची फुले शिमग्याला लाकडे रंगपंचमीला रंग ई व्यवसायांना मरण नाही !!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 03/22/2021 - 09:36

In reply to हे व्यवसाय निवडा .. by चौकटराजा

Permalink

त्यापेक्षा ....

बाबा महाराज, यांचे प्रार्थना स्थळ तयार करा ... आता देवाला कुणी विचारत नाही...निदान डोंबोलीत तरी हीच परिस्थिति आहे.. फक्त, मारूतीचे मंदिर, आर्थिक फायदा देते, कारण एकच शनी... व्हिलन जितका तगडा, तितके हिरोचे महात्म्य जास्त, संदर्भ, बॅटमॅन मधल्या जोकरचे वाक्य... तळमजल्यावरचे घर मात्र हवेच.... साईबाबा, यांचे मंदिर सगळ्यात उत्तम परतावा आणि तो पण पिढ्यानपिढ्या.... देवाच्या मंदिरात चोरी होते पण बाबा महाराज यांच्या मंदिरात चोरी झालेली मी वाचलेली नाही आणि ऐकलेली नाही....
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Mon, 03/22/2021 - 06:41

Permalink

भारताबाहेरून कामे मिळवणे

२५) अभियांत्रिकी किंवा इंटिरियर डिझाईन/ प्रोडक्ट डिझाईन साठी भारताबाहेरून कामे मिळवणे .. ज्यात खालील फायदे दिसतात - कमी भांडवल, उत्पादन नाही - निर्यात असली तरी सरकारी कटकट नाही / कमी - परदेशी चलन मिळण्याहची शक्यता आणि त्याचे काही फायदे - तुलनेने तशी जास्त चांगला दर मिळू शकतो - बहुतेकदा दिलेल्या सेवेचे पैसे वेळेवर मिळण्यास सोपे ( भारतातील यात काम करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांशी बोललो त्यावरून ) - आजकाल लॅपटॉप सुधाच चांगल्या ग्राफिक कार्ड असलेले मिळत असल्यामुळे अशी डिझाईन सॉफ्टवेर त्यावर काम करतात आणि इंटरनेट डेटा स्वस्त आहे तेव्हा कुठूनही काम करता येते तोटे: -शिरकाव अवघड आणि प्रतिस्पर्धी ,,,पण जर आपल्याला खास काही गोष्टी येत असतील तर परदेशी उद्योग काम द्यायला राजी असतात - परदेशातील स्तहनिक नियम जसे कि बांधकाम डिझाईन चे नियम माहिती असणे अवयषयक - अवेळी काम !
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Mon, 03/22/2021 - 06:43

Permalink

२६)

२६) करोनाच्या काळात आंतरजालावर शिकणे आलेच मग त्यात नृत्य , गायन शिक्षण आले पण तयात अजून एक.. एक मित्र चक्क कीर्तन शिकतोय
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Mon, 03/22/2021 - 11:17

Permalink

शिकण्याचा वेग, शिकण्याची तयारी

एखादी गोष्ट शिकण्याचा चांगला वेग हे सुद्धा श्रीमंतीला पोषक असावं. सध्याच्या काळात सातत्याने शिकत राहणं महत्वाचं. नवीन कौशल्ये,जुनी अपडेट करणे यासाठी शिकण्याचा वेग चांगला हवा. कॉलेजचं शिक्षण सलगपणे पूर्ण केलेल्या उमेदवाराला केटी किंवा एक-दोन इयर डाऊन होऊन शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीपेक्षा निश्चितच जास्त संधी उपलब्ध असणार आहेत. सलग पास होत गेलेली व्यक्ती जबाबदारीने वागणारी आहे, अभ्यास झेपतो हे गुण सलग पास होणार्‍या व्यक्तीत दिसून येतात. म्हणून तुम्ही एखादी गोष्ट किती लवकर शिकता यावरही आर्थिक समृद्धी अवलंबून असते. दुर्दैवाने भारतातले बहुसंख्य अभ्यासक्रम हे डावा मेंदू अधिक वापरणार्‍यांच्या सोयीचे असेच बनवले गेले आहेत. अशा ठिकाणी उजवा मेंदू बर्‍यापैकी वापरणारी मुले मागे पडतात, शिक्षणात काहीवेळा अपयशही येते. अशा मुलांनी उजव्या मेंदूला पोषक अशाच क्षेत्रात जाणे आर्थिक भरभराटीसाठी चांगले. माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीचा जॉब लॉकडाऊनमधे गेला. वय ४२. कंपनीच्या बसनेच ये जा. त्यामुळे दुचाकी शिकला नव्हता. आता नवीन जॉब शोधताना सर्व्हिस सेक्टरमधे फिरतीचे जॉब काही ठिकाणी मिळाले पण बाईक येत नाही हे समजल्यावर नकार मिळायचा. बाईक शिकतो म्हणून सांगितलं तरी काम देणारे मालकलोक विश्वास ठेवायचे नाहीत. "हे काय वय आहे काय बाईक शिकायचं? पडला बिडलात तर जबाबदार कोण?" म्हणून नको म्हणायचे. शेवटी हा गाडी शिकला. एका उद्योजकाला भर रहदारीच्या रस्त्यातून सफाईदारपणे चालवून दाखवली. मग त्याला नोकरी मिळाली. वय जास्त आहे म्हणून शिकणं जमणार नाही वगैरे गोष्टी आजच्या काळात उमेदवारांनीही सांगू नयेत.शिकण्याची तयारी ठेवावी. यश येईल न येईल तो पुढचा भाग. शिवाय कोणी शिकण्याची तयारी दाखवली तर काम देणार्‍यानेही थोडा सैल हात सोडावा. अगदीच अविश्वास दाखवू नये किंवा पूर्वग्रहदूषितपणे वागू नये असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Tue, 03/23/2021 - 07:41

Permalink

श्रीमंती ही व्यक्ती आणि काळ

श्रीमंती ही व्यक्ती आणि काळ सापेक्ष नाही काय? पैसा कितीही मिळो, त्याने समाधान होणारच नाही. कारण पैसा हे समाधान मिळवण्याचं साधनच नाही मुळात. समाधान त्या पैशाच्या योग्य विनियोगातून कदाचित थोडे बहुत मिळू शकेल. :-) तसेही पैसा कमावणे एक गोष्ट आणि त्याचा विनियोग करणे वेगळी गोष्ट. खूप पैसा आहे पण वापरलाच नाही तर त्या व्यक्तीला श्रीमंत म्हणता येईल काय? खूप आलेला पैसा उधळून टाकला तर ती व्यक्ती श्रीमंत म्हणता येईल काय? पैसा कसा कमवायचा, किती कमवायचा, विनियोग कसा करायचा आणि पुनर्गुंतवणूक कशी करायची ह्या सर्व बाबी निगडीत आहेत. त्यांचा समतोल साधता आला पाहिजे. बाकी व्यवसाय कोणता निवडायचा त्याचे स्वॉट अ‍ॅनालिसिस करून मग त्यात उतरणे श्रेयस्कर. आणि सोबतच एक ना धड भाराभर चिंध्या असं होऊ न देण्याची खबरदारी ठेवणे हिताचे.
  • Log in or register to post comments

Submitted by ॲबसेंट माइंडेड… on Tue, 03/23/2021 - 09:54

In reply to श्रीमंती ही व्यक्ती आणि काळ by राघव

Permalink

सर्वोत्तम प्रतिसाद. +१

सर्वोत्तम प्रतिसाद. +१
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Tue, 03/23/2021 - 10:01

Permalink

विश्वास ठेवा अगर ठेवू नका ..

मी एक ब्रन्डेड टी शर्ट ( अदिदास ) गेले १५ वर्षे वापरीत आहे ! आता त्याचा रंगच विटला त्यामुळे वापर घरातच ! मी वुडलॅंन्ड कंपनीचे सेकंड वाले सँडल्स घेतले ६०० रु ते साडे नऊ वर्षे वापरले त्यानंतर मी आदिदास कंपनीचे सेकंड वाले सँडल्स घेतले ते गेले साडेसात वर्षे वापरीत आहे ! याबरोबर माझ्याकडे वॉकिंग शू आदिदास सेकंड ९०० त घेतलेले आहेत ते मी गेले ८ वर्षें वापरीत आहे ! वुडलँड चे लेदर शू असेच ऑफर मध्ये १२०० ला घेतलेत. १९८५ साली फिलिप्स डेक ( ओरिजिनल ) ची म्युसिक सिस्टिम घेतली ती २००५ पर्यंत वापरली ! फ्लोरा फाउंटन ला उत्तम दर्जाच्या बर्म्युडा ८० रु ते मिळतात अगदी कोर्या करकरीत त्याचे कापड कॉडराय डेनिम ई प्रकारचे असते ! इथेच १५० रू ता नवी कोरी पँट १५० ते १८० रु त मिळते . त्याची किंमत इतरांना विचारली तर ती आठशेला तरी असेल असे सांगतात ! २००१ मध्ये यामाहाचा की बोर्ड घेतला तो २०१८ पर्यंत वापरला सध्या कॅशियो चा अरेंजर सिंथेसायझर घेतला आहे ! मी एम ८० ही गाडी १९९५ त घेतली टी २२ वर्षे वापरली पुन्हा नोंदणी सह ! तीच्यावरून जबर फिरलो ! आता प्लेझर ही गाडी वापारित आहे तिनेही भरपूर .फिरतो ! आमच्या सोसायटीत इतरानी जितके पैसे फर्निचरच्या लेबर साठी दिले तेवढ्यात मी योग्य सुतार आठवून पूर्ण फर्निचर ( मटिरिअल सह ) फ्लॅट सजविला आहे ! कोणत्याही इंटेरिअर डेकोरेटर ची मदत ना घेता ! ( जे मिपाकर घरी आलेत त्यांनी तो पाहिला आहे ) कोणतीही चारचाकी घेतलेली नाही ! गरज पडल्यास ओला आहेच ! आयुष्यात कधीही कर्ज घेतले नाही पण बराचसा भारत पाहिला ,युरोपातील तीन देशाना पत्नी सह भेटी दिल्या .सुमारे ३००० चित्रपट मी १९७० पासून पाहिलेत . पुस्तके वाचली ! नाटकात काम देखील केले! आज माझ्या खर्चापेक्षा माझे सेव्हिंग जास्त आहे !मी कुठल्याही अधिकार पदावर नव्हतो ! ना माझी पत्नी ! तुम्हाला पैसे कसे मिळवावे ,कर्ज कुठून मिळेल हे सांगणारे अनेक भेटतील पण सुज्ञपणे खर्च कसा करावा याचे एकही पुस्तक बाजारात आहे का ... ? ते पुस्तक माझ्याकडे आहे ! लेखक निराद चौधरी म्हणतात " बेस्ट सेव्हर इज द बेस्ट स्पेंडर !! "
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 03/23/2021 - 10:23

In reply to विश्वास ठेवा अगर ठेवू नका .. by चौकटराजा

Permalink

"बेस्ट सेव्हर इज द बेस्ट स्पेंडर !!"... सहमत आहे ...

आमचे एक गूरू म्हणून गेले आहेत, "अंथरूण पायापेक्षा, मोठेच ठेवा."
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Tue, 03/23/2021 - 10:44

In reply to विश्वास ठेवा अगर ठेवू नका .. by चौकटराजा

Permalink

प्रतिसाद खूप आवडला

पैसे किती कमावत आहोत हे जसे महत्वाचे आहे त्या पेक्षा जास्त ते पैसे तुम्ही कसे वापरत आहात हे महत्वाचे आहे. आणि आर्थिक स्थिरता हवी असेल तर पैसे योग्य रिती नी वापरले पाहिजेत. एकच प्रकारची आणि पगाराची नोकरी करणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती वेग वेगळी असते त्याला हेच कारण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Tue, 03/23/2021 - 10:59

In reply to विश्वास ठेवा अगर ठेवू नका .. by चौकटराजा

Permalink

पर्फेक्ट

!
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 03/23/2021 - 17:17

In reply to विश्वास ठेवा अगर ठेवू नका .. by चौकटराजा

Permalink

चौराकाका,

चौराकाका, प्रतिसाद आवडला.. बेस्ट सेव्हर इज द बेस्ट स्पेंडर !! हे वाक्य लाजवाब... तरीही काही बाबतीत मी स्वतः असे करत नाही..प्रत्येकाचे वेगळे गणित असते..प्रत्येक माणुस वेगळा.. काटाकासर करणे हे नेहमी चांगले, माझे वडील हि तुम्ही म्हणता तसेच आहेत, अगदी तंतोतंत... पण जीवन म्हणजे काय? गरज तेथे खर्च आयडीयल असेल, परंतु मला छान राहिला आवडते, माझ्याकडे ऑफिस साठी ३ आणि ट्रेक, running असे सगळे इतर४-५ ब्रँडेड shooes आहेत, Apache असताना मला बुलेट आवडते तर ती मी घेतली. फर्निचर मला जास्त आवडत नाही तर ते माझ्याकडे जवळ जवळ कमीच आहे.. पण मला घराचे रंग, त्याचे गेट माझे ब्रँडेड शर्ट्स आणि गॉगल मला आवडतात..आत्ताच rayban घेतोय या महिन्यात आणि या सर्वातून जेंव्हा मला वाटते खर्च जास्त होतोय,तेंव्हा मी नविन गोष्टीं शिकतोय, नविन तंत्रज्ञान आत्मसात करतोय, नविन मार्ग शोधतोय..नविन क्लास लावून माझे skills वाढवतोय.. मान्य आहे, शांती, समाधान जास्त महत्वाचे, पण मला संघर्ष करणे त्याहून जास्त प्रायोरिटीचे वाटते, कदाचीत, या अश्या स्वभावाने माणसाची जास्त प्रगती होत असेल किंवा त्याच्या कडे असणाऱ्या skills जास्त use होऊन जे तो करण्याचे धाडस करणार नसेल ते करु शकत असेल. आणि मला वाटते, अतिरिक्त खर्च वाचवून नंतर कुठे पैसे spend करायचेत याप्रमाणेच नंतर काय खर्च करायचाय, यावरून आता खर्च करत असताना हि पैसे कसे निर्माण करायचे हे हि तितकेच महत्वाचे.. आणि मला वाटते, तुमच्याकडे किती पैसे save आहेत यावरून तुम्ही श्रीमंत ठरत नसतात, तर तुम्ही तुमच्यावर, तुमच्या आवडीवर तुमच्या मनाप्रमाणे त्या त्या वेळेस किती पैसे खर्च करू शकता यावर तुमची श्रीमंती ठरते... म्हणुन मी म्हणू इच्छितो.. (कोणी आधीच म्हणाले असेल तर माहित नाहि) "जो वर्तमानात खर्च करू शकतो, त्यालाच जगण्याचा अर्थ कळतो.. " - गणेशा (अवांतर - आपण ऑर्कुट काळात भेटलेलो आहोत काय, तुम्ही चित्र काढता काय? )
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 03/23/2021 - 18:13

In reply to चौराकाका, by गणेशा

Permalink

मस्तच

तेंव्हा मी नविन गोष्टीं शिकतोय, नविन तंत्रज्ञान आत्मसात करतोय, नविन मार्ग शोधतोय..नविन क्लास लावून माझे skills वाढवतोय..... हे आवडले...
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Tue, 03/23/2021 - 18:27

In reply to मस्तच by मुक्त विहारि

Permalink

नवीन शिकणे ई ..

अच्युत गोडबोले म्हणतात " आज नोकरीत टिकून रहायचे असेल तर नवीन काहीतरी शिकावेच लागेल. पण त्यात एक अडचण अशी येऊ शकते की तुम्ही जे शिकत आहात त्यापेक्षा तन्त्रज्ञानाचा बदलण्याचा वेग जास्त असणार आहे ! मी १९८८ मधे कोबोल ही प्रोग्रामिंग भाषा शिकलो . पाच वर्षात ती गैरलागू झाली. मला फायदा इतकाच की सोफ्टवेअर प्रोग्राम म्हणजे काय .. ? इतपत मला कळले.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 03/23/2021 - 18:38

In reply to नवीन शिकणे ई .. by चौकटराजा

Permalink

आपण आयुष्यात खूप काही शिकतच असतो ...

पण प्रत्यक्षात आणतोच असे नाही... उदा. सायकलचे पंक्चर काढता येणारा मनुष्य, पंक्चरचे दुकान टाकेलच असे नाही... ज्ञानलालसा महत्वाची...
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Tue, 03/23/2021 - 18:20

In reply to चौराकाका, by गणेशा

Permalink

चित्र काढतो ..

आकुर्ट काळात भेटलो असू आता काही आठवत नाही . तिथे मूळ नाव आय डी मधे होते. खर्च करण्याच्या धोरणात एक गोष्ट महत्वाची जे खर्च वयानुसार करायला हवेत ते करावेत. उदा. लग्नात थोडे तरी का होईना फोटो काढणे पण करिझ्मा आल्बम ची गरज नाही तो धूळ खात पडून रहात. अलिकडे एकाने लग्नात एथनिक ड्रेस चक्क भाड्याने आणून वेळ मारून नेली .लग्न झाल्यावर हनीमून करणे खर्चिक वाटले तरी करावे ! कारण काट्कसर काळ पुन्हा मागे आणत नाही ! मुळात सर्वात मोठी गोष्ट खर्च करण्यात महत्वाची की आपली चंगळ करण्याची व्याख्या हळू हळू बदलत नेणे .उदा. सुरुवातीच्या काळात पुस्तक ग्रन्थालयातून आणून वाचा नंतर सवलतीत पुस्त्काचे सन्च मिळतात का पहा ! नन्तर जसे जसे पैसे वाढत जातील तसतसे पुस्तक एकेक विकत घेऊन वाचा !
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 03/23/2021 - 18:53

In reply to चित्र काढतो .. by चौकटराजा

Permalink

__^__

__^__
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Wed, 03/24/2021 - 07:07

In reply to चित्र काढतो .. by चौकटराजा

Permalink

अहो गंमत म्हणजे

अलिकडे एकाने लग्नात एथनिक ड्रेस चक्क भाड्याने आणून वेळ मारून नेली अहो गंमत म्हणजे - रोजच्या जीवनात सूट घालण्याची सवय आणि गरज असून सुद्धा लग्नाचे कपडे म्हणून नवरा / नवरी ते १ दिवसापूर्वी भाड्याने घेतात हे सर्रास पाश्चिमात्य देशात असते ... - रोजच्या जीवनात सूट घालण्याची गरज आणि शक्यता नसून ( ऐपत असली तरी) केवळ लग्नाचाच म्हणून सूट घेण्याची "प्रथा" भारतात आहे ! का कोण जाणे , ३५ ते ४० अंश सेल्सिसाय असलेल्या मुंबई पुण्यात कोण डोंबलाचा सूट घालणार? एक वेळ दिल्ली चंदीगढ ला ठीक आहे .. पण म्हणनात ना गोरा साहेब गेला पण राखाडी साहेब राहिला तो असा! असो सहज विरोधाभास जाणवला म्हणून माहिती म्हणून लिहिले
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Tue, 03/23/2021 - 17:23

In reply to विश्वास ठेवा अगर ठेवू नका .. by चौकटराजा

Permalink

जबरदस्त!

खूप आवडले.
बेस्ट सेव्हर इज द बेस्ट स्पेंडर
वाचायला पाहिजे! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Tue, 03/23/2021 - 11:13

Permalink

https://www.loksatta.com

https://www.loksatta.com/mumbai-news/work-of-the-transmission-line-was-handed-over-to-adani-without-any-tender-abn-97-2426726/ अशी कृपा असल्यावर श्रिमंत व्हायला काय वेळ लागतो
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 03/23/2021 - 11:29

In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस

Permalink

माहिती बद्दल धन्यवाद

माहिती बद्दल धन्यवाद ....
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on गुरुवार, 04/01/2021 - 11:10

In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस

Permalink

https://www.loksatta.com/pune

https://www.loksatta.com/pune-news/toll-rates-on-pune-satara-highway-increased-1648381/ अजुन एक कृपा. दुसर्‍या एका धाग्यात कौशल्य आणि त्या द्वारे श्रिमंत कसे होता येइल हा विषय होता. इथे कोणते कौशल्य उपयोगी पडले असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Tue, 03/23/2021 - 19:07

Permalink

आवड म्हणून अविन स्कील शिकणे स्ट्रेस देत नाही

पण आता नवीन स्किल हे तुमच्या आवडीच्या क्षेत्रात आत्मसात करावे लागत नाही तर तुमची आवक चालू राहावी म्हणून जबरदस्ती नी शिकावे लागते. आणि स्ट्रेस वाढण्याचे हे महत्वाचे कारण आहे. त्याचाच परिणाम म्हणून तरुणांमध्ये व्यसनं करण्याचे प्रमाण वाढत आहे दिवसभर ऑफिस मध्ये काम आणि रात्री दारू किंवा तस्तम नशेत आनंद शोधायचा प्रयत्न होताना दिसतो. अगदी मोठमोठे उद्योगपती पण त्याच जीवन शैली मधून जात आहेत. त्यांना पण भीती २४ तास आहे . की मी मागे तर पडणार नाही ना स्पर्धा सर्व स्तरावर आहे. आपण त्या स्पर्धेत किती सहभाग घ्यायचा हा आपला निर्णय . स्पर्धेत सहभागी तर होणे हे अटळ आहे पण किती त्याचे प्रमाण आपण ठरवायचे आहे. माणसाने वयाची पन्नाशी गढली की अंत जवळ आला आहे ह्याची जाणीव होवू लागते. आणि पाठी वळून बघितले की ५० वर्ष आयुष्य आपण स्वतसाठी जगलोच नाही ह्याची जाणीव होते. पण वेळ तर निघून गेलेली असते. जसे वय वाढत जात तसे व्यर्थ च आपण धावत होती ह्याची सल तर टोचत राहतेच. माणसाने आपले सर्व छंद जोपासले च पाहिजेत. गरजे पेक्षा थोडा जास्त पैसा कमावला पाहिजे.ते गरजेचेच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Tue, 03/23/2021 - 19:43

In reply to आवड म्हणून अविन स्कील शिकणे स्ट्रेस देत नाही by Rajesh188

Permalink

पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे

हे म्हणण्याआधी तुम्ही तो पुरेसा मिळवला आहे का हे पहा. हे जर खरं असेल तर याचाच व्यत्यास "आधी पुरेसा पैसा मिळवावा मगच पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे" हे तत्वज्ञान मांडावं. सदर धागा हा श्रीमंत होण्यासाठी काय करता येईल याबद्दल आहे. त्यावरुन भरकटून पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे,मन:शांती महत्वाची वगैरे भरपूर पैसे मिळवून झाल्यावर सांगायचे तत्वज्ञान धागाविषयापासून दूर नेते आहे. पैसा मन:शांती घालवत असेल तर गरीबी मन शांत ठेवते का? ठेवत नसेल तर आधी श्रींत होण्याबद्दल बोलुयात. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 03/24/2021 - 06:25

In reply to पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे by उपयोजक

Permalink

पुरेसा ....

या पुरेसा शब्दातच गोची आहे ! मी डोळसपणे आजूबाजूच्या लोकांना पाहात असतो. फारसा पैसा नसतानाही नवरा बायकोत वाद नाही . मुलांवर प्रेम आहे ,बायकोने आपले घर लक्ख ठेवले आहे,,पैसा नाही सबब इतर धनिक पुरूषाचे आकर्षण आहे असे नाही असे निम्न अर्थिक स्तरातले संसार मी आजूबाजूला आजही पहात आहे ! म्हणूनच म्हटले " मला मी श्रीमन्त आहे असे वाटले पाहिजे " ही श्रीमन्तीतील मुख्य पायरी आहे. मी आजही माझ्या कुटुम्बाला रोज हसत ठेवत असतो. माझी धाकटी मुलगी म्हणते बाबा ही आपली खरी श्रीमन्ती आहे. ते ती बाहेरून विकत आणलेली कछ्ही धाबेली खात म्हणत असते. यात दोन गोष्टी आल्या ! आवडती वस्तू रेडीमेड आणल्याची लाईफ स्टाएलही झाली व मौजमजा करीत ती खाण्याचा मोफत आनन्द ही लुटता आला. वस्तू च्या उपभोगाची कल्पना लाईफ स्टाईल शी आज जोडली जाते हे अमेरिकन " बाजार " आधारित संस्क्रुतीचे बाळ आहे. मग दागिने, कपडे, गाडी, फ्लॅट, उन्ची सेन्टस, महागडे वाढदिवस, बायकोला भारी भेटवस्तू, मुलाना महागडी मोटर सायकल ,पार्ट्या हेच जीवन वाटू लागते. व मग ते मिळविण्यासाठी संघर्ष हेच जीवन असे तत्वज्ञान हिरीरीने मांडले जाते. मी तरी व्रुद्धापकाळात " अफोर्डेबल व रिव्हर्सीबल " असे दोन निकष जमतील तरच वैद्यकीय उपचार घ्यावयाचे ठरवले आहे ! मला वॉरेन बफे व सन्त तुकाराम यान्च्याबद्द्ल सारखाच आदर आहे !!!
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Wed, 03/24/2021 - 08:00

In reply to पुरेसा .... by चौकटराजा

Permalink

नवरा बायकोत वाद नाही

ही अतिशयोक्ती वाटते. :) आता काळ बदललाय. तुमच्या तरुणपणीची स्थिती आता राहिली नाही. ती स्थिती आज आणताही येणार नाही. आज मुलींच्या होणार्‍या नवर्‍याबद्दलच्या अपेक्षा अतोनात वाढल्या आहेत. "नॉन आयटी क्षमस्व,नॉन MBBS क्षमस्व,नॉन CA क्षमस्व" असे लिहून येतात मुली अपेक्षांच्या कॉलममधे. शिकलेल्या,चांगलं मिळवणार्‍या मुली सोडाच पण १०/१२ वी शिकलेल्या मुलींच्याही याच अपेक्षा आहेत. मिपाकरांची इंटेलेक्चुअल लेवल बरीच वरची असल्याने हे असे काही मिपाबाह्य जगात घडते आहे हे कदाचित माहित नसावे किंवा आपल्यापर्यंत हे दाहक वास्तव पोहचत नाही तोपर्यंत कशाला लक्ष द्या वगैरे विचार होत असावा. परंतु मिपाबाहेरच्या जगात गरीबी,वाढत्या अपेक्षा, प्रबोधनाने न बदलणारी जनता आहे. "गुण्यागोविंदाने संसार करा. फक्त पैशाकडे पाहू नका" हा भरल्यापोटीचा गुडीगुडी सल्ला आजच्या काळात अजिबात कामाचा नाही. "पैसा सगळ्या गरजा भागवत नसला तरी बहुतांश गरजा पूर्ण करण्यासाठी पैसाच लागतो!" श्रीमंतीची अपेक्षा न ठेवता नवरा बायको,मुले आनंदात राहतात हे अपवादात्मक, क्वचित कुठेतरी दिसले असेल. सगळा समाज तितका समजुतदार नाही. सध्या लग्ने ही आर्थिक डिल या तत्वावर होतात. 'जोवरी पैसा तोवरी बैसा' हेच चालते. हळवे होऊन किंवा नॉस्टॅल्जिक होऊन आजचे वास्तव बदलणार नाहीये. आजचे प्रश्न आजच्या मार्गांनीच सोडवले पाहिजेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 03/24/2021 - 09:25

In reply to नवरा बायकोत वाद नाही by उपयोजक

Permalink

आजच्या मुलीची मानसिकता

आजच्या मुलीची मानसिकता हा एक वेगळा धागा होउ शकतो. त्या मानसिकतेचे दुश्परिणाम देखील दिसू लागले आहेत. कारण मुळात अशा मुलीचे आईवडीलच माझ्या सारखे नसतात. माझी मुलगी आजच्या काळातीलच आहे ! पण कोणत्याही मुलीला ठराविक प्रमाणात भावनिक ,आर्थिक सुरक्षितता हवीच असते. ती माझे लग्न झाले त्या काळात देखील माझ्या बायकोने पाहिली होती. ( मी ज्या कम्पनीत कामाला होतो तिथे वस्तू मिळायला दहा वर्षाचा वेटिंग पिरियड होता ! ) सुरक्षेततेचे रुपांतर चंगळीत झाले की समस्या निर्माण होतात .त्याला मग मनोरुग्ण म्हणून उपाय करण्याखेरीज गत्यन्तर नसते. माझा एक नातेवाईक मुलगा नोकरीही हवी व पत्रिका ही जुळली पाहिजे या हट्टापायी आज वयाच्या ६१ व्या वर्षीही अविवाहित आहे. आयुष्यात कितीतरी समस्या स्वतः चा व परिसराचा नीट अभ्यास न केल्याने उदभवतात . निसर्ग व नशीब फार कमी वेळा घाला घालतात.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 03/25/2021 - 09:42

In reply to आजच्या मुलीची मानसिकता by चौकटराजा

Permalink

दहा वर्षाचा वेटिंग पिरियड

( मी ज्या कम्पनीत कामाला होतो तिथे वस्तू मिळायला दहा वर्षाचा वेटिंग पिरियड होता ! ) गेले ते दिन गेले ! सुमित कि बजाज ( स्कुटर ) ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 03/24/2021 - 10:33

In reply to नवरा बायकोत वाद नाही by उपयोजक

Permalink

Money is like a sixth sense

Money is like a sixth sense without which you cannot make a complete use of the other five. W. Somerset Maugham A Luxury Once Tasted Becomes a Necessity Joe Bautista ... luxury becomes necessity when your neighbour buys it. subodh khare
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Wed, 03/24/2021 - 04:55

In reply to आवड म्हणून अविन स्कील शिकणे स्ट्रेस देत नाही by Rajesh188

Permalink

दिवसभर ऑफिस मध्ये काम आणि

दिवसभर ऑफिस मध्ये काम आणि रात्री दारू किंवा तस्तम नशेत आनंद शोधायचा प्रयत्न होताना दिसतो. पैसा-स्ट्रेस-व्यसन(कोणतंही) हे समीकरण होता कामा नये. माणसाने आपले सर्व छंद जोपासले च पाहिजेत. गरजे पेक्षा थोडा जास्त पैसा कमावला पाहिजे.ते गरजेचेच आहे. बरोबर.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Wed, 03/24/2021 - 08:08

In reply to दिवसभर ऑफिस मध्ये काम आणि by Bhakti

Permalink

छंदांबद्दल जरा सावध!

१)नोकरी करत असताना भरपूर वेळ द्यावा लागणारा किंवा खर्चिक छंद असू नये.छंद हा काही कालांतराने धुंदीचं स्वरुप धारण करतो.त्यात जाणारा पैसा,वेळ गरीबीला कारणीभूत ठरु शकतो. २) छंदातून चांगली आर्थिक कमाई होत असेल तर दुधात साखर. पण तसे नसेल तर तो छंद वेळीच सोडलेला बरा. असे छंद वाट लावतात. :( हा धागा वाचावा. http://www.misalpav.com/node/47786
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 03/24/2021 - 10:34

In reply to दिवसभर ऑफिस मध्ये काम आणि by Bhakti

Permalink

गरजे पेक्षा थोडा जास्त पैसा

गरजे पेक्षा थोडा जास्त पैसा कमावला पाहिजे. पण गरज आणि चैन यातील सीमारेषा कशी ठरवणार? चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते? तुमच्या शेजाऱ्याने विकत घेतली कि. उदा. व्हॅक्युम क्लिनर
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 03/25/2021 - 05:22

In reply to गरजे पेक्षा थोडा जास्त पैसा by सुबोध खरे

Permalink

याचाच व्यत्यास

गरजे पेक्षा थोडा जास्त पैसा कमावला पाहिजे. कमाई तुमच्या हातात काही १०० टक्के असत नाही पण कितीतरी प्रमाणात गरज नक्की असते. सबब मीच वर एका ठिकाणी म्ह्टल्याप्रमाणे आपली गरज कमाई नुसार बदलत जावी . १९७७ साली आग्फा चा क्लिक थ्री कॅमेरा ( त्यावेळी किंमत १५० रु. ) मला पगार ३८० रु. येथपासून आज २७ हजाराचा सोनी कॅमेरा असा प्रवास मी प्रत्येक कमोडिटीच्या बाबतीत केला आहे ! हळू हळू अंथरूण वाढवत न्यावे मग तसे तसे पाय पसरत जावे ,फक्त अंथरूण वाढवण्यातच जर लक्ष दिले तर पाय पसरण्याची मजा संपून जाईल. व अचाटपणे पाय पसरण्याची आकांक्षा बाळगली तर डी एस के होण्याची शक्यता असते . उत्पादन व उपभोग यांचा सुरेख संगम आयुष्यात आनंद निर्माण करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on गुरुवार, 03/25/2021 - 09:15

In reply to याचाच व्यत्यास by चौकटराजा

Permalink

अचाटपणे पाय पसरण्याची

अचाटपणे पाय पसरण्याची आकांक्षा बाळगली तर डी एस के होण्याची शक्यता असते . +१
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 03/24/2021 - 19:12

In reply to आवड म्हणून अविन स्कील शिकणे स्ट्रेस देत नाही by Rajesh188

Permalink

टॉलस्टॉयची कथा

प्रसिद्ध रशियन लेखक टॉल्स्टॉय यांची एक सुरेख कथा आहे. एका लोभी माणसावर देव प्रसन्न झाला आणि म्हणाला ‘सकाळ संध्याकाळ पर्यंत जितक्या जमीनीवर तुझी पावूले पडतील तितकी जमीण तुझी होईल. आता तुला किती जमीन हवी हे तू ठरवायच आणि त्या प्रमाणे प्रयत्न करायचा’ माणूस लोभीतर होताच शिवाय लोभामुळे विचार क्षमता ही गमावून बसला होता. म्हणूनच देवाच्या बोलण्याचा आशयही समजू शकला नाही. त्याने विचार केला कि चालत राहिलो तर अशी कितीशी जमीन त्याब्यात येणार त्या पेक्षा पळत निघालो तर जास्ती जास्त जमीन आपल्याला मिळवता येइल. बस ठरल पळायच.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Wed, 03/24/2021 - 22:37

In reply to टॉलस्टॉयची कथा by प्रकाश घाटपांडे

Permalink

लोभामुळे विचार क्षमता ही गमावून बसला होता

मास्तर! हा देश तमाशानं बिघडला नाही आणि किर्तनानं सुधारलाही नाही. - पिंजरा
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Tue, 03/23/2021 - 21:59

Permalink

शंभरावा प्रतिसाद!

उत्तम चर्चा सुरु आहे; वाचतो आहे. "धडधाकट गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती" यासारखे साफ खोटे, दिशाभूल करणारे आणि अवसानघातकी विधान दुसरे नसेल. मानवी जीवनात सुख-दुःख हे सर्वत्रच आहे. श्रीमंती (म्हणजे मुख्यतः आर्थिक सुबत्ता) दुःख कमी करण्यास आणि सुख वाढवण्यास अत्यंत उपयुक्त ठरते. तुम्हाला लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि तुम्ही श्रीमंत आहेत तर तुम्हाला अधिक भव्य रीतीने (टॅंकबंडच्या बसऐवजी स्वित्झर्लंडची फ्लाइट!) करता येईल, आणि ब्रेकअपच्या दुःखात बुडून जायचे आहे तर तेही अधिक भव्य (बॅगपाइपरऐवजी ग्लेनफिडिच!) रीतीने करता येईल! आता प्रश्न आहे, भरपूर पैसा कसा कमवावा? सर्वसाधारणपणे, आपल्या कौशल्याचे रूपांतर पैशात करण्याचे कसब तुम्हाला श्रीमंतीकडे नेते. तथापि समाजातील सर्वांनाच हे करता येते असे नाही, त्यांच्याकडे उपयुक्त कौशल्य असतेच असेही नाही. म्हणूनच की काय, इतर लोकांना श्रीमंत व्हायची संधी उपलब्ध असते! माझ्या मते, पोट भरण्याची, गरिबीतून बाहेर पडण्याची, संपदा निर्माण करण्याची, श्रीमंत होण्याची... आजच्याइतकी प्रचंड संधी, ज्ञात मानवी इतिहासात पूर्वी केंव्हाही नव्हती. ज्याला कोणतेही समाजपयोगी काम करता येते अश्या प्रत्येक व्यक्तीला आज मागणी आहे. ज्याला/जिला श्रीमंत व्हायचे आहे -- मर्यादा ज्याची त्याने आपापल्या कुवतीनुसार ठरवावी -- त्याने/तिने - १. आपल्या कौशल्याला उपयुक्त बाजार शोधावा किंवा बाजाराला उपयुक्त कौशल्य शोधावे. २. आपल्या कौशल्याला सतत मागणी राहील याची तजवीज करावी किंवा मागणीप्रमाणे कौशल्य बदलावे. ३. भरपूर पैसे कमवावे आणि कमावलेल्या पैशापैकी किमान ७५% पैसा खर्च करावा. पैसा असो की पाणी, फार काळ साठवून ठेवता येत नाही, खराब होत जाते. ४. मध्यम वयात आपल्या खर्चाच्या प्रमाणात पैसे कमविण्याचे उद्दिष्ट ठेवावे. ५. उतारवयात आपल्या पैश्याच्या प्रमाणात खर्च करण्याचे नियोजन करावे. हे सर्व कायदेशीर मार्गाने साध्य करणे सहज जरी नसले तरी शक्य आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com