Skip to main content

उत्पन्न वाढ

श्रीमंतीचे नियम??

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 20/03/2021 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
भरपूर पैसे मिळवावेत असे कोणाला वाटणार नाही? बहुतांश लोकांना तसे वाटते तरी किंवा भोवतालची परिस्थिती तरी त्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडते. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. साहजिकच इथे संघर्ष खूप आहे, भ्रष्टाचारसुद्धा बराच आहे. शिवाय भारतात श्रममूल्य हे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीतून प्रयत्न करुन आर्थिक समृद्धी आणण्याचे महत्कार्य पार पाडावे लागते. थिंक अँड ग्रो रिच हे श्रीमंत कसे व्हावे या विषयावर बरेच गाजलेले पुस्तक विशेषत: अमेरिकन जनता डोळ्यासमोर ठेवून लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिले होते. यालाही साधारण ८४ वर्षे होऊन गेली.

गुंतवणूक कशी, कुठे

लेखक नीलमोहर यांनी गुरुवार, 24/12/2015 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
अन्न, वस्त्र, निवारा यांच्या बरोबरीने माणसासाठी अत्यंत गरजेची बनलेली गोष्ट म्हणजे आर्थिक गुंतवणूक. आपण पैसे कमावतो, खर्च करतो तसेच भविष्याची तरतूद म्हणून अनेक ठिकाणी गुंतवतो. मात्र ही गुंतवणूक कुठे, कशी, किती प्रमाणात करावी याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. सध्याचा महागाईचा वाढता आलेख पाहून भविष्यातील आर्थिक गणित कसे जुळवावे हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. खर्च वाढते राहतात मात्र उत्पन्न त्या प्रमाणात वाढतेच असे नाही.