Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ३)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी बुधवार, 10/02/2021 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात २००+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी तिसरा भाग काढत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनातील झालेल्या हिंसाचारात भडकावायचे काम केल्याबद्दल भारत सरकारने दिलेल्या यादीतील काही ट्विटर खाती भारतातून बघता येणार नाहीत असे ट्विटरने जाहीर केले आहे. मात्र सिविल सोसायटीमधील 'अ‍ॅक्टिव्हिस्ट'ची खाती ब्लॉक करण्यात आलेली नाहीत असे ट्विटरने म्हटले आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/withheld-some-a/cs-within-ind…

वाचने 67952
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

In reply to by चंद्रसूर्यकुमार

दिशा रवीने दिल्लीतील न्यायालयासमोर म्हटले की तिने त्या टूलकिटमधील 'केवळ' दोनच ओळी एडिट केल्या. https://timesofindia.indiatimes.com/india/greta-toolkit-probe-activist-… म्हणजे-- १. असे कोणते टूलकिट आहे आणि त्याद्वारे भारतात गोंधळ घालायची काहीतरी योजना आहे हे तिला माहित होते. २. ती स्वतः पर्यावरणाच्या क्षेत्रात 'काम' करत असल्याने तिला ग्रेटा थनबर्ग माहित नाही असे होणे शक्य नाही. तेव्हा ही टूलकिट कोणा सोम्यागोम्याने उगीच टाईमपास म्हणून बनवलेली नाही हे तिला कळायला हरकत नसावी. असे असेल तर तिने आधीच पोलिसांना माहिती का दिली नाही की भारतात गोंधळ घालायचे कारस्थान शिजत आहे आणि त्याची माहिती तिच्याकडे आहे? ३. ही टूलकिट तिच्याबरोबर शेअर करण्यात आली होती याचा अर्थ ती गोंधळ घालण्याच्या कामात काहीतरी हातभार लावू शकेल याची खात्री नाही तरी निदान विश्वास तरी ते शेअर करणार्‍यांना असावा. मिपावरच्या कोणाबरोबर कशी ती टूलकिट शेअर झाली नाही? इतकेच नव्हे तर त्या टूलकिटमधील दोन ओळी का होईना तिने एडिट केल्या. म्हणजे भारतात गोंधळ घालायच्या आंतरराष्ट्रीय कारस्थानात ती सामील आहे असे म्हणायला जागा असावी. ती २१ वर्षाची म्हणजे लहान असली तरी कायद्याच्या दृष्टीने सज्ञान आहे. त्यामुळे तिला तिच्या कृत्याची कडक शिक्षा मिळायलाच हवी. अमेरिकेतील वगैरे मिलिएनल्स फुकाच्या समाजवाद, डावे विचार वगैरेंच्या आहारी गेले आहेत त्यातलाच हा प्रकार दिसतो. डावे विचार सगळीकडे घातक असतात आणि वेगवेगळ्या देशांमध्ये हिंसाचार माजवून कम्युनिस्ट राज्य स्थापन करायचा त्यांचा उद्देश असतो. जिथे राज्य स्थापन करतात तिथल्या लोकांवर अनन्वित अत्याचार करणे, विरोधकांना गुलागमध्ये पाठवणे किंवा फायरींग स्क्वाडमध्ये ठार मारणे, खाजगी मालमत्तेवर सामाजिक न्यायाच्या गोंडस नावाखाली टाच आणणे असले प्रकार कम्युनिस्ट राज्यात होतातच. मानवजातीला कलंक असलेल्या या तथाकथित विचारसरणीकडे जास्त प्रमाणावर तरूण आकर्षित होऊ नयेत म्हणून जे काही गरजेचे असेल ते सगळे केलेच पाहिजे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हिने केलेला कथित गुन्हा नक्की कोणत्या कायद्याने गुन्हा आहे हे तरी दिल्ली पोलिस ना माहीत असेल का? ती आंतरराष्ट्रीय संस्थेची सभासद आहे पूर्ण जगाचे लक्ष त्या वर असणार आहे. कोणी गरीब शेतकरी नाही आली लहर म्हणून कोणती ही कलम लावून अटक केली. न्यायालयात दिल्ली पोलिस कोणते आकलेचे तारे तोडत आहे हे केस उभी राहिली तर माहीत पडेल च मग न्यायालय कसे ह्यांच्या अब्रू ची लक्तर कस वेशीवर सुकत घालतंय ते पण माहीत पडेल. तो पर्यंत वाट बघता येईल.

In reply to by काळे मांजर

याचा महाराष्त्राच्या राजकारणावर फार दूरगामी परिणाम होणार असे दिसतेय.. हिंमत असेल तर ़खडसेंनी स्वत:च्या खासदार सुनेला फोडावे. मग आम्ही म्हणू खडसे खरेच आपल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत म्हणून. गेला बाजार १९ आमदार तरी फोडायचे, नगरसेवक? हा का ना का.

In reply to by काळे मांजर

पुढेमागे राष्ट्रवादीतून स्वतः निवडुन नाही आले तरी न फोडलेल्याला तरी लटकुन राहता येईल हाच विचार असेल.

T मोदी सरकारच्या काळात परदेशात स्थलांतरित व्हायचा दर वाढला

राहण्यास योग्य नाहीत .मुंबई असू नाही तर कोणते ही शहर आता श्रीमंत लोकांना राहण्यास योग्य वाटत नाहीत. त्याचे महत्वाचे कारण जीवघेणे ट्रॅफिक आणि प्रचंड गर्दी. स्वतःची गाडी असून सुद्धा प्रवास आरामदायी नाही .. त्या मुळे श्रीमंत लोक दुबई किंवा बाकी ठिकाणी शिफ्ट होत आहेत व्यवसाय भारतात असला तरी इथे राहण्यास ते तयार नाहीत. ह्या मध्ये मोदी चा दोष नाही. एकंदरीत भारताचे city planing चे १२ वाजले आहेत हे कारण आहे.

In reply to by Rajesh188

थोडे सिरियस . . . भारताचे city planing हे कधी काळी इंग्रज लोकांनी केले. बस. नंतर त्यात कुणी जास्त हात ठेवला नाही. म्हणजे बघा ... मुंबै चे उदाहरण घेउ ... कोलकता पण असेच. जे इन्फ्रा १०० वर्षापुर्वी होते तेच अजुनही चालु आहे. रोड नवीन होतात. पण फूटपाथ बनवत नाहीत. बनले तर लगेच हातगाड्या लाउन आंडाभुर्जी विकायला सुरुवात होते. रस्त्याच्या कडेला मोठे दुकान अगदी झगमगाट .. पण पार्किंगला जागा नाही. मग गाड्या रस्त्यावर पार्क करणार. यात प्रशासन हतबल होते ... नो पार्किंग च्या गाड्या उचलाव्या तर लोक बोंबल्नार ... फुट्पाथ मोकळे करावे तर दुकानदार बोंबलनार. दुसरे ... एखाद्या शहरावरचा भार कमी करुन दुसरे क्लस्टर डेवलप करावे तर तो अगदी अस्मितेचा प्रश्न होतो. म्हणजे बघा ... मुंबईतील काही सरकारी / निम्न सरकारी कार्यालये दुसरीकडे हलवली कि यच्चयावत लोक अस्मिता जागवुण विरोध करतात .. मग त्या शहरावरचा ताण कमी न होता .. वाढतच जातो. हे दुष्ट्चक्र कधीच थांबणार नाही जो पर्यंत एकतर प्रशासन कठोर होउन निर्णय घेत नाही भले कितीही विरोध झाला तरी किंवा लोकच शहाणे होउन विरोध करतील. दुसरी शक्यता फार कमी आहे. तस्मात ... हे असेच चालेल .. अगदी दरवर्षी मुंबई तुंबली तरी .. किंवा शहर कोल्कता सारखे बकाल झाले तरी ... फक्त अस्मिता महत्वाची ... म्हणजे मुंबै म्हणजे मायनगरी किवा कोलकता म्हणजे सिटी ओफ जोय. मग अगदी रस्त्यावर लोक रहात असले तरी .....

In reply to by सुक्या

सिटी प्लांनिंग बोंबलले तर फक्त लोकच जबाबदार आहेत दर पिढीत पोरे वाढवून शेत अन घराचे वाटण्या करून करून लोकांनी अप्पे पात्र करून ठेवले , तर त्याला प्रशासन कसे जबाबदार ?

In reply to by काळे मांजर

प्रशासन आणि शासन दोघेही जबाबदार आहेत. पुण्यातला शेवटचा अप्रूव्ड प्लॅन २००८ साली संपला. साधारणपणे कोणताही नवीन प्लॅन हा जुना प्लॅन संपण्याआधी अप्रूव्ह व्हायला हवा. आपले तसे नाही. २०१४ उजाडेतोवर यांनी प्लॅन बनवलाच नाही.. त्यावर चर्चा होऊन तो अप्रूव्ह होणे बाजूलाच. माझ्या माहितीप्रमाणे अजूनही प्लॅन लागू झालेला नाही. यात सर्वच पक्षांचा दोष आहे. अळिमिळी गुपचिळी. मनपा केवळ पैसे खाण्याचं साधन झालेलं आहे, बाकी काहीही नाही.

In reply to by सुक्या

बोंबलायची गरजच नाही. स्मार्ट सिटी ची योजना आणली तर त्याला स्थानिक नगरपलिकांनी च विरोध केला. मुंबई माझी म्हणून एक पक्ष ना मुंबई तली सत्ता सोडतो, ना मुंबई चा विकास करतो. मुंबई मेट्रो चे 3 - 13 कसे वाजवले पहा. एक वर्षात जितकी झाडे तोडली त्यांच्यातून जे प्रदूषण झाले ते रिकव्हर झाले असते. आता ते 4 वर्षे पुढे गेले आणि अजून ते कुठे होणारे ते नक्की नाहीच. सरकारने कामे करायची सोडून त्याला नको त्या विरोधामध्ये विरोधी पक्षाने गुंतवून ठेवलंय.

In reply to by पिनाक

पुण्याची अवस्था मुंबई पेक्षा खराब आहे नवी मुंबई किंवा बाकी नियोजन करून बसवलेली एक दोन शहर सोडली तर झाडून सर्व शहर बकाल ,आहेत. शहराचा एकदा लहान हिस्सा फक्त ठीक असतो बाकी पूर्ण शहर .म्हणजे बकाल गाव च आहेत.

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी अमित शहा श्रीलंका आणि नेपाळमध्येही सरकार स्थापन करणार असल्याचे अजब वक्तव्य केले आहे. मार्च २०१८ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर बिप्लब देब यांनी पहिला महिनाभर अशी विचित्र विधाने करून पक्षाला अडचणीत आणले होते. माजी विश्वसुंदरी डायना हेडनवरही विनाकारण काहीतरी वक्तव्य केले होते. पण त्यानंतर जवळपास तीन वर्षे ते गप्प होते पण आता परत त्यांनी सुरवात केलेली दिसते. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने असे परदेशाशी संबंधित विधान करणे नक्कीच अयोग्य आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम बघणे सोडून फालतूची विधाने केल्याबद्दल त्यांच्यावर काहीतरी कारवाई होईल ही अपेक्षा. माझे वैयक्तिक मत हे की असल्या माणसाला मुख्यमंत्रीपदावरून काढायलाच हवे. https://maharashtratimes.com/india-news/biplab-kumar-deb-claims-bjp-wil…

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सहमत...अशी वक्तव्ये करून आपल्याच पक्षाला अडचणीत आणून नेमके काय साध्य होते ते त्यांनाच ठाऊक..

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बेजबाबदार वक्तव्ये करणारे वाचाळ इतर पक्षांप्रमाणे भाजपत सुद्धा बरेच आहेत.

राजकीय नेते जे बोलतात त्यावर जनता खुश होत असेल तर बाकी कोणत्याच गोष्टीचा राजकीय लोक विचार करत नाहीत. सध्यातरी. मान डोलवत हा जी हा जी म्हणणारी जनता आहे तो पर्यंत ह्या नेत्यांना कोणीच रोखू शकत नाही.

In reply to by Rajesh188

सरदार पटेल यांना डावलून, जवाहरलाल नेहरू, आले, तिथपासून हीच प्रथा पडली आहे... त्यांना सगळे समजते.ही मानसिकता, समाजाचा घातच करते.

In reply to by मुक्त विहारि

सरदार पटेल यांना डावलले गेले ह्याची खंत सरदार पटेल यांनी कुठे बोलुन दाखवली किंवा लिहून ठेवली आहे काय? सरदार पटेल हे काँग्रेस चे होते आणि काँग्रेस चेच राहिले.. Bjp ला असा चेहरा नसल्याने त्यांनी सरदार पटेल यांचा चेहरा घेऊन काँग्रेस वरच हल्ला केला आहे.. पण ते विसरतात, पटेल आणी नेहरू यात पंतप्राधन कोण होणार हे काँग्रेस ठरवणार होती, लोक नव्हे..आणि दोन्ही काँग्रेसचेच होते. आणि काँग्रेस ला पटेल यांच्या बद्दल आदर होता आणि आहेच.. उपऱ्या bjp ने आदर्शवादाचे धडे का द्यावे हा खरा प्रश्न... जसे अटल बिहारी का अडवानी, किंवा मोदी का कोणी इतर. आणि गृहमंत्रिपद हे डावलले गेले त्यांना मिळते काय?

In reply to by गणेशा

लोकांना भुलवायला भाजपाला सरदार पटेलांबद्दल पुतनामावशीचा पान्हा फुटत आहे ह्याच भाजपाने गुजरात मधील विमानतळाला सरदार पटेलांचे नाव देण्यास विरोध केला होता Shankersinh Vaghela, a former BJP chief minister of Gujarat, has revealed that the saffron party had once opposed renaming of Ahmedabad airport after Sardar Patel. Vaghela said that one should not have any impression that the BJP loved Sardar Patel. http://www.jantakareporter.com/india/bjp-once-opposed-naming-of-ahmedab…

मोदी सरकार की तर्फ से अजमेर दर्गा को सातवी चादर भेट की हर साल एक चादर देते है और भकतो को सतरंजी देते है

तेव्हापासुन जास्त वर्ष चोन्ग्रेस्स ची एक हाती सत्ता होती. तेव्हा जर योग्य कयदे केले असते, वेळेवर लोकसन्ख्या नियन्त्रण केले असते आणि सर्व धर्म सारखे वागवले असते तर ६० सालापासुन शिक्शित लोक भारता बाहेर जात आहेत ते गेले नसते. दाखवायला उदारमतवाद आणि प्रत्यक्श मात्र शेतकरि व कामगर यान्ची जास्त वाट लावली. खासगिकरण जास्त करुन सरकारने जर अनुशासन अनि तत्सम बाबीवर जास्त भर दिला असता तर भारत खुप चान्गल्या परिस्थितित असता. सन्गणक आले म्हणुन नोकर्या आल्या. मध्यम्वर्गिया परदेशी जाउन कमवु लागले. भारतात परदेशी चलन आले. नाहीतर चोन्ग्रेस्स च्या सगळ्या कार्भारात सरकारी शिक्शण सन्स्था कमी अणी खासगी सन्स्था म्हनजे पुढार्यान्ची चराउ कुरणे.. मध्यम्वर्ग वाचला तो परदेशी जाण्याची सोय झाली म्हणून.. चोन्ग्रेस्स म्हण्जे आइ जेवु घलिना आणि बाप भीक मागु देइना अशी अवस्था झाली होती मध्यम वर्गाची. परत कर भरणार तो हाच वर्ग... त्यान्ची उत्पन्न वाढली म्हणुन चोन्ग्रेस्स ला मिरवायला आणि खैरात करायला पैसे मिळाले.. चोन्ग्रेस्स चा डन्का वाजवताना हे लक्शात घेतले पाहिजे की त्याना ६० वर्श राज्य करायला दिले आहे. त्याची फळ भोगतो आहोताच. यात बदल हवा आहे आणि त्यासाठी वेगळ्या विचारसरणीचे सर्कार किमान ५० वर्श हवे आहे.

मानसिकता अक्शर्शा शहारे आणते. स्वातन्त्र्य काय फक्त नेहरु व गान्धी यान्च्यामुळे मिळाले आहे का? घराणेशाही का चालेल ? जितका सन्घ सन्कुचीत आहे तितके चोन्ग्रेस्स पण आहेच.. गान्धी कुटुम्बिया सोडुन कोणि का नाही नेत्र्रुत्व करु शकत चोन्ग्रेस्स चे? राजकारणात का कुटुम्बासाठी राखीव जागा असाव्यात? चोन्ग्रेस्स ला जर खरी सामाजिक समरसता आणायची असती तर आतापर्यन्त एकतरी पन्तप्रधान त्यानी मागास वर्गातुन आणला असता.. सन्घ काय आणि चोन्ग्रेस्स काय कोणीही मागास् वर्गिया नेत्रुत्व वाढु देणार नाही. उलट आधिच्या मतलबी धोरणामुळे नव्याने इतर जातीना आरक्शण द्यावे लागले.. ना आधिच्या सरकारकडे काही ठोस धोरण होती. ऊलट नको तश्या सवलती देउन सरकारी तिजोरीचा खडखडाट केला..कर्जाचा डोन्गर उभा केला. आणि लोकाना अडाणी व गरीब ठेवणे हेच चोन्ग्रेस्स व तत्सम पक्शान्चे ध्येय आहे. म्हणजे एक गठ्ठा मत मिळवणे सोपे.. एवढा गरिबान्चा पुळका होता तर कायदे कडक करायचे होते.तुम्हाला योग्य वातावरण देतो, कायद्याचे सरन्क्शण देतो कष्ट करा कमवा. ते केले नाही मोदिचे अन्ध्भक्त आहेत तर गान्धीचे मन्द गुलाम

लिंक हरयाणातील महिला काँग्रेस नेत्याच्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. विद्या देवी असे या महिला काँग्रेस नेत्याचे नाव आहे. केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन पुनर्जीवित करण्यासाठी पैसा आणि दारु पुरवा असे आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. हरयाणातील जींदमध्ये त्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होत्या. ह्यांचा हात, पिझ्झा पार्टी आंदोलकोंके साथ...

In reply to by सॅगी

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत. काहींना बॅन्काॅक प्रिय, तर काहींना, बाॅलीवूड.

In reply to by मुक्त विहारि

टीप : . व्यक्तिस्वातंत्र्य आणि मत मांडण्याचे स्वातंत्र्य मला आणि इतर सर्वांना आहे. त्या हक्काचा आदर करावा ही विनंती. सदर प्रतिसादात कोणतीही माहिती "चुकीची" असेल तर मिपाने लेख खुशाल उडवावा हिप्पोक्रसी म्हणजे काय - मोदींच्या परदेशदौर्यावर टीका करणारे राहुलजींच्या बँकॉक आणि थायलंड बद्दल चूप असतात. मोदी संपूर्ण कार्यक्रम जनतेसमोर ठेवतात तर हे बँकॉक मध्ये नेमके कुठे जातात ते सांगत नाहीत. मोदींच्या बायकोचे, त्यांच्या जुन्या व्यवसायाचे ( चहावाला ) अक्षरशः वाभाडे काढायचे पण वद्रा, सोनियाजी यांचे पूर्वाश्रमीचे व्यवसाय आणि धंदे काढले कि लगेच खाजगी आणि वयक्तिक गोष्टीत नाक खुपसले. म्हणजे तुमचे लाईफ म्हणजे खाजगी आणि मोदींचे लाईफ काय वाईल्ड लाईफ आहे का सारखं सारखं नाक खुपसायला. ? मोदींचा जॅकेट, मोर इत्यादी बद्दल लेखांचा किस पडायचा.. पण राहुल जी यांचे लाखोंचे किंमती पोशाख, जॅकेट, प्रायव्हेट जेट इ कुठून आले विचारले कि बिळात लपून बसायचे. मोदींनी जय श्री राम म्हणले कि कम्युनल. पण अल्लाह हूं अकबर म्हणणे.. आणि जाळीदार टोप्या घालून मिरवणे म्हणजे सेकुलर. मंदिरात पूजा करणे कम्युनल पण इफ्तार पार्ट्या झोडणे तेही सरकारी कार्यालयात.. म्हणजे सेकुलर. बुरखा प्रोग्रेसिव्ह.. पण डोक्यावरचा पदर हा गुलामीचे लक्षण. शिया, सुन्नी, अहमदिया, बोरखा हे सर्व मुस्लिम पण हिंदू आणि दलित वेगवेगळे.. लाखो बकरी, मुके प्राणी, बैल यांची कत्तल धार्मिक, पर्यावरण पोशक आणि सुंदर.. पण दिवाळी, दसरा , नागपंचमी, बैलपोळा, वटपौर्णिमा हे सगळं outdated आणि पर्यावरणासाठी हानिकारक. कारवाचौथ, वटपौर्णिमा इ स्त्री गुलामीचे लक्षण पण हलला, तीन तलाक, बहुपत्नीत्व सर्व काही सुंदर आणि प्रोग्रेसिव्ह. गणपती वेळी 4-5 दिवस गाणी वाजवणे कम्युनल. पण वर्ष्याच्या 365 दिवस मशिदीतून भोंगे वाजवणे म्हणजे सेकुलर. " अल्लाह शिवाय कोनताही दुसरा देव नाही आणि त्याच्याशिवाय दुसऱ्याला पुजणे म्हणजे पाप " असा संदेश मशिदीवरून सर्वांना ओरडून सांगणे म्हणजे सेकुलर. याला कोणी विरोध केला (सोनू निगम, अभिजित इ ) कि सगळे कम्युनल पण गणपतीत dj लावू नका म्हणणारे पुरोगामी. मोदींना मौत का सौदागर, भगवा आतंकी, mass murderer म्हणणे म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य.. पण सोनिया जी यांना त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नावाने म्हणजे " अँटिनियो माईनो " म्हणणे म्हणजे त्याचा अपमान आणि वयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ... 26/11, 1992, 1984, 1947, 1979-80 इ हे सगळं कम्युनल व्हायोलन्स. कोणताही काँग्रेसी किंवा सरकार त्याला जबाबदार नही.. कोणतीही सुप्रीम कोर्ट कमिटी किंवा चौकशी नाही.. पण 2002 मोदींनी घडवून आणले. मोदी जबाबदार. हर एक प्रकारच्या चौकशी मधून गेले, कुठेही कोणताही पुरावा नाही.. तरीही तेच जबाबदार. पण बाकी सगळ्या घटनांच्या वेळी कोणताही मुख्यमंत्री, पंतप्रधान जबाबदार नाही. कोणतीही ठोस चौकशी नाही. 2002 वर चर्चा आणि आरोप यांचा पाऊस पडायचा पण ते ज्यामुळे घडले ते गोध्रा हत्याकांड सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करायचे. Isis, लष्कर ए तोयबा, सिमी इ सर्व जिहादी संघटना यांचा इस्लाम शी घेणेदेणे नाही.. यांनी जगात कुठेही हल्ला केला तर लगेच.. दहशतवादास कोणताही धर्म नसतो, आणि रंग नसतो. पण जरा कुठेएखाद्या मुस्लिम व्यक्तीस खरचटले तरी लगेच भगवा दहशतवाद, हिंदू आतंकी असे शब्द शोधून काढायचे. जर हिंदू खरंच आतंकी असता तर भारत आज या परिस्थितीत नसता. त्याचे लचके तोडले गेले नसते. त्याच्या सहिष्णुतेचा, सर्वांना आपलेसे करण्याच्या स्वभावाचा आणि सहनशीलतेचा पुरेपूर गैरफायदा घेतला गेला आणि शेवटी त्यालाच कालप्रिट ठरवले जातेय. एक मंदिर जे कि हिंदू समुदायांने त्यांच्याच देशात मेजॉरिटी असून सुद्धा सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आणि तिथे मंदिरच होते ( पुरावा - archeology survey of india cha अहवाल ) हे सिद्ध करून पुन्हा ताब्यात घेतले. पण हजारो मंदिरे पाडली गेली , हजारो वर्ष्यापुर्वीचा वारसा असणारे स्टॅच्यू, मंदिरे, मुर्त्या जमीनदोस्त केली ते सर्व सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करायचे. त्यांना क्लीनचिट द्यायची. अगदी कालपरवा सुद्धा हजिया सोफिया बाबतीत हेच झाले. 26/11 चा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत होता हे गुप्तचर आणि तपास संस्था यांनी सिद्ध केले, कसाब जिवंत पकडला गेला. त्याने आपल्या जबाबात सर्व काही उघड केले पण तरीही मुद्दामहून याचा संबंध RSS शी जोडून हिंदूंना चिथावणी द्यायची. त्यांना विनाकारण आरोपी च्या पिंजऱ्यात उभे करायचे. हिंदू कसा आतंकवादी आहे हे खोटी उदाहरणे देऊन दाखवून द्यायचे. पुस्तके छापायची.. आरक्षण ही एक टेम्पररी व्यवस्था आहे हे प्रत्यक्ष बाबासाहेबांनी सांगितले तरीही त्याचा उपयोग वोट बॅक राजनीतीसाठी करणे ही प्रथा काँग्रेस ने सुरु ठेवली. आज त्या प्रथेचे लॉन्ग टर्म परिणाम भोगतोय. कोणताही पक्ष आता आरक्षणाला धक्का लावू शकत नाही. उलट दिवसेंदिवस सर्वच जाती आरक्षण मागायला लागलेत. हे 30-40 वर्ष्यापुर्वीच्या चुकीच्या पॉलिसी इम्प्लेंट केल्याचे परिणाम आहेत. या सर्व कारणामुळे मी कधीही माझ्या आयुष्यात काँग्रेस आणि तत्सम विचारसरणी असलेल्या व्यक्तीला मत देत नाही. पण याचा अर्थ असा नव्हे कि भाजपा किंवा संघ यांचा एजेंट आहे. योग्य ठिकाणी मी त्यांचाही समाचार घेतच असतो.

In reply to by बाप्पू

आरक्षण टेम्पररी आहे , असे आंबेडकर बोलले होते म्हणे 30 वर्षात आरक्षण सम्पवले नाही म्हणे 10000 वर्षे जातीव्यवस्था काँग्रेसने किंवा आंबेडकरांनी चालवली होती की काय ? ते 10 वर्षे बोलले म्हणून 10 च वर्षे रहायला ते काय ज्योतिषी होते का ? तसे तर मोदीही बोललेत , सौ दिन दो , झाले 100 दिवसात ? वदरा , सोनिया ह्यांचे कोणते जुने धंदे बेकायदेशीर होते ?

In reply to by काळे मांजर

म्हणे..
10000 वर्षे जातीव्यवस्था काँग्रेसने किंवा आंबेडकरांनी चालवली होती की काय ?
१०००० वर्षे असो किंवा १० करोड वर्षे असो...कायदे करून अनुचित व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सरकारचेच असते ना?

In reply to by काळे मांजर

मग ६० वर्षे काँग्रेसने जे राज्य केले तेव्हाची त्यांची जबाबदारी काय? देशाला लुटायची का?? राम मंदिराची काळजी तुझ्यासारख्यानी करायची काही गरज नाही. आधी स्वतःचा शांतताप्रिय धर्माची काळजी कर...

In reply to by सॅगी

भाजपच्या 15 वर्षात एकही काँग्रेसी तुरुंगात गेला नाही , उलट काँग्रेसचे लोक भाजपात जाऊन आमदार खासदार झाले आणि म्हणे काँग्रेस भ्रष्ट

In reply to by सॅगी

आमच्या काँग्रेस वाल्यानी वेगळ्या जातीधर्मात तसेच आंतरराष्ट्रीय लग्ने केली आणि मुलांवर चांगले संस्कार केले अजून काय उदाहरण देशासमोर ठेवायला हवे होते ? कायदा करून बळजबरीने अंतरजातीय लग्ने लावायची होती का ?

In reply to by काळे मांजर

कसले संस्कार म्हणे? आंदोलकांना दारुचा पुरवठा करण्याचे संस्कार? की सैनिकांची मुंडकी पाकड्यांनी छाटल्यावर त्यांना प्रतिकार करण्यासाठी परवानगी न देण्याचे संस्कार? की मिलीटरीसाठी साधनसामुग्री खरेदी न करण्याचे संस्कार?
अजून काय उदाहरण देशासमोर ठेवायला हवे होते ?
पप्पुराजांचे उदाहरण आधीच आहे, अजून काय उदाहरण ठेवणार आहेत??

In reply to by सॅगी

आमच्या काँग्रेसने सर्व जनतेला स्वातंत्र्य दिले इंदिराबाईंनी 91000 पाकडे पकडले होते , एवढे शत्रू पकडायला मोदी शहाना 100 वर्षे लागतील

In reply to by काळे मांजर

आणी मग स्वातंत्र्य मिळाल्यावर
आंदोलकांना दारुचा पुरवठा करण्याचे संस्कार? की सैनिकांची मुंडकी पाकड्यांनी छाटल्यावर त्यांना प्रतिकार करण्यासाठी परवानगी न देण्याचे संस्कार? की मिलीटरीसाठी साधनसामुग्री खरेदी न करण्याचे संस्कार?
हे अगाध संस्कार दिले..पप्पुशेठसारखे गिफ्ट पण दिले नाही का?

In reply to by काळे मांजर

व्यवस्था बदलायला चाललाय !
कोणी सांगितले मी व्यवस्था बदलायला चाललोय? प्रतिसाद नीट वाचला का? की तुमच्या चष्म्याचा फिल्टर हिरवेपणाकडुन काळेपणाकडे झुकतोय??

In reply to by काळे मांजर

10000 वर्षे जातीव्यवस्था काँग्रेसने किंवा आंबेडकरांनी चालवली होती की काय ?
हे 10, 000 हा आकडा कुठून आला . ? काही पुरावा? आणि तुमचा आकडा खरा 10, 000 म्हणत असाल तर हिंदू धर्म किमान 10, 000 वर्षे जुना आहे हे मान्य करताय तुम्ही. . म्हणजे तुमच्या जन्माच्या आधी देखील हिंदू होते. आज स्वघोषित बाबर, हुमाँयू, अकबर आणि औरंगजेब पुत्र पण कधीकाळी हिंदूच होते हे मान्य करताय का मग?? कारण तुम्हाला फक्त 1400 वर्ष्याचा वारसा आहे. त्याआधीही जग आणि हिंदू धर्म होता हे मान्य करताय ना.. .. नाही तुम्ही 10, 000 असा आकडा सांगताय म्हणून विचारावे वाटले. . असो आणि खाली कोणलाही जातीवाचक आणि एकेरी नावाने तुम्ही कस काय बोलायताय?? तुम्हाला हे लायसन्स कोणी दिले?

In reply to by बाप्पू

10000 वर्षांपूर्वी हे होते , ते नव्हते ह्यातून काय दगड ज्ञान मिळते ? 10000 वर्षांपूर्वी केळीची पाने होती , रिलायन्सची कापडगिरणी नव्हती , मग आता काय रिलायन्सची गिरणी मोडून केळीची झाडे लावणार का ?

In reply to by काळे मांजर

नक्कीच नाही. केळीची साले नाही लावणार पण आम्ही केळीची साले वापरात होतो आणि काळासोबत इवोल्व होत आज कापड वापरतोय असा दावा नक्कीच करेल. पण आम्ही जगाच्या निर्मितीपासून कापड वापरतोय.. कापडाचा शोध आम्हीच लावला.. आम्हीच श्रेष्ठ दुसरे सगळे बावळट ( काफिर ) असा भंपक दावा करणार नाही.

बिहार युपी ला आपण नावं ठेवतो. किबोर्ड नी एकमेकांशी हमरीतुमरीवर येतो. असं एक्स्प्रेस हायवेवर यायचा विचार तरी करू शकतो का? https://www.loksatta.com/pune-news/pune-gangster-gajanan-marne-rally-fr…

In reply to by झेन

अहो एवढच नाही टोल न भरता गेलेत एक्सप्रेसवेवरून

गांधी खानदांचा पंतप्रधान होऊन 30 वर्षे उलटून गेली आहेत त्यात भाजपाचीही 12 वर्षे आहेत तरी अजून गांधी मरत नाही

घडामोडींचा धागा.. पण घडामोडींबद्दल माहिती मिळण्यापेक्षा हेवेदावे/स्कोर सेटलिंग्/जाणीवपूर्वक चिथावणीखोर प्रतिक्रिया असंच जास्त दिसतं. १०० प्रतिसादांत १० सुद्धा नवीन काही माहिती देणारे दिसत नाहीत.

In reply to by राघव

दुर्दवाने सहमत आहे. त्यासाठी काही विशिष्ट आय.डी विनाकारण कुरापत काढायला जे प्रतिसाद देत आहेत त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे आणि त्यांना अनुल्लेखाने मारावे हे सर्वच सदस्यांना (माझ्यासकट) आवाहन.