भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला आहे. या दौर्यात भारत ३ एकदिवसीय सामने, ३ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळेल. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) -
एकदिवसीय सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २७ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे
दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २९ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे
तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - बुधवार २ डिसेंबर सकाळी ९:१० वाजता कॅनबेरा येथे
ट-२० सामने
पहिला सामना - शुक्रवार ४ डिसेंबर दुपारी १:४० वाजता कॅनबेरा येथे
दुसरा सामना - रविवार ६ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे
तिसरा सामना - मंगळवार ८ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे
कसोटी सामने
पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - गुरूवार १७ डिसेंबर सकाळी ९:३० वाजता अॅडलेड येथे
दुसरा सामना - शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे
तिसरा सामना - गुरूवार ७ जानेवारी पहाटे ५:०० वाजता सिडने येथे
चौथा सामना - शुक्रवार १५ जानेवारी पहाटे ५:०० वाजता ब्रिस्बेन येथे
या व्यतिरिक्त भारतीय दोन सराव सामने सुद्धा खेळणार आहे.
या मालिकेत भारत प्रथमच गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र चालणारा कसोटी सामना खेळेल. तसेच कॅनबेरा येथे कदाचित भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.
भारताने दोन वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये प्रथमच कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारताला विजय काहीसा सोपा झाला होता. परंतु यावेळी दोघेही संघात आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील सर्व ४ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. नंतर २०१७ मध्ये भारतात झालेल्या मालिकेतील ४ पैकी ३ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. यावेळीही स्मिथ व वॉर्नर भारताला त्रासदायक ठरणार हे नक्की. त्यांच्या जोडीला मागील वर्षीच पदार्पण केलेला जबरदस्त फलंदाज लाबूशेन व शॉन मार्श असतीलच. स्टार्क व फिरकी गोलंदाज नेथन लॉयन नेहमीच भारताविरूद्ध चांगली कामगिरी करतात. त्यांच्या बरोबर पॅट कमिन्स व हॅझलवूड हे दोन चांगले गोलंदाज आहेत.
ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीनिशी असताना भारताची ताकद कमी असणार आहे. कोहली फक्त पहिल्या कसोटीपर्यंत असेल व नंतर तो भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणे कर्णधार असेल. रोहीत शर्मा व ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर उपलब्ध असतील. त्यामुळे भारतीय संघाची ताकद कमी असणार आहे. फलंदाजीचा बहुतांशी भार मयंक, पुजारा व रहाणेवर असेल, तर बुमराह, शमी व चहलवर गोलंदाजीचा सर्वाधिक भार असेल.
एकंदरीत भारताला हा दौरा सोपा नसणार हे नक्की.
यापूर्वी १९७८ मध्ये, १९८६ मध्ये व २००४ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आली होती. परंतु ते जमले नाही. २०१८-१९ मध्ये मात्र भारताने कसोटी मालिका जिंकून दाखविली. यावेळी सुद्धा भारत जिंकावा अशीच इच्छा आहे.
२७ नोहेंबर पासूनच आफ्रिकेत इंग्लंडविरूद्ध व न्यूझीलंड मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध मालिका सुरू होत आहे.
प्रतिक्रिया
डे नाईट टेस्ट
हो. भारताबाहेर पहिल्यांदाच
२००४ मध्ये बकनर नावाचा धटिंगण
स्टीव्ह बकनरच्या लीलांवर मी लेख लिहीलेला आहे ऑलरेडी.
येस्स, पूर्वी वाचला होता आणि
मॅरेनस लबुशेन - मूळ दक्षिण
२००४ मध्ये बकनर नावाचा धटिंगण
छान माहिति
पृथ्वी शॉ ला कसोटीत संधी
नको. सध्या तो अत्यंत वाईट
बकनर २००४
बकनर पक्षपाती होतेच. पूर्वी
वेळ
सर्व एकदिवसीय सामने दिवस
सिडनी वेळ
हो. नोव्हेंबरच्या पहिल्या
सर्व एकदिवसीय सामने दिवस
ताजा कलमः इंग्लंडच्या
काही तरी गल्लत होते आहे का?
क्षमा करा
बरोबर आहे. भारतीय वेळेनुसार
आज ऑस्ट्रेलियन फलंदाजानी,
ईथे रोज अपडेट आणि सामन्याचे
भारतीय गोलंदाजाची प्रचंड
८०/३ (९.५)
राहुल गेला. १०४/४ (१४).
आता मॅच
भारताच्या गोलंदाजांची पिसे
उद्या सकाळी ९:१० वाजता सिडने
ऑस्ट्रेलिया ६६/० (१०.२)
२१८/२ आपल्या खेळांडूच्या
२९२/२ (४१.१)
३९० चे टारगेट आहे आज.
दुसऱ्या सामन्यातही पराभव.
सराव सामने
नाही
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात
५० षटकांंत
धवनने स्लिपमध्ये फिंचचा सोपा
सामना रंगतदार स्थितीत आहे.
२७८/८ (४७)
२७९/९ (४७.१)
भारत जिंकला. ऑस्ट्रेलिया
पैसा पैसा पैसा पैसा पैसा पैसा पैसा पैसा पैसा पैसा पैसा पैसा पैसा
श्रीगुरुजी म्हणायचं होतं.
पहिला ट-२० सामना
भारताने ११ धावांनी सामना
तुमचा अंदाज बरोब्बर आला.
रविंद्र जडेजाला फलंदाजीत
सध्या ट २० मधून बाहेर
Pagination