Skip to main content

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 25/11/2020 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला आहे. या दौर्‍यात भारत ३ एकदिवसीय सामने, ३ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळेल. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) - एकदिवसीय सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २७ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २९ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - बुधवार २ डिसेंबर सकाळी ९:१० वाजता कॅनबेरा येथे ट-२० सामने पहिला सामना - शुक्रवार ४ डिसेंबर दुपारी १:४० वाजता कॅनबेरा येथे दुसरा सामना - रविवार ६ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे तिसरा सामना - मंगळवार ८ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे कसोटी सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - गुरूवार १७ डिसेंबर सकाळी ९:३० वाजता अ‍ॅडलेड येथे दुसरा सामना - शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे तिसरा सामना - गुरूवार ७ जानेवारी पहाटे ५:०० वाजता सिडने येथे चौथा सामना - शुक्रवार १५ जानेवारी पहाटे ५:०० वाजता ब्रिस्बेन येथे या व्यतिरिक्त भारतीय दोन सराव सामने सुद्धा खेळणार आहे. या मालिकेत भारत प्रथमच गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र चालणारा कसोटी सामना खेळेल. तसेच कॅनबेरा येथे कदाचित भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारताने दोन वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये प्रथमच कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारताला विजय काहीसा सोपा झाला होता. परंतु यावेळी दोघेही संघात आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील सर्व ४ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. नंतर २०१७ मध्ये भारतात झालेल्या मालिकेतील ४ पैकी ३ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. यावेळीही स्मिथ व वॉर्नर भारताला त्रासदायक ठरणार हे नक्की. त्यांच्या जोडीला मागील वर्षीच पदार्पण केलेला जबरदस्त फलंदाज लाबूशेन व शॉन मार्श असतीलच. स्टार्क व फिरकी गोलंदाज नेथन लॉयन नेहमीच भारताविरूद्ध चांगली कामगिरी करतात. त्यांच्या बरोबर पॅट कमिन्स व हॅझलवूड हे दोन चांगले गोलंदाज आहेत. ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीनिशी असताना भारताची ताकद कमी असणार आहे. कोहली फक्त पहिल्या कसोटीपर्यंत असेल व नंतर तो भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणे कर्णधार असेल. रोहीत शर्मा व ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर उपलब्ध असतील. त्यामुळे भारतीय संघाची ताकद कमी असणार आहे. फलंदाजीचा बहुतांशी भार मयंक, पुजारा व रहाणेवर असेल, तर बुमराह, शमी व चहलवर गोलंदाजीचा सर्वाधिक भार असेल. एकंदरीत भारताला हा दौरा सोपा नसणार हे नक्की. यापूर्वी १९७८ मध्ये, १९८६ मध्ये व २००४ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आली होती. परंतु ते जमले नाही. २०१८-१९ मध्ये मात्र भारताने कसोटी मालिका जिंकून दाखविली. यावेळी सुद्धा भारत जिंकावा अशीच इच्छा आहे. २७ नोहेंबर पासूनच आफ्रिकेत इंग्लंडविरूद्ध व न्यूझीलंड मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध मालिका सुरू होत आहे.

वाचने 80830
प्रतिक्रिया 272

प्रतिक्रिया

माझ्या लहानपणापासून भारतीय गोलंदाजी कमकुवत असल्याची रड सतत चालू असे. यावेळेस मात्र गोलंदाची अतिशय तिखट आहे. अगदी पहिल्या कसोटीतही गोलंदाजी व्यवस्थित होती. जर शंभरेक धावा आजून मिळाल्या असत्या तर गोलंदाजांनी यजमानांना २०० च्या आत उखडायचा कसोशीने प्रयत्न केला असता. या कसोटीतही गोलंदाजी एकदम धारदार व सफाईदार होती. क्या जमाना सचमुच इतना सारा बदला है? -गा.पै.

अभिनंदन!! पुढच्या दोन्ही कसोटी जिंकण्यास शुभेच्छा!! एक मजेशीर ढकल या निमित्ताने... अजिंक्य रहाणे बाबत उद्याचे मुखपत्र 1. अजिंक्यने "करून दाखवले" 2. ऑस्ट्रेलिया को "उखाड दिया" 3. सामनावीर अजिंक्यने कांगारूंचा "कोथळा काढला" 4. लक्षात ठेवा, भारतीय संघ कोणाच्या बापाचा नाही 5. शेवटी विजयी कप्तान महाराष्ट्राचाचं 6. महाराष्ट्राच्या नेतृत्वाशिवाय देशाला गत्यंतर नाही 7. अजिंक्य राहण्यासाठी महाराष्ट्र नेहमीचं दिशादर्शक 8. कांगारूंनो सावधान : आ देखे जरा किसमे कितना हैं दम 9. मराठी रहाणे समोरून वार करतो 10. मर्द मराठा रहाणे 11. एकट्या रहाणेने 11 ऑस्ट्रेलियन घरी बसवले 12. जगातील बेस्ट कप्तान 13. कांगारूरुपी गिधाडांनो रहाणे तुमचा बाप आहे 14. हीच ती वेळ : रहाणेचे कौतुक करण्याची 15. पुढील 50 वर्षे अजिंक्यचं राहणार कप्तान #IndvsAus2020 #अजिंक्य #राहणे #रहाणे #कोणाचाराहणेतरकोणाचारहाणे

जिंकलो असलो तरी संघात काही बदल हवेत अगरवाल = रोहित शर्मा विहारी = के एल राहुल हे बदल गरजेचे आहेत.

In reply to by कपिलमुनी

सहमत उमेश यादवची दुखापत गंभीर असेल तर नवदीप सैनी किंवा नटराजनला संधी मिळू शकते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

स्विंग ला मिळणारी मदत बघता नटराजनला संधी मिळायला हवी

In reply to by कपिलमुनी

उमेश तिसर्या सामन्यात खेळु शकणार नाही आहे त्याबदली नटराजन उत्तम पर्याय वाटतो.

In reply to by श्रीगुरुजी

बरोबर आहे, पण बदली खेळाडू म्हणुन तो आत येऊ शकतो. तो अजुन ऑस्ट्रेलियामधेच आहे. बातमी

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सैनी उमेश ची जागा भरुन काढतोय लय धावा देउन राहीलाय. रोहीत व गील सुरुवातील खेळत असताला वाटत होते की दोघांपैकी एक तरी १०० करेल.असो.. ऑस्ट्रेलियन गोलंदाजिच्या तुलनेत आपली गोलंदाजी कमकुवत आहे. त्यामुळे फार अपेक्षा न ठेवलेलच बरं. २/१.

आज, पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा ऑस्ट्रेलिया २ बाद १६६ वर आहे. त्या ऋषभ पंतला कश्याला घेतलेय टिम मधे काही कळायला मार्ग नाही. त्यांने आज विलो पुकोव्हस्कीचे दोन कॅच सोडले.

In reply to by प्रसाद_१९८२

फिरकी गोलंदाज गोलंदाजी करत असताना पंतला यष्टीमागे चेंडू अडविण्यात व झेलण्यात अडचण येतेय. मागील कसोटीत सुद्धा पहिल्या डावात पंतने बऱ्याच बाईज दिल्या होत्या.

In reply to by श्रीगुरुजी

यष्टिच्याजवळ अंदाजपंचे विकेटकिपरिंग सुरुय त्यांचं, अकीबात आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू वाटत नाही. आजचा खेळ संपेपर्यन्त ५ विकेट्स तरी पड़ायला पाहिजे होत्या. असो. उद्या काही उजेड पडेल अशी अपेक्षा करूया...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ESPNcricinfo's logs revealed that Pant has dropped nine of the 20 catches that have come his way off spin bowling in Test cricket. https://www.espncricinfo.com/story/aus-vs-ind-3rd-test-r-ashwin-s-fortu…

पावसाने मदत केली नाही तर भारतीय संघाचा दारुण पराभव. पंत, पांड्या हे अती ओव्हर रेटेड खेळाडू आहेत.

In reply to by तुषार काळभोर

हे मर्यादित षटकांच्या सामन्यांचे खेळाडू आहेत. पंड्या तसा बराचदा चांगला खेळलाय. पण पंत क्वचितच खेळतो.

Aus ३१५/९ अजुन १० एक धावात गुंडाळले पाहिजे. नियमित गोलंदाजापेक्षा रवीन्द्र जडेजाने चांगली गोलंदाजी केली. चार विकेट्स मिळवील्या. अश्विनचा कुंबळे व्हायला लागला आहे, नुसते थकने. बुमरा आणि सैनीने दोन विकेट्स घेतल्या. सिराजला एक विकेट्स मिळाली. शेवटची जोड़ी, अधिक धावा जोड़तील आणि ते बादही होतील. भारताची फलंदाजी बघण्यास उत्सुक आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज स्मिथची फलंदाजी १३१ अतिशय उत्तम होती, जड़ेजाने त्यास जबरा धावबाद केले परंतु तो पर्यन्त Aus ला त्याने एका मजबूत स्थीतीत नेले आहे, लाबुशिंगी ९१ आणि पुकोवस्की ६१ या तिघांनी उत्तम स्कोर केला. संघाला ३३८ धावांवर पोहोचवले. आता भारतीय फलंदाजी पाहणे आहे, भारताच्या पहिल्या तासात फलंदाजी कशी राहील त्यावर आपला स्कोर लक्षात येईल. पहिल्या तासात दोन-तीन विकेट्स गेल्या तर आपल्यावर प्रेशर राहील. -दिलीप बिरुटे

रोहित शर्मा आणि गिलने सुरुवात केलीय. चहा-पानाला दहा मिनिटे बाकी आहेत... आज दोघे चांगले फलंदाजी करतील अशी अपेक्षा करतो, विशेष घड़ामोडीनंतर पुन्हा धाग्यावर हजर होईन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजच्या दिवसाच्या खेळ संपला तेव्हा भारताने रोहीत शर्मा आणि गील अनुक्रम २६ आणि ५० वर गमावून ९६ धावा केल्या आहेत. खरं तर दोघेही चांगले खेळत होते, विकेट्स पडाव्यात असे ते चेंडू नव्हतेही असे वाटते. बाकी राहिलेली षटके पुजारा आणि राहणे यांनी कन्हत कन्हत काढली, उद्या किमान २०० धावा होईपर्यन्त हे दोघे टिकले तर आपण सामन्यात टीकू असे वाटते. -दिलीप बिरुटे

सामना अनिर्णित होईल बहुतेक. फलंदाजांची खेळपट्टी आहे. खेळपट्टीकडून गोलंदाजांना फारशी मदत दिसत नाही.

आज ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनच्या ४० व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर ,ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अजिंक्य रहाणेविरोधात एक अपील केली. त्यावेळी पंचांनी राहाणे नाबाद असल्याचा निर्णय दिला, यावेळी डिआरएस घेण्याचा वेळ देखील संपला होता. तरिही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी डिआरस घेतला व त्यातही राहाणेला नाबाद घोषीत केले. असे वेळ संपल्यावर डिआरएस घेणे नियमाला धरुन आहे का ?

मंडळी, अशा त-हेने ७ गड़ी गमावून आपण २०७ धावा केल्या आहेत, आपलं शेपूट वळवळत आहे. आपण सव्वादोनशे अड़ीचशे पर्यन्त खेळतो म्हणजे १०० एक धावांची आघाडी त्यांना मिळेल. त्यांनी अजुन दोनशे धावा केल्या तरी आपल्याला आपलं मरण पाहणे आहे असे वाटते. -दिलीप बिरुटे

भारताचे तीन फलंदाज धावबाद झाले ही एक विषेश नामुष्की दिसली भारताने सर्वबाद २४४ अशी संख्या झाली. आता एकूण ९४ धावांची आघाडी ऑष्ट्रोलियाने घेतली आहे, आता अजून किती धावा करतात आणि भारताला फलंदाजी देतात ते पाहणे रोचक ठरणार आहे, मला पराभव धुसर धुसर दिसतोय. विशेष घडामोडीनंतर धाग्यावर हजर असेनच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसोटी क्रिकेटमध्ये ३ फलंदाज धावबाद होणं हे अक्षम्य आहे. पराभव नक्कीच आहे, किती आणि कितीने लांबवतात हे फक्त बघणे आहे :)

In reply to by प्रचेतस

धावसंख्या पुरेशी नसतांना जवाबदारीने खेळलं पाहिजे, गल्ली क्रिकेटमधे एकवेळ असे समजू शकते परंतु आंतरराष्ट्रीय सामन्यांमधे असा बेजवाबदारपणा योग्य नाही असे वाटते, बाकी आपल्या मताचा पूर्वीपासून आदर आहेच. ऑस्ट्रेलिया २ बाद ४१.

वल्ली, हा बेजवाबदारपणा २०१४ नंतर फार वाढला आहे, असे माझे (खोडसाळ) मत आहे. ;)

-दिलीप बिरुटे

पराभव होईल असं आता चिन्ह आहे. पंतच्या जागी साहा यष्टीरक्षण करतोय. पंतला scanning साठी नेलंय. दुखापत बऱ्यापैकी गंभीर असावी.

In reply to by श्रीगुरुजी

पंत ओव्हररेटेड खेळाडू वाटला नाही का कधी तुम्हाला?

In reply to by किसन शिंदे

तो ओवहररेटेडच आहे. त्याची फलंदाजी बरी आहे, पण यष्टीरक्षण कौशल्य फारसे चांगले नाही.

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी जर चमत्कार केला किंवा पावसाची साथ मिळाली तर काही आशा आहेत. माझ्यामते सामना गेल्यात जमा आहे. स्मिथला शेवटी सूर गवसला ही चौथ्या सामन्यासाठी पण धोक्याची घंटा आहे. त्याला बाद करायला प्लॅन आणि विशेष प्रयत्न करायलाच हवेत. हनुमा विहारी साठी पुढचा डाव शेवटची संधी असावा.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आपली सध्याची फलंदाजी देवभरोसे आहे, एकही फलंदाज रोहीतशर्मा आणि पुजारा सोडला तर खेळपट्टीवर चिकाटीने उभा राहणारा फलंदाज मला नावच घेता येणार नाही. गील आणि अजिंक्य राहणे आहेत पण त्यांच्यावर कोण विश्वास ठेवेल. बाकी, लॉटरी सारखं, लागली तर लागली. पण एकेकाने पन्नास पन्नास धावा केल्या आणि आणि एखाद्याने शतक केले तर वाचू, नाय तर, कर चले हम फिदा ऐ वतन साथीयो. उद्या पहाटे, झोपेचं खोबरं करुन सकाळी सामना पाहणे आहे. देवा, माझा तुझ्या कार्यकर्तुत्त्वावर भारतीय फलंदाजीसारखा विश्वास नै, पण काही तरी चमत्कार कर आणि उद्या भारतीयांची इज्जत ठेव भो. १०० ग्राम पेढे वाटेन. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१०० ग्राम काय, १०००० ग्राम पेढे वाटले तरी कोणी कै चमत्कार करणार नै, तस्मात पहाटे उठून झोपेचं खोबरं करुन घेऊ नका. झोपा भो, उठल्यावर ऑस्ट्रेलियाची आघाडी ३५० पार झालेली दिसेलच ;)

In reply to by प्रचेतस

वल्ली सर, आपल्या शब्दाबाहेर नाही. थेट आठवाजता स्कोर पाहीन. मग टीव्ही लावतो. आपण म्हणता तसे भला मोठा स्कोर दिसू नये असे मनोमन वाटते. सकाळी सकाळी मूड खराब होतो. तुम्ही बघा ना एखाद्या जागृत देवस्थान अथवा देवाला साकडं घालुन. आपल्याला फरक पडण्याशी मतलब. -दिलीप बिरुटे (क्रिकेट फॅन)

ऑष्ट्रेलियाने मजबूत आघाडी घेतली आहे, लाबूसेठ ७३, स्मिथ ८१ क्यामरॉन ७४ वर खेळतोय तर टीम ३९ वर खेळतोय ३०१ धावां३०१ धावांवर पाच फलंदाज बाद झाले आहेत एकूण ३९५ धावांची आघाडी घेतलीय आपला पराभव निश्चितच.....असे वाटत आहे. पण क्रिकेटमें कुछ भी हों सकता है. -दिलीप बिरुटे

चारशे सात धावांचं लक्ष्य पार करण्याचे आव्हान भारतास दिले आहे. आपल्या समोर संकटेच उभे आहेत. एक तर सामना ड्रॉ करणे हा पर्याय आहे, खेळपट्टी स्लो आहे, धावा येऊ शकतात. रोहीत शर्मा , गील, पुजारा, यांना धीटपणे उभे 'राहणे' आहे. गील आणि शर्मा खिंडीत उभे आहेत. भारताची धावसंख्या चार आहे. सामना मस्त मोडमधे आलाय सामन्याच्या घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही टीव्हीवर आणि मिपावर पडीक असू. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजूनही तुम्ही आशेवर आहात? मिपा आणि भारतीय संघाचं काहीच सांगता येत नाई, कधीही डाऊन होऊ शकतात :)

In reply to by प्रचेतस

मा.मिपा मालक आणि मिपाचं तांत्रिक काम बघणा-यांना विनंती की प्रचेतस आयडीस काहीकाळ डाऊन करण्यात यावं ही नम्र विनंती. वल्ली कोण बघतं रे हल्ली हे तांत्रिक काम.... ! ;) भारतीय संघ चांगला खेळतोय. धपाधप चेंडु पायावर आदळत असले तरी धावाही होत आहेत, निव्वळ बचावात्मक पवित्रा घेतला आहे असे दिसत नाही. नैसर्गिक खेळी केली तर सामना वाचू शकतो. पंचांनी रोहीतला बाद दिल्यावर चहा घेता घेता जर चटका बसला होता, रिव्ह्यू घेतल्यामुळे वाचला बरं वाटलं. भारत बीनबाद २०. धन्यवाद.

रविवार किंचित ढगाळ तापमान २७/१८ सोमवार स्वच्छ सूर्यप्रकाश तापमान २६/१८ क्रिकेट खेळायला उत्कृष्ट! आतापर्यंत तीनहून कमी धावगती होती. शेवटच्या चार सेशन्स मध्ये चार धावगती शक्य नाहीये.

In reply to by तुषार काळभोर

उद्या विजयासाठी ९७ षटकांत ३०९ धावा हव्या. आवश्यक धावगती प्रतिषटक ३.१९ धावा.

रोहित, गिल, पुजारा, रहाणे, जडेजा, साहा, हनुमा/ मयंक/ पृथ्वी (!), बुमराह, आश्विन, शार्दुल, सिराज ** हनुमा/ मयंक/ पृथ्वी (!) एकाला झाकावा आणि एकाला काढावा अशी स्थिती आहे. त्यातल्या त्यात मयंक बरा आहे का? के एल राहुल ची उणीव जाणवतेय.

आपली सलामीची जोडी चांगली खेळत होती. एका आत येतोय असे वाटणा-या चांगल्या चेंडूवर गीलच्या ब्याटीचा हलकासा कीस घेऊन चेंडु विकेट किपरच्या ग्लोव्हज मधे स्थीरावला. प्रतिसाद लिहितच होतो की पुजाराला पायचितच्या निर्णयावर बाद देण्यात आलं पण रिव्हूमुळे वाचला. भारतीय संघ एक बाद ७१ या जोडीने किमान दीडशेपर्यंत संघाला घेऊन जावे. रोहीत ३९ धावावर चांगला खेळतोय. गीलही ३१ धावा काढून बाद झाला. पालथे आहेत साले, बाकी काय. -दिलीप बिरुटे

ऑस्ट्रेलिया ची योजना सरळ दिसते आहे. त्यांनी लाईन ऑफ स्टंप वर ठेवली आहे. मारा पायावर चालला आहे. मधूनच अचानक बाहेर जाणारा आणि थोडा वर येणारा बॉल टाळून खेळत राहणे कठीण असतेच.. त्यात ते अगदी स्टंपला चिकटून बॉलिंग करताहेत. शिस्तबद्ध माऱ्याने दबाव निर्माण होत जातो. दबाव झुगारून खेळणे प्रत्येक खेळाडूला शक्य होत नाही. राहूल खूप गरजेचा होता. पहिल्या चार पैकी दोघांनी मोठी खेळी खेळली तरच काही होऊ शकेल. अशावेळेस सेहवाग सारखा माणूस एकटाच 100 धावांचा फरक करून टार्गेट जवळ आणून ठेवतो. :-)

In reply to by राघव

डिसेंबर २००८. भारत - इंग्लंड कसोटी. टार्गेट ३८७ सेहवाग ८३(६८ चेंडू)

क्रिकेट रंगतदार अवस्थेत पोहचला आहे, रोहीत, गील आणि राहणे च्या नंतर पंत आणि पुजाराने डाव सांभाळला आहे, ३ बाद २०२ धावा झाल्या आहेत जिंकायला २०५ धावा आहेत. पंत ७३ तर पुजारा ३७ धावावर खेळतोय. हार जीत होत राहील पण लढले पाहिजेत, सामना पहातांना मजा येत आहे. -दिलीप बिरुटे

पंत आणि पुजारा जोडीने भारतीय संघाला विजयाच्या वाटेवर आणला आहे. पण दुर्दैवाने पंत ९७वर बाद झाला. २५०/४, पुजारा रॉक सॉल्लिड ५८ अजून अंदाजे 50 षटकात दीडशे धावा. पुजराची जबाबदारी अजून वाढली आहे.

In reply to by तुषार काळभोर

अतिशय रोमांचकारी सामना होतोय. पंत, अजिबात वाटला नाही की बाद होईल. अतिशय उत्तम आत्मविश्वासाची फलंदाजी सुरु होती. पुजारा आणि पंतांनी आपल्याला विजयाचे स्वप्न दाखवले. काल पुजाराला बाद दिल्या गेलं तेव्हा त्याने जरासं चिडून रिव्हू घेतला तेव्हा असे वाटले की मुझे रन बनाना है असा त्याचा अ‍ॅटीट्युड वाटला होता आणि तो ते खरं करुन दाखवतोय. पुजारा ७० (आत्ता लागोपाठ तीन चौकार अहाहा जबरा) आणि हनुमा विहारी शुन्यावर खेळतोय. पन्नास षटकांचा सामना बाकी आणि जिंकायला हवे १४५ धावा. थँक्स पंत उत्तम फलंदाजीबद्दल....मजा आग गया. -दिलीप बिरुटे

In reply to by तुषार काळभोर

आता परिस्थिती पाहता आपण सामना ड्रॉ जरी केला तरी आपला विजय झाला असेच म्हणू या. आता मागे फक्त जडेजा उरला आहे. अश्विन आणि विहारी हे किती टाइमपास करतात माहिती नाही. अजून ३७ षटकांचा खेळ बाकी आहे. एकवेळ जिंकण्याकडे वाटचाल सुरु होती असे वाटत होते. आता मॅच ड्रॉ जरी झाला तरी आपण जिंकलो असे म्हणू.... फोकलीचे पीचवर उभे राहीले पाहिजेत. चहापानाची वेळ झाली आहे. २८० / ५. आता फक्त सामना ड्रॉ करायची निती अवलंबील्या जाईल, दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे शिल्लक नाही. -दिलीप बिरुटे (किंचीत अपसेट भारतीय क्रिकेट फॅन)

Cricket हनुमा विहारी आणि रविचंद्र अश्विनने चांगला किल्ला लढवला आहे, सामना येथून ड्रॉ होईल असेच दिसते आहे. चला एक पराभवापेक्षा ड्रॉचा आनंद आहे.एकवेळ. पराभव होईल असे वाटले, पंत पुजारा खेळत होते तर जिंकू असे वाटले, ते बाद झाल्यानंतर आता पराभव होईल असे वाटले. अश्विन आणि विहारीने ड्रॉ करु अशी खेळी केली. धन्यवाद. अधिकृत ड्रॉची वाट पाहणे आहे.. भारत २९९ / ५ -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ड्रॉ होणे हे जवळपास जिंकण्यासारखेच आहे. ब्राव्हो टीम इंडिया.

पण पाचव्या दिवशी , चौथ्या डावात ३३४/५ ही खुपमोठी गोष्ट आहे. हा ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा पराभव आहे.

मॅच अतिशय रंगतदार झाली! खूप खूप अभिनंदन टीम ब्लू! जिद्दीनं लढले!! आणि पंतचे खास कौतुक! त्यानं सेहवागची आठवण करून दिली. लागोपाठ २ विकेट्स पडल्यानं जिंकण्याच्या आशा बाजुला ठेवाव्या लागल्या, नाहीतर पोरानं मॅच खेचली होती! प्रतिपक्षाला पुढचे डावपेच आखतांना विचार करायला लावणारी खेळी! :-)

अश्विन व विहारीने जवळपास ४३ षटके झुंझार फलंदाजी करून पराभव टाळला याबद्दल दोघांचे कौतुक करावे तितके कमीत आहे. या डावात रहाणे वगळता सर्वांनीच चांगली फलंदाजी केली. विशेषतः पुजारा व पंत खेळत असताना एक वेळ भारत जिंकण्याची बरीच शक्यता निर्माण झाली होती. पंतचे ३ व विहारीचा १ झेल सोडणाऱ्या पेनलाही श्रेय दिले पाहिजे.

१/१. आता लक्ष पुढील सामन्यावर.जाडेजा पुढील सामन्यात नसेल. पंत वर पण ?.. साहा येईल पण जाडेजा च्या जागेवर कोण ?.. ते बघाव लागेल. सैनी च्या जागी नटराजनला संधी मिळावी असे वाटते.

भारताची जिगरबाज फलंदाजी. पंतची आक्रमकता आणि विहारी, पुजारा, अश्विनचा संयम. अजून काही वर्षांनी ही कसोटी आठवली की आपण याचे साक्षीदार होतो हे फीलिंग मस्त वाटेल एकदम. दर्शकाची वंशभेदी टिप्पणी, जडेजा, विहारीची दुखापत, पहिल्या डावतील मोठी पिछाडी अशी अनेक आव्हाने असून सामना अनिर्णित राखला. आजच राहुल द्राविडचा वाढदिवस, त्याला पण हा वाढदिवस चांगलाच लक्षात राहील. आणि आजच विराट कोहलीला कन्या रत्न झाले. एकंदरीत भारतीय क्रिकेट संघासाठी जल्लोषाचा दिवस.

In reply to by श्रीगुरुजी

अरे कोणी उरणार आहे की नाही शेवटची टेस्ट खेळायला..?? माहित नाही कोणाला बोलवतील बुमराहच्या ऐवजी.. कमलेश नागरकोटी खरंतर मला खूप आवडलेला खेळाडू आहे. वाटलं होतं त्याला घेतील या टूर मधे सोबत म्हणून तरी.. बघू.

In reply to by राघव

विहारीऐवजी मयंक आगरवाल आणि जडेजा व बुमराहच्या जागी कुलदीप, शार्दूल ठाकूर व नटराजन यापैकी कोणतेही दोघे येतील. कदाचित सैनीसुद्धा बाहेर असेल. शार्दूल बऱ्यापैकी फलंदाजी करतो. त्यामुळे तो संघात असेल तर फायदाच होईल.