Skip to main content

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 25/11/2020 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला आहे. या दौर्‍यात भारत ३ एकदिवसीय सामने, ३ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळेल. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) - एकदिवसीय सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २७ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २९ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - बुधवार २ डिसेंबर सकाळी ९:१० वाजता कॅनबेरा येथे ट-२० सामने पहिला सामना - शुक्रवार ४ डिसेंबर दुपारी १:४० वाजता कॅनबेरा येथे दुसरा सामना - रविवार ६ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे तिसरा सामना - मंगळवार ८ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे कसोटी सामने पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - गुरूवार १७ डिसेंबर सकाळी ९:३० वाजता अ‍ॅडलेड येथे दुसरा सामना - शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे तिसरा सामना - गुरूवार ७ जानेवारी पहाटे ५:०० वाजता सिडने येथे चौथा सामना - शुक्रवार १५ जानेवारी पहाटे ५:०० वाजता ब्रिस्बेन येथे या व्यतिरिक्त भारतीय दोन सराव सामने सुद्धा खेळणार आहे. या मालिकेत भारत प्रथमच गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र चालणारा कसोटी सामना खेळेल. तसेच कॅनबेरा येथे कदाचित भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारताने दोन वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये प्रथमच कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारताला विजय काहीसा सोपा झाला होता. परंतु यावेळी दोघेही संघात आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील सर्व ४ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. नंतर २०१७ मध्ये भारतात झालेल्या मालिकेतील ४ पैकी ३ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. यावेळीही स्मिथ व वॉर्नर भारताला त्रासदायक ठरणार हे नक्की. त्यांच्या जोडीला मागील वर्षीच पदार्पण केलेला जबरदस्त फलंदाज लाबूशेन व शॉन मार्श असतीलच. स्टार्क व फिरकी गोलंदाज नेथन लॉयन नेहमीच भारताविरूद्ध चांगली कामगिरी करतात. त्यांच्या बरोबर पॅट कमिन्स व हॅझलवूड हे दोन चांगले गोलंदाज आहेत. ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीनिशी असताना भारताची ताकद कमी असणार आहे. कोहली फक्त पहिल्या कसोटीपर्यंत असेल व नंतर तो भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणे कर्णधार असेल. रोहीत शर्मा व ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर उपलब्ध असतील. त्यामुळे भारतीय संघाची ताकद कमी असणार आहे. फलंदाजीचा बहुतांशी भार मयंक, पुजारा व रहाणेवर असेल, तर बुमराह, शमी व चहलवर गोलंदाजीचा सर्वाधिक भार असेल. एकंदरीत भारताला हा दौरा सोपा नसणार हे नक्की. यापूर्वी १९७८ मध्ये, १९८६ मध्ये व २००४ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आली होती. परंतु ते जमले नाही. २०१८-१९ मध्ये मात्र भारताने कसोटी मालिका जिंकून दाखविली. यावेळी सुद्धा भारत जिंकावा अशीच इच्छा आहे. २७ नोहेंबर पासूनच आफ्रिकेत इंग्लंडविरूद्ध व न्यूझीलंड मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध मालिका सुरू होत आहे.

वाचने 80680
प्रतिक्रिया 272

प्रतिक्रिया

१११/७

मस्त चालु आहे सामना

जिंकायची संधी आहे. बघुया काय होत ते.

In reply to by गोंधळी

अगदी खरंय. बक्कीने उद्या दिवसभर खेळून फक्त २०० धावा काढल्या तरी चालेल. २६३ चं आव्हान ऑस्ट्रेलियाला पार करणं अवघड आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कमीत कमी ३०० धावांचे टार्गेट दिले पाहिजे आणि स्मिथ लवकर बाद झाला पाहिजे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आज स्मिथ लवकर सापडला, पण असे क्वचितच होते. तो दुसऱ्या डावात शतक करू शकतो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आज स्मिथ लवकर सापडला, पण असे क्वचितच होते. तो दुसऱ्या डावात शतक करू शकतो.

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांची नांगी. १५/४ आता कोहली रहाणे शेवटची जोडी

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

रहाणे शून्यावर बाद १५/५ चला आता वेब सिरीज बघतो कोणती तरी

१५/५ रहाणे व पुजारा शून्यावर बाद.

कठीण आहे. ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना __/\__

खुपच वाईट हारणार :(

अवघ्या ३६ धावात संपूर्ण भारतीय संघ गारद. निचांकी धावांचा विक्रम असावा बहुतेक हा. सामन्याचा निकाल आजच लागणार बहुतेक. फक्त ९० धावा हव्यात ऑस्ट्रेलियाला जिंकायला.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, कोण म्हणतो आयपीएल प्रभावशाली नाही? आयपीएल नामे चेंडूफळी खेळाने क्रिकेटची वाट लावलीये. गोलंदाजीवर असलेले अतिरिक्त निर्बंध हटवले की फलंदाजांची भंबेरी उडते. तिचा सामना कसा करायचा ते शिकण्यासाठी परिश्रम व विश्रांती दोन्हींची निकड असते. पण पैसे हापसायच्या नादात तिथं लक्ष देणार कोण. आ.न., -गा.पै.

आज ३६ धावांवर उजेड पडला तेव्हाच आपलं सर्व संपलं. दुस-या इनिंगला एकेक महारथी धारातीर्थ पडले तेव्हा सामना बघावा सुद्धा वाटत नव्हते. लैच बेक्कार हरले. हारजीत चालायचीच म्हणून तान हलका करुया. -दिलीप बिरुटे

शमीच्या हाताचे हाड मोडल्याने दौऱ्यातून बाहेर. कोहली पुढील सामने खेळणार नाही. ०-४ असा मार खाण्याची बरीच शक्यता आहे.

1 0 0 0 0 0 0 3 0 2 0 1 0 0 0 0 0 0 W 0 0 0 0 0 0 0 0 0 0 2 0 0 0 0 0 0 0 0 0 4 0 0 2 0 0 0 0 W 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 W 0 0 0 0 W 0 0 0 W 0 0 0 4 W 0 0 0 0 0 0 0 0 0 0 2 0 0 0 0 0 1 0 0 2 0 0 2 0 0 0 0 0 0 W W 0 0 4 0 0 1 0 W 0 1 0 4 0 0 0 And That's All Folks!

In reply to by तुषार काळभोर

चालायचंच. प्रत्येक देशाचा संघ कधीतरी अशा परिस्थितीतून गेला आहे. केपटाऊन येथे २०११ मध्ये आफ्रिकेविरूद्ध ऑस्ट्रेलियाची स्थिती दुसऱ्या डावात २१/९ व नंतर सर्वबाद ४७ अशी दारूण होती. पॉंटिंग, मायकेल हसी, मायकेल क्लार्क, शेन वॉटसन, शॉन मार्श असे दिग्गज फलंदाज संघात असूनही वाट लागली होती. https://www.espncricinfo.com/series/australia-tour-of-south-africa-2011…

In reply to by श्रीगुरुजी

द्वारकानाथ संझगिरीचा आज लेख आहे दै. सामनात. त्यांनीही अशीच आठवण दिली आहे. १९७४ मधे इग्लंडविरुद्ध लॉर्डसवर खेळतांना तेव्हा भारतीय दुसरा डाव असाच ४२ धावात गुंडाळला गेला होता. लाजीरवाणा पराभव झाला. तेव्हाही अशीच हाराकिरीवर चर्चा झाली. हायकमिशन बी.के.नेहरुंनी त्यांना बोलावलं तेव्हा संघ उशिरा पोहचला तेव्हा ते भडकले आणि कर्णधार वाडेकरला अद्वात्द्वा बोलले ''तुम्हाला बॅटींग करता येत नाहीच, पण तुम्हाला वेळेवर कार्यक्रमालासुद्धा येता येत नाही'' हे शब्द संघाला फार झोंबले वाडेकर आपली टीम घेऊन पुन्हा बसमधे येऊन बसला. भडकलेली माथी थंड झाल्यावर संघाची समजूत घालण्यात आली पुढे अनेक दिवस संघावर टीका होत होती. इग्लंडमधे तेव्हा एक चित्रपट येऊन गेला ''समर ऑफ ४२ टू '' हिंदुस्थानच्या संघाला समर ऑफ ४२ टू म्हटल्या जात होते. ( सामनाच्या लेखातून साभार) -दिलीप बिरुटे

एक बेशरमाचं ओलं फोक घेऊन भारतीय फलंदाजी ज्या अनुक्रमाने आले त्या अनुक्रमे एकेक फलंदाजाच्या ढुंगावर चार-चार निब्बर फटके द्यावेत असा विचार येत आहे. -दिलीप बिरुटे (भडकलेला भारतीय क्रिकेट फॅन) -

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शांत व्हा डॉक्टरसाहेब. होतं असं कधीतरी. सर्वच देश या परिस्थितीतून गेलेत. कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या नीचांकी धावा २६ आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या नीचांकी धावा ३०, ३०, ३५, ३६, ४३, ४५, ४७ अशा आहेत. ऑस्ट्रेलियाची नीचांकी धावसंख्या ३६ व ४२ आहे. विंडीज व इंग्लंडची ४७ तर पाकड्यांची ४९ आहे. श्रीलंका वगळता सर्व प्रमुख देश कधी ना कधी ५० धावांच्या आत आटोपले आहेत. दु:ख होणे स्वाभाविक आहे. परंतु हा खेळाचाच भाग आहे.

जर सहा वर्षांनी त्याच संघासाठी, त्याच संघाविरुद्ध, तोच लेख जसाच्या तसा कॉपी पेस्ट करून चालत असेल तर.. ये रे माझ्या मागल्या........ - जे पी मॉर्गन बाबांनो आम्हाला क्रिकेटमधलं काही कळत नाही. पण जीव तोडून केलेला प्रयत्न नक्कीच कळतो. तुम्ही वर्षातले तीनशे दिवस क्रिकेटच खेळत असता, प्रेशर असतं सगळं मान्य.... आयपीएल खेळा, जाहिराती करा... आमचं काही म्हणणं नाही. पण ज्यासाठी आम्ही क्रिकेट बघतो ती मजा नका हिरावून घेऊ! तुम्ही पण लाइव्ह कार्यक्रमात lip synch करणार्‍या त्या चिर्कुट महागायकांसारखे आयपीएलच्या तमाश्यात नाचण्यात खुश असाल तर लक्षात ठेवा.... अजून ५ - ७ वर्षांत ते खूळ उतरेल आणि दुसर कुठलंतरी वेड लागेल क्रिकेटला. पण अजून दोन पिढ्यांनी तेव्हाचे आजोबा त्यांच्या नातवंडांना क्रिकेटच्या गोष्टी सांगतील तेव्हा तुम्ही त्यात असाल का हा विचार करा. हरायला आमची ना नाही... पण हरलात तरी अभिमानाने दाखवण्यासारखे घाव तरी अंगावर असले पाहिजेत रे! पहिल्या कसोटीत पहिल्या दोन दिवसातच माना नका टाकू! डोळ्यांला डोळे भिडवून लढा रे....दात ओठ खाऊन तुटून पडा....धीरोदात्तपणे त्यांच्या आक्रमणाचा सामना करा.....नवे डावपेच लढवा.... झोकून द्या स्वतःला. बाकी काही नाही... तुम्ही असं केलंत ना तरच मी माझ्या पोराला सांगू शकीन "लेका ठेव ते पुस्तक बाजूला.... आपली लोकं बघ काय लढताहेत! ह्यांच्याकडून जास्त शिकशील!"

In reply to by रंगीला रतन

ह्या धाग्यात काही चुकीचे आहे का? सध्या चालू असलेल्या मालिके विषयी चर्चा चालु आहे. ह्या मध्ये वाईट वाटण्याचं काय कारण आहे?

In reply to by रात्रीचे चांदणे

चुकीचे काहीच नाही. असे धागे मिपावर शोभत नाहीत एवढेच म्हणायचे होते. ज्यांना क्रिकेटची आवड आहे ते सामने बघतात. त्यात चर्चा करण्यासारखे काय आहे?

बरं झालं क्रिकेटमधला इंटरेस्ट फार आधीच संपला. मोअर प्रिसाइजली सचिन जेव्हा उतरणीला लागला होता व केवळ विक्रमासाठीच पेन्शनरासारखा खेळत होता तेव्हाच इंटरेस्ट संपला होता. त्यामुळे ह्या पराभवामुळे फार काही दु:ख झाले नाही. नाहीतर मनस्थिती फारे बेक्कार झाली असती.

दुसरा कसोटी सामना उद्या शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे सुरू होईल. भारताने संघात ४ बदल केले आहेत. संघ असा आहे. - मयंक आगरवाल, शुभमन गिल, पुजारा, हनुमा विहारी, रहाणे, पंत, जडेजा, अश्विन, यादव, बुमराह, महंमद सिराज राहुलला संघात स्थान न देणे व हनुमा विहारी संघात कायम ठेवणे आश्चर्यकारक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

एक स्पेशालिस्ट फलंदाज सरळ सरळ कमी आहे. विहारी किंवा जडेजाच्या ऐवजी के एल राहुल पाहिजे होता. ही कसोटी अनिर्णित राहिली तरी भारताच्या दृष्टीने मोठा विजयच म्हणावा लागेल.

हाल पाहात राहु. माझ्या मनात सर्व वाइटच येत आहे. तरीही उत्तम खेळू असे वाटते. भारतीय संघाला शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनाचे खेळ लैच वाईट असतात बरेका.... चांगला खेळ करणाऱ्या संघाला शुभेच्छा...! --ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

भोजनवेळेपर्यंत ऑस्ट्रेलिया ६७/३. स्मिथला अश्विनने शून्यावर बाद केले. आता १०३/३. लाबूशेन व हेड स्थिरावलेत. पंतचे यष्टीरक्षण चिंताजनक आहे. आतापर्यंत १० बाईज गेल्यात. फिरकी गोलंदाजांंनी लेगच्या बाजूला टाकलेले चेंडू पकडण्यात पंतला समस्या येताना दिसताहेत.

In reply to by श्रीगुरुजी

अस्ट्रोलिया १३६ - ५, गोलंदाज चांगली गोलंदाजी करीत आहेत, दोनशे आत गुंडाळले पाहिजे असे वाटते, सिराजच्या गोलन्दाजीवर शॉर्ट लेगला घेतलेला झेल मस्त होता. -दिलीप बिरुटे -

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अष्ट्रोलिया सर्वबाद १९५. आता आपल्या परिक्षेची वेळ आहे, कमीत कमी एक मोठी धावसंख्या उभारावी असे वाटते. एकही भरवशाचा फलंदाज माझ्या नजरेसमोर नाही जो खेळ्पट्टीवर उभा राहील. खेळपट्टीवर दमदारपणे उभे राहीलं की धावा येत राहतील. खेळपट्टीवर संयम आवश्यक आहे. बुमराचा मारा जबरा होता. ४ विकेट्स बळकावल्या. अश्वीन ३, सिराज दोन तर जडेजाला एक विकेट्स मिळाली. -दिलीप बिरुटे

भारताची पहिली विकेट पाचव्या चेंडुवर मयंक अग्रवालची पडली. वेगाने चेंडू येत असतांना बॅटलिफ्ट पार डोक्याला लागून येते.बॅट खाली येईपर्यंत कार्यक्रम झालेला असतो अशी चर्चा क्रिकेट समालोचक करत असतांना पायचितचा निर्णयाने मयंक बाद झाला. चेंडु दोन्ही बाजूला वळतोय. रिव्ह्यू वाया गेला. प्रतिसाद प्रकाशित करीत असतांना दोन तीन विकेट पडतील की काय असे वाटत होते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद प्रकाशित करीत असतांना दोन तीन विकेट पडतील की काय असे वाटत होते. खी खी खी सर घाबरवू नका हो मला तर वाटते जडेजा, बुमराह ला वर पाठवून फटकवायला सांगायला पाहिजे. ३० ४० धावा झाल्या तरी ऑसी वर दबाव वाढेल. बाद झाले तरी काही विशेष फरक पडणार नाही.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पहिल्या विकेट् नंतर वेगात येणा-या चेंडुना खेळत आजच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा ०७ तर गिल २८ धावावर खेळत होते. गीलचा कॉन्फिडेंस चांगला होता. उद्या सकाळच्या सत्रात आपण पहिल्या तासभर विकेट गमावली नाही तर आपली धावसंख्या वाढलेली असेल, तसे झाले नाही तर आपण जेव्हा डोळे चोळून उठू तेव्हा शेपुट वळवळ असेल असेही होऊ शकते. क्रिकेट तज्ञ आजच्या अभ्यासावर ना ड्रॉची शक्यता ३० टक्के म्हणत आहेत. देखेंगे आगे आगे होता है क्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ड्रॉ होण्याची शक्यता नाही. सामना निर्णायक होणार. चौथ्या डावात भारताला फलंदाजी करावी लागणार असल्याने अवघड आहे.

In reply to by प्रचेतस

भारत हा सामना जिंकू शकेल असे वाटते. ? असे बोलणे खुप घाईचे ठरेल. राहुल ला विहारीच्या जागी घ्यायला हवे होते अस मलाही वाटत. उमेश यादव मला अजिबात आश्वासक वाटत नाही. स्ट्रेटेजी करुन गोलंदाजी करतो असे दिसत नाही. विकेट मिळाली तर मिळाली.

६१/२ शुभमन गिलने कमिन्सला ड्राइव्ह करायच्या नादात विकेट फेकली.

६४/३

मस्त खेळले आज. मागच्या मानहानीकारक पराभवानंतर तर आजची फलंदाजी अजूनच उठून दिसली. राहणेची संयमी फलंदाजी आणि शतक त्याला जडेजाची भक्कम साथ यामुळे ८२ धावांची चांगली आघाडी मिळाली आणि उद्या ती अजून वाढवून १५० किंवा अधिक धावांची व्हायला पाहिजे. हनुमा विहारी परत अपयशी ठरला, पुढच्या कसोटीत त्याला संधी मिळणे अवघड वाटतेय. उद्याचा दिवस महत्वाचा आहे, सामना कुठे झुकतोय हे दिवस अखेरीस स्पष्ट होईल असं वाटतंय.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पुढील सामन्यात रोहीत शर्मा आत येईल व मयंक किंवा विहारी यापैकी एकजण बाहेर जाईल. कदाचित दोघेही बाहेर जातील व राहुलसुद्धा आत येईल.

पहिल्या डावात १३१ धावांनी मागे पडल्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात १३३/६. भारताला सामना जिंकण्याची उत्कृष्ट संधी.

शेपुट ६०-७० धावांच्या आत गुंडाळले तर विजयाची शक्यता वाटते, शेपुट वळवळत राहिले तर कठीण होईल....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉ, तुमच्या तोंडात साखर पाहे. रहाणेची कर्णधारकी आश्वासक वाटते आहे. तो पन्नासच्या आत शेपूट गुंडाळवून देईल. असा माझा अंदाज आहे. आ.न., -गा.पै.

पहिला दिवस ११ विकेट  दुसरा दिवस ०५ विकेट तिसरा दिवस ११ विकेट चौथा  दिवस ०५ विकेट पडतील म्हणजे भारत ०९ विकेटने जिंकेल माझा अंदाज 

आष्ट्रोलियाचा संघाने ७० धावांचं आव्हान दिले आणि त्या धावांचा पाठलाग करतांना आपल्याला दम लागतोय, आपण दोन फलंदाज गमावले. अजिंक्यचा कॉन्फिडंन्स भारी आहे, मस्त खेळतोय. मयंक अग्रवाल आणि पुजारा अनुक्रमे ०५ आणि ०३ वर पॅव्हीलियनमधे जमा झाले. गील आणि अजिंक्य आपल्या जिंकून देतील अशी अपेक्षा करुया. मागच्या सामन्यातील पराभवाची वेदना जरा कमी होईल. ४२ वर दोन जिंकण्यासाठी २८ धावा हव्या आहेत. आता विजय फार दूर नाही. चिवटपणाने खेळा, अशा शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

हे हे हे जिंकले हे धड्डड तत्तड, जिंकले, भारी वाटले बघताना, विजयाचे सगळे श्रेय रहाणेच्या संयमी खेळीला. पैजारबुवा,

सर्व भारतीय संघांचं अभिनंद्न. पाठीराख्याचंही अभिनंदन. मिपा धाग्यावर क्रिकेट सामन्याबद्दल लिहून क्रिकेट सामना पाहण्यास, लिहिण्या बोलण्यास प्रेरीत करणा-या धागा लेखकाचेही आभार आणि अभिनंदन. पुन्हा भेटू याच धाग्यात ७ जानेवारी २०२१. सकाळी पावनेपाचला. -दिलीप बिरुटे

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय... वेल डन राहणे अँड कंपनी...हा विजय खास आहे कारण ह्या सामन्यात विराट, भुवनेश्वर, शमी, ईशांत, रोहित हे अनुभवी खेळाडू नव्हते...गिल आणि सिराज ची कारकिर्दीच्या पहिल्याच सामन्यातील कामगिरी उल्लेखनीय आहे..

In reply to by सुजित जाधव

पहिल्याच सामन्यामधे पदार्पण करणारा पहिल्या इनिंगमधे दोन विकेट्स तर दुस-या इनिंगला ३ विकेट्स घेऊन मोहम्मद सिराजने लक्ष वेधले आहे. पहिला इनिंगमधे फार उशिरा त्याला गोलंदाजी देण्यात आली तरीही त्याने उत्तम गोलंदाजी केली. -दिलीप बिरुटे

आता पुढील सामन्यात मनोबल सकारात्मक असेल. पण पंतचे यष्टीरक्षण व शेपटाला लवकर गुंडाळणे यावर लक्ष देण्याची गरज वाटते.

अभिनंदन