>> त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला नाही. >>
१०००% सहमत..
उत्साहाने व्हिडीओ बघितला पण प्रचंड निराशा झाली. अगदीच पेद्रु थ्रो होता.लहान मुलाला कॅच देताना सुद्धा यापेक्षा जोरात बॉल टाकतो आपण.
टंकन हापिसच्या लॅपटॉपवर केले. त्याचे रेजोल्यूशन् नेहमीच्या पडद्यांपेक्षा जास्त असल्याने त्यानुसार लाम्बलचक ओळी काढल्या; ज्या त्या संगणकाच्या पडद्यावर त्यामानाने लांबलचक न वाटता व्यवस्थित दिसतात. मागे-पुढे, वर-खाली स्क्रॉलिंग करावे लागत नाही.
(तंत्रज्ञ)बेसनलाडू
एकदम जोरदार लिखाण, थ्रोच्यापेक्षा कायच्या काय जोरदार ...
आडवं स्क्रोल करण्याच्या प्रश्नावर उपायः आडव्या रेघा मारायच्या ऐवजी साधारण मध्यात तीन ऍस्ट्रीक्स काढले तर? पण तुमची निवड!!
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या चोर्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते
आहे.
त्याच्याव काही ल्वॉक डोकॅलिटी लडवायचे. डावी चप्पल मंदिराच्या डाव्या कोपर्यात आन उजवी उजव्या कोपर्यात. चोराला यका चप्प्लेचा काय उपेग ? मंग तो नेनार नाई.
बूट घातलेल्या लोकांचा मोजे काढल्यावर चरणकमलगंधा मुळे डास पळुन जातील का? असा विचार मनात आला असता डास जागेवर रहातात पण माणस पळून जातात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
त्या पत्रकाराला गृहमंत्र्यांवर बूट फेकल्याबद्दल २ लाख रुपये मिळाले !!!!!!!!!!!!!!!
सर्व बेकार आणि जागतिक मंदिमुळे नोकरी गमावलेल्यांना सर्वाना त्या पत्रकाराने पैसे कमवंण्याचा सोपा मार्ग दाखवला. चला मग बूट घेउन तयार रहा.
बाटा फ़ॅन अर्चिस
लेख चांगला. त्या पत्रकाराने निषेध व्यक्त करण्यासाठी तो बूट चक्क 'हा घे कॅच' असं म्हणत टाकला. त्या कृतीला "जोडा फेकून मारला" या स्तरावर नेले पत्रकारांनी. थोरच ते. अतिशयोक्ती अलंकार तो. बाकी काही नाही.
तो पत्रकार अशा ठिकाणी बसला होता की, गृहमंत्र्यांना जोडा मारणे अशक्य नव्हते आणि त्याने तसा मारला असता तर चिदंबरम यांना तो चुकवता आलाही नसता. तीन-चार फुटांमध्ये काही करण्यासाठी लागणारी चपळता व जागरूकता आपल्या गृहमंत्र्यांमध्ये असेल असे वाटत नाही.
बाकी या निमित्ताने इतरही काही प्रश्न निर्माण झाले. हा पत्रकार बदली कामगाराच्या भूमिकेत होता म्हणे. म्हणजे कॉंग्रेस पक्ष हे त्याचे बीट नाही. तरीही तो त्या पत्रकार परिषदेला गेला ते त्यांचा 'कॉंग्रेसमन' गैरहजर असल्याने. दुसरी बाब (अ)ज्ञानाची. सीबीआय गृह खात्याच्या कक्षेत येत नाही. ते येते पंतप्रधानांच्या अखत्यारित. या पत्रकाराचा अनुभव किमान दहा वर्षांचा असावा. त्याला हे ठाऊक नाही असे कसे म्हणता येईल. त्यामुळे तर्कसंगतरित्या त्याने जोडा फेकायचाच असेल तर तो पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर फेकला पाहिजे.
यापुढे पत्रकार परिषदेत जाताना पत्रकारांना चप्पल, बूट बाहेरच काढून ठेवण्यास सांगितले जाईल, असा एक एसएमएस काल घुमत होता.
सीबीआय नि गृहखात्याचा काहीएक संबंध नाही, सीबीआय वर कोणत्याही मंत्रालयाकडून टायटलर यांची पाठराखण करण्याबाबत दबाव आणला गेलेला नाही, हे चिंदबरम यांनी एकदा नाही तर दोनदा सांगितल्याचे अंधुकसे आठवते (कदाचित एकदाच असेल) पण असे असतानाही पत्रकार महाशयांनी आपलेच आरोप/प्रश्न जे काही असेल ते पुढे रेटणे अनाकलनीयच वाटले; आणि अर्थातच यामुळे बूट फेकण्याचा बेत पूर्वनियोजित असावा, या संशयाला जागा उरते. एका बातमीत तर पत्रकार महोदय बुटाची नाडी सैल करूनच बसले असल्याचे वाचण्यात आले. अर्थात अशा मसालेदार बातम्या पुढचे दोन दिवस वाचायला मिळतीलच.
जोडा 'हाणायचाच' होता तर किमान शेवटच्या बेन्च वर बसून कॉलेजातली पोरे कागदी बाणांची जी मारामारी करतात, तसे तरी करायला हवे होते, असे वाटले. हे म्हणजे अगदीच खोटेखोटे, लुटुपुटूचे झाले राव! आणि भारतात असा 'आवाज' उठवायला या स्टन्ट् करायची गरजच काय (आणि तो ही हा असा!), हा प्रश्नही उरतोच. इराक नंतर चीन, आता भारत अशा पद्धतीने पत्रकार समुदायात या नव्या निषेधपद्धतीचा अवलंब होऊ घातला आहे, असे वाटते.
(वार्ताहर)बेसनलाडू
प्रतिक्रिया
झकास!
पहिल्या रांगेत बसण्याची चूक झाली असावी
बेलासेठ..
लगे रहो
हापिसचा लॅपटॉप
एकदम
बहोत खूब!
खूपच सुंदर!
सहमत, लेख
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आयडिया
धांसु
बटांना नाही बुटांना
बूट फेकुन पैसे कमवता येतात
मस्त!!
टंकनचूक झाली बहुदा माझी ;)
चांगला
बरोबर
खुलासा
मस्त!
छान