Skip to main content

उपक्रम/चांगल्या सवयी दीर्घकाळ चालवणे

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 20/10/2020 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याचदा आपण आपल्या व्यक्तिमत्वात काही चांगला बदल घडवण्याच्या उद्देशाने काही नवीन सवयी लावू पाहतो.जसे की दररोज पहाटे उठून व्यायाम करणे किंवा दररोज किमान २० मिनिटे मेडीटेशन करणे किंवा दररोज ठराविक अंतरापर्यंत सायकल चालवणे इ. असे बरेचसे बदल उपक्रम असतील आणि बरेच लोक तो ठरवत असतील.पण हे उपक्रम दीर्घकाळ टिकवणे सोपे नसते.२-३ दिवसात त्याचा कंटाळा येतो आणि तो उपक्रम सोडून द्यावासा वाटतो; किंवा मधेच काही कारणांनी खंड पडतो आणि पुन्हा तो उपक्रम सुरु करणे टाळण्याकडे मनाचा कल असतो किंवा पुरेशी मानसिक ऊर्जा नसल्याने पुनश्च हरिअोम होत नाही. असे का होते? या उपक्रमांमधे रंजकता नसल्याने असे होते का? प्रत्येक उपक्रम रंजक बनवणे शक्य आहे का? कशी आणावी रंजकता उपक्रमांमधे? तुम्ही कधी या अशा प्रकाराला सामोरे गेला आहात का? एखादा चांगला पण तुमचे पेशन्स बघणारा उपक्रम तुम्ही मधेच सोडून दिलात किंवा बाह्य कारणांनी त्यात खंड पडला असेल तर तो परत सुरु करणे आणि दीर्घकाळ चालवणे तुम्हाला जमले का? तुम्ही हे कसे साध्य केलेत? या विषयावर काही पुस्तके किंवा साईटस् ,अॅप्स असतील तरी सुचवाव्यात.

वाचने 45593
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

चांगल्या सवयी अंगभूत करून घेण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे मोटिवेशन लागते. ते असेल तरच तुम्ही तग धरू शकता. दुसरी एक गोष्ट म्हणजे मी कुठेतरी एका व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे तुम्ही एखादी गोष्ट २० वेळा सलग करून पहिली तर पुढे ती गोष्ट सवयीत रूपांतर होते. हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे.

स्वतः काहीही विचार न करता, डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये ! एनी वे, सगळ्यांना उपयोगी होईल म्हणून उत्तर देतो : १. कुठलीही गोष्ट लावून धरण्यामागे तुमच्या इंटरेस्टची तीव्रता कारणीभूत असते. लोकांचे इंटरेस्ट फारसे तीव्र नसतात त्यामुळे प्रोजेक्ट फाफलतो. २. आपल्याला जमेल हा अत्मविश्वास असेल तरच त्या उपक्रमावर मेहेनत होते. संदिग्धावस्थेमुळे उपक्रम बारगळण्याची शक्यता प्रचंड. ३. उपक्रमासाठी आवश्यकती उत्तम गॅजेटरी विकत घेणं तुमचा इंटरेस्ट वाढवतं (म्हणजे धावायचं असेल तर ब्रँडेड शॉर्ट्स, आरामदायी टी शर्ट आणि उत्तम स्पोर्टस शूज) ४. लवकारात लवकर थोडं फार यश मिळणं अत्यंत अनिवार्य आहे. जर रिझल्ट येत नसेल तर तुम्ही चुकीची मेथड (उपक्रम नाही) निवडली आहे असा अर्थ होतो. त्यामुळे योग्य मेथड हा एक अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

स्वतः काहीही विचार न करता, डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये! स्वत:च काहीही तर्क करायचा ,स्वत:च निष्कर्ष काढायचा ,स्वत:च तो परिपूर्ण असल्याचे ठरवून स्वत:लाच सर्वज्ञ असल्याचे प्रमाणपत्र द्यायचे हा तुमचा फंडा त्याहून भारीये. असो.

In reply to by उपयोजक

देण्याची सवय तुम्हालाही जडलेली दिसते !
त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कसा मांडला जावा,केव्हा काय लिहावे हे त्या लेखकाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे ना? की तुम्ही सांगाल तसंच लिहायचंय?

In reply to by संजय क्षीरसागर

सगळेच मुद्दे फारच बरोबर आहेत. ३. उपक्रमासाठी आवश्यकती उत्तम गॅजेटरी विकत घेणं तुमचा इंटरेस्ट वाढवतं (म्हणजे धावायचं असेल तर ब्रँडेड शॉर्ट्स, आरामदायी टी शर्ट आणि उत्तम स्पोर्टस शूज) - हे माझ्याबरोबर नेहमी होतं. मी जर चांगल्या वस्तू विकत घेतल्या कुठल्यातरी व्यायाम प्रकारासाठी तर मला सकाळी उठायचा उत्साह पण येतो. आणि वस्तू विकत घेतली असेल तर तो उत्साह जवळपास ८-१० महिने टिकतो आणि वजन बऱ्यापैकी कमी होऊन जातं तेवढ्या वेळात. मग २-४ महिने (खासकरून थंडीचे) असेच जातात, मार्च-एप्रिल नंतर परत उत्साह येतो व्यायाम करायला . माझे थोडे पैसे : १. थंडीच्या महिन्यात कुठल्याही सकाळी लवकर उठायच्या उपक्रमाची सुरवात करू नका (खासकरून तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय नसेल तर) . २. एखादा मित्र - मैत्रीण शोध जे नियमित व्यायाम करतायत, आणि त्यांच्या बरोबर व्यायाम करायचा प्रयत्न करा. कोणी बरोबर असेल तर उत्साह नक्कीच वाढतो. ३. उपक्रम सुरु केल्या केल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवा. कारण खूप व्यायाम करून वजन कमी होतंच नाहीये असं झालं कि व्यायामाचा उत्साह निघून जातो. व्यायाम केलाय आता दुप्पट खाल्लं तरी चालेल असं करू नका. ४. वेळ अशी निवड कि जी सहज शक्य असेल (ती बरेचदा सकाळचीच येते :( ) , संध्याकाळी ऑफिस वरून आल्यावर करेन असा प्लॅन असेल तर तो बारगळण्याची शक्यता जास्त असते.

In reply to by वीणा३

१. कोणत्याही दीर्घकालीन उपक्रमाची सुरुवात रोज सकाळी लवकरात लवकर केली तरंच सातत्य टिकतं. संध्याकाळी ठरवलेल्या वेळेत हमखास विक्षेप येतात आणि तो लवकरच बंद पडतो. २. ग्रुप अ‍ॅक्टीविटी अनंत काळ चालते आणि नक्की मजेची होते. आमच्या टेबलटेनीसची टाईम स्लॉट सकाळी ८ ते ९ आहे. आम्हाला फार हौस म्हणून आम्ही ७.३० लाच हजर ! एकजण तर सकाळी ६ वाजता निघून फुल सायकल मारुन खेळायला येतो. दिवसाची सुरुवात फार प्रसन्न होते.

In reply to by संजय क्षीरसागर

स्वतः काहीही विचार न करता, डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये !
+१ कदाचित म्हणूनच लोक इथे लिहिते होत नसतील

In reply to by संजय क्षीरसागर

तुमची फार मोठ्या बाता मारून ठरवलेली पेड साईट ३ वर्षात आली नाही त्यामागे यातली कोठली कारणे नव्हती ? आत्मविश्वास तर जास्तच दिसत होता कि

In reply to by हेमंतकुमार

छान अनुभव आहे. आभार्स!

@ उपयोजक : मनात विचार आला की त्यावर

स्वतः काहीही विचार न करता,

डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये ! त्यांनी याच्या वर काहीही विचार केलेला नाही हे तुम्हाला कसे समजले? त्यांना त्यांचा विचार सध्या लोकांना जाहीर करायचा नसू शकतो. काही वेळेस आपला विचार व्यक्त केला कि दुसऱ्या बाजूचा पूर्वग्रह (BIAS) होऊ शकतो.

जिकडे तिकडे मीच शहाणा

म्हणू दर्पोक्ती का करता?

In reply to by सुबोध खरे

लॉजिक वाढत जाईल. फक्त घाईघाईनी उपप्रतिसाद न देता शांतपणे वाचत जा ! सदर लेखक सतत फुटकळ विषय घेऊन पोस्ट टाकतात. त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही. तरीही उपक्रम चालू रहावा यासाठी काय करावं हे वरच्या प्रतिसादात लिहिलं आहे; ते सोडून तुम्ही पुन्हा विषय भरकटवत सुटलात !

In reply to by संजय क्षीरसागर

सतत फुटकळ विषय घेऊन पोस्ट टाकतात दुसर्‍यांचे धागे हायजॅक करुन त्या धाग्याची वाट लावणे हे तुमचे कौशल्य सर्वांकडे असणे शक्य नाही. असो. जहाँ नहीं चैना उस धागे को मत वाचना। बघा जमेल का इतकं ते!

In reply to by संजय क्षीरसागर

@ संजय क्षीरसागर त्यांनी याच्या वर काहीही विचार केलेला नाही हे तुम्हाला कसे समजले? याचं उत्तर द्या मग तुमच्या बाकी सगळ्या भंपक गोष्टींबद्दल विचार करू त्यांच्या मेंदूत चालणारे विचारही तुम्हाला ऐकू येतात कि काय? हे स्किझोफ्रेनिया चे लक्षण आहे. काळजी घ्या

In reply to by सुबोध खरे

न वाचता वैयक्तिक शेरेबाजी करुन दरवेळी स्वतःचं हसू करुन घेणं बरं नाही > आता तरी नीट वाचा : त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

ते सगळं ठीक आहे पण त्यांनी याच्या वर काहीही विचार केलेला नाही हे तुम्हाला कसे समजले? हे सांगा मग बाकी चर्चा करू

In reply to by सुबोध खरे

पुन्हा वाचा : त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

ते सगळं ठीक आहे पण त्यांनी याच्या वर काहीही विचार केलेला नाही हे तुम्हाला कसे समजले? हे सांगा मग बाकी चर्चा करू

In reply to by सुबोध खरे

महासंग्रामांना कळलंय, त्यांना व्यनि करुन विचारा म्हणजे आता आणखी शोभा होणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मी त्यांनी एखादा दीर्घकालीन उपक्रम राबवून यशस्वी केला असता तर त्यांचा अनुभवच त्यांच्या कामी आला असता. या पोस्टमधे सुद्धा त्यांना नक्की कोणता उपक्रम हाती घ्यायचा आहे किंवा घेतला आहे, तो चालू ठेवण्यात काय अडचणी आल्या याविषयी काहीही उल्लेख नाही या बाबतीत सहमत आहे. विचार करायचा कि नाही हे ज्याची त्याची वैयक्तीक गोष्ट आहे

In reply to by सुबोध खरे

असा प्रश्न तुम्ही सर्वज्ञानींना कसा विचारू शकता? धागा काथ्याकूटात असला तरी देखील लेखकाने स्वतः संपूर्ण विचार करून आधी एक लेख पाडावा आणि मगच काथ्या कुटावा. अवांतर, लेखकाने उपक्रम अयशस्वी का होतात असे विचारले आचा, सबब त्याला अनेक उपक्रम अयशस्वीपणे सुरू करायचा अनुभव असावा असे गृहीत धरू शकतो. त्यामुळे विचार केला नाही ही टिपण्णी अनाठायी आहे, असे मत व्यक्त करून खाली बसतो.

In reply to by आनन्दा

***संक्षि मोड ऑन*** निरर्थक प्रतिसाद देण्याची इतकी घाई करू नका ! आधी प्रतिसाद नीट वाचत चला, म्हणजे पुन्हा पुन्हा अशी वेळ येणार नाही ! मिसळपावचे काथ्याकूट धोरण वाचले असते तर अशी वेळ आली नसती ! वाचा-
येथे तुम्ही एखाद्या विषयावर थोडे लिहावे म्हणजे लोकांना त्या विषयाची पार्श्वभूमी लक्षात येईल. त्यानंतर आपले मत मांडावे आणि शेवटी अन्य लोकांचे मत मागावे. अश्याने अन्य लोकसुध्दा त्या चर्चेत सहभागी होतील. केवळ कुठल्यातरी बातमीचा दूवा (लिंक) देवून याविषयी तूमचे मत काय? असे प्रश्न विचारू नये. त्याचर्चे बाबत तुम्ही गंभीर आहात किंवा किमान तुम्ही त्याबाबत विचार करताय हे लोकांना कळल्यास त्यांना त्याचर्चेत सहभागी व्हायला आवडेल.
इथे धागालेखकाने स्वतःचा एकतरी विचार लिहिलाय का ? त्यामुळे उगाच विरोध करण्याऐवजी जरा वाचत चला ! ***संक्षि मोड ऑफ***

In reply to by डॅनी ओशन

इथे धागालेखकाने स्वतःचा एकतरी विचार लिहिलाय का ? ते सगळं ठीक आहे पण संक्षी यांनी लेखकाने विचारच केलेला नाही असे सांगितलंय. काय म्हणताय?

In reply to by सुबोध खरे

संक्षि मोड ऑन धागालेखक म्हणजे उपयोजक या आयडीने यावर विचार केला नाही असे मी म्हणालो आहे आणि ते योग्य, परफेक्शन, तंतोतंतच आहे ! धागा मोकळा असेल तर मूळ व्यक्तीने विचार केला अथवा न केला याला काडीचेही महत्व नाही ! उपयोजक या आभासी व्यक्तीने कोणताही विचार केला नाहीच ! संक्षि मोड ऑफ

In reply to by संजय क्षीरसागर

सदर लेखक सतत फुटकळ विषय घेऊन पोस्ट टाकतात.
लेखकाचे फुटकळ विषय आणि सततचे पाट्या टाकणारे दळणाविषयी आपल्या मुद्द्याशी सहमत असलो तरी लिहिण्या-बोलण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे व्यक्त होण्याची संधी या विचारपिठाची असल्यामुळे लेखकांनी प्रॅक्टीकली काही केल्याशिवाय लेखन करावे असे काही आढळत नाही, असे दिसते. त्यामुळे आपण म्हणता की लेखक फुटकळ विषय घेऊन पोश्ट टाकतात असे असले तरी आपल्याला प्रत्येकाच्या लिहिण्या-बोलण्याचा आदर व्यक्त केला पाहिजे असे वाटते. इग्नोर करण्याचा मार्ग आपल्याकडेही आहेच असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काहीजणांना माझे धागाविषय चांगले वाटतात.सर्व प्रतिसाद वाचलेत तर कळेल. इथल्या प्रत्येक धाग्यात 'दर्जा' शोधण्याआधी बहुतांश वेळेला १० पेक्षा जास्त सदस्य उपस्थित नसतात; किंवा कधी कधी तर आत्ता उपस्थित सदस्य १ असेही वाचले आहे.याकडे लक्ष द्या जरा. आधीच लोकांचा वाचनाकडे कल कमालीचा कमी झालाय त्यात तुम्ही आणि इथलीच दोन-चार मंडळी प्रत्येक धाग्यात 'साहित्यिक दर्जा' वगैरे शोधू लागलात तर जे लोक लिहितायत ते सुद्धा लिहायचं बंद करतील.किंवा तुम्हाला हवं तसं दर्जेदार लेखन हवं असेल तर इथे तुम्ही आणि 'तुमच्याइतके' 'दर्जेदार' लेखन करणारे लोकच का सगळे धागे काढत नाही? तुमच्या तराजूत न बसणार्‍यांना मनाईच करावी लेखनाला. म्हणजे मग मनासारखे दर्जेदार लेख मिळत नसल्याने होणारी चिडचिड तरी थांबेल तुमची. आधी लोकांना हवं तसं लिहा म्हणायचं आणि नंतर त्यांच्या लेखनाची मापं काढायची हा विकृत आनंद झाला ना? त्या 'भेजा फ्राय' सिनेमातल्यासारखा.

In reply to by उपयोजक

आपलं मिपाचं वय आणि वावर पाहता, एकच सल्ला देतो आपण मिपाची फार काळजी करु नका. तान घेऊ नका. दळत राहा सॉरी लिहिते राहा शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालतंय की! :) पण मग तुम्हीही इतरांच्या धाग्याच्या विषयांचा दर्जा आणि वारंवारिता यांची काळजी करत जाऊ नका.ही विनंती! बाकी मिपावरचं वय आणि वावर जास्त असणे हे निकष कैच्या कै आहेत. ;)

माझा असा समज आहे की चांगल्या सवयी आहेत असं वाटतं त्या गोष्टी १) वेळ उलटून गेल्यावर लक्षात येतात. त्याचा पाठपुरावा करण्यास वय आणि शरीर साथ देत नाही. थोडे दिवस करून मग विचार येतो की याची सुरुवात अगोदरच करायला हवी होती. २) निरीक्षण कमी पडणे किंवा त्या सवयींचं महत्त्व उशिरा कळणे हेसुद्धा आहे. अर्थात उत्साह गेलेला असतो. अगदी झोपसुद्धा येऊ लागते. आणखीही कारणं आहेत. नंतर.

In reply to by कंजूस

सवयींचं महत्त्व उशिरा कळणे हेसुद्धा आहे. दुर्दैवाने खरं आहे! :(

असा काहि उपाय बिपाय नाहि आमच्याकडे ;) पण स्वानुभवाने एक गोष्त लक्षात आलि आहे. जर एखादा उपक्रम / सवय अंगी बाळगायची इच्छा होत असेल तर त्याची काहि ना काहि गरज नक्की वाटली असते. उदा. व्यायाम करायची सवय लागावी अशी इच्छा असेल तर आरशात दिसणारं स्थुल शरीर, एखादा वाईट मेडीकल रिपोर्ट, किंवा अगदी पोरगा/पोरगी पटवणे वगैरे काहिही कारण असु शकेल. असं म्हणतात कि कुठलिही सवय २१ दिवसांच्या नियमीत सरावाने लावुन घेता येते. आता असा काटेकोर २१ दिवसांचा विदा नाहि नाहि माझ्याकडे, पण माझी एक पद्धत आहे. सवय लावुन घ्यायला जे कारण असेल, जसं इथे व्यायामाच्या गरजेबद्दल म्हटलय, ते कारण दृष्य स्वरुपात आपल्याला नेहेमी दिसेल अशा ठिकाणी ठेवावे. एखादा फोटो, तक्ता, मेडीकल रिपोर्ट वगैरे. त्या सवयीला अनुकुल अशी १५ मिनीटाची अ‍ॅक्टीव्हिटी बनवावी. म्हणजे कसं, कि व्यायाम करायचा असेल तर ५ मिनिटे वॉर्म अप, ५ मिनीट मुख्य व्यायाम, ५ मिनीटे कुल डाऊन. बस्स.. आणि हि अ‍ॅक्टीव्हिटी दिवसाची सुरुवात होताच सर्वप्रथम उरकावी. ८ - १० दिवस जर असं करु शकलो तर नवीन सवय आत्मसात करायचे चान्सेस खुप वाढतात.

In reply to by अर्धवटराव

कुठलिही सवय २१ दिवसांच्या नियमीत सरावाने लावुन घेता येते. ८ - १० दिवस जर असं करु शकलो तर इथेच तर घोडं पेंड खातंय. व्यायाम करायचा तर आळस फार येतो. बाकी वजन कमी करणे किंवा असा कोणताही हेतू नाहीये.(ते प्रमाणातच आहे)

व्यायामाला मी एक ठराविक वेळ ठरविली नाही आहे आणि जिम वगैरेही लावली नाही. जिन्याच्या पायर्यांवर स्टेप अप स्टेप डाऊन करत बसायचे. ठराविक वेळ नसल्याने ती उलटुन जायचा प्रश्नच नाही. (म्हणजे सकाळी ८ लाच व्यायाम करायचा असे ठरवले कि एकदा का साडेआठ झाले तर मग आपणच स्वत:ला कन्विन्स करतो कि आता तर वेळ गेली उद्या करु.) आणि जिनाही कुठे जात नसल्याने जबरदस्तीने व्यायाम करावा लागतो नाहीतर मन खात राहते. तरीही टाळाटाळ होते पण तरीदेखील हा प्रकार सुरु राहतो.

उत्तम विषय! शरीर - मन (विचारप्रवाह) ह्यांच्या परस्पर संबंधांवर कुठल्याही बदलाला आपण कसे सामोरे जातो हे ठरते. डोपामाइन नावाचे हार्मोन ह्यासाठी महत्वाचे असते. कुठलीही गोष्ट केल्यावर मिळणारा मोबदला काय आणि तो कसा आणि कितीआनंदायी आहे ह्याची चिकित्सा झाल्यावर डोपामाइन हार्मोन तयार होते. त्याची मात्रा मोबदला मिळणाची शक्यता किती जास्त आहे त्यावर ठरते. तर, डोपामाइन शरीरात किती प्रमाणात तयार होते ह्यावर उपक्रम दीर्घकाळ चालणार की नाही हे ठरते. ह्या डोपामाइनच्या योग्य पातळीसाठी खालील सोप्पे उपाय उपयोगी ठरावेत. १. समतोल आहार २. आहाराची ठरलेली वेळ ३. पुरेसा व्यायाम ४. भरपूर वाचन किंवा एखादा छंद जो नविन अनुभव देऊ शकेल ५. ध्यान (मेडीटेशन) ह्या डोपामाइनचा एक लेख रेकमेंड करतोय वाचण्यासाठी. तसेच सखोल अभ्यासाठी हे एक पुस्तक रेकमेंड करेन. Click to download the book - (उपक्रम दीर्घकाळ टिकवण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

धन्यवाद सोत्रि.तुम्ही थोडं तांत्रिक/वैज्ञानिक अंगानं लिहिलंय त्यामुळेच थोडं अधिक लिहितो. माझा प्रॉब्लेम हा मेडीटेशनसंबंधीच आहे.बर्‍याच वर्षांपूर्वी एका किचकट प्रॉब्लेममधून जाताना मानसिक ताणामुळे येणारे मनातले अनावश्यक किंवा नकारात्मक विचार कमी व्हावेत यासाठी एका स्नेह्यांनी जपमाळेचा उपाय सुचवला होता.दुसरा काही पर्याय त्यावेळी नसल्याने त्यावेळी 'शरणागती पत्करुन' मी तो उपाय केला आणि त्यामुळे कमालीचा फायदा झाला देखील. आता हे मला परत सुरु करायचं आहे.त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.पूर्वी हे कार्य बिनबोभाट घडून गेलं कारण पर्याय नव्हता,फारच अडचणीत होतो,शरणच गेलो म्हणा! आता का जमत नाहीये तर 'समस्येची तीव्रता किंवा आवाका पूर्वीइतका मोठा नाहीये.सध्याचा उपक्रम हा आहे त्यापेक्षा अधिक फायदा मिळवण्यासाठी करत आहे. यात अजून एक लोचा म्हणजे मी जरा चिकित्सक आहे.जपमाळेचा उपाय हा तसा 'एकसुरी' आहे.दररोजचा अर्धा तास.सुरुवातीला पहिले ५-६ दिवस चिकाटीने केला जातो.नंतर नंतर ती मोनोटोनस क्रिया जोखड वाटू लागते.याच्याऐवजी इतकाच प्रभावी पण एकसुरी नसणारा उपाय करता येईल का यावर समांतरपणे विचार सुरु राहतो.त्यामुळे त्या जपावर १००% एकाग्रता होत नाही.हातात माळ,तोंडातून 'यांत्रिकपणे' बारीक आवाजात जप सुरु.पण मेंदूत विचार मात्र या जपमाळेपेक्षा दुसरा एखादा 'कंटाळवाणा नसणारा' उपाय असेल का याच्या चिंतनावर.नंतर नंतर तर इमॅजिनेशनला चेव चढून कल्पनेत मी बोरींग चेहर्‍याने जप करत असल्याचे कल्पनाचित्र मला दिसू लागते.पुढे पुढे १-२ दिवस खंड पडतो.मग बळजोरीने परत काही दिवस रेटले जाते.हा खंड पडण्याचा कालावधी वाढला तर उत्साह जवळपास संपल्यात जमा होऊन उपक्रम थंडावतो.मी आचरत असलेल्या उपायामुळे मला फायदा होणार आहे हे मला १००% माहित आहे.तसूभरही शंका नाही. सारांशाने सांगायचे तर उपक्रम बारगळ्याचे कारण हे त्या उपक्रमाच्या प्रक्रियेतला 'एकसुरीपणा' हे आहे. यावर काय उपाय करता येईल?

In reply to by उपयोजक

उपक्रमाविषयी सविस्तर पार्श्वभूमी सांगिल्यावर प्रॅाब्लेम स्टेटमेंट स्वच्छ झालं. व्यनि करतो, चर्चा करूयात, मीही ह्यातून गेलोय / जातोय. - (मुमुक्षू) सोकाजी

In reply to by उपयोजक

तर इतका गोंधळ झाला नसता ! लपवाछपवीमुळे गुंता वाढत जातो हा फंडा आहे. १. जप ही मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवायची सर्वात बोगस पद्धत आहे. ते लहान मुलाचं लक्ष त्याच्या हट्टापासून काही काळ दुसरीकडे वेधण्यासारखं आहे. जप थांबला की पुन्हा मनातला गोंधळ दुप्पट वेगानं उसळी मारुन सुरु होतो. थोडक्यात जप हा निर्बुद्ध टाईमपास आहे. एकतर तो करत असतांना तुम्हाला दुसरं काही करता येत नाही आणि तो थांबवला की मनाच्या आवेगाची दहशत कायम रहाते. तस्मात, हा प्रोजेक्ट ड्रॉप करणं उत्तम ! २. मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवण्याचा एकमेव उपाय आणि पहिली स्टेप म्हणजे त्याची व्यर्थता लक्षात येणं. मनानी कोणतंही काम होत नाही. काम शरीर आणि मन यांच्या संगतीनंच होऊ शकतं. त्यामुळे मनानं काम करण्याचा खटाटोप सोडून देणं श्रेयस. उदा. घरात असतांना मनानी ऑफिसला जाण्याचा प्रयत्न हा असंभव प्रयास आहे. मन आणि शरीर कायम एकसंगत असतील तरच काम होईल इतकी साधी गोष्ट लक्षात आली की तुमची ७० ते ८० टक्के मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबलीच म्हणून समजा. ३. कायम समोर पहाणं आणि आजूबाजूला चाललेलं ऐकत रहाणं हे जगातल्या सर्व ध्यानप्रणालींचा अभ्यास करुन मी शोधलेलं सर्वोच्च आणि सर्वात सोपं मेडीटेशन आहे. एकदा तुम्हाला ते जमलं की मनाची दहशत संपलीच म्हणून समजा.

In reply to by संजय क्षीरसागर

जप ही सर्वात बोगस पद्धत आहे जप हा निर्बुद्ध टाईमपास आहे. मनानी कोणतंही काम होत नाही. जगातल्या सर्व ध्यानप्रणालींचा अभ्यास करुन

मी

शोधलेलं सर्वोच्च आणि सर्वात सोपं मेडीटेशन आहे. एकदा तुम्हाला ते जमलं की मनाची दहशत संपलीच म्हणून समजा.

In reply to by सुबोध खरे

मी जेवलो याचं दुसरं वर्शन करुन दाखवा. आणि अर्थात ती मी शोधलेली पद्धत आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननी लावला असंच वाक्य होणार. तुम्ही उगीच गोंधळ घालून विषय भरकटवण्यापेक्षा, जमल्यास ते मेडीटेशन करुन पाहा, प्रचिती येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

मी कुठे काय म्हणालोय? मी फक्त तुमचेच शब्द लिहिलेले आहेत. त्यात माझे अक्षरशः एकही अक्षर नाही जाता जाता -- खाई त्याला खवखवे अशी एक म्हण ऐकली आहे.

In reply to by सुबोध खरे

तद्दन प्रतिसाद देऊन आणखी शोभा होते. खवखवतंय तुम्हाला की लेखकानं सरते शेवटी नक्की प्रॉब्लम उघड केला. तुम्ही उगीच फालतू मुद्दा लावून धरला होता तो आता फेल गेलायं.

In reply to by संजय क्षीरसागर

स्वतः काहीही विचार न करता हा स्वत:ला हवा तसा केलेला तर्क आतातरी उघडा पडलाय का? फेल गेला का आतातरी? की अजून काही मल्लिनाथी येणारेय यावरदेखील? धागा विषयाबद्दल बोलाल तर बरे होईल. किंवा दुसरे झाड धरावे!

In reply to by उपयोजक

इतका वेळ तुम्ही ताकाला जाऊन भांडं लपवत होता आणि म्हणून ते निरिक्षण पर्फेक्टच होतं ! आता झकत नेमका प्रश्न लिहिल्यामुळे धागा योग्य वळणावर आला आहे.

In reply to by उपयोजक

सगळ्यांनी मुद्दा सोडून आधी मला घेरायचा प्रयत्न करायचा आणि काही जमलं नाही की ही मखलाशी ! व्यक्तिगत होण्यापेक्षा सगळे मुद्दा धरुन लिहायला लागले तर संकेतस्थळावर सर्वांना उपयोगी असं काही तरी विधायक होत राहील.

In reply to by संजय क्षीरसागर

आधी मला घेरायचा तसे का होते याचा विचार केलात का कधी? १. तुमचे प्रतिसाद हे अनावश्यकपणे धार लावलेले असतात. सौम्य शब्दांत आपला मुद्दा समोरच्यापर्यंत पोहचवता येतो यावर तुमचा विश्वास नाही.जगात कोणीही परिपूर्ण नसतो हे मुख्य तत्वच तुम्ही विसरता. ही अनावश्यक धार न लावता संवाद साधायचा प्रयत्न करा.शाब्दिक तलवारींचा खणखणाट नसावा. २. तुम्ही अध्यात्म,विज्ञाननिष्ठता या विषयात इथल्या लोकांपेक्षा थोडे अधिक ज्ञानी असालदेखील.पण त्यामुळे अध्यात्म,विज्ञाननिष्ठता या विषयातलं जगातलं सगळं ज्ञान तुम्हाला आहे असा तुमचा गैरसमज होतो. आणि त्यातून तुम्ही तुमचे विचार लादायला बघता.विचार मांडावेत आणि लोकांना तुमच्या विचारांवर विचार करायला वेळ द्यावा हे तुमच्या लक्षातच येत नाही.तुमचे विचार लोकांनी बिनबोभाटपणे मान्य करावेत असा तुमचा दुराग्रह असतो. तुमचे विचार पटले तर लोक तसं सांगतील ना! पटलेच पाहिजेत असा दुराग्रह नसावा.

In reply to by उपयोजक

२. तुम्ही अध्यात्म,विज्ञाननिष्ठता या विषयात इथल्या लोकांपेक्षा थोडे अधिक ज्ञानी असालदेखील. अहो उपयोजक, हा गैरसमज दूर करा हो आधी.

In reply to by उपयोजक

अर्थात, हाच धागा पाहा : १. तुम्ही पोकळ धागा काढला म्हणून मला स्पष्ट प्रतिसाद देणं भाग पडलं. २. इतर सदस्यांना मधे पडायची गरज नव्हती तरी ते मुद्दा लक्षात न घेता नाहक मधे पडले (आणि तुमचं स्पष्टीकरण आल्यावर तोंडावर आपटले). त्यांचे प्रतिसाद किती व्यक्तिगत आहेत ते पाहा. अशा लोकांना सांगायची इथे कुणाची हिंमत नाही; त्यामुळे जशास तसे उत्तर देणे क्रमप्राप्त झाले. ३. जालावर कुणी कुणाचं ऐकून घेत नाही त्यामुळे मी मतं लादतो हा तर फारच तकलादू युक्तीवाद आहे. थोडक्यात, तुम्हाला माझं पटलं तरच तुम्ही जपाचा नाद सोडाल हे सरळ आहे. ४. शिवाय राजेंद्र बर्व्यांचे सगळे मुद्दे बाद झाले आहेत त्याचा तुम्हाला आणि इतरांनाही (नीट विचार केला तर) हमखास उपयोग होईल. ५. नामस्मरणाचा फोलपणा शाम भागवतांच्या अप्रिय आठवणींच्या धाग्यावर यथोचित खोडून काढला होता. जप हा तोच प्रकार आहे. माझ्याबाजूनी सर्व मुद्देसूद आणि सकारण लिहिलेलं आहे. या उप्पर जशास तसे हा व्यावहारिक दृष्टीकोन आहे हे समजायला काहीच अडचण नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

५. नामस्मरणाचा फोलपणा शाम भागवतांच्या अप्रिय आठवणींच्या धाग्यावर यथोचित खोडून काढला होता. जप हा तोच प्रकार आहे. माझ्याबाजूनी सर्व मुद्देसूद आणि सकारण लिहिलेलं आहे. या उप्पर जशास तसे हा व्यावहारिक दृष्टीकोन आहे हे समजायला काहीच अडचण नाही.
हाहाहा. तसं काहीही झालेलं नाहीये. तुम्ही तर्काच्या जोरावर विचार करता व मुद्दे मांडता. नामस्मरण हे तर्काच्या कक्षेच्या बाहेर असल्याने ते तुम्हाला कधीच कळू शकणार नाही. प्रत्यक्ष कृती करून व अनुभव घेऊनच जाणता येणारी गोष्ट आहे ती. नामस्मरण करत असताना एक क्षण असा येतो की देहभान हरवते. आजूबाजूचा कोलाहल गोंगाट सगळंच एकदम विरून जाते. परत जेव्हा भान येते, तेव्हां अंग हलकं झालेले असते. प्रसन्नतेचा अनुभव येत असतो. कितीही शारिरीक कष्ट झालेले असले तरी ते सगळे निघून गेलेले असतात. तुम्ही कितीही तर्काच्या जोरावर विचार केला तरी तुम्हाला ते कळू शकणार नाही. तिथे प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता असते. मात्र या अनुभवानंतर आपण कोणितरी विशेष आहोत हा अभिमान धरायचा नसतो, तर ह्या बोधात जगायचे असते. त्यातून शहाणपण व अखंड प्रसन्नता प्राप्त होत असते. त्याची परिणिती अजातशत्रूत्वात होत असते. नामस्मरणाच्या माध्यमातून शांतता अनुभवणाऱ्याला हे सहज जमू शकते. कारण ही स्थिती मी मिळवलेली नसून, ती मला भगवंताच्या कृपेने लाभलीय अशी भावना असते. त्यामुळे या शांततेचा वारंवार अनुभव घेताना त्याच्यातील कृतज्ञता वाढत जात असते, नम्रता अंगी बाणली जात असते. मात्र इतर मार्गांनी शांतता अनुभवणाऱ्यांना मात्र मी ही स्थिती मिळवली आहे असे वाटत असल्याने, “आपण कोणी विशेष आहोत” हा अभिमान नडतो. इतकेच नव्हे तर मला सगळे कळते असे वाटू लागल्याने नवीन ज्ञान ते मिळवू शकत नाहीत. त्यामुळे नामस्मरण कसं काम करते हे तुम्हाला कधीच कळू शकणार नाही. तर्काच्या सहाय्याने तर्काच्या पलिकडे असलेले भगवंताचे नाम जाणण्याचा प्रयत्न करणे हे मुलाने आपल्या वडिलांच्या बारशाला हजर राहण्याचा अट्टाहास करण्यासारखे आहे. यासाठी मी माऊलींची ओवी उद्धृत केली होती. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळीकाळाचा रीघ नाही ॥२५.२॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी तें जीवजंतूंसी काय कळे ॥२५.३॥ पण तुमची सर्व संतांबद्दलची मते माहीत असल्याने थांबायचे ठरवले. पण शेवटचा प्रतिसाद आपला असला की आपण जिंकलो असा तुमचा ग्रह झालेला असल्याने काय करावे हे कळत नव्हते. साधारणत: वाद थांबवायचा असेल तर मी नमस्कार करून बाजूला होतो. पण त्याचा वेगळाच अर्थ घेतला जाऊ लागल्याचे लक्षात आल्याने ॐ शांती ॐ ने समारोप करायचा असा करायचा प्रघात मी सुरू केला. खरे तर मी उत्तर देणार नव्हतो. त्याचा तुम्हाला काहीच उपयोग नाही. मात्र
नामस्मरणाचा फोलपणा शाम भागवतांच्या अप्रिय आठवणींच्या धाग्यावर यथोचित खोडून काढला होता.
या तुमच्या वाक्याने धागाकर्ता आणखीन गोंधळात पडू नये यासाठी हे सगळे लिहायला लागले. परत एकदा ॐ शांती ॐ

In reply to by शाम भागवत

इतरांच्या धारणांना तो शह देतो तेंव्हा “आपण कोणी विशेष आहोत” असा तकलादू युक्तीवाद करुन त्याची बोळवण करण्याचा प्रयत्न केला जातो. १. कोणत्याही नामजपापेक्षा सजगता सरस आहे. इतकी वर्ष नामसाधना करुन सुद्धा साधक कल्पना आणि वास्तव यात फरक करु शकत नाही याचा अर्थच साधकाला फक्त गुंगी आलेली आहे. तो साध्या कल्पनेनी इतका बेभान होतो की त्याची सर्व साधना आणि शांती एका क्षणात हरवून जाते. २.
मात्र या अनुभवानंतर आपण कोणितरी विशेष आहोत हा अभिमान धरायचा नसतो, तर ह्या बोधात जगायचे असते. त्यातून शहाणपण व अखंड प्रसन्नता प्राप्त होत असते. त्याची परिणिती अजातशत्रूत्वात होत असते.
ही भावना किती फोल आहे याची कल्पना तुम्हाला स्वतःच्या त्या पोस्टवर लिहिलेल्या अनुभवातून आलेली आहे. सजग व्यक्ती विषय तिथल्या तिथे मिटवते, मग भूतकाळाचं ओझंच रहात नाही. थोडक्यात, अप्रिय आठवणींपासून सुटकेसाठी कल्पनेतल्या व्यक्तीला काल्पनिक क्षमा करणं, असा भोळसट प्रकार करावा लागत नाही. ३.
तर्काच्या सहाय्याने तर्काच्या पलिकडे असलेले भगवंताचे नाम जाणण्याचा प्रयत्न करणे हे मुलाने आपल्या वडिलांच्या बारशाला हजर राहण्याचा अट्टाहास करण्यासारखे आहे
उलट आहे, नामस्मरणाची गुंगी चढलेल्याला आपण वडिलांच्या बारशाला हजर होतो असा सुद्धा भास होऊ शकतो ! पण सजग व्यक्ती सर्व आभासी दुनियेतून मुक्त झालेली असते. (तुम्हाला इतरांना क्वोट करुन रुपकात्मकतेनं विधानला जोर आणावा लागतोयं) ४.
शेवटचा प्रतिसाद आपला असला की आपण जिंकलो असा तुमचा ग्रह झालेला असल्याने काय करावे हे कळत नव्हते.
प्रतिसादात मटेरियल असेल तरच तो टिकतो, नाही तर ॐ शांती ॐ करत पुन्हा नामाची गुंगी चढवून घेण्यापरता उपाय रहात नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

जप ही मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवायची सर्वात बोगस पद्धत आहे. तुमच्याकडून हा असाच काहीतरी प्रतिसाद येणार याची १००% खात्री होती.म्हणून धाग्याच्या निवेदनात स्पष्टपणे सांगत नव्हतो. --------------------------------------------- प्रफुल्ल डॉ . राजेंद्र बर्वे स्मरण - विस्मरण स्मरणाचं महत्त्व प्रत्येक धर्मगुरूंनी , संतांनी , महंतांनी आणि सद्गुरूंनी आपल्या सर्वांना पटवलं आहे . वैखरीवाटे प्रकट होणारे ' नाम ' अगदी अंतरात्म्यापासून आलं पाहिजे , याचा आग्रह धरला आहे . आपल्या आराध्यदैवताचं गोड नाव असो की आपापल्या गुरूंनी कानात सांगितलेले मंत्रात्मक नाम असो . ज्यानं त्यानं मुखात परमेश्वराचं नाव धारण केलं पाहिजे , असा उपदेश केला जातो . सर्व पिढ्यांतल्या काही आबालवृद्धांना नामस्मरणाची महती पटते असं नाही , तर त्यांना ते आचरणातही आणता येते . आपापली अत्यंत जिकिरीची आणि जटिल कामं पार पाडताना मनातल्या मनात नामस्मरण करीत राहण्याची तारेवरची कसरत ' त्यांना जमते . खरंच , अशा मंडळीचं कौतुक वाटतं . परंतु सर्वसामान्य माणसांना ते जमतंच असं नाही . पटतं ; पण वर्तनात वठत नाही . कळतं ; पण वळत नाही . तर काही विलक्षण चिकित्सक शास्त्रीय विश्लेषण करू इच्छिणाऱ्या शिक्षित लोकांना ते आवडलं तरी पटतंच असं नाही . त्यांना असं नामस्मरण अनाठायी आणि अवडंबर आहे असं वाटतं . अशा लोकांसाठी काही विश्लेषण ! मानसशास्त्रानुसार मनाची एकाग्रता म्हणजे एखाद्या संवेदनेवर लक्ष केंद्रित करणं . असं अवधान खरोखरंच एकाग्र असतं . स्मरण करताना त्या एकाच संवेदनेवर अथवा मनांतर्गत विचारावर लक्ष केंद्रित होतं . त्या एकाग्रतेनं मानसिक शक्ती एकवटण्याची क्षमता मनात निर्माण होते . मनाला लक्ष एकाग्र करण्याचं प्रशिक्षण मिळतं . अशा प्रशिक्षणाचा आपल्याला खूप फायदा होतो . पण नामस्मरणाच्या उपयुक्ततेचं रहस्य पुढे आहे . आपण स्मरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपोआप विस्मरणाची प्रक्रिया सुरू होते . चक्रावलात ना ? मनामध्ये असंख्य विचार असतात . काही होकारात्मक , काही नकारात्मक . ( काहींच्या बाबतीत नकारात्मक अधिक ) नामस्मरण होकारात्मक असतं , अशा होकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते जमू लागलं की आपोआप ' नकारात्मक ' विचारमालिकाचं विस्मरण होतं . होकारात्मक विचारांची मनात स्थापना होते . नकारात्मक विचारांना गच्छन्ती मिळते . ते विचार मनातून मावळतात . होकारात्मक विचारातून सद्गुणांवर विश्वास निर्माण होतो . त्या विश्वासातून ' आशा ' जन्म घेते . आशा म्हणजे उत्साहित मन , प्रसन्न मन प्रफुल्ल मन ! आहे की नाही गंमत !! तुमची माझी!!! drrajendrabarve@yahoo.com ----------------------------------------------- आता हे डॉक्टर राजेंद्र बर्वे कोण ते इथे वाचा. https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0… मुंबई विद्यापीठातून डॉक्टरकीची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. पण तुमच्या ज्ञानाच्या तुलनेत यांचं ज्ञान आणि अनुभव तसं किरकोळच असणार नाही का? ;)

In reply to by उपयोजक

तुमची सतावणारी मेंटल अ‍ॅक्टिवीटी ? एनी वे, काय म्हणतात बर्वे पाहा : १.
मानसशास्त्रानुसार मनाची एकाग्रता म्हणजे एखाद्या संवेदनेवर लक्ष केंद्रित करणं . असं अवधान खरोखरंच एकाग्र असतं . स्मरण करताना त्या एकाच संवेदनेवर अथवा मनांतर्गत विचारावर लक्ष केंद्रित होतं . त्या एकाग्रतेनं मानसिक शक्ती एकवटण्याची क्षमता मनात निर्माण होते . मनाला लक्ष एकाग्र करण्याचं प्रशिक्षण मिळतं . अशा प्रशिक्षणाचा आपल्याला खूप फायदा होतो .
मन एकाग्र करण्याचा प्रयत्नच विक्षेप निर्माण करतो ! तुम्ही प्रेयसी समवेत असतांना मनाची एकाग्रता साधता का ? तीचा सहवासच मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवतो. ही निर्विचार अवस्था हेच रिलॅक्सेशन आहे. त्यामुळेच तर तीचा सहवास हवाहवासा वाटतो. तस्मात, जपानी मन एकाग्र करणं व्यर्थ आहे (हे तुम्हाला ही लक्षात आलं आहे आणि म्हणूनच तुमचा प्रोजेक्ट बारगळला आहे !) २.
पण नामस्मरणाच्या उपयुक्ततेचं रहस्य पुढे आहे . आपण स्मरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपोआप विस्मरणाची प्रक्रिया सुरू होते . चक्रावलात ना ? मनामध्ये असंख्य विचार असतात . काही होकारात्मक , काही नकारात्मक . ( काहींच्या बाबतीत नकारात्मक अधिक ) नामस्मरण होकारात्मक असतं , अशा होकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते जमू लागलं की आपोआप ' नकारात्मक ' विचारमालिकाचं विस्मरण होतं . होकारात्मक विचारांची मनात स्थापना होते . नकारात्मक विचारांना गच्छन्ती मिळते . ते विचार मनातून मावळतात . होकारात्मक विचारातून सद्गुणांवर विश्वास निर्माण होतो . त्या विश्वासातून ' आशा ' जन्म घेते . आशा म्हणजे उत्साहित मन , प्रसन्न मन प्रफुल्ल मन ! आहे की नाही गंमत !! तुमची माझी!!!
नेगटिव विचार हद्दपार करायला सजगता लागते. सजगतेमुळे नेगटिव विचार येता क्षणी तुम्ही सावध होता आणि लगोलग तो विचार निघून जातो. बर्व्यांचा सजगतेचा अभ्यास शून्य आहे. एकदा विचारचक्र सुरु झालं की सकारात्मक विचारांमागे नकारात्मक विचार आपसूक येणारच. बर्व्यांना निर्मन अवस्थेची कल्पनाच नाही त्यामुळे त्यांचा मनाचा अभ्यास एकांगी आणि निरुपयोगी आहे .

In reply to by संजय क्षीरसागर

नामस्मरण मन एकाग्र करूनच करावे असे काही बंधन आहे का? खरे तर हे बोलायचा मला अधिकार नाही, पण तरी सांगतो.. नामस्मरण एक विशिष्ट मर्यादेपलीकडे गेले की ते एक छंद होऊन जाते, आणि ज्याला त्याची गोडी लागेल त्याला ती गोडी खूपच चांगली वाटते असे म्हणतात.

In reply to by शाम भागवत

यथार्थ आणि मार्मिकपणे मांडला आहे ते वाचलेलंच दिसत नाही ! वाचा :
यात अजून एक लोचा म्हणजे मी जरा चिकित्सक आहे.जपमाळेचा उपाय हा तसा 'एकसुरी' आहे.दररोजचा अर्धा तास.सुरुवातीला पहिले ५-६ दिवस चिकाटीने केला जातो.नंतर नंतर ती मोनोटोनस क्रिया जोखड वाटू लागते.याच्याऐवजी इतकाच प्रभावी पण एकसुरी नसणारा उपाय करता येईल का यावर समांतरपणे विचार सुरु राहतो.त्यामुळे त्या जपावर १००% एकाग्रता होत नाही.हातात माळ,तोंडातून 'यांत्रिकपणे' बारीक आवाजात जप सुरु.पण मेंदूत विचार मात्र या जपमाळेपेक्षा दुसरा एखादा 'कंटाळवाणा नसणारा' उपाय असेल का याच्या चिंतनावर.नंतर नंतर तर इमॅजिनेशनला चेव चढून कल्पनेत मी बोरींग चेहर्‍याने जप करत असल्याचे कल्पनाचित्र मला दिसू लागते

In reply to by उपयोजक

मुंबईवरून दिल्लीला पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणी कोणता मार्ग पकडून दिल्लीला पोहोचतो हे महत्वाच नसून पोहोचणं महत्वाचं असतं. एक २५ वर्षांचा सधन तरूण विमानाने दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करतो म्हणून दिल्ली गाठण्याचा तोच एक मार्ग असं असू शकत नाही. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या मार्गाने दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करणार. ध्यानाचेही तसेच आहे. विविध मार्ग आहेत. ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार (कर्मसंस्कारांच्या ओझ्यानुसार किंवा अविद्येच्या पडद्यानुसार) जो तो आपापल्या अनुभूतीने मार्ग अवलंबतो. कारण मुक्ती मिळणं महत्वाचं कशी आणि कधी हे गौण असतं! - (मुमुक्षू) सोकाजी

In reply to by सोत्रि

तस्मात, तो मुक्तीचा मार्गच नाही. उगीच गोलगोल फिरण्यापेक्षा जपानं मुक्ती कशी मिळते हे लिहा. तो तुमचा मार्ग नसेल किंवा त्याविषयी तुमचा अभ्यास नसेल तर प्रतिसाद न देणं योग्य. बर्व्यांच्या मेथडॉलॉजीचा वरच्या प्रतिसादात यथोचित उहापोह झाला आहे त्याला अनुसरुन काही जमत असेल तर पाहा.