Skip to main content

उपक्रम

नॉन फिक्शनल साहित्य हवे आहे. व्हॉइसओव्हर आर्टीस्ट पण हवेत..

लेखक विनिता००२ यांनी मंगळवार, 02/08/2022 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लेखक मित्र-मैत्रिणींनो, 'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात… आपण चांगले नॉन फिक्शनल साहित्य लिहीत असाल...(किंवा लिहीण्याची इच्छा असेल).....म्हणजे मोटीव्हेशनल, माहीतीपर, मराठी साहित्यातील विभूतींवर, लेखकांवर इत्यादी जसं की त्यांचे जीवनचरित्र, एखाद्या विषयावरची स्टेप बाय स्टेप माहीती..... तर आपण आपले स्वलिखित साहित्य आम्हांला देऊ शकता. प्रकाशित असेल तरी चालेल...पण ऑडिओ बनलेले नकोत. निवड झालेल्या साहित्याचे ऑडिओबुक बनेल अगदी मोफत!

'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा २०२१'

लेखक विनिता००२ यांनी गुरुवार, 11/11/2021 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा २०२१' नमस्कार मिपाकर, 'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे. ह्या वर्षी आम्ही प्रथमच 'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा' आयोजित करत आहोत. आपण ह्यात वैयक्तिक किंवा सांघिक भाग घेवू शकता. अधिक माहितीसाठी मला संपर्क करावा - ७७०९०७३००८ / pisalvinita@gmail.com

उपक्रम/चांगल्या सवयी दीर्घकाळ चालवणे

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 20/10/2020 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याचदा आपण आपल्या व्यक्तिमत्वात काही चांगला बदल घडवण्याच्या उद्देशाने काही नवीन सवयी लावू पाहतो.जसे की दररोज पहाटे उठून व्यायाम करणे किंवा दररोज किमान २० मिनिटे मेडीटेशन करणे किंवा दररोज ठराविक अंतरापर्यंत सायकल चालवणे इ. असे बरेचसे बदल उपक्रम असतील आणि बरेच लोक तो ठरवत असतील.पण हे उपक्रम दीर्घकाळ टिकवणे सोपे नसते.२-३ दिवसात त्याचा कंटाळा येतो आणि तो उपक्रम सोडून द्यावासा वाटतो; किंवा मधेच काही कारणांनी खंड पडतो आणि पुन्हा तो उपक्रम सुरु करणे टाळण्याकडे मनाचा कल असतो किंवा पुरेशी मानसिक ऊर्जा नसल्याने पुनश्च हरिअोम होत नाही. असे का होते? या उपक्रमांमधे रंजकता नसल्याने असे होते का?

ग्रंथपेटी

लेखक अनुप देशमुख यांनी शुक्रवार, 05/04/2019 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, पुस्तक प्रेमातून एक कीडा डोक्यात वळवळत आहे, म्हटलं आपल्या माणसात पहिल्यांदा सांगावा न जाणो ही कल्पना कुठपर्यंत जाईल. सध्या सर्वजण (लहान, थोर, मध्यमवयीन) कुठल्या ना कुठल्या कारणाने हरतऱ्हेच्या स्क्रिन समोर आपला दिवस घालवतात आणि बघत/वाचत रहातात. यामुळे स्क्रिन पलीकडच्या साहित्याला (कंटेंट)अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे. साहित्य मालक आपल्याला पाहिजे ते आपल्या नजरेस आणून डोक्यात भरत रहातो. कधी कधी आपण आपल्या आवडत्या कधी काळी वाचायचं ठरवलेल्या गोष्टी / पुस्तकं सुद्धा वाचत नाही. डोळ्यांचे दुष्परिणाम आहेत ते वेगळेच. या सगळ्या धबडग्यात खूप मोठा वारसा हरवत चाललेला आहे तो म्हणजे वाचनसंस्कृती.

मराठीप्रेमी पालक महासंमेलन

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 27/11/2017 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
या सविनय नमस्कार, मातृभाषा शिक्षणाचं जगभर निर्विवाद सिद्ध झालेलं महत्व, महाराष्ट्रातील मराठी शाळांचं संवर्धन, पालकांच्या मनातील समज-गैरसमज, शासनाची धोरणं, शिक्षकांची तळमळ आणि कोंडी, पालकांची संभ्रमावस्था, मुलांवरचा ताण, इंग्रजी भाषा व इंग्रजी माध्यम अशा अनेक विषयांना धरून, मोठ्या प्रमाणावर पालकांचं, शिक्षकांचं आणि शाळांचंही एक महासंमेलन मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित केलेलं आहे.

द इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट अँड डेव्हलपमेंट पॉलिसी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 07/06/2017 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
आपण ट्रॅफिक, गर्दी, रस्ते या सगळ्याला शिव्या नेहमीच घालत असतो. परंतु या सगळ्याबद्दल काहीतरी प्रत्यक्षात करण्याची संधी एक तर विशेष येत नाही, आणि आली तर आपण सहभाग घेत नाही. एक उपक्रम नुकताच वाचनात आला ज्याबद्दल मिपाकरांना सांगावं असं वाटलं म्हणून हा धागा. विशेष माहिती नसल्याने निबंध लिहीत बसत नाही, पण उपक्रमाचा दुवा देतो. माझी खात्री आहे इच्छुक आणि पात्र मिपाकरांची संख्या माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल. या दुव्यावरील 'गेट इन्व्हॉल्व्ह्ड' या अक्षरांवर क्लिक केलं असता आपण या उपक्रमाचा कुठल्या कुठल्या प्रकारे भाग होऊ शकता ते आपल्याला समजेल. http://itdp.in/

कुणी तयार आहे का माझ्यासोबत खो कथा ( chain fiction Story) लिहायला ?

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 15/03/2017 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
दोन किंवा त्यापेक्षा जास्त लेखकांनी लिहलेल्या कथांना chain fiction असं म्हणतात. ही कथा कशी लिहली जाते ते सांगतो – एका लेखकाने कथा लिहायला सुरुवात करायची आणि अर्धवट सोडून द्यायची, दुसऱ्याने त्याच्या पुढचा भाग लिहायचा, तिसऱ्याने त्याच्या पुढचा वगैरे वगैरे. परत दुसरा round, तिसरा round. अशापद्धतीने कथा पुर्ण करायची. (थोडक्यात एकमेकांना खो देत पुढे जायचं) कथालिखाण करतांना भिडूंनी एकमेकांशी चर्चा करायची नाही.