उगवत्या सूर्याचा देश
जपान! उगवत्या सूर्याचा देश! शाळेमध्ये इतिहास,भूगोलाच्या पुस्तकांतून जपानची ओळख झाली,तर पु.लंच्या पूर्वरंग आणि तानाजी एकोंडेंच्या 'उगवत्या सूर्याचा देश' या पुस्तकातून जपानशी ओळख झाली.त्या ओळखीचं कधीतरी एकदम स्नेहात आणि मैत्रीत रुपांतर होईल, असं कधी स्वप्नात सुध्दा वाटलं नव्हतं.
A I 134 , मुंबई- दिल्ली-हाँगकाँग- ओसाका असा आमच्या विमानाचा मार्ग! आपल्याला गाड्या लेट होण्याची सवय,आमचे विमानही लेट झाले,चांगले ३ तास! थोडा कंटाळा प्रवासाच्या सुरुवातीलाच आला,एवढ्या वेळात दिल्लीपर्यंत पोहोचलो असतो असं स्वत:लाच सांगून झालं, पहिल्यांदाच देश सोडणार होते,माझी मायेची माणसं सोडून जाणार म्हणून थोडी हुरहुर मनात होतीच..
एकदाचे आम्ही विमानात बसलो,पट्टे बांधण्याची उद्घोषणा झाली,आणिबाणीच्या काळात वागण्याच्या आवश्यक सूचना देऊन झाल्या,आणि धावपट्टीवर विमान धावू लागले,विमानाबरोबरच माझे मनही धावू लागले, विमान आकाशात झेपावले आणि काही काळाकरता का होईना धरणीशी नाते तुटले.. खिडकीतून खाली मुंबापुरीतल्या दिव्यांचा लखलखाट दिसत होता. हळूहळू सारे मुंगी एवढे दिसू लागले आणि सभोवार चांदण्या दिसू लागल्या,आतमध्ये हवाई सुंदर्यांची लगबग,सरबराई चालू झाली.तासाभरातच दिल्लीच्या "आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर " आलो.परत एकदा सिक्युरीटी चेक चे सगळे सोपस्कार झाले. ओसाका जन्मगाव असलेली एक जपानी ललना मला तिथे भेटली आणि मी सुध्दा ओसाकाला जाते आहे हे ऐकून जपानी इंग्रजीत कुतुहुलयुक्त प्रश्नांचा माराच तिने सुरू केला.खिडक्या बंद करून आम्हाला 'गाई गाई' करायला लावून विमानसुंदर्याही झोपल्या.
माझे घड्याळ पहाटेचे साडेचार दाखवत होते,पण बाहेर लख्ख उजाडले होते.सकाळचे ७.१५ इथला लोकल टाईम दाखवत होते.म्हणजे हाँगकाँग आले तर... खिडकीतून बाहेर डोकावले. एकीकडे प्रशांत निळासागर आणि डोंगरातून विमान खाली झेपावत होते,सागराच्या लाटा खुणावत होत्या.समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे.परीने ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला उतरलं.चढणारे,उतरणारे प्रवासी,सफाईकामगारांची लगबग असा गजबजाट झाला.उरली सुरली झोप कडक कॉफीने उडाली.आता विमानाने परत आकाशात झेप घेतली,ढगांच्याही वर निळ्या निळाईतून जाऊ लागलो आम्ही,उगवत्या सूर्याच्या देशाकडे..
ओसाका कानसाई विमानतळाचे विहंगम दॄश्य फार सुंदर दिसते असे दिनेशने आधीच सांगून ठेवल्याने खिडकीला नाक लावूनच बसले होते आणि ते सारे डोळ्यात साठवत होते.सुंदर्,स्वच्छ रेखीव रस्ते,मुंग्यांची रांग वाटावी अशा पळणार्या गाड्या,जुन्या पध्दतीची घरे अशी रांगोळी पाहताना अंगावर आणि मनातही रोमांच उभे राहत होते.या धरतीवर आता आपण काही महिने राहणार आहोत,जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाच्या देशात! हा विचारच इतका उत्तेजक होता की त्या नादात विमानाची चाकं जमिनीला लागली तरी अस्मादिक आकाशातच तरंगत होते.
छोटीशी शटल ट्रेन घेऊन आम्ही कस्ट्म क्लिअरन्स्,बॅगेज क्लेम कडे आलो.भाषेचा प्रश्न धास्ती करुन होताच पण सुहास्य वदना जपानी ललना आपली ती भीती पळवून लावत असाव्यात.सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी देऊन पासपोर्टावर शिक्का मारुन घेऊन सामान घेण्यासाठी पुढे आले,तिथे असलेल्या अटेंडटनेच माझी बॅग र्ट्रॉलीवर घालून दिली आणि 'हाजीमेमास्ते' असे स्वागतात्मक अभिवादन करून पुढे कसे आणि कोठे जायचे हे ही सांगितले.(मंडळी,बेल्ट वरून बॅग काढून द्यायला अटेंडंट; तो ही सुहास्यवदनी मला पुढे कधीही , कोणत्याही विमानतळावर दिसला नाही.)बॅगेत किराणासामान ठासून भरले होते,थोडे आंबेही होते दिनेश साठी.यातलं इथे काय चालतं आणि काय नाही याचा विचार मनात येऊन नर्व्हस झाले होते पण तिथल्या अधिकार्याने पासपोर्ट पाहिला फक्त आणि विचारले,"गोईंग टू मीट युअर हजबंड?" माझ्या 'हो'ला "दिस बे बित युअल लगेज.." असं उत्तर आणि मी चक्क बाहेरच आले की,समोरच दिनेश!
याद्या
30595
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! अगदी छान!
छान
In reply to वा! अगदी छान! by गुंडोपंत
काय विमानतळ आहे!
In reply to छान by सहज
विचारायचे होते
छान,
हेच
In reply to छान, by विसोबा खेचर
मस्त!
स्वाती ताई
एक लेख
In reply to स्वाती ताई by टीकाकार-१
माफ करा हं
In reply to एक लेख by स्वाती दिनेश
तुमचे नाव टीकाकार असल्याने
In reply to माफ करा हं by टीकाकार-१
जय हो
In reply to तुमचे नाव टीकाकार असल्याने by आजानुकर्ण
"मिसळीवरची
In reply to जय हो by जुना अभिजित
आम्ही
In reply to "मिसळीवरची by टीकाकार-१
अच्छा...अच्
In reply to तुमचे नाव टीकाकार असल्याने by आजानुकर्ण
कारण
जपान
जपानला
In reply to जपान by जुना अभिजित
छान सुरवात
काय
In reply to छान सुरवात by विकास
छान !
स्वाती,
वा वा
उत्सुक
धन्यवाद
मस्त
>>समुद्राला