Skip to main content

पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत : भारतीय मानसिकतेतला फंडामेंटल घोळ !

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 08/07/2020 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही एकमेकात गुंफलेल्या, फंडामेंटली चुकीच्या मानसिक धारणा आहेत. कर्मसिद्धांत मानणं म्हणजे आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेण्याऐवजी, ते आपल्या पूर्वसंचिताचं फळ समजून गप्प बसणं, किंवा (आता इलाजच नाही म्हटल्यावर), दुसर्‍याला माफ करणं, किंवा प्रसंग निस्तरण्याशिवाय पर्यायच नसेल तर, अत्यंत पडेल मनोवृत्तीनं, जमेल तसा प्रसंग रेटणं ! शिवाय ही थिअरी मानणार्‍याला, पूर्वसंचितात आपली नक्की किती लफडी आहेत याचा पत्ता नसतो, त्यामुळे आला बिकट प्रसंग की लाव थिअरी असं करत; तो स्वतःचा सारासार विचार कायमचा गमावून बसतो. त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? या लेखावरचे प्रतिसाद, जनमानसात ही भावना किती डीप गेलीये ते दर्शवतात. त्यामुळे, पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही धारणांच निस्सरण झाल्याखेरिज, आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेता येणार नाही. यास्तव ही पोस्ट. _____________________________________ या धरणा अनेक ग्रंथात आणि अनेक अध्यात्मिक दिग्गजांनी दिमाखात मांडल्या आहेत, त्या ग्रंथांच्या किंवा दिग्गजांच्या अवमानाचा कोणताही हेतू नाही. तस्मात, सदस्यांनी त्यांच्या श्रद्धा वगैरे मधे न आणता फक्त विषयाला धरुन प्रतिसाद दिल्यास विधायक चर्चा होईल. तर्कशास्त्रानुसार : An Asserter Has to Prove His Claim थोडक्यात `पूर्वसंचित किंवा कर्मसिद्धांत आहे' असा दावा करणार्‍यांनी तो सिद्ध करायचा आहे. _______________________________ या सिद्धांतांप्रमाणे व्यक्ती आता जे काय भोगते आहे ते त्याच्या पूर्वकर्माचं फळ आहे : मना त्वांची रे पूर्वसंचित केले । तया सारखे भोगणे प्राप्त झाले ॥ १. हा सिद्धांत मांडणार्‍यांचा मानसशास्त्राचा अभ्यास फारसा नव्हता. स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही याची त्यांना कल्पना नव्हती. २. शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही, इतकी उघड गोष्ट संतांच्या लक्षात आली नाही. ३. कर्मफलाच्या अंमलबजावणीला प्रत्येक व्यक्तीचा अनेक जन्मांचा डेटा स्टोअर करुन तो प्रत्येक व्यक्तीचं ‘कर्मफल रिअल टाईम बेसिसवर’, मॅनेज करु शकेल अशी प्रणाली अस्तित्वात हवी. अर्थात, संतमंडळींच्या वेळी अशा काही सिस्टम्सच नसल्यामुळे त्यांना आपल्या कल्पनेतला फोलपणा लक्षात आला नाही. ४. शिवाय डेटा नीती-अनीती किंवा पाप-पुण्याच्या कल्पनांवर सॉर्ट करण्यासाठी लिहावा लागणारा अल्गरिदम कुणाही देवाच्या देवाला सुद्धा, लिहिता येणं अशक्य आहे. कारण त्या कल्पनाच मुळात मानवी आहेत. समाज व्यवस्थेसाठी त्या उपयोगी असल्या तरी अस्तित्वात असा कोणताही मॉरल कोड नाही. ५. मुळात अस्तित्वात वेळ नाही त्यामुळे पूर्वसंचित ही कल्पना जे कालविभाजन गृहित धरते ते निराधार आणि कपोलकल्पित आहे. व्यक्तीच्या दृष्टीनं काल ही उपयोगीता आहे पण ती प्रक्रिया मापनासाठी माणसानं शोधलेली कल्पना आहे. अस्तित्वात फक्त एकच काळ कायम चालू आहे, तो म्हणजे वर्तमान काळ ! अशाप्रकारे पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या बोगस कल्पना आहेत. ______________________________ तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते. कोणतंही पूर्वसंचित नाही आणि अत्यंत पारदर्शक वागणुकीमुळे कोणताही कर्मविपाक नाही; ही खरी आणि वास्तविक मुक्त चित्तदशा आहे. ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ व्यक्तिगत टीका चालू असल्याने हा धागा वाचनमात्र करत आहोत. --मिपा व्यवस्थापन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 70013
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

In reply to by आनन्दा

तुमचा प्रश्न फंडामेंटल लेवलला होता आणि त्याचं वर उत्तर दिलंय. पुन्हा वाचा !

In reply to by अर्धवटराव

१) बालपणी मी जे वॅक्सीन्स घेतली त्याची योग्य स्मृती माझ्या इम्युनीटी सिस्टीममधे साठवली गेली
याचा कर्मफलाशी संबंध नाही.
२) मी ज्या हार्श प्रसंगांच्या संपर्कात आलो त्याची स्मृती माझ्या रिफ्लेक्स सिस्टीममधे साठवली गेली
ती मेंदूत असायलाच हवी. अन्यथा तुम्हाला काहीही आठवणार नाही.
३) मी ज्या काहि दृक्/श्रवण्/स्पर्श अनुभवांतुन गेलो (पाढे पाठ करणे हे त्यातच आलं) त्याची स्मृती माझ्या न्युरॉन्सच्या विशिष्ट कनेक्शन्स मधे साठवली गेली
हे पण तुमच्या मेंदूत असेल तितकेच आठवेल.
४) निसर्गाने माझ्यात जे काहि शारीरीक बदल करायचे ठरवले, ति स्मृती माझ्या जिनोम लेव्हलला साठवली गेली.
याचा ही कर्मफलाशी काहीएक संबंध नाही. _______________________________
तुमच्या डोक्यात सतत इन्सिक्युरिटीची घंटा वाजत असते हा तुमचा मानसीक लोचा असा सर्वांसमोर मांडत जाऊ नका. आम्हाला त्याची कल्पना आहे.
हा व्यक्तिगत प्रतिसाद असला तरी उत्तर देतो, सर्वांना उपयोगी होईल. मी स्वतः सत्य असल्यानं मला कोणतीही इन्सिक्युरिटी नाही की चिंता नाही. माझ्या इतकं बिनधास्त आणि जनसामान्यांच्या खोलवर रुजलेल्या धारणांवर लिहिण्याचं साहस कुणीही केलेलं नाही. शिवाय मी स्वतःच्या खर्‍या नावानं लिहितो, मला कोणत्याही लपवाछपवीची गरज नाही. तस्मात, माझी चिंताच सोडा ___________________________________ याउलट तुमचे प्रतिसाद संपूर्ण मानसिक गोंधळ दर्शवतात. तुम्हाला विषय काय आणि प्रतिसाद काय याचं भान नाही. इन्सिक्युरिटी वाटणारा इतरांना हाका मारतो आणि इतरांचा आधार शोधतो शिवाय तुमचा आयडी तुमच्या मनस्थितीचं यथार्थ वर्णन करतो, ते वेगळंच.

In reply to by संजय क्षीरसागर

एव्हढ्यात विसरलात? पाढ्यांवरुन प्रश्न तुम्हीच केले होते ना? तुम्हाला मग स्मृतींबद्दल वेगेवेगेळी माहिती दिली... एव्हढ्यात गारद झालात ? उपर्निदेष्ट वेगवेगळ्या स्मृती कशा मॅनेज होते, त्यात मेंदुचा रोल किती, इतर शरीर यंत्रणांचा रोल किती, याचं संपूर्ण विज्ञान अभ्यासाला अव्हेलेबल आहे. अर्थात, एकदाका दोन चार संगणकीय शब्दांत अक्ख्या जैव-विज्ञानाची वाट लावायची म्हटल्यावर त्या अभ्यासाची काहि गरज नाहि. सुलभीकरण हेच ज्ञान, नाहि का? स्मृती स्ट्रींगवरुन तुम्ही तोंडावर आपटलात. मिपावर शोभा झाली. ति रिकव्हर व्हायला म्हणुन कसंही करुन दोन चार भक्तांकडुन आपल्या संगणकीय रुपकावर शिक्कामोर्तब करुन घ्यायला म्हणुन तुम्ही हा नवीन धाग्याचा प्रपंच मांडलात. निराकारी बुवाबाजी धोक्यात आल्यावर तुमच्या मनाने दिलेली स्वाभावीक प्रतिक्रीया आहे हि. तुम्ही पण एक लक्शात ठेवा... जसे तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला उत्तरं त्याच टाईपचे मिळातील.

In reply to by अर्धवटराव

आता तरी नीट वाचा : चर्चा कर्मसिद्धांतावर चालू आहे. त्यासाठी केलेल्या कर्माची स्मृती स्टोअर होणं गरजेचं आहे. तुम्ही बालपणी घेतलेली इंजेक्शनं, तुमची शारीरिक वाढ या गोष्टी कर्मविपाकात येत नाही. तुम्हाला एकतर विषयही कळत नाही आणि भलत्याच गोष्टीवर भारंभार आणि निरर्थक लिहित सुटता.

In reply to by संजय क्षीरसागर

हे कष्ट तुम्ही कधि घेणार? कर्मविपाकाचा स्मृतीशी संबध जोडुन, आणि ति स्मृती संगणकाप्रमाणे काम करते हे सुलभीकरण करुन तुम्ही कर्मविपाकाची हवा काढायचा केवीलवाणा प्रयत्न करत आहात.. कर्म, स्मृती वगैरे बाबतीत तुमचं आकलन इतकं उथळ आहे कि तुम्हाला विषयाचा आवाकाच लक्षात येत नाहि.. मग तुमचा नेहेमीचा ठरलेला फॉर्मुला... सगळ्यांना गोंधळलेले वगैरे लेबलं चिकटवायची, आणि आपलं आत्मस्तुतीचं सुख भोगायचं. असो. हे आता नित्याचच झालय.

In reply to by अर्धवटराव

कर्मविपाकाचा संबंध स्मृतीशी नाही तर काय बालपणी घेतलेल्या इंजेक्शनशी आहे ? का शारिरिक वाढीशी आहे ? तुम्हाला सकाळी खाल्लेलं संध्याकाळी आठवायला जाणीवेचा रोख मेंदूकडे वळवावा लागत नाही काय ? का आठवण्याची तुमची काही वेगळी प्रोसेस आहे ? स्मृतीभ्रंश होतो तेंव्हा व्यक्तीच्या मेंदूवर उपचार होतो का गुडघ्यावर ? पाप-पुण्य, नीती-अनितीचा विचार तुम्ही कोणत्या अवयवानी करता ? कर्मसिद्धांत तुम्ही मेंदूनी शिकलात का आणखी कोणत्या मार्गानी ? देव तुम्हाला भाषेतून शिकवला गेला का जन्मतःच ते ज्ञान घेऊन आला होतात ? आणि तसं असेल तर ते नक्की कुठे होतं ? न तुम्हाला विषयाची कल्पना, न काही वैचारिक सुसंगतता. यापुढे प्रतिसाद न देणं तुमच्या हिताचं आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

स्मृती म्हणजे केवळ काहि दृक्/श्राव्य आठवणी, ज्या संगणकीय टाईप पद्धतीने मेंदुत 'स्टोअर' होतात, त्याच अर्थाने कर्मविपाकात ति कंसीडर केल्या जाते, हेच तुमह्चं चुकीचं आकलन आणि अझप्शन आहे.. हे तुम्हाला खरच कळत नाहि आहे कि मुद्दाम पेडगावला जातात ?
न तुम्हाला विषयाची कल्पना, न काही वैचारिक सुसंगतता. यापुढे प्रतिसाद न देणं तुमच्या हिताचं आहे.
आले आले.. साहेब आपल्या मूळ स्वभावावर परत आहे.. तसे ते नेहेमीच होते म्हणा.

In reply to by अर्धवटराव

तुम्हाला स्मृती अंगभर पसरलीये असं वाटतंय, आणि त्यामुळे बहुदा स्वतःचा मेंदू नक्की कुठे आहे याचा पत्ता लागत नाहीये ! अहो, कर्माची स्मृती मेंदूत असते ! तुम्ही सकाळी काय काम केलं ? असं विचारल्यावर तुमचे विचार मेंदूत चालू होतात की गुडघ्यात हे बघा, म्हणजे असा गोंधळ होणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्हाला मुळात स्मृती म्हणजे काय हेच कळत नाहिए. कर्माच्या स्मृती म्हणजे केवळ दृक्/श्राव्य/स्पर्षाच्या काहि लिमीटेड आठवणी नाहित... एक वाटीभर मिर्च्या खा. किती खाल्ल्या, त्यांचा रग कसा होता, चव कशी होती हे प्लॅस्टीक मेंदुने आठवलं नाहि तरी दुसर्‍या दिवशी शरीराच्या योग्य ठिकाणी बरोब्बर आठवण करुन दिली जाईल.

In reply to by अर्धवटराव

मेमरी आणि संवेदना यामधे घोळ होतोय! कोणत्याही कर्माच्या स्मृती प्रत्यक्ष अनुभवापासून कशा वेगळ्या असतील. अ‍ॅक्सिडेंट झाल्यानंतर फ्रॅक्चर तसंच राहील आणि दुखेल, पण अ‍ॅक्सिडेंट कसा झाला हे कसं आठवतं ? हा सगळा अनुभव हाताने किंवा पायाने स्टोअर केला कि मेंदू ने ? आणि फ्रॅक्चर बरे झाल्यानंतरही कसं आठवतं नेमकं कुठं झालं होतं ते ? हा सगळा डेटा जेव्हा पाहीजे तेव्हा कुठे रेडिली अवेलेबल असतो ? तुमच्या मते मेंदूचा रोल काय आहे ? आता तुम्ही म्हणाल कि काहीतरी पूर्वसंचीत (ऑलरेडी केलेल्या कर्माच्या स्मृती) त्यामुळं झाला अ‍ॅक्सिडेंट ! तर याला पुरावा आणि आधार काय आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

तुमचा प्लॅस्टीक मेंदु तुम्ही 'त्या' कामासाठी वापरता होय... ते ही बरोबर आहे म्हणा. जे साठवलं असेल्त तेच बाहेर पडेल. म्हणुनच तुमचा प्लॅस्टीक मेंदु 'बाईट बाय बाईट' प्रसवतो आणि तुम्हाला ते संगणकीय वाटत.

In reply to by मराठी_माणूस

याचा अर्थ तुम्ही चौकटीबाहेर जाऊन, कुठलीही पूर्वधारणा मधे न आणता, नव्याला सामोरे जाऊ शकता ! धन्यवाद !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

कर्मसिद्धांत याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचं वर्तमान हे त्याचा भूतकाळ ठरवतो . यात मागचे जन्मही (किती ते कुणालाही माहिती नाहीत) आले. आणि असा डेटा मॅनेज करणारी एक रिअल टाईम यंत्रणा (पापभीरुंसाठी देव) अस्तित्वात आहे ! याचा काऊंटर असायं की प्रत्येकानं काय काशी केली याचा आलेख त्याच्या मेंदूतल्या स्मृतीपलिकडे कुठेही नसतो. आता या स्मृतीविषयी बोला !

In reply to by संगणकनंद

तुम्हाला थोडं जरी कंप्युटरमधलं ज्ञान असेल तर सगळं शांतपणे वाचा. नक्की लाईट पडेल.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही आज लिहीलेलं: मॄत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही हे खरं आहे की, याआधी लिहीलेलं: एका जीवंत माणसाला दुसऱ्या मृत व्यक्तीचा भूतकाळ स्मरत असतो. नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते. या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात. अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात हे खरं आहे. की ही दोन्ही विधाने जरी परस्पर विरोधी असली तरी ती तुम्ही केलेली असल्याने दोन्ही बरोबर आहेत?

In reply to by संजय क्षीरसागर

शोभा तुमची होत आहे. तुम्ही दोन परस्पर विरोधी विधाने केली आहेत. आणि ही विसंगती लक्षात आणून दिल्यावर तुमची बोलती बंद झाली आहे. १. मॄत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही २. एका जीवंत माणसाला दुसऱ्या मृत व्यक्तीचा भूतकाळ स्मरत असतो. नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते. या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात. अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात हे खरं आहे. ही दोन विधाने परस्पर विरोधी आहेत की नाही? हो किंवा नाही एव्हढंच सांगा. इथला दुवा, तिथला दुवा, हे वाचा, ते वाचा असल्या पळवाटा शोधणं बंद करा.

स्मृती कशा कशात आणि कोण कोणत्या रूपात साठवल्या जातात ह्याचा पूर्ण अभ्यास करा अगोदर. तुम्हाला हार्ड डिस्क आणि electromagnetic chya रुपात असलेलं स्मुर्ती एवढेच मर्यादित ज्ञान आहे. विश्व खूप विशाल आहे तिथे काय होवू शकत हे अजुन तरी कोणाला समजले नाही. किती तरी विद्वान लोक होवून गेली पण डाव्या विचारांच्या लोकांसारख फाजील आत्मविश्वास कोणाकडे च बघायला मिळाला नाही.

या एकाच थिअरीला प्रुव करण्यासाठी पूर्वसंचीत आणि कर्मसिद्धांत ही गृहीतकं मानली गेली आहेत, आणि त्यांना आजपर्यंत कुणीही क्वेश्चन किंवा रिफ्युट केले नसल्याने ते तसेच मानणे चालू आहे. वर सोत्रींनी सगळ्यासाठी सायंटीफिक पुरावे मागितले आहेत. पुनर्जन्म या थिअरीला काय सायंटीफिक पुरावा आहे ? शिवाय कर्म->पूर्वसंचीत->पुनर्जन्म->कर्म ही साखळी कुठपर्यंत चालू रहाणार ? मग फ्री वील आणि फ्रीडम चं काय ? सुटका कधी कर्मापासून आणि प्रारब्ध भोगण्यातून. आणि प्रारब्ध चालू कधी झालं हाच एक प्रश्न आहे.

In reply to by उन्मेष दिक्षीत

तुमचं खालील संक्षीघोषित "वैज्ञानिक सत्य" बद्दल काय म्हणणं आहे?
पुनर्जन्म असं काहीही नाही ती लोकांना दिलासा द्यायला शोधलेली एक कल्पना आहे जेंव्हा आपण एखाद्याचा पुनर्जन्म झाला म्हणतो तेंव्हा काय झालेलं असतं ? तर एका जीवंत माणसाला दुसऱ्या मृत व्यक्तीचा भूतकाळ स्मरत असतो. या पलिकडे पुनर्जन्म म्हणजे काही नाही. ही स्मृती जीवंत व्यक्तीच्या मेंदूखेरीज कुठेही नसते. पण हा प्रकार कशामुळे होतो ? नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते. या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात. अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात > त्याला तो डेटा सक्रीय झाला की मृत व्यक्तीच्या जीवनपटाचा काही भाग दिसायला लागतो > आणि आपण म्हणतो पुनर्जन्म झाला ! अशाप्रकारे पुनर्जन्म वगैरे काही नसून, ती डिस्क फॉरमॅटींगमधे नकळत झालेली चूक आहे

In reply to by उन्मेष दिक्षीत

आणखी एक मुद्दा- पूर्वसंचिताची कल्पना ही कायमच शोषितांवर होणारे अन्याय चालवून घेण्यासाठी वापरली गेली आहे.

In reply to by शा वि कु

> शोषितांवर होणारे अन्याय चालवून घेण्यासाठी वापरली गेली आहे.
आणि देवभोळ्यांचा देवावरचा विश्वास कमालीचा फोफावत नेऊन सदैव तेवत ठेवण्यासाठी !

In reply to by शा वि कु

पूर्वसंचिताची कल्पना ही कायमच शोषितांवर होणारे अन्याय चालवून घेण्यासाठी वापरली गेली आहे.
पूर्वसंचिताची शास्त्रिय बैठक घालवून, मोडकळीस नेऊन, विवीध भेदांवर आधरित शोषणव्यवस्था उभी करण्यासाठी पूर्वसंचिताची कल्पना वापरली गेली आहे. असंही असू शकतं. - (पूर्वसंचित) सोकाजी

In reply to by शा वि कु

पूर्वसंचिताची कल्पना ही कायमच शोषितांवर होणारे अन्याय चालवून घेण्यासाठी वापरली गेली आहे.
पूर्वसंचिताची शास्त्रिय बैठक घालवून, मोडकळीस नेऊन, विवीध भेदांवर आधरित शोषणव्यवस्था उभी करण्यासाठी पूर्वसंचिताची कल्पना वापरली गेली आहे. असंही असू शकतं. - (पूर्वसंचित) सोकाजी

In reply to by सोत्रि

इथे कोणीही त्या व्यवस्थेचे समर्थन नाही करणार हे जाणून आहे. तुमची पूर्वसंचिताची कल्पना वेगळी असावी आणि, ही कल्पना ज्याप्रमाणे वापरली गेली आहे, ती तुमच्या मते गैरलागू/चुकीचा वापर आहे हेही जाणून आहे. पण का ? तुमचे रॅशनलायझेशन समजण्यासारखे आहेच, आणि गरजेचे पण, जर ही कल्पना खरोखरीच मानायची असेल तर. मला समजलेली कल्पना- पूर्वसंचित- पूर्वसंचित म्हणजे यापूर्वी साठवलेले. यापुर्वी तुम्ही केलेली कर्म तुम्हाला कशा प्रकारचं आयुष्य मिळेल हे ठरवतात, सॉर्ट ऑफ quid pro quio. यामध्ये तुमची चालू आणि पूर्वीच्या जन्माचीही कृत्ये येतात. जर पूर्वीच्या जन्मी तुम्ही दुष्कृत्ये केली असतील तर पुढच्या जन्मात तुम्हाला कष्ट भोगावे लागतील. या धर्तीवर खरोखरीच तुम्ही म्हणताय तस काही misuse नाही दिसत. त्या धर्तीवर खरोखरीच शोषित व्यक्तींनी या जन्मात कष्ट भोगणे योग्य आणि न्याय्यच आहे. त्यांच्यातल्या कुठल्यातरी चिरंतन भागाने काही दुष्कृत्ये केली आहेत, आणि त्या कृत्यांची फळे ते भोगत आहेत.ह्यात काही गैरवापर नाही दिसत. हे तुम्हाला अयोग्यच वाटते, जसे मलाही वाटते. ह्याचा अर्थ तुमची पूर्वसंचिताची कल्पना वेगळी दिसतेय (ज्याला तुम्ही शास्त्रीय बैठक म्हणता). ती कल्पना सांगाल तर बरे होईल. वाचायला आवडेल.

In reply to by शा वि कु

ती कल्पना सांगाल तर बरे होईल. वाचायला आवडेल
नक्की, ह्यावर एक लेख नक्कीच लिहायचा आहे. लवकरच ‘टंकाळा’ टाळून लिहीतो जे मला अनुभूतीतून उमगलंय ते! - (साधक) सोकाजी

In reply to by शा वि कु

सूर्याच्या गाभ्यात अविरत चाललेल्या आण्वीक प्रक्रियेतुन फोटॉन रुपाने ऊर्जा निर्माण होते. अनेक वर्षांच्या प्रवासातुन तो फोटॉन सूर्याच्या पृष्ठभागावर येतो. काहि मिनीटात तो पृथ्वीवर पोचतो. गव्हाच्या रोपावर असलेल्य्य हरीतद्रव्य संयोगातुन तो साखरेत रुपांतरीत होतो. शर्करा दाण्याचं रुप घेते. त्यातल्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. भरडला जाउन त्याचं पीठ होतं. भाजल्यामुळे त्याच्या रेणुंची वीण उसवते. खाल्ल्यानंतर काहि रेणु शरीरात अ‍ॅब्सॉर्ब होतात, काहिंची माति होते. या प्रत्येक स्टेजमधे पुनर्जन्म झालाय, मागच्या जन्मीचं 'कर्म' संचीत रुपाने कॅरी फॉर्वर्ड झालय. याच कॅरी फॉर्वडींगमुळे पुढच्या जन्माच्या कर्माचा बेस तयार झालाय. कर्माच्या आधारावर पुढला जन्म निश्चित झालाय (शरीरात अ‍ॅब्झॉर्ब होणे किंवा विष्ठा होणे, पानांतुन शर्करा बनणे किंवा रिफ्लेक्ट होऊन हवेचं तापमान वाढवणे) गत जन्माच्या आठवणी ट्रान्फॉर्मेशन रुपाने (कर्म संचीत) या जन्मात उपलब्ध आहेत. रिव्हर्स इंजीनीअरींग करता आलं तर मातीपासुन तर थेट सूर्यगर्भातल्या मूळ स्थानापर्यंत जाता येतं (सोत्रींनी 'निब्बाण' संकल्पना आगोदरच मांडली आहे). रूढार्थाने ज्याला स्मृती म्हणतात (दृक/श्राव्य माहिती किंवा पंचेंद्रीयांचे इतर अनुभव, जे मेंदुतल्या विचारांना खाद्य पुरवतात, सिम्युलेशन करायला मदत करतात) तो या संपूर्ण प्रोसेसमधे काहि वेळेस कॅरीफॉर्वर्ड होण्याची शक्यता असते (कारण त्यालाही 'शरीर' असतं). बहुतेक वेळा त्याचा कॉण्टेक्स्ट लागत नाहि (पोळीला 'आठवलं' कि आपण दाणा होतो, तरी तिला त्यातलं काहि कळणार नाहि, कारण पोळीच्या मेंदुत चाललेले तत्कालीन सिम्युलेशन्स दाण्याचा डाटा वापरु शकत नाहि) ** या सर्व थेअरीला कुठलाहि 'वैज्ञानीक' अधार नाहि. कोणि याचं 'शास्त्रीय' संशोधन वगैरे केलं असेल/नसेल माहित नाहि :)

In reply to by उन्मेष दिक्षीत

सोत्रींनी सगळ्यासाठी सायंटीफिक पुरावे मागितले आहेत
ते ह्यासाठी होते ->> सिद्धांत मांडणार्‍यांचा मानसशास्त्राचा अभ्यास फारसा नव्हता.
पुनर्जन्म या थिअरीला काय सायंटीफिक पुरावा आहे
जिथे मुदलात जन्म मृत्युच नाही तिथे पुनर्जन्म कसला आलाय. - (सायंटीफिक पुराव्याने शाबित) सोकाजी

In reply to by सोत्रि

शरिराला जन्म आणि मृत्यू नाही का ? इथे त्याबद्दलच चाललंय डिस्कशन कि पुनर्जन्म म्हणजे मेमेरी ट्रान्स्फर.

इथले भारतातील डावे ,पुरोगामी जेव्हा येथील संस्कृतीचा,हिंदू धर्माचा विज्ञान चा मुलामा देवून टीका करतात त्याचा राग तर येतोच त्यांचे विचार ऐकून हसायला खूप येते. विज्ञान आणि ह्यांचा खऱ्या आयुष्यात काहीच कडीचा संबंध नसतो पण दुसऱ्या समोर सारखे विज्ञान , विज्ञान करत असतात. विज्ञान च्या प्रगतीत ह्यांचा वाटा 0 असतो. त्या मुळे ह्या लोकांना जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. त्यांचा कंपू बनवून त्यांनी आपल्या सुप्त इच्छा पूर्ण कराव्यात. आम्हाला शिकवायला येवू नये. देव,धर्म,संस्कृती,परंपरा त्यांचा विज्ञान शी असलेला परस्पर संबंध ह्या विषयी आम्हाला योग्य ते ज्ञान आहे

nn

In reply to by कपिलमुनी

खतरनाक =))))

मिपाकरांनी गतजन्मात कोणते पाप केले होते की इतरांच्या आयडी पुनर्जन्मानंतर असल्या दवणीय जिलब्या वाचाव्या लागत आहेत? पूर्वीचे मिपा राहिले नाही आता.

देव आहे की नाही ? हा प्रश्न जितका वेळा उपस्थित केला जातो ... तसच आहे काही गोष्टीत आता पर्यंत कोणीही आपले रक्त ,, स्किन (चामडी) , किंवा हाडे तयार केली नाहीत ... मग हे कुणी केले ??? हा प्रश्न उरतोच

अवांतर : संजय क्षीरसागर, तुमचं हे विधान फारंच धाडसी आहे :
स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही याची त्यांना कल्पना नव्हती.
अवयव प्रत्यारोपण झालेल्या ग्राहकात त्याच्या दात्याच्या आवडीनिवडी उत्पन्न झाल्याचे अनेक दाखले आहेत. यावरून स्मृती मेंदूशिवाय इतरत्रही साठवली जाते असं दिसतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

यावरून स्मृती मेंदूशिवाय इतरत्रही साठवली जाते असं दिसतं.
डॉ Bessel van der Kolk या सायकियाट्रीमध्ये एमडी असलेल्या डॉ़क्टरांनी संशोधन केलं आहे. आणि त्या संशोधनावर त्यांनी एक छान ओघवत्या भाषेत पुस्तक लिहीलं आहे. asdf (या पुस्तकाची मी छापील प्रत विकत घेऊन वाचली आहे. मात्र पुस्तकाचा सारांश सांगितला जाणार नाही. त्याबद्दल दिलगीर आहे)

In reply to by गामा पैलवान

त्याच्या दात्याच्या आवडीनिवडी उत्पन्न झाल्याचे अनेक दाखले आहेत. यावरून स्मृती मेंदूशिवाय इतरत्रही साठवली जाते असं दिसतं.
चुकीचा अप्रोच आहे गामाश्री ! १ > विषय व्यक्तीगत कर्माची स्मृती आणि त्याचं कर्मफल असा आहे > अवयव प्रत्यारोपणातून ट्रान्सफर झालेल्या गोष्टींचा नाही २> आणि इन्वर्सली, व्यक्तीचा एखादा अवयव काढून टाकला तर त्याचा स्मृतीवर काहीही परिणाम होत नाही

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, एक व्यावहारिक प्रश्न सांगतो. समजा कुण्या एकाचं हृदय निकामी झालं आहे. त्यामुळे त्यास इतर कोणाचं तरी हृदय बसवलं. आणि त्यासोबत नको त्या आवडीनिवडी (उदा. तंबाखूची सिगरेट फुंकणे ) वगैरे ग्राहकात नव्याने उत्पन्न झाल्या. तर हे कोणाचं कर्मफळ मानायचं? ग्राहकाचं की दात्याचं? की कर्मफळ नावाची काही चीजंच अस्तित्वात नाही? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

साधा विचार करा स्मृतीभ्रंश झाल्यावर व्यक्तीला न्यूरोलॉजिस्टकडे नेतात. गायनॅक किंवा कार्डिओकडे नेत नाहीत. याचा अर्थ स्मृती कुठे असते ?
कर्मफळ नावाची काही चीजंच अस्तित्वात नाही?
हा देव या संकल्पनेतून निघालेला बोगस प्रकार आहे. तो देवभोळ्यांसाठी मॉरल पोलिसिंगचं काम करतो पण ते फार चाईल्डीश प्रकरण आहे. जो कुणाचा गैरफायदा घेत नाही आणि दुसर्‍याला स्वतःचा गैरफायदा घेऊ देत नाही, त्याला कोणताही कर्मलेप लागू शकत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, आपण इथे आधीपासनं असलेल्या स्मृतीच्या नाशाविषयी बोलंत नाहोत. ग्राहकाशी संबंध नसलेल्या स्मृती त्याच्या मनांत नव्याने प्रत्यारोपित कशाकाय होतात, असा प्रश्न आहे. अशी परिस्थिती यकृत प्रत्यारोपणाच्या ग्राहकांत सर्रास आढळून येते. हिचं स्पष्टीकरण द्यायचं झालं तर ते म्हणजे, स्मृती मेंदूसोबत उर्वरित शरीरातही अस्तित्वात असतात. बाकी, ग्राहकाला नको त्या आवडीनिवडी जडल्या तर ते कर्मफळ मानायचं की नाही? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

यात आहारासंबंधी सोडून इतर कोणत्या आवडीनिवडी जुळतात काय ? उदा- सिनेमाची आवड वैगेरे ? कारण अशा गोष्टीचे बायोकेमिकल उत्तर असण्याची शक्यता जास्त वाटत आहे. कॅल्शियमची कमी असलेल्या मुलांना खडू खायला आवडतो, तशा प्रकारात. याच्या कर्मफळाशी काय सम्बन्ध कळालं नाही. अजूनसुद्धा स्मृती/कर्म/संचित शरीराच्या पलीकडे नाहीच आले, जरी मानले की किडनीमध्ये सुद्धा काही प्रकारच्या स्मृती असतात.

In reply to by शा वि कु

शा वि कु, अमेरिकी सरकारी संकेतस्थळावर एक लेख सापडला. त्याच्या सारांशानुसार पेशींतील चार प्रकारच्या स्मृती ग्राहकात संक्रमित होतात. सारांश (इंग्रजीत) इथे आहे : https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/31739081/ सांगायचा मुद्दा असा की मानवी स्मृती ही एक अत्यंत जटील रचना आहे. संगणकाच्या स्मृतीसारखी सरळधोप आजीबात नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१. > चार प्रकारच्या स्मृती ग्राहकात संक्रमित होतात
विषय पूर्वसंचित आणि कर्मफलाचा आहे. शिवाय अवयव प्रत्यारोपण ही अपवादत्मक केस आहे आणि जरी अशा स्मृती संक्रमित झाल्या तरी > २. शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही, इतकी उघड गोष्ट संतांच्या लक्षात आली नाही. ही गोष्ट निर्विवाद आहे आणि त्या विधानाला बाधा येत नाही.
२. मानवी स्मृती ही एक अत्यंत जटील रचना आहे. संगणकाच्या स्मृतीसारखी सरळधोप आजीबात नाही
ती मॅनेज करणारी कोणतीही रिअल टाईम यंत्रणा नाही आणि मृत्यूत ती नष्ट होते याचा प्रतिवाद करुन दाखवा, कारण कर्मफलसिद्धांत या दोन गोष्टींवर आधारित आहे.

मेंदू व्यतिरिक्त स्मृती दुसरीकडे स्मृती साढवल्या जात नाहीत हे चूक आहे. माणसाच्या विर्यात आणि झाडांच्या बियात अनेक स्मूर्ती साढवलेल्या असतात. वडाच्या झाडाच्या बियांपासून पूर्ण झाड तयार होते ते स्मृती शिवाय. माणसाच्या वीर्य आणि स्त्री च्या अंड्याचे फलन झाल्यानंतर एकद्या कुशल कारागीर नी घडवावे असे मानवी शरीर तयार होते ते काय स्मृती शिवाय. आता स्मृती म्हणजे काय काय हे फक्त तुम्ही ठरवा. व्याख्या पण तुम्ही च ठरवा.

संक्षी सरांच्या या व इतर धाग्यांवरच्या चर्चा बघीतल्या आणि मला सप्टेंबर 1893 मधे शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्म परिषदे मध्ये हिंदुधर्माचे प्रतिनिधीत्व करणार्या स्वामी विवेकानंदांनी वेगवेगळ्या धर्मांमधे कलह का होतात हे समजावुन सांगण्यासाठी एक गोष्ट सांगितली होती ती आठवली. सुमारे 125 वर्षा पूर्वी सांगितलेल्या या छोट्याश्या गोष्टीचा शेवट मानवी स्वभावाचे अचूक ज्ञान असलेल्या स्वमीजींनी त्रिकालाबाधीत सत्य असलेले हे वाक्य सांगून केला.. That has been the difficulty all the while म्हणजे अशी मानसिकता पूर्वीही होती आजही आहे व पुढेही राहील. या ठिकाणी “फक्त माझाच धर्म” या ऐवजी “फक्त माझेच मत” हा शब्दप्रयोग जास्त योग्य ठरेल.. . WHY WE DISAGREE 15th September, 1893 I will tell you a little story. You have heard the eloquent speaker who has just finished say, "Let us cease from abusing each other," and he was very sorry that there should be always so much variance. But I think I should tell you a story which would illustrate the cause of this variance. A frog lived in a well. It had lived there for a long time. It was born there and brought up there, and yet was a little, small frog. Of course the evolutionists were not there then to tell us whether the frog lost its eyes or not, but, for our story's sake, we must take it for granted that it had its eyes, and that it every day cleansed the water of all the worms and bacilli that lived in it with an energy that would do credit to our modern bacteriologists. In this way it went on and became a little sleek and fat. Well, one day another frog that lived in the sea came and fell into the well. "Where are you from?" "I am from the sea." "The sea! How big is that? Is it as big as my well?" and he took a leap from one side of the well to the other. "My friend," said the frog of the sea, "how do you compare the sea with your little well?” Then the frog took another leap and asked, "Is your sea so big?" "What nonsense you speak, to compare the sea with your well!" "Well, then," said the frog of the well, "nothing can be bigger than my well; there can be nothing bigger than this; this fellow is a liar, so turn him out." That has been the difficulty all the while. I am a Hindu. I am sitting in my own little well and thinking that the whole world is my little well. The Christian sits in his little well and thinks the whole world is his well. The Mohammedan sits in his little well and thinks that is the whole world. I have to thank you of America for the great attempt you are making to break down the barriers of this little world of ours, and hope that, in the future, the Lord will help you to accomplish your purpose.

In reply to by मामाजी

आणि इथे खुली चर्चा चालू आहे. कुणीही आपली मतं उघडपणे मांडू शकतं. ही विवेकानंदांच्या भाषणातल्या धारणांनी बंदिस्त झालेल्या व्यक्तींची काँन्फरन्स नाही. तुमच्या योग्य आणि सुसंगत पॉईंटसचा इथे नक्की उहापोह होईल. अर्थात, आपल्याला मुद्दा पटला हे दिलखुलासपणे कबूल करण्याची प्रामाणिकता तुमच्याकडे असेल तर तुमच्या विचारातही प्रगल्भता येऊ शकेल. पाहा : accounts मधे opening balance घेउनच सुरूवात का करता ?

संक्षी सर, या सिद्धांतांप्रमाणे व्यक्ती आता जे काय भोगते आहे ते त्याच्या पूर्वकर्माचं फळ आहे : मना त्वांची रे पूर्वसंचित केले । तया सारखे भोगणे प्राप्त झाले ॥ आपल्या मते हे जर चूक असेल तर आपल्याला माझा एक साधा प्रश्न आपण accounts मधे opening balance घेउनच सुरूवात का करता?

In reply to by मामाजी

सुरूवात का करता?
Business Continuity Principal मुळे तो व्यावसाय, वर्षानुवर्ष असाच पुढे चालू राहिल हे गृहितक आहे. पण व्यक्तीगत जीवनात ते प्रिंसिपल लागू होत नाही; वाचा : २. शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही, इतकी उघड गोष्ट संतांच्या लक्षात आली नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही

पुनर्जन्म असं काहीही नाही ती लोकांना दिलासा द्यायला शोधलेली एक कल्पना आहे जेंव्हा आपण एखाद्याचा पुनर्जन्म झाला म्हणतो तेंव्हा काय झालेलं असतं ? तर एका जीवंत माणसाला दुसऱ्या मृत व्यक्तीचा भूतकाळ स्मरत असतो. या पलिकडे पुनर्जन्म म्हणजे काही नाही. ही स्मृती जीवंत व्यक्तीच्या मेंदूखेरीज कुठेही नसते. पण हा प्रकार कशामुळे होतो ? नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते.

या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात.

अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात > त्याला तो डेटा सक्रीय झाला की मृत व्यक्तीच्या जीवनपटाचा काही भाग दिसायला लागतो

> आणि आपण म्हणतो पुनर्जन्म झाला ! अशाप्रकारे पुनर्जन्म वगैरे काही नसून, ती डिस्क फॉरमॅटींगमधे नकळत झालेली चूक आहे

#१, २, ३ सारखी बालिश विधाने वाचून खूप हसू आले. खरेतर संक्षींकडून अशी बालिश विधानं अपेक्षित नव्हती. पण यावरून एक आठवले- गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा न्यूटनने शोध लावायच्या आधीपासून अस्तित्वात आणि कार्यरत होता आणि नंतरही अस्तित्वात आणि कार्यरत राहिला/राहील. न्यूटनला फक्त जे होत आहे ते समजले. परंतु त्याच्या किंवा इतर कोणाच्याही समजण्या किंवा न समजण्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर काही फरक पडला नाही. कर्माचेही तसेच आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर || मानो या ना मानो. पण दोन्हीमुळे वस्तुस्थितीत काडीचाही फरक पडत नाही किंवा पडणार नाही. आता आपल्याच धुंदीत इंद्रियगोचर राहून सरसकट सगळे धुडकावून लावायचे (आणि पर्यायाने जे भोग वाट्याला येतील ते भोगायचे) की अध्यात्माच्या साहाय्याने सूक्ष्माचा अभ्यास करून, त्याचे सार जाणून घेऊन कर्माच्या साखळीतून मुक्त व्हायचे हा पर्सनल चॉईस.

In reply to by कोहंसोहं१०

१.
घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
लोकलमधले भिकारी हे गाणं मन लावून म्हणतात, यापलिकडे त्याला काहीही पुरावा नाही. ईश्वर हीच मुळात अत्यंत बालिश कल्पना आहे. भोळसट वृत्तीच्या लोकांना भीती घालण्यासाठी किंवा त्यांना एक काल्पनिक आधार म्हणून आणि बसल्याबसल्या टाईमपास इतकाच तीचा उपयोग आहे.
२. > १, २, ३ सारखी बालिश विधाने वाचून खूप हसू आले
प्रतिवाद करुन तर दाखवा मग बघा कुणाचं हसूं होईल ते !

In reply to by संजय क्षीरसागर

प्रतिवाद करून काय होणार आहे? तुम्ही रेशमातल्या किड्याप्रमाणे स्वतःच्या मर्यादित विचारांच्या कोशातले अडेलटट्टू. बाकी तुमची झेप भौतिक इंद्रियजन्य विषयांच्या पलीकडे नाही हे तुम्ही दाखवून दिलेलंच आहे त्यामुळे कर्मसिद्धांत सारख्या सूक्ष्म विषयांवर तुमच्याबरोबर चर्चा करण्यात काही अर्थ नाही कारण तुम्हाला ते समजणार नाही. समजण्यासाठी एकतर मला माहित नाही आणि मला माहित करून घ्यायचे आहे हि मनोवृत्ती लागते जी तुमच्यासारख्या स्वयंघोषित सर्वज्ञाकडे नाही. मात्र तुमच्या बालिश विचारांचा आस्वाद घेत हसत राहीन. चांगली करमणूक आहे.

हिंदू धर्म हा श्रेष्ठ धर्म आहेत. त्याचे तत्व तत्व ज्ञान सुद्धा श्रेष्ठ आहे. ते कसे चुकीचे आहे असा भ्रम निर्माण करण्यासाठी जो ईश्वर न मानणारा धर्म आहे त्याचे अनुयायी ईश्वर,कसा नाही . पुनर्जन्म कसा नाही असल्या विषयावर चर्चा घडवून आणता आणि त्या आडून ईश्वर न मानणाऱ्या धर्माचा प्रचार करतात हे सत्य कारण आहे. पण आम्हाला आमचा धर्म योग्य ते ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी सक्षम. ईश्वर न मानणाऱ्या धर्माचे कोणतेच तत्व ज्ञान स्वीकर्याची किंवा मान्य करायची आम्हाला गरज नाही. आणि त्या विषयावर चर्चा पण करायची गरज नाही अशी भूमिका घेतली तरच हे आडून केलेले प्रचार तंत्र निष्प्रभ होईल. त्या हिंदू धर्मा व्यतिरिक्त बाकी कोणत्याच धर्माची शिकवण आम्हाला मान्य नाही.

तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते. कोणतंही पूर्वसंचित नाही आणि अत्यंत पारदर्शक वागणुकीमुळे कोणताही कर्मविपाक नाही; ही खरी आणि वास्तविक मुक्त चित्तदशा आहे.
पुन्हा अगदी थेऑरिटिकल विधान. कधीही क्रिकेट न खेळलेल्या समालोचकासारखी ही विधाने आहेत. एक उदाहरण देतो. कुठल्यातरी एका परदेश दौर्यात एका कसोटी सामन्यात दिवसाचा खेळ संपला तेव्हा सचिन नुकतेच शतक पूर्ण करुन नाबाद खेळत होता.कॉमेंटेटर बॉक्स मध्ये चारु शर्मा ह्या कधीही क्रिकेट न खेळलेल्या समालोचकाने"आता उद्या सचिनला २०० करायचा चान्स आहे. त्याचे पहिले द्विशतक "वगैरे सारखी स्टेटमेंट दोन तीन वेळेला केली. समालोचन कक्षात बाजुला बसलेले गावस्कर शास्त्री ढिम्म.त्यांच्याकडुन ह्यावर काहीच टिप्पणी नाही. दुसर्या दिवशीचा खेळ चालु झाला आणि सचिन त्यादिवशी एकही धाव न काढता बाद झाला. चारु शर्माने एक जरी क्रिकेट मॅच खेळली असती तर त्याला खेळातील अनिश्चिततेचा अंदाज आला असता. वरील स्टेटमेंटच्याच धर्तीवर..पोहोणे शिकणे अगदी सोपे आहे..हातपाय मारायचे..पोटाखाली पाणी घ्यायचे..आणि काहीही केले तरी स्वतःला बुडु द्यायचे नाही बरका...हया मूर्खांना पोहोणे शिकायला गुरु का लागतो बरे हे काही कळत नाही.. क्रिकेटचेच उदाहरण द्यायचे तर.. बॅटींग करणे अगदी सोपे आहे.. सरळ बॅटीने खेळायचे.. बॉलवर नजर ठेवायची...बाहेर जाणार्या चेंडुच्या नादी लागायचे नाही..मग कोणाची बिशाद आपल्याला आऊट करायची... सुनील सचिन सारख्या महान फलंदाजांना पण ही सोपी युक्ती समजली नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते. कोणतंही पूर्वसंचित नाही आणि अत्यंत पारदर्शक वागणुकीमुळे कोणताही कर्मविपाक नाही; ही खरी आणि वास्तविक मुक्त चित्तदशा आहे.
इतकं सोपं मराठी आहे. यात तुम्हाला काय कळलं नाही ? किमान संवेदनाक्षमता असणार्‍याला सुद्धा, आपण दुसर्‍याचा गैरफायदा घेतांना कळतं आणि आपण दुसर्‍याला आपला गैरफायदा घेऊ देत असू तरी कळतं

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षी सर, तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते. हे अगदी बाळबोध विधान नाही वाटत तुम्हाला. कमीत कमी महाराष्ट्रीयन संस्कृतीत तरी लहानपणापासुनच असे संस्कार केले जातात. उदा. शत्रुबुध्दी विनाशाय.. सुसंगती सदा घडो. सुजनवाक्य कानी पडो वगैरे.. तुम्ही जे वर सांगता आहात समर्थांनी ते आधीच सांगितले आहे. मना सज्जना भक्तिपंथेचि जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्य ते सर्व सोडुनि द्यावे जनी वंद्य ते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडु नये तो जगी तोचि तो मानवी धन्य होतो मना वासना दुष्ट कामा न येरे मना सर्वथा पापबुध्दी नको रे.. मना सर्वथा नीती सोडू नको हो.. मना अंतरी सार विचार राहो.. नको रे मना क्रोध हा अंगिकारु नको रे मना मत्सरु दंभ भारू. मना त्वांचि रे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. देवादिकांचे उल्लेख तूर्तास राहु द्या पण सुमारे ४००-४५० वर्षांपूर्वी समर्थ हे लिहुन गेलेत. लोकांना जर इतक्या सहजगत्या वळले असते तर इथे एव्हाना स्वर्ग अवतरायला हवा होता. तुमच्याकडे हे कसे साध्य करायचे ह्याचे उपाय नसतील तर तुमचे विधान शब्द बापुडे केवळ वारा ठरते. हे म्हणजे तरंगता येणे अगदी सोपे आहे फक्त बुडता कामा नये असे म्हटल्यागत झाले. बुडायचे कसे नाही हे तुम्हाला सांगता आले तर तो सल्ला काहीतरी विधायक ठरेल. केवळ देव नाही पूर्वसंचित नाही असे म्हणुन तुम्ही बुडत्याला मिळालेला काडीचा(तुमच्या मते) आधारही नाकारत आहात.

In reply to by कानडाऊ योगेशु

ह्याचे उपाय नसतील ?
तुम्ही पुन्हा तोच प्रश्न विचारतायं म्हणून उत्तर देतो. पूर्वीचे संत आणि इथले सदस्य काय म्हणतयंत ते सध्या बाजूला ठेवा. _______________________________________ तुम्ही फक्त एक आठवडा हा प्रयोग करुन पाहा : एकदम ऑथेंटिक व्हा. दुसर्‍याचा फायदा घेतांना शब्दांची जुळवाजुळव करायला लागते. दुसर्‍याशी वागतांना तुम्हाला काहीही विचार करायला लागणार नाही. जे आत तेच बाहेर. आणि जे झेपणार नाही किंवा जड होतंय ते सरळ खाली ठेवा. मग तो बॉस असो, बाप की आई, की मित्र, बिनधास्त सांगा की मला झेपणार नाही. हे जरा साहसाचं काम आहे. पण करुन पाहा तुम्हाला जन्मात कधी मागे पहायची वेळ येणार नाही ! _________________________________________ आता याचं कारण असं आहे की मुळात आपणच सत्य आहोत. आणि साक्षात्काराची साधी व्याख्या अशी आहे : The Ultimate Unfoldment of the Self ! थोडक्यात, स्वतःला पूर्णपणे खोलून टाका, जे आत तेच बाहेर. अशा व्यक्तीला मग कोणत्याही नीतीमत्तेची गरज उरत नाही, आणि त्याला कधीही पश्चात्ताप करावा लागत नाही. हा खरा कर्मसिद्धांत आहे ! _________________________________ इतर संतांसारखा हा गुहेत बसून आणि जगापासून विन्मुख राहून केलेला उपदेश नाही, किंवा अनुभवशून्य लोकांनी आणि रोज तेच ते रुटीन जगणार्‍यांनी, इथे निव्वळ टाईमपास म्हणून येऊन केलेली निरर्थक शेरेबाजी नाही. हा माझा पूर्णपणे संसारात राहून, व्यावसायिक यशस्विता साधून, जगण्याचा वास्तविक अनुभव आहे आणि याच मार्गानं मला सत्य गवसलं आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

अतिसुलभीकरण, ते ही चुकीचं, आणि त्यावर कडी म्हणजे मनाच्या काहि फिचर्सला अध्यात्म सम़जण्याचा समज, रादर गैरसमज. हेच चाललं आहे अनेक वर्षे :)

अर्धवटराव, इथे केवळ उदाहरण द्यायचं झालं म्हणुन मेंदुच्या क्रियेला संगणकीय शब्द वापरले आहेत. याचा अर्थ मेंदु संगणकाप्रमाणे मेमरी मेनेज करतो असा कोणि घेत असेल तर तो फार बालीशपणा झाला. या विधानाशी शंभर टक्के सहमत आहे. दोन स्वतंत्र प्रक्रियांच्या कार्यात समान धागे सापडले तरीही तदानुषंगिक सामुग्रीची आंतरिक रचना भिन्न असू शकते. आ.न., -गा.पै.

संजय क्षीरसागर,
brain-wide process in which several different areas of the brain act in conjunction with one another (sometimes referred to as distributed processing)
विकेंद्रित प्रक्रियन ( = distributed processing ) वरनं एक आठवलं. तुम्ही म्हणता कर्मफलाच्या अंमलबजावणीला प्रत्येक व्यक्तीचा अनेक जन्मांचा डेटा स्टोअर करुन तो प्रत्येक व्यक्तीचं ‘कर्मफल रिअल टाईम बेसिसवर’, मॅनेज करु शकेल अशी प्रणाली अस्तित्वात हवी. विकेंद्रित प्रक्रियन असेल तर अशा एकत्रित डेटाबेसची गरज नाही. प्रत्येक नोडचा ( म्हणजे माणसाचा ) स्वतंत्र डेटाबेस असला तरी चालेल. या वैयक्तिक डेटाबेसालाच संचित का म्हणू नये? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

> विकेंद्रित प्रक्रियन असेल तर अशा एकत्रित डेटाबेसची गरज नाही. प्रत्येक नोडचा ( म्हणजे माणसाचा ) स्वतंत्र डेटाबेस असला तरी चालेल. या वैयक्तिक डेटाबेसालाच संचित का म्हणू नये?
हा डेटाबेस त्या व्यक्तीच्या मेंदू व्यतीरिक्त कुठेही नसतो आणि तो मृत्यूसमेत नष्ट होतो. शिवाय असे अनेक डेटाबेसेस रिअल टाईम बेसिसवर मॅनेज करणारी कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही. पण ती अस्तित्वात आहे या भोंगळ कल्पनेला भक्त देव म्हणतात !