Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 07/08/2020 - 00:10
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही एकमेकात गुंफलेल्या, फंडामेंटली चुकीच्या मानसिक धारणा आहेत. कर्मसिद्धांत मानणं म्हणजे आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेण्याऐवजी, ते आपल्या पूर्वसंचिताचं फळ समजून गप्प बसणं, किंवा (आता इलाजच नाही म्हटल्यावर), दुसर्‍याला माफ करणं, किंवा प्रसंग निस्तरण्याशिवाय पर्यायच नसेल तर, अत्यंत पडेल मनोवृत्तीनं, जमेल तसा प्रसंग रेटणं ! शिवाय ही थिअरी मानणार्‍याला, पूर्वसंचितात आपली नक्की किती लफडी आहेत याचा पत्ता नसतो, त्यामुळे आला बिकट प्रसंग की लाव थिअरी असं करत; तो स्वतःचा सारासार विचार कायमचा गमावून बसतो. त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? या लेखावरचे प्रतिसाद, जनमानसात ही भावना किती डीप गेलीये ते दर्शवतात. त्यामुळे, पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही धारणांच निस्सरण झाल्याखेरिज, आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेता येणार नाही. यास्तव ही पोस्ट. _____________________________________ या धरणा अनेक ग्रंथात आणि अनेक अध्यात्मिक दिग्गजांनी दिमाखात मांडल्या आहेत, त्या ग्रंथांच्या किंवा दिग्गजांच्या अवमानाचा कोणताही हेतू नाही. तस्मात, सदस्यांनी त्यांच्या श्रद्धा वगैरे मधे न आणता फक्त विषयाला धरुन प्रतिसाद दिल्यास विधायक चर्चा होईल. तर्कशास्त्रानुसार : An Asserter Has to Prove His Claim थोडक्यात `पूर्वसंचित किंवा कर्मसिद्धांत आहे' असा दावा करणार्‍यांनी तो सिद्ध करायचा आहे. _______________________________ या सिद्धांतांप्रमाणे व्यक्ती आता जे काय भोगते आहे ते त्याच्या पूर्वकर्माचं फळ आहे : मना त्वांची रे पूर्वसंचित केले । तया सारखे भोगणे प्राप्त झाले ॥ १. हा सिद्धांत मांडणार्‍यांचा मानसशास्त्राचा अभ्यास फारसा नव्हता. स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही याची त्यांना कल्पना नव्हती. २. शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही, इतकी उघड गोष्ट संतांच्या लक्षात आली नाही. ३. कर्मफलाच्या अंमलबजावणीला प्रत्येक व्यक्तीचा अनेक जन्मांचा डेटा स्टोअर करुन तो प्रत्येक व्यक्तीचं ‘कर्मफल रिअल टाईम बेसिसवर’, मॅनेज करु शकेल अशी प्रणाली अस्तित्वात हवी. अर्थात, संतमंडळींच्या वेळी अशा काही सिस्टम्सच नसल्यामुळे त्यांना आपल्या कल्पनेतला फोलपणा लक्षात आला नाही. ४. शिवाय डेटा नीती-अनीती किंवा पाप-पुण्याच्या कल्पनांवर सॉर्ट करण्यासाठी लिहावा लागणारा अल्गरिदम कुणाही देवाच्या देवाला सुद्धा, लिहिता येणं अशक्य आहे. कारण त्या कल्पनाच मुळात मानवी आहेत. समाज व्यवस्थेसाठी त्या उपयोगी असल्या तरी अस्तित्वात असा कोणताही मॉरल कोड नाही. ५. मुळात अस्तित्वात वेळ नाही त्यामुळे पूर्वसंचित ही कल्पना जे कालविभाजन गृहित धरते ते निराधार आणि कपोलकल्पित आहे. व्यक्तीच्या दृष्टीनं काल ही उपयोगीता आहे पण ती प्रक्रिया मापनासाठी माणसानं शोधलेली कल्पना आहे. अस्तित्वात फक्त एकच काळ कायम चालू आहे, तो म्हणजे वर्तमान काळ ! अशाप्रकारे पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या बोगस कल्पना आहेत. ______________________________ तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते. कोणतंही पूर्वसंचित नाही आणि अत्यंत पारदर्शक वागणुकीमुळे कोणताही कर्मविपाक नाही; ही खरी आणि वास्तविक मुक्त चित्तदशा आहे. ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ व्यक्तिगत टीका चालू असल्याने हा धागा वाचनमात्र करत आहोत. --मिपा व्यवस्थापन.
  • 69686 views

प्रतिक्रिया

Submitted by अर्धवटराव on Fri, 07/10/2020 - 02:15

In reply to @ अर्धवटराव : फक्त मुद्याचं बोला ! by संजय क्षीरसागर

Permalink

मुद्द्याचं टंकलेलं बघायचच नाहि का??

"तुमच्या नित्यकर्माची स्मृती ही जीवनप्रवाही उर्जा वगैरे नसून, निव्वळ डेटाबेस असतो. अन्यथा काहीही आठवणं असंभव आहे." हा तुमचाच मुद्दा आहे ना? हे असलं संगणकीय संज्ञांचं सुलभिकरण आपलच कर्तुत्व ना? मेंदुची स्मृती मॅनेजमेण्ट हि 'स्टोअर-रिट्रीव्हल' पद्धतीने होत नसुन न्युरोन्सच्या एका विशिष्ट जोडणी-विभागणी पद्धतीने होते, त्यामुळे 'स्मृती मेंदूशिवाय कुठेही स्टोअर होत नाही' हा मुद्दा फोल ठरतो, हे कळायला फार काहि अवघड आहे का ? सजीवांच्या बाबतीत स्मृती म्हणजे केवळ संगणकीय डेटाबेस प्रमाणे साठवण नसुन संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी, तो प्रभाव कॅरी फॉर्वर्ड करणारी सिस्टीम असते, हे फार जगावेगळे कन्सेप्ट आहेत का? जेनेटीके मेमरी वगैरे टर्मीनॉलॉजी कधिच ऐकली नाहि का?

Submitted by शाम भागवत on Fri, 07/10/2020 - 09:02

In reply to मुद्द्याचं टंकलेलं बघायचच नाहि का?? by अर्धवटराव

Permalink

व्वा! पूर्णराव!! व्वा!!!

व्वा! पूर्णराव!! व्वा!!!

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 07/10/2020 - 11:36

In reply to मुद्द्याचं टंकलेलं बघायचच नाहि का?? by अर्धवटराव

Permalink

@ अर्धवटराव : तुमचं कंप्युटरचं ज्ञान कितपत आहे ?

१. > सजीवांच्या बाबतीत स्मृती म्हणजे केवळ संगणकीय डेटाबेस प्रमाणे साठवण नसुन संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी, तो प्रभाव कॅरी फॉर्वर्ड करणारी सिस्टीम असते
डेटा स्टोअर्ड असल्याशिवाय प्रोसेस काय होणार ? अ) तुम्ही बालपणी पाढे पाठ केले असतील ती स्मृती `संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी, तो प्रभाव कॅरी फॉर्वर्ड करणारी सिस्टीम असते' का ? ब) तो पाढा आता तुमच्या मेंदू व्यतीरिक्त कुठे स्टोअर्ड आहे ? क) पाढा आठवायला तुम्हाला कुठली (घंटा) `संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी सिस्टम लागते ' ? उगीच काहीही टर्मिनॉलॉजी वापरुन वाट्टेल ती फेकाफेकी चललीये ! __________________________________________ आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा : The Highest Intelligence Is To Simplify. Complications Indicate Either a Failure of Understanding or a Stupid Mind.

Submitted by आनन्दा on Fri, 07/10/2020 - 13:01

In reply to @ अर्धवटराव : तुमचं कंप्युटरचं ज्ञान कितपत आहे ? by संजय क्षीरसागर

Permalink

जर स्मृती केवळ मेंदूमध्ये

जर स्मृती केवळ मेंदूमध्ये असते तर नुकत्याच जन्माला आलेल्या वासराला ओरडण्याचे आणि दूध पिण्याचे ज्ञान कधी प्राप्त होते त्याबद्दलचे ज्ञानामृत पण आम्हाला पाजून आम्हाला उपकृत करावे ही विनंती.

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 07/10/2020 - 14:32

In reply to जर स्मृती केवळ मेंदूमध्ये by आनन्दा

Permalink

@ आनन्दा : छान प्रश्रे !

पण तुम्हाला स्मृती आणि शरीर यंत्रणा (ओएस) यातला फरक कळलेला दिसत नाही. भूक लागणं, त्यासाठी अन्नाचा शोध किंवा मागणी या शरीर यंत्रणेचा भाग आहेत, त्या जम्मतःच उपलब्ध होतात. थोडक्यात, कंप्युटरसमेत येणारी ती ओएस आहे. स्मृती ही वेगळी गोष्ट आहे, तो डेटा आहे. तुम्ही लेख नीट वाचला असेल तर चर्चा कर्मसिद्धांतावर चालू आहे, म्हणजे डेटाबेसवर चालू आहे. कर्मसिद्धांताचा आधार डेटाबेस आहे, ओएस नाही.
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Fri, 07/10/2020 - 16:43

In reply to @ आनन्दा : छान प्रश्रे ! by संजय क्षीरसागर

Permalink

BIOS आणि OS मधला फरक कळला की

BIOS आणि OS मधला फरक कळला की उलगडा होईल की ओएस संगणकाबरोबर येत नाही ती लोड करावी लागते. ओएस अनेक असतात ज्या एकाच संगणकावर एकाच वेळी चालू शकतात. - (उथळ पाण्याचा खळखळाट फार असतो हे जाणणारा) सोकाजी

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 07/10/2020 - 20:34

In reply to BIOS आणि OS मधला फरक कळला की by सोत्रि

Permalink

@ सोत्रि : तुम्हाला BIOS आणि OS मधला फरक कळतो का ?

चर्चा डेटाबेसवर चालली आहे OS नसेल तर डेटा अ‍ॅक्टीविटीच होणार नाही इतर सजीवांच्या बाबतीत निव्वळ BIOS वर बहुतांश काम चालतं त्यामुळे तिथे कर्मविपाकाचा प्रश्नच येत नाही. व्यक्तीमधे BIOS आणि OS असल्याशिवाय कर्म होणं आणि त्याची स्मृती स्टोअर होणं या प्रक्रियाच असंभव आहेत. लिहितांना मी या दोन्ही गोष्टी क्लिअर करायला हव्या होत्या पण तुम्हाला संगणकीय ज्ञान असेल तर OS शिवाय कंप्युटर डेटा प्रोसेसच करु शकणार नाही हे लक्षात यायला हरकत नव्हती.

Submitted by आनन्दा on Fri, 07/10/2020 - 16:48

In reply to @ आनन्दा : छान प्रश्रे ! by संजय क्षीरसागर

Permalink

तुमच्या अगाध ज्ञानाने दिपून

तुमच्या अगाध ज्ञानाने दिपून जाऊन मी माघार घेत आहे. तुम्ही ओएस म्हणताय म्हणजे असणारच.

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 07/10/2020 - 20:35

In reply to तुमच्या अगाध ज्ञानाने दिपून by आनन्दा

Permalink

@ आनन्दा : वर सोत्रींना दिलेला प्रतिसाद वाचा

ज्ञानात नक्की भर पडेल !

Submitted by अर्धवटराव on Fri, 07/10/2020 - 16:46

In reply to @ अर्धवटराव : तुमचं कंप्युटरचं ज्ञान कितपत आहे ? by संजय क्षीरसागर

Permalink

वाह वा!!

आमचं संगणकीय ज्ञान किती? हे काय विचारणं झालं ? अहो, तुमच्या संगणाकीय ज्ञानापुढे आमचा काहि पाड लागणार आहे का... अटेन्शन मिपाकर्स. आता संक्षी साहेब संगणाकीय मेंदु ज्ञान (सिद्ध संक्षींनी उदयाला आणलेली हि एक नवीन ज्ञानशाखा आहे) वापरुन मेंदुच्या मेमरीचे बेस अ‍ॅड्रेस, अ‍ॅड्रेस आणि डाटा बस फॉर्मेट्स वगैरेचं डेमो देतील.
उगीच काहीही टर्मिनॉलॉजी वापरुन वाट्टेल ती फेकाफेकी चललीये !
नाहि तर काय... लोकं उगाच आपले जेनेटीक मेमरी वगैरेचा अभ्यास करतात. साध्या दोन-चार संगणकीय संज्ञा वापरुन जिथे मेंदुच्या मेमरी मेनेजमेण्टवर एक्स्पर्ट होता येतं, तिथे कशाला भारंभार फेकाफेकी करायची... मूर्खच आहे लोक्स.
The Highest Intelligence Is To Simplify.
हो ना. या बोटाची थुंकी त्या बोटावर लावणं म्हणजे गोष्टी Simplify करणं असा एकदाका आपला समज करुन घेतला कि आपण वाट्टेल त्या गोष्टीत ओ का ठो कळत नसताना भारंभार फेकाफेकी करायला मोकळे.
Complications Indicate Either a Failure of Understanding or a Stupid Mind.
बरोब्बर. रूपक आणि रुप्य यांच्यातला करक न कळणे याला मूर्खपणा म्हणतात. अशा मूर्खपणावर अजुन ज्ञान पाजळणे याला भोंदुगिरी म्हणतात. त्याची नशा होणे याला भोंदुभक्ती म्हणतात... आणि बरच काहि सांगता येईल... पण... कळायचे आणि कळुन वळायचे मार्ग बंद आहेत. हा तुमच्या गोंधळलेल्या मानसीकतेचा परिणाम आहे.

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 07/10/2020 - 20:19

In reply to वाह वा!! by अर्धवटराव

Permalink

@ अर्धवटराव : आरडाओरडा करुन मुद्दा सिद्ध होत नाही

हे आधी सोडवा : अ) तुम्ही बालपणी पाढे पाठ केले असतील ती स्मृती `संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी, तो प्रभाव कॅरी फॉर्वर्ड करणारी सिस्टीम असते' का ? ब) तो पाढा आता तुमच्या मेंदू व्यतीरिक्त कुठे स्टोअर्ड आहे ? क) पाढा आठवायला तुम्हाला कुठली (घंटा) `संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी सिस्टम लागते ' ?

Submitted by अर्धवटराव on Fri, 07/10/2020 - 21:25

In reply to @ अर्धवटराव : आरडाओरडा करुन मुद्दा सिद्ध होत नाही by संजय क्षीरसागर

Permalink

हे आधि सोडवा?

अ) तुम्ही बालपणी पाढे पाठ केले असतील ती स्मृती `संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी, तो प्रभाव कॅरी फॉर्वर्ड करणारी सिस्टीम असते' का ? १) बालपणी मी जे वॅक्सीन्स घेतली त्याची योग्य स्मृती माझ्या इम्युनीटी सिस्टीममधे साठवली गेली २) मी ज्या हार्श प्रसंगांच्या संपर्कात आलो त्याची स्मृती माझ्या रिफ्लेक्स सिस्टीममधे साठवली गेली ३) मी ज्या काहि दृक्/श्रवण्/स्पर्श अनुभवांतुन गेलो (पाढे पाठ करणे हे त्यातच आलं) त्याची स्मृती माझ्या न्युरॉन्सच्या विशिष्ट कनेक्शन्स मधे साठवली गेली ४) निसर्गाने माझ्यात जे काहि शारीरीक बदल करायचे ठरवले, ति स्मृती माझ्या जिनोम लेव्हलला साठवली गेली. ५) अजुन बरच काहि आहे ब) तो पाढा आता तुमच्या मेंदू व्यतीरिक्त कुठे स्टोअर्ड आहे ? -- उपरनिर्दीष्ट जंत्री बघा क) पाढा आठवायला तुम्हाला कुठली (घंटा) `संपूर्ण जैवीक प्रक्रियेवर प्रभाव टाकणरी सिस्टम लागते ' ? -- तुमच्या डोक्यात सतत इन्सिक्युरिटीची घंटा वाजत असते हा तुमचा मानसीक लोचा असा सर्वांसमोर मांडत जाऊ नका. आम्हाला त्याची कल्पना आहे. बाकि अ) चि उत्तरं बघा. माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात जैवीक या सर्व स्मृती मी रोज, लाखो पेशी मेल्या आणि नवीन तयार झाल्या तरी, कॅरी फॉर्वर्ड करतो. त्यातला एक फार मोठा हिस्सा मी माझ्या मुलात कॅरी फॉर्वड केला आहे. आता, तुम्ही खरच थोडे जरी प्रामाणीक असाल तर इतर कुठलिही शाब्दीक हेराफेरी न करता एका सिंपल प्रश्नाचं उत्तर द्या. "पाढा पाठ करणे" म्हणजे नेमकं काय असतं ?

Submitted by अर्धवटराव on Fri, 07/10/2020 - 21:28

In reply to हे आधि सोडवा? by अर्धवटराव

Permalink

माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात जैवीक...

माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात जैवीक लेव्हललाच होतो..

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 07/11/2020 - 16:09

In reply to माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात जैवीक... by अर्धवटराव

Permalink

@ अर्धवटराव : माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात ....

माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात जैवीक लेव्हललाच होतो
जबरदस्त ज्ञान ! मग मेंदू काय शो पीस आहे का ?

Submitted by अर्धवटराव on Sat, 07/11/2020 - 18:16

In reply to @ अर्धवटराव : माझ्य मते या सर्व स्मृती व्यवहारात .... by संजय क्षीरसागर

Permalink

नशीब, तेव्हढं तरी कळलं.

तुमचा मेंदु शो पीस पुरता आहे हे स्विकारल्याबद्दल धन्यवाद. मटेरीअल कुठलं वापरलं ? प्लॅस्टीक, दगड, प्लॅस्टर ऑफ पॅरीस? आम्हा जनरल पब्लीकचा मेंदु जैवीकच आहे... काय करणार.

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 07/11/2020 - 19:10

In reply to नशीब, तेव्हढं तरी कळलं. by अर्धवटराव

Permalink

@ अर्धवटराव : तुमच्या मेंदूबद्दल चाललंय !

नॉर्मल मेंदूत स्मृती स्टोअर होते. आता तुम्हाला वाचताही येईना !

Submitted by अर्धवटराव on Sat, 07/11/2020 - 20:06

In reply to @ अर्धवटराव : तुमच्या मेंदूबद्दल चाललंय ! by संजय क्षीरसागर

Permalink

चालायचच

तुमचा मेंदु शो पीस आहे म्हटल्यावर तुम्ही इतरंच्या मेंदुकडेच बघाल.
नॉर्मल मेंदूत स्मृती स्टोअर होते.
हो ना. पण तुमचा तो शो पीस संगणकाची प्रतिकृती आहे ना.. त्यामुळेच कदाचीत तुम्ही संगणक आणि मंदु यात गफलत करता.

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 07/11/2020 - 21:18

In reply to चालायचच by अर्धवटराव

Permalink

@ अर्धवटराव : आता मात्र हद्द झाली !

तुमची स्मृती गुडघ्यात स्टोअर्ड आहे का ?

Submitted by अर्धवटराव on Sun, 07/12/2020 - 00:09

In reply to @ अर्धवटराव : आता मात्र हद्द झाली ! by संजय क्षीरसागर

Permalink

आता तुमची नजर, समज वगैरे सगळच गंडलय का??

वरच्या प्रतिसादांत स्मृती प्रकारांबद्दल अगदी थोड्यावेळापूर्वी वाचलं ना तुम्ही ? अगदी थोड्यावेळापूर्वी वाचलेलं आठवे ना तुम्हाला? मेंदु प्लॅस्टीकचा म्हटल्यावर तसंही होऊ शकतं म्हणा.

Submitted by आनन्दा on Sat, 07/11/2020 - 10:10

In reply to हे आधि सोडवा? by अर्धवटराव

Permalink

संक्षी फंडामेंटल लेवल चे

संक्षी फंडामेंटल लेवल चे प्रश्न हँडल करू शकत नाहीत..

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 07/11/2020 - 16:05

In reply to संक्षी फंडामेंटल लेवल चे by आनन्दा

Permalink

@ आनन्दा : संक्षी फंडामेंटल लेवल चे प्रश्न हँडल करू शकत नाहीत ?

तुमचा प्रश्न फंडामेंटल लेवलला होता आणि त्याचं वर उत्तर दिलंय. पुन्हा वाचा !

Submitted by अर्धवटराव on Sun, 07/12/2020 - 00:39

In reply to संक्षी फंडामेंटल लेवल चे by आनन्दा

Permalink

ते स्वाभावीक आहे.

सुलभीकरण करण्याच्या नादात त्यांना विषयाचा आवाक लक्षतच येत नाहि. उथळ पाणि आहे.. नुसताच खळखळाट.

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 07/11/2020 - 15:48

In reply to हे आधि सोडवा? by अर्धवटराव

Permalink

@ अर्धवटराव : चर्चा कशावर आणि प्रतिसाद काय !

१) बालपणी मी जे वॅक्सीन्स घेतली त्याची योग्य स्मृती माझ्या इम्युनीटी सिस्टीममधे साठवली गेली
याचा कर्मफलाशी संबंध नाही.
२) मी ज्या हार्श प्रसंगांच्या संपर्कात आलो त्याची स्मृती माझ्या रिफ्लेक्स सिस्टीममधे साठवली गेली
ती मेंदूत असायलाच हवी. अन्यथा तुम्हाला काहीही आठवणार नाही.
३) मी ज्या काहि दृक्/श्रवण्/स्पर्श अनुभवांतुन गेलो (पाढे पाठ करणे हे त्यातच आलं) त्याची स्मृती माझ्या न्युरॉन्सच्या विशिष्ट कनेक्शन्स मधे साठवली गेली
हे पण तुमच्या मेंदूत असेल तितकेच आठवेल.
४) निसर्गाने माझ्यात जे काहि शारीरीक बदल करायचे ठरवले, ति स्मृती माझ्या जिनोम लेव्हलला साठवली गेली.
याचा ही कर्मफलाशी काहीएक संबंध नाही. _______________________________
तुमच्या डोक्यात सतत इन्सिक्युरिटीची घंटा वाजत असते हा तुमचा मानसीक लोचा असा सर्वांसमोर मांडत जाऊ नका. आम्हाला त्याची कल्पना आहे.
हा व्यक्तिगत प्रतिसाद असला तरी उत्तर देतो, सर्वांना उपयोगी होईल. मी स्वतः सत्य असल्यानं मला कोणतीही इन्सिक्युरिटी नाही की चिंता नाही. माझ्या इतकं बिनधास्त आणि जनसामान्यांच्या खोलवर रुजलेल्या धारणांवर लिहिण्याचं साहस कुणीही केलेलं नाही. शिवाय मी स्वतःच्या खर्‍या नावानं लिहितो, मला कोणत्याही लपवाछपवीची गरज नाही. तस्मात, माझी चिंताच सोडा ___________________________________ याउलट तुमचे प्रतिसाद संपूर्ण मानसिक गोंधळ दर्शवतात. तुम्हाला विषय काय आणि प्रतिसाद काय याचं भान नाही. इन्सिक्युरिटी वाटणारा इतरांना हाका मारतो आणि इतरांचा आधार शोधतो शिवाय तुमचा आयडी तुमच्या मनस्थितीचं यथार्थ वर्णन करतो, ते वेगळंच.

Submitted by अर्धवटराव on Sat, 07/11/2020 - 18:33

In reply to @ अर्धवटराव : चर्चा कशावर आणि प्रतिसाद काय ! by संजय क्षीरसागर

Permalink

चर्चा कशाची?

एव्हढ्यात विसरलात? पाढ्यांवरुन प्रश्न तुम्हीच केले होते ना? तुम्हाला मग स्मृतींबद्दल वेगेवेगेळी माहिती दिली... एव्हढ्यात गारद झालात ? उपर्निदेष्ट वेगवेगळ्या स्मृती कशा मॅनेज होते, त्यात मेंदुचा रोल किती, इतर शरीर यंत्रणांचा रोल किती, याचं संपूर्ण विज्ञान अभ्यासाला अव्हेलेबल आहे. अर्थात, एकदाका दोन चार संगणकीय शब्दांत अक्ख्या जैव-विज्ञानाची वाट लावायची म्हटल्यावर त्या अभ्यासाची काहि गरज नाहि. सुलभीकरण हेच ज्ञान, नाहि का? स्मृती स्ट्रींगवरुन तुम्ही तोंडावर आपटलात. मिपावर शोभा झाली. ति रिकव्हर व्हायला म्हणुन कसंही करुन दोन चार भक्तांकडुन आपल्या संगणकीय रुपकावर शिक्कामोर्तब करुन घ्यायला म्हणुन तुम्ही हा नवीन धाग्याचा प्रपंच मांडलात. निराकारी बुवाबाजी धोक्यात आल्यावर तुमच्या मनाने दिलेली स्वाभावीक प्रतिक्रीया आहे हि. तुम्ही पण एक लक्शात ठेवा... जसे तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला उत्तरं त्याच टाईपचे मिळातील.

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 07/11/2020 - 19:11

In reply to चर्चा कशाची? by अर्धवटराव

Permalink

@ अर्धवटराव : हाच तो मानसिक गोंधळ !

आता तरी नीट वाचा : चर्चा कर्मसिद्धांतावर चालू आहे. त्यासाठी केलेल्या कर्माची स्मृती स्टोअर होणं गरजेचं आहे. तुम्ही बालपणी घेतलेली इंजेक्शनं, तुमची शारीरिक वाढ या गोष्टी कर्मविपाकात येत नाही. तुम्हाला एकतर विषयही कळत नाही आणि भलत्याच गोष्टीवर भारंभार आणि निरर्थक लिहित सुटता.

Submitted by अर्धवटराव on Sat, 07/11/2020 - 20:15

In reply to @ अर्धवटराव : हाच तो मानसिक गोंधळ ! by संजय क्षीरसागर

Permalink

आता तरी नीट वाचा :

हे कष्ट तुम्ही कधि घेणार? कर्मविपाकाचा स्मृतीशी संबध जोडुन, आणि ति स्मृती संगणकाप्रमाणे काम करते हे सुलभीकरण करुन तुम्ही कर्मविपाकाची हवा काढायचा केवीलवाणा प्रयत्न करत आहात.. कर्म, स्मृती वगैरे बाबतीत तुमचं आकलन इतकं उथळ आहे कि तुम्हाला विषयाचा आवाकाच लक्षात येत नाहि.. मग तुमचा नेहेमीचा ठरलेला फॉर्मुला... सगळ्यांना गोंधळलेले वगैरे लेबलं चिकटवायची, आणि आपलं आत्मस्तुतीचं सुख भोगायचं. असो. हे आता नित्याचच झालय.

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 07/11/2020 - 21:35

In reply to आता तरी नीट वाचा : by अर्धवटराव

Permalink

@ अर्धवटराव : कळत नसेल तर प्रतिसाद देणं तरी थांबवा !

कर्मविपाकाचा संबंध स्मृतीशी नाही तर काय बालपणी घेतलेल्या इंजेक्शनशी आहे ? का शारिरिक वाढीशी आहे ? तुम्हाला सकाळी खाल्लेलं संध्याकाळी आठवायला जाणीवेचा रोख मेंदूकडे वळवावा लागत नाही काय ? का आठवण्याची तुमची काही वेगळी प्रोसेस आहे ? स्मृतीभ्रंश होतो तेंव्हा व्यक्तीच्या मेंदूवर उपचार होतो का गुडघ्यावर ? पाप-पुण्य, नीती-अनितीचा विचार तुम्ही कोणत्या अवयवानी करता ? कर्मसिद्धांत तुम्ही मेंदूनी शिकलात का आणखी कोणत्या मार्गानी ? देव तुम्हाला भाषेतून शिकवला गेला का जन्मतःच ते ज्ञान घेऊन आला होतात ? आणि तसं असेल तर ते नक्की कुठे होतं ? न तुम्हाला विषयाची कल्पना, न काही वैचारिक सुसंगतता. यापुढे प्रतिसाद न देणं तुमच्या हिताचं आहे.

Submitted by अर्धवटराव on Sat, 07/11/2020 - 22:00

In reply to @ अर्धवटराव : कळत नसेल तर प्रतिसाद देणं तरी थांबवा ! by संजय क्षीरसागर

Permalink

चला... फायनली तुम्ही आपलं लिमीटेड आकलन मान्य केलत

स्मृती म्हणजे केवळ काहि दृक्/श्राव्य आठवणी, ज्या संगणकीय टाईप पद्धतीने मेंदुत 'स्टोअर' होतात, त्याच अर्थाने कर्मविपाकात ति कंसीडर केल्या जाते, हेच तुमह्चं चुकीचं आकलन आणि अझप्शन आहे.. हे तुम्हाला खरच कळत नाहि आहे कि मुद्दाम पेडगावला जातात ?
न तुम्हाला विषयाची कल्पना, न काही वैचारिक सुसंगतता. यापुढे प्रतिसाद न देणं तुमच्या हिताचं आहे.
आले आले.. साहेब आपल्या मूळ स्वभावावर परत आहे.. तसे ते नेहेमीच होते म्हणा.

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 07/12/2020 - 00:02

In reply to चला... फायनली तुम्ही आपलं लिमीटेड आकलन मान्य केलत by अर्धवटराव

Permalink

@ अर्धवटराव : तुमच्या जिनोम थिअरीमुळे

तुम्हाला स्मृती अंगभर पसरलीये असं वाटतंय, आणि त्यामुळे बहुदा स्वतःचा मेंदू नक्की कुठे आहे याचा पत्ता लागत नाहीये ! अहो, कर्माची स्मृती मेंदूत असते ! तुम्ही सकाळी काय काम केलं ? असं विचारल्यावर तुमचे विचार मेंदूत चालू होतात की गुडघ्यात हे बघा, म्हणजे असा गोंधळ होणार नाही.

Submitted by अर्धवटराव on Sun, 07/12/2020 - 00:20

In reply to @ अर्धवटराव : तुमच्या जिनोम थिअरीमुळे by संजय क्षीरसागर

Permalink

परत तेच

तुम्हाला मुळात स्मृती म्हणजे काय हेच कळत नाहिए. कर्माच्या स्मृती म्हणजे केवळ दृक्/श्राव्य/स्पर्षाच्या काहि लिमीटेड आठवणी नाहित... एक वाटीभर मिर्च्या खा. किती खाल्ल्या, त्यांचा रग कसा होता, चव कशी होती हे प्लॅस्टीक मेंदुने आठवलं नाहि तरी दुसर्‍या दिवशी शरीराच्या योग्य ठिकाणी बरोब्बर आठवण करुन दिली जाईल.

Submitted by उन्मेष दिक्षीत on Sun, 07/12/2020 - 02:01

In reply to परत तेच by अर्धवटराव

Permalink

अर्धवटराव : सॉरी पण तुमचा

मेमरी आणि संवेदना यामधे घोळ होतोय! कोणत्याही कर्माच्या स्मृती प्रत्यक्ष अनुभवापासून कशा वेगळ्या असतील. अ‍ॅक्सिडेंट झाल्यानंतर फ्रॅक्चर तसंच राहील आणि दुखेल, पण अ‍ॅक्सिडेंट कसा झाला हे कसं आठवतं ? हा सगळा अनुभव हाताने किंवा पायाने स्टोअर केला कि मेंदू ने ? आणि फ्रॅक्चर बरे झाल्यानंतरही कसं आठवतं नेमकं कुठं झालं होतं ते ? हा सगळा डेटा जेव्हा पाहीजे तेव्हा कुठे रेडिली अवेलेबल असतो ? तुमच्या मते मेंदूचा रोल काय आहे ? आता तुम्ही म्हणाल कि काहीतरी पूर्वसंचीत (ऑलरेडी केलेल्या कर्माच्या स्मृती) त्यामुळं झाला अ‍ॅक्सिडेंट ! तर याला पुरावा आणि आधार काय आहे?

Submitted by अर्धवटराव on Sun, 07/12/2020 - 02:57

In reply to अर्धवटराव : सॉरी पण तुमचा by उन्मेष दिक्षीत

Permalink

योग्य प्रश्न विचारला. धन्यवाद.

प्रतिसाद लांबलचक आहे... इथेदेतोय.

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 07/12/2020 - 08:47

In reply to परत तेच by अर्धवटराव

Permalink

@ अर्धवटराव : शाब्बास ! आता तुमचा घोळ कळला

तुम्ही स्वतःचा मेंदू अशाप्रकारे शोधलेला दिसतो ! म्हणून तुम्हाला तो नक्की कुठे आहे हे समजत नाही !

Submitted by अर्धवटराव on Sun, 07/12/2020 - 17:29

In reply to @ अर्धवटराव : शाब्बास ! आता तुमचा घोळ कळला by संजय क्षीरसागर

Permalink

तरीच...

तुमचा प्लॅस्टीक मेंदु तुम्ही 'त्या' कामासाठी वापरता होय... ते ही बरोबर आहे म्हणा. जे साठवलं असेल्त तेच बाहेर पडेल. म्हणुनच तुमचा प्लॅस्टीक मेंदु 'बाईट बाय बाईट' प्रसवतो आणि तुम्हाला ते संगणकीय वाटत.

Submitted by मराठी_माणूस on Wed, 07/08/2020 - 14:42

In reply to काही गृहितके अपूर्ण आहेत ... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

छान. एक वेगळा विचार , विचार

छान. एक वेगळा विचार , विचार करायला लावणारा.

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 07/08/2020 - 16:11

In reply to छान. एक वेगळा विचार , विचार by मराठी_माणूस

Permalink

@ मराठी_माणूस : छान. एक वेगळा विचार , विचार करायला लावणारा.

याचा अर्थ तुम्ही चौकटीबाहेर जाऊन, कुठलीही पूर्वधारणा मधे न आणता, नव्याला सामोरे जाऊ शकता ! धन्यवाद !

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 07/08/2020 - 15:54

In reply to काही गृहितके अपूर्ण आहेत ... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

@ ज्ञानोबाचे पैजार : फारच लांब गेलात !

कर्मसिद्धांत याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचं वर्तमान हे त्याचा भूतकाळ ठरवतो . यात मागचे जन्मही (किती ते कुणालाही माहिती नाहीत) आले. आणि असा डेटा मॅनेज करणारी एक रिअल टाईम यंत्रणा (पापभीरुंसाठी देव) अस्तित्वात आहे ! याचा काऊंटर असायं की प्रत्येकानं काय काशी केली याचा आलेख त्याच्या मेंदूतल्या स्मृतीपलिकडे कुठेही नसतो. आता या स्मृतीविषयी बोला !

Submitted by Rajesh188 on Wed, 07/08/2020 - 14:27

Permalink

मूळ रूप सर्वांचे एकच

सजीव असू नाही तर निर्जीव मूळ रूप सर्वांचे एकच.

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 07/08/2020 - 15:41

In reply to लगे रहो स्मृती स्ट्रींगवाले विज्ञाननिष्ठ बाबा by संगणकनंद

Permalink

@ त्याचू वैलपान : पुन्हा त्याचू प्रतिसाद !

तुम्हाला थोडं जरी कंप्युटरमधलं ज्ञान असेल तर सगळं शांतपणे वाचा. नक्की लाईट पडेल.

Submitted by संगणकनंद on Wed, 07/08/2020 - 15:51

In reply to @ त्याचू वैलपान : पुन्हा त्याचू प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर

Permalink

झाली ना बोलती बंद =))

तुम्ही आज लिहीलेलं: मॄत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही हे खरं आहे की, याआधी लिहीलेलं: एका जीवंत माणसाला दुसऱ्या मृत व्यक्तीचा भूतकाळ स्मरत असतो. नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते. या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात. अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात हे खरं आहे. की ही दोन्ही विधाने जरी परस्पर विरोधी असली तरी ती तुम्ही केलेली असल्याने दोन्ही बरोबर आहेत?

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 07/08/2020 - 16:01

In reply to झाली ना बोलती बंद =)) by संगणकनंद

Permalink

@ त्याचू वैलपान : त्याचू फार शोभा होतेयं !

थोडं तरी वाचत जा. हा वरचा प्रतिसाद बघा

Submitted by संगणकनंद on Wed, 07/08/2020 - 16:15

In reply to @ त्याचू वैलपान : त्याचू फार शोभा होतेयं ! by संजय क्षीरसागर

Permalink

शोभा तुमची होत आहे...

शोभा तुमची होत आहे. तुम्ही दोन परस्पर विरोधी विधाने केली आहेत. आणि ही विसंगती लक्षात आणून दिल्यावर तुमची बोलती बंद झाली आहे. १. मॄत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही २. एका जीवंत माणसाला दुसऱ्या मृत व्यक्तीचा भूतकाळ स्मरत असतो. नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते. या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात. अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात हे खरं आहे. ही दोन विधाने परस्पर विरोधी आहेत की नाही? हो किंवा नाही एव्हढंच सांगा. इथला दुवा, तिथला दुवा, हे वाचा, ते वाचा असल्या पळवाटा शोधणं बंद करा.

Submitted by Rajesh188 on Wed, 07/08/2020 - 15:44

Permalink

स्मृती

स्मृती कशा कशात आणि कोण कोणत्या रूपात साठवल्या जातात ह्याचा पूर्ण अभ्यास करा अगोदर. तुम्हाला हार्ड डिस्क आणि electromagnetic chya रुपात असलेलं स्मुर्ती एवढेच मर्यादित ज्ञान आहे. विश्व खूप विशाल आहे तिथे काय होवू शकत हे अजुन तरी कोणाला समजले नाही. किती तरी विद्वान लोक होवून गेली पण डाव्या विचारांच्या लोकांसारख फाजील आत्मविश्वास कोणाकडे च बघायला मिळाला नाही.

Submitted by आनन्दा on Wed, 07/08/2020 - 16:09

Permalink

Calling गड्डा झब्बू,

Calling गड्डा झब्बू,

Submitted by उन्मेष दिक्षीत on Wed, 07/08/2020 - 16:27

Permalink

पुनर्जन्म

या एकाच थिअरीला प्रुव करण्यासाठी पूर्वसंचीत आणि कर्मसिद्धांत ही गृहीतकं मानली गेली आहेत, आणि त्यांना आजपर्यंत कुणीही क्वेश्चन किंवा रिफ्युट केले नसल्याने ते तसेच मानणे चालू आहे. वर सोत्रींनी सगळ्यासाठी सायंटीफिक पुरावे मागितले आहेत. पुनर्जन्म या थिअरीला काय सायंटीफिक पुरावा आहे ? शिवाय कर्म->पूर्वसंचीत->पुनर्जन्म->कर्म ही साखळी कुठपर्यंत चालू रहाणार ? मग फ्री वील आणि फ्रीडम चं काय ? सुटका कधी कर्मापासून आणि प्रारब्ध भोगण्यातून. आणि प्रारब्ध चालू कधी झालं हाच एक प्रश्न आहे.

Submitted by उन्मेष दिक्षीत on Wed, 07/08/2020 - 16:29

In reply to पुनर्जन्म by उन्मेष दिक्षीत

Permalink

पुनर्जन्म या एकाच थिअरीला

प्रुव* करण्यासाठी * सपोर्ट करण्यासाठी

Submitted by संगणकनंद on Wed, 07/08/2020 - 16:49

In reply to पुनर्जन्म या एकाच थिअरीला by उन्मेष दिक्षीत

Permalink

संक्षीघोषित "वैज्ञानिक सत्य"

तुमचं खालील संक्षीघोषित "वैज्ञानिक सत्य" बद्दल काय म्हणणं आहे?
पुनर्जन्म असं काहीही नाही ती लोकांना दिलासा द्यायला शोधलेली एक कल्पना आहे जेंव्हा आपण एखाद्याचा पुनर्जन्म झाला म्हणतो तेंव्हा काय झालेलं असतं ? तर एका जीवंत माणसाला दुसऱ्या मृत व्यक्तीचा भूतकाळ स्मरत असतो. या पलिकडे पुनर्जन्म म्हणजे काही नाही. ही स्मृती जीवंत व्यक्तीच्या मेंदूखेरीज कुठेही नसते. पण हा प्रकार कशामुळे होतो ? नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते. या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात. अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात > त्याला तो डेटा सक्रीय झाला की मृत व्यक्तीच्या जीवनपटाचा काही भाग दिसायला लागतो > आणि आपण म्हणतो पुनर्जन्म झाला ! अशाप्रकारे पुनर्जन्म वगैरे काही नसून, ती डिस्क फॉरमॅटींगमधे नकळत झालेली चूक आहे

Submitted by शा वि कु on Wed, 07/08/2020 - 16:38

In reply to पुनर्जन्म by उन्मेष दिक्षीत

Permalink

उन्मेष

आणखी एक मुद्दा- पूर्वसंचिताची कल्पना ही कायमच शोषितांवर होणारे अन्याय चालवून घेण्यासाठी वापरली गेली आहे.

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 07/08/2020 - 17:02

In reply to उन्मेष by शा वि कु

Permalink

@ शा वि कु : पूर्वसंचिताची कल्पना ही कायमच

> शोषितांवर होणारे अन्याय चालवून घेण्यासाठी वापरली गेली आहे.
आणि देवभोळ्यांचा देवावरचा विश्वास कमालीचा फोफावत नेऊन सदैव तेवत ठेवण्यासाठी !
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Wed, 07/08/2020 - 18:24

In reply to उन्मेष by शा वि कु

Permalink

पूर्वसंचिताची कल्पना ही कायमच

पूर्वसंचिताची कल्पना ही कायमच शोषितांवर होणारे अन्याय चालवून घेण्यासाठी वापरली गेली आहे.
पूर्वसंचिताची शास्त्रिय बैठक घालवून, मोडकळीस नेऊन, विवीध भेदांवर आधरित शोषणव्यवस्था उभी करण्यासाठी पूर्वसंचिताची कल्पना वापरली गेली आहे. असंही असू शकतं. - (पूर्वसंचित) सोकाजी

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com