Skip to main content

देवाचं नांव कुणी ठेवलं ?

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 16/06/2020 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
देवाचं नांव कुणी ठेवलं ? या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो. तुमचं जीवन निर्भार होतं; सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते, पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे, एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली ! कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही. कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही. कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत, कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्‍याचं धन होणारी दानपेटी नाही. कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही. कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको, कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज. घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ; सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी. स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला, तुमच्या कष्टाचा पैसा ! आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ? _____________________________________ देवाचं नांव कुणी ठेवलं ? इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर ! प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला; आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं ! कुठल्या गुरुकडे जायला नको, 'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही, आणि चेहेर्‍यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही. वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही, जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही, की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही. एका प्रष्णात काम तमाम ! _____________________________ एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही ! इतकी वर्ष काय झक मारलीस का ? या मनाच्या उपहासाला, एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं. मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील, पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल, वाघावर बसून आकाशमार्गे येणार्‍यांच्या आणि भींत चालवणार्‍यांच्या सिद्धींपेक्षा; तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्‍या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ, तुम्हाला जवळचे वाटतील. पाण्यात दिवे पेटवणार्‍यांऐवजी, रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्‍या कामगारांप्रती, तुमचा मैत्रभाव जागेल. चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे, आपण त्यांच्यापुढे छपरी, हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल. एक सामान्य, वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय, संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी, अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला, साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही निर्भ्रांत जगायला लागाल ! अगदी आजपासून !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 92127
प्रतिक्रिया 379

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, १.
याचा अर्थ शांती लाभेल हा तुमचा अनुभव नसून तर्क आहे आणि अजपाजप हा स्वानुभव होऊनही तुम्हाला ती लाभलेली नाही. थोडक्यात, नामस्मरणाच्या दुसर्‍या पायरीवरही रिझल्ट नाही.
मी नाम घेतो ते देवाचं अनुसंधान साधण्यासाठी. म्हणजे देव माझ्या सोबत आहे ही जाणीव जागृत ठेवण्यासाठी. यातनं उत्पन्न झालेल्या उपफळांचा मी फारसा विचार करीत नाही. २.
आता नामसाधनेच्या अंतीम पायरीवरचा इष्ट देवतेचं दर्शन, हा शेवटचा भ्रम उरला आहे !
मला देवदर्शनाची आंस नाही. तो बरोबर असला म्हणजे झालं. दिसला नाही तरी माझं व्यक्तीश: काहीही बिघडंत नाही. पण दिसला तर आवडेल मला. ३.
थोडक्यात, हा तुम्हीच निर्माण केलेला विठ्ठल, तुम्हाला निर्गुणाचं दर्शन होण्याच्या मार्गात अडसर होणार !
विठ्ठल नामदेवाने निर्माण केलेला नाही. तो पंढरपुरात स्वयंभूपणे उभा आहे. ४.
मग त्या कामासाठी तुम्ही तोतापुरींऐवजी विसोबा शोधणार !
हा 'तुम्ही' म्हणजे नेमकं कोण? विसोबा शोधणं हे ज्ञानदेवांचं काम आहे. नामदेवाचं नाही. ५.
एकतर विसोबानी नामदेवांचा विठ्ठल कसा सोडवला, या प्रक्रियेची तुम्हाला काहीही माहिती नाही,
मला गरज नाही. माझ्याकडे भरपूर बुद्धी आहे. पाहिजे तेव्हा त्यातला हवा तेव्हढा विदा जाणून घेऊ शकेन, इतका आत्मविश्वास आहे. ६.
थोडक्यात, उपलब्ध कागदपत्रांनुसार, विसोबांनी नामदेवांचा विठ्ठल सोडवलेला दिसत नाही.
विठ्ठल सोडवणे म्हणजे सगुण रुपापल्याड असलेलं निर्गुण रूप दाखवणे. ७.
नामस्मरण हा निव्वळ टाइमपास आहे,
आहेच मुळी. एकदा का जप मनात मुरला की तो मस्तपैकी टाईमपास होऊन राहतो. कबीर म्हणून गेलेत : राम हमारा जप करे, हम बैठे आराम ८.
त्यातून शांती लाभणं तर दूरच, परत विसोबा खेचर शोधावा लागतो, आणि
मला आजवर लाभली नाही म्हणून तुम्हांस लाभणार नाही असं थोडंच आहे? शिवाय मला उद्या शांती लाभू शकते. ती शक्यता जागृत आहेच. नामस्मरणातनं अनेकांना शांती मिळाली आहेही. ९.
पण ते चैतन्य पराकोटीच्या ध्वनीशून्यतेत काम करतं, त्याचा नामस्मरणाशी सुतराम संबंध नाही.
तरीही स्पंदन असतंच. ते स्पंदन म्हणजे नाम. १०.
त्यात इतकी ध्वनीशून्यता आहे की आपणही तिच्याबरोबर ती परिक्रमा करतोयं,
तिथेही स्पंदन आहेच. थोडक्यात 'नाम' सर्वत्र आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१. मी नाम घेतो ते देवाचं अनुसंधान साधण्यासाठी. म्हणजे देव माझ्या सोबत आहे ही जाणीव जागृत ठेवण्यासाठी. थोडक्यात, नामाच्या आधारावर तुम्ही एक काल्पनिक देव धरुन ठेवला आहे. नाम बंद की देव गुल ! २. मला देवदर्शनाची आंस नाही. तो बरोबर असला म्हणजे झालं. दिसला नाही तरी माझं व्यक्तीश: काहीही बिघडंत नाही. पण दिसला तर आवडेल मला. तुमच्या कल्पनेतला देवच तुम्हाला दिसू शकतो ! गोंदवलेकरांना राम शिकवला नसता तर त्यांना तो दिसला (?) नसता ! ३. विठ्ठल नामदेवाने निर्माण केलेला नाही. तो पंढरपुरात स्वयंभूपणे उभा आहे. मोदी युगपुरुष आहेत या भक्तांच्या श्रद्धेत आणि तुमच्या वरच्या विधानात फारसा फरक नाही. ४. विसोबा शोधणं हे ज्ञानदेवांचं काम आहे. नामदेवाचं नाही. तुमच्यासाठी विसोबा शोधणारे ज्ञानदेव ऑलरेडी आहेत ? कुठे असतात आणि केंव्हा भेटले ते तुम्हाला ? ५. मला गरज नाही. माझ्याकडे भरपूर बुद्धी आहे. पाहिजे तेव्हा त्यातला हवा तेव्हढा विदा जाणून घेऊ शकेन, इतका आत्मविश्वास आहे. वरच्या प्रतिसादांवरुन तुम्हाला इष्ट देवता दिसायला लागली तर तिच्यापासून सुटकेचा, तुमच्याकडे कोणताही मार्ग दिसत नाही. ६. विठ्ठल सोडवणे म्हणजे सगुण रुपापल्याड असलेलं निर्गुण रूप दाखवणे ? तुम्हाला अजून सगुण दिसायला तयार नाही, ते दिसल्यावर तुमचे ज्ञानेश्वर तुमच्यासाठी विसोबा आणणार मग ते तुम्हाला निर्गुण दाखवणार, आणि कसा ते तुम्हाला माहिती नाही ! तुम्ही माझे सगळे मुद्दे यथोचित सिद्ध केले ! ७. आहेच मुळी. एकदा का जप मनात मुरला की तो मस्तपैकी टाईमपास होऊन राहतो. पुन्हा एकदा धन्यवाद ! ८. मला आजवर लाभली नाही म्हणून तुम्हांस लाभणार नाही असं थोडंच आहे? शिवाय मला उद्या शांती लाभू शकते. ती शक्यता जागृत आहेच. नामस्मरणातनं अनेकांना शांती मिळाली आहेही. पुन्हा तीच चूक ! शांती आपण खुद्द आहोत. त्यासाठी नामस्मरणाची आवश्यकताच नाही. पण आता तुमचे प्रतिसाद तर्कहीन झाल्यामुळे ते कळण्याची शक्यता मालवली. ९. तरीही स्पंदन असतंच. ते स्पंदन म्हणजे नाम. स्पंदनासाठी नामाची आवश्यकता नाही. हृदय चालू आहे म्हणून धडधड ऐकू येतेयं, तुम्ही घोड्याच्या पुढे गाडी जोडतायं ! १०. तिथेही स्पंदन आहेच. थोडक्यात 'नाम' सर्वत्र आहे. शांततेत स्पंदन आहे आणि स्पंदन आहे म्हणून नाद आहे. तस्मात, मूळ शांतता आहे; नाद नाही ____________________________________________ एकूणात तुमच्याशी आतापर्यंत चर्चा छान झाली पण आता प्रतिसाद तर्कशून्य आणि भवविवश होत चालल्यानं मला चर्चेत स्वारस्य उरलेलं नाही. तरीही गामाश्री, तुमच्या सभ्य आणि सयंमशील प्रतिसादांना मनःपूर्वक दाद देतो !

In reply to by संजय क्षीरसागर

शांततेत स्पंदन आहे
शांततेत जर स्पंदन असेल तर ती शांतता नाही! शांतता म्हणजे शून्य. - (शांत होण्याची आस असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

काय बोल्ता ? शांतता सर्वव्यापी आहे, स्पंदन नाद सर्व काही तिच्यात आहे. शून्य हे शांततेचं दुसरं नांव आहे, आणि सर्व प्रकटीकरण (हे अस्तित्त्व) शून्यानं तर धारण केलंय ! ती शांतता किंवा ते शून्यच तर सर्व चराचर व्यापून आहे, आणि त्यामुळे तेच आपलं स्वरुप आहे.

In reply to by सोत्रि

मुळात ज्याला इथे शांतता म्हटलं जातय ति म्हणजे स्पंदन जाणवणार्‍याची क्षमता संपणं आहे. एका मर्यादेपलिकडे ध्वनी ग्रहण करता येत नाहि... त्यालाच शांतता म्हटलं तर ति ग्रहण करणार्‍याची लिमीटेशन झाली. तिथे खरच शांतता आहे कि ध्वनी तरंगांचं आपल्याला न उमगलेलं रूप आहे याचा अंदाज बांधता येतो किंवा आणखी खोलात जायचे प्रयत्न करता येतात. शांतताच सर्वकाहि आहे म्हणणे अर्धसत्य तरी आहे किंवा संपूर्ण असत्य तरी.

४. मग त्या कामासाठी तुम्ही तोतापुरींऐवजी विसोबा शोधणार ! हा 'तुम्ही' म्हणजे नेमकं कोण? विसोबा शोधणं हे ज्ञानदेवांचं काम आहे. नामदेवाचं नाही.
गा.पैंशी सहमत. ह्यावरुन एक कथा आठवली. अरबस्थानातील एका उंट व्यापाराकडे १७ उंट होते.तो मृत्युशय्येवर असताना त्याच्या ३ मुलांच्या भवितव्याबाबत चिंता वाटत असे.३ मुले साधारण बुध्दीमत्तेचे असल्याने कुणा एका मार्गदर्शकाची त्यांना गरज आहे हे तो ओळखुन होता. आपल्या मृत्युपत्रात त्याने असे लिहिले कि एकुण उंटांपैकी १/२ मोठ्याला,१/३ मधल्याला व १/९ धाकट्याला द्यावेत.कुठलाही उंट मरता कामा नये व जोपर्यंत वाटणी बरोबर होत नाही तोपर्यंत तिघांनी मिळून काम करावे जेव्हा होईल तेव्हा ज्याने कोणी मदत केली त्याचा सल्ला पुढे मानावा वगैरे. तिघांनाही वाटणी काही करता येईना. शेवटी एक फकिर तिथुन स्वतःच्या उंटावरुन जात असताना त्याला ह्या समस्येबद्दल कळले व त्याने त्यांना मदत करायची इच्छा दर्शविली. मदत म्हणुन त्याने आपला एकुलता एक उंट त्या ३ बंधुंना दिला. मग आता नवीन संख्येनुसार १८ मधले ९ उंट मोठ्याने घेतले,६ उंट मधल्याने व २ उंट धाकट्याला मिळाले. एकुण वाटणी झालेले उंट ९+६+२ मिळुन १७ असे झाले व फकिराने आपला उंट परत घेतला. सगूणापलिकडील निर्गुण दाखवणे हा प्रकार मला वरील उदाहरणातील फकिराने फिरवलेल्या उंटासारखा वाटतो. उंट वापरलाही गेलाय व वापरला नाहीही गेलाय.

In reply to by संजय क्षीरसागर

निर्गुण असा कशात काढता घालता येत नाही ! तो एकच आहे आणि त्यातच सगळं आहे.
तुम्ही म्हणता तसे असुही शकेल. पण हे विधान फार थेऑरिटिकल आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

पण हे विधान फार थेऑरिटिकल आहे.
जो पर्यंत स्वानुभूती येत नाही तोपर्यंत सर्वच थियराॅटिकल असतं, सायंन्समधेही! - (प्रॅक्टिकल) सोकाजी

In reply to by सोत्रि

>जो पर्यंत स्वानुभूती येत नाही तोपर्यंत सर्वच थियराॅटिकल असतं, सायंन्समधेही! एक्झॅक्टली सोत्रिसर. विज्ञानात सिध्दता असते तर अध्यात्म्यात प्रचिती.! वरील उंटाच्या उदाहरणात ही फकिराच्या बाजुने पाहिले तर उंटाची गरज नाही म्हणजे नसलेला उंट तीन बंधुंना दिला व त्यांची समस्या सोडवली व तो नसलेला उंट परत स्वतःकडे आणला. पण ते तिघे बंधु फकीराच्या पातळीवरचे नसल्याने त्यांच्यासाठी एक उंट असा फिरवावा लागला. समजा इथे फकिराने असे म्हटले असते कि बाबांनो माझ्याकडे एक उंट आहे त्याचे नाव "अल्लारखा" वा "अल्लाबक्ष" वगैरे तत्सम काहीतरी ठेवु. तो मी तुम्हाला इथे दिला असे समजा आता कॅलक्युलेशन करा व समस्या सोडवा.तशीही समस्या सुटली असती पण इथे जर तिघा बंधुंनी कुतर्क केला असता कि जो उंट नाहीच आहे त्याचे नाव तुम्ही कसे ठेवता तर ही समस्या कदाचितही ना सुटती.

In reply to by कानडाऊ योगेशु

करेक्ट ! प्रचिती नसल्यानं अशी उदाहरण पसरली आहेत आणि कुणी संतांनं असं उदाहरण दिलं की पब्लिकला वाटतं `हाऊ ग्रेट !' पण मजा म्हणजे त्यालाही त्यातलं काही कळलेलं नसतं, तो त्याच्या गुरुकडून मिळालेला माल पुढे पोहोचवत असतो. सत्य ही निर्वस्तू आहे आणि तीच सर्व चराचर अंतर्बाह्य व्यापून आहे. तुम्ही ती काढणार कशातून ? आणि ठेवणार कुठे ? कारण निर्वस्तू असल्यानं तीचं विभाजनही होऊ शकत नाही, म्हणून तर नैनं च्छिंदंती शस्त्राणी म्हटलंय. आणि तीनंच सर्व व्यापल्यानं तीला कुठेही ठेवता येत नाही. म्हणून निर्वस्तू अक्षय आहे; तीच्यात वृद्धी किंवा घट होत नाही. ___________________________________________ त्यामुळे तुमचं ऊंटाचं उदाहरण गैरलागू आहे. तसंच ते सगुणातून निर्गुण अलगद काढता येईल या भ्रामक कल्पनेला ही गैरलागू आहे. त्यामुळे अध्यात्म एकदम क्लिअर-कट आहे : एकतर निर्गुणाचा उलगडा झाला किंवा मग नाही झाला. आधी सगुण साधू मग नामदेवाला, ज्ञानदेव विसोबा खेचराकडे पाठवतील, आणि तो अलगद सगुणातून निर्गुण वेगळा काढून दाखवेल, याला काव्यात्मक कल्पनेपलिकडे काही अर्थ नाही. कारण निर्गुण ही निर्वस्तू आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

त्यामुळे तुमचं ऊंटाचं उदाहरण गैरलागू आहे.
ते कसे? माझ्यामते भावंडांच्या मटेरिअलिस्टीक सत्य परिस्थितीत फकिर भेटल्यानंतर काहीही फरक पडला नाही.पण एक समस्या सुटली आहे. नसलेला उंट फिरवला आणि चमत्कार घडला आणि सत्यही तसेच राहिले.
तसंच ते सगुणातून निर्गुण अलगद काढता येईल या भ्रामक कल्पनेला ही गैरलागू आहे.
माझ्यामते सगुणातुन निर्गुणाला बाहेर काढणे असे नसुन सगुणाच्या सहाय्याने निर्गुणाची अनुभुती घेणे असे असायला हवे. म्हणजे एखादा तरण-शिक्षक आपल्या शिष्याला आधी डबा बांधुन पोहायला शिकवेल. पण एका निर्णायक क्षणी तो डबा आता जोखड होतोय तुच काढुन टाक असे म्हणेल वा स्वतःच त्याचा डबा काढुन शिष्याला पाण्यात ढकलेल.

तीनशे प्रतिसाद झाल्यावर.. कोणाच्या विचारात जर फरक पडला नाही तर, दोन्ही साईड ने बोलणाऱ्यांनी विषय बंद करण्यास काही हरकत आहे काय? सहज वाटले..

फक्त धागा कर्त्यालं पटल तरच निर्माता अस्तित्वात आहे नाही पटल तर नाही. धार्मिक विचारांनी सुयोग्य समाज निर्माण होतो अन्यथा नाही हे धागा कार्त्याला पटले तरच सत्यात उतरले. कशाला त्यांना पटवण्याचा आटापिटा करताय कारण त्यांच्या सारखा विचार करणारी लोक अल्प संख्यक आहेत. आपले विचार त्यांना पटले पाहिजेत ही आपली मजबुरी नाही. अन् त्यांचे विचार आपल्याला पटले पाहिजेत ही त्यांची गरज आहे. हा धागा बंद करणे च उत्तम.

In reply to by Rajesh188

निर्माण होतो अन्यथा नाही ? वाचा : >दुसर्‍याचा गैरफायदा घेऊ नका आणि भीडेखातर किंवा मोहास्तव, स्वतःचा दुसर्‍याला फायदा घेऊ देऊ नका या फक्त एका आचरणानं समाज कायम नितीमान राहील आणि कोणत्याही पाप-पुण्याच्या भयाची (म्हणजे देवाची) गरज उरणार नाही

In reply to by संजय क्षीरसागर

ह्या जगाचा कोणी तरी निर्माता आहे ह्या वर माझा विश्वास आहे. आणि कसे जगावे,जगण्याची उद्दीष्ट काय असावीत, समाजात वावरताना वर्तन कसे असावे. सुख ,दुःखाच्या कल्पना ह्या विषयी धर्म जे सांगतो ते अती उत्तम दर्जाचे च आहे .आणि मला ते पटत धर्म अस्तित्वात आले नसते तर आताच सुनियोजित समाज,कुटुंब अस्तित्वात आलीच नसती. हे पण ठाम मत आहे तुमची मत बरोबर असतील तुमच्या पुरती त्या वर माझा काही आक्षेप नाही. आणि तुमचीच मत योग्य आहेत ती सर्वांनी स्वीकारावी असे तुम्हाला वाटत असेल तर माझा नाईलाज आहे. मी तुमच्या मताशी सहमत नाही.

In reply to by Rajesh188

म्हणून तुम्हाला नीती-मूल्यांचा धसका आहे, अन्यथा ती स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळण्या इतकी प्रगल्भता कुणाच्यात नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

म्हणजे नीती-मूल्य स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळणारे जगात जे काही प्रगल्भ नास्तिक आहेत ते फक्त २ % आहेत. असा सरळ अर्थ होतो.

संजय क्षीरसागर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
थोडक्यात, नामाच्या आधारावर तुम्ही एक काल्पनिक देव धरुन ठेवला आहे.
करेक्ट. इलेक्ट्रॉन देखील कुणीही पाहिला नाहीये. त्याचीही केवळ कल्पनाच करता येते. त्याचं थेट रूप न दिसता ती कल्पना गणिती समीकरणांच्या मार्गे मांडावी लागते. २.
नाम बंद की देव गुल !
समीकरणाचा कागद फाडला की इलेक्ट्रॉन गुल होत नाही. ३.
तुमच्या कल्पनेतला देवच तुम्हाला दिसू शकतो !
समीकरणातला इलेक्ट्रॉन इतका झगझगीतपणे दिसतो की तो गृहीत धरून त्याचे गुणधर्म शोधणाऱ्या अनेक लोकांना नोबेल पारितोषिक मिळालं. ४.
गोंदवलेकरांना राम शिकवला नसता तर त्यांना तो दिसला (?) नसता !
गोंदवलेकरांचं माहीत नाही. क्षमस्व! ५.
मोदी युगपुरुष आहेत या भक्तांच्या श्रद्धेत आणि तुमच्या वरच्या विधानात फारसा फरक नाही.
'इलेक्ट्रॉन अमुकेक स्थानी अस्तित्वात आहे' असं थेट विधान करता येत नाही. तरीपण त्याचं वस्तुमान मोजलं जातं. आणि ते मोजतांना तो स्थिर आहे असं मानलं जातं. हा तिढा कसा सोडवणार? हा पेच सुटंत नाही तोवर इलेक्ट्रॉनचं अस्तित्व ही एक भक्तांची श्रद्धाच असणारे. ६.
तुमच्यासाठी विसोबा शोधणारे ज्ञानदेव ऑलरेडी आहेत ? कुठे असतात आणि केंव्हा भेटले ते तुम्हाला ?
ते माझा देव बघून घेईल. त्याला माझ्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्याला योग्य वाटेल तेव्हा मला यथोचित माणसं भेटतील. ७.
वरच्या प्रतिसादांवरुन तुम्हाला इष्ट देवता दिसायला लागली तर तिच्यापासून सुटकेचा, तुमच्याकडे कोणताही मार्ग दिसत नाही.
माझ्या देवाला माझ्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्यामुळे हा भर मी त्याच्यावर टाकला आहे. ८.
तुम्हाला अजून सगुण दिसायला तयार नाही, ते दिसल्यावर तुमचे ज्ञानेश्वर तुमच्यासाठी विसोबा आणणार मग ते तुम्हाला निर्गुण दाखवणार, आणि कसा ते तुम्हाला माहिती नाही !
एकदम बरोबर. यालाच देवावर भरवंसा असणे म्हणतात. ९.
तुम्ही माझे सगळे मुद्दे यथोचित सिद्ध केले !
धन्यवाद! माझं थोडंतरी सहाय्य झालं. :-) १०.
स्पंदनासाठी नामाची आवश्यकता नाही.
तुमच्यासाठी नसेल. बहुसंख्य साधकांसाठी स्पंदन हेच नाम आहे. ११.
हृदय चालू आहे म्हणून धडधड ऐकू येतेयं, तुम्ही घोड्याच्या पुढे गाडी जोडतायं !
हे कळलं नाही. १२.
शांततेत स्पंदन आहे आणि स्पंदन आहे म्हणून नाद आहे.
बरोबर. १३.
तस्मात, मूळ शांतता आहे; नाद नाही
बरोबर. प्रत्येक नाद स्पंदनजन्य नसतो. उदा. : अनाहत नाद. १४.
एकूणात तुमच्याशी आतापर्यंत चर्चा छान झाली पण आता प्रतिसाद तर्कशून्य आणि भवविवश होत चालल्यानं मला चर्चेत स्वारस्य उरलेलं नाही.
तुमच्या मताचा आदर आहे. मी सुद्धा थांबायचं म्हणतो. असो. एकंदर चर्चेवरनं मला वाटतं की तुम्ही ज्याला देव (किंवा परम तत्त्व) म्हणता ते आकाशासारखं स्थितीशील आहे. याउलट मी (व बहुसंख्य लोकं) ज्याला देव म्हणतो तो चेष्टाकर म्हणजे हालचाल करणारा आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना:. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आणि तुमचा तर्कही काही वेळा काम करतो, म्हणून तुमच्यासाठी एक प्रयत्न करतो. १. > इलेक्ट्रॉन देखील कुणीही पाहिला नाहीये. त्याचीही केवळ कल्पनाच करता येते. त्याचं थेट रूप न दिसता ती कल्पना गणिती समीकरणांच्या मार्गे मांडावी लागते. सत्य सिद्ध आहे ! ती इलेक्ट्रॉनसारखी (किंवा देवासारखी) कल्पना नाही. सिद्ध याचा अर्थ जे ऑलरेडी प्रूव्ड आहे, ज्याच्या पुष्टीकरणार्थ कोणताही पुरावा सादर करण्याची गरज नाही. आता हे शांतपणे वाचा : जगात एकमेव विधान असं आहे ज्याचा प्रतिवाद होऊ शकत नाही, ते म्हणजे : मी आहे ! बाकी कोणतीही गोष्ट सिद्ध करायला लागेल,पण `मी नाही' म्हणायला सुद्धा, तुमचं असणं अनिवार्य आहे. आणि हा `मी' सार्वजनिक आहे. तो आपल्या सर्वांचा एकच आहे. त्यामुळे तो स्थानबद्ध नाही. ________________________________ मी नव्हतो किंवा मी नसेन या सुद्धा कल्पना आहेत कारण त्या देहाधारित आहेत. थोडक्यात, मी नव्हतो किंवा मी नसेन हा कुणाचाही अनुभव नाही. तस्मात, मी आहे हे विधान कालबद्ध नाही. __________________________ याचं एकच कारण आहे ते म्हणजे आपणच सत्य आहोत ! आणि ही इतकी उघड गोष्ट आहे की त्यासाठी देव, इलेक्ट्रॉन, किंवा काहीही मधे आणण्याची गरज नाही. ________________________________________ मग लफडा काये ? तर प्रत्येक जण `मी आहे' हा व्यक्तिगत आणि खाजगी मामला समजतो ! प्रत्येकाला असं ठामपणे वाटतं की तो विशिष्ठ देह आणि नांव असलेली व्यक्ती आहे. हा भ्रम युगानुयुगं, मानसिकतेत इतका खोल गेला आहे की बोलता सोय नाही. त्यात संत महंतांनी `निर्गुण प्राप्तीसाठी सगुणोपासनेचं' असं काही स्तोम माजवलंय की एकालाही आपण सत्य आहोत ही उघड गोष्ट मान्य करायची लाज वाटते ! आणि त्यापुढे जाऊन तसं म्हणणं म्हणजे अहंकाराची भाषा समजली जाते. _________________________________ वास्तविकात, अहंकार हा चुकीच्या धारणांचा एकत्रित परिणाम आहे. स्वतःला व्यक्ती समजणे आणि मग स्वतः सत्य असतांना, ते प्राप्त करण्याचा घाट घालणे हा खरा अहंकार आहे कारण `अहं-आकार' या मूलभूत धारणेतून तो निर्माण झाला आहे. __________________________________ तस्मात, देव ही मानवी कल्पना न सत्यप्राप्तीसाठी गरजेची, न तीच्यामुळे कुणाला काही संरक्षण, न कृपा, न कोप. देवच नाही म्हटल्यावर त्याचं तुम्हीच ठेवलेलं नांव, त्याच्या इतकंच निरुपयोगी आहे ही उघड गोष्ट आहे. थोडक्यात, ही भानगड आता संपवा आणि कोणतीही साधना, जप-जाप्य, परिक्रमा, कर्मकांड, पूजा-अर्चा, नवस करणं आणि फेडणं, तिर्थाटनं यात वेळ, पैसा आणि श्रम व्यर्थ घालवू नका. उन्मुक्त आणि स्वच्छंद जगा. दुसर्‍याचा गैरफायदा घेऊ नका आणि भीडेखातर किंवा मोहास्तव, स्वतःचा दुसर्‍याला फायदा घेऊ देऊ नका या फक्त एका आचरणानं समाज कायम नितीमान राहील आणि कोणत्याही पाप-पुण्याच्या भयाची (म्हणजे देवाची) गरज उरणार नाही.

देवाचं नाव माणसाने ठेवलं यावर एकमत झाल्याबद्दल सर्वांचे आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्थात, दरवर्षी आम्ही देवाचा जन्म भक्तिभावे अगदी पाळण्याला झोके देऊन साजरा करतो त्यामुळे नाव ठेवणे क्रमप्राप्त आहे. . नाव ठेवणाऱ्या माणसाचा वंशज अभ्या

In reply to by अभ्या..

चूक होते आहे अभ्या...! (ह्या धाग्यावरचे पॉप्युलर विधान..) इथे माहीत असलेल्या देवाला त्याचे माहीत असलेले नाव देतोयस तू. हा म्हणजे "तुम्हारा नाम क्या है बसंती" सारखा प्रकार आहे. पण ते असो ह्या निमित्ताने हा २९९ वा प्रतिसाद..

In reply to by कानडाऊ योगेशु

बरे. माझी चुक झाली. खरे तर देवाला देव का म्हणायचे सुरुवात आहे माझी पण हरकत नाही. धडकनमध्ये सुनील शेट्टी "देव" नाव घेऊ शकतो तर कसलीच हरकत नाहीये खरोखर. . ३०० झाले ब्वॉ. झरक्सिस खुष हुवा. आहू........

In reply to by शाम भागवत

तुम्ही घ्या मनावर. पास न देता खेळा टिच्चून मग ३०० काय ५०० पण कमी पडतील. बाकी सगळ्याबाबत आम्हाला आदरच आहे. सद्य परिस्थितीत दोन चार प्लस वण ठोका सहमतीचे. होतील ३००. .

In reply to by अभ्या..

नको. मी तेवढ्यासाठी जुना धागा वरती आणतोय. चितळेसाहेबांच्या धाग्याला फक्त ८८ प्रतिसाद?

In reply to by शाम भागवत

आता हे शांतपणे वाचा : आता शांतपणे वाचा : आता हे तर खरंच शांतपणे वाचा : आता परत वरचा ४ शांतपणे वाचा ! आता नीट वाचा : पुन्हा वाचा : वर २. वाचा

In reply to by सतिश गावडे

तस्मात, देव ही मानवी कल्पना न सत्यप्राप्तीसाठी गरजेची, न तीच्यामुळे कुणाला काही संरक्षण, न कृपा, न कोप. देवच नाही म्हटल्यावर त्याचं तुम्हीच ठेवलेलं नांव, त्याच्या इतकंच निरुपयोगी आहे ही उघड गोष्ट आहे. थोडक्यात, ही भानगड आता संपवा आणि कोणतीही साधना, जप-जाप्य, परिक्रमा, कर्मकांड, पूजा-अर्चा, नवस करणं आणि फेडणं, तिर्थाटनं यात वेळ, पैसा आणि श्रम व्यर्थ घालवू नका. उन्मुक्त आणि स्वच्छंद जगा. दुसर्‍याचा गैरफायदा घेऊ नका आणि भीडेखातर किंवा मोहास्तव, स्वतःचा दुसर्‍याला फायदा घेऊ देऊ नका या फक्त एका आचरणानं समाज कायम नितीमान राहील आणि कोणत्याही पाप-पुण्याच्या भयाची (म्हणजे देवाची) गरज उरणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

या धाग्यावर लोकांना "देव नाही" हे सांगण्याची तुम्हाला इतकी नशा चढली आहे की माझ्यासारख्या नास्तिकालाही तुम्ही "देव नाही" हे सांगत आहात. भानावर या संजयजी :)

In reply to by सतिश गावडे

>आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥ ? केंव्हा झाला हा बदल ? आणि कशामुळे ?

In reply to by संजय क्षीरसागर

>> ४ वर्षाला युगे म्हणतायं ! अहो गंमतीत म्हटलं होतं ते. तुम्ही लगेच माझा तो प्रतिसाद मी केव्हा दिला होता पाहून आलात ना. :) >> पण विचारसरणीत बदल कशामुळे झाला ? मिपावरील समाज प्रबोधन करणारे नास्तिक लोकांचे लेख वाचून मलाही नास्तिक व्हावंसं वाटू लागलं. मग मी लगेच अमेझॉनवरुन How to be an atheist in 21 days हे पुस्तक मागवलं. त्या पुस्तकाच्या फिलॉसॉफीनुसार रोज एक चाप्टर वाचू लागलो. २१ व्या दिवसाच्या रात्री रिचर्ड डॉकिन्स माझ्या स्वप्नात आला आणि नास्तिकपंथाचा गंडा माझ्या हातावर बांधला. माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशिर्वाद दिला, "आजन्म नास्तिक भव". बाविसाव्या दिवशी सकाळी मी अंतर्बाह्य नास्तिक झालो होतो. जोक्स अपार्ट, सश्रद्ध अथवा अश्रद्ध असणं ही मी वैयक्तीक बाब मानतो. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं मी उचित समजत नाही. क्षमस्व.

In reply to by सतिश गावडे

ही मी वैयक्तीक बाब मानतो ? काय सांगता ? पण इथे तर तुम्ही मोठ्या झोकात, पब्लिक फोरमवर म्हटलंय : " माझ्यासारख्या नास्तिकालाही तुम्ही "देव नाही" हे सांगत आहात. "

In reply to by संजय क्षीरसागर

ही मी वैयक्तीक बाब मानतो हे मी नास्तिक का आहे याची चर्चा मला करायची नाही अशा अर्थी होतं ते. >> पण इथे तर तुम्ही मोठ्या झोकात, पब्लिक फोरमवर म्हटलंय हो, मला माहिती नव्हतं मी तसं लिहीण्याने तुमच्या भावना दुखावतील. सॉरी हा.

In reply to by सतिश गावडे

ज्या ठामपणे तुम्ही लिहीलंय ते वाचून नवल वाटलं. सगळा लेख तर देव ही कल्पना आहे यावर आहे. तुमचं अजून नक्की ठरत नाही असं म्हणा !

In reply to by संजय क्षीरसागर

एकच गोष्ट साध्य करायला विविध मार्ग असतात हे पटलं तर. :)

In reply to by शाम भागवत

पळवाट शोधायचा तुम्हाला `नवीन मार्ग' सापडला, असा अर्थ आहे !

खुदा बुरा लगा तो होगा ऐ खुदा तुझे, दुवा में जब, जम्हाई ले रहा था मैं― दुआ के इस अमल से थक गया हूँ मैं ! मैं जब से देख सुन रहा हूँ, तब से याद हैं मुझे, खुदा जला बुझा रहा है रात दिन, खुदा के हात मैं हे सब बुरा भला― दुआ करो ! अजीब सा अमल है ये ये एक फर्जी गुफ्तगू, और एकतर्फ़ा― एक ऐसे शख्स से, ख्याल जिसकी शक्ल है ख्याल ही सबूत है ।

In reply to by शा वि कु

अजीब सा अमल है ये ये एक फर्जी गुफ्तगू, और एकतर्फ़ा― एक ऐसे शख्स से, ख्याल जिसकी शक्ल है ख्याल ही सबूत है । __________________________ अजीब आलम है दोस्तों तुम्हारा, अगर कोई खुदासे बातें करें तो जमानेने उसे सर-आखोंपे बिठा लिया, और अगर कोई खुदसे बातें करे तो उसे पागलखाना करार दिया |

In reply to by शा वि कु

किती सुरेख कविता आहे ही, तीचा मराठीत अर्थ असा ! देवा, तुझी प्रार्थना चालू असतांना मला जांभई आली; तुला नक्कीच वाईट वाटलं असणार. तुझ्या या पवित्र प्रार्थनेनं, मी आता थकलोयं. जेंव्हापासनं मी ऐकतोय आणि पहातोयं, तेंव्हापासून मला आठवतंय की देव दिवस-रात्र उजळवतो आणि मालवतो, देवाच्या हातात सगळ्यांचं भलं-बुरं आहे - प्रार्थना करा ! अजब पावित्रता आहे ही, हा एक फसवा संवाद, जो एकतर्फी आहे - आणि तोही अशा व्यक्तीशी, की कल्पनाच जिचा चेहरा आहे, आणि कल्पनाच जीचा पुरावा !

In reply to by संजय क्षीरसागर

अमल चा हिंदी अर्थ अपवित्रता आहे, पण तो इथे त्या अर्थाने वापरला नसावा. इथे उर्दू अमल अभिव्यक्त आहे. नशा, अमली पदार्थांमधला अमल.

In reply to by शा वि कु

अमलचा हिंदी अर्थ निर्मल, स्वच्छ असा आहे आणि ते उपहासात्मक आहे. उर्दू शब्द म्हणून तुम्ही म्हणता तसा `नशेचा अंमल' हा पण एक अँगल आहे.

In reply to by शा वि कु

अजीब आलम है दोस्तों तुम्हारा, अगर कोई खुदासे बातें करें तो जमानेने उसे सर-आखोंपे बिठा लिया, और अगर कोई खुदसे बातें करे तो उसे पागलखाना करार दिया |
ओळी आवडल्या.
दुआ के इस अमलसे..
इथे अमल चा अर्थ जबरदस्ती असा असावा. (अमलबजावणी वा अमलात आणणे मधला अमल)
अजीब सा अमल..
माहौल हा अर्थ असावा.. म्हणजे एकुण कवितेचा अर्थ खयाली पुलावा मधल्या पुलावाला कित्ती चविष्ट आहे असे म्हणण्याची जबरदस्ती करुन थकुन गेलोय असे म्हणायचे असावे कवीला असे वाटते.(चुभुदेघे.)

In reply to by कानडाऊ योगेशु

ते वरच्या प्रतिसादात दिलेत. अर्थात, तुम्ही काढलेला निष्कर्श : > एकुण कवितेचा अर्थ खयाली पुलावा मधल्या पुलावाला कित्ती चविष्ट आहे असे म्हणण्याची जबरदस्ती करुन थकुन गेलोय असे म्हणायचे असावे कवीला असे वाटते एकदम करेक्टे !

कोणी तरी सांगितलं देव आहे आणि जगभरातील लोक देव आहे असे मानायला लागले पूजा अर्चा करायला लागले असे घडले नाही. किती तरी वर्ष गेली असतील ह्या मध्ये. त्या पासून निरंतर बदल होत गेले आणि अजुन पण होत आहेत . पण देव (भले कल्पना असली तरी अजुन घट्ट टिकून आहे) एकादी कल्पना (सिध्द करता येत नाही म्हणून कल्पना असे म्हणुया)हजारो वर्ष टिकून राहण्याचे हे एकमेव उदाहरण असावे. पण देव ,माणसाच्या प्रगतीत आडवा पण आला नाही लोकांनी श्रद्धा पण ठेवली आणि नव नवीन शोध पण लावले. विज्ञान आणि श्रद्धा ह्यांची भेसळ न केल्या मुळे च ते शक्य झाले. आता सरळ सरळ एक काही तरी निवडा असा अतिरेकी विचार काही लोक करत आहेत. विज्ञान तरी निवडा नाही तर देव तरी निवडा हा अतिरेक आहे त्या ची विक्षिप्त प्रतिक्रिया म्हणून लोक त्याचा विरोध करतात. शोध चालू आहे निर्मात्याचा. तो प्रश्न निकाली निघणार नाही इतक्यात कारण अजुन पण खूप काही सिध्द होणे बाकी आहे. जसा काळ पुढे सरकत जाईल आताचे शोध सुद्धा खोटे ठरतील सत्य काही वेगळेच आहे अश्या नवीन गोष्टी माहिती पडतील. आणि एक दिवस देव सत्य की कल्पना हे पुराव्या सहित सिद्ध होईल . तो पर्यंत wait and watch .

In reply to by Rajesh188

म्हणून तुम्हाला नीती-मूल्यांचा धसका आहे, अन्यथा ती स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळण्या इतकी प्रगल्भता कुणाच्यात नाही. आणि तुमच्या मते तुमच्यासारखे ९८ % लोक आहेत ! म्हणजे नीती-मूल्य स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळणारे जगात जे काही प्रगल्भ नास्तिक आहेत ते फक्त २ % आहेत. असा सरळ अर्थ होतो. ________________________________ हे आधी सोडवा आणि मग पुढे जंप मारा.

धार्मिक लोक प्रगल्भ नसतात आणि नास्तिक प्रगल्भ असतात ( भले संख्येने नगण्य असले तरी). हे पण तुम्हीच ठरवत आहात. हाच तो हट्ट वादी पना तुमच्या स्वभावात आहे.

In reply to by Rajesh188

> धर्म अस्तित्वात आले नसते तर आताच सुनियोजित समाज,कुटुंब अस्तित्वात आलीच नसती. हे पण ठाम मत आहे > 28 Jun 2020 - 9:33 pm | Rajesh188 हे तुम्ही लिहिलंय !

हट्ट वादी पना सोडा लोकांना ठरवू ध्या त्यांना काय योग्य वाटते ते. साधं सिंपल आहे.

In reply to by Rajesh188

म्हणून तुम्हाला नीती-मूल्यांचा धसका आहे, अन्यथा ती स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळण्या इतकी प्रगल्भता कुणाच्यात नाही. आणि तुमच्या मते ९८ % लोक तुमच्यासारखे आहेत ! म्हणजे नीती-मूल्य स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळणारे जगात जे काही प्रगल्भ नास्तिक आहेत ते फक्त २ % आहेत. असा सरळ अर्थ होतो. ________________________________ हे आधी सोडवा आणि मग पुढे जंप मारा.

आपण समजतो तेच सर्वांनी मान्य करावे हे नास्तिक लोकांना वाटत असते. आणि हेच लोकांना खटकते. नास्तिक त्या मध्ये भारतीय नास्तिक हे कट्टर धर्म वेड्या व्यक्ती पेक्षा जास्त आग्रही असतात. हे कोडेच आहे.. तुम्ही प्रगल्भ आहात ना मग तुम्ही विचाराचा अतिरेक का करताय . आग्रह का धरत आहात. लोकांना ठरवू ध्या ना. नरेंद्र दाभोलकर सारखा विचारी व्यक्ती सुद्धा शालेय शिक्षणात देव नाही हे शिकवावे असा विचार व्यक्त करतो तेव्हा ही भारतात चाललेली नास्तिक चळवळ ही कट कारस्थान आणि प्रायोजित आहे असे लोकांना वाटते. शालेय शिक्षणात देव आहे हे शिकवत नाहीत. धर्मग्रंथ शालेय शिक्षणात समाविष्ट नाहीत. मग देव नाही हे मात्र शाळेत शिकवा असे विचार कसे व्यक्त होवू शकतात . प्रायोजक असल्या शिवाय भारतात असे विचार व्यक्त होवूच शकत नाहीत. जगातील कोणत्याच देशात देव नाही हे शालीय शिक्षणात मुलांना शिकवा ही मागणी होत नाही पण भारतात तसे विचार व्यक्त होतात. प्रतेक व्यक्ती विचार करू शकतो . व्यक्ती व्यक्ती च्या मानवी मेंदूच्या क्षमतेत विशेष फरक नसतो. हे तरी सायन्स स्वीकारा.

In reply to by Rajesh188

म्हणून तुम्हाला नीती-मूल्यांचा धसका आहे, अन्यथा ती स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळण्या इतकी प्रगल्भता कुणाच्यात नाही. आणि तुमच्या मते ९८ % लोक तुमच्यासारखे आहेत ! म्हणजे नीती-मूल्य स्वतःला योग्य वाटतात म्हणून पाळणारे जगात जे काही प्रगल्भ नास्तिक आहेत ते फक्त २ % आहेत. असा सरळ अर्थ होतो. ________________________________ हे आधी सोडवा आणि मग पुढे जंप मारा.

संजय क्षीरसागर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
थोडक्यात, ही भानगड आता संपवा आणि ....
संपवणारा मी कोण? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. २.
कोणतीही साधना, जप-जाप्य, परिक्रमा, कर्मकांड, पूजा-अर्चा, नवस करणं आणि फेडणं, तिर्थाटनं यात वेळ, पैसा आणि श्रम व्यर्थ घालवू नका.
माझा दिवसाला फक्त १५ मिनिटं नित्यपाठ असतो. बाकी काहीही करीत नाही. मात्र लोकांना याची गरज असू शकते. ३.
उन्मुक्त आणि स्वच्छंद जगा.
एकदम बरोबर. ४.
दुसर्‍याचा गैरफायदा घेऊ नका आणि भीडेखातर किंवा मोहास्तव, स्वतःचा दुसर्‍याला फायदा घेऊ देऊ नका या फक्त एका आचरणानं समाज कायम नितीमान राहील
पहिली गोष्ट म्हणजे समाजाला नीतिमान करण्याची किंवा ठेवण्याची माझी जबाबदारी नाही. दुसरं असं की नीती काय व अनीती काय हे प्रसंग पाहून ठरवावं लागतं. एक उदाहरण देतो. पांडवांवर लाक्षागृहात जाळून जायची वेळ आली होती. पण त्यांच्या जागी एक स्त्री व तिचे पाच पुत्र जळून मेले. आता, या मृत्यूंना जबाबदार कोण? पांडव की दुर्योधन? सांगायचा मुद्दा असा की ईश्वरी अस्तित्वाशिवाय ( म्हणजे देव मानल्याशिवाय) न्याय, नीती इत्यादिंना आधार प्राप्त होणार नाही. ५.
कोणत्याही पाप-पुण्याच्या भयाची (म्हणजे देवाची) गरज उरणार नाही.
खरा देव पापपुण्यादि द्वैताच्या पल्याड आहे. मात्र देवाचा धाक असेल तर माणूस क्रूरपणे वागणार नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ईश्वरी अस्तित्वाशिवाय ( म्हणजे देव मानल्याशिवाय) न्याय, नीती इत्यादिंना आधार प्राप्त होणार नाही.
हे योग्य नाही असे वाटते. स्वतःच्या व स्वतःसारख्या इतरांच्या वेल बिइंग साठी माणूस स्वतःवर आणि इतरांवर बंधनं घालून घेण्यास तयार नाही होऊ शकत, देव नसेल तर ? दैवी शक्तीने सांगितलेल्या नैतिकतेच्या नियमांमध्ये माणूस कायमच बदल करत असतो. काही नियम अगदी नव्याने वाढवत असतो. असे असताना देवाच्या अभावात नैतिकता उरणार नाही हे का म्हणावे ?

In reply to by गामा पैलवान

माणूस क्रूरपणे वागणार नाही ? काय बोल्ता ? वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणार्‍यांनी ते काम देव आणि धर्मासाठी केलंय, स्वतःचे प्राण पणाला लावण्याइतक्या इतक्या उदात्त आस्तिकतेचं हे जगासमोर आलेलं सर्वात रिसेंट आणि अत्यंत ठळक उदाहरण आहे. धर्माचा किंवा देवाचा आणि निती-मूल्यांचा शून्य संबंध आहे याचा इतका उघड पुरावा, इतिहासात नोंदवण्यासारखा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

इथे धर्म दोषी नाही ज्यांनी केले आहे ती धर्मांध लोक होती,धर्माचा चुकीचं अर्थ लावणारे कट्टर धर्मांध,. कट्टर म्हणजे मीच म्हणतो ते जगानी ऐकावे नाही तर त्यांना जगण्याचा हक्क नाही अशा विचाराची. नस्तीक्ता पण वाईट आहे असे इथे कोणीच बोलत नाही तुम्ही जो विचार करता देव,धर्मा विषयी तो सोडा असे इथे कोणी म्हणत नाही. पण कट्टर नास्तिक बनू नका(कट्टर धर्मांध लोकांसारखे कट्टर नास्तिक) अतिरेकी विचारसरणी सोडा . तुमच्या मताचा अतिरेक करू नका नाही तर नंतर तुमचे काहीच ऐकून घेतले जाणार नाही आणि मी ह्या निष्कर्ष पर्यंत पोचलो आहे संजय जी हे कट्टर नास्तिक( कट्टर धर्मांध अतिरेकी विचाराचे ह्या अर्थाने) आहेत. त्यांचे विचार कोणी ऐकले नाहीत की ते त्या वर थोपण्याचा प्रयत्न करत असतात. हा अतिरेक च झाला .

In reply to by Rajesh188

धर्माचा किंवा देवाचा आणि निती-मूल्यांचा शून्य संबंध आहे याचा इतका उघड पुरावा, इतिहासात नोंदवण्यासारखा आहे.