Skip to main content

देवाचं नांव कुणी ठेवलं ?

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 16/06/2020 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
देवाचं नांव कुणी ठेवलं ? या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो. तुमचं जीवन निर्भार होतं; सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते, पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे, एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली ! कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही. कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही. कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत, कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्‍याचं धन होणारी दानपेटी नाही. कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही. कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको, कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज. घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ; सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी. स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला, तुमच्या कष्टाचा पैसा ! आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ? _____________________________________ देवाचं नांव कुणी ठेवलं ? इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर ! प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला; आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं ! कुठल्या गुरुकडे जायला नको, 'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही, आणि चेहेर्‍यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही. वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही, जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही, की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही. एका प्रष्णात काम तमाम ! _____________________________ एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही ! इतकी वर्ष काय झक मारलीस का ? या मनाच्या उपहासाला, एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं. मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील, पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल, वाघावर बसून आकाशमार्गे येणार्‍यांच्या आणि भींत चालवणार्‍यांच्या सिद्धींपेक्षा; तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्‍या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ, तुम्हाला जवळचे वाटतील. पाण्यात दिवे पेटवणार्‍यांऐवजी, रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्‍या कामगारांप्रती, तुमचा मैत्रभाव जागेल. चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे, आपण त्यांच्यापुढे छपरी, हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल. एक सामान्य, वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय, संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी, अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला, साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही निर्भ्रांत जगायला लागाल ! अगदी आजपासून !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 92127
प्रतिक्रिया 379

प्रतिक्रिया

In reply to by Rajesh188

1) पायथागोरसने aesthetic shape म्हणून पृथ्वी spherical आहे असे जे आर्ग्युमेन्ट केले ते तर्कशुन्यच आहे. ते बरोबर ठरले हा निव्वळ योगायोग. त्याला त्रिकोणाकर आवडत असला असता तर तो पृथ्वी त्रिकोणी आहे म्हटला असता. त्याचे भाकीत बरोबर ठरले म्हणून त्याचे आर्ग्युमेन्ट बरोबर होत नाही. 2) तुमचे वर्ल्डकप बद्दलचे म्हणणे- नक्कीच. जर भारत जिंकला ही माहिती मिळवायचे सगळे सोर्स हायपोथेटिकली बंद झाले,तर्क करायचे सुद्धा सगळे दरवाजे बंद झाले, तर भारत जिंकला हे विधान करता येणार नाही! आता यावर तुम्ही म्हणाल कि तर्क करता येत नसला म्हणून भारत जिंकला हे सत्य थोडीच बदलते ? अगदी योग्य. पण तुम्ही बोलत आहेत ते खरं काय ते माहिती आहे या जागेतून. मी एक तुमच्या हायपोथेटीकल भविष्यातला माणूस आहे असं समजा. मला माहीतच नाही की कुठला देश जिंकला ते! त्यामुळे मी काय म्हणीन ?- भारत वर्ल्डकप जिंकला असण्याची शक्यता आहे, पण तसं मी ठामपणे म्हणू शकतं नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आणि न्यूझीलंड जिंकले असण्याची शक्यता तितकीच आहे, जितकी भारत जिंकण्याची आहे. आणि त्याही पुढे, तर्काचा अजिबात आधार नसलेल्या गोष्टीची शक्यता आणखीनच कमी. उदा- 1983 चा वर्ल्डकप माकडांची टीम जिंकली. म्हणजे , या अर्ग्युमेंटने देव सिद्ध करायला, तुम्ही स्टॅन्ड घेताय, कि देव तर बुवा अस्तित्वातच आहे (जस मगाशी तुम्हाला माहित होतं की भारत जिंकलाय). आणि इथही, माझा स्टॅन्ड आहे की, "देव असू शकतो, पण आत्ता तरी तसं मानायचं काही कारण नाही" (जसा मी मगाशी म्हणत होतो, कि भारत जिंकलाय हे मी खात्रीशीर सांगू शकत नाही.)

In reply to by शा वि कु

भारत वर्ल्डकप जिंकला असण्याची शक्यता आहे, पण तसं मी ठामपणे म्हणू शकतं नाही...देव असू शकतो, पण आत्ता तरी तसं मानायचं काही कारण नाही --------> याचा पुढील विचार करुन बघुया. तुमचे क्रिकेटचेच उदाहरण घेऊ. आता तुम्हाला तुमच्या ४-५ मित्रांनी सांगितले की १९८३ चा वर्ल्ड कप भारत जिंकला आहे आणि तुलापण हे माहित करून घ्यायचे असल्यास दूरदर्शन नावाच्या यंत्रावर बातमी पहा किंवा वर्तमानात बातमी पहा किंवा प्रत्यक्ष टीममधील प्लेयरला विचार. कारण त्यानी त्या त्या मार्गाने खरे जाणुन घेतले. अश्या वेळी प्रथम तुम्ही कदाचित त्यांच्यावर विश्वास ठेवाल कारण तुमच्या वेगवेगळ्या मित्रांनी जे अतिशय विश्वासू आहेत त्यांनी स्वानुभवरून वेगवेगळ्या मार्गाने एकच माहिती तुम्हाला दिली आहे. पण तुम्हाला खरेच सत्य जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही स्वतः त्यांनी सांगितलेला एखादा मार्ग अवलंबाल. आता सर्व परफेक्ट करून जर तुम्हाला समजले की १९८३ चा वर्ल्ड कप भारताने जिंकला नाही तरच तुम्ही ठामपणे म्हणू शकता की तुमच्या सर्व मित्रांनी सांगितलेले खोटे आहे. पण यापैकी काहीच न करता किंवा काहीही पुरावा, अनुभव, आणि सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न न करता नुसत्याच १९८३ चा क्रिकेट वर्ल्ड कप भारताने जिंकला नाही अश्या १०० वेळा बोंबा जर कोणी मारू लागला तर तुम्ही त्याला मुर्ख मानाल की विज्ञाननिष्ठ? त्याच्प्रमाणे एखाद्याला पुढचा प्रश्न पडू शकतो की या देशात अनेक असामान्य व्यक्ती ज्या वेगवेगळ्या कालखंडात होऊन गेल्या त्या सर्वांनी तर एकमुखाने देवाचे अस्तित्व स्वानुभवावर मान्य केले आहे वर हेही सांगितले आहे कि तुम्ही स्वतः तो अनुभव घेऊ शकता. तेंव्हा जिज्ञासेपोटी त्यान्च्यावर विश्वास ठेवून एखाद्याने त्यांनी सुचवलेला मार्ग अवलंबला तर ते योग्य की कोणताही शास्त्रीय पुरावा नसताना महानुभावांनी सांगितलेले सगळेच खोटे आणि ते मूर्ख पण मी सान्गितलेले मात्र खरे असे १००दा ओरडून सांगणे हे योग्य?

गुरुत्वाकर्षण बल कार्यरत आहे असे अनुभवाने सिद्ध झाले आहे पण गुरुत्वाकर्षण बल कशामुळे निर्माण होते ह्याचे उत्तर कोणाकडेच नाही मग ते गुरुत्वाकर्षण हे बल देव निर्माण करतो असा मी दावा केला तर तो दावा चुकीचं आहे हे सिद्ध करायला कोणाकडेच काही पुरावा नाही.

In reply to by Rajesh188

1) गुरुत्वाकर्षण देव निर्माण करतो. 2) सर्व जग ऍटलास ने पेलून धरले आहे. 3)सर्व जग हे एका मोठ्या राक्षसाच्या शेम्बडात सामावले आहे, आणि त्या राक्षसाने शेमबुड पुसला कि जग नष्ट होणार. हे सगळे दावेच आहेत, आणि कोणताही दावा खोटा म्हणून सिद्ध करता येत नाही. एखादी गोष्ट नाही हे सिद्ध करता न येणे हा ती गोष्ट असण्याचा पुरावा नव्हे !

In reply to by शा वि कु

जे नाही हे सिद्ध करता येत नसेल तर ते आहे हा दावा तसाच राहतो तो चुकीचा ठरत नाही. माणसाला जे आवाज ,वास येत नाहीत ते कुत्र्यांना येतात . म्हणजे माणसाला एकदा वास चे ज्ञान होत नाही एकदा आवाज ऐकायला येत नाही म्हणजे तो वास ,आवाज अस्तित्वात नसतो असे म्हणता येत नाही . कारण त्या दोन्ही गोष्टींचे ज्ञान प्राण्यांना होते त्याची त्यांना जाणीव होते. आपल्या डोळ्यांनी जे दिसत तेवढेच अस्तित्वात नसते हे सायन्स च सांगते . किती तरी टक्के दृश्य माणसाला दिसत नाहीत म्हणजे ती अस्तित्वात नाहीत हा विज्ञान विरोधी मत आहे. मेंदू ची जेवढी क्षमता तेवढ्याच गोष्टीची जाणीव होते.

In reply to by Rajesh188

जे नाही हे सिद्ध करता येत नसेल तर ते आहे हा दावा तसाच राहतो तो चुकीचा ठरत नाही.
अशक्यता सिद्ध होत नसल्यानेच तर शक्यता आहे असे मानले आहे. पुनःश्च- अशक्यता सिद्ध होत नसल्याने अस्तित्व नक्की होत नाही. वरील मुळ प्रतिसादातल्या तीन शक्यता वाचाव्यात. त्याही तुम्हाला मान्य आहेत का , अशक्यता सिद्ध होत नाही म्हणून ?
माणसाला जे आवाज ,वास येत नाहीत ते कुत्र्यांना येतात . म्हणजे माणसाला एकदा वास चे ज्ञान होत नाही एकदा आवाज ऐकायला येत नाही म्हणजे तो वास ,आवाज अस्तित्वात नसतो असे म्हणता येत नाही . कारण त्या दोन्ही गोष्टींचे ज्ञान प्राण्यांना होते त्याची त्यांना जाणीव होते.
कुत्र्याला जास्तीचे वास येतात हे समजण्यासाठी पुरावे आहेत. त्या पुराव्यांवरच तर तुम्ही हे विधान केले आहे.
किती तरी टक्के दृश्य माणसाला दिसत नाहीत म्हणजे ती अस्तित्वात नाहीत हा विज्ञान विरोधी मत आहे. मेंदू ची जेवढी क्षमता तेवढ्याच गोष्टीची जाणीव होते.
देव डोळ्यांना दिसत नाही म्हणून तो अस्तित्वात नाही हे भयंकर बालिश आर्ग्युमेन्ट आहे आणि इथे कोणीही केलेले नाही. दिसत तर हवाही नाही, जस गा.पै. म्हणत होते. हवा जर वेगवेगळ्या घटकांचे वायुरूप अशी डिफाईन केली तर त्यातले विविध घटक (ऑक्सिजन, नायट्रोजन, co2) हे अस्तित्वात आहेत हे सिद्ध करता येतं. तशा प्रकारे देव सिद्ध करता येत नाही.
आपल्या डोळ्यांनी जे दिसत तेवढेच अस्तित्वात नसते हे सायन्स च सांगते .
सायन्स त्याहीपुढे जाऊन केवळ दिसतच नाही, तर कोणत्याही पाच इंद्रियांमधून पकडता न येणाऱ्या, पण 1) शास्त्रीय उपकरणांमध्ये निरखता येणाऱ्या 2) निरखता ही न येणाऱ्या पण तर्काने सिद्ध करता येणाऱ्या गोष्टी सुद्धा मान्य करते. मला माझ्या सेन्सेसनीच देवाला पहायचे आहे/वास घ्यायचा आहे/ स्पर्श करायचा आहे/ चव घ्यायची आहे(!)(!) / ऐकायचे आहे असा दुराग्रह नाहीच.
मेंदू ची जेवढी क्षमता तेवढ्याच गोष्टीची जाणीव होते.
मेंदूनेच कल्पना समजावून घेऊन मेंदूच्याच क्षमतेच्या बाहेर ? एनी वेज, ही माझी मर्यादा आहे. मला तर बुवा मेंदू पल्याडच्या गोष्टीच्या असण्यावर व नसण्यावर दावा करता येत नाही.

In reply to by शा वि कु

2) सर्व जग ऍटलास ने पेलून धरले आहे. 3)सर्व जग हे एका मोठ्या राक्षसाच्या शेम्बडात सामावले आहे, आणि त्या राक्षसाने शेमबुड पुसला कि जग नष्ट होणार. तुमच्या प्रतिसाद मधील दोनच घेवूया कारण पाहिले वाक्य मी उपहासाने लिहलेले होते. ह्या दोन्ही वाक्यांचा शब्द शाह अर्थ घेतला तर तो मला मान्य नाही . पण त्या वाक्यात जो भावार्थ लपलेला आहे तो चुकीचा नाही असे मात्र माझे स्पष्ट मत आहे. सर्व जग एटलास नी पेलून धरलेले आहे. ही समजूत किती तरी वर्षा पूर्वीची आहे तेव्हा कोणतीच साधने अस्तित्वात नव्हती. लोकांना अक्षेत ग्रह तारे तरंगताना दिसायचे त्या नुसार आपली पृथ्वी सुद्धा मोकळ्या पोकळीत तरंगत आहे ह्याची जाणीव त्यांना होती पण असे का घडत असेल ह्याची माहिती नव्हती. गुरुत्वाकर्षण आणि बाकी बलांची त्या वेळी माहीत नव्हती. कोणतीच वस्तू अधांतरी राहू शकत नाही ह्याची मात्र जाणीव होती म्हणून त्या वेळच्या माहिती च्या उपलब्ध नुसार पृथ्वी Atlas ni पेलून धरली आहे असे समजण्यात आले. आपण ज्याला ब्लॅक होल म्हणतो ते ह्या साठी की ते दिसत नाहीत त्या मधून प्रकाश किरणे सुद्धा बाहेर पडत नाहीत त्या मुळे . पण पुढे अजुन प्रगती झाली तर नवीन प्रकाश किरणांचा शोध लागेल आणि आपण ती उपकरणाने बघू शकू . तेव्हा ब्लॅक होल हे ब्लॅक नसून तीव्र प्रकाश फेकणारे आहे आणि प्रकाशमान आहे असे माहीत पडेल. तेव्हा ब्लॅक होल विषयी चर्चा करताना ब्लॅक होल हे नाव चुकीचं होत असे म्हणता येईल का?

In reply to by Rajesh188

ही समजूत किती तरी वर्षा पूर्वीची आहे तेव्हा कोणतीच साधने अस्तित्वात नव्हती. लोकांना अक्षेत ग्रह तारे तरंगताना दिसायचे त्या नुसार आपली पृथ्वी सुद्धा मोकळ्या पोकळीत तरंगत आहे ह्याची जाणीव त्यांना होती पण असे का घडत असेल ह्याची माहिती नव्हती.
माझा अगदी हाच मुद्दा आहे.
तेव्हा ब्लॅक होल हे ब्लॅक नसून तीव्र प्रकाश फेकणारे आहे आणि प्रकाशमान आहे असे माहीत पडेल. तेव्हा ब्लॅक होल विषयी चर्चा करताना ब्लॅक होल हे नाव चुकीचं होत असे म्हणता येईल का?
आत्ता अस्तित्वात असलेल्या माहितीवर आत्ता मूल्यमापन होईल. भविष्यात नवी माहिती मिळाली तर नक्कीच, नाव बदला. बाकी जर ऍटलास आणि ब्लॅक हॉल हे तर्काच्या एकाच पातळीवर आहेत असे तुमचे म्हणणे आहे काय ?

In reply to by Rajesh188

ही समजूत किती तरी वर्षा पूर्वीची आहे तेव्हा कोणतीच साधने अस्तित्वात नव्हती. लोकांना अक्षेत ग्रह तारे तरंगताना दिसायचे त्या नुसार आपली पृथ्वी सुद्धा मोकळ्या पोकळीत तरंगत आहे ह्याची जाणीव त्यांना होती पण असे का घडत असेल ह्याची माहिती नव्हती.
माझा अगदी हाच मुद्दा आहे.
तेव्हा ब्लॅक होल हे ब्लॅक नसून तीव्र प्रकाश फेकणारे आहे आणि प्रकाशमान आहे असे माहीत पडेल. तेव्हा ब्लॅक होल विषयी चर्चा करताना ब्लॅक होल हे नाव चुकीचं होत असे म्हणता येईल का?
आत्ता अस्तित्वात असलेल्या माहितीवर आत्ता मूल्यमापन होईल. भविष्यात नवी माहिती मिळाली तर नक्कीच, नाव बदला. बाकी जर ऍटलास आणि ब्लॅक हॉल हे तर्काच्या एकाच पातळीवर आहेत असे तुमचे म्हणणे आहे काय ?

बरेच दिवसांनी कुणीतरी संयतपणे, अतिशय सोप्या शब्दांत वैज्ञानिक दृष्टीकोन समजावून सांगितला. तुमची समोरच्याचा प्रश्न हाताळण्याची पद्धत तर वाखाणण्याजोगी आहे. तुमचे स्वतंत्र लेखही वाचायला आवडतील.

In reply to by सतिश गावडे

भावला ! विशेषतः > जे नाही हे सिद्ध करता येत नाही म्हणून ते आहे, असं म्हणता येत नाही. हा दावा मला नवा होता. वास्तविक त्याचा काऊंटर असा आहे > जे आहे असा दावा करणाऱ्याची ते आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. शविकु > थँक्स !

In reply to by संजय क्षीरसागर

जे नाही हे सिद्ध करता येत नाही >>>>>> इथे लॉजिक चुकतंय. जे "नाही" हे "सिद्ध "करता येत नाही म्हणजे काय? जर सिद्ध झालेलंच नाही तर ते नाही हे कशावरून म्हणताय? आणि ते नाही हे जर सिद्ध झालेलं आहे तर 'जे नाही हे सिद्ध करता येत नाही' या वाक्याला काही अर्थच उरत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

एखादी गोष्ट खरी आहे की नाही हे वैज्ञानिक पातळीवर हायपोथेसिस पद्धतीने टेस्ट करतात. गृहीत धरलेले हायपोथेसिस जर कसोटीला उतरले नाही तर ते सिद्ध झाले नाही. हीच गोष्ट देवाच्या बाबतीत वैज्ञानिकांनी करून पाहावी आणि सिद्ध करावे की काम झाले. म्हणजे वैज्ञानिक पातळीवर देव आहे हे हायपोथेसिस धरून त्यावर प्रयोग करून रिसर्च अप्रूव्ह करून सांगावे की हे हायपोथेसिस चुकीचे आहे. मग प्रश्नच संपतो. ते नसेल झाले तर देव नाही असे म्हणणाऱ्यांनी विज्ञानाचा हवाला देऊ नये.

In reply to by कोहंसोहं१०

अर्थात, त्यामुळेच तर देव ही कल्पना आहे ही साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही. पण एनी वे, निदान धाग्याच्या विषयाला धरुन तुमचा हा पहिला प्रतिसाद आहे आणि हे लॉजिकचं पहिलं लक्षण आहे. ________________________ तुम्हाला ऑलरेडी उत्तर दिलंय, पण आता (तरी) शांतपणे वाचा : देव आहे हा दावा करणार्‍या भक्तांची, ते सिद्ध करण्याची जवाबदारी आहे (Logic : A Claimant Has to Prove His Statement) देव नाही हे कुणी सिद्ध करत नाही म्हणून देव आहे : या तर्काला अर्थ नाही (Logic : Not Proving a Negation Cannot Establish Its Assertion)

In reply to by संजय क्षीरसागर

देव आहे हा दावा करणार्‍या भक्तांची, ते सिद्ध करण्याची जवाबदारी आहे (Logic : A Claimant Has to Prove His Statement)
मग तुम्ही केलेल्या "मेमरी स्ट्रिंग्ज" च्या दाव्याचे पुरावे का देत नाही? तेव्हा का शेपूट घालून पळ काढता?

In reply to by कोहंसोहं१०

मी तुमच्यासमोर एक हायपोथॅटिकल चित्र ठेवतो. वैज्ञानिकांनी दोन हायपोथॅसिस घेऊन चाचण्या कराव्यात- 1) देवाचे अस्तित्व आहे 2) देवाचे अस्तित्व नाही. या दोन प्रयोगांतून येणारे निकष 1) देव नक्की आहे 2)देव नक्कीच नाही 3)देव आहे का नाही याबाबत कोणतीही ठोस विधाने देता येत नाहीत. निकष 1 आणि 2 मध्ये मी किंवा तुम्ही बिनशर्त शरणागती घेणार. निकष 3 मध्ये परत बॅक टू स्क्वेअर वन. हा झाला टप्पा एक. आता माझा पुढचा क्लेम/मत आहे- की आत्ता या क्षणी यातील दोन्ही हायपोथॅसिस सिद्ध करता येत नाहीत. माझ्या क्षमतेपुरता मी विचार केल्यावर मला असा कुठलाही प्रयोग सुचत नाही, कि ज्याने हाय.1 अथवा हाय.2 वर ठोस निकष मिळतील. तुम्हाला सुचत असतील/इतर कोणाचे यावर लिखाण असेल आणि त्यामध्ये आत्ता शक्य असलेला प्रयोग/टेस्ट सुचवली असेल, तर मी माझ्या आत्ताच्या मतामध्ये एक डिस्क्लेमर देईन- कि या या प्रयोगाच्या निकालामुळे हे मत बदलण्याची शक्यता आहे. मी काही वैज्ञानिकांच्या तोंडातून देवाचे असणे व नसणे आता सिद्ध करता येत नाही हे ऐकले आहे. त्यामुळे, आत्ता माझ्या मते आपण निकष 3, म्हणजेच देवाचे असणे आणि असण्याची अशक्यता आत्ता सिद्ध करता येत नाही, यावर अडकलो आहोत, for time being. तुमचे म्हणणे आहे की सिद्ध करता येत नसेल तर काही विधाने करू नयेत. म्हणजेच agnostic असावे (? मी असाच अर्थ घेतला तुमच्या प्रतिसादाचा, नसेल तर दुरुस्त करा.) Agnostic का- तुमच्या तर्काप्रमाणे अस्तित्व सिद्ध/ अशक्यता सिद्ध केल्याशिवाय निष्कर्ष काढू नयेत, मग यामध्ये दोन्ही आले, आहे असे मानणे आणि नाही असे मानणे. पण अश्या कितीतरी अशक्यप्राय गोष्टी आहेत ज्यांचे अस्तित्व अशक्य आहे हे आपण सिद्ध करू शकत नाही. तिथेही आपण agnostic असावे काय ? देवाचे न असणे सिद्ध करता येत नाही हा देवाच्या असण्याचा conclusive पुरावा होऊ शकत नाही.देवाची व्याख्या जर एक सर्वशक्तीशाली पुरुष/जीव/वस्तू/शक्ती असा असेल, आणि एक सेकंदभर जर मी मान्य केलं, कि अशी शक्ती आहे, तरीसुद्धा ती इतकी मोठी आणि इतकी disconnected असेल की फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पज, देवाचे असणे मानण्यातून येणाऱ्या बऱ्याचश्या गोष्टी फोल असाव्यात हाच कयास मी काढू शकतो. जर देव नावाची ही शक्ती अस्तित्वात असली तरी ती आपल्या सम्पर्कात आहे आणि आपल्या इच्छा आकांक्षांना आणि प्रार्थनांना उत्तर देते, हा आणखी मोठ्ठा दावा आहे. तर या दोन दाव्यांपैकी (देव आहे आणि तो आपल्या संपर्कात आहे) यातील एकही दावा खरा नसेल तरी देव मानण्यासोबत येणाऱ्या गोष्टी, फोल आहेत. (फोल म्हणजे कोणतंही दैवी वरदान मिळणार नाही,आणि या शक्तीची उपासना करून पण काही फळ मिळणार नाही या सेन्स मध्ये. आनंद/मनशांती मिळते.) हा विज्ञानापेक्षा तर्काचा हवाला आहे. महानुभावांबद्दल- मला चक्रधर स्वामींबद्दल काहीही माहित नाही. सश्याचा आणि हत्तीचा दृष्टांत तेवढा शाळेत वाचला होता. त्यामुळे तुम्ही जे प्रयोग सांगताय त्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण एक प्रश्न मी विचारीन- चक्रधर स्वामी आणि त्यांची शिकवण तर्कातीत आहे काय ? नसेल तर त्यांनी सुचवलेल्या मार्गाचे आणि मिळालेल्या उत्तरांचे विश्लेषण मला ऐकायला आवडेल. आणखी एक- शेकडो वर्षांपासून लोकांनी सांगितलेल्या गोष्टी चूक असतात काय ? कोणत्या लोकांनी ? काही लोकांनी वेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, आणि काहींनी वेगळ्या सांगितल्या आहेत. आता कोणीही कबूल करणार नाही की सगळं जग ऍटलास च्या खांद्यावर टिकून आहे. तर केवळ बहुतांश संस्कृती देव, स्वर्ग आणि नर्क आहे म्हणतात या एकमेव कारणासाठी ह्या गोष्टी कबूल कराव्यात का ?

संजय क्षीरसागर, तुमची काही विधानं रोचक वाटली. भाष्य करेन म्हणतो. १.
.... आणि अंतीमतः निर्विवाद वस्तुस्थिती समोर येते.
सूक्ष्म पातळीवर म्हणजे क्वांटम लेव्हलवर निर्विवाद वस्तुस्थिती नावाचं काहीही अस्तित्वात नाही. ज्ञात्याच्या उपस्थितीमुळे वस्तुस्थिती बदलते. कारण की ज्ञात्याचं मन परिणाम घडवतं. २.
मन आहे म्हणून काली आहे. मनापलिकडे ती कुठेही नाही.
मन हा वस्तुस्थितीचा घटक नाही असं इथे गृहीत धरलेलं दिसतंय. क्वांटम लेव्हलवर मन हेच मुळी वस्तुस्थिती निर्माण करतं. त्यामुळे मनातली काली ही तुम्हाला पाहिजे तितकी आणि तितक्यापुरतीच सत्य आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर तुम्हाला काली निरर्थक वाटते, पण मला ती सत्य वाटू शकते, आणि आपण दोघंही आपापल्या परीने बरोबर आहेत. ३.
चमत्काराचं दुसरं नांव देव आहे !
सिद्धी व चमत्कारांच्या मागे लागू नका म्हणून अनेक संतांनी सांगितलंय. तुमची देवाची कल्पना माझ्या कल्पनेशी जुळंत नाही. ४.
बाप नांवाची व्यक्ती आहे म्हणून त्या शब्दाला अर्थ आहे (तो बाप आहे की नाही ही गोष्ट वेगळी),
तो माझा बाप आहे की नाही, एव्हढाच माझा प्रश्न आहे. बाकी, ती व्यक्ती जिवंत असो वा नसो. ५.
अबसोल्यूटली पर्फेक्ट !
मग तुमच्या मते जी गोष्ट अस्तित्वात नाही, तिचं नाव कशाला शोधताय? काहीखास कारण? जाणून घ्यायचं कुतूहल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१> क्वांटम लेव्हलवर मन हेच मुळी वस्तुस्थिती निर्माण करतं मन वस्तुस्थिती निर्माण करु शकत नाही. ते फक्त विचार निर्माण करु शकतं आणि त्यान्वये वस्तुस्थितीबद्दल, ज्ञाताला भ्रम निर्माण करु शकतं. उदा. इतर कुणालाही न दिसणारी काली फक्त परमहंसांना दिसते आणि ते तिच्याशी बोलतात ! २ > सूक्ष्म पातळीवर म्हणजे क्वांटम लेव्हलवर निर्विवाद वस्तुस्थिती नावाचं काहीही अस्तित्वात नाही. ज्ञात्याच्या उपस्थितीमुळे वस्तुस्थिती बदलते. कारण की ज्ञात्याचं मन परिणाम घडवतं. निर्विवाद वस्तुस्थिती म्हणजे मनाच्या प्रोजेक्शननी डिस्टॉर्ट न झालेली, वास्तविक स्थिती. हा मुद्दा २. ला घेतला कारण वर १. मधे याचं उत्तर आहे. ३. > सिद्धी व चमत्कारांच्या मागे लागू नका म्हणून अनेक संतांनी सांगितलंय. तुमची देवाची कल्पना माझ्या कल्पनेशी जुळंत नाही संतांनी चमत्कार केलेत अशा स्टोर्‍या भक्तांनी लावल्यामुळे तर ते संत असामान्य झालेत ! चांगदेव वाघावर बसून आकाशमार्गे ज्ञानेश्वरांना भेटायला आले मग ज्ञानेश्वर डायरेक्ट भींतच आकाशात उडवून त्यांना भेटायल गेले हे तुम्ही वाचलेलं नाही का ? तुमची देवाची जी काय कल्पना असेल ती तुमच्याच विधानाप्रमाणे `कल्पना' नाही का ? ४. > तो माझा बाप आहे की नाही, एव्हढाच माझा प्रश्न आहे. बाकी, ती व्यक्ती जिवंत असो वा नसो अहो, बाप नांवाची व्यक्ती अस्तित्त्वात आहे म्हणून त्या शब्दाला अर्थ आहे. देव नांवाची कोणतीही गोष्ट अस्तित्त्वात नाही आणि देव या कल्पनेचं नांव भक्तांनी ठेवलंय हाच तर संपूर्ण लेखाचा विषय आहे ! ५. > मग तुमच्या मते जी गोष्ट अस्तित्वात नाही, तिचं नाव कशाला शोधताय? काहीखास कारण? जाणून घ्यायचं कुतूहल आहे. कारण त्याच्यावरनंच तर सगळ्या समाजात, राजकारणात आणि जगात धमासान चालू आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

इतर कुणालाही न दिसणारी काली फक्त परमहंसांना दिसते आणि ते तिच्याशी बोलतात ! >>>>>>> विषाणू जसे उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत त्यांना पाहण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. पण जर फक्त दिसत नाही म्हणून बाहेरून पाहणाऱ्या माणसाने मायक्रोस्कोपखाली पाहणाऱ्या वैज्ञानिकाला विषाणू दिसणे हा त्याचा भ्रम आहे असे म्हणणे म्हणजे स्वतः भ्रमात असणे. विषाणू दिसण्यासाठी लागणारी कसोटी पाळून जर विषाणू दिसले नाहीत तर तो भ्रम म्हणणे बरोबर. परंतु त्या कसोटीवर खरा न उतरता नुसतेच इतरांना भ्रमात आहे हे म्हणणारा खरा भ्रमात असतो. कोल्ह्याला द्राक्षे आंबटच. संतांनी चमत्कार केलेत अशा स्टोर्‍या भक्तांनी लावल्यामुळे तर ते संत असामान्य झालेत ! >>>>>>>>> पूर्ण चूक. प्रचंड मोठी गैरसमजूत. संतांचे असामान्यत्व त्यांच्या समाजकल्याणाच्या कर्तृत्वात आणि अध्यात्मिक संदेशात आणि केलेल्या जागृतीत आहे. आहे. चमत्कार कथा नमूद करण्याचा उद्द्येश कोणत्या शक्तीच्या आधारे पाण्याची पातळी कमी होत गेली ह्या तुम्च्या प्रश्नावर ज्या शक्तीच्या आधारे बाकीचे चमत्कार करण्यात आले हे सांगण्याचा होता. चमत्कारामागचे विज्ञान जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला वाचनासाठी रेफरन्स सुद्धा दिलेला होता पण खात्री आहे तुम्ही तो पाहिला नसणार म्हणूनच असली भंपक विधाने येथे करत आहेत. चमत्कार केले म्हणून ते असामान्य असे कुठेही म्हणलेले नाही. सरळपणे लिहिलेला अर्थ तुम्हाला समजतच नाही. गैरसमजूत करून घेऊन वेगळा अर्थ काढण्यात मात्र पटाईत आहात. चमत्कारामागचे विज्ञान ठाऊक नसले की ते चमत्कार वाटतात कारण एकतर भौतिक विज्ञान तिथंपर्यंत पोहोचलेले नसते किंवा सूक्ष्म पातळीवर चालणारे नियम त्यांच्या बुद्धीला गवसलेले नसतात. आईस्टाईन म्हणतो तसं एकतर सगळंच चमत्कार आहे किंवा काहीच चमत्कारिक नाही (म्हणजे त्या चमत्काराच्या मागे विज्ञान आहे).

In reply to by कोहंसोहं१०

१. > विषाणू जसे उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत त्यांना पाहण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. विषाणु मायक्रोस्कोपमधून पाहणार्‍या प्रत्येकाला दिसतील पण काली दिसायला मन त्या भ्रमिष्ठ स्थितीत पोहोचायला हवं कारण ती फक्त ज्याला भ्रम झालायं त्यालाच दिसते, इतर कुणालाही नाही. २. > चमत्कारामागचे विज्ञान ठाऊक नसले की ते चमत्कार वाटतात कारण एकतर भौतिक विज्ञान तिथंपर्यंत पोहोचलेले नसते किंवा सूक्ष्म पातळीवर चालणारे नियम त्यांच्या बुद्धीला गवसलेले नसतात. काय सांगता ? मेलेल्याला जीवंत करण्याच्या चमत्कारामागंच भौतिक विज्ञान उलगडायला भक्तांना अजून किती वर्ष काम करायला लागेल ? पुन्हा वाचा : माणूस जीवंत केला हा दावा करणार्‍या भक्तांची, ते सिद्ध करण्याची जवाबदारी आहे (Logic : A Claimant Has to Prove His Statement) ३. > आईस्टाईन म्हणतो तसं एकतर सगळंच चमत्कार आहे किंवा काहीच चमत्कारिक नाही (म्हणजे त्या चमत्काराच्या मागे विज्ञान आहे) अर्थात ! पण आईन्स्टाईन ते रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या संशोधनानं मानवतेला उपकृत करतो. भक्त कशालाही चमत्कार समजतो (आणि चमत्काराच्या मागे विज्ञान आहे असं म्हणून स्वतःला आईन्स्टाईनच्या लेवलला नेतो !) भक्ताला संशोधनाशी काहीही देणं-घेणं नसतं तो फक्त भक्तीभावनं, चमत्कार झाला असलाच पाहिजे असं समजून भजन करतो.

In reply to by संजय क्षीरसागर

कारण ती फक्त ज्याला भ्रम झालायं त्यालाच दिसते, इतर कुणालाही नाही >>>>> पुन्हा तेच. केवळ तुम्ही म्हणताय म्हणून तो भ्रम का? तुम्ही केलाय का प्रयत्न परमहंसाप्रमाणे? बरं तो केला नसेल तर ते भ्रमिष्ट होते हे कोणत्या डॉक्टरने सांगितलेलं आहे का? याआधीही मी लिहिले आहे आणि पुन्हा लिहितो - आयडी ब्लॉक झाला नसता तर सत्तांतर होण्याची शक्यता होती असली विधानं करून भ्रमिष्ट तुम्हीच आहात असे स्पष्ट होते. (Logic : A Claimant Has to Prove His Statement)>>>>>>> इथेही पुन्हा तेच. दुसऱ्यांना सांगण्याआधी स्वतः त्याचे पालन केलेत तर बरे होईल. "मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?" ह्याचे उत्तर अजूनही मिळाले नाही. आणि याच न्यायाने देव नाही हे तुमचे स्टेटमेंट प्रूव्ह करायची जबाबदारी पण तुमच्यावरच येते. तुमच्या विज्ञाननिष्ठतेचा बुरखा फाडणारी आणि तुम्हाला तोंडावर पडायला लावणारी अशी अनेक विधाने अनेक वेळेला अनेकांनी दाखवली आहेत. एकच गोष्ट १०० वेळेला लिहून काही फायदा नाही. तुमच्याकडे केवळ तुमच्या पोकळ विधानाशिवाय काहीही नाही, ना हि तुम्ही तर्कशुद्ध आहात आणि विज्ञाननिष्ठ तर मुळीच नाही त्यामुळे यापुढे तुमच्याशी चर्चा करण्यात काहीच अर्थ आणि स्वारस्य नाही.

अवांतर : शा वि कु, तुमचं हे विधान पार चुकीचं आहे :
उत्क्रांती हे गृहीतक अजिबात नाही आहे. उत्क्रांती well established scientific fact आहे.
उत्क्रांती हे सुस्थापित वैज्ञानिक तथ्य आजिबात नाही. कारण की उत्क्रांती म्हणजे नेमकं काय हा प्रश्न उपस्थित होतो. पूर्वी हा प्रश्न मी इथे विचारला होता : https://www.misalpav.com/comment/955679#comment-955679 उत्क्रांती म्हणजे नेमकं काय हे आधी ठरवायला हवं. ती झाली की नाही ते नंतर ठरवूया. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

उत्क्रांती म्हणजे नेमकं काय हे आधी ठरवायला हवं.
नक्कीच. Life on earth gradually beginning with one primitive species- perhaps a self replicating molecule, that lived more than 3.5 billion years ago, it them branched out over time, throwing of many new and diverse species, and the mechanism for most (but not all) changes is natural selection. आत्ता तरी वरील विधानातील 5 शास्त्रीय क्लेम हे वर्षानुवर्षे जमवलेल्या पुराव्याच्या आधारावर शाबूत आहेत. 1)उत्क्रांती- जेनेटिक बदल 2)gradual- टाईमलाईन 3)स्पेसिअशन- एका स्पेशीच्या शाखा अनेक स्पेशींमध्ये फुटणे 4)common ancestry- एका सिंगल एकपेशीय जिवातून सम्पूर्ण जीवन 5)natural selection- जगण्यासाठी उपयोगी क्षमता असणाऱ्या जीन्सचे नमुने ह्या क्षमता नसणाऱ्या नमुन्यांपेक्षा जास्त संख्येने पुढच्या पिढीत असतील.

In reply to by शा वि कु

डार्विन चा सिद्धांत हा उत्क्रांती विषयी आहे उत्पत्ती विषयी नाही. त्या मुळे उत्पत्ती ची संबंध उत्क्रांती शी जोडू नये दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. उत्पत्ती ही निर्जीव मधून सजीव निर्मिती ह्या तत्व वर आहे आणि अजुन तरी ह्या विषयात ठोस असे काहीच निष्पन्न झालेले नाही. नैसर्गिक निवडी मुळे सजीव बदल होवून नवीन प्रजाती तयार होते हे बरोबर आहे की अपघाताने गुणसूत्र मध्ये बदल झाल्यामुळे नवीन प्रजाती जन्म घेते ह्या मध्ये योग्य काय आहे. डार्विन नी जेव्हा सिद्धांत मांडला तेव्हा गुणसूत्र विषयी माणसाला काहीच माहिती नव्हती. अचानक मोठा बदल झाला तर कोणताच सजीव स्वतः ला त्या बदलाशी अनुरूप बनवू शकत नाही हळू हळू किती तरी वर्ष नियमित एका दिशेने बदल झाला तरच नैसर्गिक निवड हा सिद्धांत योग्य आहे असे म्हणता येईल हा काळ कोट्या वधी वर्षाचा असू शकतो. डार्विन नी dionosar सारख्या मोठ्या प्राण्यांकडे का दुर्लक्ष केले ह्याचे कारण काय असावे हे जाणून घेण्याची उस्तुकता आहे.

In reply to by गामा पैलवान

एकपेशीय जिवातून सजीव निर्मिती झाली हा दावा का ? प्रत्येक सजीव स्पेशी काही मूळ गोष्टींमध्ये एकसारख्याच आहेत. DNA बांधणी, ऊर्जा निर्मितीसाठी लागणारे biochemichal pathways- या गोष्टी एकसारख्या असल्यामुळे काढला गेलेला हा निष्कर्ष आहे.

देवाचा नाव कोणी ठेवला यापेक्षा कोणाचं नाव कोणी का ठेवतं हा प्रश्न विचारला कि उत्तर मिळून जाईल. आता तुमचा संजय हे नाव (हे नाव खरा असेल असा गृहीत धरून....नसल्यास त्याऐवजी तुमच्या खरे नाव इथे गृहीत धरा) का ठेवलं हा प्रश्न विचाराल तर उत्तर मिळेल की तुमचे अस्तित्व आहे म्हणून. कोणी ठेवलं हा प्रश्न तुमचा दुय्यम आहे. तुमचा अस्तित्व आहे म्हणून तुम्हाला ओळखण्यासाठी ते ठेवणं महत्वाचं मग ते तुमच्या परिवारातील कोणीही ठेवलेलं असो. हेच लॉजिक आता देवाला लावून पहा. कळेल. आता तुम्ही म्हणाल की मी तर देव पाहिला नाही. मी म्हणेन तुम्ही माझ्या शेजारी राहण्याऱ्या जॉन ला सुद्धा पाहिला नाहीये म्हणून तो अस्तित्वातच नाही असे म्हणणे चुकीचे...तुमच्या सापेक्ष दृष्टीने तो नसेल पण माझ्या दृष्टीने तो आहेच. सिम्पल लॉजिक आहे.

In reply to by शा वि कु

अगदी बरोबर. पण त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील मग ते वैयक्तिक पातळीवर असोत किंवा एकत्रित. नुसते अस्तित्व नाहीच ओरडत बसून काय उपयोग? आता एखादा मनुष्य अश्या वेळी काय काय करू शकेल याच्या काही शक्यता: १. जॉन नावाचा कोणी व्यक्ती कोहंसोहं१० याच्या बाजूला राहतच नाही, जॉनचे अस्तित्वच नाही, जे म्हणतात जॉनचे अस्तित्व म्हणजे भ्रम आहे अश्या नुसत्या बोंबा मारत बसेल. स्वतः प्रयत्न तर करणारच नाही वरती डोळ्यावर पट्टी आणि कानावर हात ठेवून इतरांनी काहीही सांगितले आणि दाखवले तरीही ते सगळे झूट आणि मी म्हणतोय तेच बरोबर (जरी त्याचे स्पष्टीकरण देता नाही आले तरी) आणि सर्वांनी ते मानलेच पाहिजे ह्या अविर्भावात राहील. २. जॉन नावाचा व्यक्ती असेलही किंवा नसेलही त्याच्या नसल्याने सध्या माझे काही बिघडत नाही त्यामुळे असला तर असू दे आणि नसला तर नसू दे...कोणाला काय वाटतंय याच्याशी माझा काहीही संबंध नाही मी बरा आणि माझे आयुष्य बरे असे म्हणून सोडून देईल. ३. मला जॉन आहे कि नाही हे माहित नाही परंतु जाणण्याची जिज्ञासा आहे त्यामुळे एकतर सध्याच्या शास्त्रीय मार्गाने किंवा अस्तित्वात असल्येल्या इतर काही प्रचलित मार्गाने शोधण्याचा प्रयत्न करू आणि ठरवू. जोपर्यंत जॉन भेटत नाही तोपर्यंत मत बनावट येणार नाही. ४. जॉन आहे यावर विश्वास ठेऊ. कारण इथे गेल्या काही वर्षात काही असामान्य व्यक्ती होऊन गेल्या ज्या जॉनबद्दल आणि त्याच्या अस्तित्वाबद्दल खूप काही सांगून गेल्या अश्या लोकांनी संपूर्ण जीवन जॉनच्या अस्तित्वात व्यतीत केले आणि ह्या व्यक्ती असामान्य बुद्धिमत्तेच्या, कर्तृत्वाच्या होत्या आणि त्यांनी संपूर्ण जीवन समाजाचे केवळ भले इच्छिण्यात आणि करण्यात घालवले आणि जॉनबद्दल खूप भरभरून बोलल्या त्यामुळे जॉन खरंच स्वतःदेखील असामान्य असला पाहिजे. काहीवेळेला संकटसमयी आठवण केल्यावर जॉनची अनपेक्षित मदत लाभली त्यामुळे तो आहे हा विश्वास दृढ झाला. परंतु सध्या काही त्याला भेटायचा प्रयत्न करणे शक्य नाही त्यामुळे तूर्तास तरी वेगळ्या मार्गाने जसे की ई-मेल, पत्र पाठवून त्याच्याशी शक्य तेंव्हा संपर्कात राहण्याचा प्रयत्न करू. ५. वर ४ मध्ये सांगितलेले पण आता त्यापलीकडेही जाऊन आपणही त्याला भेटलेच पाहिजे आणि प्रयत्न करून पाहिला पाहिजे. प्रवास दूरच आहे पण प्रयत्नाने पोहोचू असे म्हणून अगदी कंबर कसून जॉनचे अस्तित्व प्रत्यक्ष जाणायचा त्याला भेटण्याचा निश्चय करून प्रवासाला निघू. आता इतरही मार्ग असतील पण मी थोडक्यात ५ शक्यता वर्तवल्या. थोड्याफार फरकाने तुम्हाला लेखातून आणि प्रतिसादातून १-४ शक्यतांचे मनुष्य पाहायला मिळाले असतीलच. आता तुम्हीच सांगा तुम्हाला शक्यता १ मध्ये राहणे आवडेल कि २-५ यामध्ये?

In reply to by कोहंसोहं१०

पर्याय 3- पण मी फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पज जॉन नाहीच आहे असे म्हणीन. तसे का हे वरील बऱ्याच प्रतिसादांमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे.

जगात संघर्षाचे मूळ कारण हे देव आणि धर्म आहे असे लेखकाने मत व्यक्त केले आहे. जगातून देव धर्म नष्ट झाले तरी माणसं माणसातील संघर्ष नष्ट होणार नाहीत हे त्रिवार सत्य आहे. संघर्ष ची कारण काळानुसार बदलत राहणार पण संपणार नाहीत. त्या मुळे देव ,धर्म नष्ट झाले की सर्व एकमेकाशी प्रेमाने वागतील ह्या लेखकाच्या मताला काही अर्थ नाही. उलट देव ,आणि धर्म संगर्ष ची धार bochat करतात. पाप केले की देव शिक्षा करेल. मेल्या नंतर किंवा जिवंतपणी कर्माची फळं भोगावी लागतील. आपके वर्तन धर्माला अनुसरून राहवे ह्या बद्द्ल मनात जाणीव होत राहिल्या मुळे किती तरी संघर्ष ची तीव्रता कमी होते. ह्या धर्माच्या नावावर दंगली होतात त्या धर्मा मुळे नाही तर गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे होतात. त्यांना कत्तली करण्यासाठी कारण लागत नाही.

सर्वसामाण्यान्साठी श्रद्धा ही आन्धळ्याची काठी आहे. म्हणुनच सन्त तुकाराम महाराजानी सर्वसामान्यान्साठी सगुण उपासनेचा आदर्श ठेवला. आणि श्रद्धेला वैज्ञानिक आधार आहे असे वाटते कारण श्रद्धा अन्तर् मनात रुजली तर त्याचे सकारात्मक परिणाम आपण अनुभवू शकतो.

आज सुद्धा जगभर धार्मिक उत्सव जोरात साजरे केले जातात. मक्केत आज सुद्धा प्रचंड गर्दी होते तीन वेळ नमाज पडणाऱ्या लोकांची संख्या बिलकुल कमी झालेली नाही उलट वाढत आहे. हिंदू देवळात दान होणाऱ्या संपत्ती चे प्रमाण दर वर्षी वाढत आहे आणि मंदिर समोर ची लाईन सुद्धा. जगभर चर्च मध्ये जाणाऱ्या लोकांच्या संख्येत कोणती च कमी आलेली नाही. बुध्द आणि बौध्द धर्माचे पालन करणारे आणि शांतता प्रिय धर्म (कागदावर), असून सुद्धा त्यांचे अनुयायी दुसऱ्या धर्माच्या लोकांचा तिरस्कार करण्यात आघाडीवर आहेत. देशानुसार संख्या बघितली तर धर्माचे पालन करणाऱ्या लोकांची संख्या ही धर्म न पाळणाऱ्या लोकांपेक्षा किती तरी पट्टी नी जास्त आहे. धर्म आणि देव ह्या पृथ्वी वरून कधीच नष्ट होणार नाहीत. त्या साठी देव आहे हे सिध्द होण्याची काहीच गरज नाही. हे तर 100% सत्य आहे.

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/popcorn.gif

जुन्या काळात नैसर्गिक आपत्ती,रोगराई ,हिंसक पशु अशा कारणांपासून रक्षण व्हावे तसेच जीवन चांगले जगत यावे आणि चुकांपासुन बोध घेऊन पुढे चालत राहावे यासाठी मानवाने देवाची नावे ठेवली जशी वैज्ञानिक प्रगती होत गेली तशी अनेक कोडी उलगडत गेली अनेक सोयी सुविधा निर्माण झाल्या,जीवन सुविधापूर्ण बनले पण वैज्ञानिक प्रगतीने विध्वंसक बाजूही वाढत गेली त्यामुळे मनातून घाबरलेल्या मानवाने आधीपासून असलेल्या देवाच्या कल्पनेत मानसिक आधार शोधला जेवढी जास्त प्रगती होतीये तेवढाच संहार होतोय आणि माणसे स्वतःपुरती बघणारी होत चाललित ,वैज्ञानिक प्रगतीने हावरेपणा वाढला म्हणून कावलेल्या ,हतबुद्ध झालेल्या माणसांनी देवाचा आधार शोधला पूर्वीच्या काळात वैज्ञानिक प्रगती नव्हती तेव्हा माणसे जे होते त्यात समाधानी होती देवाचे नाव घेऊन हे आत्ताच्या त्रासलेल्या आधुनिक मानवाच्या लक्षात आले आणि त्याने अजून देवाचे नाव मॉडिफाय करून त्याला आधुनिकतेचा मुलामा चढवला निसर्गातील गुपिते उलगडताना आणि शोध लावताना चकित आणि भयभीत झालेल्या वैज्ञानिकांनी देवाच्या कल्पनेतच मानसिक आधार घेतला जुन्या काळात नैसर्गिक आपत्तीनपासून वाचण्यासाठी आणि आधुनिक काळात मानवनिर्मित आपत्तीनपासून वाचण्यासाठी माणसानेच देवाची नवे शोधली आणि स्वतःला आधार निर्माण केला पूर्णपणे नास्तिक असण्यासाठी फार मानसिक कणखरता आणि एक शुद्धता लागते (जे कधीच चुकत नाहीत त्यांना देवाची गरज भासत नाही पण अशी उदाहरणे विरळ आहेत) त्यामुळे सर्वसाधारण माणसे देवाचे नाव घेऊनच मार्गक्रमण करणार देव आहे कि नाही हा एक न संपणारा चिरंतन वाद आहे त्याला जे योग्य वाटते ते त्याने आचरावे दुसऱ्यांना त्रास न होता एवढे केले तरी खूप प्रश्न सुटतील चांगल्या चर्चेबद्दल सर्वांना धन्यवाद

In reply to by Prajakta२१

मनातून घाबरलेल्या मानवाने आधीपासून असलेल्या देवाच्या कल्पनेत मानसिक आधार शोधला
मलाही हे पटत.
पूर्णपणे नास्तिक असण्यासाठी फार मानसिक कणखरता आणि एक शुद्धता लागते
अस मात्र मला वाटत नाही. देवावर विश्वास न ठेवणे हे भुतावर विश्वास न ठेवण्यापेक्षा फार काही वेगळं नाहीये.
देव आहे कि नाही हा एक न संपणारा चिरंतन वाद आहे त्याला जे योग्य वाटते ते त्याने आचरावे दुसऱ्यांना त्रास न होता एवढे केले तरी खूप प्रश्न सुटतील
+100

In reply to by Prajakta२१

१. > आधीपासून असलेल्या देवाच्या कल्पनेत मानसिक आधार शोधला. बरोब्बर ! आणि भीती हाच खरा मुद्दा आहे. मला सुखी ठेव, मला वाचव, माझ्या पाठीशी रहा इतकाच सगळ्या प्रार्थनांचा अर्थ आहे. पण मुळात देव ही निव्वळ कल्पना असल्यानं, मनाच्या समजूतीपलिकडे त्याचा काहीही आधार मिळत नाही. २. > त्याने अजून देवाचे नाव मॉडिफाय करून त्याला आधुनिकतेचा मुलामा चढवला हल्ली फार बावळटपणा दिसायला नको म्हणून पब्लिक कर्मकांडाचे मॉडर्न अर्थ लावतात, पण एकूणात हेतू तोच : मला सुखी ठेव, मला वाचव, माझ्या पाठीशी रहा. ३. > चकित आणि भयभीत झालेल्या वैज्ञानिकांनी देवाच्या कल्पनेतच मानसिक आधार घेतला याला जनमानसाचा 'विनाकारण क्षोभ नको ' हे पण कारण आहे. स्टीफन हॉकिंगनी विश्वनिर्मितीच्या कामात देवमधे आणण्याची गरज नाही म्हटल्यावर, चर्चवाले खवळले ! ४.> माणसानेच देवाची नवे शोधली आणि स्वतःला आधार निर्माण केला आतापर्यंत २३५६ वाचनं आणि १३६ प्रतिसाद झाले, पण इतकी साधी आणि उघड गोष्ट कबूल करायला इथे कुणीही तयार नाही ! ५. > पूर्णपणे नास्तिक असण्यासाठी फार मानसिक कणखरता आणि एक शुद्धता लागते (जे कधीच चुकत नाहीत त्यांना देवाची गरज भासत नाही पण अशी उदाहरणे विरळ आहेत) उलट आहे ! एकदा काल्पनिक गोष्टीवर अवलंबित्व सोडलं, की भीती गेली ! मी अनुभावानं सांगतो. करुन पाहा ! एकदम बिनधास्त व्हाल. चूक काय कुणाचीही होते, त्यातून नवं काही तरी शिकलं की झालं ! देवभोळ्यांची चूक होत नाही असं नाही पण ते चूकीचा अ‍ॅनॅलिसिस करण्याऐवजी पूर्वसंचित वगैरे भानगडी काढतात, त्यामुळे त्यांना कशाची काही टोटल लागत नाही (पाहा : त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? ) ५. > देव आहे कि नाही हा एक न संपणारा चिरंतन वाद आहे या पोस्टमुळे, किमान विचार करणार्‍यांसाठी तरी, तो कायमचा संपेल ! ६. > चांगल्या चर्चेबद्दल सर्वांना धन्यवाद तुमच्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल मनःपूर्व आभार्स !

In reply to by संजय क्षीरसागर

इतकी साधी आणि उघड गोष्ट कबूल करायला इथे कुणीही तयार नाही !
संक्षी, तुम्हाला नैतिक अधिकार नाही हे विधान करण्याचा. तुम्ही स्वतः "मेमरी स्ट्रीन्ग्ज" सारखा भंपक अशास्त्रीय दावा केलात आणि ते वैज्ञानिक सत्य असल्याच्या अविर्भावात आपला मुद्दा रेटत राहीलात. अनेक भाकडकथा सांगून आणि कोलांट्या उड्या मारुन आपला दावा "सिद्ध केल्याचा/प्रूव्ह केल्याचा" आव आणलात. तुमची वाक्ये जशीच्या तशी इथे लिहील्यावर एका अभ्यासू सदस्याने ती विधाने अचाट आहे म्हटलयावर आपली चूक लपवण्यासाठी खोटे बोललात पण मान्य केले नाहीत की "मी एक अशास्त्रीय विधान केले". तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे हो असली मोठी मोठी वाक्ये लिहीण्याचा. केवळ माझ्या प्रतिसादांना उत्तर देणे टाळलेत म्हणजे तुम्ही लोकांना काहीही विचारण्यास आणि विज्ञाननिष्ठतेच्या बाता मारण्यास पात्र झालात असे नाही. तुमची दांभिकता, खोटारडेपणा आणि तुमचा अशास्त्रीय दृष्टिकोन लोकांना कळला आहे. म्हणूनच तुमच्या मताला कोणी किंमत देत नाही. इथे जे काही बॅलन्सड प्रतिसाद येत आहेत ते शा वि कु आणि इतर सदस्यांच्या प्रतिसादांमुळे. तुमच्या प्रतिसादांमुळे नव्हे.

In reply to by संजय क्षीरसागर

कारण ह्या पोस्ट च्या पाठी वेगळेच सत्य लपलेले आहे. मांजराला वाटत डोळे मिटून दूध पिले की त्याला कोणी बघणार नाही पण सर्व बघत असतात. त्या मुळे अशा प्रकारच्या पोस्ट ह्या बोध्द धर्मीय आणि पुरोगामी लोक हिंदू वर नीच पातळीवरची टीका करताना नास्तिक तेचा बुरखा पांघरून करतात हे सर्वांना माहीत आहे. त्यांचा हेतू एकच हिंदू धर्माची बदनामी करणे आणि बुध्द चे विचार पसरवण्याचा प्रयत्न करणे. आणि एक ओळख आहे ह्या नास्तिक मंडळी ना ओळखण्याची. हे कधीच चुकून पण मुस्लिम धर्मा वर त्यांच्या देवा टीका करणार नाहीत त्यांना देव नाही असे उपदेश करणार नाहीत. हे सर्व सर्वांना माहीत आहे मुळे अशा पोस्ट च्या विचाराशी कंपू सोडून बाकी कोणीच सहमती दर्शवत नाही.

In reply to by Prajakta२१

निसर्गा चे रौद्र रूप बघून माणूस घाबरून गेला आणि देव ही कल्पना अस्तित्वात आली ह्याला काही पुरावा आत्ता पर्यंत मिळाला आहे का. एकदा शिला लेख किंवा भित्ती चित्र . माझ्या माहिती प्रमाणे काही पुरावा मिळालेला नाही. निसर्गाचे रौद्र रूप कोणते. पावूस, वारा,हेच ना. त्या पासून कसे रक्षण करायचे ह्याची उपजत जाणीव सर्व प्राणी मात्रात असते माणूस पण प्राणी च आहे. त्याला कशाला भीती वाटेल.

Tv channel tar series चालवली होती त्या मध्ये देव हे आपल्या पेक्षा प्रगत असलेले aliens hote he सांगायचं त्यांनी प्रयत्न केला होता. त्यांच्या मताला आधार देण्यासाठी पृथ्वी वरील विविध मंदिर,किंवा वास्तू,दगडांवर खोदलेली चित्र ,शिळा लेख ह्यांची उदाहरणे दिली होती. ह्या प्रचंड विश्वात आपल्या पेक्षा पण प्रगत सजीव सृष्टी असू शकते हे नाकारता येत नाही. स्पेस एजन्सी जगातील ह्याचा पण निरंतर शोध घेत आहेत पण अजुन यश आले नाही. किमान 40 ते 45 तरी ग्रह असे असतील तिथे आपल्या पेक्षा पण प्रगत जीव सृष्टी असू शकते असा दावा नुकताच करण्यात पण आला आहे. पृथ्वी वर करोडो प्राण्या च्या विविध जाती अस्तित्वात असताना फक्त माणसाचा मेंदूचं कसा जास्त प्रमाणात उत्क्रांत झाला हा पण गहन प्रश्न आहेच.ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर पण अजुन सापडले नाही.

In reply to by Rajesh188

आणि तसही एलिअन्स ची हि थिअरी पण केवळ खळबळजनक दावे आहेत.तुम्ही म्हणताय तो कर्यक्रम नाही पहिला, पण मराठीत एक छोटं पुस्तक आहे "पृथ्वीवर माणूस उपराच" नावाचं त्यामध्ये वाचलीये ही थियरी.

संजय क्षीरसागर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगेन म्हणतो. १.
मन वस्तुस्थिती निर्माण करु शकत नाही. ते फक्त विचार निर्माण करु शकतं आणि त्यान्वये वस्तुस्थितीबद्दल, ज्ञाताला भ्रम निर्माण करु शकतं. उदा. इतर कुणालाही न दिसणारी काली फक्त परमहंसांना दिसते आणि ते तिच्याशी बोलतात !
नेमकं हेच इलेक्ट्रॉन बद्दलही म्हणता येतं. इलेक्ट्रॉन हा ही एक भ्रमंच आहे. हा कण नेमका कसा आहे ते कोणीही पाहिलेलं नाही. त्याच्या रुपाबद्दल अनेक वदंता आहेत. पण कोणतीही वदंता नि:संशयपणे तथ्य म्हणून सिद्ध झालेली नाही. तरीपण याच्यावर संशोधनं करून लोकांनी नोबेल पारितोषिक पटकावलं आहे. मग कालीनेच काय घोडं मारलंय? तुम्ही जसं कालीस काल्पनिक मानता, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन ही सुद्धा एक कल्पनाच आहे. २.
निर्विवाद वस्तुस्थिती म्हणजे मनाच्या प्रोजेक्शननी डिस्टॉर्ट न झालेली, वास्तविक स्थिती.
हिलाच ब्रह्मन म्हणता येईल का? हो असल्यास देवाविषयी चर्चा करण्याऐवजी ब्रह्मनविषयी चर्चा करायला हवी. ३.
संतांनी चमत्कार केलेत अशा स्टोर्‍या भक्तांनी लावल्यामुळे तर ते संत असामान्य झालेत !
अशा ष्टोऱ्या शिवाजी महाराजांबद्दलही सांगितल्या जातात. पण त्यांची थोरवी वेगळ्याच कारणांमुळे प्रसिद्ध झालीये. ४.
देव नांवाची कोणतीही गोष्ट अस्तित्त्वात नाही आणि देव या कल्पनेचं नांव भक्तांनी ठेवलंय
नेमकं हेच इलेक्ट्रॉन बद्दलही म्हणता येतं. इलेक्ट्रॉन हा ही एक भ्रमच आहे. हा कण नेमका कसा आहे ते कोणीही पाहिलेलं नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

इलेक्ट्रॉनची पूजा करतांना कुणाला पाहिलंय का ? त्याची मंदीरं लोकांनी बांधलीयेत का ? त्याच्या नांवावर वेगवेगळे धर्म तयार झालेत का ? राजकारणी तो निवडणूकात वापरतांना दिसतात का ? त्यावरनं धर्मयुद्ध झालीयेत का ?

In reply to by संजय क्षीरसागर

इलेक्ट्रॉनच्याविरुद्ध बोललं तर लोकांच्या भावना भडकतात का ? (या पोस्टवरनंच बघा आणि सांगा !)

देव अस्तित्व अमान्य केले की काय घडेल हे तुम्ही सांगितले आहे १) भीती नष्ट होईल देव चे अस्तित्व मानणाऱ्या लोकांना कशाची भीती वाटते आणि देवाचे अस्तित्व अमान्य केले की कोणती भीती नष्ट होईल आणि कशी २)जीवन निर्भर होईल. देवाचे अस्तित्व मानणारी लोक देव वर अवलंबून असतात निर्भर नसतात हे तुम्ही कशावरून ठरवले काही उदाहरणे ध्या ३)पूजा अर्चा करावी लागणार नाही पूजा अर्चा चा मानवी मनावर नकारात्मक परिणाम होतो हे तुम्हाला का वाटत उलट पुहा अर्चा केल्यामुळे प्रसन्न वाटते आणि सकारात्मक विचार मनात येतात असा सर्वांचा अनुभव असतो. तुम्हाला पूजा अर्चा वर आक्षेप का आहे. ४)पवित्रता ,सोवळे हा मुद्धा तुमचा योग्य आहे पटण्यासारखा आहे अपवित्रता आणि सोवळे ह्या गोष्टी नष्टच झाल्या पाहिजेत असेच आमचे मत आहे. ५)विधी विधी ,हे रीतिरिवाज चे अंग आहे.आणि त्या मुळे त्या वर आक्षेप असण्याची गरज नाही. रीतिरिवाज पाळणे हा प्रत्येकाचा कायद्या नी मिळालेला अधिकार आहे आणि कोणते रीतिरिवाज पाळायचे हे ठरवण्याचा अधिकार प्रतेक व्यक्तीला आहे. ६) दानपेटी मध्ये जाणारे पैसे वाचतील. दानपेटीत जाणारे पैसे हे वाया जातात असे तुम्ही कसे म्हणता. विविध समाज उपयोगी करतो त्या विधीचा वापर केला जातो. अन्न दान केले जाते किती तरी लोकांना रोज फुकट अन्न दान मंदिर मार्फत केले जाते. गरीब लोकांचे गंभीर आजाराची बिल मंदिर मार्फत भरली जातात. आणि अशी खूप काम केली जातात. 7)देव नाकारला की निर्फिड पना येईल. देव मानणारी लोक नीर्फिड नसतात हे तुम्हाला कोणी सांगितले. सैन्य पासून गुंडा पर्यंत आणि सामान्य शेतकऱ्या पासून उद्योग पती पर्यंत सर्व स्तरातील लोक देव मानणारी आहेत आणि त्यांनी यशस्वी रित्या संकटांवर मात केलेली आहे. कसाब ला पकडणार ओंबळे हवालदार देव मानणारा च होता तरी सशस्त्र कसाब ला पकडला ना. 8)ग्रंथ पोथ्या रद्दी मध्ये फेकता येतील. ग्रंथ आणि पोथ्या फक्त धार्मिक उपदेश करत नाहीत तर जीवन कसे जगावे,जीवनाकडे सकारात्मक रित्या कसे बघावे,चांगले गुण कसे आत्मसात करावेत हे. सर्व ते शिकवतात त्यांना रद्धी तुम्ही का ठरवता . ९)देव मानणारे बावळट असतात. ह्याची तुम्ही उदाहरणे ध्याच .काही ही baseless दावा करताना त्या साठी पुरावे,उदाहरणे तुमच्या कडे आहेत का. 10) शोध लावणारी लोक देव न मानणारी असतात. ह्या वर हसावे की रडावे तेच समाजात नाही. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि यशस्वी उद्योगपती मुकेश अंबानी पासून बाकी अनेक उद्योग सम्राट हे देव मानणारे च आहेत. देव न मानणारा एक तरी यशस्वी उद्योगपती तुम्ही दाखवून द्यावा. आता पर्यंत जे शोध लागले आहेत त्या मधील मोजकेच तीन चार संशोधक देव म मानणारे असतील बाकी सर्व देव ,धर्म मानणारे चे आहेत,होते इस्रो चे अध्यक्ष धार्मिक आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?. कमीत कमी खर्चात उपग्रह अवकाशात सोडण्याचे अतुलनीय कार्य त्यांनी केलेले आहे.

In reply to by Rajesh188

ह्याची तुम्ही उदाहरणे ध्याच .काही ही baseless दावा करताना त्या साठी पुरावे,उदाहरणे तुमच्या कडे आहेत का. >>>> टीप: असे प्रश्न विचारू नयेत. आत्तापर्यंत स्वतः केलेल्या एकही विधानाचे कोणतेही पुरावे त्यांनी दिलेले नाहीत. फक्त त्याच त्याच गोष्टी पुराव्याविना सांगत राहणे आणि स्वतःची मते रेटत राहणे यापलीकडे त्यांनी काहीही केले नाही आणि करण्याची शक्यताही नाही. विज्ञानवादाची तत्वे धाब्यावर बसवून स्वतःला विज्ञानवादी म्हणवणे आणि बोजड शब्दांचा अतिसार मांडून थयथयाट करणे हेच ते करत आले आहेत. लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि उथळ पाण्याला खळखळाट फार ह्या दोन म्हणी यावर चपखल बसणाऱ्या आहेत.

In reply to by कोहंसोहं१०

धागाकर्ता एका विचित्र मानसीक स्थितीत अडकला आहे. काहिशा कारणाने (बहुतेक ध्यानाच्या अभ्यासाने) त्यांना मनाच्या विशिष्ट अवस्थेची ( विचारांचा व्हॉल्युम अत्यंत फीबल झालेल्या अवस्थेची) प्रचिती आलि. इथे त्यांचं मन दुभंगलं. काहिसं स्प्लीट पर्स्नॅलिटी सारखं. त्यांच्या मनाने असा समज करुन घेतला कि ते मन शटडाऊन करु शकतात. त्यांच्यातल्या "मी" आणि "मन" या अंतर्विरोधाला त्यांनी अध्यात्माच्या टॅगखाली स्विकारलं. हि त्यांची अध्यात्मीक एस्टॅब्लिशमेण्ट सर्वमान्य व्हावी हा त्यांचा कळत-नकळ्त अट्टहास झाला. हा अट्टहासच त्यांना आपल्या "मी" पलिकडे काहिच बघु देत नाहि. त्यांना स्वतः ला हे कळतं कि नाहि माहित नाहि.

In reply to by अर्धवटराव

धागाकर्त्याची कपोलकल्पित मेमरी स्ट्रिंग वरची वाक्यं, तसेच "आयडी ब्लॉक झाला नसता तर सदस्यांना जिएसटीमुळे देशाचं किती अपरिमीत नुकसान होतंय ते कळलं असतं आणि सत्तांतर होण्याची शक्यता होती" असे भन्नाट दावे, मिपा वर गोंधळ घातल्यामुळे तब्बल ३ वर्षे ब्लॉक झालेला आयडी यावरून त्यांच्या मानसिक स्थितीची कोणीही कल्पना करू शकतो.

ईश्वर ही विरोधाभासाने भरलेली एक मानवनिर्मित संकल्पना आहे. ती मान्य करावी असा कुठलाही पुरावा अथवा तर्क मला आजवर सापडलेला नाही. तसा निर्विवाद पुरावा सापडल्यास ह्या संकल्पनेवर विश्वास ठेवण्यास माझी तयारी आहे. तोवर माझे विशुद्ध नास्तिकत्व कायम राहील. ते इतरांवर मी लादत नाही. तसेच इतरांचे आस्तिकत्वही मी बळेच माझ्यावर लादू देणार नाही. इत्यलम।

२-३ गोष्टी बद्दल खालील मतं आहेत : १. देव / कर्ता आहे हि संकल्पना - मला देव/कर्ता आहे का नाही हे माहित नाही, पण असं नक्की वाटतं कि असला तरी आपण त्याला सुखकारक - दुःखहारक म्हणतो तसा नसावा. इट्स जस्ट बिझनेस. एका प्राण्याला जगण्यासाठी दुसऱ्या प्राण्याचं बाळ ओढून खायला लागत. जर तो सुखकर्ता असेल तर त्याची पूजा करणारा प्रत्येक माणूस सुखातच दिसायला हवा. जगात माणूस प्राणी कोणीच दुःखी नसेल, परफेक्ट जग. २. कर्मकांड - देवळात जाण, पूजाअर्चा करणं - मी करणार नाही. पण माझ्यासाठी हि एक इंडस्ट्री आहे, ज्यात भरपूर लोकांना रोजगार मिळतो. काही लोकांना मानसिक शांती मिळेल, काहीची फसवणूक होईल. काही लोकांना फसवून घ्यायचंच असतं हे चेन मार्केटिंग मध्ये अडकलेल्या कुठल्यापण लोकांना बघून कळेल, ते देवात कर्मकांडात नाही फसले तर अजून कशातरी फसतील. ३. धर्मामुळे वेळ वाया जातो, एकूणच समाजाचं नुकसान होतं. - धर्म नसेल तर अजून काहीतरी शोधतील. मी एकदा (१९९९ मध्ये) निगडीला का कुठेतरी बस ने गेले होते, वाटेत एक झोपडपत्त्ती लागली. कमीत कमी २० मोट्या माणसांचे ग्रुप दिसले पत्ते खेळताना थोड्या थोड्या अंतरावर दुपारी १२ वाजता. त्या दिवशीपर्यंत माझ्या आसपासची कोणीही मोठी माणसं कामाच्या दिवशी दुपारी बसून पत्ते खेळतायत असं कधीच दिसलं नव्हतं. ज्यांना वेळ अनुत्पादक कामात घालवायचंय ते धर्म गेला म्हणून थांबणार नाहीत. वरती कोणीतरी शरीरातल्या पचन करणाऱ्या सूक्ष्म जंतूंचं उदाहरण दिलाय. माझ्यासाठी देव आहे नाही हे सांगण्यासाठी उत्तम उदाहरण आहे नाही. १. माणूस ह्या पृथ्वीवर ५००० वर्षांपासून राहतोय (कदाचित त्याच्या आधीपासून, अगदीच भांडायचं असेल तर २००० पकडा ) २. पहिली काही शतकं-सहस्त्रक त्याला पोटातल्या जंतूचा पत्ता नव्हता. पण कोणी एखादा वैद्य - डॉक्टरचा (त्यावेळची काय डिग्री असेल ती) अंदाज असेल कि कदाचित पोटात आपल्याला दिसत नसलेलं काहीतरी आहे. आसपासच्या सगळ्या लोकांनी, दिसत नाही - तस्मात असे काही जंतू अस्तित्वात नाहीत - म्हणून वेड्यात काढलं असेल. ३. त्याच वेळ कोणीतरी अजून एक वेडा मला अजून सूक्ष्म काही बघायचंय किंवा अजून लांबच बघायचंय म्हणून दुर्बिणीवर प्रयोग करत असेल. ते करता करता त्याला अतिसूक्ष्म कण, जो त्याला आधी कधीही दिसला नव्हता तो अचानक दिसला असेल. ४. डॉक्टर वेडा आणि दुर्बीण वेडा एकत्र भेटले असतील, कींवा नसतील, कदाचित त्यांच्या बरोबर असलेल्या सगळ्या दुनियेला ते वेडे, वेळ वाया घालवणारे वाटतं असतानाच मरुन गेले असतील. त्यांनी किंवा भलत्याच कोणीतरी पुढे, अतिसूक्ष्म कण दाखवणारी दुर्बीण पोटातल्या द्रवावर वापरून बघितली असेल आणि पुराव्याने शाबीत केलं असेल कि अतिसूक्ष्म जंतू आहेत आणि ते आपल्या पचनावर परिणाम करतात. ५. तोपर्यंत ते दोन वेडे, आणि पोटात जंतू नाहीच्चे म्हणणारे आसपासचे लोक सगळेच मरून गेले असतील. हेच देवाला पण लागू होत : १. हेच देव कदाचित आत्ता एखाद्याला दिसला किंवा जाणवला असेल, त्याला आपण वेड्यात काढत असू. २. काही लोक देव आहे असं त्यांना दिसला नसला तरी मानत असतील, कारण भोवताली चालणाऱ्या बऱ्याच गोष्टी त्यांना समजत नसतील. ३. असाच कोणीतरी वेडा असेल जो देव दाखवणारी दुर्बीण बनवण्याचा प्रयत्न करत असेल. कदाचित त्याला (किंवा त्याच काम जो कोणी पुढे नेईल त्याला ) ५०-१०० वर्षांनी यश येईल, आणि देव / कर्ता त्यातून बघता येईल. ४. बहुतेक ते बघायच्या आधी आपण "देव नाहीच्चे "अशा दृढ विश्वासात मरून जाऊ. विज्ञानात तरी तुम्ही "कुठलाही" दावा केलात तर त्याला पुरावा द्यावा लागतो, आणि तो फक्त डोळ्यांना दिसत नाही म्हणून नाही असा चालत नसाव बहुतेक. मग दावा देव आहे हा असुदे किंवा नाही हा असुदे. त्यामुळे मी तरी देव आहेच्च किंवा नाहीच्च म्हणायच्या ऐवजी, असेलही कदाचित मला तरी अजून दिसला नाही असं म्हणेन.

In reply to by वीणा३

१. > जगात माणूस प्राणी कोणीच दुःखी नसेल, परफेक्ट जग. एकदम सही ! ______________________________ २. > २. कर्मकांड - काही लोकांना फसवून घ्यायचंच असतं हे चेन मार्केटिंग मध्ये अडकलेल्या कुठल्यापण लोकांना बघून कळेल, ते देवात कर्मकांडात नाही फसले तर अजून कशातरी फसतील. बरोब्बर ! फरक इतकाच की चेन मार्केटींगवाल्याला गंडल्याचं लक्षात येतं पण तिरुपतीला जाणार्‍याला ते कधीच कळत नाही, उलट एखादे वर्षी तिरुपतीला जायला जमलं नाही तर बरेच दिवसात आपण गंडलो नाही म्हणून तो अस्वस्थ होतो ! __________________________________ ३. > धर्मामुळे वेळ वाया जातो : ज्यांना वेळ अनुत्पादक कामात घालवायचंय ते धर्म गेला म्हणून थांबणार नाहीत पैसा ही फार जादुमयी चीज आहे. लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर, ते पहिल्यांदा उठून कामाला जातील ! ______________________ ४. > मी तरी देव आहेच्च किंवा नाहीच्च म्हणायच्या ऐवजी, असेलही कदाचित मला तरी अजून दिसला नाही असं म्हणेन. हा भाग जरा महत्त्वाचायं ! अ) विज्ञान हा कार्य-कारणाचा शोध आहे : करोना आहे > कारण शोधा > लस तयार करा > विषय संपवा ! विज्ञान देवाच्या भानगडीत पडत नाही. ब) कोणताही माणूस कधीही संभ्रमात स्वस्थ राहू शकत नाही त्याला कायम एका निर्णायक स्थितीत यावं लागतं थोडक्यात, देव असेल तर पूजा-अर्चा, कर्मकांड, नवस, दानपेटी, तिर्थाटनं.... नसेल तर विषय संपला ! आपण मोकळे. आपण आपले प्रॉब्लम्स असेल त्या अक्क्ल हुशारीनं, कुणाच्या मदतीनं, जमतील तसे सोडवू पण देव असेल किंवा नसेल अशा अनिर्णायक अवस्थेत, काहीच साधत नाही. थोडी परिस्थिती हाताबाहेर गेली की शरण जाणार, सगळं सुरळीत असेल तेंव्हा देवाचा काही संबंध नाही. मग शरण जाल तेंव्हा मन म्हणणार `आता बरा देव आठवला ?' त्यापेक्षा निर्णायक स्थिती केंव्हाही चांगली एकतर सगळी जवाबदारी आपल्यावर, किंवा मग सगळंच रामभरोसे ! फुल राडा झाला तरी पूर्वसंचित समजून गप पडायचं आणि उघडपणे आपण एखादी गोष्ट कौशल्यपूर्वक केली, तर देवानी करवून घेतली असं समजायचं ! _________________ थोडक्यात, जी केवळ कल्पना आहे तिच्यावर सूज्ञ व्यक्ती कधीही भरोसा टाकणार नाही !

संजय क्षीरसागर,
इलेक्ट्रॉनची पूजा करतांना कुणाला पाहिलंय का ? त्याची मंदीरं लोकांनी बांधलीयेत का ? त्याच्या नांवावर वेगवेगळे धर्म तयार झालेत का ? राजकारणी तो निवडणूकात वापरतांना दिसतात का ? त्यावरनं धर्मयुद्ध झालीयेत का ?
प्रत्येक आधुनिक युद्धांत इलेक्ट्रॉनचा वापर झालाय. हिरोशिमा व नागासाकी येथल्या भीषण नरसंहारात तर इलेक्ट्रॉनहून शक्तिशाली अशा प्रोटॉन व न्यूट्रॉन या थोरल्या भावंडांचाही उपयोग झालाय. तुमच्या मते देव अस्तित्वात नाही. मग त्याच्या मागे का पडता? आधुनिक तंत्रज्ञान हे देवाहून कितीतरी संहारक आहे. त्याच्या मागे तुम्ही का पडंत नाही? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

> देवाहून कितीतरी संहारक आहे. त्याच्या मागे तुम्ही का पडंत नाही ? कारण ते तंत्रज्ञान शेवटी माणसाच्या हातात आहे ! एकदा माणूस सूज्ञ झाला की तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी कल्याणासाठी होईल.

एवढं कळतंय ना मग कशाला तुमचे विचार लोकांनी स्वीकारावे ह्याचा आग्रह धरतात. लोक सूज्ञ झाली की सोडतील देवाचा नाद. अशा ठेवा आणि वाट बघा अजुन हजार ,दोन हजार वर्ष . किंवा 5 ते 10 वर्षात पण लोक सूज्ञ होतील. फक्त तो पर्यंत मानव जात टिकून राण्यासाठी पर्यावरण राखा, अणु बोंब नष्ट करा, आणि दुसरे महत्त्वाचे उत्क्रांती होवून माणसाच्या मेंदू ची क्षमता कमी होवू नये. वाढता co2 माणसाच्या मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी करू शकतो असे संशोधक म्हणतात.

In reply to by Rajesh188

बरेच अलिकडे आलात ! पण तरी बेसिक चूक झालीच. विचार पटणं आणि सूज्ञ होणं या एककालिन घटना आहेत. आपण कल्पनेच्या मागे धावतोयं, हे समजता क्षणी धावणं संपतं. ओशोंचं एक खास वाक्य आहे : `समझ आचरणमें बदल जाती है !' एकदा लोक सूज्ञ झाले की अणूबाँब, कार्बनउत्सर्ग इत्यादी प्रष्ण आपोआप सुटतील.

In reply to by संजय क्षीरसागर

लवकरात लवकर पृथ्वी सोडा नाही तर मानवजात ह्या पृथ्वी वरून नष्ट होईल जसे अनेक प्राणी पृथ्वी वरून नष्ट झाले त्या प्रमाणे. त्याची कारण पण त्यांनी दिलेली आहेत. दूषित पर्यावरण आणि त्या मुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती. अणु बोंब सारख्या घटक शास्त्र चा वापर. साथीचे रोग. आणि सर्वात महत्वाचे कारण कृत्रिम बुध्दी मत्तेचा अती विकास कृत्रिम बुध्दी मत्ता एवढी विकसित होईल की माणसावर भारी पडेल . आणि माणसाचा विनाश करेल इथपर्यंत त्यांनी सांगितले आहे. तुम्ही म्हणताय लोक सूज्ञ झाली की सर्व ठीक होईल पण इथे तर वेगळेच चित्र दिसत आहे. असे पण एक मत आहे पूर्वी माणूस खूप विकसित झाला होता आता पेक्षा पण जास्त पण त्याला धोके दिसू लागले आणि ते सर्व ज्ञान नष्ट केले. हा मार्ग निवडायची आताच्या मानवावर वेळ येवू नये

संजय क्षीरसागर,
कारण ते तंत्रज्ञान शेवटी माणसाच्या हातात आहे ! एकदा माणूस सूज्ञ झाला की तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी कल्याणासाठी होईल.
देव हे सुद्धा एक तंत्रज्ञानच आहे असंही मानता येईल ना? उदा. : आत्मा नामक कोणीही कधीही न पाहिलेल्या गोष्टीचं अस्तित्व कल्पून त्याभोवती योग नावाचं कसलंसं तत्त्वज्ञान कुणीतरी रचलं. आसन व प्राणायाम हे त्या योगाचे छोटासे भाग आहेत. त्यांचे नियम पाळले तर आरोग्यदायी लाभ मिळतात. पण या लाभांचा आत्म्याशी थेट संबंध नाही. त्याच धर्तीवर देवाचं अस्तित्व कल्पून तंत्रज्ञान विकसित करायला काय हरकत आहे? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

> गोष्टीचं अस्तित्व कल्पून फार बेसिक मिस्टेक होतेयं गामाश्री ! आत्मा म्हणजे आपण स्वतः !

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, योगात मीलन अभिप्रेत असतं. म्हणूनंच योग हा द्वैताकडे अंगुलीनिर्देश करतो. आता तुम्ही म्हणता की आत्मा म्हणजे आपण स्वत:. तर योगाद्वारे कोणत्या दोन गोष्टींचं मीलन होणार? एकतर आत्मा हा तरी निराधार आहे, किंवा मग स्वत:ची जाणीव तरी निराधार मानली पाहिजे. देव ही सुद्धा अशीच 'निराधार' कल्पना असू शकते ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पुन्हा एकदा फंडामेंटल मिस्टेक ! १> योगात मीलन अभिप्रेत असतं. म्हणूनंच योग हा द्वैताकडे अंगुलीनिर्देश करतो. आता तुम्ही म्हणता की आत्मा म्हणजे आपण स्वत:. तर योगाद्वारे कोणत्या दोन गोष्टींचं मीलन होणार? योगा म्हणजे गेटींग कनेक्टेड टू वनसेल्फ ! दुही संपणं म्हणजे योगा ! आता पुढे पण शांतपणे वाचा : _______________________________________ २. > आता तुम्ही म्हणता की आत्मा म्हणजे आपण स्वत:. तर योगाद्वारे कोणत्या दोन गोष्टींचं मीलन होणार? एकतर आत्मा हा तरी निराधार आहे, किंवा मग स्वत:ची जाणीव तरी निराधार मानली पाहिजे. अर्थात ! आत्मा निराधारच आहे. आणि आपणच आत्मा आहोत. त्यामुळे आपण सर्वव्यापी आणि अभंग आहोत, आपलं स्वतःपासून विभाजन असंभव आहे. हे भ्रामक विभाजन संपवण्याचा मार्ग म्हणजे योगा ! एकदा आपणच सत्य आहोत हा उलगडा झाला, की आपल्याला स्वतःची इंद्रियांमार्फत होणारी, भ्रामक जाणीव संपते. उदा. देहाची जाणीव झाली की `आता वय झालं असं वाटणं' थांबतं ! __________________________ त्याबरोबर जाणीवेनं स्वतःचा सतत शोध घेणं थांबतं, कारण जाणीव आपल्या काह्यात आहे, आपण जाणीवेच्या काह्यात नाही. तस्मात, आपली आपल्याला जाणीव होऊ शकत नाही. आपण केवळ एक कायम स्थिती होऊन राहतो, आणि जाणीवेचा उपयोग व्यावहार्य कारणांसाठी करतो, जसा की मी हा प्रतिसाद लिहितो आहे. _____________________________ > देव ही सुद्धा अशीच 'निराधार' कल्पना असू शकते ना? आता बरोब्बर लिहिता-लिहिता पुन्हा चूकलात ! आपण निराधार आहोत ! आपल्याला कोणत्याही आधाराची गरज नाही. तस्मात, देव या आपणच केलेल्या निराधार कल्पनेचा, आपल्याला काहीही उपयोग नाही.

एस, या विधानाबद्दल तुमचं अभिनंदन :
तोवर माझे विशुद्ध नास्तिकत्व कायम राहील.
अभिनंदन अशासाठी की तुम्ही ज्याला 'विशुद्ध नास्तिकत्व' म्हणता त्याला वेदांतात स्वयंभू सत्य अशी संज्ञा आहे. स्वयंभू सत्याचा पुरावा मिळंत नसतो. म्हणूनंच तुम्हाला तुमच्या विशुद्ध नास्तिकत्वाचा कसलाही पुरावा मिळणार नाही किंवा देता येणार नाही. ते स्वयंभू सत्य आहे. जाणतेपणी अथवा अजाणतेपणी तुम्ही वेदांताचा प्रचार केला आहे. म्हणून तुमचं अभिनंदन. आ.न., -गा.पै. टीप : पूर्वी माऊलींनी रेड्यामुखी वेद वदवले होते. त्याच धर्तीवर मी नास्तिकमुखी वेदान्त वदविला. असा पराक्रम करणारा माऊलींनंतर मीच, म्हणून माझंही अभिनंदन. हा पराक्रम यापूर्वीही मी गाजवला आहे : https://www.aksharnama.com/client/article_detail/1703

प्रोफेसर विद्यासागरांसंबंधीत एक कथा वाचली होती ती आठवली. स्वातंत्र्यपूर्व काळ होता. प्रोफेसर रोज सकाळी स्टाफरुममध्ये आल्यावर स्वतःच्या केबिनमध्ये पाच-सहा मिनिटे ध्यानधारणा करुन ईश्वराचे स्मरण करत असत. आणि हे पाहुन रोज त्यांचे सहकारी त्यांची टर उडवत असत. ईश्वर नाहीच आहे त्यामुळे विद्यासागरांची रोजची पाच मिनिटे वायाच जात आहेत असे सहकार्यांचे चेष्टेयुक्त स्वरात म्हणणे होते. ही गोष्ट रोज न चुकता होत असे. विद्यासागर सस्मित मुद्रेने दुर्लक्ष करीत असत. पण एकदा अतीच झाल्यावर त्यांनी सहकार्यांना सुनावले. जर ईश्वर नसेलच तर रोज पाच असे धरुन काही वर्षांचा हिशोब करता अमुक अमुक तास जीवनातले ठार वाया गेले असे समजु. पण मी जर ध्यानधारणा केली नसती त्या पाच मिनिटात तरीही तुमच्या सोबत टिंगळटवाळी/धुम्रपान वगैरे करुन ती तशीही वायाच जाणार होती. त्यामुळे हा काही इतका मोठा तोटा नाही आहे. पण समजा जर ईश्वर आहेच तर माझी इतक्या वर्षांची गुंतवणुक नक्कीच कामाला येईल पण तुमचा तर पूर्ण जन्मच वाया गेला कि हो.. ह्या स्पष्टीकरणानंतर विद्यासागरांना त्यांच्या सहकार्यांनी पुन्हा कधी त्यांच्या ईश्वरभक्तीवरुन परत डिवचले नाही. हाच तर्क इथेही लागु होतो.

In reply to by कानडाऊ योगेशु

येत नाही. इथे देव ही निराधार मानवी कल्पना आहे याची चर्चा चालू आहे.

देव आहे ह्याचा अनुभव घेता येतो पण सिद्ध करता येत नाही म्हणून देव ही सध्या तरी मानवी कल्पना आहे असे काही व्यक्ती बोलू शकतात. पण ह्या वाक्यातील सध्या तरी हा शब्द महत्वाचा आहे . देव ठाम पने नाकारणे हे निरक्षर पणाचे लक्षण आहे. ज्या बाबतीत संपूर्ण ज्ञान नाही त्या बाबतीत ठाम पने बोलणे ह्याला अडाणीपणा असेच म्हणले पाहिजे. कारण ज्या गोष्टी का जगात मान्यता आहे आणि अजुन सुध्दा 80 ते 90 टक्के लोक देव आहे ह्या बाबत संशक नाहीत . ह्याचा अर्थ देव ही कल्पना नसून सत्य आहे. खोट्या कल्पना करून एवढ्या मोठ्या जन समूहाला मूर्ख बनवता येणार नाही. देव आहे हे सत्य आहे जोपर्यंत विश्वाचे गूढ पूर्ण पने उकलत नाही तो पर्यंत. आता आजच्या घडीला विश्व जावू ध्या मानवी शरीराचे पण गूढ पूर्णपणे उकलता आलेले नाही. पृथ्वी चा अंतर्भाग,समुद्रातील जीव सृष्टी पण माणसाला पूर्ण माहीत नाही . जो पर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तो पर्यंत देव ही कल्पना नसून सत्य आहे हेच त्रिवार सत्य आहे.

विंदा करंदीकर यांची एक बोधप्रद कविता.( बोधप्रद म्हणजे सर्वसामान्य माणसांना कळणारी. त्यात हा आत्मकथीत स्वयंषोशीत धागाकर्ता येत नाही. कारण त्याला काही कळेल,हीच शक्यता सम्प्लेली आहे!) त्याला इलाज नाही धिक्करिली तरीही सटवीस लाज नाही श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही लढवून बांधवांना संहार साधणारा गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही

In reply to by अत्रुप्त आत्मा

टाकलेली दिसते ! कारण ती तुमच्याच लेखाच्या विरोधात आहे : वाचा : देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले.... आणि तेच काम मीही करतोयं अर्थात, तुम्हाला आपण काय करतोयं तेच लक्षात येत नाही हे प्रतिसादही पुरेपूर दर्शवतात. _______________________________ पुन्हा वाचा : मनोरुगण म्हणजे नक्की काय याची ही तुम्हाला कल्पना नाही, आणि ते ही सहाजिकच आहे. ज्याचा ठावठिकाणा माहिती नाही आणि ज्याला आपली भाषा सुद्धा कळते की नाही याचा पत्ता नाही, अशा व्यक्तीला : जो खुळ्यासारखा (तेही दुसर्‍याच्या घरी जाऊन) हाका मारतो; आणि त्याही पुढे जाऊन, आपल्या हाकांमुळे, ठावठिकाणा माहिती नसलेली व्यक्ती `ऐकणार्‍यावर' खुष होईल इतका निर्बुद्ध विचार करु शकतो, तो खरा मनोरुग्ण