मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गाण्यास पावसाच्या...

सत्यजित... · · जे न देखे रवी...
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे थेंबास ओघळाया हलकेच गाल दे! नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे! होतील बघ सुरंगी लाजून गाल हे भेटीत पावसाच्या हाती मशाल दे! भिजल्या तनू-तनूवर येईल शिर्शीरी स्पर्शांतल्या सरींना ऐनेमहाल दे! शिणतीलही जराश्या गजर्‍यातल्या कळ्या तेंव्हा उश्यास माझ्या दुमडून शाल दे! —सत्यजित

वाचने 15947 वाचनखूण प्रतिक्रिया 18

गणेशा 01/06/2020 - 19:21
नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे! भिजल्या तनू-तनूवर येईल शिर्शीरी स्पर्शांतल्या सरींना ऐनेमहाल दे! वाह.. निव्वळ अप्रतिम

In reply to by चांदणे संदीप

पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा... ह्या सांज गारवा अल्बमधल्या गाण्याची चाल याही रचनेला फिट्ट बसतेय. मस्त वाटतेय गुणगुणायला. :) सं - दी - प