साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम"
या आधीचे लेखः
साकिया - पुर्वतयारी
साकिया (१) ...
==========================================================
मॅडम आय ऍम युअर ऍडम
या वेळच्या कॉकटेलचे नाव आहे "मॅडम आय ऍम युअर ऍडम" (Madam I am your Adam)
साहित्य:
- १ औंस ट्रिपल-सेक (Tripple Sec)
- २ औंस व्होडका
- १ औंस क्रॅनबेरीचा रस
- १ औंस ग्रेपफ्रुटचा रस
- १ स्ट्रॉबेरी
- १/२ औंस अननसाचा रस
- लिंबाची साल
- बर्फ
कृती:
शेकर मध्ये मध्ये ५-६ बर्फाचे खडे घ्या त्यात व्होडका, ट्रिपल-सेक, क्रॅनबेरीचा रस आणि ग्रेपफ्रुटचा रस टाका. शेकरचे झाकण घट्ट बंद करून १५-२० सेकंद हलवून घ्या. शेकरमध्ये तयार झालेले कॉकटेल गाळून ग्लासमध्ये ओता आणि बर्फ फेकून द्या. आता अननसाचा रस शेकरमध्ये घेऊन त्यात १-२ बर्फाचे खडे टाका आणि परत झाकण बंद करून १०-१५ सेकंद जोरात हलवा, अननसाच्या रसाला फेस येईल, तो अलगदपणे कॉकटेलवर सोडा. एक स्ट्रॉबेरीला खालून थोडी खाच पाडा आणि ग्लासच्या कडेला सजावटीसाठी लावा. लिंबाची साल लांबट कापून घ्या आणि ती देखील सजावटीसाठी स्ट्रॉच्या आधाराने स्ट्रॉबेरीमध्ये सजावटी साठी अडकवा.
तुमचे कॉकटेल तयार आहे (सजावटी सकट).
यात जर व्होडका आणि ट्रिपल-सेक नाही टाकले आणि त्या ऐवजी ३ औंस संत्र्याचा रस वापरला तर नॉन-अल्कोहोलिक कॉकटेल बनेल.
डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
धन्यवाद...
- नाटक्या
वाचने
17108
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
आ हा हा
In reply to आ हा हा by परिकथेतील राजकुमार
+१
ज ळ वा ग रि
वावा, झकास!
In reply to वावा, झकास! by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>१. वाईनची
In reply to वावा, झकास! by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे बघा..
In reply to वावा, झकास! by ३_१४ विक्षिप्त अदिती
उत्तरे...
In reply to उत्तरे... by सुनील
मुख्य फरक
In reply to उत्तरे... by सुनील
फिनलँडिया
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to फिनलँडिया by नंदन
येताय का?
आ हा हा !
साला
बाई मी तुमचा..
In reply to बाई मी तुमचा.. by चिरोटा
वा वा
अप्रतिम....
YAKDAM BHARIIIIIII
खुपच!!!
'Brandy'
In reply to 'Brandy' by रामदास
दर्भाचा कावळा
In reply to दर्भाचा कावळा by किट्टु
अवांतर
तिन्ही भाग
खल्लास
लिंबाच्या सालीचा सुरेख वेल
साकिया नाटक्या!
In reply to साकिया नाटक्या! by चतुरंग
शुभस्य शिघ्रम
In reply to साकिया नाटक्या! by चतुरंग
अरे बापरे!
झकास!
वाह... फारच
वा!
In reply to वा! by ऋषिकेश
एक औंस म्हणजे..
प्रेक्षणीय