या आधीचे लेखः
साकिया - पुर्वतयारी
साकिया (१) ..
साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम"
साकिया (३) - "टकिला सनराईज"
साकिया (४) - "स्ट्रॉबेरी डायक्युरी"
साकिया (५) - "चॉकलेट बनाना" (लहान मुलांसाठी खास)
साकिया (६) - स्पायसी मार्गारिटा
साकिया (७) - स्कूप युअर लक
===============================================================
सहजरावांच्या "
पाचक व मादक" बघीतल्या नंतर माझ्या असे लक्षात आले की काही प्रकारच्या मदिरा ज्या पुर्वी भारतात मिळत नव्हत्या त्या देखील आता मिळू लागल्या असाव्यात. या पास्तिस बद्द्ल
अशोक राणेंनी एक सुंदर लेख लिहीला आहे. पास्तिस हे माझे देखील अत्यंत आवडते पेय. म्हणूनच मी यावेळी पास्तिस (Pastis Pernod) पासून बनवलेले एक कॉकटेल तुम्हाला कसे बनवायचे ते सांगतो आहे.
या वेळच्या कॉकटेलचे नाव आहे "माय व्हॅलेंन्टाईन" (My Valentine)
साहित्य:
- २ औंस पास्तिस
- १ औंस कॉईनट्रो (
Cointreu)
- १ औंस क्रिम दी मेंथे (
Crème de menthe)
- १ औंस लिंबाचा रस
- ३ औंस अननसाचा रस
- सजावटी साठी अननसाचे पातळ त्रिकोणी काप आणि काही पाने, लिंबाचे पातळ काप, साखरेत घोळवलेली चेरी इ. इ. इ.
- बर्फ
कृती:
शेकर मध्ये बर्फाचे खडे घ्या. त्यात पास्तिस, कॉईनट्रो, लिंबाचा रस आणि क्रिम दी मेंथे घेऊन चांगले एक मिनीटभर शेक करा. तयार झालेले मिश्रण एका मोठ्या ग्लासमध्ये ओतून घ्या. त्यात अननसाचा रस अलगद सोडा. असा अलगद रस सोडायचा असेल तर एक चमचा घेऊन त्याच्या एका टोकावरून रस ओघळून ग्लासात आतल्या बाजूला अगदी चिकटून सोडा.
आता या मदिरेला सजवण्यासाठी एका टुथपिक वर साखरेत घोळवलेली चेरी, अननसाचे/लिंबाचे काप, अननसाचे पान लावा. जर एखाददुसरे फॅन्सी स्ट्रॉ असतील तर त्या ग्लासमध्ये ठेवा.
काही फोटो:
पाहीलंत माझी व्हॅलेंटाईन काय गोड दिसते आहे ते... अहो बघताय काय असे टक लावून? तुमची स्वतःची व्हॅलेंटाईन घ्या आणि मग लावा बरं का ओठांना..
डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
धन्यवाद...
- नाटक्या