साकिया (४) - "स्ट्रॉबेरी डायक्युरी"
या आधीचे लेखः
साकिया - पुर्वतयारी
साकिया (१) ...
साकिया (२) - "मॅडम आय ऍम युअर ऍडम"
साकिया (३) - "टकिला सनराईज"
==========================================================
स्ट्रॉबेरी डायक्युरी
या वेळच्या कॉकटेलचे नाव आहे "स्ट्रॉबेरी डायक्युरी" (Strawberry Diaquiri). पिडाकाकांनी केलेला कट्टा आणि तिथल्या स्ट्रॉबेरीज बघून मला आमच्या ४ एप्रिलला केलेल्या या कॉकटेलची पाककृती टाकण्याचा मोह आवरला नाही.
साहित्य:
- २ औंस व्हाईट रम
- ४-५ स्ट्रॉबेरीज
- १/२ औंस लिंबाचा रस
- १ चमचा साखर
- १/२ स्ट्रॉबेरी (सजावटी साठी)
- बर्फ
कृती:
मिक्सर मध्ये मध्ये ५-६ बर्फाचे खडे घ्या त्यात स्ट्रॉबेरिज, साखर, लिंबाचा रस आणि रम टाका. मिक्सर चालू करून सगळ्या स्ट्रॉबेरीज द्रावणात एकजीव होई पर्यंत ग्राईंड करा. तयार झालेले द्रावण २-३ बर्फाचे खडे असलेल्या ग्लासमध्ये ओता. एक स्ट्रॉबेरी कापून कडेला सजावटी साठी लावा. (मी एक छोटी छत्री पण सजावटी करता वापरली होती. भारतात मिळते का हे ठावूक नाही.)
तुमचे कॉकटेल तयार आहे (सजावटी सकट).
आणि हे कॉकटेल पिणारी मिपाकर मंडळी (डावीकडून एक, बेसनलाडू आणि बबलू)
डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
धन्यवाद...
- नाटक्या
वाचन
12648
प्रतिक्रिया
0