||चंद्रवेळ||
1 आकाशातून खिडकीत, खिडकीतून फोटोत उतरलेला चंद्र,
तुला WhatsApp वर पाठवला की मग कुठे माझी पौर्णिमा सुरू होते.
अन तुझा त्यावर reply आला की ती शारदीय होते.
2माहीत असतं, "छान, ओके किंवा तूच माझा चंद्र"
याहून दुसरा तुझा reply येणार नाही.
पण तरी मी खूष असते कारण मला कळतं
याहून अधिक तुला खरंच काही सुचणार नाही.
3 आठवतं? एका रात्री एअरपोर्टवरवरून तू मला कॉल केला होतास.
तू घरी पोचेपर्यंत आपण बोलत होतो. .
तेव्हा चंद्रसुद्धा खिडकीपाशी थांबून राहिला होता.
4 एकदा मोकळ्या आभाळाखाली समुद्रकिनारी
तुझ्या कुशीत चांदणी रात्र घालवायचीय.
खाली चमचमणारी वाळू, समोर चमचमता समुद्र
पांघरायला चांदणं... प्लीज? एकदाच?
5 कधी कधी वाटतं, आपल्या या नात्यात
मी तुला हट्टाने पकडून ठेवलंय, चांदण्यासारखं
जरा मूठ सैल केली की तू निघून जाशील.
मागं कसलीही खूण न ठेवता..
6न राहवून तुला काल खिडकीतल्या चंद्राचा फोटो पाठवला.
वाटलं, इतक्या दिवसांच्या अबोल्यानंतर तू काही तरी तर बोलशील..
आपल्यातलं अंतर मी केव्हाच स्विकारलेलं
खात्री होती की दुसऱ्या टोकाला तू नक्कीच असशील..
7 तुझा हात तर सोडून दिलाय, निग्रहाने,
मनाचा चकोर झालाय..
आपली चंद्रवेळ परतून येईल???
वाचने
7979
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
छान
खूपच सुरेख.
मस्त लिहीलीये!
कडक लिहिलं आहेस मायो! पहिली चार तर अगदी टोचणारी झालीयेत. काय लिहिते ही..!!
[अचंबित] राघव
छानच..
लिहीत रहा.. वाचत आहे...
धन्यवाद सगळ्यांंना! :)
एकेका कडव्याचा प्रवास हिवाळ्यातल्या दीर्घ रात्रीप्रमाणे मनात रेंगाळत राहतो हे ह्या कवितेचं (किंवा स्फुटाचं) बलस्थान आहे.
In reply to एकेका कडव्याचा प्रवास by एस
धन्यवाद.
एसभाऊ, ब-याच दिवसांनी ?
In reply to धन्यवाद. by प्राची अश्विनी
हो ना. कशा आहात तुम्ही? काही गद्यसुद्धा लिहाल का? भारी लिहिता हेवेसांनल.
काव्य हे यमक- प्रास यात नसून कल्पनेत असतं हे पुन्हा एकवार जाणवलं !
पांघरायला चांदणं...जबरा...या ओळी सुचायला बहुतेक प्रेमात पडायला हव
मी तुला हट्टाने पकडून ठेवलंय, चांदण्यासारखं
जरा मूठ सैल केला की तू निघून जाशील.
मागं कसलीही खूण न ठेवता..हे फारच आवडल...
In reply to लाजवाब by OBAMA80
:)
रच्याकने, ते "केली" हवं, शुध्दलेखनात चूक झाली आहे माझी.
छान