मानव प्रगल्भ अनसुय कधीच होणार नाही ?
"असुं"या च्या जिद्दीने
व्यवहार सिद्ध होतो
असूया घर करते
सुंदर सत्यास कडवट मानत
खुले विनाअट प्रेम पारखे होते
कल्पना आणि विचार करा..
एकपत्नी व्रताचे बंधन तोडून
राधेकडे पाहिल्या बद्दल ..
सीता रामाची
अग्नी परीक्षा घेते
रेणुका जमदग्नीचा
प्राण मागते
अहल्या गौतमास
पत्थर होण्याचा
शाप देते
एखादा टिम मेंबर
दुसर्या टिम मधून
प्रेमाने खेळता
पझेसिव्ह असुरक्षीत
खोलवर जखमा
ऐकलेत कधी?
ऑनर पनिशमेंट्स
ऑनर किलींग्स
असूयेने पछाडलेली
व्यवहार पूर्णत्वास नेऊनही
प्राकृतिक प्रेमाचा निषेध करणारी
अप्राकृतिक बंधने
अटळच असावित का ?
दुसरी कडे
असूयेशी तडजोड करणारा पाण्डू
असूया रहीत अनसुय अत्री
जोडीदाराच्या निवड स्वातंत्र्याचे प्राकृतिक प्रेमाचा
आदर करणारे प्रगल्भ अनसुय प्रेम करणारा मानव
हि समाजव्यवस्था कधीच देऊ शकणार नाही ?
मानव आणि त्याचा समाज
कधीच का प्रगल्भ होणार नाही ?
मानवी स्वभाव
कडव्या कडवट वृत्ती
बाजूस ठेऊन
कधीच
शिवासारखे सुंदर सत्य
विनाअट प्रेमाने
स्विकारणार नाही ?
(काव्य प्रेर्ना : अलिकडे दोन वेगवेगळ्या कवितांवर पटली नाही असा शेरा पाहण्यात आला १ २, मागच्या काही मिपा चर्चा सुद्धा )
कल्पनेची भरारी उत्तुंग आहे....
नमस्कार ,