✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एन डी पाटिल - महाराष्ट्रातील एक लोकनेते - मुलाखत

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Wed, 03/25/2009 - 19:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4368 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

मुलाखत

मुक्तसुनीत
Wed, 03/25/2009 - 19:34 नवीन
मुलाखत पूर्ण पाहिली. पाटलांसारख्यांचे हात आपण सर्वानी मजबूत करायला हवेत. आपण जी लढाई लढू शकत नाही ती ते लढत आहेत. त्यांचे काम फार महत्त्वाचे आहे.
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/25/2009 - 19:37 नवीन
फक्त त्रास होऊन, नैराश्य येऊन काहीच भरीव आणि ठोस होणार नाही. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+१

शक्तिमान
Wed, 03/25/2009 - 21:29 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

हेच म्हणते..

प्राजु
गुरुवार, 03/26/2009 - 07:52 नवीन
+२ - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शक्तिमान

त्यांच्या

अनामिका
Wed, 03/25/2009 - 22:20 नवीन
त्यांच्या बोलण्यात खूपच सच्चेपणा वाटला. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता, आपलं मत ते बेधडक मांडतात. आयुष्यभर स्वच्छ राहिलेला माणूसच हे करू शकतो. इतर राजकीय नेत्यांबद्दल त्यांनी मांडलेली मतं खरोखरच जहाल आहेत. देशातील सगळेच राजकारणी हे कोणाला ना कोणाला तरी विकले गेले आहेत हे स्वतः राजकारणात राहून स्पष्टपणे ठणकावून सांगणे हे सोपे नाही बिपिनदा !!!!!!! मुलाखत बघितली आणि लोप पावलेल्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्यात असे म्हंट्ले तर वावगे ठरणार नाही. "अनामिका"
  • Log in or register to post comments

प्रा.एन.डी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/25/2009 - 23:04 नवीन
प्रा.एन.डी.पाटलांची मुलाखत पाहिली, ऐकली. शेती, सहकार, शिक्षण या विषयावर सतत अभ्यासपूर्ण लेखन करणारे विचार मांडणारे म्हणून प्रा.पाटील यांची ओळख अनेकांना आहे. 'आजचे शिक्षण' नावाचा एक धडा दोन वर्षापूर्वी मराठीच्या अभ्यासक्रमात होता. 'शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी' या ग्रंथातून तो घेतलेला होता. त्यातील महत्वाचा जो विचार होता तो मला सांगण्याचा मोह आवरत नाही . बहुतांश समस्या या निरक्षरतेतून उद्भवलेल्या आहेत आणि गेली अनेक वर्ष आपण चुकीची धोरण स्वीकारल्यामुळे आपण शासनाचा शिक्षणाचा पैसा मूठभर लोकांच्या शिक्षणासाठी खर्च करत आहोत. शिक्षण ही मुठभरांची मक्तेदारी ठरता कामा नये,राजकर्ते हे शिक्षणाच्या बाबतीत दुतोंडीपणा करतात. प्राथमिक शिक्षणाच्या वाटणीचे पैसे इतरत्र खर्च केल्या जातात. खरे तर जो पैसा जनतेच्या प्राथमिक अग्रहक्काने खर्च करण्याची गरज आहे तो पैसा राज्यकर्ते इतर बाबींवर खर्च करत आहेत. प्रार्थमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याची गरज असतातांना त्यावरच्या खर्चाच्या टक्केवारीत घट होतांना दिसते, इतकेच नव्हे तर उच्च शिक्षणात धनदांडग्यांची मक्तेदारी सुरु झालेली आहे. एक दिवस शिक्षण सर्वसामान्य माणसाच्या हातून निसतून केवळ धनदांडग्याची मक्तेदारी होईल अशी अवस्था शिक्षणक्षेत्रात होणार आहे, असे ते म्हणतात. मुलाखतीतला राजपूत्र हॅम्लेटची गोष्ट त्याच धड्यातली आहे, आजतागायत सामान्य माणसाला दूर करुन आर्थिक व शैक्षणिक धोरण आखल्या जात आहेत. राजपूत्र हॅम्लेटला न घेता नाटकाचा प्रयोग चालला आहे असे ते म्हणतात. गरिबांना घेऊनच शिक्षणाचा प्रयोग झाला पाहिजे. शिक्षणाच्या वाढीसाठी खत हे झाडाच्या बुंध्याला घातले पाहिजे, शेंड्याला नव्हे.. हा विचार म्हणजे प्रार्थमिक शिक्षणाला महत्व दिले पाहिजे... प्रा.एन.डी.पाटील सामाजिक क्षेत्रात जागृती आनणारा माणूस आहे..इतकेच या मुलाखतीच्या निमित्ताने म्हणावे वाटते. बीपीन आपले आभार ! आपण एका चांगल्या माणसाची, बदलांचा आशावाद उभा करणार्‍या माणसाची या निमित्ताने आठवण करुन दिली. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुंदर...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/26/2009 - 01:39 नवीन
प्रा. डॉ. छानच माहिती दिलीत. एनडींचे विचार अर्थातच खरे आहेत. अवांतर: मला नेहमी असे वाटते, शिक्षण खाते हे दुय्यम खाते समजले जाणार्‍या राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा ठेवायच्या? (पण आजकाल शिक्षणखाते दुय्यम राहिले नसावे असे वाटते.) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तम प्रतिसाद.

मुक्तसुनीत
गुरुवार, 03/26/2009 - 01:41 नवीन
बिरुटे यांचा प्रतिसाद आवडला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास

नितिन थत्ते
गुरुवार, 03/26/2009 - 21:15 नवीन
बिरुटे सरांच्या मतांशी सहमत. सामान्य माणसाला बाजूला ठेवून आखलेल्या योजनांना विरोध करणार्‍यांना 'विकासाचे विरोधक', 'आडमुठे' आणि ते डावे असतील तर (पोथीनिष्ठ) वगैरे म्हणण्याची पद्धत आहे. सामान्यांसाठी काय चांगले ते ठरवण्याचा मक्ता पूर्वीच्या नियोजन मंडळ व मंत्री/ नोकरशहा वगैरेंकडे होता. सध्या तो मक्ता कॉर्पोरेट जगातल्या 'जाणते राजे' म्हणवल्या जाणार्‍या (नारायणमूर्ती वगैरे) उद्योजकांकडे हळुहळू हस्तांतरित होत आहे. दोन्ही काळात कायम 'देशा'चा विकास हा चर्चेचा विषय असतो. सामान्य माणसाच्या विकासाविषयी कोणालाच पडलेली नाही. सामान्य माणसाला कोणी विचारातही घेत नाही. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फारच छान माहिती

अडाणि
Fri, 03/27/2009 - 00:36 नवीन
खुप चांगली माहिती मिळाली. दुवा दिल्याबद्दल दुवा ! - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

थोडे वेगळे...

श्रावण मोडक
Fri, 03/27/2009 - 13:43 नवीन
जुनी घटना आहे ही. मी प्रत्यक्ष अनुभवलेली नाही. पण अनुभवणाऱ्यांकडून दोन तास चर्चा करीत ऐकलेली. पुलोदच्या काळातील ही घटना. बहुदा १९८० ची असावी. कोल्हापुरात बिंदु चौकात मुख्यमंत्र्यांची सभा होती. बहुदा शरद पवारांना यायला उशीर होता. ठरलेल्या वेळेच्या कितीतरी अधिक. त्या रात्री मुख्यमंत्री येईपर्यंत तीन तास एन. डी. पाटलांचे भाषण झाले. त्या भाषणातून त्यांनी अर्थसंकल्प म्हणजे काय हे असे सांगितले की, सभा जागच्या जागी होती. मध्यरात्र उलटून गेली तरीही. मुख्यमंत्री येत नाहीत, उशीर होतोय वगैरे कारणे शिल्लकच ठेवली नाहीत एन.डीं.नी. माझ्या या पत्रकार मित्रांच्या मते त्यांनाही त्या दिवशी अर्थसंकल्प म्हणजे काय हे प्रथमच चांगल्या पद्धतीने उमगले. ही एन.डीं.ची खासीयत. पवार कॉंग्रेसचे मुख्यमंत्री होते. एन.डीं.नी काही मुद्यावरून (बहुदा साखर कामगारांचा किंवा ऊस तोडणी कामगारांचा मुद्दा असावा) मुंबईत उपोषण केले. पावसाला सुरवात झाली तो काळ होता. पवारांनी तडजोड घडवून एन.डीं.चे उपोषण सोडवले. एन.डी. पावसात भिजले होते. गारवा होता. उपोषण सोडवले, आता एन.डीं.ना ऊब द्या, असे कोणीतरी पवारांना सुचवले. पवार म्हणाले, "ती तर आधीच दिली आहे त्यांना." संदर्भ पवारांची बहिण ही एन.डीं.ची पत्नी हाच होता. (काही तपशील कदाचित चुकतील. वय झाले, आठवणी पक्क्या नाहीत असे म्हणूया)
  • Log in or register to post comments

ऊब द्या

घोडीवाले वैद्य
Fri, 03/27/2009 - 18:04 नवीन
एन.डीं.ना ऊब द्या, असे कोणीतरी पवारांना सुचवले. पवार म्हणाले, "ती तर आधीच दिली आहे त्यांना." संदर्भ पवारांची बहिण ही एन.डीं.ची पत्नी हाच होता. हा संवाद झाल्यानंतर तिथे खसखस पिकली, हास्यकल्लोळ झाला, की गंभीर नीरव शांतता दाटली, याविषयी काही माहिती आहे का तुमच्याकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वेल...

श्रावण मोडक
Fri, 03/27/2009 - 18:42 नवीन
काय घडले असावे? तुमचा अंदाज?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घोडीवाले वैद्य

असेच विचारतो ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/27/2009 - 18:46 नवीन
काय घडले असावे? तुमचा अंदाज? घोडीवाल्या वैद्यांना असेच विचारतो ! (काही तरी जबरदस्त माहितीच्या प्रतिक्षेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

बघा...

घोडीवाले वैद्य
Sat, 03/28/2009 - 13:11 नवीन
नाही पण काय घडले असेल हो.. बघा ना काही माहिती मिळ्तेय का, बघा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

माझं

भोचक
Sat, 03/28/2009 - 16:22 नवीन
माझं शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतच झालं. त्यावेळी एन. डी. पाटील व दि. बा. पाटील ही जोडगोळी संस्थेत चर्चेत असायची. त्यातल्या दिबांनी शेकाप सोडून शिवसेनेची कास धरली. एनडी मात्र अजूनही तत्वाला चिकटून लढाई एकटेपणाने लढताहेत. रयतशी तर त्यांचे नाते अजूनही तितकेच जिव्हाळ्याचे आहे. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा